Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 619

Juices For Skin | हे 4 प्रकारचे ज्यूस त्वचा बनवतील निरोगी आणि चमकदार; आजपासूनच करा सेवन

Juices For Skin

Juices For Skin | आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला देखील निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. कारण आपल्या चेहऱ्यावर तेज असते ते आपण ज्या गोष्टी खातो त्यावर ते अवलंबून असते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही ज्यूसचे सेवन करू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा (Juices For Skin) अत्यंत निरोगी आणि चमकदार राहील. तर आज आपण त्या ज्यूसबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

टोमॅटोचा रस | Juices For Skin

व्हिटॅमिन सी समृद्ध टोमॅटोचा रस निरोगी त्वचेसाठी खूप महत्वाचा आहे. त्वचेला अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट पुरवतात, जे स्वतःला फ्री रॅडिक्ल डॅमेजपासून संरक्षण देत नाहीत, तर तुमच्या त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवण्याचे काम करतात.

बीटरूट रस

व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए ने भरपूर बीटरूटचा रस त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने, आपण अतिनील प्रदर्शनामुळे होणारे नुकसान टाळू शकता आणि आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकू शकता.

हिरव्या भाज्या रस

व्हिटॅमिन ए आणि कॅरोटीनॉइड्स भरपूर असल्याने हिरव्या भाज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्हालाही तुमच्या वयानुसार तुमची त्वचा तरुण ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पालक, कारले, काकडी इत्यादींचा रस समाविष्ट करू शकता.

गाजर रस | Juices For Skin

बायोटिन आणि व्हिटॅमिन एने भरपूर गाजराचा रस त्वचेला निरोगी बनवतो. प्रक्षोभक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने, ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी, तुम्ही याला तुमच्या आहाराचा एक भाग देखील बनवू शकता.

फक्त 4000 रुपयांत खरेदी करा 16MP सेल्फी कॅमेरावाला मोबाईल; Flipkart वर भन्नाट ऑफर

Vivo T2 Pro 5G Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर चिंता करू नका.. हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मोबाईल बद्दल आणि त्याच्यावर असलेल्या ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्याअंतर्गत तुम्ही अवघ्या 4000 रुपयांतच हा मोबाईल घरी घेऊन जाऊ शकता. होय, हे खरं आहे.. Vivo T2 Pro 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर या मोबाईल खरेदीवर अनेक भन्नाट ऑफर देण्यात आल्यात. त्यामुळे तुमच्या खिशात कमी पैसे असले तरी तुम्ही अगदी स्वस्तात हा मोबाईल खरेदी करू शकता. चला तर जाणून घेऊयात, या मोबाईल वरील सर्व ऑफर जाणून घेऊयात …

Flipkart वर , Vivo T2 Pro 5G मोबाईल हा 27,999 रुपयांत लिस्ट करण्यात आला आहे. मात्र यावर सुरुवातीपासूनच 14% डिस्काउंट देण्यात आला असून हा मोबाईल 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना HDFC आणि Flipkart Axis बँक कार्ड्सवर 2000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक सुद्धा मिळतोय. महत्वाची आणि खास बाब म्हणजे या मोबाईल वर एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे. त्यानुसार तुमच्याकडे जर जुना मोबाईल असेल तर त्याबदल्यात तुम्हाला तब्बल 19650 रुपयांपर्यंत सूट मिळतेय. परंतु तुमचा जुना मोबाईल त्यांसाठी चांगल्या कंडिशन मध्ये असावा. याशिवाय तुम्ही 4000 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनच्या माध्यमातून सुद्धा हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Vivo T2 Pro 5G चे फीचर्स पहा –

Vivo T2 Pro 5G मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा फुल HD + प्लस 3D कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1300 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. कंपनीने या हँडसेटमध्ये MediaTek डायमेंशन 7200 चिपसेट वापरली असून हा मोबाईल 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास विवोच्या या स्मार्टफोन मध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तर पॉवरसाठी मोबाईलमध्ये 4600 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Weather Update | मुसळधार पावसासह ‘या’ जिल्ह्यांना आणखी एक संकट; IMD ने केला हायअलर्ट जारी

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वत्र मान्सूनने हजेरी लावलेली आहे. हवामान विभाग रोज पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. आज देखील हवामान विभागाकडून म्हणजेच 8 जुलै रोजी हवामान कसे असेल? याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने (Weather Update) दिलेले माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अत्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दिवसभर या ठिकाणी ढगाळ असे वातावरण असणार आहे. या ठिकाणी किमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल 30°c एवढे तापमान असणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी मेघगर्जना होण्याची देखील शक्यता आहे. तसेच कोकण गोव्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

या ठिकाणी पावसासह (Weather Update) अनेक आणखी एक संकटाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. कारण कोकण गोव्यात पावसासोबत विजा देखील कडाडणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे.

त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुण्यातही आज मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागाला ऑरेंज अलर्ट देखील जारी केलेला आहे. पुण्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे यामध्ये किमान तापमान 21°c ते कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांना येल्लो अलर्ट देखील जारी केलेला आहे.

Baba Vanga Predictions : मंगळावर युद्ध!! एलिअन्सशी सामना….; बाबा वेंगा यांच्या घाबरवणाऱ्या भविष्यवाण्या पहाच

Baba Vanga Predictions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पृथ्वीवरील मानवी संस्कृतीच्या भविष्याविषयी अनेक ऋषीमुनींनी भाकीत केले आहे. यापैकी एक नाव आहे बेंझिलिया पांडेवा गुश्तेरोवा. त्यांना बाबा वनगा म्हणूनही ओळखले जाते. बाबा वेंगा ही एक अंध आणि रहस्यमय बल्गेरियन महिला होत्या. त्या अंध होत्या. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र तत्पूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या ज्यातील बहुतांश भविष्यवाण्या (Baba Vanga Predictions) खऱ्या झालेल्या आहेत. आज आपण इथून पुढच्या काळासाठी बाबा वेंगा नेमक्या कोणकोणत्या भविष्यवाण्या केल्यात ज्यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

बाबा वेंगा यांनी ज्या काही भविष्यवाण्या (Baba Vanga Predictions) केल्यात त्यामुळे नक्कीच तुम्हाला धसका बसेल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी नुसार, ५०७९ मध्ये एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीचा अंत होईल. मात्र तत्पूर्वी माणसाचा सामना एलिअन्सशी सुद्धा होऊ शकतो. तसेच मंगळावरील युद्ध होईल असेही बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितलं आहे. भविष्यात मानव पृथ्वीशिवाय इतर दुसऱ्या ग्रहावर जाण्यास सक्षम होईल असेही बाबा वेंगा यांनी म्हंटल आहे.

काय आहेत बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या – Baba Vanga Predictions

2025: युरोपमध्ये एक मोठे युद्ध होईल ज्यामुळे युरोप खंडातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. म्हणजे यात अनेक लोकांचा मृत्यू होईल.
2028: उर्जेचे नवीन स्त्रोत शोधण्याच्या प्रयत्नात मानव शुक्रावर पोहोचेल.
2033: ध्रुवीय बर्फ वितळल्याने समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होईल.
2076: जागतिक स्तरावर साम्यवाद परत येईल.
2130: पृथ्वीच्या बाहेरील संस्कृतींशी संपर्क होईल.
2170: जगभर दुष्काळ पडेल.
3005: मंगळावर युद्ध होईल.
3797: पृथ्वीचा नाश सुरू होईल, मानवाला सूर्यमालेतील इतर कोणत्याही ग्रहावर जाणे शक्य होईल.
५०७९: जगाचा अंत होईल.

मुंबई- पुणे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी!! ‘या’ 2 रेल्वेगाड्या रद्द

Mumbai Pune Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rain) झोडपलं आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल उशीराने धावत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. तर पुण्याला जाणारी सिंहगड आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द (Sinhagad and Deccan Express Cancelled) करण्यात आली आहे.

मुंबईच्या पावसाचा फटका पुणेकरांना सुद्धा बसला आहे. कारण या महाप्रचंड पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे सिंहगड आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई- पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आधी हि माहिती जाणून घेणं महत्वाचे आहे. याशिवाय भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर आहे. एकूणच मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे आज पावसात उभी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पावसाचा जोर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मुंबईतील परिस्थिती आशाची राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आजही मुंबईत धुव्वाधार पावसाची शक्यता असून त्यापार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या सकाळच्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर पावसाचा अंदाज घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत जे नोकरी करतात त्या नोकरदारांना सुद्धा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Viral Video | जीव धोक्यात टाकून नागरिकांनी वाचवले, धबधब्यात अडकलेल्या महिलेचे प्राण

Viral Video

Viral Video | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक लोक हे नदी, नाले, झरे, धबधबे, किल्ले इत्यादी ठिकाणी भेट देत आहेत. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोक अगदी त्यांच्या जीवाचा देखील विचार करत नाही. आपण सोशल मीडियावर देखील अनेक नदी नाल्यात लोक वाहून गेलेल्या बातम्या पाहिलेल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून देखील पाण्याच्या ठिकाणी गेल्यावर काळजी करण्याचे आवाहन दिलेले आहे. तरीदेखील लोक याबाबत खूपच निष्काळजीपणा दाखवत आहेत. आणि या घटना वाढतच चाललेल्या आहेत.

अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका धबधब्याच्या ठिकाणी एक महिला अडकलेली दिसत आहे. परंतु त्या महिलेच्या नशीब चांगले होते की, तेथील स्थानिक लोकांनी तिला पाण्याबाहेर काढले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/C87F0a7vrz0/?igsh=bG9qNWFrb2RhbXBo

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला हातात चप्पल आणि अंगावर पर्स घेऊन धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात अडकलेली दिसत आहे. तेव्हा तेथील स्थानिक लोक धावून आले आणि त्या महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो.

जर त्या नागरिकांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या महिलेला वाचवण्याचे धाडस केले नसते, तर आज त्या महिलेचे काय झाले असते देवच जानो! सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आणि अनेक लोक त्या महिलेवर टीका देखील करत आहेत. कारण वारंवार शासनाकडून काळजी घेण्याचे आव्हान देण्यात आलेले आहे, तरी देखील लोक खूप निष्काळजीपणाने वागत आहेत.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस!! शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Mumbai Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rain) झोडपलं आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. आजही मुंबईत धुव्वाधार पावसाची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यानंतर सर्व एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सध्या फक्त सकाळच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. यानंतर पावसाचा अंदाज घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत जे नोकरी करतात त्या नोकरदारांना सुद्धा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत – Mumbai Rain

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर आहे. पुण्याकडे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द केल्याची माहिती आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही सिग्नल न मिळालाने एकामागे एक लोकल गाड्या उभ्या आहेत. पुढील काही तास पावसाचा जोर (Mumbai Rain) कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा…..; जय शाह यांच्या विधानाने क्रिकेटप्रेमी खुश

Rohit Sharma Jay Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सेक्रेटरी जय शाह (Jay Shah) यांनी भारतीय संघाचे आभार मानले आहेत. जय शाह यांनी हा वर्ल्डकप राहुल द्रविड, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित केला आहे. तसेच आगामी WTC आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा नक्कीच जिंकू असा विश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला. याबाबतचा एक विडिओच जय शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत जय शाह म्हणाले, या ऐतिहासिक विश्वचषक विजयबद्दल टीम इंडियाचे मी अभिनंदन करतो. टी-२० विश्वचषकातील विजय मला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. जून 2023 मध्ये आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो. नोव्हेंबर २०२३ मध्ये दहा विजयानंतर आम्ही मन जिंकले, पण चषक जिंकू शकलो नाही. मी राजकोटमध्ये सांगितले होते की, जून 2024 मध्ये आम्ही चषकाबरोबरच मनेही जिंकू. आम्ही भारतीय ध्वजही फडकवू आणि आमच्या कर्णधाराने ध्वज फडकावला.

या विजयात शेवटच्या पाच षटकांचा मोठा वाटा होता. या योगदानाबद्दल मी सूर्यकुमार, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याचे आभार मानू इच्छितो. या विजयानंतर पुढचा टप्पा डब्ल्यूटीसी फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे. मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण या दोन्ही स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा चॅम्पियन बनू. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद असं जय शाह यांनी म्हंटल.

कधी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप?

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये असून ती पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. तर 9 मार्च 2025 रोजी अंतिम सामना होणार आहे. तर दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जूनमध्ये लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जाईल.

SBI Mutual Funds | SBI च्या SIP योजना आहेत खूपच फायदेशीर; अनेक पटीत मिळेल फायदा

SBI Mutual Funds

SBI Mutual Funds | आजकाल अनेक लोक म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करतात. कारण यातील परतावा खूप जास्त असतो. लोकांना यातून खूप फायदा होतो. जर तुम्हाला ही म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही एसबीआयच्या काही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या पाच वर्षांमध्ये या एसबीआय म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. SBI च्या कोणत्या SIP योजना आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड | SBI Mutual Funds

यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर 1 लाख रुपयाचे 5 वर्षानंतर 3.26 लाख रुपये होतात. जर 5 वर्षांपूर्वी या SIP मध्ये गुंतवणूकदारांनी 10 हजार रुपयांची मासिक SIP सुरू केली, तर 5 वर्षानंतर गुंतवणुकीचे एकूण मुले 14.51 लाख एवढे होईल.

SBI फोकस्ड इक्विटी

SBI च्या म्युच्युअल फंडात एकरकमी आणि मासिक SIP अशा दोन्ही प्रकारच्या योजना आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी यामध्ये एक रकमे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर 5 वर्षानंतर त्याचे मूल्य 2.19 लाख रुपये एवढे होईल. जर 10 हजार रुपये मासिक SIP केली तर त्यानंतर 10.23 लाख रुपये.

SBI मॅंगम इक्विटी फंड | SBI Mutual Funds

एसबीआयच्या म्युच्युअल फंडातील ही योजना गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक परतावा देणारी ही योजना आहे. यामध्ये जर 5 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने एकरकमी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर 5 वर्षानंतर त्याचे मूल्य 1. 93 लाख रुपये एवढे असते. त्याचप्रमाणे यामध्ये 5 वर्षांपूर्वी 10 हजार रुपयांच्या मासिक SIP ने सुरु केले तर 5 वर्षानंतर त्याचे मूल्य 9.68 लाख रुपये एवढे होईल

मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच आगामी विधानसभा निवडणूक हि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा साधूसंतांचा, शिवप्रभूंचा, मर्दांचा ही ओळख अशीच ठेवणार की, लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार? हे आपण ठरवा. मी तर लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही. या गद्दांरांनी लोकसभेला चोरुन विजय मिळवला आहे. शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं. अरे चोरट्यांनो, भामट्यांनो तुमचा विजय हा खरा विजय नाही. अनेकांनी मला सांगितलं की आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतं दिली. कारण मशाल लोकांपर्यंत उशिरा पोहचली. आता मशालीच्या माध्यमांतून यांची पापं आपल्याला जाळायची आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, गळती सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. हे पुन्हा गादीवर बसणार नाही अशी शपथ घेऊन आपण मैदानात उतरलो पाहिजे. माता-भगिनींना समोर ठेवून निवडणुकीला सामोरं जायची तयारी यांनी सुरु केली आहे. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत. मागच्या दहा वर्षांत ज्या योजना जाहीर केल्या त्यातल्या किती अंमलात आणल्या? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. घरातील मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का मोफत शिक्षण दिले जात नाही, मुलींसाठी योजना आणता पण घराघरात भाऊ बेकार आहे. त्याचा कधी विचार करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.