Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 634

वर्ल्डकप जिंकला खेळाडूंनी, अन भाजप म्हणतंय BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा

ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा T20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडिया चॅम्पियन झाली. भारताच्या या विजयानंतर देशभरातून खेळाडूंचे कौतुक केलं जात आहे. मात्र भारतीय जनता पक्ष मात्र खेळाडूंऐवजी BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा म्हणत आहे असं म्हणत राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसेच भाजपच्या लोकांचं अभिनंदन करणे हा भारतीय खेळाडूंचा अपमान आहे असेही विरोधकांनी म्हंटल आहे.

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेकी ते म्हणाले, T20 विश्वचषक भारतीय क्रिकेट संघाने जिंकला आहे. त्यासाठी सभागृहात भारतीय संघातील 11 खेळाडुंचे अभिनंदन करायला पाहिजे होते. पण भाजपचे नेते म्हणतात बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे अभिनंदन करा. खरंतर विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडुंचं अभिनंदन केले पाहिजे, भारतीय संघाचे अभिनंदन केले पाहिजे. कारण, ते परिश्रम घेतात,मेहनत करतात . रक्ताचं पाणी करुन देशाचं नाव उंचावतात. ते सोडून बीसीसीआयमध्ये असणाऱ्या भाजपच्या लोकांचं अभिनंदन केलं जातं. हा भारतीय खेळाडुंचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाला देशाशी काही देणंघेणं नाही. त्यांना स्वत:चे नेते, स्वत:चा पक्ष आणि स्वत:ला ओवाळून घेण्यातच रस आहे. हा तूप लावून चमचेगिरी, चमकोगिरी करने असेच प्रकार भाजपवाले करतात. खेळात राजकारण आणणे योग्य नाही असेही दानवे यांनी म्हंटल. सभागृहात भाजपच्या नेत्याना बोलू दिले जाते मात्र विरोधकांना बोलू दिले जात नाही. हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाचा त्याग करत आहोत असं अंबादास दानवे यांनी म्हंटल. .

लाडकी बहिण योजनेसाठी या तारखेपर्यंत करा अर्ज; जाणून घ्या अर्ज प्रकिया आणि इतर माहिती

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतून २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. याकरिता आजपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी १५ दिवसात कधीही महा-इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा. तसेच या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरतील यासाठी प्रक्रिया काय आहे याविषयी जाणून घ्या.

योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार?

  • महाराष्ट्र राज्याची रहिवासी असलेली महिला
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
  • २२ ते ६० वयोगटातील महिला
  • कुटुंबाचे उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा कमी असलेली महिला
  • कोणत्याही आर्थिक योजनेतून दीड हजार रुपयांपर्यंत जास्त लाभ न घेतलेली महिला
  • चारचाकी वाहन नावावर नसलेली महिला

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती??

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र वा जन्म दाखला
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
  • योजनेच्या अटी मान्य असलेले हमीपत्र
  • हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
  • त्यावेळी प्रत्यक्ष महिला उपस्थित असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे भरता येईल?

अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे

अर्ज भरण्याची अंतिम तारीख

  • अर्ज प्रक्रियेला १ जुलैपासून सुरुवात झाली आहे.
  • 15 जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.

दिनेश कार्तिकसाठी RCB ची मोठी घोषणा!! चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

dinesh kartik RCB Mentor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकने आपला अखेरचा सामना खेळत क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आता पुन्हा एकदा कार्तिक मैदानात दिसणार आहे. कारण दिनेश कार्तिकवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challenger Bangalore) मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. फ्रेंचायजीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खेळाडू म्हणून दिनेश कार्तिकने आरसीबीला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. मात्र यंदाची आयपीएल त्याच्या कारकिर्दीतील अखेरची ठरली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला. यानंतर विराट कोहली, फाफ डुप्लेसिस यांच्यासह सर्व सहकारी खेळाडूंनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर 39 व्या वाढदिवशी दिनेश कार्तिकने निवृत्तीची घोषणा केली होती.

कार्तिकची आयपीएल कारकीर्द

दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर कार्तिकने 257 सामन्यांमध्ये 4842 धावा केल्या. यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या 17 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत दिनेश कार्तिक RCB व्यतिरिक्त, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2024 मध्ये त्याने 15 सामन्यांमध्ये 187.36 च्या स्ट्राइक रेटने 326 धावा केल्या. आता त्याला मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी फ्रेंचायजी कडून देण्यात आली असून पुन्हा एकदा तो आरसीबीच्या ताफ्यात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Maharashtra krushi Din | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणल्यात या योजना; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra krushi Din

Maharashtra krushi Din | शेती हा आपल्या भारतातील अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे आपल्या भारताची जवळपास 50% पेक्षा जास्त अर्थव्यवस्था ही शेती अवस्थेवर अवलंबून आहे. आज शेतकरी शेतात घाम गाळतो, कष्ट करतो, अन्न पिकवतो. त्यामुळे त्याच देशातील इतर लोक हे सुखाने चार घास खाऊ शकतात. तर शेतकऱ्यांनी बंड केला आणि शेती केली नाही तर लोकांना तरी काय? आणि यासाठीच आज म्हणजेच 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन (Maharashtra krushi Din) साजरा केला जातो. यामध्ये 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान कृषी सप्ताह साजरा केला जातो. हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात त्यांचे खूप जास्त योगदान दिले आहे. आणि या योगदानानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे. त्याचप्रमाणे त्यांना शेती क्षेत्रात प्रगती करता यावी. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहे. अगदी सिंचनापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो. शेतकरी त्यांच्या व्यवसायात चांगला चांगली प्रगती करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक मदत झाल्याने बी बियाणे आणणे. या सगळ्याला देखील मदत होते. राज्यातील जवळपास कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळत आहे. आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कोणत्या योजना मिळतात? हे आपण पाहणार आहोत.

पंतप्रधान पिक विमा योजना | Maharashtra krushi Din

निसर्गाच्या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. यासाठी सरकारने ही पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केलेली आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे, कीड किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते. त्यावेळी या विमा अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे 6 हजार रुपये 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जातात. देशातील कोणताही शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड

केंद्र सरकारने 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी त्याचप्रमाणे शेतीतील खर्चासाठी पुरेशी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना लागू केलेली आहे. आपण इतर मार्गाने जर कर्ज घेतले, तर त्यावर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते. परंतु सरकारने चालू केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक 4 टक्के सवलतीच्या दराने कर्ज दिले जाते. याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.

माण-खटाव मतदारसंघात जयकुमार गोरेच पुन्हा आमदार होतील??

Jayakumar gore

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूकीत आपण जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा… जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची… मतदारसंघात जयकुमार गोरेने (Jayakumar Gore) जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे. ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतलीय… हे स्टेटमेंट आहे शेखर गोरे (Shekhar Gore) यांचं… आपल्या सख्ख्या भावाच्या विरोधात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता मान खटावमध्ये विधानसभेला नेमकं काय घडणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय… 2009 पासून आधी अपक्ष, मग काँग्रेस आणि आता भाजप अशी अनेक पक्षात कोलांट्या उड्या मारूनही मान खटावनं कौल दिला तो जयकुमार गोरे यांनाच… 2019 ला तर सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत यंदा काहीही झालं तरी यंदा जयकुमार गोरेंना आमदारकीला पाडायचंच, असं म्हणून आमचं ठरलंय! या फॉर्म्युलाखाली एकत्र येऊनही कुणी कितीबी समोर येऊंद्या त्यांना एकटा बास! हे परफेक्ट लागू होत पुन्हा आमदार झाले ते जयकुमार गोरेच… त्यामुळे गोरे मान खटावच्या राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळखले जातायत… त्यामुळे आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या गोरेंना यंदा चौकार रोखण्यापासून कुणी रोखणार का? जयकुमार यांच्या राजकारणाला मतदारसंघात नडण्याची कुणाची ताकद आहे? या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणात मान खटावच्या पाणी प्रश्नाला संभाव्य आमदार कितपत हात घालतील? त्याचाच घेतलेला हा आढावा…

माण आणि खटाव (Maan Khatav) …सुरुवातीला वेगवेगळे असणारे हे विधानसभा मतदारसंघ 2009 ला एकत्र झाले .. पूर्वीचा माण विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून 2009 पर्यंत कायम राखीव होता. पण या मतदारसंघावर तब्बल 40 वर्ष सदाशिवराव पोळ या हुकमी एक्क्याचा शब्द चालायचा… पोळ ज्याच्याकडे बोट करतील तो उमेदवार इथून निवडून यायचा… तब्बल 40 वर्ष त्यांचा या तालुक्यावर दरारा होता… त्यामुळे त्यांना या मतदारसंघात किंगमेकर म्हणून ओळखले जायचं…. पण दस्तूर खुद्द पोळ 2009 साली माण खटाव मधून आमदारकीसाठी उभे असताना त्यांच्या विरोधात अपक्ष लढत दिलेल्या जयकुमार गोरेंनी पोळ यांच्या प्रस्थापित राजकारणाला नख लावत आमदारकी खेचून आणली… तेव्हापासून सदाशिवराव पोळ यांच्या राजकारणाचा सूर्य मावळत गेला… तर दुसऱ्या बाजूने जयकुमार गोरेंनी मान खटावमध्ये सब कुछ गोरे! असं वातावरण तयार केलं… तसं फारसं कुणाला माहीत नसणार हे नाव चर्चेत आलं ते तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सलगीमुळे… आपल्याच तालुक्यातील एक अपक्ष आणि तरुण आमदार म्हणून पृथ्वीराज बाबांनी गोरेंना साथ दिली… मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी जमेल तितका निधी मिळवून दिला…जयकुमार गोरे चव्हाण यांच्या इतक्या संपर्कात आले होते की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वाधिक भेट याच तालुक्याला दिली होती…

अर्थात काँग्रेसकडे झुकलेल्या जयकुमार गोरेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी ऑफिशियली काँग्रेस पक्षात प्रवेश केला….आणि निवडणूक लढवून जिंकली देखील… पण सत्तेत आलं ते भाजप सरकार…2019 पर्यंतची भाजप सरकारची पहिली टर्म पूर्ण होईपर्यंत गोरे फडणवीसांच्या संपर्कात आले…काँग्रेस टू भाजप असा प्रवास करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला… आणि 2019 ला हाय व्होल्टेज ठरलेल्या मान खटावच्या आमदारकीच्या निवडणुकीला विरोधकांच्या एकजुटीला फोडून काढत जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून दिलीच…मात्र या पंचवार्षिकला त्यांनी कुठेही हालचाल केली नसल्यामुळे सध्या तरी महायुती आघाडीकडून भाजपचे आमदारकीचे उमेदवार म्हणून ते लढत देताना दिसतील… पण विरोधात कोण? यावर अजून एकमताने काही शिक्कामोर्तब झालेलं दिसत नाहीये…

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शड्डू ठोकला… रणजितसिंह देशमुख, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर घारगे, दिलीप येळगावकर, सुरेंद्र गुदगे या आणि अशा अनेक पहिल्या फळीतील नेत्यांनी गोरेंच्या विरोधात एक पक्का उमेदवार द्यायचा… आणि त्याच्या पाठीमागे ताकद लावून त्याला निवडून आणायचं…. असं म्हणत आमचं ठरलंय! या पॅटर्न खाली ते एकत्र आले होते… जयकुमार गोरेंच्या विरोधात आमचं ठरलंय या पॅटर्नचे प्रभाकर देशमुख हे अपक्ष उमेदवार होते… आता काहीबी झालं तरी गोरे पडणार म्हणजे पडणारच…असा सगळ्यांचाच समज झाला होता…पण निकाल लागला आणि गोरे पुन्हा एकदा जायंट किलर ठरत सलग तिसऱ्यांदा मान खटाव मधून आमदार झाले….

मान खटावच्या राजकारणाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इथल्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालत नाही… या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमिनी आजही आहेत. काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्याने पडून आहेत आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी इथलं राजकारण पाणी प्रश्नभोवती झुलवत ठेवलं… मात्र, आज अखेर तुरळक पाण्याचे रिसोर्सेस तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही. पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं मतदारसंघातमतदारसंघात आजही पाहायला मिळतात. निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरुन स्टेज गाजत असल तरी मुळात या भागात अनेक निवडणुकीत पाण्यापेक्षा जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसून आला… इतर आमदारांपेक्षा किमान पाण्यासाठी थोडीफार हालचाल आमदार साहेबांनी केली असली तरी संपूर्ण मतदारसंघात पाणी पोहोचवण्यात ते आजही फेल झालेले दिसतात… टेंभू, ताकारी, तारळी, जिहे कटापुर या चार योजनेच्या पाण्याने मान खटावची तहान भागवण्याचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे… पण यातही जयकुमार गोरे यांना यश आलेले नाहीये… थोडक्यात काय तर पाण्याच्या प्रश्नावरून जयकुमार गोरे यांची पंधरा वर्षांची कारकीर्द ही निराशा जनकच म्हणावी लागेल…

पण दुसरीकडे लोकनेते, जनसंपर्क आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता तालुक्याचं पॉवर पॉलिटिक्स आजही त्यांच्याकडे झुकलेलं पाहायला मिळतं… गेल्या वेळेस विरोधात असणारे संदीप पोळ सध्या भाजपमध्ये आल्याने आणि येळगावकर सुद्धा जयकुमार गोरे गटात असल्यानं गोरे यंदाही विधानसभेच्या निवडणुकीला प्लसमध्ये दिसतायेत… तर करंट स्टेटसमध्ये त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख किंवा काँग्रेसचे रणजीत देशमुख हे लढत देताना दिसतील… सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असणारं वारं, त्यात मराठा वर्सेस ओबीसी फॅक्टर आणि गोरे यांच्याबद्दल असणारी अँटी इनकंबनसी पाहता माण खटावचा निका ल फिरण्याचे चान्सेसही वाढतात…आता गोरेंच्या विरोधात पुन्हा एकदा एकत्र येत आमचं ठरलंय चा पार्ट टू काढण्यात विरोधकांना यश येईल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल… बाकी यंदा या विरोधात मोहिते पाटलांचही नाव ऍड झालेलं असेल… बाकी मान खटावचा 2024 चा आमदार कोण? जयकुमार गोरे की कुणी दुसरा? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Gold Price Today : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किमतीत बदल

Gold Price Today 1 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) मोठा बदल पाहायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 71170 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 105 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा 238 रुपयांची घट झाली असून एक किलो चांदी 89344 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव 70760 पयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) वाढल्याचे पाहायला मिळाले. 9 वाजून 50 मिनीटांनी सोन्याच्या भावाने 71249 रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र त्यानंतर सोन्याचा दर कोसळला. 10:30 वाजता सोन्याच्या किमती 71061 रुपयापर्यंत खाली गेल्या. सध्या 10 ग्राम 24 कॅरेट सोने 71170 रुपयांवर करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 72220 रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 66250 रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,250 रुपये
मुंबई – 66,250 रुपये
नागपूर – 66,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,280 रूपये
मुंबई – 72,280 रूपये
नागपूर – 72,280 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Bank of Baroda Bharti 2024 |पदवीधरांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी ! असा करा अर्ज

Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती व्यावसायिक आणि मानव संशोधन या पदांसाठी निघालेली आहे. या पदांच्या एकूण 627 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती |Bank of Baroda Bharti 2024

  • पदाचे नाव- व्यावसायिक आणि मानव संसाधन
  • पदसंख्या – 627 जागा
  • वयोमर्यादा – 25 ते 48 वर्ष
  • अर्ज शुल्क
  • ओबीसी जनरल कॅटेगिरी – 600 रुपये
  • एससी, एसटी पीडब्ल्यूडी महिलांसाठी – 100 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जुलै 2024.
  • रिक्त पदे
  • व्यवसायिक 168 पदे
  • मानव संसाधन 659 पदे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 2 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

National Doctor’s Day 2024 | 1 जुलैला डॉक्टर्स डे का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

National Doctor's Day 2024

National Doctor’s Day 2024 | आपण नेहमीच असे ऐकले आहे की, आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते. जर आपले आरोग्य चांगले असेल, तर आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो. एका व्यक्तीसाठी निरोगी आरोग्य खूप महत्त्वाचे असते. आपल्याला हे निरोगी आरोग्य देण्यासाठी डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची असते. अगदी लहान मोठ्या आजारांपासून ते सगळे आजार डॉक्टरांच्या मदतीने बरे होतात. म्हणूनच अनेकवेळा लोक डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात. अशातच आज 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे (National Doctor’s Day 2024) साजरा केला जातो. प्रसिद्ध डॉक्टर आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय डॉक्टर दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो.

1 जुलैला डॉक्टर डे का साजरा केला जातो ? | National Doctor’s Day 2024

वेगवेगळ्या देशांमध्ये डॉक्टर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु भारतात हा दिवस 1 जुलै रोजी साजरा केला जातो. कारण या दिवशी भारतातील प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर बिधानचंद्र राय यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू देखील 1 जुलै 1962 रोजी झाला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी 1 जुलै रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो.

डॉक्टरचे साजरा करण्यामागील उद्देश

डॉक्टरांचे आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे योगदान आहे. अगदी कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या पेशंटला जास्त महत्त्व देतात आणि त्यांना बरे करतात हेच डॉक्टरांचे योगदान आणि त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सगळ्या गोष्टींचा त्याग करून रुग्णांसाठी डॉक्टर हजर असतात. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा डॉक्टर दिन साजरा करण्यामागील मोठा उद्देश आहे. कोविडच्या काळात जेव्हा संपूर्ण जग हे या आजाराने घाबरून घरात बसले होते. त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता ड्युटी केलेली आहे. यामध्ये अनेक डॉक्टरांना जीव देखील गमवावा लागलेला आहे.

डॉक्टर्स डे 2024 ची थीम

दरवर्षी डॉक्टर्स डे हा कोणत्या ना कोणत्या थीम सह साजरा केला जातो. 2024 मधील राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम ही फिलिंग हँड्स आणि केअरिंग हार्टस अशी आहे.

ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून…. सामनातून दादांवर निशाणा

ajit pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून बहिण- भावाच्या नात्यावरून अजित पवारांना डिवचलं आहे. सरकार कडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? असा सवाल करत सामनातून अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

राज्याचा अर्थसंकल्प पोकळ असला तरी तिन्ही सत्तापक्ष हे आमचेच श्रेय म्हणत एकमेकांना लाथा घालत आहेत. या सर्व योजना जनहिताच्या आहेत, जनतेला थेट लाभ देणाऱ्या आहेत, असा या मंडळींचा कांगावा आहे. त्या खरोखर तशा आहेत का? त्याचा थेट लाभ जनतेला खरंच मिळणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी त्यावरून पोकळ खणखणाट सुरू आहे. मुळात अर्थसंकल्पातील असंख्य घोषणांची अवस्था ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी आहे. राज्यातील निम्म्या जिह्यांमध्ये अद्यापि पाऊस पडलेला नाही; परंतु अर्थसंकल्पात कोरडय़ा घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. थापांचा महापूर आणि खोटय़ा आश्वासनांची अतिवृष्टी करण्यात आली. याच खोटय़ा आणि जुमलेबाज आश्वासनांच्या फुग्यांमध्ये श्रेयाची हवा भरण्याचे उद्योग सत्तापक्षांमध्ये सुरू आहेत.

मागील अडीच वर्षे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’चा या सरकारला विसर पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक बहिणींची उचकी लागली. त्यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या- नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करीत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडले आहे. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करीत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? हा प्रश्न आहे. पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची ‘फुंकर’ भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे ‘अनाथ’ करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे. असं म्हणत सामनातून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

Pumpkin Seeds | अशाप्रकारे भोपळ्याच्या बियांचा आहारात करा समावेश, होतात आश्चर्यकारक फायदे

Pumpkin Seeds

Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड देखील असतात. त्याचप्रमाणे भोपळ्यांच्या बिया हा मॅग्नेशियमचाही खूप चांगला स्रोत आहे. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करतात. भोपळ्याच्या बिया आपले रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. आणि हृदयाच्या आरोग्याच्या देखील रक्षण होते. तुम्हाला जर भोपळ्याचे बिया तशाच खायला आवडत नसेल, तर तुम्ही वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करून याच्या सेवन करू शकता. इतर पदार्थ देखील खाल्ले जाऊ शकते. आता तुम्हाला आम्ही भोपळ्यांच्या बियांचे असे काही पदार्थ सांगणार आहोत. जे तुम्हाला खूप जास्त आवडतील.

रोस्टेड बिया | Pumpkin Seeds

साहित्य:
भोपळ्याच्या बिया – 1 कप
तेल (ऑलिव्ह ऑइल) – 1 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार

पद्धत:
कढईत तेल गरम करा. भोपळ्याचे दाणे घालून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. बिया नीट ढवळत राहा जेणेकरून ते एकसारखे भाजतील. भाजलेल्या भोपळ्याच्या बियांवर मीठ शिंपडा आणि स्नॅक म्हणून सर्व्ह करा.

भोपळा बिया स्मूदी

साहित्य:
भोपळ्याच्या बिया – 1 कप
काळे – १
दूध – 1 कप

पद्धत:
ब्लेंडरमध्ये भोपळ्याच्या बिया आणि एक केळी घाला. आता दूध घालून मिक्स करा. एका ग्लासमध्ये काढून बारीक चिरलेल्या पिस्त्याने सजवा आणि प्या.

मध भोपळा बिया

साहित्य:
भोपळ्याच्या बिया – 1 कप
मध – 2 चमचे
मीठ – अर्धा टीस्पून

पद्धत:
भोपळ्याच्या बिया एका कढईत मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता भाजलेले बिया एका भांड्यात काढा. त्यावर मध घालून चांगले मिसळा. त्यावर थोडे मीठ टाकून त्याचा आस्वाद घ्या.

भोपळा चटनी | Pumpkin Seeds

  • साहित्य:
  • भोपळ्याच्या बिया – १/२ कप
  • टोमॅटो – 1 मध्यम
  • हिरवी मिरची – २
  • लसूण – 2-3 लवंगा
  • आले – 1 छोटा तुकडा
  • मीठ – चवीनुसार
  • लाल मिरची पावडर – 1/2 टीस्पून
  • हिरवी धणे
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • तेल (ऑलिव्ह ऑइल) – 1 टीस्पून

पद्धत:
कढईत भोपळ्याचे दाणे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता ते बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. आता ब्लेंडरमध्ये भाजलेले भोपळ्याचे दाणे, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आले, मीठ, तिखट, हिरवे धणे आणि लिंबाचा रस घाला. सर्वकाही चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करण्यासाठी मिसळा. एका भांड्यात चटणी काढा आणि गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घ्या.