Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 646

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता का ? पहा IRCTC ने जारी केल्या महत्वाच्या सूचना

IRCTC online booking

IRCTC : हल्ली सर्वच प्रणाली डिजिटल झाल्यामुळे कोणतंही काम सहज घरबसल्या करू शकतो. रेल्वे , बसचे तिकीट बुकिंग असो किंवा घरून जेवण ऑर्डर करणे असो सर्वकाही एका क्लिक वर होऊन जाते. तुम्ही देखील रेल्वे प्रवासाचे बुकिंग ऑनलाईन करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक करताना साधारणतः आयडी प्रूफ मागितला जातो आणि जर बुकिंग करणाऱ्या अकाउंट वरून इतर आडनाव असलेले बुकिंग करण्यावर बंदी घालण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या अकाउंट वरून तुमच्या मित्राचे तिकीट बुक करत असाल तर तसे करता येणार नाही अशा प्रकारचा हा संदेश होता. मात्र या संदेश चुकीचा असल्याचा IRCTC ने आता स्पष्ट केले आहे. IRCTC ने अशा खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या स्पष्टीकरणात, IRCTC ने म्हटले आहे की, त्यांच्या साइटवर तिकीट बुकिंग रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाते.

खरं तर, अशा पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत होत्या ज्यात असे म्हटले होते की जर एखाद्याचे आडनाव वेगळे असेल तर तो आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर वेगळे आडनाव असलेल्या व्यक्तीसाठी त्याच्या तिकीट बुकिंग खात्यातून तिकीट बुक करू शकणार नाही. आणि इतर आडनावांसह तिकीट बुक केल्यास शिक्षा होऊ शकते. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर IRCTC ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.

आयआरसीटीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती आपल्या युजर आयडीने आपले मित्र, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसाठी तिकीट बुक करू शकते. प्रत्येक महिन्याला एक युजर 12 तिकिटे बुक करू शकतो. जर युजरने आपली ओळख आधारद्वारे केली असेल तर तो दर महिन्याला 24 तिकिटे बुक करू शकतो. केवळ आयआरसीटीसीच नाही तर भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यानेही ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे.

काय आहे नियम ? (IRCTC)

आयआरसीटीसीने म्हटले आहे की वैयक्तिक वापरकर्ता आयडीद्वारे बुक केलेली तिकिटे व्यावसायिकरित्या विकली जाऊ शकत नाहीत आणि तसे करणे गुन्हा आहे. असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 143 नुसार कठोर कारवाईची तरतूद आहे.

SIP Investment : SIP मध्ये फक्त 5 हजार गुंतवा अन् मिळवा 50 लाखांहून अधिक परतावा; काय आहे फॉर्म्युला?

SIP Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) आपण कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला की, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींची चिंता वाटत नाही. कारण, वेळेला असाच गुंतवलेला पैसा आपल्या मदतीसाठी उभा राहतो. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण आर्थिक नियोजन करून भविष्यासाठी निधी जमा करू लागले आहेत. योग्य वयात केलेली गुंतवणूक ही वयाच्या चाळीशीपर्यंत चांगला निधी जमा करण्यास मदत करते. अशा योग्य गुंतवणुकीसाठी SIP हा एक चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये अधिकाधिक पैसे जमा करून भविष्यातील आर्थिक अडचणींवर मात करता येते. अशा या SIP मध्ये केवळ ५ हजारांची गुंतवणूक केल्यास ५ लाखांहून जास्त रक्कम जमा करता येते. ती कशी? हे जाणून घेऊया.

फक्त ५००० रुपयांची SIP बनवेल तुम्हाला लखपती (SIP Investment)

जर तुम्ही गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय शोधत असाल तर SIP हा एक उत्तम पर्याय आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगला निधी जमा करता येईल. समजा, जर तुम्ही SIP मध्ये दरमहा केवळ ५ हजार रुपये गुंतवले तरीही तुम्ही अंदाजे ५५ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. मात्र, यामध्ये तुम्हाला वार्षिक स्वरूपात निदान ५% ते १०% रक्कम वाढवावी लागेल. आता हे कॅल्क्युलेशन नेमकं कसं असतं? याविषयी आपण जाणून घेऊया

कसे व्हाल लखपती?

अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा तुम्ही ५००० रुपयांचा SIP प्लॅन सुरू केला. आता यामध्ये प्रत्येक वर्षाला ५% रक्कम वाढवली तर तुम्ही जमा करत असलेल्या रकमेत वर्षानुवर्ष वाढ होईल. पहिल्या वर्षात प्रतिमहिना ५ हजार गुंतवल्यास तुमची जमा रक्कम ५० हजार होईल. पण जसजशी तुम्ही रक्कम वाढवत जालं तसतशी ही रक्कम मोठी होत जाईल. (SIP Investment) तुम्ही ५ हजार रुपयांचा एसआयपी प्लॅन घेतला असेल तर १ वर्षात फक्त ६० हजार रुपयांची गुंतवणूक करता येईल. मात्र, दुसऱ्या वर्षी तुम्हाला ५ हजार रुपयांसह २५० रुपये मासिक रकमेत वाढ करायची आहे. असे केल्यास तुम्ही प्रतिमहिना ५२५० रुपयांची गुंतवणूक कराल. त्यामुळे दुसऱ्या वर्षी १.२३ लाख रुपये जमा होतील.

अशीच दरवर्षी तुम्ही ५% वाढ सुरु ठेवली आणि १८ वर्षे ही SIP अशीच चालू ठेवलीत तर तुम्ही एकूण १६.८७ लाख रुपये जमा कराल. या प्रकरणात दीर्घ मुदतीचा परतावा गृहीत धरल्यास तुमच्या SIP प्लॅनवर अंदाजे १२% दराने तुम्हाला व्याजातून एकूण ३४.५० लाख रुपये मिळतील. (SIP Investment) म्हणजेच काय? तर तुम्ही जमा केलेली एकूण रक्कम व्याजासकट १८ वर्षांनंतर ५१.४५ लाख रुपये इतकी होईल.

NHAI अंतर्गत 38 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; अर्जांची अंतिम तारीख पहा

NHAI

NHAI Requirement 2024| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. कारण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) ने विविध रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती वाचा.

संस्थेचे नाव – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India)

एकूण पदसंख्या – 38 रिक्त जागा

रिक्त पदांची नावे- वरिष्ठ महामार्ग तज्ञ 5 जागा, मुख्य डिपीआर तज्ञ 5 जागा, रस्ते सुरक्षा तज्ञ 5 जागा, वाहतूक तज्ञ 5 जागा, पर्यावरण/वन तज्ञ 5 जागा, जमीन संपादन तज्ञ 5 जागा, भू-तंत्रज्ञ तज्ञ 5 जागा, पुल तज्ञ 2 जागा, सुरुंग तज्ञ 1 जागा,

वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत असायला हवे.

कामाचा कालावधी – 2 वर्षे

पगार – विविध पदांसाठी अनुभव आणि पात्रतेनुसार पगार ठरवण्यात आला आहे.

अधिकृत संकेतस्थळ – https://nhai.gov.in/

महत्वाचे म्हणजे, निवडलेल्या उमेदवारांना कराराच्या कालावधीत पूर्ण वेळ काम करावे लागेल. त्यांना कोणत्याही इतर असाइनमेंट करता येणार नाहीत. प्रवास भत्ता / महागाई भत्ता सामील होताना किंवा पूर्ण झाल्यावर दिला जाणार नाही. सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर राहणे आवश्यक असेल. दिलेल्या सूचना पाळाव्या लागतील.

GIC Bharti 2024 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; येथे करा अर्ज

GIC Bharti 2024

GIC Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता (GIC ) मुंबई म्हणजेच भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन अंतर्गत एक मोठी भरती आलेली आहे. या भरती अंतर्गत इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविलेले आहेत. ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी होणार आहे. आणि या भरतीसाठी तब्बल 12 रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मार्ग देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागेल. त्याचप्रमाणे 7 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच त्यांच्या अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता | GIC Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा पदवीधर असणे गरजेचे आहे.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदाची भरती होणार आहे.

रिक्त जागा

या भरती अंतर्गत 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | GIC Bharti 2024

8 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल 1308 जागांची भरती सुरु; असा करा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवीन नवीन संधी घेऊन येत असतो. जेणेकरून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल आणि तुम्हाला भविष्यात देखील काम करता येईल. आज देखील आम्ही तुमच्यासाठी नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रयत शिक्षण संस्था अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 1308 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 27 आणि 30 जून या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता
  • पदसंख्या – 1308 जागा
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 आणि 30 जून 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.
  • 27 आणि 30 जून हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदर सर्च करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

PNB Bank : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 जुलैआधी ‘हे’ काम न केल्यास तुमचे खाते बंद होणार

PNB Bank

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (PNB Bank) जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) करोडो ग्राहकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वृत्तानुसार, पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांकडे केवळ ४ दिवसाचा अवधी शिल्लक आहे. या चार दिवसांत ग्राहकांना आपले डॉर्मंट खाते सक्रिय ठेवायचे असेल तर येत्या ३० जूनपर्यंत एक महत्वाचे काम पूर्ण करावे लागेल. तसे न केल्यास ग्राहकांचे खाते बँकेकडून बंद करण्यात येईल. या संदर्भात सविस्तर माहिती देणारी नोटीस बँकेकडून आधीच ग्राहकांना पाठवली गेली आहे. हा नेमका काय प्रकार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

PNB मधील कोणती खाती बंद होणार? (PNB Bank)

जर तुम्ही पीएनबी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी चुकूनही स्किप करू नका. जर तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असेल तर सगळ्यात आधी आपल्या खात्याची स्थिती तपासून या. कारण येत्या ३० जून २०२४ पर्यंत बँकेकडून काही खाती बंद करण्यात येणार आहेत. याबाबत बँकेने दिलेल्या अधिसूचनेत सांगितले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या ३ वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, ज्यांच्या खात्यात गेल्या ३ वर्षांत केवळ ० रुपये शिल्लक आहे अशी खाती बँकेकडून लवकरच बंद केली जाणार आहेत.

अशा खातेधारकांना बँकेने आधीच नोटीस पाठवली आहे. (PNB Bank) या नोटीसचा कालावधी १ महिना असून महिनाभरात खातेधारकांना खाते सुरु न केल्यास बरोबर १ महिन्याने त्यांची खाती बंद केली जातील. त्यामुळे जर तुमचे तुमच्या खात्याकडे दुर्लक्ष झाले असेल तर आताच वेळ आहे आपल्या खात्याची स्थिती तपासा. आपले खाते सक्रिय ठेवण्यासाठी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या. अन्यथा, तुमचे बँक खाते १ जुलै २०२४ रोजी बँकेकडून पूर्णपणे बंद केले जाईल.

फक्त ४ दिवस बाकी

पीएनबी बँकेकडून आपल्या ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या खात्याचे KYC करून घ्यावे. तरीही बऱ्याच लोकांनी अद्याप केवायसी अपडेट न केल्यामुळे बँकेने ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवली. मात्र, आता या कामासाठी कालावधी वाढवून दिला जाणार नसून १ जुलै २०२४ रोजी अशी सर्व खाती बंद करण्याचा मोठा निर्णय बँकेने घेतला आहे. (PNB Bank) बऱ्याच कालावधीपासून बंद असलेल्या खात्यांचा स्कॅमर गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ग्राहकांना बँकेने यापूर्वीच नोटिसा पाठवून पूर्वसूचना दिल्या होत्या. यानंतर अखेर बँकेने ही खाती बंद करण्याचे निश्चित केले आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल ! 5 वर्षात 44,000 किलोमीटरपर्यंत बसवणार कवच प्रणाली

railway kavach

Indian Railway : 17 जूनला पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय अधिकच सतर्क झालेला दिसत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांना एक संरक्षित मिशन मोडवर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तातडीचे निर्देश दिले आहेत. भारतीय रेल्वे पुढील पाच वर्षांत ४४,००० किमी लांबीच्या ट्रॅकवर कवच संरक्षण प्रणाली लागू करण्याची योजना आखत आहे, असे रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी कॅबिनेट सचिवांना सांगितले. कवच नक्की काय आहे ? तर ही एक स्वयंचलित ट्रेन (Indian Railway) संरक्षण प्रणाली आहे जी एकाच ट्रॅकवर टक्कर टाळण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

कवच 4.0 वर लक्ष केंद्रित केलेल्या आढावा बैठकीदरम्यान, वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना ताबडतोब सिस्टीम तयार होताच सर्व इंजिने सुसज्ज करण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार, तीन उत्पादक सध्या कवच प्रणालीचे उत्पादन करत आहेत, तर इतर विकासाच्या विविध टप्प्यात आहेत.

रेल्वे मंत्रालय (Indian Railway) दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गांवर कवच बनवण्याचे काम करत आहे. या वर्षाच्या अखेरीस अतिरिक्त 6,000 किलोमीटरसाठी निविदा जारी करणे अपेक्षित आहे, असे अहवालात म्हटले आहे.

1980 च्या दशकात कवच सारखीच ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम (ATP) जगभरातील बहुतेक प्रमुख रेल्वे नेटवर्कने स्वीकारली. भारतीय रेल्वेने 2016 मध्ये ट्रेन कोलिशन अवॉयडन्स सिस्टीम (TACS) च्या पहिल्या आवृत्तीला मान्यता देऊनही अशीच प्रणाली स्वीकारली. 2019 मध्ये यशस्वी चाचण्या आणि SIL-4 सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर, 2020 मध्ये ही प्रणाली अधिकृतपणे राष्ट्रीय ATP प्रणाली म्हणून (Indian Railway) स्वीकारण्यात आली.

नक्की काय आहे कवच प्रणाली ? (Indian Railway)

कवच, एक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने तीन भारतीय कंपन्यांच्या भागीदारीत डिझाइन केली आहे. रेल्वे सुरक्षा सुधारणे हा त्याचा उद्देश आहे.हे ट्रेनच्या वेगावर लक्ष ठेवते आणि ट्रेन ऑपरेटरना धोक्याची चिन्हे ओळखण्यात मदत करते, शिवाय आव्हानात्मक हवामानातही सुरक्षित ऑपरेशन्स सुनिश्चित करते. ऑन बोर्ड डिस्प्ले ऑफ सिग्नल ॲस्पेक्ट (OBDSA) ट्रेन ऑपरेटर्सना मॅन्युअल व्हिज्युअल तपासणीवर अवलंबून राहून, प्रतिकूल व्हिजनच्या (Indian Railway) परिस्थितीतही सिग्नलचे निरीक्षण करण्यास सक्षम करते.

भारतीय रेल्वेने 10,000 किमीमध्ये कवच यंत्रणा बसवण्यासाठी निविदा काढल्या आहेत. सध्या, दक्षिण मध्य रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या 139 लोकोमोटिव्हवर ही प्रणाली लागू करण्यात (Indian Railway) आली आहे.

INDIA च्या सरकारमध्ये राहुल गांधी असते पंतप्रधान; तर ठाकरे आणि सुळेंकडे असती ही मोठी जबाबदारी

India Alliance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवले जात होते. परंतु मोजक्या काही मतांनी NDA पुढे गेल्यामुळे देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापित झाले. परंतु इंडिया आघाडीचे सरकार आले असते तर कोणाकडे कोणती जबाबदारी सोपवण्यात आली असती? असा प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे. याच प्रश्नाचे उत्तरे एआयच्या माध्यमातून आली आहेत. ज्यात सत्तेत आल्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांकडे कोणती जबाबदारी असती याबाबत माहिती दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर यायच्या माध्यमातून बनवण्यात आलेले इंडिया आघाडीच्या खासदारांचे फोटो प्रचंड वायरल होत आहेत. या फोटोच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे सरकार देशात स्थापित झाले असते तर कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी असते याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पद असते असे एआयने म्हटले आहे. तर शशी थरुर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी असती. डी. के. शिवकुमार हे रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री झाले असते.

त्याचबरोबर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गृहमंत्री बनले असते. काँग्रेसच्या सचिन पायलेट यांच्याकडे नागरी उड्डायन मंत्रालयाची जबाबदारी असती. काँग्रेसच्या अभिषेक सिंघवींकडे कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी असती. अखिलेश यादव यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय असते. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश रेल्वे मंत्रीपद असते. तेजस्वी यादव यांच्याकडे संरक्षण मंत्रालय असते. दिपेंद्र हुड्डांकडे अर्थमंत्रालय असते.

इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडे महिला व बालविकास मंत्रालय सोपवले असते. टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींना युवा व क्रीडा मंत्रालय असते. टीएमसीच्या युसूफ पठाणकडे अल्पसंख्यांकं मंत्रालयाची जबाबदारी असती. प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीकडे शिक्षण मंत्रालय असते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी कृषी व कृषी कल्याण मंत्रालय असते. अशी माहिती AI च्या फोटोतून देण्यात आली आहे.

Train Journey: रेल्वेत चोरीला गेले महिलेचे सामान ; आता रेल्वे देणार 1 लाखांची भरपाई

train jourany

Train Journey: भारतीय रेल्वे म्हणजे प्रवासाचे स्वस्तात मस्त साधन. म्हणूनच भारतातल्या बहुतांशी ट्रेन मध्ये खचाखच गर्दी भरलेली असते. भारतातल्या मोठ्या शहरांमधून निघणाऱ्या ट्रेनची अवस्था तर काही विचारायलाच नको अशी असते. कारण अगदी क्लास ३ आणि २ मधल्या बोग्यांमध्ये सुद्धा घुसखोर असतात. याच कारणामुळे एका महिलेला आपली बॅग गमवावी लागली. मात्र त्यानंतर ग्राहक न्यायालयात केस दाखल केली. आता त्याबाबतचा निर्णय आला असून त्यात रेल्वेला एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे (Train Journey) आदेश देण्यात आले आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया …

नक्की काय घडलं ? (Train Journey)

ही घटना २०१६ ची आहे. जया कुमारी यांनी नवी दिल्लीहून इंदूरला जाण्यासाठी मालवा एक्स्प्रेसचे तिकीट काढले होते. त्यांनी आधीच सीट बुक केली होती, म्हणून त्या जाऊन त्यांच्या सीटवर बसल्या आणि लगेज सीटखाली ठेवले. आरक्षित डब्यात बरेच अनधिकृत लोक ये-जा करत असल्याचे त्यांनी पाहिले. झाशी ते ग्वाल्हेर दरम्यान त्यांचे सामान चोरीला गेले. टीटीई आणि रेल्वे प्रशासनाला ही माहिती देण्यात आली. मात्र त्याला दिलासा मिळाला नाही.

दिल्लीमध्ये परतल्यानंतर जया कुमारी यांनी उपभोक्ता फोरम इथं आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर अडवोकेट प्रशांत प्रकाश यांची नियुक्ती केली आणि उपभोक्ता फोरमचे अध्यक्ष इंग्रजीत सिंह आणि सदस्य रश्मी बन्सल यांनी या केस मध्ये सुनावणी केली. या प्रकरणी त्यांनी भारतीय रेल्वेने सेवांमध्ये निष्काळजीपणा आणि कमतरता दाखवल्याचे मान्य केले. सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे तसेच प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करणे हे रेल्वेचे कर्तव्य होते, असे तक्रारीत म्हटले आहे. तसे या प्रकरणात (Train Journey) झाले नाही.

आयोगाने म्हटले आहे की, “ज्या प्रकारे ही घटना घडली आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यानंतर तक्रारदाराने एफआयआर दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले.” योग्य तपासासाठी अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागला. आरक्षित तिकिटावर प्रवास करताना त्याच्या बॅगेत ठेवलेले सामान चोरीला (Train Journey) गेल्याने तक्रारदाराने भारतीय रेल्वेविरुद्ध सेवेत निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेला द्यावी लागणार नुकसान भरपाई (Train Journey)

आयोगाने म्हटले आहे की, “जर विरुद्ध पक्षाच्या किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सेवांमध्ये कोणतीही निष्काळजीपणा किंवा कमतरता नसती तर अशी घटना घडली नसती. फिर्यादीकडे प्रवासादरम्यान वाहून नेल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत नाकारण्यासाठी अन्य कोणताही बचाव किंवा पुरावा नाही, म्हणून तक्रारदारास 80,000 रुपयांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी पात्र मानले जाते. त्यांना गैरसोय, आणि मानसिक त्रास झाला यासाठी 20,000 रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी 8,000 रुपये भरपाई करण्यास (Train Journey) सांगितले.

Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर!! सोने-चांदी झाले स्वस्त; इथे पहा आजचे दर

Gold Price Today (1)

Gold Price Today: लोकसभा निवडणुकीचा काळ संपल्यानंतर आता सोन्या-चांदीच्या भावामध्ये हळूहळू घसरण होताना पाहायला मिळत आहे. कारण, आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. त्यामुळे आज म्हणजेच 26 जून रोजी सोने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी दिसून येत आहे. तसेच चांदीच्या किमती ही उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला ही सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर आजचे भाव तपासून घ्या.

गुड रिटर्न्सनुसार 26 जून रोजी, बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासह 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 72,000 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तसेच 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने 6,60,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 7,20,000 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच आज सोन्याच्या भावामध्ये लक्षणीय घट झाल्याची पाहायला मिळत आहे.

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,000 रुपये
मुंबई – 66,000 रुपये
नागपूर – 66,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,000 रूपये
मुंबई – 72,000 रूपये
नागपूर – 72,000 रूपये

चांदीचे आजचे भाव

ग्राहकांसाठी खुशखबर म्हणजे फक्त सोन्याचेच नाही तर आज चांदीचे भाव देखील उतरले आहेत. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 900 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9000 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 90,000 रूपये अशी आहे. या कारणामुळे चांदी खरेदी करणे ग्राहकांना परवडत आहे.