Monday, December 22, 2025
Home Blog Page 602

पवारांच्या भेटीनंतर भुजबळ स्पष्टच बोलले; मला आमदारकीची-मंत्रिपदाची पर्वा नाही

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी दोघांमध्ये तब्बल अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीविषयी प्रतिक्रिया देखील दिली. यावेळी बोलताना त्यांनी, ना मला राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची, गोरगरीबांची घरं पेटता कामा नयेत, राज्य शांत राहिलं पाहिजे, असे वक्तव्य केले.

पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “मी शरद पवारांची अपॉईंटमेंट घेतली नव्हती. पण, तरी त्यांना भेटायला गेलो. तब्येत ठीक नसल्याने ते झोपले होते. मी दीड तास थांबलो. ते उठल्यानंतर मी गेलो आणि आमच्यात दीड तास चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की, राजकारण घेऊन आलो नाही. आमदार-मंत्री म्हणून आलो नाही. पण, राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण, आता राज्यात काही ठिकाणी स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे, असं मी त्यांना सांगितलं”

ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे..

तसेच, “सध्या काहीजण मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही, तर काहीजण हे ओबीसी, धनगर, वंजारी या समाजांच्या दुकानात जात नाहीत. ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबतही स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. तुमची भूमिका महत्त्वाची आहे, यावर शरद पवार म्हणाले की, दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलतो. काय झालं, काय करायला पाहिजे, यावर चर्चा करायला तयार आहे” अशी अशी माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Kitchen Tips : पावसाळ्यात तुमचे किचन ठेवा फ्रेश आणि बॅक्टेरियाफ्री ; वापरा सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : पावसाळा आला म्हंटल म्हंटलं की पुरेसं ऊन नसल्यामुळे सर्वत्र चीकचीक होऊ लागते. त्यातही किचनमध्ये जिथे पाण्याचा वारंवार वापर होते. तिथे पावसाळ्यात अनेकदा किचकिच होऊन दुर्गंधी यायला लागते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखामध्ये अशा काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्यामुळे पावसाळ्यात सुद्धा तुमचे किचन फ्रेश असेल. चला तर मग (Kitchen Tips) जाणून घेऊया

पावसाळ्याचे दिवस म्हंटले की घरात हमखास माशा घोंगावताना दिसायला लागतात. त्यामुळे घरात फरशीवर काही चिकट अन्नपदार्थ राहणार नाहीत याची काळजी घ्या. खरकटे उघड्यावर ठेऊ नका. कचऱ्याच्या (Kitchen Tips) डब्यावर झाकण लावा. जेणेकरून माशा येणार नाहीत. शिवाय लादी पुसताना पाण्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घालून पुसा म्हणजे फरशीवर माशा येणार नाहीत.

भाज्या फ्रेश राहण्यासाठी (Kitchen Tips)

पावसाळ्यामध्ये पाऊस असल्यामुळे भाज्या सहसा लवकर कुजण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही बाजारातून भाजी घेऊन येता तेव्हा ती पूर्णपणे कोरडी करून किंवा टिशू पेपरमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते लवकर खराब होणार नाही. शिवाय जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच भाज्या तुम्ही घेऊन या. म्हणजे त्या लवकर खराब होणार नाहीत. कारण पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया ही लवकर सुरू होते. त्यामुळे भाज्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढ्या लागतील तेवढ्याच भाज्या आणा आणि तेवढ्याच फ्रेश भाज्या खा.

विनेगर आणि लिंबू

विनेगर आणि लिंबू ह्या घरातलया अशा दोन गोष्टी आहेत ज्या नैसर्गिकरित्या स्वच्छतेचे काम करतात. या दोन्हीचा वापर करून तुम्ही पावसाळ्यामध्ये किचनमधले सरफेस म्हणजे किचन ओटा असेल किंवा फरशा असतील या पुसून घेऊ शकता (Kitchen Tips) म्हणजे पावसाळ्यात बॅक्टेरियल ग्रोथ होणार नाही.

ओलासर मिठ (Kitchen Tips)

आपल्याला अनुभव असेलच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मिठाला देखील ओलावा चढतो त्यामुळे मीठ ओलसर होऊन जातो आणि अशा वेळेला पावसामध्ये मीठ ओलसर होऊ नये याकरिता मिठाच्या बरणीमध्ये चार दाणे तांदळाचे मिसळा म्हणजे मीठ हे ओलसर होत नाही.

हवा खेळती राहू द्या

तुमच्या किचनमध्ये हवा खेळती राहते की नाही हे मात्र नक्की तपासून पहा. कोंदट (Kitchen Tips) वातावरणात बुरशी लवकर वाढत असते त्यामुळे तुमच्या किचनच्या खिडक्या उघड्या ठेवा शिवाय किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावायला विसरू नका.

ताजे तेल वापरा

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो पुन्हा पुन्हा वापरलेले तेल तुम्ही वापरू नका कारण ते लवकर खराब होण्याची शक्यता असते शिवाय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच जेव्हा तुम्ही जेवण बनवणार तेव्हा चांगलं (Kitchen Tips) आणि उत्तम आरोग्य हवं असेल तर तुम्ही फ्रेश तेलच वापरा

वनडे- कसोटीतील निवृत्तीबाबत रोहित शर्माची मोठी माहिती; हिटमॅन कधी होणार रिटायर?

ROHIT SHARMA ON RETIREMENT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटबाबत मात्र त्याने कोणतेही भाष्य केले नव्हतं. मात्र आगामी चॅम्पियन ट्रॉफीनंतर रोहित आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चा सातत्याने सुरु असतात. परंतु आता खुद्द रोहितनेच आपण कधीपर्यंत क्रिकेट खेळणार आणि कधी निवृत्ती घेणार याबाबत अपडेट्स दिले आहेत.

रोहित अमेरिकेतील डलास येथे एका कार्यक्रमात सहभागी झाला असता त्याला त्याच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित म्हणाला की तो भविष्याचा जास्त विचार करणारा माणूस नाही. मी आधीच सांगितले आहे की, मी फार पुढचा विचार करणारी व्यक्ती नाही. त्यामुळे येत्या काही काळासाठी तुम्ही मला खेळताना पाहाल असं त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इथून पुढे वनडे आणि कसोटी मध्ये तरी रोहितचा आक्रमक खेळ बघायला या आशेने चाहते खुश आहेत. बीसीसीयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे कि, रोहित शर्मा चा आगामी चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताचा कर्णधार असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली या दोन्ही ट्रॉफी सुद्धा भारतीय संघ जिंकेल असा विश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, T20 मधून निवृत्ती घेत असताना रोहितने म्हंटल कि, यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. हा माझा शेवटचा सामनाही होता. जेव्हापासून मी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मी या फॉरमॅटचा आनंद लुटला आहे, रोहितने T20 मध्ये आत्तापर्यंत 159 सामन्यांमध्ये 4231 धावा केल्या असून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक पाच शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला. यात रोहित 2007 साली तो संघात नवखा होता मात्र २०२४ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला.

Herbal Drinks | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी; रोज ‘या’ हर्बल पेयांचे करा सेवन

Herbal Drinks

Herbal Drinks | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शरीराला आराम मिळत आहे. परंतु यामुळे अनेक आजार देखील त्यांच्या मागे लागलेले आहेत. त्यातही आजकाल मधुमेहासारखा आजार अनेक लोकांना झालेला दिसत आहे. अगदी कोणत्याही वयोगटातील लोकांना मधुमेह होतो. परंतु मधुमेह झालेल्या लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी त्यांना योग्य अन्न आणि व्यायाम देखील करावा लागतो. परंतु तुम्ही जर मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी घरच्या घरी काही हर्बल पेये (Herbal Drinks) करून पिले, तर त्यातून तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहील. आणि त्यासोबत आरोग्याला अनेक फायदे देखील होतील. आता हे कोणते पेय आहेत? त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हे आपण जाणून घेऊया.

मेथीचा चहा | Herbal Drinks

मेथी, सामान्यतः स्वयंपाकघरात वापरली जाणारी औषधी वनस्पती, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासह आरोग्याला अनेक फायदे देखील होतात. जर्नल ऑफ डायबिटीज अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर असते जे कार्बोहायड्रेट पचन आणि शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मेथीचा चहा बनवण्यासाठी फक्त एक चमचा मेथीचे दाणे गरम पाण्यात काही मिनिटे भिजत ठेवा आणि पिण्यापूर्वी गाळून घ्या.

दालचिनी चहा

दालचिनी हा एक लोकप्रिय मसाला आहे. जो त्याच्या गोड आणि उबदार चवसाठी ओळखला जातो, परंतु त्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, दालचिनी इंसुलिन संवेदनशीलता सुधारू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. दालचिनीचा चहा गरम पाण्यात दालचिनीची काडी घालून 10 मिनिटे भिजवून सहज तयार करता येतो.

आले चहा

आले ही आणखी एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे. ज्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनमधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये आले उपवास रक्तातील साखरेची पातळी आणि HbA1c सुधारू शकते. आल्याचा चहा बनवण्यासाठी ताज्या आल्याच्या मुळाचा एक छोटा तुकडा किसून घ्या आणि गरम पाण्यात 5-10 मिनिटे भिजवा.

ग्रीन टी

ग्रीन टी रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करण्याच्या क्षमतेसह त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल असते, विशेषत: एपिगॅलोकेटचिन गॅलेट (EGCG), जे इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. २-३ मिनिटे गरम पाण्यात चहाची पिशवी किंवा सोडलेली पाने भिजवून ग्रीन टी बनवा.

हिबिस्कस चहा | Herbal Drinks

हिबिस्कस चहा, त्याच्या चव आणि दोलायमान रंगासाठी ओळखला जातो, तो अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याच्या क्षमतेसाठी त्याचा अभ्यास केला गेला आहे. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्रीच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की हिबिस्कस अर्क उपवास रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतो आणि इंसुलिन संवेदनशीलता सुधारू शकतो. हिबिस्कस चहा बनवण्यासाठी, वाळलेल्या हिबिस्कसची फुले गरम पाण्यात सुमारे 5-10 मिनिटे भिजवा.

Mharashtra Rain : रेल्वे बोगद्याच्या समोरच कोसळली दरड ; कोकण रेल्वे वाहतूकीवर परिणाम

Mharashtra Rain : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही मागच्या दोन दिवसात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला असून कोकण रेल्वे मार्गावरील सेवा रविवारी सायंकाळ पासून विस्कळीत झाले असून, या विस्कळीतपणामुळे लांब पल्ल्याच्या पाच गाड्या (Mharashtra Rain) थांबवण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे (Mharashtra Rain) रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विन्हेरे (रायगड) आणि दिवाण खवटी (रत्नागिरी) स्थानकांदरम्यान बोगद्याच्या बाहेर दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र, सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी एकही गाडी जात नव्हती, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

कोकण मार्गावरील विविध स्थानकांवर पाच ते सहा लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याची माहिती आहे . मार्ग मोकळा करून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती देताना (Mharashtra Rain) अधिकाऱ्यांनी सांगितले की, “एक जेसीबी आधीच घटनास्थळी पोहोचला आहे आणि एक पोकलेन मशीन देखील मार्गावर आहे. सेवा दोन ते तीन तासात पुन्हा सुरू होऊ शकते,” ते म्हणाले होते. मात्र सध्या तेथील परिस्थिती काय आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही.

महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार (Mharashtra Rain) पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला पावसामुळे गोव्यातील मदुरे-पेरनेम विभागातील पेरनेम बोगद्यात पाणी साचल्याने कोकण रेल्वे मार्गावरील सेवा प्रभावित झाली होती. आता दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

Success Story | मिश्र शेतीतून शेतकऱ्याने वर्षाला कमावले 15 लाख रुपये; असे केले नियोजन

Success Story

Success Story | आजकाल अनेक तरुण लोक देखील शेती व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे ते पारंपारिक पद्धतीने शेती न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अनेक आधुनिक पद्धतीच्या पिकांची लागवड देखील आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. अशाच एका शेतकऱ्याची आपण कहाणी जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याचे नाव श्याम सिंह असे आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या या शेतकऱ्याने आपल्या मिश्र शेतीतून उत्पन्न चांगले घेतले आहे. आणि त्या शेतकऱ्याला वर्षाला 15 लाख रुपये नफा होत आहे.

शाम सिंग यांच्याकडे 9 एकर एवढी जमीन आहे. यातून ते दरवर्षाला जवळपास 15 लाख रुपये नफा कमवतात. त्यांनी मिश्र शेती करून हे यश मिळवलेले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही एक प्रेरणा मिळालेली आहे. मिश्र शेती ही एक अशा प्रकारची शेती आहे, ज्यामध्ये पिके घेण्याव्यतिरिक्त पशुपालनाचा ही समावेश असतो. आशियावमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, चीन , युरोप, कॅनडा, रशिया या सारख्या देशांमध्ये या प्रकारची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

श्याम सिंग यांचे नियोजन | Success Story

श्याम सिंग हे सध्या या मिश्र शेतीतून लाख रुपये कमवत आहेत. आत्मा प्रकल्पात सेंद्रिय आणि कृषी विविधीकरणाच्या मदतीने त्यांनी 9 एकर शेत जमिनीवर ही शेती केल्याचे सांगितले. त्यांनी दोन एकर शेतीमध्ये भाजीपाला लावलेला आहे. 4 एकरावर धान्य आणि 2 एकर जमिनीवर फळझाडे लावलेली आहे. तर उरलेली जमीन ही जमिनीवर त्यांनी सेंद्रिय तयार केलेले आहे.

पॉलिहाऊसमध्ये केला भाजीपाला

श्याम सिंग यांनी पॉलिहाऊस देखील तयार केलेले आहे. यामध्ये त्यांनी अनेक भाजीपाल्यांची लागवड देखील केलेली आहे. यातून त्यांना चांगलाच नफा मिळालेला आहे. यामध्ये त्यांनी पालकाची लागवड देखील केलेली आहे. त्यांनी 2 एकर जमिनीवर 100 ते 125 क्विंटल एवढ्या पालेभाज्या मिळत आहेत. त्यांच्या या सेंद्रिय भाज्यांना खूप जास्त मागणी आहे.

पशुपालन

श्याम सिंग हे शेती सोबत पशुपालनही करत आहे. त्यामुळे गावात दररोज 60 ते 70 लिटर दुधाची ते विक्री करतात. यातून त्यांना दर महिन्याला 1 लाख 26 रुपये एवढा नफा होतो. त्यांनी सेंद्रिय खत बनवण्याचे प्रशिक्षण देखील घेतलेले आहे. त्यांनी वर्मी कंपोस्ट खत तयार केलेले आहे. ज्याचा शेतीला खूप चांगला फायदा होतो.

BSNL And TATA TCS Deal | BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; कंपनीने TATA सोबत केला 15 हजार कोटींचा करार

BSNL And TATA TCS Deal

BSNL And TATA TCS Deal | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच एअरटेल, जिओ आणि व्हीआय या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सगळेच ग्राहक निराश झालेले आहेत. आणि अनेक लोकांचा कल आता BSNL कडे आहे. अशातच आता BSNL ने त्यांच्या युजरसाठी आणखी एक चांगली बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता टाटा समूहाची आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसने BSNL सोबत 1500 कोटी रुपयांचा 4G नेटवर्कचा करार (BSNL And TATA TCS Deal) देखील केलेला आहे. त्यामुळे आता या करारा अंतर्गत TCS आणि BSNL या दोन कंपन्या मिळून 4G नेटवर्क सर्विस 1000 गावापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आता 1000 गावांना इंटरनेटचा हाय स्पीड देखील मिळणार आहे.

इतर टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यामुळे अनेक लोक BSNL मध्ये त्यांचे सिम पोर्ट करत आहे. कारण BSNL ही सध्या एकमेव अशी कंपनी आहे, जी ग्राहकांना अत्यंत स्वस्त दरात इंटरनेटची सुविधा पुरवत आहे. अशातच आता टाटा आणि BSNL ने एक मोठा करार (BSNL And TATA TCS Deal) केल्यामुळे युजर्सला चांगले इंटरनेट वापरण्यास मिळणार आहे.

एप्रिलमध्येच करार जाहीर झाला | BSNL And TATA TCS Deal

TCS आणि BSNL ने हा करार एप्रिलमध्ये जाहीर केला होता. ही TCS आणि भारत एजन्सी यांच्यातील पार्टनरशिप आहे. देशातील BSNL ही सेवा भारतातील पहिले स्वदेशी विकसित होती. नेटवर्क सोल्युशन तैनात करणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. याबाबत गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितलेले आहे की, टाटा समूहाची कंपनी ही BSNL सोबतच्या या करारा अंतर्गत देशातील चार क्षेत्रांमध्ये डेटा सेंटर स्थापन करणार आहे.

देशातील विविध भागांमध्ये सध्या 5G इंटरनेट उपलब्ध आहे. जिओ, एअरटेल आणि आयडिया कंपन्या 4G इंटरनेट पुरवत आहे. परंतु 5G सेवा पुरवण्यात देखील या कंपन्या सध्या आघाडीवर आहेत. परंतु BSNL सध्या 4G सेवा बळकट करण्यावर जास्त भर देत आहे. आता टाटा आणि BSNL यांच्या करारामुळे BSNL ची 4G इंटरनेट सेवा आणखी मजबूत होणार आहे.

Chhagan Bhujbal Meet To Sharad Pawar : कालच पवारांवर टीका अन् आज छगन भुजबळ सिल्वर ओकवर

Chhagan Bhujbal Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली (Chhagan Bhujbal Meet To Sharad Pawar) आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालच छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर २४ तास उलटच नाहीत तोच भुजबळ शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेल्याने चर्चाना उधाण आलं आहे. छगन भुजबळ सिल्वर ओकवर नेमका का गेले? पडद्यामागे काय राजकारण चाललं आहे याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही.

काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे आपल्या ताफा घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न भुजबळांकडून करण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये भुजबळांचा ताफा कैद झालाच आणि हि बातमी फुटली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी विरोधकांना कॉल करून मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला जाऊ नका असं सांगितल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी कालच केला होता. व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टिका केली होती.

भाजपची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, भुजबळ- पवार भेटीबाबत भाजपकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास मला माहिती आहे, त्यामुळे ते महायुतीला धक्का बसेल, असा कोणताही निर्णय घेणार नाही, त्या उलट ते महायुती कशी एकत्र राहिल याचा प्रयत्न नेहमी करतात अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मी देखील शरद पवारांना अनेक वेळा भेटलो आहे, त्यामुळे काही बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे या भेटीत काहीही राजकीय घडामोड नाही असं बावनकुळे यांनी सांगितलं.

Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठात 152 जागांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 | ज्या लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आम्ही एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता मुंबई विद्यापीठांतर्गत (Mumbai University Bharti 2024) सध्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

ही भरती विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोग प्राध्यापक, उपग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल या पदांसाठी होणार आहे. या पदांच्या एकूण 152 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 7 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता | Mumbai University Bharti 2024

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदवीत्तर पदवी असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Mumbai University Bharti 2024

7 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन!! राज्य सरकारचा निर्णय

pension to warkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूरची आषाढी एकादशी २ दिवसांवर आली असतानाच राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार आहे. राज्य शासनाने कीर्तनकार व वारकऱ्यांच्या सोयी- सुविधेकरता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. पंढरपूर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार असून या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन देण्यात येणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी वारीला जातात. या वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. मात्र दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढतच चालली असून या पार्श्वभूमीवर वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे या गोष्टींचा समावेश आहे.

काय आहेत महामंडळाच्या योजना

आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.
कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.
सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.
वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.
पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.