हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोल्हापूरमधील विशाळगड (Vishalgad) परिसरात झालेल्या अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी काही अज्ञातांनी विशाळगड येथील अतिक्रमणांविरोधात परिसरात तोडफोड केली होती. यामुळे तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणीच पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काहींना अटकही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेत रविवारी ‘चलो विशाळगडचा नारा’ दिला होता. रविवारी त्यांच्यासह अनेक शिवभक्त विशाळगडावर गेले होते. याच दरम्यान काही अज्ञातांनी येऊन गावांमध्ये धुडगूस घातला. तसेच स्थानिकांवर हल्लाही केला. एवढेच करून न थांबता घरांची, वाहनांची तोडफोड केली. यात अज्ञातांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत अनेक गावकरी जखमी झाले. ज्यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला.
या सर्व घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनेकांना ताब्यात घेतले. तसेच, अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर संभाजींनराजेंनी आज शाहूवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसोबत चर्चा केली. पुढे घडलेल्या प्रकारानंतर संभाजींनराजेंनी x वर पोस्ट करत म्हणले की, “काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा.”
काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2024
Post Office Recruitment 2024 | जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एका विशेष भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांना केंद्र सरकारची नोकरी लागणार आहे. तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीचा अर्ज करा.
या भरती अंतर्गत तुम्हाला भारतीय डाक विभागात ( Post Office Recruitment 2024) नोकरी करण्याची संधी आहे. तुम्ही केवळ दहावी पास असाल तरी देखील तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येईल. या भरती अंतर्गत तब्बल 44 हजार 228 रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा ही भरती विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये ही भरती प्रक्रिया चालू आहे. आता या भरतीची माहिती आपण जाणून घेऊया.
शैक्षणिक पात्रता | Post Office Recruitment 2024
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे.
एकूण रिक्त जागा
या भरती अंतर्गत 44 हजार 228 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
5 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.
वयोमर्यादा | Post Office Recruitment 2024
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 दरम्यान असते गरजेचे आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय… आपल्या भारतात सोने खरेदीला मोठं महत्व आहे. त्यामुळे अनेक शुभ मुहूर्ती ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत असतात. मात्र सोन्याचा भाव हा प्रत्येक शहरात वेगवेगळा पाहायला मिळतो. सोन्या-चांदीच्या दरात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या करांचा आणि धोरणांचा फरक पडतो. परंतु आता संपूर्ण देशात आपल्याला सोन्याचा एकच भाव दिसू शकतो. जेम अँड ज्वेलरी कौन्सिल वन नेशन, वन रेट पॉलिसी (One Nation One Gold Rate Policy) लागू करण्यास तयार आहे.
यासाठी जेम अँड ज्वेलरी कौन्सिल (GJC) ने देशभरातील आघाडीच्या ज्वेलर्सचे मत घेतले आहे. यावेळी संपूर्ण देशात सोन्याची एकच किंमत लागू करण्यावर सर्वांचे एकमत झालं आहे. सप्टेंबरच्या बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी उद्योग सक्रियपणे चर्चा करत आहे.
‘वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी म्हणजे काय? One Nation One Gold Rate Policy
वन नेशन वन गोल्ड रेट धोरण (One Nation One Gold Rate Policy) ही भारत सरकारने प्रस्तावित केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश हाच आहे कि देशभरातील सोन्याच्या किमती एकसमान व्हाव्यात. याचाच अर्थ, देशाच्या कोणत्याही शहरात तुम्ही गेलात तरी सोन्याची किंमत एक एकसारखीच राहील. ‘वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी या योजनेंतर्गत सरकार राष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करणार आहे. हे एक्सचेंज सोन्याची किंमत ठरवेल आणि ज्वेलर्सना ते याच किमतीत विकावे लागेल. उदाहरणार्थ, शेअर बाजारात, एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत संपूर्ण देशात सारखीच असते आणि तीच किंमत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड केली जाते. सध्या MCX वर सोने आणि चांदीची खरेदी-विक्री होते. मात्र आता सराफा बाजारासाठीही एक्सचेंज निर्माण केले जाणार आहे. किमतीतील तफावत बंद झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. समान किंमतीमुळे मनमानी दर आकारण्यास वाव राहणार नाही.त्यामुळे सोन्याच्या व्यवहारात पारदर्शकता येईल.
Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात कोणतेही व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण अनेकवेळा पाळीव प्राण्यांचे किंवा जंगली प्राण्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहतो लोक या प्राण्यांसोबत मस्ती करताना खेळताना वगैरे दिसतात. परंतु तुम्ही कधी कोणत्याही व्यक्तीला वाघ, सिंह, बिबट्या यांच्यासोबत फोटो काढताना पाहिलाय का? कदाचित नसेल पाहिले. परंतु सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क चित्त्यासोबत फोटो काढताना दिसत आहे.
वाघ, सिंह म्हटलं की, अनेकांना खूप भीती वाटते. परंतु या तरुणाने असे काही धाडस केलेले आहे. जे पाहून सगळेच अवाक झालेले आहेत. या तरुणाने जंगलात बसून चित्यासोबत फोटो काढलेला आहे. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, एक तरुण त्यांच्या मित्रांसोबत जंगलात फिरायला जात असताना, त्यांना मध्ये चित्ता दिसतो. यावेळी त्या मित्रांच्या ग्रुपमधील एक तरुण चित्त्याच्याबाजूला येतो आणि फोटो काढतो. पण यावेळी फोटो काढताना त्याला अक्षरशः घाम फुटलेला आहे. एका फोटोसाठी तो तरुण हिम्मत करून त्याच्या बाजूला बसतो आणि पाठीवर हात फिरवतो. मग फोटो काढतो. यावेळी चित्ता त्या तरुणाकडे पाहतो. परंतु तो त्याला काहीच करत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला (Viral Video) आत्तापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज झालेले आहे. त्याचप्रमाणे 50000 पेक्षा जास्त लाईक देखील आलेले आहे. अनेक युजर्स या व्हिडिओवर कमेंट देखील केले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ,बाळा चित्ता आहे तो तुला पळून पण देणार नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेले आहे, “अरे तू किती घाबरला आहेस हे दिसते तुझ्या तोंडावरून” तर तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “एका फोटोसाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास” अशाप्रकारे अनेक लोक या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
Cryogenic Freezing | पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा मृत्यू हा निश्चित असतो आणि हे एक त्रिकाल बाधित सत्य आहे. याबाबत कोणीही काही करू शकत नाही. पण मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्याची इच्छा, अमेरिकेतील काहीव्यक्तींनी पूर्ण केली आहे आहे, हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटावे. अरब पती यासाठी खूप पैसे खर्च करत आहे. या यादीत अब्जाधीश आणि PayPal CO Peter Thelche यांचा समावेश आहे.
पुनरुज्जीवन करण्याच्या इच्छेने काही श्रीमंत लोक ‘क्रायोजेनिक फ्रीझिंग’कडे वळले आहेत. हे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे असा दावा केला जात आहे की अत्यंत कमी तापमानात मृतदेह गोठवून ते भविष्यात पुन्हा जिवंत केले जाऊ शकतात. पण हे खरंच शक्य आहे का हा मोठा प्रश्न आहे. भविष्यातील तंत्रज्ञान खरोखरच इतके प्रगत असेल का की ते मृत शरीराला जिवंत करू शकतील?
ही सेवा ‘अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशन’ नावाच्या क्रायोनिक्स कंपनीने दिली आहे. सध्या त्याचे 1400 सदस्य आहेत आणि आतापर्यंत 230 मृतदेह अत्यंत कमी तापमानात गोठवले गेले आहेत. या प्रक्रियेची किंमत $2,00,000 (म्हणजे अंदाजे रु. 1.7 कोटी) आहे. ‘क्रायोजेनिक फ्रीझिंग’ हा भविष्यातील चमत्कार असेल की अयशस्वी विज्ञान प्रयोग असेल हे सांगणे फार लवकर आहे, ही एक वादग्रस्त प्रक्रिया आहे. त्याच्या नैतिक आणि वैज्ञानिक पैलूंवर वादविवाद चालू आहे.
क्रायोजेनिक फ्रीझिंगला क्रायोनिक्स देखील म्हणतात. ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मृत शरीर अत्यंत कमी तापमानात म्हणजेच -196 अंश सेल्सिअसमध्ये स्टोर केले जाते. भविष्यात वैद्यकीय शास्त्रात पुरेशी प्रगती झाल्यावर त्यांचे पुनरुज्जीवन करता येईल, हा त्याचा उद्देश आहे. या प्रक्रियेत, बर्फाचे स्फटिक तयार होण्यापासून रोखण्यासाठी मृत शरीर द्रव नायट्रोजनमध्ये बुडवले जातात.
बहुतेक लोक याला फक्त फसवणूक मानतात. परंतु काही श्रीमंत लोक भविष्यात हजारो वर्षे जिवंत राहतील या आशेने आपल्या प्रियजनांचे मृतदेह जतन करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. पीटर थिएल यांनी अलीकडेच एका पॉडकास्ट दरम्यान या तंत्रज्ञानाबद्दल त्यांचे विचार सांगितले आहेत.
Most Expensive Expressway : सध्या देशभरात अनेक नवनवीन रस्ते तयार होत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? देशातील सर्वात जुना एक्सप्रेसवे कोणता ? हा मार्ग बनवण्यासाठी त्या काळी किती खर्च आला असावा ? दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील सर्वात जुना आणि महागडा एक्सप्रेसवे आपल्या महाराष्ट्रातून जातो. चला तर मग जाणून घेऊया या एक्सप्रेसवे बाबतच्या काही इंटरेस्टिंग (Most Expensive Expressway ) फॅक्टस …
देशातील पहिला 6 लेन रस्ता
आम्ही बोलत आहोत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबद्दल. हा देशातील सर्वात जुना आणि पहिला एक्सप्रेस वे मानला जातो. 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हा मार्ग बांधला होता. हा रस्ता राज्यातील (Most Expensive Expressway ) दोन मुख्य शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्याला जोडतो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा देशातील पहिला 6 लेन रस्ता देखील आहे.
16.3 हजार कोटी रुपये खर्च
देशातील हा पहिला एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी सुमारे 16.3 हजार कोटी रुपये खर्च आला होता. त्याची लांबी फक्त 94.5 किलोमीटर आहे. हा रस्ता नवी मुंबईतील कळंबोली भागातून सुरू होऊन पुण्यातील (Most Expensive Expressway ) किवळे येथे संपतो. हा मार्ग NHAI ने बांधला नसून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधला आहे. याच्या द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला 3-लेन काँक्रिट सर्व्हिस लेनही बांधण्यात आल्या आहेत.
प्रवासाचा वेळ झाला कमी (Most Expensive Expressway )
हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्याने मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ ३ तासांवरून केवळ १ तासावर आला आहे.या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील दैनंदिन प्रवाशांची संख्याही वाढली आहे. सह्याद्री पर्वतरांगां पार करत जाणाऱ्या या एक्स्प्रेस वेचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. या मार्गावर बोगदे आणि अंडरपास बांधण्यात आले आहेत. एक्स्प्रेस वेचा वेग ताशी 100 किलोमीटर आहे.
किती आकाराला जातो टोल ?
मुंबई-पुणे हा देशातील सर्वात महागडा एक्स्प्रेस वे आहे. येथे एका कारसाठी ३३६ रुपये टोल भरावा लागतो. या दृष्टीकोनातून पाहिले तर या एक्स्प्रेस वेवर प्रति किलोमीटर टोल 3.40 रुपये आहे. देशातील इतर द्रुतगती मार्गांचे सरासरी टोल भाडे पाहिल्यास ते सुमारे 2.40 रुपये प्रति किलोमीटर आहे. या संदर्भात येथे प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक (Most Expensive Expressway ) किलोमीटरसाठी 1 रुपये जास्तीचा मोजावा लागतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका (Assembly Election) पार पडल्या. या निवडणुकीत 12 उमेदवारांपैकी शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीवेळी काँग्रेसची (Congress) मते फुटली. या फुटीर आमदारांच्याविरोधातच आता काँग्रेस कठोर पाऊल उचलणार आहे. विधान परिषदेच्या मतदानावर ज्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले अशा आमदारांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे.
सूत्रांकडून माहिती आली आहे की, विधान परिषदेच्या निवडणूकीत जे आमदार फुटले त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते. आता याच आमदारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी फुटलेल्या आमदारांची नावे दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान, यंदाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 11 जागांसाठी राजकीय पक्षांचे 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. या 12 उमेदवारांमध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. तसेच ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. परंतु शेकापचे जयंत पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच या निवडणुकीमध्ये काही मते देखील फुटली. सांगितले जात आहे की, निवडणुकीवेळी काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांनी भाजप आणि अजित पवार गटाला मते दिली. अन्यथा या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या.
Vande Bharat Express : देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातही काही अशा ट्रेन्स आहेत ज्या भारतीयांच्या मोठ्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. म्हणूनच या ट्रेनची मागणी देशभरातून होत आहे. महाराष्ट्रातूनही ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला मोठी मागणी आहे. आता महाराष्ट्रातल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. नक्की कोणत्या मार्गावर या गाड्या धावणार आहे चला जाणून घेऊया…
वंदे भारत स्लीपर ट्रेन
महाराष्ट्राच्या बाबतील बोलायचे झाल्यास सध्या ८ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. आता त्यामध्ये आणखी दोन वंदे भारत ट्रेन्सची भर पडणार आहे. एवढेच नाही तर नव्या मिळणाऱ्या वंदे भारत ट्रेन्सपैकी एक ही ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन असू शकते. ही गाडी मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे.
कोल्हापूरला मिळणार वंदे भारत ?
कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी मागणी मागच्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कोल्हापुरात प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे आश्वासन दिले होते. यानंतर तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर लोकसभा निवडणुकीनंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे अशी माहिती दिली होती.
खासदार मुन्ना महाडिक यांनी सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे लवकरच या मार्गावर नवीन वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन मीन तीन विधानसभा मतदारसंघ असणारा वाशिम जिल्हा (Washim Assembly Election 2024) मात्र राजकारणासाठी बराच गुंतागुंतीचा आहे…भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार असणाऱ्या या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला बरीच उलथा पालथ पाहायला मिळणार आहे… शिवसेनेतील फूट, लोकसभेचा निकाल, बंजारा – दलित आणि मराठा समाजाची मत यामुळे भाजपच्या मतदार संघांना हादरे बसणार का? रिसोड, कारंजा आणि वाशिम या तीन मतदारसंघाचा संभाव्य निकाल कसा असेल? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग…
पहिला मतदारसंघ येतो तो रिसोडचा…आधी गोवर्धना, नंतर मेडशी आणि 2019 च्या पुनर्रचनेनंतर रिसोड असं नव नाव देण्यात आलेला हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला… त्यातही झनक कुटुंब अगदी राजेशाही थाटाप्रमाणे रिसोडमध्ये राजकीय वर्चस्व गाजवतात… रामराव झनक, सुभाष झनक पाठोपाठ विद्यमान आमदार अमित झनक अशा तिसऱ्या पिढीचा मतदारसंघात वावर आहे…झनक कुटुंबाची या मतदारसंघावर पकड इतकी घट्ट आहे की अगदी मोदी लाट असतानाही काँग्रेसचे इतर बुरुज ढासळले असले तरी रिसोडची आमदारकी मात्र अमित झनक यांच्या रूपाने कायम राहिली… राजकारणात विलन असल्याशिवाय मजा येत नाही… पण रिसोडमध्ये मात्र अगदी फिल्मी स्टाईल सारखं विरोधकही आहे… आणि राजकीय मीठ मसाला ही… काँग्रेसची माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक कुटुंबाचा राजकारणात छत्तीसचा आकडा… त्यांनी पक्षात बंडाळी करून झनक कुटुंबाला आव्हान देण्याचा अनेकदा प्रयत्नही केला… पण तो प्रत्येक वेळेस फोल ठरला… त्यामुळे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी देशमुखांनी अखेर भाजपची वाट धरली… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही महाविकास आघाडीकडून अमित झनक यांचंच नाव कन्फर्म असलं तरी भाजपकडून इच्छुकांची भाऊ गर्दी आहे… आता त्यात देशमुखांचे सुपुत्र नकुल देशमुख यांच्याही नावाची भर पडलीये…
त्यामुळे आत्तापर्यंत काँग्रेसच्या बाजूने वन साईड जाणारी रिसोडची निवडणूक मात्र यंदा घासून होईल अशी चिन्हं आहेत. रिसोड मतदारसंघातील दोन तालुक्यातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. याचा फायदाही भाजपला होण्याची शक्यता आहे. रिसोड मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय…झनक कुटुंबाकडे इतकी वर्ष आमदारकी असतानाही मतदार संघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे… त्यामुळे हे सगळे मुद्दे काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत मायनस मध्ये घेऊन जाणारे आहेत… तर दुसऱ्या बाजूला मतदारसंघात मराठा समाजाचे 55 टक्के, मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रत्येकी 11 टक्के मतदान आहे. या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावर निवडणूक झाली आहे. मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदानही 16 टक्क्यांवर आहे… थोडक्यात काय तर रिसोडमध्ये सोशल इंजीनियरिंग हा निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरतो… मुस्लिम, मराठा आणि दलित समाजाची विरोधात जाणारी मतं रिसोडमध्ये भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात… अंदाज बांधायचा झाला, तर यंदाही काँग्रेसचंच पारडं जड असलं तरी भाजप यावेळेस जोरदार टक्कर देऊ शकते…
दुसरा मतदारसंघ वाशिम विधानसभा… वाशिम विधानसभा मतदारसंघात यंदा झालेल्या निवडणूकीत शिवसेनेकडून प्रखर विरोध होऊनही भाजपाच्या लखन मलिक यांनी विजयाची ‘हॅटट्रीक’ करण्यासोबतच तब्बल चौथ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला…1990 पर्यंत कॉंग्रेसकडे असलेल्या या गडाला खऱ्या अर्थाने सुरुंग लागला तो 1990 मध्ये. राजकारणाचा लवलेश नसताना भाजपकडून लखन मलिक यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आणि कॉंग्रेसचे आमदार भीमराव कांबळे यांचा 3907 मतांनी पराभव झाला. यानंतर भाजपने सलग तीन वेळा वाशिम विधानसभामतदार संघावर आपला झेंडा कायम ठेवला. या मतदारसंघावर भाजपची पकड 1990 पासून 2004 कायम होती. इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळाल्याने विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवारांकडे सातत्याने पहिलं जायचं. मात्र दहा वर्ष राजकारणापासून अलिप्त असलेले लखन मलिक 2004 च्या निवडणुकीत सक्रीय झाले. भाजप पुन्हा उमेदवारीची संधी देईल, या आशेने त्यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरु केलं आणि भाजपकडे उमेदवारी मागितली. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत नवखा चेहरा मोतीराम तुपसांडे यांना उमेदवारी दिली. याच गोष्टीचा राग मनात ठेवून मलिक यांनी भाजपाशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मलिक यांचं अपक्ष निवडणूक लढवणं हे भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात जाण्याचं कारण ठरलं…
भाजपने 2004 मध्ये केलेली चूक 2009 मध्ये लखन मलिक यांच्यावरच विश्वास ठेवत भरून काढली.. मलिक पर्यायाने भाजप निवडून आली… आणि पक्षापेक्षा उमेदवार मोठा ही वेळ वाशिम विधानसभेवर आली… सलग तीन टर्म मलिक या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतायत… विद्यमान आमदारही हेच मलिक आहेत, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… भाजप विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकारची कामं करत असला तरी या मतदारसंघाची विकासापासून कायमच उपेक्षा राहिली. त्याचं कारण म्हणजे सर्वात कमी शिक्षण असलेले राज्यातील एकमेव आमदार म्हणून लखन मलिक यांची ओळख… सुशिक्षित आमदार जो विकासाच्या दृष्टीने काम करेल त्यालाच मतदारराजा कौल देणार असं इथलं प्रत्येक निवडणुकीचा चित्र दिसतं… पण इथे काही ना काही घडामोड घडते… आणि ती गोष्ट लखन मलिक यांच्या पथ्यावर पडते… निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. राजकारणाचा कुठलाही गंध नसताना तसेच प्रचारासाठी जेमतेम १५ ते २० दिवस मिळूनही डॉ. देवळे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळविली. शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलेले अपक्ष बंडखोर उमेदवार शशीकांत पेंढारकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले…तर जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रजनी राठोड यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली…
जनमानसात सहज मिसळण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रिय ठरलेल्या आमदार लखन मलिक यांची अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या विजयाचे प्रमुख कारण मानले जाते. लखन मलिक यांनी यापूर्वी १९९०, २००९ आणि २०१४ अशा तीनवेळच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करित आमदारकीला गवसणी घातली. यंदा त्यांना शशिकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ देवळे व काँग्रेसच्या रजनी राठोड यांचे आव्हान असणार आहे… पण स्ट्रॉंग विरोधक नसणं यंदाही मलिकांच्या पथ्यावर पडेल, असं वाशिम विधानसभेबद्दल सांगता येऊ शकतं….
तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ पाहूया कारंजा विधानसभेचा… राजकारणात कुठलाही अमिताभ पाठीशी नसताना राजेंद्र पाटणी यांनीकारंजा विधानसभा गाजवली… सलग दोन वेळा भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले… मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर आता हा मतदारसंघ रिक्त झालाय…. त्यामुळे मतदारसंघातील अनेक इच्छुकांच्या आमदारकीच्या स्वप्नांना बळ मिळालय… भाजपकडून त्यांचा मुलगा ज्ञायक राजेंद्र पाटणी यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून अमोल पाटणकर यांचाही या मतदारसंघात सहभाग वाढलाय… पाटणकर हे फडणवीसांच्या कार्यालयातील अप्पर सचिव असून ते त्यांचे विश्वासूही मानले जातात…कारंजा मतदारसंघाचा विचार केला, तर एखादा अपवाद वगळला तर या मतदारसंघात स्थानिक सोडून मतदारसंघाबाहेरील उमेदवार आमदार म्हणून निवडून येतात, असाच इतिहास राहिला आहे, तर पाटणी यांच्यापूर्वी हा शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यायचा.
मात्र, 2014 मध्ये भाजपकडून राजेंद्र पाटणी निवडून आल्याने भाजपने 2019 मध्येही या मतदारसंघात दावा केला होता…. पण यंदा महायुतीत या जागेच्या उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते… शिवसेनेत पडलेली फूट, दलित आणि बंजारा समाजाची मतं, लोकसभेचा कौल या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला एक्स फॅक्टर ठरणार असल्यामुळे महाविकास आघाडीलाही या निवडणुतील विजयाचे चान्सेस वाढले आहेत… तर असं होतं वाशिम जिल्ह्यातल्या या तीन विधानसभा मतदारसंघाचं पॉलिटिकल डीकोडींग… बाकी कारंजा, वाशिम आणि रिसोडमध्ये येणाऱ्या विधानसभेला कोण निवडून येईल? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी दोघांमध्ये तब्बल अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीविषयी प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी बोलताना त्यांनी, ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची, गोरगरीबांची घरं पेटता कामा नयेत, राज्य शांत राहिलं पाहिजे, असे वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “मी शरद पवारांची अपॉईंटमेंट घेतली नव्हती. पण, तरी त्यांना भेटायला गेलो. तब्येत ठीक नसल्याने ते झोपले होते. मी दीड तास थांबलो. ते उठल्यानंतर मी गेलो आणि आमच्यात दीड तास चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की, राजकारण घेऊन आलो नाही. आमदार-मंत्री म्हणून आलो नाही. पण, राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण, आता राज्यात काही ठिकाणी स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे, असं मी त्यांना सांगितलं”
ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे..
तसेच, “सध्या काहीजण मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही, तर काहीजण हे ओबीसी, धनगर, वंजारी या समाजांच्या दुकानात जात नाहीत. ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबतही स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. तुमची भूमिका महत्त्वाची आहे, यावर शरद पवार म्हणाले की, दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलतो. काय झालं, काय करायला पाहिजे, यावर चर्चा करायला तयार आहे” अशी अशी माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.