Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 621

Nutmeg Benefits | जायफळ आरोग्यासाठी आहे गुणांचा खजिना, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Nutmeg Benefits

Nutmeg Benefits | आपले भारतीय मसाले हे खूप गुणकारी आहेत. या मसाल्यामुळे जेवणाची चव तर वाढतेच, परंतु त्यासोबत आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असतात. त्यातील जायफळ हा आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारा एक मसाला आहे. हा मसाला मिरीस्टिका फ्रेग्रन्सच्या बियांपासून मिळतो. आयुर्वेदात जायफळाला खूप पूर्वीपासूनच महत्त्व आहे. जायफळ हा एक औषधी मसाला आहे. जायफळ (Nutmeg Benefits) हे पावडर स्वरूपात किंवा बियाणू स्वरूपात उपलब्ध होते. यात अनेक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. आता जायफळामुळे आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त | Nutmeg Benefits

जायफळमध्ये असलेले उच्च फायबर अन्न पचण्यास मदत करते. हे पाचक एंजाइम सोडण्यास देखील मदत करते, ज्यामुळे अन्न सहज पचते. यासोबतच यामध्ये असलेले कार्मिनेटिव गुणधर्म अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध

जायफळात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. इतकंच नाही तर अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत करतात.

वेदना आराम | Nutmeg Benefits

जायफळाचे तेल स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम देते. याशिवाय शरीराच्या कोणत्याही भागात सूज येण्यापासूनही आराम मिळतो.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

जायफळमध्ये असलेले काही आवश्यक घटक, औषधी गुणधर्मांनी समृद्ध, मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते, तणाव कमी होतो आणि नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर

जायफळात अँटीबैक्टीरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेचे आरोग्य वाढवतात. याच्या वापराने मुरुम आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होऊन त्वचा उजळ होते.

रोगप्रतिकारक शक्तीची ताकद

ॲन्टीऑक्सिडंटने भरपूर जायफळ शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

तोंडाची दुर्गंधी दूर करतात

जायफळमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडाची दुर्गंधी आणि दातांच्या पोकळीसारख्या सामान्य तोंडाच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. हे तोंड धुणे आणि टूथपेस्ट म्हणून वापरले जाते.

बेरोजगारांना 10 ते 12 हजार रुपये देणार!! नव्या घोषणेनं तरुणाई खुश

unemployed prashant kishore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार (Election Strategist) आणि जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहार मधील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. बेरोजगार तरुणांना 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार देणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच प्रशांत किशोर यांनी केलेल्या या घोषणेची बिहारमध्ये जोरदार चर्चा आहे.

नोकरीसाठी परराज्यात स्तलांतर हि बिहारची मुख्य समस्या आहे. त्यामुळेच याच मुद्द्यावर प्रशांत किशोर यांनी पहिले बोट ठेवलं. बेरोजगार असल्याने बिहारमधून नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्या तरुणांना येथे रोजगार देणार आहे. बेरोजगारांना बिहारमध्येच 10 ते 12 हजार रुपयांचा रोजगार दिला जाईल असं प्रशांत किशोर म्हणाले. बिहारमध्ये कशाप्रकारे रोजगार आणणार हे सुद्धा प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे तसेच बिहारच्या विकासाच्या रोडमॅपवरही त्यांनी भाष्य केलं. याशिवाय 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये किमान 5 जागतिक दर्जाच्या शाळा बांधण्याचा दुसरा संकल्प असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

वृद्धांना 2000 रुपये पेन्शन-

प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, सध्या बिहार सरकार ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा ४०० रुपये देतं. ज्या दिवशी ही व्यवस्था अस्तित्वात येईल, त्या दिवशी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्री-पुरुषांना दरमहा किमान २००० रुपये पेन्शन दिली जाईल अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली. प्रश्नात किशोर यांच्या या घोषणेचा विधानसभा निवडणुकीत त्यांना किती फायदा होतो ते पाहायला हवं.

Weather Update | पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह होणार अतिमुसळधार पाऊस

Weather Update

Weather Update | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच वेग घेतलेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभाग देखील रोजच्या पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त करत आहे. अशातच आजचा म्हणजेच 7 जुलै 2024 रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तो आता आपण जाणून घेणार आहोत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असणार आह, तर काही ठिकाणांना मात्र पावसाचा हाय अलर्ट जारी केलेला आहे.

आपण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बोलायला गेले, तर आज या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. येथील कमाल तापमान 33 ° सेल्सिअस किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.

आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक तर अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडण्याची देखील शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये घाट भागात देखील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आज ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे या विभागांना येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट वादळ वारा यांच्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढा वाऱ्याचा वेग असणार आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे पुणे, जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये घाट भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गोंदीया, चंद्रपूर, बुलढाणा, जालना, भंडारा, नांदेड, अमरावती, लातूर, धाराशिव, अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

मुंबईत उभारण्यात येणार नवं क्रिकेट स्टेडियम; 1 लाख 30 हजार प्रेक्षक बसू शकणार

Mumbai New Cricket Stadium

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काळात मुंबईमध्ये आम्ही नवीन क्रिकेट स्टेडियम (Mumbai New Cricket Stadium) उभारणार आहोत अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. हे स्टेडियम सध्याच्या वानखेडे स्टेडियमपेक्षा ४ पटीने मोठं असेल आणि त्यात एकाच वेळी तब्बल 1 लाख 30 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील असेही ते म्हणाले. भारताच्या विश्वविजेत्या संघातील ४ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधानभवनात सत्कार कऱण्यात आला त्यावेळी फडणवीसांनी आपल्या भाषणात नवीन क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याचे सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या रूपाने एक ऐतिहासिक असं स्टेडियम आहेच. परंतु आपल्या या क्रिकेटप्रेमी देशात हे स्टेडियम छोटं पडू लागलं आहे. अशा स्थितीत मुंबईत नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा विचार सुरू आहे. सर्व आधुनिक सुविधा असणारे हे स्टेडियम वानखेडेपेक्षा 4 पट मोठे असेल, अशी योजना आहे. वानखेडे येथे एकाच वेळी 32000 लोकांचे सामने पाहण्याची क्षमता आहे, म्हणजेच सुमारे 1 लाख 30 हजार लोकांना एकत्र बसून क्रिकेट सामन्याचा आनंद नवीन स्टेडियममध्ये घेता येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन स्टेडियमच्या आराखड्यावर चर्चा सुरू केली आहे.मात्र हे नवीन स्टेडियम कधीपासून उभारण्यात येईल याबद्दल मात्र त्यांनी कोणतीही माहिती सांगितली नाही.

दरम्यान, मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. क्रिकेटवेड्या मुंबईत आधीच तीन उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम आहेत. ज्यामध्ये वानखेडे व्यतिरिक्त, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमचा समावेश आहे. यातील वानखेडे स्टेडियम 32000 लोकांची आसन क्षमता आहे. तर डीवाय पाटील स्टेडियममध्ये 60 हजार आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये फक्त 20 हजार लोक बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु सध्या मुंबईतील बहुतांश सामने हे वानखेडे स्टेडियमवरच खेळवले जातात. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला होता ज्यामध्ये विजय मिळवत भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे अनेक अर्थानी वानखेडे स्टेडियम हे एक ऐतिहासिक स्टेडियम आहे.

वरळीत ‘हिट अँड रन’… चारचाकीने महिलेला फरफटत नेलं, चालक फरार

Worli Hit And Run

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघाताच्या वेगवेगळ्या घटना समोर आल्यात. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील वरळीत हिट अँड रनची (Worli Hit And Run) धक्कादायक घटना घडली. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीनं उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या अपघातात एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागेल आहे. तर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. फरार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. त्यातच भर म्हणजे अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार न थांबवता तशीच पुढे चालवत महिलेला फरफटत नेलं.

या अपघातात नवरा थोडक्यात वाचला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. सदर महिलेला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केलं. जर कार चालकाने वेळीच कार थांबवली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. या अपघातानंतर घाबरलेल्या कार चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. वरळी पोलीस चालकाच्या शोधात असून या प्रकरणात पुढील तपास करत आहे.

रोहित शर्माला मिठी मारताच नीता अंबानींना अश्रू अनावर; Video व्हायरल

nita ambani hug rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉन्सर्टलाही क्रिकेटपटूंनी तसेच मनोरंजन आणि क्रीडा जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचा चॅम्पियन खेळाडू रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचाही समावेश होता. यावेळी रोहित शर्माला (Rohit Sharma) मिठी मारताना नीता अंबानी (Nita Ambani) या खूपच भावुक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नीता अंबानी यांनी रोहित शर्माला मंचावर बोलावलं. रोहित स्टेजवर येताच नीता अंबानींनी त्याला मिठी मारली. यावेळी नीता अंबानी भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. आज रात्री मुंबई इंडियन्सचे कुटुंब माझ्यासोबत असणं किती छान वाटतं हे मी सांगू शकत नाही. या मुंबई इंडियन्सच्या परिवाराचा देशाला अभिमान आहे, यांच्यामुळे सर्वांचे हृदय अभिमानाने भरले आहे असं म्हणत नीता अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, या देशात विश्वचषक आणणे आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. हे त्या लोकांसाठी आहे जे खेळाचे समर्थन करतात आणि तो पाहतात आणि आपल्या सर्वांसोबतच, गेल्या 11 वर्षांपासून, त्यांना सुद्धा ही ट्रॉफी भारतात आणायची होती, शेवटी आपण ती आणलीच याचा मला खूप आनंद वाटत आहे.

दरम्यान, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचं खास कनेक्शन आहे. 2013 साली रोहित शर्माकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्सने तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र 2024 म्हणजेच यंदाच्या वर्षी रोहित शर्माची कर्णधारपदाची जबाबदारी काढली आणि मुंबईने हार्दिक पंड्याच्या खांद्यांवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. या निर्णयानंतर रोहितच्या चाहत्यांनी फ्रेंचायजीवर सडकून टीकाही केली होती.

Fish Oil Supplements | फिश ऑइल सप्लिमेंटमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या तोटे

Fish Oil Supplements

Fish Oil Supplements | आज-काल अनेक लोक फिश ऑइल सप्लीमेंट्स घेत आहोत. माशांच्या पेशीमधून काढलेले फॅटी ऍसिड हे त्या ऑइल फिश सप्लीमेंटमध्ये असतात. त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. आपल्या शरीराला ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची खूप गरज असते. या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड च्याअपुऱ्या सेवनामुळे आपल्या शरीरात ओमेगा थ्री फॅटी ऍसिडची गरज निर्माण होते आणि त्यामुळे अनेक लोक या सप्लीमेंट घेतात.

तुम्ही जर तुमच्या आहारात ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा समावेश केला, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अशा फिश ऑइल सप्लीमेंट घेण्याची गरज नाही. या ऑइल सप्लीमेंटमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो. यामुळे आपल्या शरीराला अनेक तोटे होतात. आणि हृदयासाठी देखील धोका निर्माण होतो. आता आपल्या हृदयाला कसा धोका निर्माण होतो हे आपण जाणून घेणार आहोत.

फिश ऑइल सप्लिमेंट हृदयाला हानी पोहोचवू शकते | Fish Oil Supplements

जरी फिश ऑइल सप्लिमेंटचा वापर हृदयाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी केला जातो, परंतु संशोधनानुसार, ज्या लोकांना आधीच हृदयाशी संबंधित धोका नाही, त्यांच्यामध्ये सप्लीमेंट घेतल्यानंतर आश्चर्यकारकपणे हा धोका वाढतो. ज्यांना आधीच हृदयविकार आहे, हे त्यांच्यासाठी फायदेशीर असल्याचे आढळून आले, परंतु सामान्य लोकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरल्यास ते रोगास उत्तेजन देण्यासाठी जबाबदार असल्याचे आढळले.

महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे

बीएमजे मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लाखो लोकांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या लोकांना पूर्वी कोणत्याही प्रकारचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग नव्हते, त्यांनी सप्लिमेंट घेतल्यानंतर, ॲट्रियल फायब्रिलेशनचा धोका वाढला होता. 13% पर्यंत आणि स्ट्रोक 5% पर्यंत वाढलेला आढळला. महिलांमध्ये, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदय अपयशाची शक्यता 6% नी वाढल्याचे दिसून आले. ही तुलना अशा लोकांशी केली गेली ज्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग नाही किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट घेतले नाही.

तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे

त्याच संशोधनात, हे देखील स्पष्ट झाले की ज्यांना आधीच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आहे, त्यांनी फिश ऑइल सप्लिमेंट घेतल्यानंतर, ॲट्रियल फायब्रिलेशनचे हृदयविकाराच्या झटक्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता 15% कमी झाली आणि हृदयाच्या विफलतेमुळे मृत्यूची शक्यता 9% कमी झाली. % देखील कमी झाला. यावरून हे स्पष्ट होते की शरीरात ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त नसावे आणि फिश ऑइल सप्लिमेंटचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा ‘या’ मतदारसंघातून लढवणार

Mahadev Jankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढची लोकसभा निवडणूक आपण बारामती मधून लढवणार आहे असं त्यांनी म्हंटल आहे. जानकर यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं बोलताना याबाबत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीत जानकर यांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता ते पुढची लोकसभा बारामती (Baramati) मधून लढवणार.

जानकर म्हणाले, पुढच्या निवडणुकीसाठी माझी आता बारामतीसाठी तयारी सुरू आहे. बारामती लोकसभा निवडणूक मी लढणार आहे. यापूर्वी मी महाराष्ट्रातील नांदेड, सांगली, माढा, परभणी, बारामती अशा ५ मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. या पाचही ठिकाणी माझा पराभव झाला आहे. पण मतदान वाढत चाललं आहे, मतदान कमी झालं नाही. आता बारामतीत ताकदीने लढून विजयी होणार असल्याचा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, २०२४ ची लोकसभा निवडणूक महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून लढली होती. ते खरं तर महाविकास आघाडीकडून मधून निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी जानकर यांनी महायुतीत जाऊन परभणी लोकसभा निवडणूक लढवली. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाच्या संजय बंडू जाधव यांनी जानकर यांचा दणदणीत पराभव केला. परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाला असं महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच आता महादेव जानकर यांनी बारामती मधून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

पुण्यातील रिक्षावाल्याकडून अंध, अपंग, गरोदर महिलांसाठी खास ऑफर; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Riksha Driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चा असते. पुण्यातील म्हणी आणि पुण्यातील माणसं आपल्या अनोख्या कृतीमुळे तर सोशल मीडियावर (Social Media) सतत चर्चेत असतात. आता देखील पुण्यातीलच एक ऑटो रिक्षावाला (Auto Riksha) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ऑटो चालकाने आपल्या रिक्षावर असे एक वाक्य लिहिले आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या एका कृतीतून पुणेकरांचे माणुसकी ही दिसून येत आहे.

दररोज सोशल मीडियावर अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो अमित परांजपे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोत ऑटो रिक्षाच्या मागच्या बाजूला “अंध, अपंग आणि गरोदर महिलांसाठी २ किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास” असा संदेश लिहला आहे. हा संदेश त्याच रिक्षाचालकाने आपला रिक्षावर आहे. त्यामुळे या रिक्षा चालकाचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. सांगितले जात आहे की हा रिक्षावाला पुण्यातील औंध परिसरातील आहे. त्यामुळे पुणेकर माणुसकीच्या बाबतीत कुठे आहे मागे पडत नाहीत? अशा कमेंट्स या फोटोवर येत आहेत. तसेच अनेकांनी या रिक्षा चालकाला भेटण्याची इच्छा ही व्यक्त केली आहे.

हार्दिकबद्दल खूप वाईट वाटले, शेवटी तो सुद्धा माणूस आहे; भाऊ कृणाल बरंच काही बोलला

hardik and krunal pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) अखेरच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारताचा विजय सोप्पा केला. हार्दिकच्या या दमदार कामगिरीमुळे सध्या संपूर्ण देशभर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच हार्दिकला काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या आयपीएलमध्ये टीकेचा सामना करावा लागला होता. भर मैदानात क्रिकेटप्रेमी त्याला ट्रॉल करत होते. या एकूण सर्व परिस्थितीवरून हार्दिकचा भाऊ आणि क्रिकेटर कृणाल पंड्याने (Krunal Pandya) भाष्य करत सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटले. त्याने या काळात खूप काही सहन केले. शेवटी तो देखील एक माणूस आहे त्यालाही भावना आहेत असं कृणाल पंड्याने म्हंटल आहे.

कृणाल पांड्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, हार्दिक आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात करून जवळपास एक दशक पूर्ण झाले आहे. मागील काही दिवस एखाद्या स्टोरीसारखे होते. ज्याचे आपण स्वप्न पाहिले होते ते अखेर सत्यात उतरले आहे. प्रत्येक देशवासीयांप्रमाणे मी देखील या क्षणाचा आनंद घेत आहे. मी माझ्या भावाकडे पाहून खूप भावुक झालो आहे. हार्दिकसाठी गेले सहा महिने सर्वात कठीण गेले आहेत. त्याच्यासोबत खूप वाईट झाले. तो केवळ याच्यासाठी पात्र नव्हता हे मला कळते. म्हणूनच एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटले. त्याने या काळात खूप काही सहन केले. शेवटी तो देखील एक माणूस आहे त्यालाही भावना आहेत. हार्दिक कसा तरी हसत हसत या सगळ्यातून बाहेर पडला, तरीही मला माहित आहे की त्याला हसणे किती कठीण होते.

तो कठोर परिश्रम करत राहिला आणि विश्वचषक मिळविण्यासाठी त्याला काय करावे लागेल यावर लक्ष केंद्रित केले कारण ते त्याचे अंतिम उद्दिष्ट होते. भारताचे दीर्घकाळचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने खूप चांगली कामगिरी केली. त्याच्यासाठी यापेक्षा मोठे काहीच नाही. वयाच्या ६ व्या वर्षापासून देशासाठी खेळणे आणि विश्वचषक जिंकणे हे स्वप्न होते. मी फक्त लोकांना आठवण करून देऊ इच्छितो की हार्दिकने त्याच्या कारकिर्दीत इतक्या कमी कालावधीत जे केले ते अविश्वसनीय आहे. राष्ट्रीय संघासाठी त्याने खूप काही केले. प्रत्येक वेळी, हार्दिकच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, लोकांनी त्याला हिणवले आहे आणि यानेच त्याला आणखी मजबूत केले. हार्दिकने नेहमीच सर्वप्रथम देशाचा विचार केला. बडोद्याहून आलेल्या एका लहान मुलासाठी आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मदत करण्यापेक्षा मोठी कामगिरी असू शकत नाही. हार्दिक, मला तुझा खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू प्रत्येक आनंदासाठी आणि तुझ्या मार्गावर येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहेस. माय बच्चू, मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे, अशा शब्दांत कृणाल पांड्याने हार्दिक बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त केलं.