Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 632

जनतेसाठी कामाची बातमी!! आता या सरकारी योजनेअंतर्गत दातांचे उपचारही मोफत होणार

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील जनतेला योग्य उपचार सेवा अगदी मोबलक दरात मिळावी, यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला एक मोठे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामध्ये सावंत यांनी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंत वैद्यकीय उपचारांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. असे झाल्यास जनतेला दातांचे उपचारही (Dental Treatment) मोफत घेता येतील.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना मुंबई पुणे आणि इतर शहरातील खासगी रुग्णालयातही लागू करण्यात येणार आहे. याकरता डेलिगेशन रुग्णालयांना भेट देण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात दातांचे मोफत उपचार घेता येतील. यामुळे या उपचारासाठी अधिक पैसे मोजावे लागणार नाही. सत्यजित तांबे यांनी सभागृहात माहिती दिली की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपैकी केवळ 1.5 लाख रुपये विमा कंपनी देणार आहे . उर्वरित 3.5 लाख रुपयांची हमी राज्य सरकार घेणार आहे.

दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महाराष्ट्रातील गरीब लोकांच्या उपचाराची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. या योजनेअंतर्गत जनतेला १ जुलैपासून ५ लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा जनतेला होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे आता याच योजनेअंतर्गत दातांवरील उपचार देखील मोफत घेण्याची सुविधा सुरू होणार आहे.

राहुल गांधी स्वतःच दहशतवादी; रामदास आठवलेंच्या विधानाने नवा वाद??

rahul gandhi athwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात असं म्हणत काँग्रेस नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र यावेळी राहुल गांधी यांनी देशभरातील हिंदूंचा अपमान केला असं म्हणत भाजपने हा मुद्दा उचलून धरला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्या विधानावरून माफी मागावी अशी मागणीही भाजपकडून करण्यात येत आहे. या सर्व वादात आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उडी घेत थेट राहुल गांधींनाच दहशतवादी म्हंटल आहे. आठवले यांच्या या आरोपाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

आठवले म्हणाले, राहुल गांधींनी हिंदूंना दहशतवादी म्हटलं, पण ते स्वतः दहशतवादी आहेत. राहुल हिंदू समाजाला तोडण्याचं काम करत आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करणं चुकीचं आहे असं म्हणत रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. आठवले यांनी राहुल गांधींना थेट दहशतवादी म्हणल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आठवले यांच्या या विधानानंतर काय प्रत्युत्तर देते ते पाहायला हवं.

राहुल गांधी नेमकं काय म्हणले होते?

सोमवारी (1 जुलै) राहुल गांधी यांनी लोकसभेत आपलं म्हणणं मांडलं, तेव्हा चांगलाच गदारोळ झाला. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात. तुम्ही लोक अजिबात हिंदू नाही. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. मात्र राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उभं राहून संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं ही गंभीर बाब असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत. भाजप म्हणजे हिंदू नाही असं म्हणत राहुल गांधी आपापल्या विधानावर ठाम राहिले.

Mhada Mumbai : डिपॉजिट तयार ठेवा ; म्हाडाच्या सोडतीसंदर्भांत आली नवी माहिती समोर

Mhada Mumbai

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.

मुंबईत सुद्धा म्हाडा (Mhada Mumbai) कडून घरांची सोडत काढली जाते. मुंबईकरांची घर घेण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्ट मध्ये त्याची सोडत निघणार आहे.

या भागांचा समावेश (Mhada Mumbai)

2023 मध्ये म्हाडा कडून गोरेगाव आणि विक्रोळी या दोन जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र यंदाच्या सोडती मध्ये उपलब्ध असणाऱ्या घरांमधून उरलेल्या घरांच्या बरोबरच मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी ,कन्नमवार नगर भागामध्ये घर उपलब्ध असणार आहेत. 2020 ते 2022 दरम्यान म्हाडा कडून सोडत काढण्यात आली नव्हती. तर 2023 मध्ये 4 हजार 82 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र यंदाच्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सोडत जाहीर करण्यात येणार असल्याचे चिन्ह आता (Mhada Mumbai) स्पष्ट झाली आहेत.

मुंबईमध्ये गोरेगाव प्रेम नगर येथील तब्बल 322 हायफाय (Mhada Mumbai) घरांची उभारणी करण्यात आलेली आहे. ही घरं 800 ते 1000 स्क्वेअर फुटांची आहेत. ऑगस्टमध्ये निघणाऱ्या सोडतीमध्ये या घरांचाही समावेश करण्यात येणार आहे मात्र या घरांच्या किमती काय असतील हे अद्यापही जाहीर केलेलं नाही

Realme C63 भारतात लाँच; किंमत 9000 पेक्षा कमी

Realme C63 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme C63 असे या मोबाईलचे नाव असून C सिरीज मधील हा नवीन मोबाईल आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि सर्वोत्तम फीचर्सने सुसज्ज असा हा स्मार्टफोन आहे. आज आपण Realme च्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

6.74 इंच डिस्प्ले –

Realme C63 मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1600 x 720 pixels रिझोल्युशन, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 450 nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने Realme C63 मध्ये Unisock चा T612 ऑक्टाकोर प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 वर चालतो. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्मार्टफोन मध्ये मिळत असून SD कार्डद्वारे हे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – Realme C63

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C63 मध्ये पाठीमागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8 MP चा फ्रंट कॅमेरा आहे . पॉवरसाठी मोबाईलमध्ये 5 हजार mAh बॅटरी असून हि बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देण्यात आली आहे.

किंमत किती?

रिअलमी C63 च्या 4GB + 128GB मॉडेलची किंमत 8999 रुपये आहे. हा मोबाईल लेदर ब्लू आणि जेड ग्रीन रंगात येते. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून विक्री सुरू होईल. ग्राहक realme.com, Flipkart आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सहानंतर फिरण्यास बंदी; थेट मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Lonavala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्यात पर्यटकांना लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी स्थळे आकर्षित करत आहेत. त्यामुळे अशा स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या २ दिवसांपूर्वीच
लोणावळ्यातील भूशी डॅम (Bhushi Dam) धबधब्यात एक कुटुंब वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरच लोणावळ्यात (Lonavala) संध्याकाळी सहानंतर पर्यटन स्थळे फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सध्या लोणावळ्यामध्ये विविध पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वाईट घटना देखील घडत आहेत. त्यामुळेच या पर्यटकांसाठी कठोर नियम आखण्यात आले आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना लोणावळ्यातील पर्यटनस्थळी फिरण्यास मजाव करण्यात आले आहे. या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास पर्यटकांवर कारवाई केली जाईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी सांगितले आहे की, आता इथून पुढे लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोर कारवाई केली जाईल. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण-तरुणी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडून रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे असे प्रकार करतात, अनेकवेळा तर हेच प्रकार त्यांच्या जीवावर बेततात. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डेंगू, मलेरिया आजारांच्या उपचारासाठी आरोग्य विमा असतो का?? या विम्याचा फायदा कसा होतो?

Health policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळा सुरू झाला की विविध आजार पसरण्यास सुरुवात होतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या काळात डेंगू, मलेरिया, चिकनगुनियांसारखे आजार तर वेगाने पसरतात. त्यामुळे दरवर्षी या काळात हजारो लोकांना उपचारासाठी रुग्णालय दाखल व्हावे लागते. यामध्ये डेंगूचा आजार बरा व्हायला सर्वात जास्त काळ जातो. परिणामी हे उपचार घेताना लाखो रुपये खर्च होतात. खासगी रुग्णालयात उपचारांवर बराच खर्च येतो. हा खर्च 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. परंतु, आरोग्य विमा असल्यामुळे खर्चाला बळी पडावे लागत नाही.

त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा आजारांच्या उपचारासाठी तुमच्याकडे आरोग्य विमा (Health Policy) असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असेल, तर त्याचे कव्हर अमाउंट किती आहे हे तपासणे देखील आवश्यक आहे. तसेच, त्यात कोणत्या आजारांचा उपचार कव्हर केला जातो हेही पाहावे लागेल. परंतु जर तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर लवकरच ती घेणे गरजेचं असेल. यामुळे तुमचे लाखोंचे नुकसान टळेल.

कोणती हेल्थ पॉलिसी घ्यावी?

लक्षात घ्या की, आरोग्य विमा पॉलिसींमध्ये 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असतो. त्यामुळे लवकरात लवकर हेल्थ पॉलिसी खरेदी करणे कधीही फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य पॉलिसी घेत असाल असाल तर ते अत्यंत फायदेशीर ठरेल. अशा धोरणाला फ्लोटर पॉलिसी म्हणतात. यामध्ये तुम्ही, तुमची पत्नी आणि मुलांचा समावेश केला जातो. कधीही एका चांगल्या विमा कंपनीकडून पॉलिसी घ्यावी. ज्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलच्या यादीमध्ये तुमच्या घराजवळील हॉस्पिटल्सचा समावेश असेल. हे तुम्ही तुमच्या पालकांसाठी वेगळी पॉलिसी देखील घेऊ शकता. यावर तुम्हाला टॅक्समध्ये सूटही मिळेल. अशा पॉलिसी घेतल्यामुळे उपचारांच्या काळात लाखो रुपयांची बचत होईल.

Travel : भीमाशंकरवर ‘या’ तारखेपर्यंत पर्यटनासाठी बंदी ; अपघात टाळण्यासाठी उचलले पाऊल

bhimashankr

Travel : पावसाळा सुरु झाला की डोंगर, दऱ्या, धबधब्यांनी भरलेल्या अनेक प्रेक्षणीय ठिकाणांना गर्दी होत असते. त्यातही धबधब्यांना भेट देणाऱ्यांची संख्या आधीक असते. कारण केवळ पावसाळ्यातच हे धबधबे प्रवाहित होत असतात. मात्र अनेकजण अशा ठिकाणी भेटी देत असताना जीवाची परवा न करता विचित्र धाडस करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे विपरीत घटनांना सामोरे जावे लागते. मागच्या दोन तीन दिवसात लोणावळा येथील भुशी डॅम ची दुर्घटना तसेच ताम्हिणी घाट येथील दुर्घटना ही ताजी उदाहरणे आहेत. म्हणूनच भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना देण्यास बंदी घातली आहे. ही बंदी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. म्हणजेच पूर्ण पावसाळा असेपर्यंत ही बंदी (Travel) असणार आहे. असे माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.

भीमाशंकर हे ठिकाण उंच डोंगरदर्‍यात असलेलं ठिकाण आहे. पावसाळ्यात इथं येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही शिवाय पावसाळ्यात पाऊस जास्त असल्यामुळे इथली वाटाही निसरड्या होत असतात. या वाटांवर अपघात होण्याचा धोका जास्त आहे आणि हाच धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागतर्फे एक जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत बायोडाटा पर्यटनासाठी बंद (Travel) करण्यात आले आहेत.

भीमाशंकर येथील अप्रतिम असा निसर्ग सौंदर्य आणि धबधबे पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि भावीक इथे भेटी देत असतात. मात्र ज्या ठिकाणी असणाऱ्या धबधबे आणि कुंडांमधील पाण्याचा अंदाज पर्यटकांना घेता येत नाही त्यामुळे वाहून जाण्याची शक्यता असते म्हणूनच कोंडवळ धबधब्याला जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. चोंडीचा धबधबा, खोपिवली क्षेत्र, नाणीचा धबधबा, पदरवाडी जवळ सुभेदार धबधबा, नारिवली क्षेत्र घोंगड घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी हे सर्व बंद (Travel) करण्यात आले आहेत.

…अन्यथा कारवाई (Travel)

याबाबत माहिती देताना उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांनी सांगितले की. सध्या धबधबांच्या ठिकाणी प्रचंड पाऊस होत. आहे अपघाताचा धोका वाढल्यानं आम्ही धबधबे बंद करत आहोत ताम्हिणी घटासह भीमाशंकर अभयारण्य देखील बंद केले आहे. त्या ठिकाणीअवैधरित्या कोणी गेले तर त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल अशी माहिती तुषार चव्हाण यांनी दिली आहे.

तरुण वाहून गेला… (Travel)

दरम्यान सोमवारी ताम्हिणी घाटामध्ये असलेल्या धबधब्यामध्ये एक तरुण उडी घेत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र हा तरुण वाहून गेल्यामुळे त्याला वाचवता आले नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे भीमाशंकर येथे पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे.

Gold Price Today: महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ!!

Gold Price Today 20 june

Gold Price Today: सध्याच्या घडीला सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दररोज चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोने चांदी खरेदी कधी करावे?? असा मोठा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण झाला आहे. आज तर सोन्याचेच नव्हे तर चांदीचे भाव देखील वाढले आहेत. निवडणुकीचा काळ संपल्यानंतर सोन्याच्या किमती घसरतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु किमती घसरण्याच्या ऐवजी वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आजचे भाव तपासून घ्या.

गुड रिटर्न्सनुसार 2 जुलै रोजी बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 72,380 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,63,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,23,800 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,350 रुपये
मुंबई – 66,350 रुपये
नागपूर – 66,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,380 रूपये
मुंबई – 72,380 रूपये
नागपूर – 72,380 रूपये

चांदीचे आजचे भाव

2 जुलै रोजी सोन्याच्या नाहीतर चांदीच्या किमतींमध्ये देखील घसघशीत वाढ झाली आहे. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 910 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9100 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 91,000 रूपये अशी आहे.

Vespa 946 Dragon Edition भारतात लाँच; 14.27 लाख किंमत

Vespa 946 Dragon Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही कधी विचार केला आहे का? कि भारतीय बाजारात एक अशी स्कुटर लाँच होईल जिची किंमत १४ लाख रुपये असू शकते? नाही ना.. पण हे खरं ठरलं आहे. कारण प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Vespa ने भारतीय मार्केट मध्ये ड्रॅगन एडिशन स्कूटर लॉन्च (Vespa 946 Dragon Edition) केली आहे. या स्कुटरची किमत तब्बल १४ लाख रुपये असून मारुती अल्टो, Creta या चारचाकी पेक्षाही Vespa च्या स्कुटरची किंमत जास्त आहे. या स्कूटरमध्ये नेमकं काय खास आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Vespa 946 Dragon Edition ही हाँगकाँगच्या लुनार न्यू इयर सेलिब्रेशन डेपासून प्रेरित असलेली स्कुटर आहे. ही स्कूटर एमराल्ड ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आली असून स्कुटरच्या हेडलॅम्पच्या खाली आणि त्याच्या प्रोफाइलवर एक ड्रॅगन आहे. त्यात दिलेले नवीन पेंट आणि डेकल्समुळे ही स्कुटर खूपच आकर्षक दिसत आहे. या स्कूटरचे फक्त 1888 युनिट्स जगभरात विकले जातील असे कंपनीने म्हटले आहे, मात्र कंपनीने भारतीय बाजारात किती युनिट्स विकले जातील हे स्पष्ट केलेले नाही.

इंजिन आणि पॉवर – Vespa 946 Dragon Edition

स्कुटरच्या इंजिन बद्दल सांगायचं झाल्यास, Vespa 946 Dragon Edition मध्ये 50 cc चे इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 12.7bhp पावर आणि 12.8Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात 8 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. वेस्पा ड्रॅगन एडिशन स्कूटरच्या पुढील बाजूस कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूस प्रीलोड मोनोशॉक सेटअप आहे. दोन्ही टायरमध्ये 220 mm डिस्क ब्रेक बसवण्यात आले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल ABS सिस्टीम देखील उपलब्ध आहे.

किंमत ?

व्हेस्पा ड्रॅगन एडिशन स्कूटरचे 1,888 युनिट्स जागतिक स्तरावर उपलब्ध आहेत. भारतातील Motoplex डीलरशिपवर ग्राहक या स्कुटरचे बुकिंग करू शकतात. Vespa Dragon Edition ची भारतात एक्स-शोरूम किंमत 14.27 लाख रुपये आहे. तसा विचार केला तर या किमतीत तुम्ही महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करू शकता. Mahindra Scorpio ची एक्स-शोरूम किंमत 13.61 लाख रुपये आहे.

राहुल द्रविडने पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज का केला नाही? जय शहांचा मोठा खुलासा

rahul dravid jay shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. राहुल द्रविडने 2021 च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला मोठं यशही मिळाले. त्यामुळे जर द्रविडची इच्छा असती तर तो पुन्हा एकदा भारतीय संघाचा कोच बनू शकला असता, मात्र त्याने अर्ज भरला नाही. यामागे नेमकं कारण काय होते ते आता बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठा खुलासा केला आहे.

कौटुंबिक बांधिलकीमुळे आपण पुन्हा एकदा प्रशिक्षक पदासाठी अर्ज भरू इच्छित नाही, त्यामुळे मला प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हायचे आहे असं आपल्याला राहुल द्रविड यांनी सांगितलं असल्याच्या खुलासा जय शाह यांनी केला. राहुल द्रविड यांच्या या निर्णयाचा आपण आदर केला आणि त्यांच्यावर पुन्हा प्रशिक्षक होण्यासाठी मी कोणतीही जबरदस्ती केली नाही असं जय शाह यांनी सांगितलं. राहुल द्रविड यांनी साडेपाच वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. ते तीन वर्षे एनसीएचे संचालक होते आणि गेली अडीच वर्षे ते टीम इंडियाचे प्रशिक्षक होते असं म्हणत जय शाह यांनी राहुल द्रविड यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ दोन वर्षांचा होता. 2023 मधील ५० षटकांच्या एकदिवसीय विश्वचषक-2023 नंतर त्यांचा कार्यकाळ संपत होता, परंतु टी-20 विश्वचषक-2024 जवळ येत असल्याचे पाहून बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवला. बीसीसीआयचा हा निर्णय योग्य ठरला आणि त्याच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांचा स्वभाव शांत असल्याने एकमेकांना समजून घेणं त्यांना सोप्प पडलं. त्याचा संपूर्ण परिणाम भारतीय संघावर झाला आणि राहुल- रोहित जोडगोळीने एक मजबूत भारतीय क्रिकेट संघ तयार केला.