Monday, December 22, 2025
Home Blog Page 5836

सोलापूरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीला आता रोबोट; रेल्वे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा तुटवडा

सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत शहरातील 19 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन शिफ्टमध्ये या रूग्णांवर दररोज उपचार सुरू असून त्यासाठी अवघे नऊ डॉक्टर त्याठिकाणी आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अद्यापही डॉक्टर उपलब्ध झालेले नाहीत. रुग्णांना पाणी, फळे, औषध देण्यासाठी व रुग्णांचा डॉक्टरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद घडवून आणण्यासाठी रेल्वे हॉस्पिटलमध्ये आता रोबोट पाहायला मिळणार आहे.

सोलापुरात आतापर्यंत कोरोनाबाधित 135 रूग्ण आढळले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह अन्य डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे त्यातील‌ 22 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना आरओचे गरम पाणी, अंडी, दूध, चिक्कू, द्राक्ष केळी, सफरचंद देण्याबरोबरच रुग्णांची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांमधील दुवा म्हणून रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापूर रेल्वे विभागातील तील यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा रोबोट बनविला असून उद्यापासून तो सेवेत दाखल होईल, असा विश्वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला. सोलापुरात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक खाजगी हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहेत. तत्पूर्वी, सर्वोपचार रुग्णालय व रेल्वे हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेल्वे हॉस्पिटलला आणखी पाच डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना आणखी चांगली सेवा देता येईल, असेही डॉ. कांबळे म्हणाले.

कोरोनाचे वैश्विक संकट देशातून हद्दपार करण्यासाठी रस्त्यांवर तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांनाही या कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांचा वारंवार संपर्क येतो. तर दुसरीकडे डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांचा तुटवडाही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व त्यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करण्यासाठी रोबोट पाहायला मिळणार आहे. या रोबोटमध्ये व्हिडिओ कॅमेरा बसविण्यात आला असून मोबाईलद्वारे त्याला दिलेल्या सूचनांचे पालन तो तंतोतंत करतो की नाही, याची माहिती डॉक्टरांना सहज उपलब्ध होणार आहे. तो रोबोट रुग्णांचा डॉक्टरांशी व्हिडीओ संवादही करून देण्यास मदत करणार आहे. या नव्या प्रयोगामुळे कोरोनाच्या संसर्गापासून डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची निश्चितपणे सुटका होईल, असा विश्वास डॉ. आनंद कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

जीएफएक्स –
– रेल्वे हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत 19 कोरोनाबाधित रुग्ण
– तीन शिफ्टमध्ये सुरू आहेत रुग्णांवर उपचार; नऊ डॉक्टर करत आहेत रात्रंदिवस सेवा
– श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील पाच डॉक्टर मिळावेत; रेल्वे हॉस्पिटलची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
– कोरोनाबाधित रुग्णांशी वारंवार संपर्क येऊ नये आणि डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून रेल्वेच्या यांत्रिक विभागाने तयार केला रोबोट
– रुग्णांना पाणी, औषध देण्यासाठी व रुग्णांचा डॉक्टरांशी संवाद करून देण्यात रोबोट करणार मदत
– रेल्वे हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत 19 कोरोनाबाधित रुग्ण
– तीन शिफ्टमध्ये सुरू आहेत रुग्णांवर उपचार; नऊ डॉक्टर करत आहेत रात्रंदिवस सेवा
– श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील पाच डॉक्टर मिळावेत; रेल्वे हॉस्पिटलची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
– कोरोनाबाधित रुग्णांशी वारंवार संपर्क येऊ नये आणि डॉक्टरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून रेल्वेच्या यांत्रिक विभागाने तयार केला रोबोट
– रुग्णांना पाणी, औषध देण्यासाठी व रुग्णांचा डॉक्टरांशी संवाद करून देण्यात रोबोट करणार मदत

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/673328746800522/

काश्मिरच्या ३ फोटोग्राफरना पुलित्झर अवाॅर्ड; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मिरातील कलम 370 काढून टाकल्यानंतर फीचर फोटोग्राफीसाठी असोसिएट प्रेसच्या तीन फोटोग्राफरना २०२० च्या पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर लॉकडाऊन आणि कर्फ्यू दरम्यान सर्व प्रकारच्या संभाषणाच्या सुविधा बंद केल्या गेल्या होत्या तेव्हा या तिघांनीही फोटोग्राफी केली.दार यासीन, मुख्तार खान आणि चन्नी आनंद अशी त्यांची नावे आहेत.काश्मीरची कहाणी जगासमोर दाखविणे फार कठीण असताना,या तिघांनीही आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी केली.

या तिन्ही छायाचित्रकारांनी विरोध प्रदर्शन, पोलिस आणि निमलष्करी कारवाई आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करून घेतले आणि हे फोटो एजन्सीच्या दिल्ली कार्यालयात पाठविले.विमानतळावर दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मेमरी कार्ड घेऊन जाण्यास समजवावे लागले.या सर्व गोष्टींनी आम्हाला अधिक दृढ बनवले असे ते म्हणाले. यासीन आणि खान काश्मीरमधील सर्वात मोठे शहर असलेल्या श्रीनगर येथील आहेत तर आनंद हे शेजारच्या जम्मू जिल्ह्यातील आहेत.

In Pics | Three AP photojournalists from J&K win Pulitzer Prize ...

पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद झाला
एक पुलित्झर फीचर फोटोग्राफी पुरस्कार हा पत्रकारितेतला एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे.आनंद म्हणाले, “ते एक्दम स्तब्धच झाले आणि त्यांना विश्वासही नव्हता की त्यांनी एपीबरोबर २० वर्षे काम केल्यावर हा पुरस्कार मिळाला.त्यांना त्यांचा आनंदही व्यक्त करता आला नाही. दार यासीन म्हणाले की ही फक्त त्या लोकांची कहाणी आहे. मी ज्या चित्रीकरणाची शूटिंग करत होतो ती माझी कथा नव्हती. मला पुरस्काराची घोषणा पहायला सांगण्यात आले, काय म्हणावे ते मला समजत नाही, हा पुरस्कार माझ्यासाठी एक मोठा सन्मानच आहे.”

Kashmiri Photographers Among List of Pulitzer Prize 2020 Winners ...

एपीचे अध्यक्ष गॅरी प्रित म्हणाले की, “या टीममुळे काश्मीरमधील एक दीर्घकाळ चाललेला संघर्ष पाहायला मिळाला. त्यांचे काम आश्चर्यकारक होते.” एपींनी ही परंपरा कायम ठेवली. यापूर्वीही, एपी फोटोग्राफर डीएयू नलिओ चेरी आणि रेबेका ब्लॅकवेल हे हैती येथील पोलिस आणि सरकारविरोधी निदर्शक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकींचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी पुरस्कारासाठी हे लोक पुलित्झरचे फायनलिस्ट होते.या पुरस्काराने केवळ सन्मानच दिला नाही तर लोकांमध्ये उत्साह व उत्कटता देखील जागृत केली आहे तसेच सत्य हे जगासमोर ठेवण्याचे काम केले आहे.

Reuters, The Associated Press win Pulitzers for photography | CBC

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना व्हायरसबाबत WHO ने केली भयावह भविष्यवाणी! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लस बनविण्याचा दावा कधी अमेरिकेने तर इस्राईलने केला आहे. चीननेही असा दावा केला आहे की आपली लस बाजारात सर्वप्रथम येईल.एक माहिती अशीही आहे की भारत पहिल्यांदा बाजारात कोरोना विषाणूची लस बाजारात आणणार आहे.या सर्व बातम्यांच्या आणि अनुमानांच्या दरम्यान डब्ल्यूएचओने सर्वांनाच हैराण केले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञाची भविष्यवाणी वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या विचारांना चिडवू शकते. डब्ल्यूएचओ तज्ज्ञ डॉ. डेव्हिड नाबोरो यांनी म्हटले आहे की कोरोना व्हायरसची लस कधीच येऊ नये अशी शक्यता असू शकते. डॉ. डेव्हिड नाबोरो यांनी अशी भीती व्यक्त केली कारण अनेक वर्षांच्या संशोधनानंतरही एचआयव्ही आणि डेंग्यूवरची लस उपलब्ध झालेली नाही आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डॉ. डेव्हिड नाबोरो म्हणाले, ‘इथे असे काही विषाणू आहेत ज्यांवर अजूनही लस उपलब्ध झालेली नाही आहे.जरी ही लस आली तरी तीला सुरक्षितता व कार्यक्षमतेच्या अनेक चाचण्यांमधून जावे लागेल. तसेच ती या सर्व मानकांवर आधारित आहे का हे ही आपल्याला समजू शकणार नाही. ‘ हे लक्षात घेण्यासारखे आहे की डब्ल्यूएचओ चीफ देखील कोरोना विषाणूबद्दल भयंकर भविष्यवाणी करीत आहे आणि आता तज्ञांच्या या भीतीने लोकांमध्ये चिंता वाढवली आहे.

एका इंग्रजी टीव्ही वाहिनीच्या म्हणण्यानुसार नाबोरो म्हणाले, “सर्वात वाईट परिस्थिती अशी असू शकते की जिथे लस कधीच येऊ शकत नाही.” ते म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत आणि नंतर शेवट येत आहेत,कारण शेवटच्या अडचणीआधी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरलेले दिसत आहेत. लक्षात ठेवा, गेल्या चार दशकांत एचआयव्हीमुळे सुमारे ३२ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु अजूनही जगाला त्याची लस सापडलेली नाही. डेंग्यूची लागण दरवर्षी सुमारे चार लाख लोकांना होते, परंतु अद्यापही त्यांना डेंग्यूवरची यशस्वी लस मिळू शकलेली नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुण्यात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा कोरोनामुळं मृत्यू; प्रशासन संपर्कात आलेल्यांच्या शोधात

पुणे । येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांसह येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झोप उडाली असून संबंधित युवकाने किती जणांना दारू विक्री केली याची माहिती मिळणे अवघड झालं आहे. दरम्यान, या युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला युवक रात्रभर गावठी व विदेशी दारू, ताडी विक्री करीत होता. त्याला काही दिवसापूर्वी कोराेनाचा संसर्ग झाल्याचे निष्पण झाले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र येरवडा पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र संबंधित युवकाला कोणामुळे कोरोना झाला? त्यानंतर त्याचा किती जणांनी संपर्क आला हे सांगणे कठीण असल्यामुळे तो राहत असलेल्या वस्तीतील रहिवासी भयग्रस्त झाले आहेत.

‘‘डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात युवकाची आरोग्य तपासणी केली होती. त्याला कोरोना संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल केले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला.’’ अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भुकेने व्याकुळ झालेला सिंह शिरला चक्क शाळेत; पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु आहे.अशा परिस्थितीत लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान, वन्य प्राण्यांच्या शहरात दाखल होण्याच्या घटनाही देशातील विविध रस्त्यावर दिसून आलेल्या आहेत.असाच एक व्हिडिओ आता गुजरात मधून समोर आला आहे.ज्यामध्ये एक भुकेलेला सिंह अन्नाच्या शोधात एका प्राथमिक शाळेत प्रवेश करताना दिसला.त्याने शाळेत प्रवेश केल्यावर एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

गुजरातचे आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत ही घटना गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील उना गावची असल्याची माहिती दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शाळेशेजारी असलेल्या पाळीव प्राण्यांच्या घेरात अन्नाचा शोध घेण्यासाठी सिंह आला होता. पण शेताच्या मालकाने त्याला पाहटाच आरडाओरडा केला.यानंतर सिंह पळून गेला आणि शेजारी असलेल्या शाळेत आसरा घेतला.

सिंहाचा शाळेत प्रवेश झाल्याची माहिती कळताच ग्रामस्थही एकत्र झाले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि सिंहाला पकडण्यासाठी मोहीम राबविली. सिंह पळून जाऊ नये म्हणून संघाने सर्व जाण्याचे मार्ग बंद केले.एकीकडे त्यांनी सिंहाला पकडण्यासाठी मोठा पिंजरा ठेवला पण सिंह त्यातूनही सुटला. यानंतर या पथकाने त्याला बेशुद्ध केले आणि त्याला पिंजऱ्यात ठेवले. यानंतर त्याला जसधर अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथून त्याला जंगलात सोडण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जोडप्याने शेयर केला ‘असा’ फोटो कि न्यायालयाने ठोठावली तब्बल १६ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणमधील सोशल मीडिया एनफ्लूएंसर आणि जिमचा मालक अहमद मोईन शिराझी याला पत्नी शबनम शाह रोखीसह १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय ७४ चाबूक मारण्याचीही शिक्षा झाली आहे. या संदर्भात शिराजी यांनी अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की आम्हां दोघ जोडीदारांवर सरकारविरूद्ध अपप्रचार करण्यासह सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करणार
मात्र, पती आणि पत्नी हे दोघेही सध्या आपल्या दोन मुलांसमवेत तुर्की येथे राहत आहेत.२०१९ मध्येच या दोघांनी इराण सोडलेले आहे.शिराजी यांना ९ वर्षांची शिक्षा तर त्याच्या पत्नीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांना ७४ चाबकांच्या फटक्याची शिक्षासुद्धा सुनावण्यात आली आहे.मात्र , सध्या हे जोडपे इराणमध्ये नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीतच ही शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेबद्दल त्यांना आपल्या वकिलांकडून माहिती मिळाली. त्याचबरोबर कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात आपण अपील करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तथापि, इराणच्या कोर्टाला त्यांना दोषी ठरवायचे आहे, असे शिराजी यांचे म्हणणे आहे. यामुळेच त्याने इराण सोडण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, शिराजीच्या इन्स्टाग्रामवर दीड दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो माजी किक बॉक्सिंग चॅम्पियन आहे. असं म्हटलं जात आहे की शिराजीवर तासनतास या प्रकरणाची चौकशी केली जात होती आणि सोशल मिडीयावर हिजाबची छायाचित्रे पोस्ट करू नका असंही त्यांच्या पत्नीला सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे, शबनम शाह रोखी तिच्या व्यायामाशिवाय आपल्या मुलांची, नवऱ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत असते

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विप्रो पुण्यात उभारणार विशेष कोविड रुग्णालय

पुणे । जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने 450 खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र सरकारसमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे.आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करणार आहे. कोरोनाविरुद्ध लढतांना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल.

450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात 12 खाटा उपलब्ध असतील. हे कोविड 19 साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात 24 उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.

विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड 19 विरुद्ध लढताना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत 1125 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोनाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल. विप्रोने मुंबई, पुणे, औरंगाबाद वाळूज, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दारुची दुकाने सुरु झाल्यानिमित्त ठेवली पार्टी अन् मित्राचा चाकू घुपसून केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये कोविड -१९मुळे लॉकडाउन सुरु करण्यात आला होता. यावेळी लावण्यात आलेल्या निर्बंधांवरील शिथिलतेमुळे दारूची विक्री सुरू झाल्यानंतर दारूमुले झालेल्या भांडणात दोन जण ठार झालेत.तर दुसर्‍या एका घटनेत एक महिला आरोग्य कर्मचारी आणि तिचा नवरा हे या हल्ल्यात जखमी झालले आहेत. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

दारूची दुकाने उघडल्याच्या आनंदात पार्टी दिली
पहिल्या घटनेत, सुमारे तीस वर्षांच्या मित्राला मद्यविक्री सुरू झाल्याच्या निमित्ताने सोमवारी झालेल्या पार्टीत आपल्याच मित्राने चाकूने वार करून त्याला ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आता आरोपी फरार आहे. दुसरी हत्या लाइफ इन्शुरन्स नगर येथे घडली. मद्यधुंद अवस्थेत एका युवकाला त्याच्या मित्राने मारहाण केली.पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमवारी रात्री या दोन्ही घटना मद्यपान करत असताना घडल्या.फरार आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे.

एका मद्यधुंद व्यक्तीने महिला आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
तिसरी घटना ही चिकबल्लापूर जिल्ह्यातील सिद्दलाघाटा येथे घडली जिथे एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला झाला.आरोग्य कर्मचारी रावणम्मा आपल्या पतीसमवेत कोविड -१९ संबंधित सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील एका खेड्यात गेले होते.तेथे एका मद्यधुंद व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला.

एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,आरोपीने या दांपत्याशी वैयक्तिक वैर असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला केला.पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.बंगळूर आणि कर्नाटकच्या इतर भागातही दारूची दुकाने उघडली गेली आणि मोठ्या संख्येने लोक मद्य खरेदीसाठी बाहेर आले.

सोमवारपासून दारूची दुकाने सुरू आहेत
विशेष म्हणजे सोमवारी देशातील बर्‍याच भागात दारूची दुकाने सुमारे ४० दिवसानंतर पुन्हा उघडली आणि तिकडे लोकांची प्रचंड झूबंड दिसून आली. तथापि, काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंग राखण्याच्या नियमांचे पालन न केल्यामुळे दुकाने पुन्हा बंद ठेवण्यात आली.

गृह मंत्रालयाने लॉकडाउनच कालावधी हा सोमवारपासून आणखी दोन आठवडे वाढविला आहे,तसेच ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये दारू आणि तंबाखूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊनमुळे तब्बल १२ कोटी लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाउनचा जसा जागितक अर्थव्यस्थेवर परिणाम झाला आहे तसा भारतावर सुद्धा झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या आतापर्यंतच्या दीर्घकालीन लॉकडाउनने देशातील १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले आहे. गेल्या महिनाभरात देशात १२ कोटी २० लाख बेरोजगार झाल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.

१२ कोटी २० लाख लोक बेरोजगार होणं हा गेल्या काही वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांकी स्तर आहे. यात मजुरी करणारे आणि दैनंदीन कमाई करणाऱ्या कामगारांना लॉकडाउनची मोठी झळ बसली असल्याचे ‘CMIE’ ने म्हटलं आहे. नोकरी गमावणारे वाढले आहेत. तसेच नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे, असे CMIEच्या अभ्यासातून दिसून आले आहे. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण ३६.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

बेरोजगारी वाढल्याने विरोधकांना आयत कोलीत मिळाल असून केंद्र सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. दरम्यान, असंघटीत क्षेत्रापाठोपाठ आता कॉर्पोरेट आणि स्टार्टअप , छोटे मोठे उद्योग यांनीही नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात बेरोजगारी आणखी वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. लघु आणि मध्यम उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, वाहन क्षेत्र, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील कंपन्यांना मंदीचा जबर फटका बसला आहे.

रोजंदारीवर पोट भरणाऱ्या या लोकांचे हाताचे उत्पन्न गेले
छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे, हमाल अशा दैनंदिन कमाई करणाऱ्या कोट्यवधी श्रमिकांची रोजीरोटी लॉकडाउनमुळे बुडाली असे CMIE ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

परदेशी अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना एअर इंडिया करणार ‘एअरलिफ्ट’

नवी दिल्ली । भारत सरकारनं कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एक योजना आखली आहे. याद्वारे ७ मे ते १३ मे दरम्यान 64 उड्डाणं आखत ही योजना अमलात आणली जाणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणांचं संचालन एअर इंडिया आणि त्यांची सहाय्यक एअर इंडिया एक्सप्रेस करणार आहे. जे प्रवासी भारतात परततील त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. परदेशांत असणाऱ्या ज्या नागरिकांमध्ये करोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळणार नाहीतत, अशांना भारतात आणण्यात येईल, अशी घोषणा गृह मंत्रालयानं केली आहे.

या रेस्क्यू ऑपरेशनची सुरुवात संयुक्त अरब अमीरात(UAE) पासून होणार आहे. प्रदेशात अडकलेल्या भारतीयांनी देशात परत येण्यासाठी नोंदणी केली आहे. भारतातून पहिल्या टप्प्यात फिलिपिन्स, सिंगापूर, बांग्लादेश, यूएई, यूके, सौदी अरेबिया, कतार, अमेरिका, कुवेत, बहारीन, ओमानला फ्लाईट्स जातील. त्या-त्या देशातील दूतावासांमध्ये परराष्ट्र अधिकाऱ्यांनी भारतात परत जाऊ इच्छिणाऱ्यांची यादी करायला सुरुवात केलेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन सेवेचा वापर केला जात आहे. परदेशातून येऊ इच्छिणाऱ्यांना विमान प्रवासाचा खर्च आणि संस्थात्मक क्वारंटाईनचा खर्च स्वत:ला उचलावा लागणार आहे. गरोदर महिला, वृद्ध लोक, मेडिकल इमर्जन्सी असलेले लोक यांना परत आणण्यासाठी प्राधान्य असणार आहे.

पहिल्या दिवशी 10 फ्लाईट्सच्या मदतीनं 2300 लोकांना भारतात आणलं जाईल. दुसऱ्या दिवशी 2050 लोक चेन्नई, कोच्ची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीसह इतर 9 शहरात पोहोचतील. तिसऱ्या दिवशी 2050 लोक मुंबई, कोच्ची, लखनौ, दिल्लीसह इतर शहरात येतील, हे लोक मध्य आशिया, युरोप आणि अमेरिकेतून येणार आहेत. चौथ्या दिवशी 1850 लोकांना परत आणलं जाईल. ते अमेरिका, इंग्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीसह 8 देशांमधून त्यांची सोडवणूक केली जाईल. परत येण्याआधी या सगळ्यांना आरोग्याची स्थिती सांगणारा फॉर्म भरावा लागेल. ज्याची एक कॉपी अरायव्हल काऊंटरवर इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल. ज्यात प्रवाशाला खोकला, ताप, कफ, मधुमेह किंवा इतर आजार असल्यास त्याची माहिती द्यावी लागेल.

लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. एकूण 64 फ्लाईटपैकी 10 फ्लाईट यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलीपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये धावणार आहेत. विमानात बसण्याआधी या सर्वांचं स्क्रीनिंग होणार आहे. तसंच ज्यांना कोविडची कुठलीही लक्षणं नाहीत अशाच लोकांना भारतात आणलं जाणार आहे.भारतात आणल्यानंतर पुन्हा त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवलं जाईल. त्याचा खर्च प्रवाशांना द्यावा लागेल.

भारतात परत आल्यानंतर या सगळ्या प्रवाशांना आरोग्य सेतू अपवर आपलं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे. 1990 मध्ये झालेल्या गल्फ युद्धानंतरचं हे त्यासारखाच हे रेस्क्यू ऑपरेशन असणार आहे. त्यावेळी 1 लाख 70 हजार जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. 2015 मध्येही युद्धभूमी झालेल्या येमेनमधूनही ‘ऑपरेशन राहत’ च्या नावानं भारतीयांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”