Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 623

आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच राऊत बरसले

raut on waikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Clean Cheat) यांच्यावर सर्व गुन्हे मुंबई पोलिसांनी मागे घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी आहे असं म्हणत राऊतांनी प्रहार केला. यांचं लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले दाखल केले होते, किरीट सोमय्या यांनी आता यावर बोलावं असं आव्हान संजय राऊतांनी दिले. आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आता केवळ दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ओवाळून टाकलेल्या सर्व भ्रष्ट्राचारी लोकांना सरकार आपल्याकडे घेतेय आणि आमची ताकद किती आहे ते दाखवत आहे. खरं तर यांचं लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले दाखल केले होते. रवींद्र वायकर तर घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीन चिट दिली. याचा अर्थ आहे आहे कि तुम्ही आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना भीती दाखवली आणि पक्षात घेतलं. आमच्यासारखी लोक अशा धमक्यांना घाबरले नाहीत पण ज्यांचे काळीज उंदराचे आहे ते पळून गेले असं म्हणत संजय राऊतांनी रवींद्र वायकर यांच्यावर हल्लाबोल केला. स्वता मुख्यमंत्री पळून गेले, त्यांच्याबरोबर आमदार पळाले, अजित पवार पळून गेले. वायकरही त्यातलेच गेले. आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले हे भाजपने मान्य केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊतांनी किरीट सोमय्यां यांच्यावरही हल्लाबोल केला. किरीट सोमय्या हा फडतूस माणूस आहे. वायकर यांच्यावरील गुन्हे ज्याप्रकारे मागे घेण्यात आले आहेत त्याव र सोमय्यांनी बोलावं असं आव्हान संजय राऊतांनी दिले. जे कोणी खऱ्या बापाचे असतील किंवा सत्यवचनी असतील त्यांनी या वाशिंग मशीनवर बोलावं, वायकरसारख्या लोकांवरील खटले कसे मागे घेतले जात आहेत त्यावर बोलावं असं आव्हान संजय राऊतांनी दिले. रवींद्र वायकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायला हवा. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. एका आमदारावर एफआयर दाखल करता, ईडीकडे पाठवता आणि नंतर गुन्हे रद्द करता..असं संजय राऊत यांनी म्हंटल.

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024 | गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत मोठी भरती सुरु, असा करा अर्ज

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एका भरतीची जाहिरात निघालेली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागा अंतर्गत (Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत वकील या पदाच्या रिक्त जागा आहेत. या भरती अंतर्गत तब्बल 1318 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी आता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज उमेदवारांना ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करायचे आहेत. त्याचप्रमाणे 26 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारख्या अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024

  • पदाचे नाव – वकील
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज शुल्क – 2000 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन ईमेल
  • अर्ज पाठवण्याचा मेल आयडी – [email protected]
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 26 मे 2024

अर्ज कसा करावा ?

  • त्या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करताना सगळे कागदपत्र आवश्यक जोडा.
  • 26 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेला अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा ‘हा’ इतिहास तुम्हाला आजवर कुणीच सांगितला नसेल

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरिबांचा रॉबिनहुड, अंध अपंगांचा आधारवड, ज्यांच्या भाषणांनी विधान भवनात सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो… शेतकऱ्यापासून ते प्रत्येक उपेक्षित घटकासाठी आसूड काढण्याची धमक दाखवून सरकारवर प्रहार करणारे बच्चू कडू… विदर्भातल्या अचलपूरसारख्या एका साध्या मतदारसंघाचे आमदार राहिलेले बच्चू कडू यांचं नाव मात्र उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे… शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन असो… वा वनाधिकाऱ्यांच्या घरात साप सोडणं… हा माणूस कशालाच भीत नाही… आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर इन मीन दोन आमदार असणाऱ्या या प्रहार पक्षाची सर्वच राजकीय पक्षांना धास्ती का वाटते? बच्चू कडू या माणसाच्या राजकारणाचं गणित नेमकं आहे तरी काय? आणि येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव सर्वात फ्रंटला कसं दिसू शकतं? त्याच सगळ्याची साधी सोपी मांडणी पाहुयात… .

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला प्रहार 20 जागांवर निवडणूक लढवेल, अशी घोषणा करून बच्चू कडूंनी आमदारकीचं बिगुल वाजवलं… महाराष्ट्राच्या पॉवर पॉलिटिक्समध्ये तयार झालेला स्पेस भरून काढण्याची मोठी संधी यंदा प्रहारला चालून आली आहे… पण आजकालच्या स्पर्धेमध्ये बच्चू कडू नावाचा ब्रँड बनवणं… आणि राजकारणामध्ये मुरलेल्या, खानदानी आणि प्रस्थापित नेत्यांना भिडण्याचा हा प्रवास वाटतो तितका साधा नक्कीच नव्हता… या सगळ्याची सुरुवात झाली महाराष्ट्राच्या काठावर असणाऱ्या अमरावतीमधील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा या गावापासून… ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जन्म याच बेलोऱ्याचा…. चक्क आठवीत असताना तरुणांना बरबाद होण्यापासून वाचवण्यासाठी बच्चु भाऊंनी तमाशा बंदीसाठीच आंदोलन केलं होतं… तेव्हा पुऱ्या गावाला त्यांच्यातील डायरेक्ट भिडण्याच्या स्वभावाचा ट्रेलर बघायला मिळाला होता… त्यात पुढे बँकेचे हप्ते थकल्यामुळे ट्रॅक्टर जप्ती झालेल्या हवालदील शेतकऱ्यांसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामुळे बच्चू कडू हे नाव पंचक्रोशीत चांद्यापासून बांधापर्यंत माहित झालं… खरं म्हणजे प्रहारचा आसूड हातात घेणारे बच्चू भाऊ बाळासाहेबांचे जब्री फॅन म्हणूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली…

अडलेल्या नडलेल्या साठी धावून जाणाऱ्या याच बच्चु भाऊंना राजकारणात येण्याचा कार्यकर्त्यांनी तगादा लावला… म्हणून त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती एकामागून एक लढवली… आणि जिंकली देखील… यानंतर त्यांनी लावलेल्या कामांचा सपाटा इतका मोठा होता की बच्चुभाऊ हे नाव पंचक्रोशीत आदरानं घेतलं जाऊ लागलं… इंटरेस्टिंग गोष्ट अशी की स्वतःच्या लग्नात देखील मोठा तामजम न करता गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रभक्तीपर गीतांच्या आवाजात दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करून बच्चु भाऊंनी लग्नाचा नवा पायंडा पाडला होता… पण शिवसेना पक्षातील असणाऱ्या अंतर्गत कुरघोडींमुळे बच्चूभाऊंनी पक्ष सोडला… आणि प्रस्थापितांच्या नाकावर टिच्चून स्वतंत्र राजकारण करण्याचा निर्णय घेतला…पण ते कसं आणि कुठल्या नावाखाली करायचं? हा मोठा प्रश्न होता…

याच दरम्यान एकदा बच्चूभाऊ टीव्हीवरती नाना पाटेकरांचा प्रहार हा सिनेमा बघत होते… भ्रष्टाचाराच्या प्रश्नांना या चित्रपटातून नायक भिडत असतो… पण खऱ्या खुऱ्या आयुष्यात बच्चुभाऊ हे पात्र अक्षरशः जगत होते…त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना बोलावून घोषणा केली… अपंग बांधव, रुग्ण, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी राजकारण करण हे आपलं काम आहे, आणि यासाठी आता आपल्याला कोणताही अडथळा नको आहे… त्यामुळे आता आपण अपक्ष… आपली संघटना ‘प्रहार संघटना’… या घोषणेपासून ते आजपर्यंत प्रहारची चळवळ एका खेड्यातून सुरू होत आज पश्चिम महाराष्ट्रासारख्या सधनपट्ट्यातल्या खेडोपाडी जाऊन पोहचलीय… अपंगांचे प्रमाणपत्र काढून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण, वेळ पडलीच तर मोर्चे आंदोलन काढणं ही काम संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू होती… त्याचीच पावती म्हणून की काय 2004 च्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चु भाऊ अपक्ष म्हणून पहिल्यांदाच आमदार झाले… तेव्हापासून सलग चार टर्म त्यांनी अचलपूरमधून अपक्ष निवडून जाण्याचा नवा रेकॉर्ड रचला… यामुळे झालं असं की तालुक्याचा गावचा विचार करणाऱ्या बच्चू भाऊंनी आता उभ्या महाराष्ट्राला हादरे द्यायला सुरुवात केली…

आमदाराची राहुटी आपल्या गावी, घंटो का काम मिंटो मे, जनता दरबार अशी मतदार संघातील लोकांची काम मार्गी लावतानाच राज्यातील प्रश्नांना भिडण्याचीही हिंमत दाखवली… आंदोलनं ही स्टंटबाजी म्हणून नाही तर पॉवर पॉलिटिक्स म्हणून करायची असतात, हे घेरलं ते बच्चू भाऊंनीच… आदिवासी कसत असणारे शेतजमीन त्यांच्या नावावर करण्याचा शासन आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बच्चू भाऊंनी स्वतःला जमिनीत अर्ध गाडून घेत आंदोलन केलं… आदिवासी समाजाला वनपट्टे देण्यात कचराई केल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या घरात साप सोडून आंदोलन, अधिकाऱ्यांच्या सततच्या गैरहजरीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून केलेलं अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन, कापसाला बाजार भाव दिला नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं सामूहिक मुंडन, दारूबंदीसाठी दारूंच्या दुकानासमोर केलेलं दूध वाटप आंदोलन, आश्वासनांचं गाजर दाखवणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांवर काळया रंगाचे पट्टे मारून आंदोलन, जंगल बुक आंदोलन, च्याव म्याव आंदोलन, रक्षाबंधन आंदोलन, विदर्भ मिल आंदोलन एवढंच नाही तर शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर सलग दोन दिवस राहून कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाने शासन आणि प्रशासनाला कित्येक वेळा सुता सारखं सरळ करण्यात बच्चू भाऊंना यश आलय…

दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे… देहू ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर अपंगांची पालखी यात्रा असो, अपंग बांधवांना घेऊन विधानभवनात काढलेली तीन चाकी सायकल रॅली, संपूर्ण आठवडाभर एक हात गळ्यात बांधून विधानसभेत शासनाच्या कानापर्यंत दिव्यांगांच्या समस्यांचा आवाज जाण्यासाठी बच्चु भाऊंनी हरेक प्रकारे प्रयत्न केले… आणि अनेक यशस्वीही करून दाखवले… रुग्णांसाठी निधी उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष रुग्णालयात येणाऱ्या लहान सहान गोष्टींसाठी आजही प्रहारची रुग्ण सेवा समिती काम करताना दिसून येते… तब्बल 25 हजार दिव्यांगांचा दिल्लीत मोर्चा घेऊन जाणारे बच्चू कडू हे कदाचित पहिलेच अपक्ष आमदार असतील… त्यांचं सर्पमित्र असणं…आणि घोडेसवारी जमणं यांसारख्या कौशल्यांचाही त्यांनी आंदोलनासाठी वापर करून घेतला हे विशेष…

शेतकऱ्यांच्या विविध काढलेली आसूड यात्रा तर या सगळ्यांची हाइप होती.. यामुळे बच्चू कडू या नावाबद्दल प्रत्येकाच्याच मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला… पण हे सगळ करूनही बच्चू कडूंना अनेक राजकीय यशापयश आले… प्रहारचा विस्तार, कामाच्या पद्धती, संघटना वाढत गेली पण म्हणावं इतपत यश संघटनेला आलं नाही… 2019 च्या निवडणुकीत प्रहारचे दोन आमदार निवडून आले… एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे मेळघाटचे राजकुमार पटेल. बच्चू कडूंच्या आजवरच्या राजकारणचा फोकस हा शेतकरी, कष्टकरी, अपंग वर्गावर असल्यामुळे जमिनीवरचा कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पण खोक्यांच्या आरोपांमुळे बच्चू कडूंच्या प्रतिमेला बसलेला धक्का पुसण्याचं मोठं आव्हान पक्षापुढे असणार आहे… त्यात राणा यांच्या वर्चस्वाला आव्हान देऊन त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपलं उपद्रव्य मूल्य दाखवून दिलय… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला एकला चलो रे चा नारा देऊन बच्चू कडूंनी मोठं पॉलिटिक्स खेळलय… आता त्यात त्यांना कितपत यश येतंय? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…

Cough and Cold | पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून राहा सावध; ‘या’ घरगुती उपायांचा करा अवलंब

Cough and Cold

Cough and Cold | पावसाळ्यामध्ये अनेक आजार होण्याचे धोके असतात. कारण वातावरण सगळे थंड असते. अशावेळी खोकला, सर्दी आणि फ्लूचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. कारण यावेळी हवेतील आद्रता वाढते आणि हवेत विषाणू आणि जिवाणूंचे प्रमाण देखील वाढते. विषाणू आणि जिवाणूंना वाढण्यासाठी ओलसर जागा गरजेची असते. आणि पावसाळ्यामध्ये त्यांना ते पोषक वातावरण मिळते. त्यामुळे पावसाळ्यात विषाणू हवेत सहज पसरतात. आणि याच कारणामुळे सर्दी, खोकला, फ्लू आणि ताप (Cough and Cold) होत असतो.

अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच सर्दी, खोकल्याची (Cough and Cold) लक्षणे दिसतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक्षक कमी आहे. अशा लोकांना लगेच सर्दी होते. अशावेळी तुम्ही पावसाळ्यामध्ये स्वतःची जास्त काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सर्दी, खोकला झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करू शकता. आज आपण सर्दी आणि खोकला झाल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे हे जाणून घेणार आहोत.

तुळशीचे पाणी | Cough and Cold

तुळशीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे बॅक्टेरिया आणि विषाणूंच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी-खोकला बरा करण्यासाठी आयुर्वेदात अनेक वर्षांपासून तुळशीचा वापर केला जातो. तुळशी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते, जी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या हंगामी फ्लूशी लढण्यास मदत करते. यासाठी तुळशीची काही पाने पाण्यात उकळून गाळून प्या.

आले आणि लवंग चहा

आले आणि लवंग दोन्ही सर्दी आणि खोकला रोखण्यास मदत करतात. त्यांचा स्वभाव उष्ण असतो, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त, आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील जळजळ कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

हळद आणि दूध

हळदीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे जंतूंशी लढण्यास मदत करतात. हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी रात्री गरम दुधात हळद मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरते.

गरम सूप | Cough and Cold

सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी गरम सूप पिणे देखील खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही टोमॅटो किंवा लसूण सूप पिऊ शकता, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसणात अँटी-मायक्रोबियल तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे तुम्हाला मौसमी फ्लूपासून वाचवण्यास मदत करतात.

Eye Care Tips | पावसाळ्यात होऊ शकतो डोळ्यांचा संसर्ग; अशाप्रकारे घ्या काळजी

Eye Care Tips

Eye Care Tips | पावसाळा ऋतू अनेकांना आवडतो. परंतु पावसाळा आला की, त्याच्यासोबत अनेक आजार देखील येत असतात. पावसाळ्यात डोळ्याच्या संसर्गाचा धोका देखील सगळ्यात जास्त असतो. आपल्या शरीरातील डोळे हा अवयव अत्यंत संवेदनशील असतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्गाचा जास्त धोका असतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधने खूप गरजेचे असते. परंतु त्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात देखील काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांचे (Eye Care Tips) संबंधित अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला डोळ्यांच्या संसर्गापासून आराम मिळेल.

वारंवार हात धुवा | Eye Care Tips

पावसाळ्यात हातांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. तुमच्या जवळ सॅनिटायझर असल्यास ते चांगले आहे, अन्यथा तुम्ही ते साबण आणि पाण्याने देखील स्वच्छ ठेवू शकता. हे महत्त्वाचे आहे कारण हवेतील आर्द्रतेमुळे जंतू वेगाने पसरतात आणि जर तुम्ही कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर डोळे चोळले किंवा स्पर्श केला तर संसर्गाचा धोका वाढतो.

मेकअप प्रोडक्टस स्वच्छ ठेवा

मेकअप प्रोडक्टस किंवा विशेषत: डोळ्यांचा मेकअप वापरताना ब्रश, आयलाइनर आणि मस्करा निर्जंतुक करण्यास विसरू नका, कारण ते एकापेक्षा जास्त वेळा किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला वापरल्यास डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो.

पावसात काळजी घ्या

पावसाळ्यात डोळ्यांना बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो, अशा परिस्थितीत त्यांना चिखल किंवा घाण पाण्यापासून संरक्षित ठेवा आणि पावसात भिजल्यानंतर किंवा आंघोळीनंतर डोळे साध्या पाण्याने धुवा.

स्वच्छतेची काळजी घ्या | Eye Care Tips

या ऋतूमध्ये चुकूनही तुमचा रुमाल किंवा टॉवेल कोणाशीही शेअर करू नका. आम्ही तुम्हाला सांगतो की, वैयक्तिक काळजीशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरियाचा धोका असतो, अशा परिस्थितीत डोळ्यांचा संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टी इतर लोकांच्या आवाक्याबाहेर ठेवणं आणि त्यांची स्वच्छता करत राहणं गरजेचं आहे.

पोहणे टाळा

या ऋतूत बॅक्टेरिया आणि विषाणूंचा प्रसार झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत स्विमिंग पूलवर जाणेही टाळावे. हे पाणी तुमच्या डोळ्यांसाठीच नाही तर नाक, कान आणि त्वचेसाठीही खूप हानिकारक ठरू शकते.

Agriculture State Award | महाराष्ट्राला कृषी राज्य पुरस्कार जाहीर! एकनाथ शिंदे राहणार कार्यक्रमाला हजर

Agriculture State Award

Agriculture State Award | संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्राला 2024 कृषी राज्य पुरस्कार (Agriculture State Award) जाहीर झालेला आहे. या ठिकाणी भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम हजर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जुलैला नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार आहेत.

10 जुलैच्या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राझील, अल्जीरिया, नीदरलॅंड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना महाराष्ट्रात नेहमीच आणल्या जातात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी या योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 21 लाख हेक्टरवर बांबू लावण्याचा सर्वात मोठा मिशन यावेळी हाती घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचवण्यासाठी तब्बल 123 योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम देखील दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नॅनो तंत्रज्ञानाद्वारे खतांच्या वितरण करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 4.63 लाखांची मदत केलेली आहे.

याआधी 2023 ला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार (Agriculture State Award) बिहारला मिळाला आहे. तर 2022 तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशला देण्यात आला होता. साल 2008 ला या पुरस्काराची सुरुवात डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत करण्यात आली होती. 2008 चा पुरस्कार आंध्रप्रदेशला देण्यात आला होता.

मोदी सरकार ऑगस्टमध्ये कोसळणार; INDIA आघाडीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

MODI GOVERNMENT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार (Modi Government) ऑगस्ट महिन्यात कोसळणार असून निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राष्ट्रीय जनता दलचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. शुक्रवारी (05 जुलै) आरजेडीचा 28 वा स्थापना दिवस पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संभोधित करताना लालू यांनी मोदी सरकार कोसळल्याची भविष्यवाणी केली. लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या दाव्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लालूप्रसाद यादव म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार अत्यंत कमकुवत असून ऑगस्टमध्ये पडणार आहे. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ शकतात. यासाठी तयारीला लागा. डिसेंबर २०२४ किंवा २०२५ मध्ये जेव्हाही विधानसभा निवडणुका होतील तेव्हा बिहारमध्ये आणि देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल असेही त्यांनी म्हंटल. लालू यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनीही आपल्या पित्याची री ओढली. केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. आम्ही लोकसभेत चांगली लढत दिली. जर आम्हाला आणखी काही जागा मिळाल्या असत्या तर पंतप्रधान सत्तेत राहिले नसते असं तेजस्वी यांनी म्हंटल.

भाजपचा लालूंवर हल्लाबोल –

दरम्यान, लालूंप्रसाद यादव यांच्या सरकार कोसळण्याच्या भविष्यवाणीवरून भाजपने मात्र हल्लाबोल केला आहे. लालू यादव आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्याला पडलेले स्वप्न खूप त्रासदायक आहे. लालूप्रसाद यादव बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतमातेच्या मुलांचे आशीर्वाद लाभले असून, तिसऱ्यांदा भारताची विश्वगुरूच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे घाबरले आहेत असं म्हणत भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी लालू यांच्यावर निशाणा साधला आहे.

Pune Crime : पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

pune women police pouring petrol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) मागील काही महिन्यापासून कायदा सुव्यस्था पुरती बिघडली आहे. पोर्शे कार अपघात, ससून ड्रग रॅकेट, कोयता गॅंगमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी बनललेया पुण्यातुन आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. याच दरम्यान, वाहनातील एकाने संबंधित महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्याच्या हातातील लाईटर पेटू न शकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या प्रकरणी आरोपी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपीनं दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत चक्क पोलिस अधिकाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळं पुन्हा एकदा पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यात वाहतूक पोलीस सुद्धा सुरक्षित नाहीत का? पुण्यातील कायदा व्यवस्था वेशीला का टांगली गेली आहे? तसेच पुण्यात आणखी काय काय बघायला मिळणार असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकाकडून केला जात आहे.

Weather Update | आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाने दिला हायअलर्ट

Weather Update

Weather Update | जुलै महिना सुरू होताच, पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. हवामान विभागाने देखील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता आज म्हणजेच 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा हाय अलर्ट चालू केलेला आहे. या ठिकाणी अति मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणातील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाकडून दिलेला आहे.

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 6 जुलै रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस असल्याने या ठिकाणी येलो अलर्ट जारी आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

आज पुण्यात देखील हाय अलर्ट जारी केलेला आहे. पुण्यात ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आजचे तापमान या ठिकाणी कमाल 31 अंश सेल्सिअसते 22 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. मागील चार दिवसांपासून मराठवाड्यातील पाऊस देखील जरा कमी झालेला आहे. परंतु आज या ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन दिवसात मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भात देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार आज अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, नाशिक या जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे. अनेक शेतकरी या पावसामुळे सुखावलेले आहेत. कारण त्यांच्या आता भात लावणीच्या कामाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे.

Ravindra Waikar Clean Cheat : रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे; मुंबई पोलिसांची क्लीन चीट

Ravindra Waikar Clean Cheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) वायकराना क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. आता मात्र मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे. वायकरांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही. गैरसमजातून, चुकीच्या माहितीवरुन या प्रकरणात मुंबई महापालिकेन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला,’ असा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेनं काढला आहे

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेले. पक्षांतर करा, अन्यथा तुरुंगात जा, असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते, असं वायकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांना क्लीन चिट मिळाली असून त्यांची तुरुंगवारी टळण्याची शक्यता आहे. म्हणजेच विरोधात असताना जे वायकर भ्रस्ट होते तेच आता सत्तेत गेल्यानंतर क्लीन झाले कि काय असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.