Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 626

Indian Air Force Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दलात मोठी भरती; असा करा अर्ज

Indian Air Force Bharti 2024

Indian Air Force Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण आता त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळणार आहे. भारतीय हवाई दलांतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ (तांत्रिक व्यापारी) या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 33 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी (Indian Air Force Bharti 2024) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. आणि मग अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 25 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

महत्त्वाची माहिती | Indian Air Force Bharti 2024

  • पदाची नाव – शिकाऊ तांत्रिक व्यापार
  • पदसंख्या – 33 जागा
  • वयोमर्यादा – 17 ते 26 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा दहावी किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना देखील संधी आहे.

अर्ज कसा करावा ? | Indian Air Force Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 25 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Gokul Milk Price : गोकुळ दूध दरात वाढ!! आता किती रुपये मोजावे लागणार?

Gokul Milk Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलं असून आता खिशाला कात्री लावणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. गोकुळच्या दुधाच्या दरात वाढ (Gokul Milk Price) झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. प्रति लिटर दोन रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात गाईच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. पूर्वी गोकुळचे गायीचे दूध 54 रुपये प्रति लिटर होतं ते आता 56 रुपये मोजावे लागणार आहे. खरं तर मुंबई आणि पुण्यातच गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला मोठी मागणी असते. त्यामुळे येथील ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

1 जुलैपासून दरवाढ लागूGokul Milk Price 

नवीन दरवाढ 1 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बाकी शहरात राहणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल 3 लाख लिटर विक्री तर पुण्यात भागात 40 हजार लिटर दूधाची विक्री होते. वाढता खर्च आणि दूध पावडरीमधील होणाऱ्या तोट्याचा ताळमेळ घालण्यासाठी सध्या वाढलेल्या दरामुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे.

दरम्यान, राज्यातील इतरही सर्वच दूध संघांनी दरवाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी अमूल (Amul company) आणि पराग कंपनीने (Parag company) दुधाचे दर वाढ केली होती. आता गोकुळ दूधातही दर वाढ (Gokul Milk Price) झाल्यामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत. मात्र गोकुळच्या दरवाढीनंतर शेतकऱ्यांना याचा किती फायदा होतो ते पाहायला हवं, कारण एका बाजुला चाऱ्याच्या, पशुखाद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे दुधाच्या किमतीला मामुली दर मिळत असल्याने शेतकरी नाराज आहे.

Weather Update | महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, IMD ने दिला धोक्याचा इशारा

Weather Update

Weather Update | जुलै महिना सुरू झाला आहे, तशी महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अशातच आता हवामान विभागाकडून आजच्या हवामानाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) पुढील 24 तासांमध्ये आता विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विजा देखील कड कडणार आहेत. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळ आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणातही आज अनेक ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे वादळाची देखील शक्यता आहे.

मुंबईबाबत सांगायचे झाले, तर मुंबईमध्ये पुढील 24 तासात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर अधून मधून पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेले आहे. आज मुंबईचे तापमान हे 35° c च्या आसपास राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. पावसासोबत (Weather Update) हवामान विभागाने वादळी वाऱ्याचा देखील इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असणार आहे. त्याचप्रमाणे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक हे पर्यटनाला जातात. परंतु सध्या पावसाचा वेग आणि वाऱ्याचा वेग दोन्ही जास्त प्रमाणत वाहत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे.

LPG Subsidy : LPG अनुदानासाठी 9000 कोटींची सबसिडी? काय आहे सरकारचा प्लॅन?

LPG Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महिन्यात लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पना सर्वसामान्य नागरिकांना क्षुह करण्यासाठी सरकार अनेक वेगवेगळ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार तेल कंपन्यांना (OMCs) सुमारे 9,000 कोटी रुपयांची LPG सबसिडी जाहीर करेल असं बोललं जातंय. उज्ज्वला योजनेंतर्गत हि सबसिडी देण्यात येईल. सरकारने तेल कंपन्यांना हि सबसिडी दिल्यास याचा फायदा देशभरातील १- कोटी उज्ज्वला लाभार्थ्यांना होणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, सरकार आगामी अर्थसंकल्पातही ही आर्थिक मदत सुरू ठेवणार आहे.

खरं तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत, सरकार लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 300 रुपयांचेअनुदान देते. म्हणजेच ९०० रुपयांचा मिळणारा गॅस ६०० रुपयांत खरेदी करता येतोय. 1 मार्च 2024 पर्यंत PMUY चे भारतात 10.27 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. चालू आर्थिक वर्षात (2024-25) सरकारने आधीच 2,000 कोटी रुपये ओएमसीकडे हस्तांतरित केले आहेत. आता सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सरकारने या योजनेअंतर्गत 70,000 हून अधिक नवीन कनेक्शन देण्याची घोषणा आधीच केली आहे. याशिवाय, रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण करणाऱ्या अधिक क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी मोदी सरकार उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनांच्या विस्ताराची घोषणा करू शकते. या अर्थसंकल्पात देशातील तरुण, सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणी यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार आणखी काय पाऊले उचलते ते सुद्धा बघायला हवं.

Fungal Infection | पावसाळ्यात वाढतो बुरशीजन्य संसर्गाचा धोका; अशाप्रकारे घ्या काळजी

Fungal Infection
Fungal Infection

Fungal Infection | पावसाळा हा ऋतू आणि त्यांचा आवडता ऋतू असतो. पावसाळ्यात सर्वत्र हिरवागार निसर्ग आणि थंड वातावरण असते. त्यामुळे अनेकांना हा ऋतू आवडतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील होतात हवेतील आद्रता वाढल्यामुळे जीवाणू सहज वाटतात. आणि त्याचा मोठा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. पावसाळ्यात खास करून बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पावसाळ्यात या बुरशी संसर्गापासून (Fungal Infection) स्वतःचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे. आता या फंगल इन्फेक्शनपासून कसे रक्षण करायचे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

सैल कपडे घाला | Fungal Infection

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते, त्यामुळे भरपूर घाम येतो आणि अशा ओलसर ठिकाणी बुरशीची वाढ होते. म्हणून, सैल सुती कपडे घाला, ज्यामुळे तुम्हाला घाम कमी येतो आणि लवकर कोरडे होतात. अशा परिस्थितीत जाड कपडे घालणे टाळावे, जसे की जीन्स किंवा कमी घाम शोषणारे कपडे.

घाम पुसा

जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर घामाने भिजलेले कपडे जास्त वेळ घालू नका, त्याऐवजी कपडे बदलत राहा. त्याचप्रमाणे शरीराच्या काही भागांना जसे अंडरआर्म्स, गुडघ्याच्या मागे आणि कोपरांना जास्त घाम येतो. त्यामुळे ही ठिकाणे वेळोवेळी पुसत राहा, जेणेकरून घामामुळे तेथे बुरशीची वाढ होऊ नये. अशी कसरत करूनही लगेच आंघोळ करून कपडे बदला.

हात धुवा

कोणताही जंतू आपल्या हातातून सर्वाधिक पसरतो, कारण आपल्या हातांनी आपण शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागाला स्पर्श करतो. म्हणून, बाहेरून आल्यानंतर, कोणत्याही प्राण्याला स्पर्श केल्यानंतर किंवा साफसफाई वगैरे केल्यानंतर, आपले हात नक्कीच धुवा आणि चांगले पुसून टाका. यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होईल.

टॉवेल आणि चादरी बदला

आंघोळीनंतर किंवा बाहेरून आल्यानंतर आपण आपले हात पाय टॉवेलने पुसतो. त्याचप्रमाणे झोपताना सोडलेला घाम आपल्या उशीवर आणि बेडशीटवर दिसते. त्यामुळे त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे टॉवेल आणि चादरी नियमितपणे बदलणे महत्त्वाचे आहे.

खाजवू नका | Fungal Infection

जर तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग झाला असेल तर त्या भागात खाज करू नका. यामुळे संसर्ग वाढू शकतो किंवा अधिक गंभीर स्वरूप येऊ शकते. त्यामुळे अजिबात खाज सुटू नका.

स्वत: औषधोपचार करू नका

बुरशीजन्य संसर्ग असल्यास, स्वतःहून औषध घेऊ नका. हे फक्त तात्पुरते आराम देते आणि काही दिवसात संसर्ग परत येऊ शकतो. त्यामुळे शरीरावर पुरळ किंवा खुणा दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला

आपल्या प्रायव्हेट पार्टलाही खूप घाम येतो. तसेच महिलांमध्ये योनीमार्गातून स्त्राव झाल्याने प्रायव्हेट पार्टमध्ये आर्द्रता वाढते. म्हणून, अंडरवेअर दररोज बदला आणि गरम पाण्यात पूर्णपणे स्वच्छ करा.

हे क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा; सत्यजित तांबे भडकले

satyajit tambe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईतील मरीनड्राइव्ह पासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. जग्गजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी मुंबई अक्षरशः थांबली होती. यावेळी प्रचंड गर्दीत काहीजणांचा श्वास कोंडला तर अनेकजण एवढ्या मोठ्या गर्दीत जखमी सुद्धा झाले. या सर्व परिस्थितीवरून आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांची हि गर्दी म्हणजे क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे असं म्हणत सत्यजित तांबे यांनी क्रिकेटप्रेमींना खडेबोल सुनावले आहेत.

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करत म्हंटल, मुंबईला आणखी एक हाथरस बनण्यापासून वाचवल्याबद्दल देवाचे आभार. प्रशासन एवढा मोठा धोका कसा पत्करू शकते.हातरसमध्ये 121 लोकांचा जीव गेल्याच्या एका दिवसानंतर वानखेडे स्टेडियमवर “फर्स्ट कम, फर्स्ट सीट” येणाऱ्यास परवानगी दिली जात आहे? हे आपल्या देशावर किंवा क्रिकेटवरचे प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा आहे. अनागोंदी आणि बेपर्वाईपेक्षा सुरक्षितता आणि विवेकाला प्राधान्य देऊ या असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केलं.

दरम्यान , मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत भारतीय संघाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. आपल्या लाडक्या रोहित शर्मासह सर्व खेळाडूंना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींचा जनसागर लोटला होता. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. इतका विराट जनसागर पाहून भारतीय खेळाडूही हरखून गेले होते. क्रीडाचाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. यानंतर वानखेडे स्टेडियमवर एका छोटेखानी कार्यक्रमात भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारली. यावेळी ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा स्वतावर आवर घालू शकला नाही. त्याने चांगलाच ठेका धरला आणि नाचायला सुरुवात केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनीही नाचायला सुरुवात केली. क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आनंद देणार असं हे दृश्य होते

आपण World Cup जिंकलोय, नाचायला पाहिजे; रोहित मराठीत भरभरून बोलला

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाची भव्य दिव्या अशी विजयी मिरवणूक मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत पार पडली. लाखोंचा जनसागर मरीन ड्राइव्ह परिसरात गोळा झाला होता. आपल्या लाडक्या क्रिकेटप्रेमींना बघण्यासाठी चाहते चांगलेचा आतुर झाले होते. यानंतर वानखेवर खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मराठीत बोलत चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली. आपण World Cup जिंकलोय, नाचायला पाहिजे असं रोहित शर्मा म्हणाला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला, “वर्ल्डकप जिंकल्याचा सर्वांनाच फार आनंद झाला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर वर्ल्डकप ट्रॉफी भारतात आली आहे. त्यामुळे सर्व भारतीय फार खुशीत आहेत. निवृत्ती घेण्याची ही अगदी योग्य वेळ होती. 2007 चा वर्ल्डकप माझ्यासाठी तितकाच स्पेशल होता आणि आताचा हा वर्ल्डकप पण तितकाच खास आहे.असं रोहित म्हणाला. यावेळी त्याला स्टेडियम मध्ये केलेल्या डान्स बाबत विचारलं असता, भारताने वर्ल्डकप जिंकला आहे त्यामुळे आपण नाचायला पाहिजे असं रोहित शर्माने म्हंटल. रोहित शर्माला मराठीत बोलताना पाहून चाहत्यांना सुद्धा आनंद झाला.

रोहित शर्माचा वानखेडेवर गणपती डान्स

दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारली. यावेळी ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा स्वतावर आवर घालू शकला नाही. त्याने चांगलचह ठेका धरला आणि नाचायला सुरुवात केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनीही नाचायला सुरुवात केली. क्रिकेटप्रेमींना सर्वात जास्त आनंद देणार असं हे दृश्य होते. वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.

Vitamins | जेवणात करा ‘या’ जीवनसत्वांचा समावेश; हृद्यविकार होईल कायमचा दूर

Vitamins

Vitamins | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. धावपळीच्या जगात अनेक लोक फास्ट फूड खातात. त्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक जमा होऊ लागतात. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजकाल लोकांना हृदयविकाराचा झटका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार होतात. आणि ते धमन्यांच्या भिंतीवर जाऊन चिकटतात. त्यामुळे तुमची रक्तभिसरणची प्रक्रिया मंदावते.

या सगळ्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. धमन्यांवर अडकलेल्या या ब्लॉकचा रक्तभिसरणवर परिणाम होऊन त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आणि आजार वाढतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या जेवनामध्ये काही बदल करणे खूप गरजेचे आहे. तुमच्या जेवणात काही जीवनसत्त्वांचे (Vitamins) सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. आता आपण या जीवनसत्त्वाबद्दल माहिती जाणून घेऊया.

व्हिटॅमिन सी | Vitamins

व्हिटॅमिन सी व्यक्तीच्या रक्तवाहिन्या, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, जे कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखण्यात मदत करते. व्हिटॅमिन सी शरीरातील जळजळ देखील कमी करते.

व्हिटॅमिन-बी

रक्तामध्ये आढळणाऱ्या होमोसिस्टीनची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते आणि प्लेक होऊ शकतो. अशा परिस्थितीत, व्हिटॅमिन बी रक्तातील होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते.

व्हिटॅमिन के | Vitamins

व्हिटॅमिन के शरीरात आढळणारी प्रथिने सक्रिय करते, जे कॅल्शियम रक्तवाहिन्यांऐवजी हाडांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, जिथे त्याची गरज असते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होत नाही आणि ते ब्लॉक होत नाही.

व्हिटॅमिन-ई

व्हिटॅमिन ई आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होण्यापासून प्रतिबंध होतो. हे रक्तवाहिन्यांना स्वच्छ आणि सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी कॅल्सिफाइड प्लेक तयार होण्यापासून रोखून धमन्यांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करते, ज्यामुळे धमनी अवरोधित होण्यास प्रतिबंध होतो.

Travel : व्हा मेंटली डिटॉक्स …! भेट द्या भारतातील ‘या’ अप्रतिम ठिकाणाला

Travel : सध्याची लाइफस्टाइल ही अत्यंत धकाधकीची आहे. घर, जॉब, फ्युचर अशा बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतोच. जर तुम्हाला ह्या सर्व स्ट्रेस पासून सुटका करुन घ्यायची असेल एखाद्या शांत ठिकाणी जाऊन तुम्हाला स्ट्रेसफ्री व्हायचे असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे म्हणून समजा. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा एका ठिकणाबद्दल (Travel) सांगणार आहोत इथे तुम्ही मेंटली डिटॉक्स व्हाल. इथली शांतता तुम्हाला मन:शांती देऊन जाईल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल…

खरंतर शांतीचे प्रसारक म्हणून गौतम बुद्ध जगभरात प्रसिद्ध आहेत. जेथील वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बोधगया . याच ठिकणी बोधी वृक्षाखाली बसून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांच्या ज्ञानाने संपूर्ण जग आनंदित होऊ लागले. तेव्हापासून जगभरातील लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. हे एक तीर्थस्थान बनले आहे. जगभरातून अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी (Travel) येत असतात. चला जाणून घेऊया इथली काही प्रेक्षणीय स्थळांबाबत

महाबोधी मंदिर (Travel)

गया येथील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे महाबोधी मंदिर. या मंदिरात जगभरातून बौद्ध अनुयायी येतात. हे ठिकाण देखील विशेष आहे कारण येथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. या मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा घोषित केले आहे.

द ग्रेट स्टॅच्यू ऑफ बुद्ध

गया शहर पूर्णपणे गौतम बुद्धांना समर्पित आहे. द ग्रेट स्टॅच्यू ऑफ बुद्ध हे एक असे ठिकाण (Travel) आहे जिथे बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती स्थापित केली आहे. या 25 मीटर उंच मूर्तीवर गौतम बुद्ध कमळावर बसलेले दिसतात. हा पुतळा बनवण्यासाठी 7 वर्षे लागली.

रॉयल भूतानी मठ (Travel)

अतिशय शांत वातावरणात, रॉयल भूतानी मठ हे बौद्ध धर्म जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण ठरेल. या मठात (Travel) बौद्ध धर्माचे शिक्षण दिले जाते जेथे भगवान बुद्धाची मूर्ती स्थापित केली जाते.

थाई मठ

हा मठ खास आहे कारण तो थायलंडच्या राजाने बांधला होता. या मठात तुम्हाला (Travel) थाई कलेचे नमुने पाहायला मिळतील. थाई मठ हा भारतातील एकमेव थाई मठ असल्याचे मानले जाते.

दूंगेश्वरी गुफा मंदिर

दूंगेश्वरी मातेच्या मंदिराला सर्व धर्माच्या लोकांसाठी अनन्यसाधारण (Travel) महत्त्व आहे. या गुहेत राहून महात्मा बुद्धांनी वर्षानुवर्षे ध्यान केले, असे बौद्ध अनुयायी मानतात.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! ITBP अंतर्गत हेड कॉन्स्टेबलच्या 112 जागांसाठी भरती जाहीर

ITBP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) कडून मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबलच्या 112 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. तर 7 जुलै 2024 पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. हे अर्ज itbpolice.nic.in वर जाऊन भरता येऊ शकतात.

भरतीची जागा – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल

रिक्त पदे – 112

वयोमर्यादा – किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे

अर्जाची फी – सामान्य 100 रुपये आणि SC आणि महिलांना सूट देण्यात आली आहे.

पगार – दरमहा 25,500 ते 81,100

अर्ज कसा करावा??

सर्वात प्रथम recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जावा.

पुढे होम पेजवर दिसणाऱ्या ITBP हेड कॉन्स्टेबल भरती 2024 ऑप्शनवर प्रेस करा.

तेथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.

तसेच विचारण्यात आलेली कागदपत्रे जोडा.

सर्व प्रक्रिया झाल्यानंतर ऑनलाइन शुल्क करा.