Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 622

साप दोनदा चावल्याने तरुणाने घेतला त्याचा तीनदा चावा; साप जागीच ठार; तरुण बचावला

Snake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | झारखंडमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी वाचल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. झारखंडमध्ये एका व्यक्तीला काम करत असताना साप चावला. त्यानंतर त्या चिडलेल्या व्यक्तीने त्या सापाला पकडून त्याला तीन वेळा चावले. त्यामुळे या बातमीचा खूपच हाहाकार झालेला आहे. मजुराने तीन वेळा त्या सापाला चावल्याने तो साप मेला आहे. परंतु तो मजूर वाचलेला आहे. त्यामुळे नक्की विषारी कोण होते?असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.

झारखंडमधील संतोष लोहारसोबत हा प्रकार घडलेला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहे. आणि त्याची प्रकृती ही आता चांगली आहे. संतोष हा रेल्वे प्रकल्पामध्ये खोदकाम करत होता. जंगलाच्या भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू होते. खोदकाम करताना एका सापाने त्याला एकदा दंश केला, तरीही तो खोदतच राहिला. त्यामुळे सापाने त्याला दुसऱ्यांदा दंश केला. रागवलेल्या संतोषने त्या सापाला पकडले आणि तीन ठिकाणी चावा घेतला.

त्या सापाला पकडण्यासाठी त्यांनी लोखंडी सळीचा वापर केला होता. परंतु संतोषने त्याचा चावा घेतल्यानंतर साप जागेवरच मेला. संतोषने ही घटना आधी ऐकली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, मी गावातील लोकांकडून ऐकले आहे. जर तुम्हाला सापाने एकदा दंश केलं तर तुम्ही त्याला दोनदा चावा. त्यांनी जर तो दोनदा चावला तर त्याला तीनदा चावा. असे केल्याने विषयाचा परिणाम तुमच्यावर होत नाही.

संतोषने हीच आयडिया वापरून त्या सापाला तीन वेळा चावल. तो साप जागीच ठार झाला. परंतु सुदैवाने संतोषचा जीव वाचला. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. आणि त्याची प्रकृती देखील धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे.

सरकार शेतकऱ्यांना देत आहे 50 हजार रुपये; 31 जुलैपर्यंत करावा लागेल अर्ज

State Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध योजना आणि विविध सोयी सुविधा राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विभाग (Department of Agriculture) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकाचे उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून पीक उत्पादन करावे यासाठीच कृषी विभागाने पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून शेतकऱ्यांना 50 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.

राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. तसेच राज्यात शेती संदर्भात विविध प्रयोग राबवले जावे हा उद्देश ठेवून अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत अर्ज करावा लागेल. ही स्पर्धा तालुका पातळीवर आयोजित केली जाईल.

या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण शेतकरी आदिवासी गटातील शेतकरी देखील भाग घेऊ शकतात. यामध्ये मूग, उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग, व सुर्यफूल अशा पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी काय पात्रता हवी? याविषयी जाणून घ्या.

शेतकऱ्यांची पात्रता काय हवी??

  • शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे. तसेच त्या जमिनीवर स्वतः कसत करणे आवश्यक आहे.
  • एकापेक्षा अधिक पिकांसाठी शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येईल.
  • स्पर्धेत भाग घेताना सर्वसाधारण शेतकऱ्याला 300 रुपये तर आदिवासी शेतकऱ्याला 150 रुपये भरावे लागतील.
  • इच्छुक शेतकऱ्याला भात पीक किमान २० आर हवे. तर इतर पिकांच्या बाबतीत १ एकर क्षेत्रावर सलग लागवड हवी.
  • अर्ज सादर करताना विहित नमुना अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा व ८-अ चा उतारा द्यावा लागेल.
  • आदिवासी शेतकऱ्याला जात प्रमाणपत्रात द्यावे लागेल.
  • चिन्हांकीत नकाशा, बँक खाते, चेक, किंवा पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत ही द्यावी लागेल.

NABARD Recruitment 2024 | पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

NABARD Recruitment 2024

NABARD Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. अनेक लोकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण तरुणांसाठी एक मोठी भरती निघालेली आहे. नाबार्ड (NABARD Recruitment 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 150 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

रिक्त पदे | NABARD Recruitment 2024

या भरती अंतर्गत आयटी/ फायनान्स, कंपनी सिक्रेटरी, सिविल इंजिनिअर, इन्फॉर्मेशन फॉर हिस्टरी, फूड प्रोसेसिंग मास कम्युनिकेशन, मीडिया स्पेशालिस्ट या पदांची भरती केली जाणार आहे.

रिक्त पदांची संख्या

या भरतीसाठी 150 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता

कम्प्युटर आयटी या पदासाठी उमेदवाराने 60% गुणांसह कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर टेक्नोलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी घेतलेली असले गरजेचे आहे.
फायनान्स या पदासाठी 60% गुणांसह फायनान्स बँकिंग विषयी पदवी असणे गरजेचे आहे
कंपनी सेक्रेटरी पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण झालेली असावी त्या cs पूर्ण असावे.
सिव्हिल इंजीनियरिंग या पदासाठी सिव्हिल विषयात पदवी असणे गरजेचे आहे 60% गुणांसह उमेदवार पास असावा.

वयोमर्यादा

या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 21 ते 30 दरम्यान असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही नोकरी करावी लागेल

अर्ज शुल्क

OBC आणि खुला गटासाठी 800 रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये अर्ज फी आहे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Bussiness Idea | फक्त 850 रुपयात करा ‘हा’ व्यवसाय सुरु; पावसाळ्यात होईल बंपर कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | रोज 9 ते 6 नोकरी करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. आणि या नोकरीपेक्षा आपला स्वतःचा एक छोटासा का होईना, पण व्यवसाय सुरू करावा.असे अनेकांना वाटत असते. परंतु हा व्यवसाय नक्की कोणता सुरू करायचा? बाजारामध्ये कोणत्या मार्केट व्यवसायाला जास्त मागणी आहे? हे लोकांना समजत नाही. जर तुम्ही देखील अशाच एका व्यवसायाबद्दल विचार करत असाल, आणि तुम्हाला कोणत्या व्यवसाय करावा ? हे समजत नसेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक बिझनेस आयडिया (Bussiness Idea) घेऊन आलेलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.

तुम्ही घरबसल्या बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाला पावसाळ्यात खूप जास्त मागणी असते. अगदी पावसाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत बटाट्याच्या चिप्सला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तुम्ही अगदी घरच्या घरी हा व्यवसाय (Bussiness Idea) सुरू करून खूप चांगला पैसा कमवू शकता. तुम्ही केवळ 850 रुपयांची मशीन खरेदी करून, या व्यवसायाला सुरुवात करू शकता. यामध्ये अगदी कमी गुंतवणूक करून तुम्हाला खूप चांगला नफा मिळेल. आता या व्यवसायाबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

850 रुपयांच्या गुंतवणुकीतून 500 रुपये कमावतात | Bussiness Idea

जेव्हा जेव्हा एखादा व्यवसाय सुरू केला जातो तेव्हा त्याच्या मशीनची किंमत 10,000-15,000 रुपये असते. पण आम्ही ज्या मशीनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत फक्त 850 रुपये आहे. याशिवाय कच्च्या मालासाठीही काही खर्च करावा लागणार आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात कच्चा माल १०० ते २०० रुपयांना मिळेल. हे मशीन तुम्हाला ऑनलाइन सहज मिळेल. कोणत्याही टेबलवर ठेवून तुम्ही चिप्स सहजपणे कापू शकता. ते जास्त जागा व्यापत नाही आणि चालण्यासाठी वीज लागत नाही. आपण ते सहजपणे हाताने ऑपरेट करू शकता. महिला आणि लहान मुलांसह कोणीही ते चालवू शकते.

बटाटा चिप्स कसे विकायचे ?

आजकाल तळलेले चिप्स झटपट खाण्याचा ट्रेंड आहे. लोक समोर तळलेले चिप्स खातात. अशा परिस्थितीत तुम्ही एखादा स्टॉल किंवा दुकान उघडून लगेच चिप्स विकू शकता. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही ते लहान पॅकेटमध्ये भरून लोकांना देऊ शकता. थोडे कौशल्य जोडल्यानंतर, चिप्स इत्यादी विकणाऱ्या दुकानदारांशी संपर्क साधा. त्यामुळे हळुहळू तुमचे नेटवर्क वाढेल आणि तुम्ही या छोट्या व्यवसायाचा खूप विस्तार करू शकता.

बटाट्याच्या चिप्समधून कमाई

बटाटा चिप्स बनवण्यासाठी कच्च्या मालात किती पैसे खर्च होतात. त्यातून 7-8 पट कमाई करता येते. एका दिवसात 10 किलो बटाट्याच्या चिप्स बनवल्या तर एका दिवसात हजार रुपये सहज कमावता येतात. यासाठी विशेष गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही.

Jio ग्राहकांसाठी खूशखबर, कंपनीने गुपचूप लॉन्च केले स्वस्त रिचार्ज प्लॅन

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स जिओने या आठवड्यातच त्यांच्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. प्रत्येक रिचार्ज किंमत वाढलेले आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्ती झालेली आहे. परंतु अशातच आता कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. ती म्हणजे आता जिओनने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर काही खास आणि स्वस्त योजना लॉन्च केलेल्या आहेत. या नवीन प्लॅननुसार 51 रुपये एवढी हा सगळ्यात कमी किमतीचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला 5जी डेटाचा देखील फायदा होणार आहे. ग्राहकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या नवीन श्रेणींच्या यादीमध्ये 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपयांचे पॅक उपस्थित आहेत आणि यामध्ये अमर्यादित 5G डेटाचा लाभ देण्यात आला आहे. 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3GB 4G हायस्पीड अमर्यादित 5G हायस्पीड डेटा दिला जात आहे. या योजनेची वैधता सक्रिय प्लॅनसह समाप्त होईल.

या यादीतील दुसरा प्लॅन 101 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G + 6GB डेटा दिला जात आहे. त्याची वैधता देखील सक्रिय योजनेसह समाप्त होईल. 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5G + 9GB डेटाचा लाभ दिला जात आहे. या योजनेची वैधता सक्रिय प्लॅनसह समाप्त होईल.

या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या Jio च्या नवीन प्लॅन्सच्या यादीमध्ये असे लिहिले होते की Jio त्याच्या काही प्रीपेड प्लॅनसह अमर्यादित 5G चा लाभ देणार नाही. असे सांगण्यात आले होते की जिओ फक्त त्या प्रीपेड प्लॅनवर अमर्यादित 5G डेटा देईल जे दररोज 2GB डेटा किंवा अधिक डेटा देतात.

याचा अर्थ असा की दररोज 1.5GB किंवा त्यापेक्षा कमी डेटा असलेल्या प्लॅनमध्ये 5G इंटरनेट डेटा सुविधा मिळणार नाही. परंतु नवीन प्लॅन पाहता असे वाटत नाही की कंपनी सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित 5G चा लाभ देणार नाही.

अरे बापरे!! म्हाडाच्या सोडतीत घरांच्या किंमती 1 कोटींच्या पुढे; सर्वसामान्यांची मोठी निराशा

Mhada Homes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्य जनतेचे घर घेण्याचे स्वप्न म्हाडा (Mhada) पूर्ण करते. म्हाडा कमी किमतीमध्ये लोकांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देते. त्यामुळे म्हाडाची घरे म्हणली की अनेकांचे कान टवकारले जातात. सध्या म्हाडाने अनेक घरांचे सोडा जाहीर केल्यामुळे 2024 मध्ये अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशा व्यक्त केली जात आहे. मात्र या सोडतीतील काही घरांच्या किमती पाहूनच लोकांना घाम फुटला आहे. या किमती थेट करोडोंच्या घरात आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांची मोठी निराशा झाली आहे.

एक कोटींच्या पुढे घरांची किंमत

सध्या म्हाडाकडून मुंबईतील गोरेगाव येथील प्रेमनगर भागात 332 उच्चभ्रू घरे उभारण्याचा प्रकल्प सुरू आहे. सुरुवातीला याच घरांच्या किमतीत बाबत लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. परंतु अखेर या घरांच्या किमती समोर आल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. कारण की, या सोडतीत मध्यम उत्पन्न गटातील 794 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे. तर, उच्च उत्पन्न गटासाठी 979 sqft क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 40 लाख आहे.

दरम्यान, या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाची पुढील सोडत जाहीर होणार आहे. या सोडतेत कोट्यावधींच्या घरांचा ही समावेश असणार आहे. कारण की, म्हाडाच्या या घरांमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा सुविधा देण्यात येतील. म्हणजेच हे घर एका ड्रीम हाऊसप्रमाणे असेल. त्यामुळे या घरांच्या किमती एवढ्या महाग ठेवण्यात आल्या आहेत. परंतु ही घरे सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर असतील.

Jio च्या ग्राहकांना खुशखबर!! या प्लॅन अंतर्गत 20GB इंटरनेट Free

Jio Mobile Recharge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Jio Recharge Plan) किमतीत वाढ करून ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. मात्र आता याच ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनीने २ नवे रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या दोन्ही प्लॅनच्या किमती अनुक्रमे 749 रुपये आणि 899 रुपये आहे. बाब म्हणजे या दोन्ही प्लॅनच्या माध्यमातून जिओ आपल्या वापरकर्त्यांना २० GB इंटरनेट Free यामध्ये देणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हे दोन्ही प्लॅन अगदी परवडणारे असतील. आज आपण या दोन्ही प्लॅनचे डिटेल्स जाणून घेऊयात..

Jio चा 749 रुपयांचा प्लॅन –

749 रुपयांच्या या रिलायन्स जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देते. करेल. हा मोबाईल रिचार्ज प्लॅन 72 दिवसांच्या वैधतेसह येत असून यामध्ये ग्राहकांना एकूण 144 GB हाय स्पीड इंटरनेट डेटाचा लाभ घेता येतोय. याव्यतिरिक्त कंपनी 20 जीबी फ्री डेटा सुद्धा देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना एकूण 164 जीबी इंटरनेट डेटाचा आनंद घेण्याची संधी मिळतेय.

Jio चा 899 रुपयांचा प्लॅन –

८९९ रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला रिलायन्स जिओकडून दररोज २ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. जिओ चा हा रिचार्ज प्लान 90 दिवसांच्या व्हॅलिडिटी नुसार येतोय. त्यानुसार हा प्लान एकूण 180GB हाय स्पीड डेटा ऑफर करतो, परंतु आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, या रिचार्ज प्लॅन मध्येही ग्राहकांना 20 GB अतिरिक्त डेटाचा लाभ मिळेल. म्हणजेच 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्स एकूण 200 GB इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात.

आज भारत Vs पाकिस्तान क्रिकेट सामना!! दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने

IND VS PAK Legend match

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) 2024 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. रात्री ८ वाजता इंग्लंड मधील एजबॅस्टन मैदानावर हा रंगतदार मुकाबला सुरु होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत दोन्हीही संघानी आपापल्या सर्व मॅचेस जिंकल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असेल.

भारत चॅम्पियन्सने पहिल्या सामन्यात इंग्लंड चॅम्पियन्सचा तीन गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 27 धावांनी पराभव केला. तर पाकिस्तान चॅम्पियन्सने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा पाच गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे दोन्हीही संघ आत्तापर्यंत या सिरीजमध्ये अपराजित राहिले आहेत. टीम इंडियाबाबत सांगायचं झाल्यास, रॉबिन उथप्पा, गुरकीरत सिंग मान आणि इरफान पठाण तुफान फॉर्मात आहेत. तर पाकिस्तानकडून शोएब मलिक, युनिस खान आणि सोहेल तन्वीर यांनी आत्तापर्यंत मॅच विनिंग खेळी खेळली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडू दमदार फॉर्मात असल्याने क्रिकेटप्रेमींना आज रंगतदार सामना पाहायला मिळेल.

कुठे खेळला जाईल सामना?
चॅम्पियन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एजबॅस्टन येथे होणार आहे.

कुठे पाहाल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ?
भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल.

मोबाईलवर मॅच कशी बघणार?
मोबाईलवर तुम्ही Sony Liv ॲप किंवा FanCode वर मॅच पाहू शकता.

भारतीय संघ – युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, गुरकीरत मान, राहुल शर्मा, नमन ओझा, राहुल शुक्ला, आरपी सिंग, विनय कुमार, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, अनुरीत. सिंग, पवन नेगी.

पाकिस्तान संघ : शर्जील खान, उमर अकमल, युनूस खान, शोएब मलिक, मिसबाह उल हक, शाहिद आफ्रिदी, अब्दुल रज्जाक, वहाब रियाझ, सोहेल तन्वीर, सोहेल खान, अब्दुल रहमान, आमिर यामीन, तौफीक उमर, शोएब मकसूद, यासिर अराफत, तन्वीर अहमद.

Nano Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘नॅनो खता’साठी केंद्र सरकार देणार 50 टक्के अनुदान

Nano Fertilizer Subsidy

Nano Fertilizer Subsidy | शेती करताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपली एखादी चूक देखील महागात पडू शकते. आणि आपल्या शेतीचे नुकसान होऊ शकते.नआपण शेतीतील पीक चांगले यावे त्याचप्रमाणे कीटकनाशकांचा नाश व्हावा, यासाठी रासायनिक खते यांचा वापर करतो. अनेकवेळा या खतांचा आपल्याकडून अतिवापर होतो. आणि आपल्या जमिनीचा पोत बिघडतो. जमिनीचा बिघडल्यामुळे मृदा, हवा, पाणी या गोष्टीच्या प्रदूषणाची देखील शक्यता असते. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊ नये, यासाठी सरकारकडून नॅनो खतांचा (Nano Fertilizer Subsidy) वापर करावा असे सांगण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने नॅनो खतांबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना हे खत स्वस्त दरात मिळावेत, म्हणून केंद्र सरकार 6 जुलै रोजी एक योजना चालू करणार आहे. या योजनेअंतर्गत नॅनो खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान देखील दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे या योजनेचे उद्घाटन करणार आहेत. 6 जुलै रोजी ते गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे.त्या ठिकाणी ते अनेक कार्यक्रमात ही योजना ते सार्वजनिक रित्या सांगणार आहेत. नॅनो खतांचा (Nano Fertilizer Subsidy) जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. आणि वायू, मृदा आणि पाण्याचे प्रदूषण कमी झाले पाहिजे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

6 जुलै रोजी होणार योजनेचे उद्घाटन | Nano Fertilizer Subsidy

या योजनेच्या माध्यमातून आता आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना नॅनो खतांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत दिले जाणार आहे. या योजनेचे नाव AGR 2 असे असणार आहे. गुजरातच्या गांधीनगरमधून ही योजना चालू केली जाणार आहे.

100 दिवसांची विशेष मोहीम

या योजनेसाठी सरकारकडून खत निर्मिती करणाऱ्या सहकारी कंपन्यांच्या प्रसार केला जात आहे. या नॅनो खतांचा वापर वाढावा, यासाठी 100bदिवसांची विशेष मोहीम देखील राबवली जाणार आहे. यामधून ते शेतकऱ्यांना नॅनो खतांचा वापर आणि त्याचे फायदे सांगणार आहे

Reliance Jio IPO| अंबानी लाँच करणार देशातील सर्वात मोठा IPO; पहा किती असेल ब्रँड व्हॅल्यू?

Reliance Jio IPO

Reliance Jio IPO | रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्यांनी त्यांचे मोबाईल रिचार्ज नुकतेच वाढवलेले आहे. त्याचप्रमाणे कंपनी त्यांच्या 5G नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने देखील वाटचाल करत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

मुकेश अंबानींनी जर त्यांचा IPO (Reliance Jio IPO) लॉन्च केला तर तो हा भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो. तर त्यांचे असे म्हणणे आहे की, कंपनीचा हा IPO पुढील वर्षात येऊ शकतो. माध्यमातून वृत्तानुसार आता मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम कंपनी रिलायन्सचा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी त्याबाबतचे संकेत देखील दिलेले आहे. या IPO चा आकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा असू शकतो. .

सध्या देशातील सर्वात मोठा IPO (Reliance Jio IPO) हा LIC चा आहे. सरकारी विमा कंपनी LIC ने 022 मध्ये हा IPO आणला होता. जो सुमारे 21000 कोटी रुपये एवढा होता. याआधी one97 कम्युनिकेशन चा विक्रम सगळ्यात जास्त होता. त्यांचा IPO हा 18, 300 कोटी रुपयांचा होता.

त्यानंतर LIC चा सर्वात मोठा IPO आहे. परंतु हा रेकॉर्ड रिलायन्स जिओ मोडू शकतो. सध्या दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई देखील IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई इंडियाने IPO साठी सेमी कडे महसुलात मसुदा देखील दाखल केला आहे. यानुसार आता ह्युंदाई इंडियाचा IPO हा 25 हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.