Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 628

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G मोबाईल लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 220 4G and Nokia 235 4G

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । HMD ने नोकिया ब्रँडचे २ नवे मोबाईल भारतीय बाजारात लाँच केले आहेत. Nokia 220 4G आणि Nokia 235 4G असे या दोन्ही मोबाईलचे नाव असून हे बटणाचे म्हणजेच कीपॅड मोबाईल आहेत. कंपनीने अलीकडेच नोकिया 3210 (2024) भारतात लॉन्च केला होता. त्यानंतर आता आणखी २ नवीन मोबाईल भारतीय बाजारात आणले आहेत. या दोन्ही मोबाईलच्या UPI पेमेंट सुद्धा करू शकता हि या मोबाईलची खास गोष्ट आहे. आज आपण नोकियाच्या या दोन्ही मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नोकियाच्या या फोनमध्ये 2.8 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. यामध्ये Unisoc T107 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन 64MB रॅम आणि 128MB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यामध्ये 32GB चे मायक्रोएसडी कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते. Nokia 235 4G फीचर फोन Nokia S30+ OS वर काम करतो. मोबाईल मध्ये स्कॅन आणि पे UPI हे अँप आधीपासूनच इंस्टाल केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी बिन्दास्तपणे एकमेकांना ऑनलाईन पैसे पाठवू शकता. नोकियाच्या या मोबाईल मध्ये पॉवर साठी कंपनीने 1450mAh बॅटरी बसवली असून अगदी 9.8 तास ती आरामात चालते. यात ३.५ मिमी हेडफोन जॅक, एमपी३ प्लेयर आणि एफएम रेडिओ यांसारखी फीचर्स मिळतात.

किंमत किती ?

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर Nokia 235 4G (2024) ची किंमत 3,749 रुपये आहे. हा फोन निळा, काळा आणि जांभळ्या रंगात येतो. तर दुसरीकडे Nokia 220 4G (2024) ची किंमत 3249 रुपये आहे. हा फोन पीच आणि काळ्या रंगात येतो. ग्राहक हे दोन्ही मोबाईल HMD.com, Amazon.in आणि इतर आउटलेटवरून खरेदी करु शकतात.

विमानतळावर रोहितने वर्ल्डकप उंचावला, अन चाहत्यांचा जल्लोष (Video)

rohit sharma trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेला ट्वेन्टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी सात वाजता भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी आपल्या चॅम्पियन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी दाखल झाले होते. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चाहत्यांकडे बघत विश्वचषक उंचावून दाखवला. आणि एकच जल्लोष सगळीकडे पाहायला मिळाला. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडतानाहीच ती ट्रॉफी आहे जी बघायला चाहत्यांचे डोळे आसुसले होते. त्यामुळे वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. टीम इंडियाचे खेळाडू आता दिल्लीतील आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काहीवेळ आराम करतील. त्यानंतर 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास भारतीय संघ मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

आज कसा असेल टीम इंडियाचा कार्यक्रम

06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोला तुंबळ गर्दी ; मेट्रोच बंद पडली , व्हायरल झाला व्हिडिओ

Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. मात्र रामवाडी मेट्रो स्टेशनला प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे मेट्रो बंद पडल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय निर्माण झाली. याबाबतचा व्हिडीओ (Pune Metro) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर piyushsocial नावाच्या खात्यावर प्रवाशांच्या गर्दीमुळे मेट्रो बंद पडल्याचे दोन व्हिडीओ पोस्ट करण्यात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”ओव्हरलोडमुळे #पुणे स्टेशन ते रामवाडी मार्गावर मेट्रो बंद पडली” हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.शिवाय काही जणांनी वारीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पुणे मेट्रोला गर्दी पाहून पुणे मेट्रोची अवस्था मुंबई लोकल (Pune Metro) सारखी झाली आहे असे मत देखील व्यक्त केले आहे.

खरंतर रविवारी पुणे शहरांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झालं होतं त्यामुळे यासाठी काही महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले होते. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, वाकडेवाडी बस स्टॉप, स्वारगेट चा काही भाग या दिवशी बंद होता. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रो वाहतुकीचा एक चांगला पर्याय असल्याने हा पर्याय स्वीकारला त्यामुळे अनेकांनी मेट्रो (Pune Metro) प्रवास करायला पसंती दिली असावी. दरम्यान काही प्रवासी पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पुण्यामध्ये आले असावेत असा अंदाज देखील व्यक्त केला जातो आहे.

मेट्रो नक्की बंद का पडली ? त्याबाबत मेट्रो (Pune Metro) प्रशासनाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही दरम्यान मेट्रो बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला पण काही वेळानंतर मेट्रो सेवा सुरळीत सुरू करण्यात आली.

Hardik Pandya ठरला जगातील No. 1 टी20 ऑलराऊंडर

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ICC कडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) जागतिक पातळीवर T20 क्रिकेटमध्ये नंबर १ चा ऑल राऊंडर ठरला आहे. टी20 वर्ल्ड कपमधल्या दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला दोन स्थानांचा फायदा झाला. आता तो श्रीलंकेचा वानिंदु हसरंगाबरोबर संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची गरज होती. मात्र हार्दिक पंड्याने अतिशय प्रभावी गोलंदाजी करत आफ्रिकेला अवघ्या ९ धावाच करून दिल्या. तसेच धोकादायक फलंदाज डेव्हिड मिलरला बाद केलं. तत्पूर्वी त्याने आधीच्या ओव्हर मध्ये हेन्री क्लासेनला माघारी धाडलं होते. क्लासेनच्या त्या विकेट मुळेच भारतीय संघ हरता हरता पुन्हा एकदा सामन्याकडे परतला. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 144 धावा केल्या. तर 11 विकेटही घेतल्या. एकूणच त्यांनी कामगिरी अतिशय दमदार राहिली आणि याचा थेट फायदा टीम इंडियाला झाला.

ICC ने जाहीर केलेल्या T20 मधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या 222 च्या रेटिंगसह नंबर वन वर पोचला आहे. त्याच्या बरोबर वानिंदू हसरंगा सुद्धा पहिल्या स्थानावर आहे. या दोघांशिवाय मार्कस स्टाइनिस तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चौथ्या क्रमांकावर सिकंदर रझा आणि शाकिब अल हसन २०६ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा दुसरा अष्टपैलू अक्षर पटेलला सुद्धा सात स्थानांचा फायदा झाला असून तो ICC च्या क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे

Vande Bharat Express : पहिल्या पावसातच गळती ; वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा चर्चेत

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र आता मागच्या काही दिवसांत या ट्रेन बाबत तक्रारी सोशल मीडियावर यायला लागल्या आहेत . यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये अन्नात अळी सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पाऊस पडतो आहे. मात्र नावाजल्या गेलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मध्ये सुद्धा पावसामुळे गळती लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर प्रवाशांनी ट्रेनच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Vande Bharat Express)

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रेनच्या छतावरून खूप पाणी गळत असल्याचं पाहायला मिळत आहे. फ्लोअरही पाण्याने पूर्णपणे ओले झाले आहे. शिवाय सीट्स वरही पाणी टपकत आहे. लोकांना नाइलाजास्तवर ओल्या झालेल्या सीटवर बसावे लागत आहे. साहजिकच अशा पाण्याच्या गळतीमुळे लोकांना त्रास होत आहे.

प्रिया सिंह यांनी हा व्हिडिओ त्यांच्या X च्या हँडल @priyarajputlive वर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रिया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Express) स्थिती पहा. ही ट्रेन दिल्ली-वाराणसी मार्गावर धावते. वंदे भारत क्रमांक २२४१६ आहे”. या व्हिडिओला आतापर्यंत 26 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे – ‘अशा परिस्थितीत विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे सावधान’…! आणखी एका युजरने लिहिले आहे – ‘मेड इन इंडिया फक्त भारतीय लोकांसाठी’ .

रेल्वे विभागाचेही उत्तर (Vande Bharat Express)

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर रेल्वेने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले -” पाईपमध्ये तात्पुरता अडथळा आल्याने डब्यात काही प्रमाणात पाणी गळती झाल्याचे दिसले! ही बाब ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि दुरुस्त करण्यात आली. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व”

मुंबईत ओपन बसमधून खेळाडूंची मिरवणूक; कसा असेल BCCI चा प्लॅन?

open bus parade team india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ उद्या मायदेशी परतणार आहे. बार्बाडोसमधून टीम इंडियाचे खेळाडू भारताकडे रवाना झाले असून उद्या सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान नवी दिल्लीत दाखल होतील. दिल्लीत आल्यानंतर सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत ओपन बस मधून सर्व खेळाडूंची भव्य मिरवणूक निघेल असं बोलल जात आहे. बीसीसीआयने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

२००७ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत ओपन बसमधून भारतीय खेळाडूंची गौरव यात्रा काढण्यात आली होती. आताही अशाच प्रकारची खेळाडूंची भव्य मिरणवूक काढण्यात येईल. मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियम पर्यंत हि भव्य मिरवणूक काढली जाईल. पुन्हा एकदा विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले असून यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळेल. मुंबईला भारतीय क्रिकेटची पांढरी मानले जाते. मुंबईने अनेक दिग्गज खेळाडू भारताला दिले आहेत. त्यातच कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचाच असल्याने मुंबईकरांचे प्रेम नेहमीच रोहितला मिळालं आहे.

टीम इंडियाच्या आगमनानंतरचे संपूर्ण वेळापत्रक कसे असेल?

४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता बार्बाडोसहून नवी दिल्लीत खेळाडू पोचतील.
सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान मोदींच्या घराकडे टीम इंडिया रवाना होईल.
मोदींची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
मुंबई विमानतळावरून वानखेडे स्टेडियमपर्यंत खेळाडूंची ओपन बस मधून मिरवणूक निघेल.
वानखेडे स्टेडियमवर छोटस प्रेझेन्टेशन पार पडेल.
रोहित शर्मा वर्ल्डकप ट्रॉफी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे सुपूर्त करेल.
त्यानंतर खेळाडू आपापल्या घरी जातील.

Sambhajinagar To Goa Flight : छत्रपती संभाजीनगर ते गोवा केवळ दिड तासात ; इंडिगोची विमानसेवा सुरु

indigo

Sambhajinagar To Goa Flight : छत्रपती संभाजीनगर ते गोवा असा विमान प्रवास अखेर सुरु झाला आहे. १ जुलै पासून इंडिगोची विमानसेवा सुरु झाली आहे. गोव्यासोबतच नागपूर विमानसेवा सुद्धा सुरु झाली असून त्यामुळे आता कमी वेळामध्ये प्रवाशांना गोवा, नागपूर सारखी ठिकाणं गाठता येणार आहेत. या विमान सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून संभाजीनगर ते गोवा हे आंतर केवळ दिड (Sambhajinagar To Goa Flight) तासात पार करता येणार आहे.

मंगळवार दिनांक एक जुलै रोजी गोव्यासाठी संभाजीनगर होऊन विमानाचे उड्डाण झाले. ‘इंडिया बाय इंडिगो’ या उपक्रमा अंतर्गत छत्रपती सम्भाजीनगरहून गोवा आणि नागपूर साठी विमानांची उड्डाण घेतली गेली. एक जुलै रोजी 63 प्रवाशांनी गोव्यासाठी प्रवास केला. तर नागपूरहून आलेलया विमानात 37 प्रवासी संभाजीनगर मध्ये दाखल झाले. तर संध्याकाळी छत्रपती संभाजी नगर ते नागपूर विमानसेवेद्वारे 38 प्रवाशांनी प्रवास केला. इंडिगो कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गोवा विमान सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महापालिका ( Sambhajinagar To Goa Flight) आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह विमानतळ संचालक शरद येवले, सीआयएसएफचे कमांडर पवनकुमार, इंडिगो विमानतळाचे विमानतळ व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

या शहरात विमानसेवा (Chhatrapati Sambhajinagar To Goa Flight)

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये आता गोवा आणि नागपूर यांची सुद्धा भर पडली आहे. मंगळवारी इंडिगो कंपनीचे एटीआर विमान क्रमांक 6ई 7462 हे विमान नागपूर वरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर लँड झालं आणि या विमानाचे वॉटर कॅनन सॅल्यूटने धावपट्टीवर स्वागत करण्यात आले. या विमानातून 23 प्रवासी उतरले.

उद्योजकांचा वेळ वाचणार ( Sambhajinagar To Goa Flight)

या विमानसेवेचा फायदा उद्योजकांना होणार आहे याच्यात अजिबात शंका नाही. छत्रपती संभाजी नगरहून गोव्यासाठी निघालेल्या पहिल्या विमानामध्ये मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्किल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर म्हणजेच (मासीआ) या लघु उद्योजक संघटनेचे 35 उद्योजक गोव्याला गेले. अगदी दीडच तासात हे विमान गोव्यात पोहोचलं. त्यामुळे उद्योग आणि व्यापार करणाऱ्या व्यक्तींसाठी ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार ( Sambhajinagar To Goa Flight) असून अवघ्या दीड तासात गोवा गाठण शक्य होणार आहे.

Mazi Bahin Ladki Yojana | उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र नसतानाही, असा भरा माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज

Mazi Bahin Ladki Yojana

Mazi Bahin Ladki Yojana | महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Bahin Ladki Yojana) आणलेली आहे. या योजनेमध्ये सध्या सरकारने काही अटी आणि नियमांमध्ये बदल केलेले आहे. या बदलामुळे आता नागरिकांना अर्ज भरणे आणि त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्णता करणे सोपे झाले आहे. सुरुवातीला या योजनेचा अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे होते. परंतु आता महिलांना या कागदपत्रांची पूर्तता न करता देखील योजनेचा लाभ घेता येणार आहेत. आता या ऐवजी कोणती कागदपत्र द्यावी लागणार आहेत? हे आपण जाणून घेऊया.

महाराष्ट्र सरकारने या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत देखील वाढवलेली आहे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा. यासाठी सरकारने योजनांमध्ये काही बदल केलेला आहे. त्याचप्रमाणे काही अटी देखील बदललेल्या आहेत. तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल | Mazi Bahin Ladki Yojana

  • रेशन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्म दाखला

ज्या महिलांचा जन्म परराज्यात झालेला असेल आणि त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला, असेल तर त्यांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल, त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असणे गरजेचे आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे योजनेतील एका पात्र अविवाहित महिलेला देखील योजनेचा लाभ मिळणार आहे.

Crop Insurance | पिक विम्याचा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा जास्त शुल्क मागितल्यास, ‘या’ ठिकाणी करा तक्रार

Crop Insurance

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकासाठी पीक विमा भरत असतात. जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यांच्या पिकाचे नुकसान झाले,तर सरकारकडून त्यांनाही नुकसान भरपाई मिळते. या पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी केवळ एक रुपये शुल्क असते. परंतु अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांकडे एक रुपयापेक्षा जास्त पैसे मागतात. जर तुमच्याकडे जास्त पैसे मागत असाल, तर सरकारने तुम्हाला तक्रार करण्यासाठी सांगितलेली आहे. परंतु अनेक लोकांना ही तक्रार नक्की कुठे करावी हे समजत नाही.

आज-काल आरोग्य विमा जितका गरजेचा आहे. तितकाच पिक विमा (Crop Insurance) सुद्धा गरजेचा आहे. पिक विमाचा अर्ज भरताना लोकांना खूप त्रास होतो. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील केली जाते. यामुळे सरकारने त्यांना खबरदारी घेण्यास सांगितलेली आहे. शेतकऱ्यांकडे जर एक रुपयापेक्षा जास्त शुल्काची कुणी मागणी केली, तर त्यांना तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. यासाठी सरकारने टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे. त्याचप्रमाणे व्हाट्सअप आणि ईमेल आयडीचा वापर करून देखील तुम्ही तक्रार करू शकता.

कुठे कराल तक्रार? | Crop Insurance

टोल फ्री : 14411/ 18001800417
तक्रार नोंद : 022-414581933 / 022-414581934
व्हाट्सअ‍ॅप : 9082921948
ईमेल : [email protected]

या पिकांसाठी मिळणार पिक विमा

2024 च्या खरीप हंगामात भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी, नाचणी, भुईमुग, कारले, कांदा या 14 पिकांसाठी तुम्हाला सरकारकडून विमा मिळणार आहे. हा पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. त्यामुळे या तारखे अगोदर शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरून घ्या. यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन हा अर्ज करावा लागेल.

Robot Commits Suicide | जीवाला कंटाळून चक्क रोबोटने केली आत्महत्या; दक्षिण कोरियातून धक्कादायक प्रकार समोर

Robot Commits Suicide

Robot Commits Suicide | प्रत्येक माणसाला भावभावना असतात. त्यामुळेच मानव प्राणी हा इतर पृथ्वीवरील इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. माणूस कधी खुश असतो तर कधी नाराज असतात. अनेकवेळा आयुष्यात कुठलाही मार्ग न दिसल्याने माणूस आत्महत्या सारखे चुकीचे पाऊल उचलतो. माणसाप्रमाणे दिसणाऱ्या माणसाप्रमाणे हालचाल करणाऱ्या आणि काम करणारे आजकाल रोबोट देखील आहेत. रोबोट हा माणसाप्रमाणे सगळी काम करू शकतो. पण रोबोटला भावभावना नाही. परंतु अशातच एक धक्कादायक खुलासा झालेला आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच वाटेल की रोबोटला देखील भावना आहेत.

दक्षिण कोरियातून एक प्रकार समोर आलेला आहे. जिथे एका रोबोटने(Robot Commits Suicide) चक्क पायऱ्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. रोबोटला भावना नसतात. परंतु या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. ही बातमी सोशल मीडियावर देखील चांगलीच व्हायरल होत आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलमध्ये सिव्हिल सर्व्हंट म्हणून काम करणारा हा रोबोट ‘रोबोट सुपरवायझर’ या नावाने ओळखला जात होता. त्याने लोकांना मदत केली आणि कर्मचाऱ्यांमध्ये तो खूप लोकप्रिय होता. मात्र, त्याच्या ‘आत्महत्या’ची घटना रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे, विशेषत: एखादे मशीनही आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकते.

सुरुवातीच्या वृत्तानुसार, रोबोट रहस्यमयपणे त्याच ठिकाणी फिरताना दिसला. यानंतर तो दोन मीटर उंच शिडीवरून खाली पडला. त्यानंतर त्याची सर्व यंत्रणा कोलमडली. या घटनेनंतर रोबोटच्या ‘मृत्यू’च्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. स्थानिक मीडियाने या घटनेचे वर्णन देशातील पहिली ‘रोबोट आत्महत्या’ असे केले आहे.

सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी सर्व प्रकारची चर्चा सुरू केली. एका यूजरने लिहिले आहे की, कामाच्या बोजामुळे मशिन्सनेही आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. तर इतर म्हणतात, रजा नाही, भत्ते नाहीत, अगदी रोबोटला युनियनची गरज आहे. आणखी एका युजरने कमेंट केली आहे, या घटनेने हे सिद्ध होते की रोबोट्स अजूनही माणसांप्रमाणे निर्णय घेण्यास आणि परिस्थिती समजून घेण्यास सक्षम नाहीत.