Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 624

Ladki Bahin Yojana | घरबसल्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेची सध्या राज्यभर चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून आता पात्र असलेल्या महिलांना दर महिन्यातील दीड हजार रुपये सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

आता सगळ्यांची या योजनेचे अर्ज भरण्याची लगबग चालू झालेली आहे. त्यासाठी कागदपत्रे देखील जमा करत आहेत. आता आपण या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? त्याचप्रमाणे अर्ज कसा भरावा? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचा अर्ज तुम्ही आता तुमच्या मोबाईलद्वारे देखील भरू शकता. आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज करण्याची पद्धत आपण जा.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा ? | Ladki Bahin Yojana

  • मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करायचा आहे.
  • या ॲपद्वारे तुम्ही अर्ज करू शकता.आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा.
  • या ॲपवर आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ओटीपी आणि टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करा आणि एप्लीकेशनला लॉगिन करा.
  • आता तुमच्यासमोर एक प्रोफाईल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल.
  • यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा तालुका, जिल्हा त्याचप्रमाणे तुम्ही गृहिणी आहात ग्रामसेवक आहात की आणखी काही आहात या सगळ्याची माहिती भरायची आहे. यानंतर तुमचे प्रोफाईल अपडेट झाले असेल.
  • यानंतर आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • परंतु हे करताना तुम्हाला सगळ्यात आधी या एप्लीकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल हा फॉर्म तुम्ही न चुकता भरायचा आहे. यावर तुमचा आधार कार्डवर जी माहिती आहे. तीच माहिती येथे टाकायची आहे.
  • यावर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचे नाव, जन्मतारीख पती किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
  • त्याचप्रमाणे तुम्ही जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल, तर नाही या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे?हे टाकायचे आहे.
  • तसेच तुमचे लग्न आधीचे संपूर्ण नाव तेथे टाकायचे आहे.
  • जर महिलेचा जन्म हा दुसऱ्या राज्यात झाला असेल तर हो असा पर्याय निवडा आणि महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर अर्जदाराची बँक तपशील तुम्हाला भरायचे आहे. यामध्ये अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी कोड आधार कार्ड खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर आता तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय येईल.
  • यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आधीवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जर प्रांतात झाला असेल, तर त्याचा दाखलाही कागदपत्र अपलोड करायची आहेत.
  • आता सर्व कागदपत्र अपलोड केल्यावर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही मोबाईल कॅमेरा आणि महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.
  • फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला एक्सेप्ट हमीपत्र दिसेल यावर क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही अपलोड केलेली कागदपत्र तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचे आहे. आणि त्यानंतर सबमिट फॉर्म या बटणावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे.
  • अशा पद्धतीने तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Indian Railway : महिलांनो बिनधास्त करा रेल्वेने प्रवास ! तुमच्यासाठी असतात खास अधिकार,जाणून घ्या

Indian Railway : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे नेटवर्क पसरले आहे. कमी पैशात आरामदायी सेवा देणारी सार्वजनिक वाहतूक म्हणून इतर वाहतुकींपेक्षा सर्वात जास्त प्रेफरन्स रेल्वेला दिला जातो. शिवाय दूरच्या आरामदायी प्रवासासाठी सुद्धा रेल्वेचे तिकीट काढले जाते. मात्र एकट्या महिलेने रेल्वेने प्रवास करीत असताना. रेल्वेकडून (Indian Railway) महिलांना काही खास सोयी उपलब्ध करून दिल्या जातात याच सोयींबद्दल आजच्या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

महिलांसाठी राखीव कोच (Indian Railway)

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश महिलांना माहिती नसेल की महिलांसाठी रेल्वेमध्ये खास राखीव कोचची सोय केलेली असते. 150 किमी अंतरापर्यंतच्या उपनगरीय गाड्यांमध्ये सुद्धा हा राखीव कोच असतो. शक्यतो महिलांसाठी शेवटचा डब्बा राखीव असतो.

तिकीट नसतानाही करू शकतात प्रवास

बऱ्याचदा रेल्वेचे तिकीट नसेल तर त्यांना दंड केला जातो. रेल्वे कर्मचाऱ्यांना अशा प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्याचे सुद्धा अधिकार असतात. मात्र रात्रीच्यावेळी एकटी महिला प्रवास करीत असेल तर महिलेचे तिकीट (Indian Railway) वैध नसले तरी तिला कर्मचारी रेल्वेतून बाहेर काढू शकत नाहीत. महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा नियम बनवलेला आहे.

सुरक्षेला प्राधान्य (Indian Railway)

महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते गरज भासल्यास त्या नियमात महत्त्वाचे बदल देखील करण्यात येतात. त्याचप्रमाणे राखीव डब्यातून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची विचारपूस केली जाते. त्यासाठी महिला सुरक्षा कर्मचारी हे प्रवासादरम्यान तैनात करण्यात येतात.

सीट बदलता येते

जर ट्रेनमध्ये महिला एकट्याने प्रवास करत असेल आणि आपल्याला (Indian Railway) मिळालेली सीट कम्फर्टेबल वाटत नसेल तर या संदर्भात टीटीईला माहिती देऊ शकते. आणि या महिलेला हवे असल्यास सीट बदलून देखील मिळते.

स्वतंत्र वेटिंग लाऊंज

एखाद्या वेळेस ट्रेनला स्टेशनवर यायला उशीर झाला तर रेल्वे स्थानकावर वेळ घालवण्यासाठी (Indian Railway) वेटिंग लाऊंजची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी करण्यात आलेली असते. महिलेच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये त्यामुळे महिलांसाठी खास लाउंज देखील रेल्वे कडून उपलब्ध करण्यात आलेले असते.

“भारताचा राजा, रोहित शर्मा…”; विधानसभेत जोरदार घोषणाबाजी

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तब्बल 17 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप (World Cup) जिंकल्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयामागे भारतीय खेळाडूंचा मोठा हात असल्यामुळे त्यांचे देशभरातून कौतुक केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज विधानसभेत T20 वर्ल्ड कप विजयी संघातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये, कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचा समावेश होता. खास म्हणजे, यावेळी विधानसभेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाचा जोरदार जयघोष झाला.

आज विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये विजय खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये टीम इंडियाच्या चारही खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यावेळी रोहित शर्मा मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे आला तेव्हा त्याच्या चहात्यांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच , “भारताचा राजा रोहित शर्मा” असे म्हणत त्याच्या नावाचा जयघोष केला. हे पाहून रोहित शर्माला देखील भरून आले.

आपले मनोगत व्यक्त करताना रोहित शर्मा म्हणाला की, “हे यश काही आमच्या चौघांचं नाही, साऱ्या टीम इंडियाचं आहे. बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला आम्ही बसवला असता” रोहितच्या या वक्तव्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये एकच हशा पिकला. त्याचबरोबर, “आमच्यासाठी विधानसभेमध्ये असा काहीतरी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे हे पाहून प्रचंड आनंद झाला आहे.” अशा भावना ही व्यक्त केल्या.

Cleaning Tips : डास, माशांना घरात नो एन्ट्री ! लादी पुसताना पाण्यात मिसळा ‘हे’ दोन घटक

Cleaning Tips : पावसाळ्याचे दिवस आले म्हटलं की घरामध्ये माशा,डास आणि इतर कीटक घोंगावतात तुम्ही घर कितीही स्वच्छ ठेवला तरी पावसाळ्याच्या दिवसात माशा घरामध्ये अनेकदा घोंगावताना दिसतातच . शिवाय डास आणि माशा यामुळे अनेक भयंकर रोग उद्भवतात त्यामुळे वेळीच तुमच्या घरातून डास आणि माशांना पळवून लावा. तुमच्या घरामध्ये तुमच्या फरशीवर हे कीटक येत असतील तर तुम्ही त्यांना पळवून लावू शकता. यासाठीच आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया…

किडे येऊच नयेत म्हणून…

  • बाथरूम आणि टॉयलेट मध्ये एक्झॉस्ट फॅन बसवा.
  • ज्या ठिकाणी घरामध्ये जास्त प्रमाणात कीटक येतात त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर घालून ठेवा
  • कपाटात किडे होऊन त्यासाठी घरामध्ये लवंग ठेवा
  • उरलेलं अन्न खरखट हे उघड्यावर ठेवू नका त्यामुळे घरात झुरळांची पैदास वाढते.

मीठ आणि लिंबू

तुम्ही दररोज घरामध्ये फरशी पुसत असताना दोन गोष्टी जर त्यामध्ये ऍड केल्यात तर घरामध्ये कीटक येणार नाहीत. फरशी पुसत असताना एका बादलीमध्ये पाणी घ्या त्यात एक चमचा मीठ आणि लिंबाचा रस मिसळा हे पाणी वापरून लादी पुसल्याने किडे फरशीवर दिसणार नाहीत. या व्यतिरिक्त एक कप पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्यात मीठ घाला. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि फरशी पुसल्यानंतर भिंती आणि फरशांवर शिंपडा त्यामुळे किडे दूर होतील.

काळी मिरी

मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी काळी मिरी फरशी पुसण्यासाठी तुम्ही वापरू शकता. फरशीवर काळी मिरी पूड घालून तुम्ही फरशी स्वच्छ करू शकता त्यासाठी एका पाणी घ्या आणि त्या मध्ये एक चमचा काळी मिरीची पावडर घाला. हे पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर फरशी पुसा फरशी स्वच्छ होईल शिवाय काळ्या मिरीच्या वासामुळे किडे दूर पळून जातील.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही फरशी पुसू शकता फरशीवर कीटक येणार नाहीत. यासाठी एक चमचा व्हिनेगर घ्या त्यामध्ये बेकिंग सोडा घालून फरशीच्या पाण्यात घालून फरशी पुसून घ्या.

पर्यटकांसाठी ही जीवघेणी पर्यटन स्थळे बंद; वाचा कोणत्या ठिकाणी कोणकोणते नियम लागू

Tourism News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्यात पर्यटकांसाठी विविध पर्यटन स्थळे खुली करण्यात येतात. परंतु सध्या याच पर्यटन स्थळांवरून धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यामुळेच येत्या ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील विविध नियम लागू झाले आहेत. या नियमांचे पालन केल्यास पर्यटकांवर कठोर कारवाई केली जाईल.

याठिकाणी बंदीचे आदेश

वरसगाव धरण, सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, माळशेज घाट, शिवनेरी, माणिकडोह, भाटघर धरण, चासकमान धरण, भोरगिरी घाट येथे बंदीचे आदेश लागू आहेत.

हे धबधबे आणि धरणे बंद

कोल्हापूर मधील धबधब्यांकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, शाहूवाडी परिसरातील धबधबे आणि धरणाजवळ पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. तसेच शाहुवाडी येथील धबधबे आणि पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर बरकी, केर्ले ऊखलू धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद ठेवले आहेत.

अजिंठा फोटो आणि रील काढण्यास बंदी

अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात फोटो किंवा रील काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच लेणीवर देखील फोटो, रील, व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी बंदी घातली आहे. कारण की याठिकाणी निसर्गाचे सौंदर्य पाहून व्हिडिओ फोटो काढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पर्यटक जोखीम पत्करून धोक्याची ठिकाणी जात आहेत.

ठाण्यातील ही ठिकाणे बंद

कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट अशा विविध पर्यटन स्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विरोधकांनो, तुम्ही महिलांना दमडी तरी दिली का? 5000 रुपयांची मागणी करणाऱ्या विरोधकांवर अजितदादा खवळले

ajit pawar vidhan bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin) या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षापर्यंतच्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. एकीकडे या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र १५०० ऐवजी ५००० रुपये द्यावेत अशी मागणी केली होती. विरोधकांच्या या मागणीनंतर अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच खवळले. तुम्ही महिलांना दमडी तरी दिली का? असा संतप्त सवाल अजितदादांनी विरोधकांना केला.

विधिमंडळात आज अजित पवारांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. विरोधक महिलांना दरमहा ५ हजार द्या म्हणतात, पण तुम्ही दमडी तरी दिली होती का?’’असा सवाल अजित पवारांनी केला. आपल्या खिशामध्ये किती आहे ते पाहूनच ओवाळणी टाकावी लागते. खिसा मोकळा असला तर फाटक्या खिशातून काही दमडी देता येईल का? असा प्रश्नही अजित पवारांनी केला.

यावेळी अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांनाही प्रत्युत्तर दिले होते. आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही एक लाख रुपये देणार होतो असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, बाबा आम्ही महिन्याला १५०० म्हणजेच दरवर्षी महिलांना १८ हजार देतोय यासाठी आपल्याला ४६ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकूण अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत. जर आपण वर्षाला १ लाख रुपये याप्रमाणे हिशोब केल्यास अडीच लाख कोटी रुपये लागतील. त्यामुळे आपलं आपलं बजेट किती, काहीतरी लोकांना पटेल, असं सांगा असे म्हणत अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!! भाजपाचे नगरसेवक, माजी उपमहापौर शिवबंधन बांधणार

Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राज्यातील पक्षाने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. कशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठी खेळी खेळली आहे. कारण की, आता लवकरच येथील भाजपचे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे आता भाजपाला आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सात जुलै रोजी भाजपाचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपच्या मंत्री अतुल सावे यांना आणि शिवसेनेच्या आमदार संजय शिरसाठ यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे, ठाकरे गटात सहभागी होणाऱ्यांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. एकाने नगरसेवक आले तर विधानसभा निवडणूक लढवली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये 6 ते 8 माजी नगरसेवक, 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत संमती सदस्य, 1 तालूका अध्यक्ष, 1 युवा मोर्चा अध्यक्ष , 5 मंडळ अध्यक्ष यांचा समावेश आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मोठा डाव टाकल्याचे म्हणले जात आहे. तसेच, हे सर्व महत्त्वाचे व्यक्ती उद्धव ठाकरे गटात आल्यानंतर याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला होईल, असेही म्हणले जात आहे.

Bajaj CNG Bike Launched : जगातील पहिली CNG Bike लाँच; 330 KM पर्यंत मायलेज

Bajaj CNG Bike Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध ऑटोमोबाईल निर्माता कंपनी बजाजने जगातील पहिली CNG बाईक लाँच (Bajaj CNG Bike Launched) केली आहे. Bajaj Freedom CNG असे या गाडीचे नाव असून ऑटोमोबाईल विश्वातील ही नवी क्रांती म्हणावी लागेल. कारण यापूर्वी आपण CNG कार बघितल्या असतील परंतु CNG बाईक आजपर्यंत बाजारात आली नव्हती. आता मात्र बजाज कंपनीने CNG बाईक बाजारात आणली असून या गाडीमुळे ग्राहकांचे पेट्रोलची चिंता मिटणार आहे तसेच आर्थिक ताण सुद्धा कमी होणार आहे. बजाज कंपनीची हि सीएनजी बाईक बाजारात चांगलाच धुमाकूळ घालेल असं बोलल जात आहे. या सीएनजी बाइकमध्ये नेमकं काय खास आहे? ती किती किलोमीटर पर्यंत रेंज देईल आणि तिची किंमत किती असेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

लूक आणि डिझाईन-

बजाज ऑटोने ही बाईक कम्युटर सेगमेंटमध्ये लॉन्च केली (Bajaj CNG Bike Launched) आहे. या बाईकचा लूक आणि डिझाईन अतिशय अप्रतिम असा आहे. या बाइकमध्ये CNG सिलेंडर ठेवलाय कुठे तेच तुम्हाला समजणार नाही इतक्या मस्त आणि आकर्षक डिझाईनमध्ये ही गाडी तयार करण्यात आली आहे. गाडीच्या सीटच्या खाली सीएनजी टाकी बसवण्यात आली आहे. यामध्ये २ किलोचा सीएनजी सिलेंडर आणि २ लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. यामध्ये हिरवा रंग CNG आणि नारंगी रंग पेट्रोल असल्याचे दर्शवते.

330 किलोमीटरपर्यंत मायलेज-

बजाजच्या या पहिल्या CNG बाइकमध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकते. हे इंजिन 9.5PS पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते. बजाज ऑटोचा दावा आहे की या बाईकमुळे ग्राहकांना पेट्रोल +CNG अशा दोन्ही इंधनांवर एकूण 330 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल. पेट्रोलवरून सीएनजी आणि सीएनजीवरून पेट्रोलवर जाण्यासाठी बाइकमध्ये एक बटण देण्यात आले आहे. कंपनीने बजाज फ्रीडम डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक आणि दोन्ही ब्रेकिंग सिस्टमसह लाँच केली आहे.

किंमत किती? Bajaj CNG Bike Launched

बजाज कंपनीने या आपल्या पहिल्या CNG बाईकच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, तिच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 95 हजार रुपये, ड्रम एलईडी व्हेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये आणि टॉप डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये आहे. हि बाईक कॅरिबियन ब्लू, इबोनी ब्लॅक-ग्रे, प्युटर ग्रे-ब्लॅक, रेसिंग रेड, सायबर व्हाईट, प्युटर ग्रे-येलो, इबोनी ब्लॅक-रेड रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Viral Video | अशाप्रकारे 1 मिनिटात धबधबा घेतो अक्राळ विक्राळ रूप; व्हिडिओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Video

Viral Video | पावसाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी धबधबे, धरणे वाहत आहेत. आणि याच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन देखील ठिकठिकाणी भेट देत आहेत. परंतु निसर्गाच्या सौंदर्यात लोक इतके हरवून जातात की, ते स्वतःच्या सुरक्षितेकडे लक्ष देत नाही. आणि त्यांचा जीव धोक्यात टाकतात. नुकतेच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना आहे. त्यानंतर ताम्हिणी घाटात एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. सोशल मीडियावर (Viral Video) या दोन्ही घटनांचे व्हिडिओ खूप व्हायरल होता आहेत. पण तरी देखील लोक आपल्या जीव धोक्यात घालून या ठिकाणी भेट देतात.

अनेकवेळा आपल्याला निसर्गाचे चक्र माहीत नसतात. आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते होते. झालेल्या अपघातानंतर या प्रशासनाने देखील खूप काळजी घेतलेली आहे. लोकांच्या डोळ्यासमोरून ते पाच लोक वाहून गेले. तरी देखील कोणाला काहीच करता आले नाही. कारण हे एक नैसर्गिक संकट होते. पाण्याचा वेग इतका वाढला की, ज्यापुढे लोकांना काही अर्थ आले नाही. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामध्ये एका मिनिटात धबधब्याचे पाणी कसे वाढते हे पाहायला मिळते.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे लोकेशन माहीत नाही. त्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, “मिनिटात धबधब्याचे पाणी कसे वाटते ते बघा व्हिडिओ आपल्याकडील नसेल, तरी धबधब्याची परिस्थिती सारखीच असते सावध रहा अवास्तव धमकी नको.”

https://www.instagram.com/reel/C89owojozyu/?utm_source=ig_embed&ig_rid=28417893-ed9c-42f2-818e-51d6e3da85ba

सोशल मीडियावर व्हायरल येणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक धबधबा दिसत आहे. तिथे सुरुवातीला खडकाळ भागातून पाणी वाहताना दिसत आहे. सुरुवातीला या पाण्याचा वेग अगदी शांत असतो. त्यानंतर धबधब्याचे पाणी मागून उंच लाटांमधून कोसळताना दिसत आहे. आणि अगदी क्षणातच पुढच्या डोंगरावरील पाणी वाढते. आणि काही सेकंदात हा धबधबा मोठ्या स्वरूपात व्हायला लागतो. जोरदार पाण्याचा प्रवाह देखील वाहतो. अशाप्रकारे काही मिनिटातच धबधब्याचे पाणी वाढते. आपण जर अशा ठिकाणी फिरायला गेलेलो असेल, तर आपल्याला वरून येणाऱ्या पाण्याचा काहीच अंदाज नसतो. यासोबत आपली जीवितहानी देखील होऊ शकते. त्यामुळे लोकांनी फिरायला जाताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Mumbai Nagpur Expressway : महत्वाची बातमी ! विधानसभा निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग होणार पूर्ण

Mumbai Nagpur Expressway : राज्यामध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आणि नागपूर ते गोवा शक्ती पीठ महामार्ग यांचा समावेश आहे. समृद्धी महामार्गाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास केवळ सात ते आठ तासात पूर्ण होणं शक्य होणार आहे कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी समृद्धी महामार्ग (Mumbai Nagpur Expressway) पूर्णत्वास येण्याची चिन्ह आहेत.

समृद्धी महामार्ग थेट मुंबईला होणार कनेक्ट

या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तातडीने काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग मुंबई पर्यंत जोडण्यासाठी शहापूर मध्ये वाहनांच्या वाहतुकीसाठी दोन पूल तयार केले आहेत यातला एक फुल जवळपास तयार झाला तर दुसऱ्या पुलाचे काम देखील सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही कारणास्तव दुसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले (Mumbai Nagpur Expressway) नाही तर आधीच्या पुलाच्या सहाय्याने एम एस आर डी सी निवडणुकीपूर्वी समृद्धी महामार्ग थेट मुंबईला कनेक्ट करण्याच्या योजनांवर काम करणार आहे.

काम जवळपास 95 टक्के पूर्ण (Mumbai Nagpur Expressway)

शहापूर मध्ये तयार असलेल्या एका पुलाला दोन भागांमध्ये विभाजन करून एम एस आर डी सी संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आतापर्यंत 625 किलोमीटर पर्यंत लांबीचा महामार्ग वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे तर अंतिम टप्पा म्हणजेच इगतपुरी ते ठाणे दरम्यानचा 76 किलोमीटरचा मार्ग तयार होतो आहे. एम एस आर टी सी च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम टप्प्यातील काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाला आहे फक्त आता एका (Mumbai Nagpur Expressway) पुलाचं काम बाकी आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी ते ठाणे पर्यंत महामार्गाचे काम हे खूप आव्हानात्मक आहे 76 किलोमीटरच्या या मार्गावर 16 पूल आणि चार बोगदे आहेत यातले 15 पूल आणि चार बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. शहापूर जवळील एका पुलाचे काम सुरू आहे. हा पूल 80 मीटर आहे. या पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊ शकते. इगतपुरी ते ठाणेदरम्यान एमएसआरडीसी ने डोंगरांच्या (Mumbai Nagpur Expressway) मधून बोगदा तयार केलाय तसंच दोन डोंगरांमध्ये एक पुल तयार करण्यास देखील वेळ लागतो आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुंबई ते नागपूर अवघ्या ७ तासांत

समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे खुलासानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या सात ते आठ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहेत त्याचबरोबर शिर्डीला पोहोचण्यासाठी आता सध्या सहा ते सात तासांचा वेळ लागतो तो मात्र तीन ते चार तासात पार (Mumbai Nagpur Expressway) करता येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मार्ग खुला होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.