हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने आपल्या ग्राहकांना धक्का देत मोबाईल तिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. कंपनीने ३ जुलै पासून हि दरवाढ केली आहे. त्यातच आता जिओने यासोबतच काही रिचार्ज प्लॅन काढून टाकले आहेत. त्यामुळे ग्राहकांना डबल झटका बसला आहे. हे रिचार्ज प्लॅन नेमके कोणते होते? आता ग्राहकांना कसा आर्थिक फटका बसेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे जिओचा 2545 रुपयांचा प्लॅन… खरं तर हा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येत होता, तसेच यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा वापरता येत होता. मात्र आता कंपनीने आपल्या लिस्ट मधून हा 2545 रुपयांचा प्लॅन हटवला आहे.
यानंतर दुसरा आहे तो म्हणजे जिओचा 2999 रुपयांचा मोबाईल रिचार्ज प्लॅन, कंपनीने हा प्लॅन हटवला नसला तरी याचं किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या रिचार्ज प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB इंटरनेटचा आनंद घेता येतो. मात्र आता याची किंमत 3599 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच काय तर ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच 1559 रुपयांच्या प्लॅनऐवजी आता तुम्हाला 1899 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
याशिवाय Jio ने OTT सबस्क्रिप्शन प्लॅनही मोठ्या प्रमाणात काढून टाकले आहेत. यामध्ये 3,662 रुपयांचा प्लॅन , 3,226 रुपयांचा प्लॅन आणि 3,225 रुपयांचा प्लॅनचा समावेश आहे. या सर्व योजना OTT सबस्क्रिप्शनसह आल्या आहेत. तसेच, त्यांची वैधता 365 दिवस होती.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून (AI Airport Services Limited) भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यात एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड 3256 पदांसाठी तरुणांची भरती करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत?? तसेच शैक्षणिक पात्रता काय हवी?? याविषयी जाणून घ्या.
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड हँडीमॅन, सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट अशा एकूण 3256 पदांसाठी तरुणांची भरती करणार आहे. सर्वात खास बाब म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतेही परीक्षा द्यावी लागणार नाही. कारण थेट मुलाखतीमधून उमेदवारांची निवड केली जाईल. ही मुलाखत येत्या 12, 13, 14, 15, 16 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वेळेत अधिकाऱ्यांकडून मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगार देण्यात येईल.
लक्षात घ्या की, प्रत्येक एका पदांनुसार शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. तसेच 18 ते 55 वयोगटातील उमेदवारच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या साईटवर देण्यात आली आहे. त्यामुळे ही माहिती सविस्तर वाचावी आणि त्यानंतरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. तसेच, मुलाखतीला जाण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.
Vande Bharat Express : कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वेसाठी मोठी गर्दी असते. या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वाढत आहे. त्यातच आता ही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू होण्याची चिन्ह आहेत.
कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)
रेल्वेच्या बाबतीतलं आपलं निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की कोल्हापूर- मुंबई या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या नेहमी प्रवाशांनी भरलेल्या असतात. अशावेळी कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करावे.
रुकडी आणि वळीवडे थांबे पूर्ववत करावे (Vande Bharat Express)
तसेच रुकडी आणि वळीवडे या दोन रेल्वे स्टेशनच्या बाबतीत थांबे पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हंटले आहे की बहुतेक सर्व रेल्वे गाड्या ज्या कोल्हापूर स्थानकावरून सुटतात त्या रेल्वे गाड्या वळीवडे आणि रुकडी या स्थानकांवर थांबत होत्या मात्र कोरोना काळात रेल्वे बंद झाल्यानंतर हे थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
डेमो ट्रेन
शिवाय निवेदनात पुढे म्हंटले आहे की रेल्वेचा पुणे विभाग मनमाड पर्यंत विस्तारित केला तर कोल्हापूरहून शिर्डी साईनगर पर्यंत एखादी विशेष रेल्वे (Vande Bharat Express) सुरू करता येईल. त्यातून हजारो भाविकांना मोठी सुविधा निर्माण होईल. तसंच सध्या मिरज ते परळी या मार्गावर डेमो ट्रेन सुरू आहे ही गाडी कोल्हापूर वरून सुरू करावी अशी मागणी देखील त्यांनी आपल्या निवेदनामध्ये केली आहे.
काय आहेत इतर मागण्या ? (Vande Bharat Express)
कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेस मध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करतात या गाडीमध्ये चार जनरल डबे वाढवावेत. कोल्हापूर ते सांगली दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे आधुनिकीकरण करावं. अमृतभारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा.
सध्या कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या कोल्हापुरात (Vande Bharat Express) आल्यावर 48 तास थांबून असतात अशावेळी या रेल्वे गाड्या सोलापूर किंवा कलबुर्गी मार्गावर सोडता येतील का याचाही विचार करावा या सर्व मुद्द्यांचा व मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महाडिक यांना सांगितलं
TISS Mumbai Bharti | नोकरीच्या शोधात असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नोकरीची मोठी संधी आलेलो आहे. ती म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूटमध्ये टीस (TISS Mumbai Bharti) अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती लीग ऑफिसर पदाची होणार आहे या भरती अंतर्गत देशातील टीसच्या मुंबई, हैदराबाद, गुवाहाटी आणि तुळजापूर या चार कॅम्पसमध्ये ही भरती होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लॉ ऑफिसर या पदाच्या रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागेल. तसेच भरतीचे नोटिफिकेशन देखील जाहीर करण्यात आलेले आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
शैक्षणिक पात्रता | TISS Mumbai Bharti
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कायद्याची पदवी पूर्ण केलेली असावी. त्याचप्रमाणे त्यामध्ये उमेदवाराला 50 टक्के गुण मिळावे. तसेच लीगल ऑफिसर पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.
अर्ज शुल्क
हा अर्ज करताना तुम्हाला 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
पगार
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 75 हजार रुपये एवढा पगार दिला जाईल.
अर्ज कसा करायचा ?
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागेल. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
12 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यापासून फोल्डेबल मोबाईलची चांगलीच हवा बघायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Moto ने Motorola Razr 50 Ultra नावाचा फोल्डेबल मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 99 हजार 999 रुपये ठेवली आहे. मात्र मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 10,000 रुपये किमतीचे मोटो बड्सही फ्री मध्ये देण्यात येत आहे. मोबाईलमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर यांसारखे अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. आज आपण मोटोच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Motorola Razr 50 Ultra मध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 6.9 इंचाचा FHD+ poled LTPO डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 2640×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 3,000 nits पीक ब्राइटनेस मिळतो. तर स्मार्टफोनच्या बाहेरील बाजूला ४ इंचाचा आऊटर डिस्प्ले असून त्याला गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण आहे. कंपनीने मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर बसवला असून त्याअंतर्गत 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह देण्यात आलं आहे. मोटोचा हा फोल्डेबल मोबाईल अँड्रॉइड १४ वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
कॅमेरा – Motorola Razr 50 Ultra
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Motorola Razr 50 Ultra 50MP चा मुख्य आणि 50MP टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W वायरलेस आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येते. मोबाईलची किंमत 99,999 रुपये असून बँक कार्डच्या माध्यमातून 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळतोय. याशिवाय मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 10,000 रुपये किमतीचे मोटो बड्सही फ्री मध्ये देण्यात येत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या विश्वामध्ये विविध प्रकारच्या आकार दिसत असतात. आणि वैज्ञानिकांना त्याबद्दल नेहमीच कुतुकुल असते. या सगळ्या आकारांचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत असतात. जेम्स टेलिस्कोपद्वारे अनेक विश्वातील आकार पाहिलेले आहेत. अशातच आता डार्क एनर्जी कॅमेराने काही फोटो कॅप्चर केलेले आहेत. यामध्ये आकाशगंगेत एका हातासारखा आकार दिसून आलेला आहे. याला देवाचा हात असे नाव देखील ठेवण्यात आलेले आहे. परंतु हे पसरलेले हात असलेली ही रचना वायू आणि धुळीचे ढग आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार इमेज कॅप्चर करणारा डीईकॅम चिलीमध्ये असलेल्या व्हिक्टर एम. ब्लँको टेलिस्कोपवर स्थापित आहे. हा कॅमेरा खोल जागेचे फोटो टिपत राहतो. वायू आणि धूळ अशा रचनांना कॉमेटरी ग्लोब्यूल म्हणतात. धूमकेतू ग्लोब्युल्स प्रथम 1976 मध्ये दिसले. या रचनांचा धूमकेतूंशी कोणताही संबंध नाही. हे अंतराळातील वायू आणि धुळीचे दाट आणि दाट ढग आहेत, ज्याचा आकार लांब, चमकदार शेपटी असलेल्या धूमकेतूसारखा आहे. या वायू आणि धुळीच्या ढगांमध्ये त्यांच्या गाभ्यामध्ये लहान तारे असतात. धूमकेतू ग्लोब्युल्स कोणत्याही आकाशगंगेत जन्मलेल्या ताऱ्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात.
समोर आलेल्या ‘देवाच्या हाताचे फोटो आपल्याच आकाशगंगेत टिपल्या गेल्या आहेत. हे ठिकाण ‘पप्पी’ नक्षत्रात पृथ्वीपासून 1300 प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचा मुख्य टोक धुळीने भरलेला असतो आणि तो फिरणाऱ्या हातासारखा दिसतो. अहवालानुसार, मुख्य टोकाची लांबी 1.5 प्रकाश वर्षांपर्यंत असते, तर लांब शेपटी 8 प्रकाश वर्षांपर्यंत वाढते. आपण प्रकाश वर्ष हे अंतर म्हणून समजू शकता की प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात अंतर पार करतो. याचा सरळ अर्थ असा आहे की चित्रात दिसणारी आकृती लहान नाही, तर ती आपल्या विचारापेक्षा अब्जावधी पट मोठी आहे.
ही रचना आता 100 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या ESO 257-19 (PGC 21338) नावाच्या दूरच्या आकाशगंगेजवळ येत असल्याचे दिसते. हा आकार टिपणारा कॅमेरा समुद्रसपाटीपासून ७२०० फूट उंचीवर बसवण्यात आलेल्या दुर्बिणीत बसवण्यात आला आहे.
Travel : पावसाळ्यात मुंबई आणि आसपासची ठिकाणे अधिक सुंदर होतात. लोणावळा, खंडाळा सारखी ठिकाणे पाहण्यासाठी आहेतच , परंतु जर तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ इच्छित असाल तर शिर्डीच्या साई बाबांना भेट देण्याचा विचार नक्की करा. IRCTC ने नुकतेच टूर पॅकेज लाँच केले आहे. 4 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये (Travel) तुम्ही शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर कव्हर करू शकता. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
पॅकेजचे नाव– साई शिवम पॅकेज कालावधी– 3 रात्री आणि 4 दिवस प्रवास मोड– ट्रेन कव्हर केलेले डेस्टिनेशन – शिर्डी
काय असतील सुविधा ? (Travel)
प्रवासासाठी, तुम्हाला स्लीपर आणि 3AC क्लास ट्रेनची तिकिटे मिळतील. या टूर पॅकेजमध्ये नाश्त्याची सुविधा उपलब्ध असेल. प्रवास विमा सुविधा देखील उपलब्ध (Travel) असेल.
किती असेल चार्ज (Travel)
या ट्रिपमध्ये तुम्ही 3AC तिकिटावर एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 9,320 रुपये मोजावे लागतील. तर दोन लोकांसाठी 7,960 रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरावे लागेल. तीन लोकांना प्रति व्यक्ती 7,940 रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 7,835 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय (Travel) तुम्हाला 6,845 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली (Travel)
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला शिर्डीला जायचे असेल तर IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता असे म्हटले आहे.
कसे कराल बुकिंग ?
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला (Travel) भेट देऊ शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र वातावरण देखील थंड होते. आणि हिरवागार निसर्ग आपल्याला दिसतो. त्यामुळे अनेक लोक हे धबधब्याच्या ठिकाणी त्याचप्रमाणे डोगरदाऱ्यांमध्ये फिरायला जातात. यावर्षी देखील पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. नुकत्याच लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना आली. त्यानंतर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आलेली आहे. यासंबंधी एक व्हिडिओ पुणे आयएमडी प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी शेअर केलेला आहे. यामध्ये त्यांनी तुम्ही जर पाण्यामध्ये बुडाला तर स्वतःचा बचाव कसा करायचा? याबाबतची ट्रिक त्यांनी सांगितलेली आहे.
होसाळीकर यांनी सांगितले की, अचानक जर पाण्याचा प्रवाह आला तर पाण्यात अडकलेल्या लोकांनी पाण्याचा वाट पाहण्यात आडवे उभे राहण्यापेक्षा एकापाठी एक उभे रहावे आणि एकमेकांना घट्ट पकडून उभे राहावे. अशावेळी पाण्याच्या प्रवाहाला विरोध होत नाही. चीनमध्ये पाण्यापासून बचाव करण्यासाठी प्रशिक्षणात हा भाग शिकवला गेल्याचे होसाळीकर यांनी सांगितलेले आहे.
जर वाहत्या पाण्यात समूहाणे अडकलो तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो हे china मध्ये दिलेले training प्रशिक्षण व्हिडिओ पहा आणि फॉरवर्ड करा जेणेकरून कुणाला तरी उपयोगी येईल Courtesy social media pic.twitter.com/uJHOyfeR9i
होसाळीकर यांनी सांगितले की, “जर वाहत्या पाण्यामध्ये समूहाने तुम्ही अडकला तर स्वतःचा जीव व इतरांचा जीव कसा वाचू शकतो? हे चायनामध्ये दिलेल्या ट्रेनिंग प्रशिक्षण व्हिडिओ पहा फॉरवर्ड करायचे मी करून कोणालाही त्याचा उपयोग होईल.”
भुशी डॅम येथील दुःखद घटना
लोणावळ्यातील भुशी डॅम येथे काही दिवसापूर्वी एक विचित्र घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण पाण्यात वाहून गेले. यामध्ये चार लहान मुले आणि एका महिलांचा समावेश होता. ते पुण्यातील रहिवाशी होते. हे लोक भुशी धरणाच्या पाठीमागे असलेला डोंगरातील वॉटर फॉलचा आनंद घेण्यासाठी गेले होते. परंतु अन्सारी कुटुंबातील पाच जण या पाण्याच्या प्रवाहात 30 जून रोजी पाय घसरून वाहून गेले. या घटनेनंतर प्रशासनाने अनेक नियम बनवलेले आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात जर्मनी, भारतात परभणी…असं आम्ही नाही तर लोकं म्हणतात… बाकी परभणीचा भकासलेपणा आणि विकासापासून कोसो दूर असणाऱ्या गावांना स्वातंत्र्यापासून विकासाचा व देखील शिवला नाहीये.. निजामकालीन असणाऱ्या या जिल्ह्याच्या पाठीमागून जालना, नांदेडसारखी जिल्हे तयार झाले.. त्यांच्यात विकासाची गंगा वाहू लागली… पण परभणी जैसै थै वैसेच आपल्या जुनाटपणाचा वारसा जपत आला… अर्थात ही चूक परभणीकरांची नक्कीच नव्हती, तर ती होती इच्छाशक्ती हीन परभणीच्या राजकारण्यांची…अवघे चारच विधानसभा मतदारसंघ असणारा हा जिल्हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.. मातोश्री ज्याच्याकडे बोट दाखवेल तो खासदार.. आणि आमदार असा इथला राजकीय इतिहास… शिंदेंच्या फुटीतही जिल्ह्यातले लोकप्रतिनीधी हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहीले.. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजय ऊर्फ बंडू जाधव या ठाकरेच्या शिलेदारानेच पुन्हा खासदारकीचं मैदान मारलंय.. थोडक्यात जिल्ह्यातील वारं सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने सध्यातरी पहायला मिळतंय.. त्यामुळे जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण कसं शिजतंय? या चार जागांवर कुठले चार आमदार निवडून येतील? त्यांचे प्लस – मायनस नेमके काय आहेत? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा…
यातला पहिला मतदारसंघ येतो तो परभणी विधानसभेचा… शिवसेनेचे राहुल पाटील हे सध्या परभणी विधानसभेचे विद्यमान आमदार. २०१४ पासून सलग दोन टर्म त्यांनी परभणीच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवलाय… परभणीच्या पाठीमागच्या बहुतांश निवडणुकांमध्ये खान हवा की बाण हवा… या टॅगलाईन खाली प्रचार रंगत असतो. निकालातही याच रिफ्लेक्शन नेहमी पाहायला मिळालं. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मतदारसंघातील असणारी मुस्लिम समाजाची संख्या… १९९० च्या निवडणुकीत हनुमंत बोबडे यांनी शिवसेनेकडून काँग्रेसच्या आयेशा इकबाल यांचा पराभव करून शिवसेनेचं जणू या मतदार संघावर नावच कोरलं…. 1990 ते 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत इथं शिवसेनेचाच विजय झाला… शिवसेनेच्या मराठा उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस मुस्लिम बहुल मतदार डोळ्यासमोर ठेऊन उमेदवार देत आली.. पण प्रत्येकवेळेस शिवसेनेचा भगवा त्यावर भारी पडत आला.. म्हणूनच खान हवा की बाण…अशी म्हणच या मतदारसंघात रुढ झाली…
२०१९ मध्ये काँग्रेसच्या रविराज देशमुख यांनी मतदारसंघातून लढत दिली खरी पण राहुल पाटील यांनी सर्वांचच डिपॉझिट जप्त करत आमदारकीची माळ आपल्या पदरात पाडून घेतली… प्रोब्लेम फक्त असा होता की खासदार बंडू जाधव आणि आमदार साहेब राहुल पाटील यांच्यात विस्तव होता.. त्यांना २०१९ ला हक्काच्या परभणीच्या मतदारसंघातच मोठी पिछाडी झाली होती.. अगदी मातोश्रीच्या दारावर त्यांची भांडण पोहचली होती.. पण पुढे दोघांच्यातील हे अंतर कमी होत गेलं. शिवसेनेच्या फुटीच्या काळात तर दोघेही उद्धव ठाकरेंसोबत राहील्याने आपसूकच त्यांच्यातील संबंध पुन्हा रुळावर आल्याचं बोललं गेलं. लोकसभेला बंडू जाधवांना परभणीतून मिळालेलं लीड पाहता विधानसभेलाही राहुल पाटील आमदारकीची हॅट्रीक मारतायत, अशी चिन्हं सध्यातरी पाहायला मिळतायत… पण यंदा धनुष्यबाणावर नाही तर मशालीच्या चिन्हावर परभणीत शिवसैनिकांना प्रचार करण्याची पहिल्यांदाच वेळ येणार आहे..
दुसरा मतदारसंघ आहे तो गंगाखेडचा… काळी कसदार जमीन अन् गोदावरी नदीचा समृद्ध वारसा लाभेलला मतदार संघ म्हणजे गंगाखेड… राखीव असलेला हा मतदार संघ 1995 पर्यंत तसा शेकापचा गढ… यातल्या ज्ञानोबा गायकवाड यांनी तर गंगाखेडवर सलग चार टर्म शेकापचा लाल झेंडा फडकविण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला… मात्र १९९५ मध्ये इथल्या राजकारणानं नवं वळण घेतलं… अभ्युदय बँकेचे चेअरमन सीताराम घनदाट अपक्ष म्हणून गंगाखेडवर निवडून आले.. त्यांनी मतदारसंघावर तब्बल २००४ पर्यंत आपल्या आमदारकीच्या माध्यमातून वर्चस्व ठेवलं… पण यानंतर गंगाखेडचा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यावर इथं बऱ्याच राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या… सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री केल्याने इथं भल्याभल्यांच्याा राजकीय करिअरला ब्रेक लागला. २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक गटतट, पक्षांची आणि नव्या चेहऱ्यांची मतदारसंघात एन्ट्री झाली…रत्नाकर गुट्टे – रासप, मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी तर ज्यांनी गंगाखेडच्या राजकारणात स्वत:चा जम बसवला होता अशा सीताराम घनदाटांनी अपक्ष निवडणूक लढवली… मग काय एक मोठा उद्योजक, एक देशातील सर्वात मोठ्या मल्टीस्टेट बँकेचा चेअरमन तर तिसरा नेता आणि कंत्राटदार असं एकमेकांना कट टू कट झालेल्या या लढतीत गंगाखेडने मात्र अवघ्या २२८९ मतांच्या लीडने राष्ट्रवादीच्या केंद्रेंच्या बाजूने कौल दिला.. पण या सगळ्या राजकारणाच्या नादात मतदारसंघाकडे पुरतं दुर्लक्ष झालं…त्यात तत्कालीन आमदार केंद्रे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात मधल्या काळात बराच संघर्ष पाहायला मिळाला.. एका आर्थिक व्यवहारात रत्नाकर गुट्टे यांना काही काळ तुरुंगात राहावं लागलं… त्यामुळे तुरुंगात राहूनच त्यांनी २०१९ ची गंगाखेडची विधानसभा निवडणुक लढवली… आणि आश्चर्य म्हणजे मधुसूदन केंद्रे यांचा पराभव होऊन गंगाखेडच्या जनतेनं रत्नाकर गुट्टे यांच्या बाजूने कौल दिला… आणि गुट्टेंनी गंगाखेडच्या मातीत विजयाचा भंडारा उधळला.. मात्र सिबीआय, इडीच्या चौकशींमुळे गुट्टे यांच्या राजकीय इमेजला सेट बॅक बसलाय… तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा करत रासप वर्सेस भाजप या नव्या संघर्षाला तोंड फोडलंय… त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांना आपल्या मतदारसंघातूनच जानकरांच्या पाठीशी लीड देऊ शकले नाहीत.. त्यामुळे गंगाखेडमध्ये सध्यातरी बदलाचे वारे वाहू लागलेत.. पण गुट्टे यांचा स्थानिक राजकारणावरचा होल्ड पाहता गुट्टे यांना डावलणंही भाजपला परवडणारं नाही, विशाल कदम नावाची असणारी चर्चा इथं इंटरेस्टींग लढत घडवून आणणार एवढं मात्र नक्की…
तिसरा मतदारसंघ आहे जिंतूरचा… एकिकडे लोअर दुधना तर दुसरीकडे येळदरी धरण.. आकाराने प्रचंड मोठा विस्तार असलेल्या जिंतूरला राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेला मतदारसंघ म्हणून ओळख आहे… हायवे जोडले गेले मात्र जिंतूरला विकासाशी इथल्या नेत्यांना कधीच जोडता आलं नाही… रामप्रसाद बोर्डीकर अनेक टर्म जिंतूरचे आमदारच नाही, तर त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही… १९९० ते २०१४ या संपूर्ण काळात म्हणजे विधानसभेच्या सहाही टर्म बोर्डीकरांनी काँग्रेसच्या तिकीटावर जिंकल्या… बोर्डीकरांनी इथे साधा आपला विरोधकही निर्माण होऊ दिला नाही… पण बोर्डीकर विरुद्ध अजितदादा यांच्यात विस्तव पडल्यानं इथं विजय भांबळे यांना अजितदादांनी ताकद दिली.. आणि २०१४ मध्ये बोर्डीकरांच्या वर्चस्वाला नख लावत भांबळे यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघात बेस मिळवून दिला… पण बदललेली राजकारण पाहता पुढे बोर्डीकर भाजपात गेले.. त्यांच्या मुलीला लोकसभेचं तिकीट देण्याचीही खलबतं झाली.. पण शेवटी भाजपनं त्याची भरपाई मेघना बोर्डेकर यांना २०१९ च जिंतूरचं तिकीट देऊन केली… विजय भांबळे विरुद्ध मेघना बोर्डीकर अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत बोर्डीकर यांनी आपली पुरी यंत्रणा कामाला लावत मेघना बोर्डीकर यांना निवडून आणलंच…पण हा विजय अवघ्या चार हजार मतांच्या निसटत्या लीडचा होता… सध्याचं करंट स्टेटस पाहायचं झालं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या म्हणजेच संजय जाधव यांच्या पाठीशी जिंतूरनं लीड दिल्याने येणाऱ्या विधानसभेला मेघना बोर्डेकर यांची आमदारकी धोक्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. मुळात विजय भांबळे हे अजित पवार गटाचे होते पण तरी देखील त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात फूट पडली असतानाही एकतर्फी किल्ला लढवत भांबळे यांनी जाधवांच्या पाठीशी निर्णायक लीड दिलं… त्यामुळेच जिंतुरमध्ये यंदा भांबळे शरद पवारांची तुतारी आरामात वाजवतील, असा एकूणच मतदारसंघाचा कल दिसतोय…
आता येतो तो शेवटचा मतदारसंघ अर्थात पाथरीचा… सिंचन व्यवस्थेनं परिपूर्ण असणाऱ्या पाथरीचा विकास मात्र कायम खुंटलेला… सगळे पक्ष बदलून झाले, अपक्षालाही संधी दिली आणि आता काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने कौल दिलेल्या पाथरीत मात्र काहीच बदललं नाहीये… विकासकामांना खीळ लागलेल्या साईंचं जन्मस्थान असणाऱ्या पाथरीचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे सुरेश वर्पुरडकर… खरंतर काँग्रेसने जिंकलेल्या या पाथरीच्या राजकारणाची सुरुवातच मुळात शिवसेनेपासून झाली होती… १९९० पासून मतदारसंघात सलग ३ वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे विजयी घोडदौड रोखली होती… पुनर्रचनेनंतर मात्र कोणत्याही एका पक्षाला सातत्याने विजय घेता आला नाही. २००९ साली मीरा रेंगे यांच्या रूपाने शिवसेनेला विजय मिळवता आला परंतु 2014च्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी सर्वच पक्षांना धूळ चारत विजय मिळवला… तर काँग्रेसचे सुरेश वरपुरडकर या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते… पुढे अपक्ष लढत दिलेल्या मोहन फड साहेबांनी भाजप व्हाया शिवसेना वारी केली..शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला… पण युतीत संघर्ष झाल्यानं भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढूनही फड यांचा पराभव करुन काँग्रेसच्या वरपूडकरांनी पक्षावर काँग्रेसचा झेंडा फडकवला… मागच्या पाच वर्षात इथलं राजकारण बरंच फिरलं आहे.. त्यामुळे वरपुडकर यांच्या बाजूनेच इथला निकाल असला तरी राजेश विटेकर इथं गेमचेंजर भुमिकेत दिसू शकतात… तर असा आहे परभणीतील या चार विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य निकाल… बाकी परभणीत यंदा आमदारकीच्या गुलालाचे मानकरी कोण असतील, ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,
PCMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खास बातमी घेऊन आलेलो आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता पिंपरी चिंचवड महानगरपालिके (PCMC Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ब्रेडिंग चेकर्स या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 56 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हि भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. 3 जुलैपासून ही भरती सुरू होईल. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 11 जुलै 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | PCMC Bharti 2024
पदाचे नाव- ब्रेडिंग चेकर्स
पदसंख्या – 56 जागा
नोकरीच्या ठिकाणी – पिंपरी चिंचवड
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन पिंपरी 411018
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
तुम्ही दिलेल्या पत्त्यावर हा अर्ज सादर करायचा आहे.
11 जुलै 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.