Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 633

नाशिक शिक्षक मतदारसंघातुन शिंदे गटाच्या किशोर दराडे यांचा विजय

kishor darade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचा विजय झाला आहे. तब्बल 24 तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर होते. अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या संदिप गुळवे यांचा पराभव केला.

अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीच्या या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत पार पडली.

नाशिक शिक्षक मतदारसंघात विजयासाठी 31576 चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक होती. यात किशोर दराडे यांनी आघाडी घेत बाजी मारली. किशोर दराडे यांना 26 हजार 476 मते मिळाली. अपक्ष विवेक कोल्हे यांना 17 हजार 372 मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना 16 हजार 280 मते मिळाली. त्यामुळे किशोर दराडे 9 हजार 204 मताधिक्याने विजयी झाले.

खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली होती. पैशांच्या वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी होती. तसेच, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. आता शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी विजय मिळवल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची हा मोठा धक्का मानला जात आहे.

Travel : पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण म्हणजे पावसाळी पर्यटनासाठी पर्वणीच ; एकदा जरूर भेट द्या

Travel : पावसाळयात भटकन्ती करायला जायचं म्हंटलं की हमखास लोणावळा , खंडाळा ही ठिकाणं डोळ्याससोमर येतातच पुणे जिल्हयातील हे ठिकाण पुण्यापासून ६४ किमी तर मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबई दोन्हीकडच्या पर्यटकांसाठी सोयीस्कर ठिकाण… म्हणूनच या दोन्ही शहरातले पर्यटक (Travel) आवर्जून लोणावळ्याला भेट देतात.

लोणावळा मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर स्थित आहे. गर्द हिरवीगार झाडी , पावसाळ्यात दऱ्या डोंगरातून कोसळणारे धबधबे, जमिनीवर आधुन मधून येणारे धुके हे चित्र काही स्वर्गापेक्षा कमी नाही. म्हणूनच पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. भरभरून निसर्ग काय असतो ? याची साक्षच जणू हा निसर्ग देत असतो. तसे पाहायला गेले तर लोणावळ्यात पाहण्यासारखे बरेच सुंदर पॉईंट्स आहेत मात्र आजच्या लेखात (Travel) काही निवडक पॉईंटची माहिती करून घेऊया…

टायगर पॉईंट (Travel)

अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. टायगर पाईंटला नेहमीच धुकं आणि थंडगार वातावरण असत. पावसाळ्यात तर इतकं दाट धुकं असत की समोरचा माणूसही दिसत नाही.

राजमाची पॉइंट

राजमाची म्हणजे एक किल्ला हा किल्ला पाहण्यासारखा आहे. हे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला (Travel) सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

भुशी डॅम (Travel)

भुशी डॅम ही लोणावळ्यातील अत्यंत प्रसिद्ध ठिकाण असून येथे पावसाळ्यात आवर्जून भेट देतात. मात्र येथे जात असताना स्वात;ची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. शिवाय प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचेही (Travel) पालन करणे आवश्यक आहे.

याबरोबरच ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

कसे जाल ? (Travel)

लोणावळा रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या (Travel) गाड्या येथे थांबतात.

PNB Bharti 2024 | पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांची भरती सुरु; असा करा अर्ज

PNB Bharti 2024

PNB Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन असतो. ज्याचा फायदा अनेकांना होत असतो. आता बँकेत नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पंजाब नॅशनल बँक (PNB Bharti 2024) अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 2700 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 30 जून 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तसेच 14 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायला सुरुवात करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

महत्त्वाची माहिती | PNB Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 2700 जागा
  • वयोमर्यादा – किमान 20वर्षे आणि कमाल 28 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • निवड प्रक्रिया – ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराची पदवी परीक्षा पास असणे गरजेचे आहे

अर्ज कसा करावा? | PNB Bharti 2024

  • त्या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 14 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Financial Rule | आजपासून देशात होणार ‘हे’ मोठे बदल; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

Financial Rule

Financial Rule | जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे. आणि पहिल्या दिवसापासून अनेक गोष्टींमध्ये बदल देखील झालेला आहे. बँकिंग तसेच इतर सेवा संबंधित देखील बदल झालेले आहे. याच प्रमाणे डिजिटल वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि गॅस सिलेंडरमध्ये देखील काही बदल लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. आता जुलै 2024 मध्ये कोणकोणते बदल होणार आहेत? हे आपण जाणून घेऊयात.

गॅस सिलेंडर स्वस्त झाला | Financial Rule

1 जुलै 2024 पासून एलपीजी सिलेंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा भाव हा 30 रुपयांनी स्वस्त झाला आहे. परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारे बदल केलेला नाही.

कारच्या किमतीत वाढ

1 जुलै 2024 पासून कार खरेदी करणारे लोकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. आता टाटा मोटर्सच्या व्यवसायिक वाहनांची किंमत वाढवण्यात येणार आहे. हिरो मोटो कॉर्पच्या निवडक स्कूटर आणि मोटरसायकल मॉडेलच्या किमतीत आता दीड हजार रुपये वाढलेले आहेत.

सिम कार्ड पोर्टचे नियम देखील बदलणार

सिम कार्ड संबंधित अनेक नियम बदलण्यात आलेले आहेत. 1 जुलै पासून आता याची अंमलबजावणी होणार आहे. केल्यानंतर ग्राहकाला 7 दिवस सिम चालू होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

फास्टॅग सेवा शुल्क वाढणार

1 जुलैपासून आता ग्राहकांना टॅग व्यवस्थापन माहिती दर तीन महिन्यांनी पेमेंट प्राप्त करण्यासाठी फास्टट्रॅक सेवा देणाऱ्या कंपनी बँकिंग कंपन्या शुल्क भरावे लागेल.

क्रेडिट कार्ड बिलचे पेमेंट नियम बदल

क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधीच्या अनेक बदल झालेले आहेत. काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर आता बिल भरण्यास समस्या होऊ शकतात. त्यामुळे आता आरबीआयच्या नवीन बदलानुसार 1 जुलैपासून क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठी BBPS वापरण्यात येईल.

मोबाईल रिचार्ज महाग | Financial Rule

जिओ, एअरटेल आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल रिचार्ज दरामध्ये बदल देखील केलेले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हे बदल लागू करण्यात येणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू केव्हा होणार?? अजित पवारांनी दिली मोठी माहिती

Old Pension scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सभागृहामध्ये जुन्या पेन्शन योजना संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या चर्चेमध्ये आमदार संजय केळकर, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, वांद्रयाचे भाजपा आमदार आशिष शेलार हे सर्वजण सहभागी झाले होते. यावेळी जुनी पेन्शन लागू करण्याबाबत सरकार काय प्रयत्न करत आहे? याची माहिती द्यावी असे संजय केळकर म्हणाले. याच प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले की, “शासन मान्यता अनुदान प्राप्त ज्या संस्था आहेत, त्यांना शंभर टक्के अनुदान दिलं जातं. त्यास अनुदानित संस्था असं संबोधलं जातं, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. संघटना सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. संघटनांनी अपील केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात जो निकाल लागेल, तो याचिकाकर्त्यांना ऐकावा लागेल आणि सरकारलाही ऐकावा लागेल”

त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न केला की, एक नोव्हेंबर पूर्वी निघालेल्या जाहिरातीत शासकीय सेवेत रुजू झालेल्या जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत हो असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे जुन्या निवृत्ती वेतनाबाबत अंमलबजावणी कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार म्हणाले की, “रिटायर झाल्यानंतर ते सुरु होणार आहे. ती बॅच 2030 ला रिटायर होणार आहे. पेन्शन देता येत नसेल तर दहा टक्के कर्मचाऱ्यांनी भरायचे आणि 14 टक्के सरकार भरेल असा निर्णय झाला. याला कर्मचारी संघटनांनी मान्यता दिली आणि सरकारने मान्यता दिली”

त्याचबरोबर, “आता प्रश्न राहिला आहे तो म्हणजे जिल्हा परिषदांचा. त्यांचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे आलेला आहे. जिल्हा परिषदेचा कर्मचारी हा सरकारचा भाग आहे, त्यामुळे तो निर्णय देखील घेण्याचा विचार आहे. यामुळे किती भार पडेल याची माहिती घेतली आहे आणि फाईल देखील मागवली आहे. प्रस्ताव आल्यानंतर आम्ही सहानभूती पूर्ण निर्णय देऊ” अशी माहिती देखील अजित पवारांकडून देण्यात आली आहे.

Artificial Plastic Sugar | प्लॅस्टिकपासून बनवतात साखर ! व्हायरल व्हिडिओ पाहून विश्वासही बसणार नाही

Artificial Plastic Sugar

Artificial Plastic Sugar | आपल्या देशामध्ये खूप वर्षापासून गोड्याच्या पदार्थांमध्ये गुळाचा वापर करतात. गुळाची चव देखील चांगली लागते. आणि तो आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. परंतु तंत्रज्ञान बदलले, तसतसे लोकांच्या अनेक सवयी बदलल्या. आणि बाजारपेठेत गुळाची जागा साखरेने घेतली. आजकाल अनेक लोक हे गुळाऐवजी साखरेचाच उपयोग करतात. परंतु साखर ही मानवी शरीरासाठी खूप हानिकारक आहे. डॉक्टरांकडून देखील जेवणामध्ये साखर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सोशल मीडियावर सध्या साखरेबाबत असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही साखर खाणे काय? साखर विकत घेणे देखील बंद कराल. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास देखील बसणार नाही.

आज-काल बाजारामध्ये भेसळयुक्त आणि बनावट पदार्थांचा (Artificial Plastic Sugar) वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु हेच भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. यामुळे एलर्जी, मधुमेह, हृदयविकाराचे आजार, अतिसार यांसारखे गंभीर आजार होतात. असाच एक भेसळयुक्त साखरेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जी खरीखुरी साखर नाहीये, तरी देखील ती खरी साखर असल्याचे भासवत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा हा व्हिडिओ एका कारखान्यात शूट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, प्लास्टिक वितळून त्याचे लांब लचक तंतूमध्ये रूपांतर केले जात आहे. त्याचप्रमाणे कटिंगद्वारे साखरेप्रमाणे त्याला आकार देण्यात आलेला आहे. म्हणजेच या कारखान्यात प्लास्टिकची साखर (Artificial Plastic Sugar) बनवली जात असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे.

प्लास्टिकपासून बनवलेली ही साखर अगदी खऱ्या साखरेसारखेच दिसते. दाण्यांचा आकार आणि पोत देखील साखरेसारखाच आहे. हे प्लॅस्टिक मॉडेलिंगमध्ये वापरले जाते. हे साखरेसारखे दिसते अशा प्रकारे प्लास्टिक शुगरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. त्यामुळे आपण साखर घेताना ती निरखूनच घेतली पाहिजे.

बनावट साखर कशी ओळखायची ? | Artificial Plastic Sugar

यासाठी तुम्ही दोन ग्लास पाणी घ्या. त्या दोन्ही ग्लासांमध्ये साखर घालून चांगले मिसळून घ्या. भेसळ नसलेली साखर पाण्यात विरघळते, तर भेसळयुक्त साखर पूर्णपणे विरघळणार नाही. त्यामध्ये काही कण शिल्लक राहतील. अशा प्रकारे तुम्ही खरी साखर आणि बनावट साखरेतील फरक ओळखू शकता.

Expressway In Maharashtra : महाराष्ट्रात बनणार 126 किमी लांबीचा नवा महामार्ग

Alibaug – Virar Corridor

Expressway In Maharashtra : राज्यात महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यापैकी शक्तीपीठ महामार्ग , समृद्धी महामार्ग यांचा समावेश होतो. आता महाराष्ट्रात 126 किमी लांबीचा आणखी एक नवा महामार्ग तयार होणार आहे. अलिबाग – विरार कॉरिडॉर असे मार्गाचे नाव असून यामुळे पाच तासांचे आंतर केवळ दीड तासात पूर्ण करता येणार आहे. यासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून यामुळे अलिबाग ते विरार (Expressway In Maharashtra ) हा प्रवास खूपच कमी वेळेत होणार आहे.

कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते . विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केल्या आहेत. 126 किमी लांबीचा हा कॉरिडॉर दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर (Expressway In Maharashtra ) लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

प्रकल्पात या जिल्ह्यांचा समावेश

हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. एमएमआरचा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी एमएसआरडीसीने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

हुडकोकडून 22,250 कोटींचे कर्ज (Expressway In Maharashtra )

बहुचर्चित अलिबाग – विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनाबाबतही २६ जूनला महत्त्वाचा निर्णय झाला. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार या कर्जासाठी महाराष्ट्र राज्य शासन हमी घेणार आहे. म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1,130 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.आतापर्यंत या प्रकल्पासाठी 215.80 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2,341 कोटी 71 लाख रुपयांचा निधी (Expressway In Maharashtra ) देण्यात आला आहे.

विरार-अलिबाग प्रकल्प तयार करून, एमएमआरमध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी एमएमआरचे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंकसह अन्य प्रकल्प जोडले जाणार (Expressway In Maharashtra ) आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, MMR च्या प्रत्येक भागात जलद आणि सुलभ प्रवेश करणे शक्य होईल.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची नावे जाहीर; पंकजा मुंडेंसह या नेत्यांना दिली संधी

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपकडून (BJP) आज विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. म्हणजेच या यादीत चार ओबीसी उमेदवारांना तर एका दलिस उमेदवाराला स्थान देण्यात आले आहे.

विधानसभेच्या 11 जागा या रिक्त असून त्यातील पाच जागा भाजपला मिळणार आहेत. या पाच जागांसाठीच भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने या निवडणुकीत पिंपरी चिंचवड येथील रहिवासी अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर केले आहे. ते भाजपच्या आयटी सेलचे काम पाहतात. अमित गोरखे हे एका दलित कुटुंबातून येतात. यंदा भाजपने पुण्यातील योगेश टिळेकर यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. ते भाजपचे हडपसरचे मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

या दोन नेत्यांना संधी नाही

खास म्हणजे, या उमेदवारांच्या यादीत भाजपने पंकजा मुंडे यांना देखील स्थान दिले आहे. मधल्या काळात पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला सरल्या होत्या. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी भाजपने पंकजा मुंडे यांनाही संधी दिली आहे. त्यांच्यासह सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे. परंतु विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या रावसाहेब दानवे यांना भाजपने संधी दिलेली नाही. तसेच हर्षवर्धन पाटील यांना ही भाजपने वगळले आहे.

Mumbai News :परदेशाप्रमाणे मुंबईतही साकारणार ‘मरीना’ ; MMRDA तयार करणार अहवाल

mumbai marina

Mumbai News : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आता झपाट्यांने नवनवीन प्रकल्प विकसित होताना पाहायला मिळत आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, याशिवाय मेट्रो बुलेट ट्रेन यासारखे काही येऊ घातलेले प्रकल्प देखील आहेत.अनेक विविध प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहे. आता मुंबईमध्ये पर्यटनाचा आनंद आणखी वाढविण्यात यावा याच उद्देशाने मुंबईमध्ये (Mumbai News) जागतिक पातळीच्या प्रमुख शहरांमधील मरीनाच्या धरतीवर मुंबईमध्ये समुद्रकिनारी मरीना प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट इथं हा प्रकल्प उभारण्याचा विचार सरकार करत आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पाचा अहवाल तयार केला जाणार आहे.

एमएमआरडीए चे अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये विधानभवनात एक बैठक नुकतीच पार पडली त्यामध्ये या प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्यात आलं.

कुठे उभारण्यात येणार प्रकल्प ? (Mumbai News)

एमएमआरडीए कडून उभारण्यात येणाऱ्या नरिमन पॉईंट ते कफपरेड कनेक्टरला लागूनच हा प्रकल्प साकारला जाणार आहे. नरिमन पॉईंट येथील एनसीपीए थेटर नजीक समुद्रामध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्तावित आहे.

मारीना म्हणजे काय? (Mumbai News)

आता तुमच्यापैकीच बहुतांशजणांना हा प्रश्न पडला असेल की मरीना म्हणजे नक्की काय ? तर मरीना म्हणजे छोट्या बोटी जॉर्ड क्राफ्ट पार्किंगसाठी जागा असते आणि त्या ठिकाणाहून तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता याशिवाय इथे रेस्टॉरंट आणि मनोरंजनाच्या इतर सुविधा सुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. परदेशात असे प्रकल्प तुम्हाला सर्रास पाहायला मिळतील.

सिंगापूरमधील कंपनीकडून पाहणी

याआधी मुंबईतील जल पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai News) पोर्ट ट्रस्ट कडून पूर्व किनारपट्टीवर मरीना प्रकल्प उभारण्यात येत होता. प्रिन्सेस डॉक परिसरात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी अपेक्षित प्रतिसाद कंत्राटदारांकडून मिळाला नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. आता त्याच धर्तीवर पश्चिम किनारपट्टीवर ही हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन केलं आहे. सिंगापूर स्थित कंपनीकडून या प्रकल्पाच्या सुसाध्यतेबाबत प्राथमिक पाहणी करण्याचे प्रस्तावित आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

याबाबत माहिती देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की यापूर्वी नरिमन पॉईंट ते कफपरेड दरम्यान पुलाची उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्यातून मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार होता त्यामुळे मच्छीमारांना अडचण येऊ नये यासाठी या मार्गात बदल केला असून आता किनाऱ्यालगत रस्ता उभारला जाणार आहे. या रस्त्याला लागून मरीना उभारण्याचा विचार आहे. या मरीनामध्ये मनोरंजनाच्या गोष्टी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल तसेच मुंबई (Mumbai News) पर्यटनाच्या संदेश निर्माण होतील एमएमआरडीएकडून याचा आराखडा बनवला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Mallikarjun kharge on RSS : RSS ही मनुवादी संस्था, संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली; खर्गेंच्या विधानानंतर संसदेत गदारोळ

Mallikarjun kharge on RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक मनुवादी संस्था आहे. त्यांची विचारधारा देशासाठी धोकादायक आहे. त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नव्हते. RSS ने नथुराम गोडसे याना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली असं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेत केलं. खर्गे यांच्या विधानानंतर (Mallikarjun kharge on RSS) भाजप चांगलीच आक्रमक झाली असून सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जेपी नड्डा यांनी खर्गे यांचं हे विधान रेकॉर्डवरुन हटवण्याची मागणी केली.

सभागृहात नेमकं काय घडलं? Mallikarjun kharge on RSS

मल्लिकार्जुन खर्गे हे सभागृहात शिक्षण व्यवस्थेवर बोलत होते. गेल्या दहा वर्षांत आपली शिक्षण व्यवस्था भाजप-आरएसएसच्या लोकांनी काबीज केली आहे. विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, एनसीईआरटी आणि सीबीएसई हे सर्व आरएसएसच्या नियंत्रणाखाली आहेत. चांगल्या विचारांच्या लोकांना तिथे स्थान नाही असं म्हणत खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल केला टॉवर प्रत्युत्तर देताना सभापती जगदीप धनखड यांनी विचारले की, कोणत्याही संस्थेचे सदस्य असणे गुन्हा आहे का? समजा एखादी व्यक्ती RSS चा सदस्य असेल तर तो स्वतःचा गुन्हा आहे का? देशासाठी काम करणारी, देशासाठी योगदान देणारी ही संस्था आहे. देशात आणि जगात प्रमाणित लोक आहेत, जे देशासाठी योगदान देत आहेत. जगातील सर्वात जास्त टॅलेंट तुम्ही त्याच्यात पाहू शकता असं धनखड यांनी म्हंटल.

धनखड यांच्या उत्तराला मल्लिकार्जुन खर्गे यांनीही प्रत्युत्तर देत आरएसएसवर हल्लाबोल (Mallikarjun kharge on RSS) केला, RSS ची विचारधारा देशासाठी घातक आहे. ते मनुवादी आहेत, त्यांना महिला आणि दलितांना शिक्षण द्यायचे नाही. अशा लोकांना तुम्ही इथे निवडले तर या देशातील शिक्षण व्यवस्थेचा उद्देश आणि संविधानाचा पराभव होईल असं खर्गे यांनी म्हंटल. खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, “खर्गे यांनी आरएसएसबद्दल जे काही म्हटले आहे ते अत्यंत बेजबाबदार विधान आहे आणि ते काढून टाकले पाहिजे. त्यांना संघटनांबद्दल थोडीशीही माहिती नाही.”

मात्र तरीही खर्गे पुढे बोलतच राहिले. हे मी म्हणत नाही, सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं म्हंटल होते. आरएसएसशी संबंधित सर्व लोकांना आणि या देशाला माहित आहे की आरएसएसच्या लोकांनी गोडसेना उचकवून महात्मा गांधींची हत्या केली. मी शंभर वेळा सांगेन की आरएसएस आणि तुम्ही मिळून देशाचा नाश करत आहात असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरएसएसवर घणाघात केला.