Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5860

लॉकडाउनमुळे ऋषी कपूर यांच्या अंत्यविधीला फक्त २० जण

मुंबई । सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, लॉकडाउनच्या नियमांचं पालन करून ऋषी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रिपोर्टनुसार, ऋषी यांचं शव इस्पितळातून थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. ऋषी कपूर यांच्यावर मरिन लाइन येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

स्मशानभूमीच्या आत आणि बाहेरील परिसरात मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. याकाळात सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. नियमांनुसार त्यांच्या अंतयात्रेला फक्त २० जण उपस्थित राहू शकतात.ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातही लोकांना या कायदे- नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. साधारणपणे दुपारी २ वाजल्यानंतर अंतिम संस्कारांची प्रकिया सुरू करण्यात येईल. याच स्मशानभूमीत शम्मी कपूर यांचेही अंत्यसंस्कार झाले होते. दरम्यान, काल अभिनेता इरफान खानच्या अंतविधाला सुद्धा फक्त २० जणांनाच उपस्थितीत राहण्याची परवानगी मुबई पोलिसांकडून दिली गेली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औरंगाबाद मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १५० पार, सकाळी १४ आणि आता आणखी ७ जण पॉजिटीव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील ऐकूण कोरोनाबाधितांची संख्या १५० पार गेली असून आज सकाळी १४ आणू आता ७ नवीन रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याचे समजत आहे. मागील तीन दिवसात औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन पटीने वाढली असल्याने आता चिंता वाढली आहे.

शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या मध्ये समतानगर, भावसिंगपुरा, नूर कॉलोनी, असेंफिया कॉलोनी, आरेफ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलोनी, पोलिसांनी सील केलेल्या या भागात नवीन रुग्ण भेटत असल्याने हे यातील काही भाग हे हॉट स्पॉट बनत चालली आहेत .त्यामुळे या भागाला पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच औरंगाबादेत सर्वाधिक कोरोना चाचण्या घेण्यात आलेनेच शहरात मागील तीन दिवसांपासून रुग्णांच्यात वाढ होत असल्याचे मत मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी व्यक्त केले आहे.

‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं! राज ठाकरेंनी ऋषी कपूर यांना वाहिली पत्रातून आदरांजली

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ऋषी कपूर हे ट्विटरवर खूप सक्रिय होते. त्यांच्या ट्वीटची नेहमी चर्चा व्हायची. अनेकदा त्यांनी केलेल्या बिनधास्त आणि निडर ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले. मात्र, आपलं निखळ मत ट्विटरवर मांडणं त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या ट्वीटबाबत प्रकर्षाने उल्लेख केला आहे. एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं! असं राज ठाकरे यांनी ट्विट करताना एक पत्र शेअर केलं आहे.

राज यांनी शेअर केलेलं हेच ते पत्र..

Image

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६० हजार पार!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाशी सामना या दिवसात भारतासह संपूर्ण जग करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोना पॉझिटिव्हची रुग्णांची संख्या ही ३३ हजारांच्या पुढे गेली आहे.तसेच त्यामुळे आतापर्यंत १०७४ लोक मरण पावले आहेत.

त्याच वेळी, जगभरात कोरोनाव्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३२ लाखांवर गेली आहे.तसेच २ लाख २८ हजारांहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनाव्हायरस आणि लॉकडाउनशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्याबरोबर रहा.
Coronavirus Live Updates:

अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा ६० हजारांच्या पुढे गेला आहे.जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने याबाबत माहिती दिली.जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सिस्टम विज्ञान व अभियांत्रिकी केंद्राने (सीएसएसई) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोविड -१९ चे संसर्ग झाल्याची संख्या बुधवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६०,२०७ होती.

वृत्तसंस्था शिन्हुआने सीएसएसईच्या हवाल्याने म्हटले आहे की,देशात आतापर्यंत एकूण १० लाख ३० हजार ४८७ लोकांमध्ये कोविड -१९ संसर्गाची पुष्टी झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात सर्वाधिक २ लाख ९९ हजार ६९१ संसर्गाची प्रकरणे तर २३ हजार ३८४ मृत्यू झाले आहेत.याच क्रमानुसार, न्यू जर्सीमध्ये ६ हजार ७७१ मृत्यू, मिशिगनमध्ये ३ हजार ६७३ मृत्यू आणि मेसाचुसेट्मध्ये ३ हजार १५३ मृत्यू यांमुळे अमेरिकेमध्ये सर्वाधिक प्रभावित राज्ये झाली आहेत.

 

तसेच भारतातही कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्हची २२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे, राज्यात बळी पडलेल्यांची संख्या ५५७ पर्यंत वाढली आणि आतापर्यंत येथे २१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमध्ये कोरोना पॉझिटिव्हची ८६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर राज्यात बळी पडलेल्यांची संख्या २५२४ वर गेली आहे.आतापर्यंतयेथे ५७ लोक मरण पावले आहेत.

 

बिहारमध्ये ही संख्या सातत्याने वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या गुरुवारी सकाळपर्यंतच्या अहवालानुसार ३९३ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६५ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर दोन जण येथे मरण पावले आहेत.राजधानी दिल्लीत कोरोना-संक्रमित लोकांची संख्या ३४०० झाली आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत ३४३९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले असून त्यापैकी १०९२ लोकांना घरी सोडण्यात आले आहे तसेच दिल्लीत ५६ लोकांचा मृत्यूही झाला आहे.

गुजरातमध्ये संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली असून येथे ४०८२ लोक या विषाणूमुळे पीडित आहे तर ५२७ जणांना येथे घरी सोडण्यात आले आहे तसेच गुरुवारी सकाळी पर्यंत १९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना इन्फेक्शनच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वल आहे. गुरुवारी सकाळी पर्यंत ९९१५ लोक व्हायरसने ग्रस्त असल्याची नोंद झाली आहे, तर १५९३ लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे तसेच येथे ४३२ मृत्यूची नोंदही झालेली आहे.

राजस्थानातही कोरोनामुळे त्रस्त झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथे ही आकडेवारी २४००ने पार केली आहे. आतापर्यंत २४३८ लोक या विषाणूमुळे पीडित असल्याची नोंद झाली आहे तर ७६८ रूग्णालयातून सोडण्यात आले आहे तसेच येथे ५१ लोक मरण पावले आहेत.कर्नाटकात ५५५ संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर २१६ लोकांना घरी सोडण्यात आले आहे आणि २१ लोक मरण पावले आहेत.केरळमध्येही हा आकडा ४९५ वर पोहोचला आहे तर ३६९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तसेच येथे चार लोक मरण पावले आहेत.आंध्र प्रदेशात कोरोना पॉझिटिव्हची एकूण ७१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत त्यामुळे राज्यात बळी पडलेल्यांची संख्या ही १४०३ पर्यंत वाढली असून आतापर्यंत ३१ लोकांचा मृत्यू झालेला आहे.

गेल्या १२ तासांत महाराष्ट्रातील पुणे येथे कोरोना पॉझिटिव्हचे १२७ नवीन रुग्ण आढळले आहेत.यामुळे जिल्ह्यात एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या ही १७२२ पर्यंत वाढली आहे.

हरियाणाच्या झज्जरमध्ये १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.यापैकी ९ लोक हे भाजी विक्रेते आहेत आणि एक नर्स आहे. झज्जरमध्ये आता एकूण १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.

गेल्या २४ तासांत भारतात १७३५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि ६७ लोक मरण पावले आहेत. अशाप्रकारे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या हि ३३०५० पर्यंत वाढली आहे. तसेच आतापर्यंत १०७४ लोक मरण पावले आहेत.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना हॉटस्पॉटची संख्या १०० करण्यात आली असून बुधवारी शहरात कोरोनाव्हायरसचे १२५ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीत कोरोनाचे एकूण रुग्ण वाढून ३४३९ झाले आहेत.दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत ५६ लोकांचा मृत्यू झालेला आहे. यातील दोन रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला.दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचे १०९२ रुग्ण बरे झाले आहेत.यातील १४ रुग्णांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.आता शहरात एकूण २२९१ कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

बिहारमधील अहवालात कोरोना विषाणूची लागण झालेल्या ३७ लोकांची पुष्टी झाली असून यामुळे राज्यात संक्रमित लोकांची संख्या ४०३ झाली आहे.राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार म्हणाले की, बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या ३७ लोकांना कोविड १९ चा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.यामुळे राज्यात कोरोनाची संख्या ४०३ झाली आहे.ते म्हणाले की, ज्यांमध्ये सकारात्मक रुग्ण आढळले त्यांच्यात पटनाचे ३, रोहतासचे ३, बक्सरचे १४, बेगूसराय व भोजपूरचे २-२, दरभंगाचे ४, पश्चिम चंपारणमधील ५ आणि औरंगाबाद, वैशाली, मधेपुरा आणि सीतामढीतील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

हॅलो, उद्धव बात कर रहा हूँ! ‘त्या’ एका कॉलनंतर बिहारचा आमदार भारावला; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई । लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणेच अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाहीमोठया संख्येत समावेश आहे. लॉकडाऊनमुळे काम ठप्प पडल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अडकून पडलेल्या बिहारचे काही मजूर अन्नाविना दिवस काढत असल्याचं कळातच तेथील स्थानिक आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवर त्यांनी या सर्व मजुरांची परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकत मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यांच्यामधील संभाषणाची २ मिनिटं २० सेकंदाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या नम्रतेचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या आमदाराला मजुरांच्या मदतीचे फक्त आश्वासन दिलं नाही तर ते पूर्णही केल. आमदार सरोज यादव यांनी उल्लेख केलेल्या मजुरांपर्यंत शिवसेना शाखेतील लोक आले होते. त्यांनी आम्हाला अन्न पुरवलं असू आता आमची काही तक्रार नसल्याचं या मजुरांनी सांगितलं आहे. सरोज यादव यांनी या चर्चेसंबंधी बोलताना ८ ते ९ दिवसांपूर्वी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याचं सांगितलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही प्रोटोकॉल मोडून कोणतीही पूर्वसूचना नसताना एका आमदाराशी चर्चा केल्याबद्दल आभारी आहे. आज जिथे आमच्या राज्यातील मुख्यमंत्री वारंवार विनंती करुनही बोलण्यास नकार देत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र आमच्याशी चर्चा केली,” अशी भावना सरोज यादव यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरोज यादव यांच्यातील संभाषणाची हीच ती क्लिप..

https://www.facebook.com/388247148018023/videos/265488024641555/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? तर मग आज मलाई कोफ्ता करी ट्राय करा

malai kopta Maharashtrian food recipes
malai kopta Maharashtrian food recipes

Hello Recipe | जिभेला तृप्त करून सोडणारी कोणती भाजी असेल तर ती म्हणजे मलाई कोफ्ता करी. या भाजीचा संबंध जास्त दुधाशी येतो म्हणून याला मलाई कोफ्ता असे नाव देण्यात आले असावे. चला तर बघूया कशी बनवायची मलाई कोफ्ता करी.

मलाई कोफ्ता करीसाठी लागणारे साहित्य
१.पनीर -५० ग्रॅम
२.उकडलेले मोठे बटाटे – ५ नग
३.पाव वाटी कॉर्नफ्लॉवर ग्रेव्ही
४.हिरव्या मिरच्या
५.बेदाणे – १०ग्रॅम
६.चीजचा क्यूब
७.दोन कांदे
८.एक वाटी भाजलेले शेंगदाणे
९.दुधाची साय एक वाटी
१०.आले लसूण पेस्ट
११.२५ग्रॅम बदाम
१२.लवंग ६,वेलदोडे ४,दालचिनीचा तुकडा,जायफळ पूड चुमुटभर,मिरपूड,मीठ,हळद.
१२.फोडणीला तूप

कृती –

उकडलेल्या बटाट्याची साल काढून एका भांड्यात ते चुरून घ्यावेत. त्यात चीज आणि पनीर खिसून टाकावे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. कॉर्नफ्लॉवर घालून ते मिश्रण चांगले मळावे. त्याचे गोलाकार गोळे करावे त्यात बदाम घालून तेलात तळावे. लवंग ६, वेलदोडे ४, दालचिनीचा तुकडा, जायफळ पूड चुमुटभर, मिरपूड यांचा मिक्सरमध्ये बारीक मसाला करून घ्यावा. तापलेल्या तुपावर बारीक केलेला मसाला घालावा. आले लसूण पेस्ट, दुधाची साय दही घालून मंद आचेवर सर्व परतून घ्यावे. शेवटी तळलेले कोफ्ते टाकून चवी नुसार मीठ टाकावे. मंद आचेवर भाजी शिजवून पानात वाढावी.

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.

मेडिकल, डेंटल कॉलेज प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा सक्तीची- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने बुधवारी नीट परीक्षेसंदर्भात 29 एप्रिल (बुधवारी) पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मोठा निर्णय दिला आहे. देशभरातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा सक्तीची असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, एमबीबीएस, एमडी यांसारख्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे. तसेच यामुळे अनुदानित किंवा विनाअनुदानित अल्पसंख्याक संस्थांच्या घटनात्मक अधिकारामध्ये हस्तक्षेप होणार नाही.

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की, ‘नीट परिक्षेमार्फत मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे. तो कोणत्याही विद्यालयात प्रवेशादरम्यान होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने नीट संदर्भातील एक याचिका फेटाळून लावली असून त्यामध्ये नीट परीक्षा खाजगी संस्थांच्या व्यापार आणि व्यवसायाशी निगडीत संविधानिक अधिकारांमध्ये दखल देते असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

देशातील मेडिकल आणि डेंटल महाविद्यालयांमधील सर्व प्रवेशांसाठी नीट ही एकच परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयं चालवणाऱ्या देशभरातील अल्पसंख्याक संस्थांनी 2012 आणि 2013मध्ये विविध हायकोर्टामध्ये जवळपास 100 याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व याचिका आपल्याकडे वर्ग करून घेऊन सुप्रीम कोर्टाने त्यासंदर्भात सुनावणी केली.

गेल्या सुनावणीत राखून ठेवलेला निर्णय न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या खंडपीठाने बुधवारी करण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान जाहीर केला. दरम्यान, नीट परिक्षेसंदर्भातील याच याचिकांपैकी एक असलेल्या वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2013 मध्ये ‘नीट’ परीक्षा घटनाबाह्य ठरवून रद्द केली होती. मात्र, त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने केलेली फेरविचार याचिका मंजूर करून तो निकाल रद्द करण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

3 मे नंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलं आहे. ग्रीन झोन क्षेत्रातील जिल्ह्यात 3 मे नंतर सूट देण्याबाबत हालचालींना आता वेग आला आहे.

ग्रीन झोन क्षेत्रात दुकानं, व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्रीन झोन परिसरात दुकानं सुरू करण्याबाबत राज्य सरकर अनुकूल आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मेनंतर देशातील लॉकडाइन बाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोशल डिसस्टसिंग नियम पाळून व्यवहार सुरू करता येतील तशी सरकारची भूमिका आहे. फार दिवस सगळे बंद करता येणार नाही. लोकांच्या समस्यांचा विचार करून ग्रीन झोनमध्ये थोडी शिथिलता आणण्याचा विचार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

मागील सोमवारी 27 एप्रिल रोजी लॉकडाउन आणि पुढील उपयायोजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही राजधानी मुंबई आणि पुण्यात आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात जर लॉकडाउन वाढवायचा असेल तर तो मुंबई आणि पुण्यात कायम राहण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील इतर जिल्हे जे रेड झोनमध्ये आहे, त्यांचाही समावेश लॉकडाउन 3 मध्ये असणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाउन हा आणखी दोन आठवड्यांसाठी असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरावर जास्त भर असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे झोन राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे. त्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इरफान-ऋषी कपूर यांचा ‘हा’ फोटो होत आहे प्रचंड व्हायराल, जाणून घ्या फोटो मागची गोष्ट

मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असतानाच सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा एक फोटोही सध्या चर्चेत आहे.

२०१३ मध्ये दोघांनी डी- डे या सिनेमात एकत्र काम केलं होतं. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर या सिनेमातील त्यांच्या एकत्रित सीनपैकी एका सीनचा फोटो त्या दोघांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरने ट्विटरवर दोघांचा या सिनेमातील एक सीनचा फोटो शेअर करून लिहिले की, ‘फार मोठं नुकसान.. फार लवकर गेलात.’

‘डी- डे’ आणि ऋषी-इरफान 
२०१३ मध्ये ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपासून प्रेरित भूमिका निभावली होती. तर इरफान खान चित्रपटात रॉ एजंट होते. या चित्रपटात अर्जून रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हसनदेखील प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील ऋषी कपूर यांचा ‘ट्रिगर खिंच मामला मत खिंच’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. शेजारी शत्रू देश भारतातातील मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉनला आपल्या देशात आश्रय देतो. तेव्हा त्याला भारतात परत आणण्यासाठी रॉ आपल्या शत्रू देशात असणाऱ्या गुप्तहेरांना एक जोखमीची मोहीम सोपविते. या मोहिमेत ते कसे यशस्वी होतात आणि या मोहिमेत कुठल्या संकटातून त्यांना जावं लागत असा प्रवास ‘डी-डे’ चित्रपटात दाखवला आहे. दरम्यान, या चित्रपट ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका फार उत्तमरित्या साकारली होती. तर इरफानच्या अदाकारीने हा चित्रपट कायम लक्षात राहणार ठरला होता. या चित्रपटातील इरफान आणि ऋषी कपूर यांच्यातील सीनपैकी एका सीनचा फोटो या दोघांच्या आठवणीत नेटकरी सध्या प्रचंड शेअर करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शाहरुख खानने ‘या’ सुपरहिट चित्रपटात ऋषी कपूरचा स्वेटर घालून केले होते काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले.महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीटद्वारे याची माहिती दिली.नंतर कपूर कुटुंबातील सदस्यांनीही या अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली.आरोग्यविषयक समस्येमुळे त्रस्त झाल्यानंतर ६७ वर्षीय ऋषींना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत.ते रोमँटिक नायक म्हणून ओळखले जात असे. शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाशी त्यांचा एक असा खास संबंध आहे,ज्याची आता चर्चा होते आहे.

आदित्य चोप्राच्या या चित्रपटाच्या वेषभूषेसाठी मदत केल्याचे करण जोहरने आपल्या बायोपिक एन सूटेबल बॉयमध्ये सांगितले आहे.या चित्रपटात त्याला शाहरुख खानसाठी वेगवेगळे कपडे हवे होते पण बजेट पाहता त्यांना महागडे कपडे परवडणार नव्हते.अशा परिस्थितीत,करणने मुंबईतील स्टुडिओमध्ये जुन्या कपड्यांना शोधायला सुरुवात केली,जिथे त्याला एक लाल-पांढरा स्वेटर सापडला.हा तोच स्वेटर होता जो ऋषी कपूरने ब्लॉकबस्टर फिल्म ‘चांदनी’ मध्ये घातला होता.

Deepa Bhatia on Twitter: "'Rang Bhare Badal Se Tere Naino Ke Kajal ...

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील शाहरुख खानने ‘ना जाने मेरे दिल को क्या ..’ या गाण्याच्या शूटच्या वेळी हा स्वेटर घातला होता.या गाण्याच्या शेवटी त्याने तोच स्वेटर घातलेला आपल्याला दिसून येतो.गाण्यामध्ये याच स्वेटरमध्ये त्याची कल्पना करताना काजोलने त्याला निरोप दिला होता. शाहरुखचा हा लूक नंतर फॅशन आयकॉन बनला आणि लोकांनाही तो खूप आवडला.ऋषी कपूर यांनी आपल्या चित्रपटात अनेकदा स्वेटर घातलेले दिसून आले आहेत,जे लोकांना खूपच आवडले.त्यावेळी त्याने आपल्या लूकमुळे सर्वांना वेड लावले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.