Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 629

Ashadhi Wari Toll Free : पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Ashadhi Wari Toll Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानिमित्ताने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दाखल होणाऱ्या राज्यातील प्रत्येत वारकऱ्याला व त्याच्या वाहनांना टोल माफी (Ashadhi Wari Toll Free) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा राज्यातील जनतेला होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिले आहेत. त्यासंबधीचा जीआर देखील काढण्यात आला आहे. याचवेळी पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ (Ashadhi Wari Toll Free) करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

ज्यादा बसेस सुद्धा सोडणार- Ashadhi Wari Toll Free

दरम्यान, हिंदू समाजात आषाढ महिन्यातील एकादशीला अन्यनसाधारण महत्त्व आहे. आषाढ एकादशी म्हंटल कि, महाराष्ट्रातील भक्तांना खास करुन वारकऱ्यांना आषाढी वारीचे आणि आषाढी एकादशीचं वेध लागत. भाविकांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी करिता मुंबईतून दोनशे ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. हिंदू पंचांगानुसार यंदा आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजता सुरु होणार असून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी करण्यात येणार आहे.

देगलूर ते भोकर…. विधानसभेला नांदेडमध्ये अशोक चव्हाण निर्णायक ठरतील?

Nanded assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड (Nanaded) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला… आणि कॉंग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी आश्चर्यकारकरित्या लोकसभा जिंकली..अशोक चव्हाण हा आपला म्होरक्याच भाजपात गेल्याने मरगळ आलेल्या पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालंय.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र असेल? नांदेड जिल्ह्यात सध्याचं वारं पाहता नेमके कोणते ९ चेहरे आमदारकी खेचून आणतील? विधानसभेला जिल्ह्यात कॉंग्रेस की भाजप भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा…

जिल्ह्यातला पहिला मतदारसंघ येतो तो नांदेड उत्तरचा.. .. शिवसेना शिंदे गटात असणारे बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार… 2019 ला काँग्रेसचे प्रस्थापित डी. पी. सावंत यांचा पराभव करून अगदी तरुण, नवख्या शिवसैनिकावर शिवसेनेनं विश्वास ठेवून, भाजपच्या इच्छुकांचा दबाव झुगारून कल्याणकर यांना उमेदवारी मिळवून दिली… सलग दोन टर्म आमदार राहीलेल्या काँग्रेसच्या सावंतांचा पराभव करत कल्याणकर जायंट किलर ठरले होते… वंचित आणि एमआयएमचाही मतदारसंघात प्रभाव असल्याने इथे मतविभाजनाचा फटका सावंतांना बसल्याचं बोललं गेलं… त्यात अशोक चव्हाणांचे मित्र एवढीच काय ती त्यांची राजकीय ओळख मर्यादीत राहील्याने चव्हाणांच्या पाठोपाठ सावंतही भाजपात गेलेत.. तर दुसरीकडं ज्या विद्यमान आमदार कल्याणकर यांच्यावर ठाकरेंनी विश्वास टाकला होता, तेच शिंदेंच्या बंडात पहिल्या फळीत असल्याने मतदारसंघातील शिनसैनिक चांगलेच नाराज असल्याचं पाहायला मिळालं.

पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आनंद जाधव यांनी केला होता. कोणत्याही आमदाराला एक कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला नव्हता. त्यामुळे हा गद्दारीचा टॅग येणाऱ्या विधानसभेला बॅकफुटला घेऊन जाणारा आहे.. . या मतदारसंघात दलीत, मुस्लीम निर्णायक संख्येने आहेत. नव्यानं वाढणारं शहर म्हणून या मतदारसंघाकड पाहीलं जातं. मात्र पाणीटंचाई आणि रस्त्यांची चाळण होऊनही विद्यमान आमदारांना या प्रश्नावर फारसं काही करता आलेलं नाहीये. थोडक्यात या नाराजीचा फटका त्यांना बसणार हे कन्फर्म आहे. त्यात महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी जास्त झाल्याने तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत महायुतीमध्ये राजकारण बघायला मिळू शकतं.. बाकी आघाडीत ही जागा काँग्रेसलाच सुटण्याचे चान्सेस अधिक आहेत.. त्यात लोकसभेतील यश, दलित आणि मुस्लिम मतांचा मिळणारा पाठींबा यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात प्लसमध्ये राहते.. त्यात ठाकरे गट इथं काय भुमिका घेतो, यावर इथलं बरंच समीकरण अवलंबून असणार आहे….

दुसरा मतदारसंघ येतो तो दक्षिण नांदेड विधानसभेचा… नांदेड दक्षीण म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको – हडको आणि सोनखेडचा काही भाग मिळून बनलेला मतदारसंघ… काँग्रेसचे मोहन हंबर्डे या मतदारसंघातील विद्यमान आमदार. 2009 ला काँग्रेसकडुन ओमप्रकाश पोकर्णा यांनी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांचा पराभव केला होता. पण २०१४ ला थोड्या लीडने का होईना हेमंत पाटील यांनी ही जागा जिंकली. पण २०१९ ला पाटलांनी हिंगोलीची खासदारकी जिंकल्याने त्यांनी दक्षीण नांदेड मधून आपल्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुक रिंगणात उतरवलं… पण बाजी मारली ती हंबर्डे यांनी.. तेव्हा भाजपतील नाराजी आणि बंडाळीचा फटका सध्याच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं गेलं.. यानंतर हेमंत पाटलांचं Hemant Patil Sad तिकीट कापणं, राजश्री पाटील ( Rajshree Patil Lok Sabha Prachar ) यांची यवतमाळ लोकसभेची अपयशी लढत यामुळे शिंदे गटात असणारे पाटील बॅकफूटला गेले आहेत. पण तरिही लोकसभेतून माघार घेणं मान्य केल्यामुळे ते महायुतीचे दक्षीण नांदेडचे उमेदवार असतील, असं बोललं जातंय.. तर दुसरीकडे स्टँडिंग आमदार हंबर्डेच पुन्हा या मतदारसंघातून आघाडीकडून लढत देतील, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे मतदान घासून होणार असलं तरी निकालात आघाडीच्या उमेदवाराला सध्यातरी एक गुण जादा मिळतोय… अशोक चव्हाण भाजपात गेल्यावर याच हंबर्डे यांनी नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं कॉन्फिडन्सली सांगून आमदारकीला फक्त आपूणच, हे ठणकावून सांगितलंय…,

तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे कंधार विधानसभा…एकेकाळी विधानभवन गाजवून सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख होती… प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली राजकीय पाळंमूळं याच मतदारसंघात घट्ट रोवली… २००४, २०१४ अशा दोन टर्म प्रताप पाटलांनी कंधार मधून निकाली काढत आमदारकीचा गुलाल उधळला. पण २०१९ ला प्रताप पाटील चिखलीकर लातूरमधून खासदार झाल्याने कंधारच्या जागेवर अनेक इच्छुकांचा डोळा गेला. त्यात कंधारचं तिकीट आपल्या मुलाला सोडण्यात यावं, यासाठी चिखलीकरांनी बरेच प्रयत्न केले. पण युती असल्यानं ही जागा शिवसेनेच्या ॲड. मुक्तेश्वर धोंडगे यांनाच सोडण्यात आली. मुक्तेश्वर धोंडगे व श्यामसुंदर शिंदे Vs यांच्यात इथं २०१९ ला मुख्य लढत झाली. चिखलीकरांचे वर्चस्व असल्याने त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील व मेहुणे शामसुंदर शिंदे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. यावरून नंतर शिंदे व चिखलीकर यांच्यात बराच वाद झाला… यातून शिंदे यांनी शेकापची उमेदवारी मिळवली. आणि शिंदे शेकापकडून विजयी झाले… सध्या २०२४ विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात इच्छुकांची यादी फार मोठी आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील, पुरुषोत्तम धोंडगे, दिलीप धोंडगे हे सध्या उमेदवारीच्या रेसमध्ये दिसतायत. त्यात प्रा. मनोहर धोंडे मतदारसंघात काय भुमिका घेणार? यावरही इथली बरीच समीकरण अवलंबून आहेत…

आता पाहुयात मुखेड विधानसभा मतदारसंघाबद्धल… गावची गाव भकास झालेली पाहायची असतील, तर मुखेडला या… अशी या मतदारसंघाची अवस्था… स्थलांतराचा मोठा प्रश्न, पाणीचंटाई, ना कुठला रोजगार ना.. ना कुठलं धरण.. भाजपचे तुषार राठोड इथले विद्यमान आमदार. खरंतर त्यांचे वडील गोविंदमामा राठोड हे २०१४ ला इथून निवडून आले. पण शपथविधी आटोपण्याच्या आधीच लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र तुषार राठोड विजयी झाले… पुढे २०१९ लाही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला… मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष, विकासकामांची वाणवा आणि लेंडी प्रकल्पाची झालेली वाताहत पाहता यंदा जनता तुषार राठोडांना दणका देण्याच्या तयारीत आहे. पारंपरिक विरोधक भाऊसाहेब पाटील यांचे निधन झाल्यामुळे हनुमंत पाटील हे निवडणुक मैदानात दिसण्याचे फुल टू स्कोप आहे… लिंगायत, बंजारा आणि इतर समाज कुणाच्या पाठीशी उभा राहतो, यावर इथला निकाल अवलंबून आहे..

पाचवा मतदारसंघ आहे तो देगलूरचा… अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रसचे जितेश आंतापुरकर विद्यमान आमदार आहेत… खरं म्हणजे 2019 ला रावसाहेब अंतापुरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश आंतापुरकर निवडून आले.. अशोक चव्हाण सध्या भाजपात गेल्याने देगलूरमध्ये काही प्रमाणात काँग्रेसला लॉस होऊ शकतो… त्यात विद्यमान आमदारांना कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढवायची, हा प्रश्न पडलेला असणार.. त्यात सुभाष साबणे यांनी पोटनिवडणुकीला शिवसेना सोडून भाजपची धरलेली वाट पाहता, ते टेक्निकली भाजपात असले तरी शिंदेंच्या अत्यंत जवळचे त्यांना मानलं जातं. त्यामुळे साबणे पोटमिवडणुकीतील पराभवाचा वचपा आत्ता काढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

सहावा मतदारसंघ येतो तो नायगावचा… नांदेडमध्ये सध्या भाजपला दणका देत खासदार झालेले वसंत चव्हाण यांची पाळंमुळं याच नायगावमध्ये राेवली गेली. २००९ आणि २०१४ मध्ये सलग त्यांनी दोनदा आमदारकी पदरात पाडून घेतली. सोबतच बरीच विकासकामंही नेटाने केली. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्धल एक सॉफ्ट कॉर्नर राहीला… पण भाजप लाट, पण आघाडीत असणारी धुसपूस आणि युतीनं एकदिलाने लढलेली निवडणुक यामुळे चव्हाणांना भाजपच्या राजेश पवारांनी पराभवाचा दणका दिला.. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालातून वसंत चव्हाण यांनी थेट दिल्ली गाठत जिल्ह्यातील वारं फिरलंय. हे दाखवून दिलंय.. त्यामुले येत्या विधानसभेला ते नायगावमधून आपल्या मुलाच्या तिकीटासाठी शब्द टाकू शकतात.. तर दुसरीकडे भाजपचे राजेश पवार हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं सध्या तरी चित्र आहे… त्यात भास्करराव खतगावकर, गंगाधर कुंटूरकर व बापूसाहेब गोरठेकर या तिघांची भूमिका काय राहील, यावरही इथला निकाल प्रभावित राहणार आहे.. फक्त यंदाही नायगावमध्ये आमदारकीसाठी काटे की टक्कर पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की…

सातवा आहे भोकर विधानसभा.. स्वर्गीय शंकरराव चह्वाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख.. बाच वारसा त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाणांनी पुढे कायम ठेवला. २०१४ ला त्यांची लोकसभेवर निवड झाल्यानं त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या आमदार झाल्या.. खासदार आणि आमदार एकाच घरात असूनही अशोक चव्हाणांना आपल्या मतदारसंघाचा म्हणावा असा विकास करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पक्षाच्या कामात ते इतके व्यस्त झाले की जिल्ह्याकडे, मतदारसंघाकडं त्यांचं दुर्लक्ष झालं… या मधल्या काळात इथे बरेच स्वयंघोषित नेते उदयास आले. याचा मोठा लॉस म्हणजे २०१९ च्या लोकसभेला दस्तुरखुद्द चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला.. आता वंचित आणि इतर फॅक्टर इथे वर्क आउट झाले, हा भाग आहेच.. पण तरिही या पराभवानं चव्हाणांना मोठा धक्का बसला.. पुढे भोकर विधानसभेला त्यांनी भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उभं केलं. चव्हाण व गोरठेकर यांच्यात थेट लढत झाली. त्यात अशोक चव्हाण यांनी बाजी मारली.. पण त्यांच्या लीडने बराच मार खाल्ला… पुढे त्यांंच्यामागे लागलेला चौकशींचा ससेमीरा.. भाजपातील प्रवेश BJP Pravesh Ashok Chavhan.. मिळवलेली राज्यसभा… हा सगळा सिक्वेन्स पाहता भोकरचं राजकारण चांगलंच गुंतागुंतीचं बनून गेलंय.. उमेदवारांची इथेही भाऊगर्दी असली तरी महायुती प्लसमध्ये राहील, असं सध्याचं चित्र सांगतं.. पण नाराज काँग्रेस कार्यकर्ते काय भुमिका घेतील, यावर इथला निकाल अवलंबून राहील…

आता पाहूयात आठव्या हदगाव विधानसभा मतदारसंघाबद्धल… 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसकडुन हा मतदारसंघ हिसकाऊन घेतला… शिवसेनेच्या नागेश पाटील आष्ठीकर यांनी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांना पराभवाचा दणका दिला.. २०२४ लाही सेमच लढत हदगावला पहायला मिळाली पण यावेळेस माधवराव पाटील आमदार झाले… नागेश पाटील आष्टीकरांनी Nagesh Patil Ashtikar Win मशालीच्या चिन्हावर हिंगोलीत खासदारकीचा गुलाल उधळल्याने माधवराव पाटीलच इथून काँग्रेसच्या पंजावर निवडणुक लढताना दिसतील… पण ठाकरे गट इथे काय भुमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…

शेवटचा मतदारसंघ आहे किनवटचा… नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदीवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख आहे. या मतदारसंघात सातत्याने तीन वेळा निवडुन येण्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईक यांनी केलाय. या तीन्ही वेळेच्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांची माजी आमदार भिमराव केराम यांच्याशी जोरदार लढाई झाली. मात्र सातत्याने तिन्ही वेळा भिमराव केराम हे क्रमांक दोनचे मते घेत राहीली आणि प्रदीप नाईक निवडुन येत राहीले. पण हा सीलसीला मोडीत निघाला तो २०१९ ला भाजपच्या भीमराव केराम यांनी अखेर प्रदीप नाईक यांचा पराभव केलाच. जवळपास साठ टक्क्यांवर असलेला बंजारा मतदार नाईक यांच्या मागे तर आदिवासी मतदार केराम यांच्या मागे असं इथल्या मतदारांचं सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळतं.. सध्या प्रदीप नाईक यांच्या बद्धल असणारी नाराजी तर केराम यांची अकार्यक्षमता यामुळे इथे सध्या राजकीय असंदिग्धता आहे… इथे दोन्हीही बाजूने उमेदवार देताना या सामाजिक परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे, एवढं मात्र नक्की..बाकी नांदेडच्या या नऊ मतदारसंघात आमदारकीचा गुलाल कोण उधळेल? अशोक चव्हाणांच्या जाण्याने जिल्ह्यातून काँग्रेस बॅकफूटला फेकली जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

IBPS Recruitment 2024 | IBPS मध्ये तब्बल 6128 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

BPS Recruitment 2024

IBPS Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला एका चांगली नोकरीची संधी चालून आलेली आहे. या भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती लिपिक या पदासाठी होणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आयबीपीएसकडून (IBPS Recruitment 2024) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरती अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी लिपिक पदासाठी भरती होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

पदाचे नाव | IBPS Recruitment 2024

या भरती अंतर्गत लिपिक या पदासाठी रिक्त जागा आहेत.

रिक्त जागांची संख्या

या भरती अंतर्गत तब्बल सहा हजार 6128 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अर्ज पद्धती

ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी | IBPS Recruitment 2024

या भरती अंतर्गत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 47 हजार रुपये एवढा पगार मिळेल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

LIC Saral Pension Yojana | LIC ने आणली जबरदस्त योजना; दरमहा मिळणार 12000 रुपये पेन्शन

LIC Saral Pension Yojana

LIC Saral Pension Yojana | तुम्हाला जर तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अगदी आनंदात आणि सुखात जगायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला आजच काही गुंतवणूक करून ठेवणे खूप गरजेचे असते. जेणेकरून तुमचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होईल. सध्या बाजारामध्ये अनेक नवनवीन योजना उपलब्ध आहेत. ज्याचा फायदा हजारो नागरिक घेत असतात. आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही आता गुंतवणूक केली, तर निवृत्तीनंतर तुम्हाला त्याचा खूप चांगला परतावा मिळेल. LIC च्या या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana ) असे आहे. या योजनेची एक खासियत म्हणजे तुम्ही यात एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर लाभ घेऊ शकता.

त्याचप्रमाणे या गुंतवणुकीत बाजारातील कोणत्याही जोखमीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टीने ही अत्यंत योग्य आणि सुरक्षित अशी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता आता. या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

या सरल पेन्शन (LIC Saral Pension Yojana ) योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 40 वर्ष असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वयाच्या 80 वर्षापर्यंत तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. ही योजना तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहा मासिक आणि वार्षिक आधारावर देखील खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे योजनेची किमान रक्कम ही खरेदी केलेल्या वार्षिक आधारावर ठरवली जाते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता.

या योजनेमध्ये जर तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. जर तुम्ही या योजनेमध्ये 30 लाख रुपये एकत्र गुंतवले, तर तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर दर महिन्याला 12,380 रुपये पेन्शन मिळेल या योजनेचा आणि पेन्शनचा लाभ तुम्हाला आयुष्यभर मिळेल. परंतु जर दुर्दैवाने व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीमध्ये गुंतवलेले सगळे पैसे मिळतात. याचाच अर्थ ही योजना तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित आणि चांगली योजना आहे.

“दादांची राष्ट्रवादी” विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी आकडाच सांगितला

ncp assembly election seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये जागावाटपाबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ९० जागा महायुतीत लढवले असं म्हंटल होते, तर अनिल पाटील यांनीही भुजबळांच्या सुरत सूर मिसळत ८५ ते ९० जागांची मागणी केली होती. आता खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) आपण विधानसभेला किती जागा लढवू याबाबत आकडाचा जाहीर केला आहे. त्यानुसार दादा गट ८५ जागा विधानसभेला लढवणार असल्याचे समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकतीच मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक महायुतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी 85 जगांवर लढणार असल्याची विधान अजित पवार यांनी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक अवघ्या ३ महिन्यावर आल्या असुन त्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश अजित पवारांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत. काय करावं? कोणत्या गोष्टी टाळाव्या? याबाबतच्या टिप्स सुद्धा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. येत्या काळात आपला पक्ष आणखी वाढेल असा विश्वास अजित पवारांनी या बैठकीत व्यक्त केला.

आपल्या मित्रपक्षांसोबत वादग्रस्त विधान टाळा, सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचवा अशा सूचना अजित पवारांनी नेतेमंडळींना दिल्या आहेत. माझी लाडकी बहीण, महिलांना अर्ध्या तिकिटात बस प्रवास यासांरख्या लोकप्रिय योजनांचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा असेही अजित पवारांनी सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवार ८५ जागा लढवणार असेल तर मी,ग शिंदे गट आणि भाजप किती जागांवर आपले उमेदवार उभे करणार हा प्रश्न निर्माण झालाय. आमदारांचे बलाबल पाहता शिंदे गटाला सुद्धा ८५ ते ९० जागा मिळू शकतील तर भाजप ११० ते १२० जागांवर विधानसभा निवडणूक लढवेल असं बोललं जातंय.

Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन आणि त्यांच्या फायद्याच्या नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय तटरक्ष दलांतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक या पदाचारीसाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 320 रिक्त जागा आहेत. आणि त्या रीक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. 13 जून 2024 पासून हे अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्याचप्रमाणे 3 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेअगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Indian Coast Guard Bharti 2024

  • पदाचे नाव – नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक
  • पदसंख्या – 320 जागा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 22 वर्ष
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जुलै 2024

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 3 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Oppo A3 मोबाईल 12GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच; किंमत किती पहा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo ने चिनी बाजारात आपला नवा स्मार्टफोन Oppo A3 लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. येत्या काही महिन्यात ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात सुद्धा लाँच होऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले –

OPPO A3 मध्ये 120Hz चा रीफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2412 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. याशिवाय मोबाईलला 1200 nits पीक ब्राईटनेस मिळत असून ओप्पोचा हा मोबाईल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i च्या प्रोटेक्शन सह येतो. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा मोबाईल Android 14 वर काम करतो.

कॅमेरा – Oppo A3

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, OPPO A3 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कैमरा आणि समोरील बाजूला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45 वॅट सुपरVOCC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Oppo A3 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळतो.

किंमत किती?

मोबाईलच्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 1599 युआन (अंदाजे 18,365 रुपये) पासून सुरू होते. 12GB + 256GB मॉडेलची किंमत 1799 युआन (अंदाजे 20,660 रुपये) आहे. 12GB + 512GB मॉडेलची किंमत 2099 युआन (अंदाजे 24,110 रुपये) आहे. हा स्मार्टफोन काळा, पर्पल आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव इलो ! एसटी चे आरक्षण सुरु ; पहा गाड्यांचे नियोजन

Ganeshotsav 2024 : कोकणातला गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) म्हणजे पर्वणीच असते. महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात नोकरी धंद्यानिमित्त जाऊन वसलेला कोकणी माणूस आवर्जून कोकणात सण साजरा करण्यासाठी येत असतो. रेल्वे आणि एसटीचे बुकिंग महिनाभर आधी करावे लागते कारण ऐनवेळेला तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासन सुद्धा या कोकण वासियांची सोया करून देत असते. मुंबईत नोकरीनिमित्त राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऐनवेळी गर्दी होऊ नये म्हणून एस टी प्रशासनाने उद्यापासूनच म्हणजेच दोन महिने आधी आरक्षण सुरु केले आहे.

गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण (Ganeshotsav 2024) ४ जुलैपासून खुलं होणार आहे. सामूहिक आणि वैयक्तिक आरक्षणासह परतीचे आरक्षण ही प्रवाशांना गुरुवारपासून करता येणार आहे.

समूह आरक्षण करता येणार

केवळ कुटुंबासाठी नाही तर गणेशोत्सवासाठी वाड्यांमध्ये संपूर्ण एसटीचे आरक्षण करण्याची पद्धत आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक आरक्षण तसेच समूह आरक्षण हे एकाच दिवशी (Ganeshotsav 2024) प्रवाशांना करता येणार आहे महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल ॲप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

60 दिवस आधी बुकिंगची सुविधा(Ganeshotsav 2024)

कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवस आधी खुले करण्याचा निर्णय महामंडळांना घेतला आहे. यापूर्वी तीस दिवस आधी गाड्यांचा रक्षण करण्याची मुभा होती. तर रेल्वे गाड्यांचा आरक्षण 120 दिवस आधी करता येते. कोकणी (Ganeshotsav 2024) माणसांचा प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने साठ दिवस आधी एसटीने बुकिंग सुरू केला आहे

सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर येथून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सुटणार आहेत. कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात (Ganeshotsav 2024) येणार आहेत. जाडा गाड्यांचे वेळापत्रक लवकरच महामंडळाकडून प्रसिद्ध केले जाणार आहे.

Weather Update | पुढील 24 तास चिंतेचे ! ‘या’ ठिकाणी पावसाचा हाय अलर्ट जारी

Weather Update

Weather Update | महाराष्ट्रासोबत मान्सूनने संपूर्ण देशात देखील हजेरी लावलेली आहे. पंजाबपासून मनिपुरपर्यंत मुसळधार पाऊस बरसताना आपल्याला दिसत आहे. अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक असे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे त्यापुढे पुढील 24 तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) आता रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. त्याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट माथ्यावर देखील पाऊस पडण्यात आलेला आहे. तसेच विदर्भात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे.

त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची(Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आता नागरिकांनी सतर्क देखील राहायला पाहिजे. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्या विभागातील पावसाचा अंदाज घेऊन प्लॅन करा. अन्यथा तुम्ही पावसात देखील अडकू शकता. परंतु आता पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काही दिवसातच एक नवीन चिंता उभी राहणार आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला दिवसाचे ऊन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांनी भात लावण्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी हे अडचणीचे होऊ शकते.

टीम इंडिया भारतात कधी येणार? तारीख आणि वेळ समोर

TEAM INDIA ARRIVAL IN INDIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. संपूर्ण जगभरातून भारतीय संघावर कौतकाचा वर्षाव होत असून रोहित सेनेचे स्वागत करण्यासाठी देश सुद्धा चांगलाच आतुरला आहे. मात्र बार्बाडोसमध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघाला काही दिवस खबरदारी म्हणून तिथेच मुक्काम करावा लागला . मात्र आता टीम इंडिया भारतात कधी येणार याबाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत पोहचणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या या जगज्जेत्या खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयने विशेष फ्लाइटची व्यवस्था केली. भारतीय खेळाडू मंगळवारी बार्बाडोस मधून निघून बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहचतील असं बोललं जात होतं. मात्र आता या वेळेत सुद्धा बदल झाला आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान टीम इंडियाचे चॅम्पियन खेळाडू भारतात परततील. भारतात आल्यानंतर मुंबईत एका ओपन बस मधून सर्व खेळाडूंची विजयी मिरवणूक सुद्धा काढली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आणखी मालामाल होणार आहेत. जय शाह ट्विटरद्वारे म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली. टीम इंडिया दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली. यापूर्वी ICC ने सुद्धा भारतीय संघाला 20 कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे.