Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 618

RBI Rules | RBI ने CIBIL बाबत बनवले हे 5 नियम; जाणून घ्या सविस्तर

RBI Rules

RBI Rules | रिझर्व बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डच्या संबंधात अनेक नियम केलेले आहेत. अनेक नियम बदललेले देखील आहेत. आणि याची माहिती त्यांनी वेळोवेळी बँकांना देखील दिली आहे. अशातच आता RBI ने (RBI Rules) सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना सांगितलेले आहे की, जेव्हा कोणतीही बँक किंवा NBFS एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासते. तेव्हा त्या ग्राहकाला माहिती पाठवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. ही माहिती तुम्ही एसएमएस किंवा ईमेल द्वारे देखील पाठवू शकता. क्रेडिट स्कोर संबंधात आजकाल आणि तक्रारी समोर येत आहे. त्यामुळे आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासतो तेव्हा त्या ग्राहकाला ती माहिती पोहोचणे खूप गरजेचे आहे.

आरबीआयने (RBI Rules) दिलेल्या माहितीनुसार आता जर ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली, तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे म्हणजे ग्राहकाला त्याची रिक्वेस्ट का नाकारली आहे, हे समजणे सोपे जाईल आणि त्यानुसार त्याला बदल देखील करता येईल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्य (RBI Rules) म्हणण्यानुसार, क्रेडिट कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान केला पाहिजे. यासाठी, क्रेडिट कंपनीला त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक प्रदर्शित करावी लागेल, जेणेकरुन ग्राहकांना त्यांचा विनामूल्य संपूर्ण क्रेडिट अहवाल सहज तपासता येईल. यासह, ग्राहकांना त्यांचा CIBIL स्कोर आणि वर्षातून एकदा पूर्ण क्रेडिट हिस्ट्री कळेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI Rules) म्हणण्यानुसार, जर ग्राहक डिफॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक आहे. कर्ज देणाऱ्या संस्थांनी सर्व माहिती एसएमएस/ई-मेल पाठवून शेअर करावी. याशिवाय बँका आणि कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांनी नोडल अधिकारी नेमावेत. क्रेडिट स्कोअर संबंधित समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकारी काम करतील.

जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकाच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण केले नाही, तर त्यांना प्रतिदिन १०० रुपये दंड भरावा लागेल. म्हणजेच जितक्या उशिरा तक्रारीचे निराकरण होईल, तितका अधिक दंड भरावा लागेल. कर्ज वाटप करणाऱ्या संस्थेला 21 दिवस आणि क्रेडिट ब्युरोला ९ दिवसांचा कालावधी मिळेल. जर बँकेने 21 दिवसांच्या आत क्रेडिट ब्युरोला माहिती दिली नाही तर बँक नुकसान भरपाई देईल. बँकेकडून माहिती दिल्यानंतर 9 दिवसांनंतरही तक्रारीचे निराकरण न झाल्यास क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई द्यावी लागेल.

Mansoon Tourism | साताऱ्यातील कास पुष्प पठार पर्यटनासाठी खुले; या वेळेतच घेता येईल निसर्गाचे दर्शन

Mansoon Tourism

Mansoon Tourism | पावसाळा सुरू झाला की, आपोआपच सगळ्यांना निसर्गाची ओढ लागते. आणि लोक निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जातात. पावसाळ्यामध्ये (Mansoon Tourism) हिरवेगार डोंगर, धबधबे, सर्वत्र फ्रेश असे वातावरण लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. अशातच आता जागतिक वारसा स्थळ कास पठारावरकास पठार हे कार्यकारी समिती वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. येथे नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान कुमुदिनी तलाव, इत्यादी पॉईंट्स असतात. ज्याकडे पर्यटक आकर्षित होत असतात.

याप्रमाणेच निसर्गरम्य (Mansoon Tourism) परिसर दाट झाडी, पाऊस, धुके आणि धबधबे हे कास पठाराला मिळालेले एक मोठे वरदानच आहे. राज्यभरातून कितीतरी पर्यटक या ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. परंतु आता या ठिकाणी फुलांच्या राखीव क्षेत्रात जाऊ नये. यासाठी कर्मचारी दिवसभर काम करत आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क देखील आकारले जात आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी अनेक वेली, झाडे, झुडपे, लाल, निळ्या, जांभळ्या रंगाची फुले, दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात. परंतु सध्या फुलांसाठी पोषक वातावरण नाही. परंतु ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फुलं पाहायला मिळतील. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रतिव्यक्ती पन्नास रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल. यानंतर तुम्हाला कुमुदिनी तलाव, कास धरण, दर्शन नैसर्गिक मंडप याचे दर्शन घेता येईल. येथे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटन सुरू असणार आहे.

या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था आहे. शुद्ध पिण्याचे पाणी आहे. संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वॉकी टॉकी देखील आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

फुलांच्या क्षेत्रात जाण्यास बंदी | Mansoon Tourism

या पठारावरील वेगवेगळे पॉईंट्स पाहण्यासाठी खुले गेलेले आहे. परंतु फुलांच्या राखीव क्षेत्रात जाण्यास बंदी आहे. या ठिकाणी कुणी प्रवेश केला, तर त्याला दंडात्मक कारवाई केली जाईल. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत या ठिकाणी कोणालाही एन्ट्री नसणार आहे.

Navjot Singh Sidhu On Virat Kohli : सचिन नव्हे तर कोहलीचा बेस्ट बॅट्समन; नवज्योत सिंग सिद्धूने उधळली स्तुतीसुमने

sidhu on virat and sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाने यंदाचा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी अंतिम सामन्यात 76 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळलेल्या विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा सर्वात बेस्ट बॅट्समन असून त्याने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) सुद्धा मागे टाकलं असं सिद्धू यांनी म्हंटल आहे. विराट कोहली हा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा, जनमानसाचा माणूस आहे असं म्हणत सिद्धू यांनी कोहलीचे तोंडभरून कौतुक केलं.

खरं तर वर्ल्डकप मध्ये विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला होता. पहिल्या सात सामन्यात त्याला केवळ 75 धावा करता आल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर आणि एकवेळ भारताची अवस्था 34/3 असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली आणि भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. याच पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. या स्पर्धेत कोहलीने जरी 38 आणि 24 धावा केल्या तरीही त्याने धावगती कमी होऊ दिली नाही. विराट एका वेगळ्याच अंदाजात खेळत होता. विराट कोहली, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारा, जनमानसाचा माणूस, एक उत्कृष्ट कामगिरी करणारा, एक प्रतिभावान खेळाडू आहे असं म्हणत सिद्धूने कोहलीचे कौतुक केलं.

यानंतर सिद्धू यांनी विराट कोहली हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पेक्षाही महान खेळाडू असल्याचे सांगितलं. विराट कोहली हा आतापर्यंतचा महान भारतीय फलंदाज आहे”. महान क्रिकेटपटुंच्या यादीत कोहली स्वतःला सचिन तेंडुलकरच्याही पुढे घेऊन गेला आहे असं विधान सिद्धू यांनी केलं आहे. वज्योत सिंग सिद्धू यांच्या या दाव्यानंतर सचिन तेंडुलकरचे चाहते काय भावना व्यक्त करतात ते आता पाहायला हवं.

Mumbai Local : लोकलच्या गर्दीत महिला पडली रुळावर ; जीव वाचला पण गमवावे लागले दोन्ही पाय

Mumbai Local : राज्यातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालेला दिसून येतो आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला असून रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे काही लोकल ठप्प झाल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ देखील उडालेली दिसत आहेत. परिणामी मुंबई, ठाण्यातल्या बहुतांशी स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीमुळे एका (Mumbai Local) महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला असून या अपघातात या महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान झालेली आहे. बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एका महिलेचा पाय अचानक घसारला आणि ही महिला रुळावर पडली. या महिलेच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डबा गेला. या महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं मात्र या महिलेला या अपघातामध्ये आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत. रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने (Mumbai Local) वेळीच रेल्वे मागे घेऊन या महिलेचा जीव वाचवला.

मुंबईत (Mumbai Local) रात्रभर पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचलं होतं. त्यामुळे हार्बर सह अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या. तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. अशातच बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी एकच गर्दी केली. या गर्दीमध्ये महिलेचा पाय घसरला आणि ही महिला थेट रेल्वे रुळावर जाऊन पडली आणि या महिलेच्या अंगावरून रेल्वेचा डब्बा गेला. ही बाब तातडीने लक्षात आल्यामुळे रेल्वे प्रशासनानं रेल्वे मागे घेतली आणि या महिलेचा जीव वाचला. मात्र या घटनेमध्ये महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.

विमानांच्या दिशा बदलल्या (Mumbai Local)

याशिवाय सततचा पाऊस असल्यामुळे दृश्यमानताही मुंबईमध्ये कमी झालेली दिसून येत आहे. परिणामी मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवर ही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन (Mumbai Local)

सध्याची मुंबईतील परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्ट वर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या (Mumbai Local) जनतेला केले आहे. मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपात्कालीन यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येवला ते सिन्नर…. यंदा नाशिकात विधानसभेला ‘हे’ निकाल डोळे फिरवतील

Nashik vidhan sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक (Nashik) भल्याभल्यांना घाम फोडतो.. तसा बघायल गेलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिककडे पक्षफुटीनंतर ठाकरे आणि शरद पवार यांनी जातीनं लक्ष दिलं…म्हणूनच की काय लोकसभेला नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मशालीनं आसमंत उजळून निघाला. पण या निकालाने छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवळ, सुहास कांदे या आणि अशा अनेक विद्यमान आमदारांचं राजकारण येत्या निवडणुकीत दावणीला लागणार आहे…शरद पवार फुटलेल्यांना धडा शिकवण्यासाठी जिल्ह्यात आधीपासूनच राजकारण पेरु लागलेत.. तर ठाकरेही गद्दार विरुद्ध खुद्दार ही लाईन कायम ठेवत विधानसभेला याचा दुसरा राजकीय ट्रेलर दाखवण्यासाठी फिल्डींग लावतायत… म्हणूनच नाशकातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभेला नेमकं कुणाच्या बाजूने वारं आहे? जिल्हातील कोणत्या मात्तबर नेत्याची विकेट आमदारकीला पडतीये? महाविकास आघाडी की महायुती नेमकं विधानसभेला जिल्ह्यात कोण भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा..

यातला पहिला मतदारसंघ आहे तो येवल्याचा… राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला.. खरंतर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एन्ट्री कशी झाली हे पाहणंही फार इंटरेस्टींगय. मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला. शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतर भुजबळयांनी येवला गाठलं. ते कायमचंच.. इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरोधात लढत देत आले.., पण २००४ ला ३५ हजाराचं, २००९ ला ५० हजार, २०१४ ला ४६ हजार तर २०१९ ला तब्बल ७० हजारांचं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली यावरुन त्यांची क्रेझ आपल्याला समजू शकते….या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते.. पण ओबिसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबिसी कार्ड कधीच चाललं नाही.. मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येवल्याची आमदारकी पटकावली होती… पण २०२४ उजाडताना चित्र सगळं बदललंय… भुजबळ अजित पवार गटात आहेत.. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ते आधीच बॅकफूटला फेकले गेलेत… शरद पवारांनीही पक्षफुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्यानं आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे तर फिक्स आहे… येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आलाय. त्यात महाविकास आघाडीने एक्सट्रा एफर्ट लावले तरी भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत, असं म्हणायला हरकत नाही… बाकी भुजबळांच्या विरोधात शिवसेनाच इथून लढत देत असल्यानं आघाडीत ठाकरे गटाचे उमेदवार संभाजी पवार यांनाच ही जागा सुटेल, अशी चिन्ह आहेत..

दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो दिंडोरी… राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ दिंडोरीचे विद्यमान आमदार… विधानसभेचे ते उपाध्यक्षही राहिले… अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघांमध्ये 2004 पासून केवळ 2009 चा अपवाद वगळता झिरवळ यांनी आमदारकी कायम ठेवलीय… विधानसभेतलं एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं… पण अजित पवार गटात गेल्याने मतदारसंघातला स्थानिक राष्ट्रवादीतील कार्यकर्ता त्यांच्यावर नाराज झाला आहे…या नाराजीचा फटका येणाऱ्या विधानसभेला त्यांना बसू शकतो…म्हणूनच ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी हालचाल करत असल्याचं सूत्रांकडून समजतं…माजी आमदार धनराज महाले आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले रामदास चारोस्कर हे दोन्ही नेते पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या दोघांचीही सातत्याने पक्ष बदलण्याची परंपरा आहे. या परंपरेमुळे हे नेते सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला दिंडोरीत जागा वाटपात स्थान नसेल. त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह अन्य इच्छुकांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे…. पण शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट दिंडोरीतून आमदारकीचा गुलाल उधळेल, अशी सध्या चिन्ह आहेत…

तिसरा मतदारसंघ पाहूया नांदगावचा…महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे जायंट किलर ठरले… आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून स्वतःच्या ताब्यात घेतली… छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव हा नक्कीच जिव्हारी लागणारा होता…यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे…पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार एकाच गटात आल्यामुळे आता नांदगावचा महायुतीचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न आहे… छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी मोठा रस्सीखेच करू शकतात… पण स्टॅंडिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं असा फॉर्मुला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो, एवढं मात्र नक्की…

चौथा मतदारसंघ आहे सिन्नरचा…राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे सिन्नरचे विद्यमान आमदार… व्यक्ती केंद्रित, नातेगोते आणि जातीवर आधारित, राजकीय समज असणारा मतदारसंघ म्हणून सिन्नरकरांची ओळख… 2014 विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनचा भगवा सिन्नरवर डौलाने फडकवला… कॉंग्रेस, शिवसेना असा प्रवास करून भाजपमध्ये आलेल्या माणिकराव कोकाटे यांचा त्यांनी तब्बल 20 हजारांच्या लीडने पराभव केला… पण 2019 ला लोकसभेच्या तोंडावर अपक्ष निवडणुक लढवत युती धर्माला फाट्यावर मारत त्यांनी तब्बल लाखभर मतं पदरात पाडून घेतली.. सर्वात महत्वाचं म्हणजे सिन्नरकर जनतेनं त्यांना ३५ हजारांचं लीड मिळालं होतं.. थोडक्यात लोकसभेला पराभव झाला असला तरी सिन्नरमध्ये मिळालेलं लीड पाहता त्यांची आमदारकी कन्फर्म समजली जात होती.. यासाठी त्यांनी वाट धरली राष्ट्रवादीची.. घड्याळाच्या चिन्हावर निवडणुक लढवत त्यांनी युतीच्या राजाभाऊ वाजेंना मात देत आमदारकी पुन्हा एकदा खेचून आणलीच… पण आता सिन्नरमध्ये उलटं वारं वाहू लागलंय..कोकाटे अजित पवार गटात असतानाही सिन्नरमधून सर्वाधिक लीड राजाभाऊ वाजेंना मिळालंय.. कोकाटे यांनी आपला आमदारकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजाभाऊ वाजे यांना अंतर्गत पाठिंबा दिल्याचीही चर्चा मतदारसंघात आहे.. त्यामुळे खासदारकीच्या मदतीची परतफेड वाजे आमदारकीला कोकाटेंना मदत देऊन करतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे… पण कोकाटे यांच्यासमोर फक्त एका चेहऱ्याचं आव्हान असणार आहे ते म्हणजे उदय सांगळे… नाशिकच्या राजकारणात एक्टीव्ह असणारे सांगळे विधानसभेला भिडण्याची इच्छा व्यक्त करतील का, यावर सिन्नरचा आमदार कोण? हे अगदी स्पष्टपणे सांगत येत.. मात्र सध्यातरी कोकाटे इथं प्लसमध्ये आहेत, एवढं मात्र नक्की…

पाचवा मतदारसंघ येतो तो चांदवड …. देवी रेणुकामाता आणि अहिल्याबाई होळकरांच्या भरीव कामांंमुळे ओळखला जाणारा चांदवडचा पट्टा… पण इथला पाणीप्रश्न मतदारसंघाच्या पाचवीलाच पुजल्यानं 1985 ते 1999 पर्यंत भाजपाचे दिवंगत जयचंद कासलीवाल यांनी या मतदारसंघाचं एकहाती नेतृत्व केलं, पण त्यांना पाण्याचा प्रश्न काही मार्गी लावता आला नाही.. पण 1999 मध्ये कासलीवाल यांचे पारंपारिक काँग्रेसमध्ये असणारे विरोधक शिरीष कोतवाल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत चांदवडची आमदारकी खेचून आणली.. याकाळात त्यांनी पाण्यासाठी राबवलेल्या विवीध योजनांचं बरंच कौतुक झालं.. यानंतर सत्ता बदलत राहील्या.. पण २०१४ ला मतदारसंघाला नवं नेतृत्व मिळालं… माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल आहेर यांनी भाजपच्या तिकीटावरुन मतदारसंघात उडी घेतली… देवळा वरील पकड, कारखानदारी, जलयुक्त शिवाराची कामं आणि विवीध विकासकामांच्या जिवांवर डॉ. राहुल आहेर मागील सलग दोन टर्म निवडून येतायत.. शिरीषकुमार कोतवाल हे प्रत्येकवेळस प्रयत्न करतात, पण त्यांना मात्र आहेरांचं लीड आत्तापर्यंत तोडता आलेलं नाहीये.. त्यामुळे मतदारसंघात भाजप स्ट्राँग पोजिशनला आहे… म्हणूनच की काय निगेटीव्ह वातावरण असताना.. भारती पवार यांचा पराभव झालेला असतानाही या मतदारसंघातून भाजपला लीड मिळालं होतं.. त्यामुळे आहेरांची आमदारकी सध्यातरी सेफ झोन मध्ये आहे.. त्यांच्या विरोधात यंदाही काँग्रेसकडून शिरीष कोतवाल फाईट देणार असले तरी शरद पवार गट आणि ठाकरे गटालाही या मतदारसंघाची भुरळ पडल्यानं चांदवड मध्ये चेहरा बदलतोय, याची आधीच चाहूल विरोधकांना लागलीय की काय, असा प्रश्नही यानिम्मिताने पडतोय..

आता येतं ते मालेगाव बाह्य… दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदार संघ म्हणून ओळखला जातो… काँग्रेस आणि पर्यायानं हिरे घराण्याच्या या मालेगाव बाह्य वर दबदबा राहीलाय.. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे नंतर प्रशांत हिरे यांनी एकदा शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीत जाऊन मंत्रीपदं मिळवलं.. पण २००४ मध्ये मालेगाव बाह्यच्या राजकारणात दादा भुसे या नावाची एण्ट्री झाली… शिवसेना आणि भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे राहिलेल्या दादा भुसे या नावाच्या मागे ताकद लावली.. दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवत प्रथमच हिरे घरण्याला बाजूला सारले आणि दादा भुसेंच्या रुपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला. 2009 च्या निवडणुकीत अधिकृतपणे सेनेच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत पुन्हा एकदा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. विकासकामांचा धडाका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि पक्ष वाढवण्याबरोबर मतदारांच्या हाकेला धावून जाणारा शिवसैनिक अशी त्यांची ओळख निर्माण केली त्याच्याच जीवावर २००४ ला ते पुन्हा निवडून आले… युतीच्या सत्तेत शिवसेनेने त्यांची ग्रामविकास राज्यमंत्री पदावर वर्णी लावली… मंत्रीपदं, पालकमंत्री असणाऱ्या दादा भुसे यांचं राजकारणाचा प्रभाव आता जिल्ह्यावर पडतो अशी सध्याची परिस्थिती आहे.. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मतदारसंघातून राहीलेलं लीड पाहता शिवसेनेच्या बंडाळीला साथ दिल्यानं इमेज डॅमेज झाली असली तरी भुसेंचा यंदाही पराभव करण अशक्यच दिसतंय.. भुसेंच्या या नाॅन स्टाॅप गाडीला ब्रेक लावायचा असेल, तर विरोधकांना एक्सट्रा एफर्ट घ्यावे लागणारयत, एवढं मात्र नक्की.. तर ही होती नाशकातली काही प्रमुख राजकीय मंडळी ज्यांची आमदारकी धोक्यात आहे का सेफ आहे? याचा आढावा आपण घेतला.. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Cidco Lottery 2024 : मुहूर्त सापडला ! जुलै महिन्यातच ‘या’ दिवशी निघणार सिडकोची सोडत

CIDCO

Cidco Lottery 2024 : मुंबईसारख्या भल्या मोठ्या मायानगरीमध्ये स्वतःचं घर घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सध्या घरांचे दर हे गगनाला भेटले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो. आता मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षीच्या सिडको लॉटरी ची (Cidco Lottery 2024 ) आता सोडत होणार आहे. ही सोडत 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुमारास होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिडको ने 332 घरांची योजना जाहीर केली होती. ही योजना तळोजा आणि द्रोणागिरी नोड मधील घरांसाठी होती. त्यासाठी 16 एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तर त्यानंतर 19 एप्रिलला संगणकीय सोडत काढण्यात येणार होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सात जुलैचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली मात्र अखेर आता सोडतीचा मुहूर्त लागला असून विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर (Cidco Lottery 2024 ) म्हणजे 12 जुलै नंतर 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार आहे.

सोडती नंतर त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता विजयी अर्जदारांच्या नावांची यादी देखील जाहीर केली जाणार आहे आणि न जिंकलेल्या अर्जदारांना 29 जुलैला अनामत रकमेचा परतावा मिळणार आहेत अशी माहिती सिडकोकडून देण्यात आलेली आहे. या बातमीमुळे नक्कीच ज्याने ज्याने सिडको (Cidco Lottery 2024 ) साठी अर्ज केला होता त्यांना दिलासा मिळाला आहे.

खरंतर मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत.मात्र सिडको (Cidco Lottery 2024 ) कडून परवडणाऱ्या दरावर ही घर उपलब्ध करून देण्यात येतात. सिडको ने तळोजा आणि द्रोणागिरी येथील 3322 घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी 61 घर द्रोनागिरी नोड आणि 251 घरात तळोजा येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. तर द्रोणागिरीतील 374 आणि तळोजातील 2636 घर सर्वसाधारण घटकांसाठी आहेत.

SAIL Bharti 2024 | SAIL अंतर्गत मोठी भरती सुरु; दरमहा मिळणार 50 हजार रुपये पगार

SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 249 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. 5 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 27 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | SAIL Bharti 2024

  • पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 249 जागा
  • वयोमर्यादा – 28 – 45 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – Degree in Engineering
  • वेतनश्रेणी – 50,000 रुपये दर महिना

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 27 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • यासारख्या अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Teacher Recruitment | ऑगस्टमध्ये होणार 10,000 शिक्षकांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Teacher Recruitment

Teacher Recruitment | जे लोक शिक्षक भरतीची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता शिक्षण भरतीला सुरुवात झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त जागांपैकी 10 टक्के पदाभरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघालेली आहे.

खाजगी अनुदानित संस्था देखील या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील 3500 तर खाजगी संस्थांमधील साडेसहा हजार पदे देखील यावेळी भरली जाणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री यांनी याबाबतची अधिसूचना जाहीर केलेली आहे. या जाहिरातीनुसार 30 हजार शिक्षकांची भरती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मागील 10 वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती (Teacher Recruitment) होणार आहे. त्या जिल्हा परिषदांमधील 22 हजार पदांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार 30% पदे रिक्तच राहतील.

ही रिक्त पदे ऑगस्ट महिन्यात भरली जाणार आहे. याआधी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नव्हती. परंतु यावेळी त्यांना संधी आहे.

शिक्षक भरतीपूर्व ‘टीईटी’ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये

शिक्षक होण्यासाठी तुम्हाला डीएड, बीएड उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना टीईटी परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टीईटी घेण्याचे नियोजन सुरू आहे. आणि आता त्यासंबंधीचा निविदा काढण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

Mumbai Rain News : गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

Mumbai Rain Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत असून बाहेर पडणे मुश्किल झाल आहे. या एकूण सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं एकनाथ शिंदेनी म्हंटल आहे.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हंटल कि, मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.

शाळा- कॉलेजला सुट्ट्या जाहीर –

मुंबईत आजही धुव्वाधार पावसाची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत जे नोकरी करतात त्या नोकरदारांना सुद्धा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वेसेवा विस्कळीत –

पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे मार्गावर अनेक लोकल तसेच एक्स्प्रेस ट्रेनस्ही रुळांवर अडकून पडल्या आहेत. भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर आहे. पुण्याकडे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द केल्याची माहिती आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत मुंबईतील एकूण परिस्थिती अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे.

Chickpeas | भाजलेले की उकडलेले! कोणत्या चण्यांनी शरीराला होतो जास्त फायदा?

Chickpeas

Chickpeas | आपल्या शरीराला प्रोटीनची खूप जास्त आवश्यकता असते. त्यामुळे अनेक प्रोटीनयुक्त पदार्थ खातात परंतु या पदार्थांमध्ये चणे हे पोषक तत्वांचे भांडार आहेत. चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला प्रोटीन, कार्ब, फायबर्स हे सगळे घटक मिळतात. त्यामुळे एका निरोगी व्यक्तीने रोज 50 ते 60 ग्रॅम सणांचे सेवन केले पाहिजे. परंतु अनेक लोकांना कोणत्या पद्धतीचे चणे (Chickpeas) खावेत? हे समजत नाही. ज्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होईल.

नियमितपणे जर तुम्ही चण्यांचे (Chickpeas) सेवन केले, तर तुमच्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर असते. तुम्ही भाजलेले किंवा शिजवलेले कोणत्याही प्रकारचे चणे खाऊ शकता. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

भाजलेले चणे | Chickpeas

भाजलेल्या चण्याची चव देखील खूप छान लागते. अनेकांना हे आवडतात. लोक नाश्त्याला त्याचप्रमाणे चहा बरोबर देखील हे खातात. ज्या लोकांना डायबिटीस आहे, त्या लोकांसाठी भाजलेले चणे खूप फायदेशीर ठरतात. हृदयाच्या आजारापासून देखील यामुळे मुक्तता होती.

भिजलेले चणे

भिजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये अनेक पोषकतत्व देखील असतात. मोड आलेल्या चाण्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपले मसल्स मजबूत होतात. आणि डायजेशनची समस्या देखील उद्भवत नाही.

उकडलेले चणे

उकडलेल्या चण्यांचे सेवन आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर असते. त्याचप्रमाणे तुम्ही उकडलेले चणे खाल्ले, तर आरोग्य संबंधी अनेक समस्या असतील त्या देखील दूर होतील.

चण्याचे आपल्या शरीराला फायदे | Chickpeas

चण्यांमध्ये जास्त प्रमाणात आयन असते. त्यामुळे रक्ताची कमतरता असेल, तर ती देखील दूर होते. चण्यांच्या सेवनाने तुमची दृष्टी देखील चांगली होते. तसेच शुगर देखील कंट्रोलमध्ये राहते. चण्यांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम असते. त्यामुळे आपली हाड मजबूत होतात.

तुम्ही चणे सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला खाऊ शकता. चण्याचे सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही. तुम्ही सकाळच्या वेळी चण्यांचे सेवन करू शकता. तुम्ही जर वजन करण्याच्या प्रयत्न असेल तर संध्याकाळी देखील नाश्त्याला चणे खा.