हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पावसाळा सुरू झालेला आहे. या पावसाळ्यामध्ये वातावरणातील आद्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आपल्या घराची कानाकोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळ तयार होत असतात. खास करून बाथरूममध्ये त्याचप्रमाणे बेसिनमध्ये झुरळ तयार होतात. त्यांना किती हाकलवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते जात नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमधील पाली सरडे देखील भिंतीवर तसेच फरशीवर आपल्याला फिरताना दिसतात.
जर तुमच्याही घरात सतत पाली, सरडे आणि झुरळे येत असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचे स्वयंपाक घर किंवा बाथरूम स्वच्छ करता त्यावेळी पाण्यात काही गोष्टी टाका. त्यानंतर झुरळे आणि सरडे तुमच्या घराच्या आसपास देखील फिरणार नाहीत.
थंड पाणी
सरडे किंवा पाली यांचे रक्त थंड असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात त्या उष्णता शोधण्यासाठी घरामध्ये येत असतात. थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे ते बाहेर पडत नाही. त्यामुळे तुमच्या घरात जर सरडा किंवा पाली दिसल्या तर त्यांना पळून लावण्यासाठी त्यांच्या अंगावर थंड पाणी टाका.
मीठ आणि लिंबू
तुम्ही जर पाण्यात तीन-चार चमचे मीठ घालून, त्यात लिंबू मिक्स करून हे मी झालेले पाणी तुम्ही स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. या पाण्याने तुम्ही तुमचे किचन तसेच फर्निचर पुसू शकता यामुळे घरात झुरळे येत नाहीत.
नॅप्थलीन बॉल्स
नॅप्थलीन बॉल्सला फिनाईल बॉल असे देखील म्हणतात. हे घरातील किटके लांब राहण्यासाठी वापरले जातात. तुम्ही याचा वापर करून देखील घरातील सरडे आणि पालीपासून सुटका मिळवू शकता.
लसूण आणि कांदा
तुम्ही जर तुमच्या घरातील लसूण किंवा कांदे घराच्या खिडक्या किंवा दरवाजांवर तांगल्या तर पाली घरात प्रवेश नाही. कारण पालींना कांदा आणि लसणाचा वास अजिबात आवडत नाही.
कापूर आणि लवंग
तुम्ही एक कप पाण्यामध्ये पाच ते सहा कापूर घेऊन त्याची बारीक पूड करा. आणि त्यात लवंगाचे तेल घ्याला. आता हे पाणी तुम्ही पाण्यात मिसळा आणि सगळीकडे पुसून घ्या. त्यानंतर झुरळे, कीटक, सरडे हे या मिश्रणाच्या वासाने लांब निघून जातील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा T20 विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि लिट्ल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच वर्षी एशिया कप जिंकला होता. तसेच क्रिकेटपटू म्हणूनही त्याने भारताकडून चांगली कामगिरी केली आहे. हीच गोष्ट लक्षात ठेऊन सरकारने द्रविडला भारतरत्न पुरस्कार द्यावा असं गावस्कर यांनी म्हंटल.
सुनील गावस्कर यांनी एका स्तंभात लिहिले की, द्रविडने जे काही केले आहे ते लक्षात घेता भारत सरकारने त्याला भारतरत्न देऊन सन्मानित करणे योग्य ठरेल. तो एक उत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधार आहे, त्याने वेस्ट इंडिजमध्ये त्यावेळच्या लोकप्रिय सिरीज जिंकण्याचे काम केले आहे तसेच इंग्लंडमध्ये जिंकणारा तो फक्त तिसरा भारतीय कर्णधार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद भूषवताना राहुल द्रविडने खेळाडूंच्या कलागुणांना जोपासले आणि नंतर तो भारताच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक झाला.
राहुल द्रविड जेव्हा भारताकडून क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याला जे काही सांगितलं ते सगळं त्याने केलं. कसोटीमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी भारताची विकेट पडली की खालच्या फलंदाजाला नाईटवॉचमन म्हणून पाठवण्याच्या जागी तो स्वत: यायचा. त्याने संघाच्या विनंतीनुसार यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा पार पाडली. कारण त्यामुळे खेळपट्टी आणि विरोधी परिस्थितीनुसार अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज निवडण्यात भारतीय संघाला मदत झाली. संघासाठी खेळण्याची हीच वृत्ती राहुल द्रविडने संघात निर्माण केली आहे . द्रविडच्या शांत स्वभावाचा सुद्धा चांगला परिणाम टीम इंडियावर झाला असावा, कारण भारताने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अतिशय रोमांचक सामन्यात संयम राखला होता.
वर्षाच्या सुरुवातीला समाजाची महत्त्वपूर्ण सेवा करणाऱ्या काही नेत्यांना भारतरत्न देण्यात आला. तथापि, त्यांचा बहुतांश प्रभाव त्यांच्या पक्षापुरता आणि ज्या देशातून ते आले त्या भागापुरतेच मर्यादित होते. द्रविडच्या कामगिरीने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे ज्यामध्ये सर्व पक्ष, जाती, पंथ, समाज आनंदी आहेत.राहुल द्रविड निश्चितच देशाच्या सर्वोच्च कौतुकास पात्र आहे. त्यामुळे भारताच्या महान सुपुत्रांपैकी एक राहुल शरद द्रविडचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करणे किती छान वाटेल? चला तर मग आपण एकत्रितपणे भारत सरकारला याबाबतचे आवाहन करूया असं सुनील गावस्कर यांनी म्हंटल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत भगीरथ भालके यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या घरवापसीच्या चर्चाना उधाण आलं आहे. कारण भगीरथ भालके हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
खरं तर भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर भालके यांनी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदावरा प्रणिती शिंदे यांचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आज त्यांनी थेट गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे. आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक भालके तुतारीच्या चिन्हावर लढवणार का याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य लागलं आहे.
पंढरपुरातील राजकारण बरच बदललं –
दरम्यान, मधल्या काही काळात पंढरपुरातील राजकारण बरच बदललं आहे. जेव्हा भगीरथ भालके यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला तेव्हा शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील हे राष्ट्रवादीच्या आणि शरद पवारांच्या अगदी जवळ गेले. पवार गटाकडून अभिजित पाटील यांनाच पंढरपूर विधानसभेचं तिकीट मिळेल असेही म्हंटल जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या काळात अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते शरद पवार आणि त्यांच्या पक्षापासून लांब गेले. याच दरम्यान भगीरथ भालके यांनी अचूक टायमिंग साधत शरद पवारांची भेट घेतल्याने आता भालके तुतारीवर निवडणूक लढणार का ते पाहावं लागेल.
Pune Railway | आपल्या देशातील कितीतरी लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जे लोक पुण्याहून खानदेशाकडे जातात किंवा खानदेशाहून पुण्यात येतात. त्यांच्यासाठी ही बातमी खूप खास असणार आहे. खानदेशमधील अनेक लोक हे पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले आहे. त्याचप्रमाणे दररोज अनेक नागरिक रेल्वेने (Pune Railway ) पुण्याहून खानदेशला प्रवास करत असतात.
हा पल्ला गाठण्यासाठी अनेक लोक हे रेल्वेने (Pune Railway ) प्रवास करत असतात. यामुळे पुणे ते भुसावळ या दरम्यान एक वेगळी रेल्वे सुरू करावी अशी मागणी गेलेअनेक दिवसांपासून येत होती. भुसावळ आणि खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी हुतात्मा एक्सप्रेस फायद्याची होती. परंतु ही एक्सप्रेस विदर्भातील अमरावती येथून सोडली जात आहे. त्यामुळे भुसावळ येथून थेट पुण्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून आली होती.
अशातच आता प्रवाशांच्या मागणीवर एक चांगला निर्णय घेतला जाणार आहे, अशी लक्षणे देखील दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या मागणीच्या प्रस्तावाचा रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पुणे ते भुसावळ या दरम्यान एक स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन असा प्रस्ताव देखील मांडण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास लगेच एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे.
आता जिल्ह्यातील अनेक लोकांनी केंद्रीय स्तरावर याबाबतचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि यांची दिल्लीमध्ये भेट घेतलेली आहे. या मध्ये पुणे ते भुसावळ या दरम्यान स्वतंत्र रेल्वे (Pune Railway ) सुरू करावी याची मागणी देखील केली आहे. जर या मागणीचा सकारात्मक विचार झाला, तर लवकरच पुणेकरांसाठी पुणे ते भुसावळ ही एक स्वतंत्र रेल्वे चालू होणार आहे.
Investment Tips | आजकाल सगळ्यांना श्रीमंत व्हायचे आहे. परंतु 20 ते 25 हजाराच्या नोकरीमध्ये झटपट श्रीमंत बनणे, खूप अवघड आहे. परंतु तुम्ही अगदी कमी वेळातही श्रीमंत बनू शकता. यासाठी तुम्हाला दीर्घकाल पण नियमित अशी गुंतवणूक केली पाहिजे. तर काही वर्षांनंतर त्याचा तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि खूप कमी वेळामध्ये तुम्ही कोट्याधीश व्हाल. परंतु तुम्हाला जर कोट्याधीश व्हायचे असेल, तर यासाठी तुम्हाला कुठे गुंतवणूक (Investment Tips) करावी लागेल? किती गुंतवणूक करावी लागेल? याची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आता तीच माहिती आपण जाणून घेऊया.
कंपाऊंडिंगची जादुई शक्ती मदत करेल | Investment Tips
जेव्हा वैयक्तिक पैशांचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात आधी ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकरणात लक्ष्य स्पष्ट आहे की आम्हाला 1 कोटी रुपये हवे आहेत, त्यामुळे आता 1 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य उत्पादन निवडण्याची वेळ येते. इक्विटी म्युच्युअल फंडातील एसआयपी हा रु. 1 कोटी सारखी मोठी रक्कम जमा करण्याचा उत्तम मार्ग आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे, तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममध्ये दर महिन्याला नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवता. जरी एसआयपीची रक्कम लहान असली तरीही चक्रवाढ आणि पैशाच्या खर्चाची सरासरी तुम्हाला दीर्घ कालावधीत मोठी रक्कम जोडण्याची परवानगी देते.
6 हजारांच्या SIP ला इतकी वर्षे लागतील
तुमचा पगार 20,000 रुपये असल्याने, त्यातील मोठा भाग म्हणजे 10 किंवा 15 हजार SIP मध्ये टाकणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, परंतु तुम्ही पगाराच्या 20-25 टक्के म्हणजे 4-5 हजार रुपये सहज काढू शकता. तुम्ही एक छोटी गुंतवणूक करत आहात त्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागेल. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात रु. 5000 ची SIP करत असल्यास, जिथे तुम्हाला 12 टक्के वार्षिक परतावा मिळतो, तिथे तुम्हाला 1 कोटी रुपये जमा होण्यासाठी अंदाजे 26 वर्षे लागतील. जर तुम्हाला 24 वर्षात 1 कोटी रुपये जोडायचे असतील तर तुम्हाला पगाराच्या 30 टक्के म्हणजे 6000 रुपये एसआयपी करावे लागेल.
SIP च्या या वैशिष्ट्यामुळे वेळ कमी होईल
तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही लक्षाधीश होण्याचे ध्येय साध्य करू शकाल. हे SIP बद्दल आहे. कमी पगाराच्या लोकांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे शक्य नसते. अशा परिस्थितीत, तुम्ही एक पर्याय निवडून तुमची SIP स्मार्ट बनवू शकता आणि लवकरच लक्षाधीश होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. अशा परिस्थितीत स्टेप-अप एसआयपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुमचा पगार वेळोवेळी वाढेल, त्यामुळे तुम्ही वेळेनुसार SIP ची रक्कम वाढवू शकता, जे तुमचे लक्षाधीश होण्याचे ध्येय पटकन साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
16 वर्षात करोडपती व्हाल | Investment Tips
स्टेप-अप कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही एसआयपी 5,000 रुपयांनी सुरू केली आणि वार्षिक 10 टक्के वाढ केली, म्हणजे दरवर्षी 10 टक्क्यांनी SIP रक्कम वाढवली, तर तुम्हाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळेल. सुमारे एक कोटी रुपयांची भर पडेल. तुम्ही 10 ऐवजी 20 टक्के वार्षिक स्टेप-अप केल्यास, 1 कोटी रुपये जोडण्यासाठी लागणारा वेळ 16 वर्षांपर्यंत कमी होईल.
MSRTC Nashik Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ उमेदवार या पदांसाठी निघालेली आहे या पदांच्या एकूण 436 रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 13 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | MSRTC Nashik Bharti 2024
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
पदसंख्या – 436 जागा
शैक्षणिक पात्रता –10th Pass
वयोमर्यादा – 14 – 38 वर्षे
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2024
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
13 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
AFMS Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय नोकरीची खास संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS Recruitment 2024) अंतर्गत एक मोठी भरती आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 450 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 4 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | AFMS Recruitment 2024
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 650 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2024
शैक्षणिक पात्रता – MBBS
अर्ज कसा करावा ?
भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी येथे आज भल्या पहाटे एका कोळी दाम्पत्याला कारने उडवलं. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला. आता या प्रकरणी (Worli Hit And Run Case) एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सदर दुचाकीला धडक देणारी कार शिंदेसेनेच्या उपनेत्याची असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांची ती गाडी असून त्यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah) हा त्यावेळी गाडी चालवत होता. सध्या पोलिसांकडून राजेश शाह याना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता पोलीस महिरीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेत आहेत.
आज पहाटे ५ वाजून ३० मिनीटांनी अपघात झाला त्यावेळी शहा, त्यांचा मुलगा मिहीर आणि चालक कारमध्ये होते. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर मिहीर शहा होता.त्याच वेळी कारनं वरळीच्या ऍट्रिया मॉलजवळ एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर एक कोळी दाम्पत्य होतं. ससून डॉकवरुन मासळी खरेदी करुन ते घरी परतत होते. त्यावेळी कारनं त्यांना मागून धडक दिली. दोघेही कारच्या बोनेटवर पडले. यावेळी नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. त्यातच भर म्हणजे अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता तशीच पुढे चालवत महिलेला फरफटत नेलं. यात महिलेचा मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अपघातावेळी मिहीर कार चालवत असल्याचा जबाब जखमीनं दिला आहे. तर राजेश शहांनी मात्र वेगळी माहिती दिली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी चालक गाडी चालवत होता असं राजेश शाह यांनी सांगितले आहे. आता हे प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हचे तर नाही ना, यादृष्टीने पण पोलिसांनी तपास करत आहेत. विशेष म्हणजे मागील महिन्यात पुण्यात सुद्धा असाच प्रकार घडला होता. ती घटना अजूनही ताजी असताना आता मुंबईत पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलनाचा सेंटर पाँइंट ठरलेला जालना जिल्हा… ज्यांची गाडी राजकारणात नॉन स्टॉप चालली होती त्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना याची झळ बसली आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले… राजकारणातील पहिल्या फळीत राहीलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा इपिसेंटर राहीलाय… दानवेंच्या मुलालाच आपल्या वडीलांना लीड मिळवून देता आलं नाही त्या भोकरदन विधानसभेपासून राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघापर्यंत यंदा नेमकं कोण निवडून येऊ शकतं? जिल्ह्यातील कोणते पाच आमदार सध्या आमदारकीच्या गुलालाच्या अगदी क्लोज आहेत? लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जालन्यात मराठा फॅक्टर वर्क आऊट होईल का? महायुतीच्या बाजूने राजकारण झुकलेल्या जालन्याला आमदारकीला महाविकास आघाडी सुरुंग लावेल का? त्याचंच केलेलं हे इनडेप्थ एनालिसीस…
यातला पहिला मतदारसंघ पाहुयात तो परतुरचा… वादग्रस्त पण बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे बबनराव लोणीकर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत… शेकाप, काँग्रेस असा प्रवास होत 1999 ला भाजपच्या बबनराव लोणकरांनी या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकी पटकावली…2004 ला ही त्यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली… 2009 ला मात्र अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूरची आमदारकी हातात घेतली.. पुढे जाऊन जेथलिया हे काँग्रेसमध्ये गेले… पण पुन्हा एकदा 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म काँग्रेसच्या जेथलियांना पराभूत करून लोणीकरांनी परतुरवर भाजपचा झेंडा फडकवत ठेवला…
भाजप मंत्रिमंडळाच्या पहिल्याच टर्ममध्ये पाणीपुरवठा मंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं होतं… त्यात केलेली विकासकामं, मोदींची लाट आणि युतीची ताकद सोबत असल्यानं लोणकरांचा विजय सोपा झाला… पण चालू असणारी टर्म ही लोणीकरांच्या पॉलिटिकल इमेजवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गेली… तहसीलदार मॅडमना हिरोईन म्हणणं, बनावट पदवी, आयपीएस अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी, राजेश टोपे यांच्यावरील वायरल झालेला शिवीगाळ करतानाचा ऑडिओ आणि स्वतःच्या मुलाला राजकारणात लॉन्च करण्यासाठी सुरू असणारी धडपड पाहता यंदाची विधानसभा लोणीकरांना जड जाऊ शकते… इथं परंपरेप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्यानं लोणीकर आणि जेथलिया यांच्यातला सामनाच मुख्यतः परतुरकरांना पाहायला मिळेल… सुरेश कुमार जेथलिया यांनी मतदारसंघातील गाठीभेटी, दौरे आणि बैठका सुरू केल्यानं यंदा शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी जेथलियांच्या पाठीशी राहिली तर इथे दिग्गज बबनराव लोणीकरांना पराभवाचा दणका बसू शकतो… फक्त लोकसभेसाठी घोड्यावर बसलेल्या त्यांच्या चिरंजीवांना म्हणजेच राहुल लोणीकरांना ते विधानसभेच्या मैदानात उतरवतील का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे..
दुसरा मतदारसंघ येतो तो भोकरदनचा… ग्रामपंचायत सदस्यांपासून केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात रावसाहेब दानवे यांनी आपला प्रभाव या मतदारसंघावर कायम ठेवलाय. भोकरदन मतदारसंघात आणि राज्याच्या राजकारणात 40 वर्ष राबलेल्या दानवेंचा संघर्ष हाच या मतदारसंघाचा इतिहास झालाय, त्यामुळे भोकरदन म्हणजे दानवेंचा राजकीय बालेकिल्ला असं म्हटलं जातं.. आणि त्याला दानवेंनी सार्थही करुन दाखवलंय… भोकरदनच्या आमदारकीसाठी इथं पाहायला मिळणारा संघर्ष आहे तो दानवे विरुद्ध दानवे असा.. चंद्रकांत दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे हे भोकरदनच्या प्रत्येक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहत आले… 2009 साली रावसाहेब दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला दानवे यांना विधासभेच्या रिंगणात उतरवले यावेळी भाजपकडून निर्मला दानवे आणि राष्ट्रवादीकडून चंद्रकांत दानवे असा सामना झाला. यात निर्मला दानवे यांचा 1 हजार 639 मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी हा गड आपल्याच ताब्यात ठेवत रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला हादरा दिला.
2014 मध्ये मात्र भोकरदन विधासभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांनी आपल्या मुलाला विधासभेच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय घेतला. यावेळी खासदार रावसाहेव दानवे यांचे पुत्र संतोष दानवे विरुद्ध राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे असा सामना रंगला. या लढतीत भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा 6 हजार 750 मतांनी विजय झाला. यावेळी विधालसभेचा गड आपल्याकडे खेचण्यात दानवे पिता पुत्राला यश आलं.. यानंतर संतोष दानवे यांनी पुन्हा चंद्रकांत दानवेंना धूळ चारत २०१९ ची आमदारकी राखली… आपल्या वडीलांना भोकरदनमधून लोकसभेला मोठं लीड मिळवून द्यायचं तर दुसरीकडे पितापुत्रांनी मिळून भोकरदनची आमदारकी आरामात काढायची… दानवेंचं राजकारण असं मस्त – मजेत चाललं होतं… पण याला ब्रेक लागल तो यंदाच्या लोकसभेला… मराठा आरक्षणाचा जालना सेंटर पाँइंट असल्यानं त्याची झळ दानवेंना बसली.. खासदारकीला ते पडले.. पण सगळ्यात वाईट होतं ते त्यांच्या मुलाच्या म्हणजेच भोकरदन या विधानसभेतूनच दानवे पीछाडीवर होते.. थोडक्यात वडिलांच्या खासदारकीनंतर आता मुलाची आमदारकीही सध्या धोक्यात दिसतेय… त्यामुळे परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेैस शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवे विरुद्ध भाजपकडून संतोष दानवे असाच यंदाचाही सामना होणार असला तरी यंदा राष्ट्रवादीची तुतारी भोकरदन मध्ये वाजण्याचे जास्त चान्सेस असल्याचं बोललं जातंय…
तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे जालना विधानसभेचा… बियाणांची पंढरी आणि किंग ऑफ स्टील सिटी अशी जागतिक पातळीवर ओळख असलेले हे शहर… 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या सलग सहा निवडणुकींपैकी दोन वेळा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि चार वेळेस शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले… २०१४ ला खोतकर अवघं २९४ मतांच्या लीडने निवडून आले होते.. पण २०१९ ला युती होऊनही खोतकरांचा गेम झाला आणि गोरंट्याल निवडून आले… तेव्हापासून शिवसेनेचं सरकार सत्तेत असूनही खोतकरांसारखा मोठा नेता सत्तेत नव्हता. याचा त्यांच्या पाॅलिटीकल करिअरला मोठा सेटबॅक बसला… यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेलाही काँग्रेसच्या उमेदवाराला ९७९० मतांची मिळालेली आघाडी पाहता हाच ट्रेंड विधानसभेलाही कायम राहीला तर पुन्हा एकदा गोरंट्याल जालन्यातून विजयाचा गुलाल लावतील, असा सध्या इथला ट्रेंड दिसतोय..
चौथा मतदारसंघ येतो तो घनसावंगीचा… घनसावंगी मतदारसंघ आस्तिवात येण्याअगोदरपासून म्हणजे 1999 पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा बालेकिल्ला राहीलाय… टोपेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे अनेक प्रयत्न झाले पण कुणालाही यात यश आलं नाही… शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी अशा या मतदारसंघातील नेहमीच्या लढतीत हिकमत उढाण हे टोपेंना शिवसेनेकडून आव्हान देत असतात.. पण प्रत्येक वेळेस ते इथून पराभूत होत असतात… सध्या हिकमत उढाण हे ठाकरे गटात आल्याने आता विधानसभेसाठी उढाण शिंदे गटात जातील, अशी जोरदार चर्चा आहे.. त्यामुळे धनुष्यबाण विरुद्ध तुतारी अशा पहायला मिळणाऱ्या लढतीत यंदाही घनसावंगीचं वारं टोपेंच्या बाजूने झुकलेलं आहे, असं दिसतंय..
पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो बदनापूरचा…जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड या चार तालुक्यातील गावांचा मिळून बनलेला हा बदनापूर मतदारसंघ… २००९ ला हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला.. यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे संतोष सांबरे निवडून आले.. पण २०१४ ला युती आणि आघाडी स्वतंत्र लढल्याने शिवसेनेच्या सांबरेंचा पराभव होऊन भाजपचे नारायण कुचे निवडून आले… २०१९ लाही राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांना धोबीपछाड देत पुन्हा एकदा भाजपच्याच नारायण कुचे यांनी मैदान मारलं.. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रावसाहेब दानवे हे याच बदनापूर मतदारसंघातून खुप पिछाडीवर फेकले गेलेत… त्यामुळे बदनापूर विधानसभेच्या निकालाचा कल यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलाय, असं म्हणायला हरकत नाही.. त्यात संतोष सांबारे यांनी शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केल्यामुळे यंदा महाविकास आघाडीकडून ते विधानसभेच्या रिंगणात दिसतील, हे स्पष्ट आहे…
शरद पवार गटाकडून बबलू चौधरीही इच्छुकांच्या यादीत असल्याने आघाडीला बदनापूरमध्ये बंडाचा फटका बसू शकतो, असं सध्याचं वातावरण आहे..तर हे होते जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ.. आणि येणाऱ्या काळात बघायला मिळणारं इथलं संभाव्य राजकारण.. बाकी मराठा आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या विधानसभेलाही जालन्यात निर्णायक ठरु शकतो.. आता याचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला सहन करावा लागेल, हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहेच.. बाकी जालन्यात यंदा कोण महायुती की महाविकास आघाडी… तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंपापासून ते मोबाईल पर्यंत सर्वच क्षेत्रात आपले हातपाय पसरून देदीप्यमान यश मिळवलेली रिलायंस इंडस्ट्री लवकरच स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहे असं दिसतंय. कारण एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम Jio TV OS ची चाचणी करत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असून सॅमसंगच्या टिझेन ओएस आणि एलजी वेबओएसशी स्पर्धा करेल. त्यामुळे ग्राहकांना लवकरच बाजारात Jio चा Smart TV बघायला मिळू शकेल.
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी Google सोबत भागीदारीत Jio TV OS ची चाचणी करत आहे. एका अहवालानुसार, कंपनीच्या एका कार्यकारिणीने सांगितले आहे की Jio TV OS एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असेल, जे डेव्हलपर्सना स्मार्ट टीव्ही आणि इतर कनेक्टेड उपकरणांसाठी ऑप्टिमाइझ ॲप्स तयार करण्यास परवानगी देईल. याशिवाय, कंपनी Jio TV OS साठी कोणतेही परवाना शुल्क आकारणार नाही . यामुळे छोटे उत्पादक Jio TV OS चा सहज अवलंब करू शकतात. त्यामुळे भारतीय स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये स्पर्धा झपाट्याने वाढणार आहे. जिओ टीव्ही लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची चर्चा इथूनच सुरू झाली आहे.
स्मार्ट टीव्हीच्या मार्केटमध्ये जिओच्या एंट्री नंतर एलजी, सोनी सारख्या स्मार्ट टीव्ही कंपन्यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे Redmi, Realme सारख्या चिनी कंपन्या भारतातील स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये आधीपासूनच आपलं बस्तान बसवून आहेत आणि अतिशय कमी किमतीत ग्राहकांना टीव्ही उपलब्ध करून देत आहेत. मात्र जिओ टीव्हीच्या एन्ट्रीमुळे ग्राहकांना भारतीय कंपनीचा पर्यायही मिळेल