3 मे नंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलं आहे. ग्रीन झोन क्षेत्रातील जिल्ह्यात 3 मे नंतर सूट देण्याबाबत हालचालींना आता वेग आला आहे.

ग्रीन झोन क्षेत्रात दुकानं, व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्रीन झोन परिसरात दुकानं सुरू करण्याबाबत राज्य सरकर अनुकूल आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मेनंतर देशातील लॉकडाइन बाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोशल डिसस्टसिंग नियम पाळून व्यवहार सुरू करता येतील तशी सरकारची भूमिका आहे. फार दिवस सगळे बंद करता येणार नाही. लोकांच्या समस्यांचा विचार करून ग्रीन झोनमध्ये थोडी शिथिलता आणण्याचा विचार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

मागील सोमवारी 27 एप्रिल रोजी लॉकडाउन आणि पुढील उपयायोजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही राजधानी मुंबई आणि पुण्यात आढळून आली आहे. त्यामुळे राज्यात जर लॉकडाउन वाढवायचा असेल तर तो मुंबई आणि पुण्यात कायम राहण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील इतर जिल्हे जे रेड झोनमध्ये आहे, त्यांचाही समावेश लॉकडाउन 3 मध्ये असणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाउन हा आणखी दोन आठवड्यांसाठी असण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे शहरावर जास्त भर असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे झोन राज्यामध्ये तयार करण्यात आले आहे. त्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment