Sunday, December 14, 2025
Home Blog Page 6694

..यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने घेतली राज्यपालांची भेट

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar

मुंबई | भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून २०२० साली ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे, तसेच लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वांनी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, तसेच सर्व विद्यापीठांमध्ये ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहीम राबवावी अशी विनंती भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केली. सचिन तेंडुलकर यांनी गुरुवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी सचिन तेंडुलकर यांचे अभिनंदन केले तसेच मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियानासाठी कॉर्पोरेट जगताचा सामाजिक दायित्व निधीदेखील मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. आदिवासीबहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याच्या सचिन तेंडुलकर यांच्या भूमिकेचेदेखील राज्यपालांनी स्वागत केले.

मे महिन्यात सचिन तेंडुलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियान राबविण्याबद्दल पुढाकार घेतला होता. हे अभियान राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवावे या दृष्टीने तेंडुलकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

यावेळी क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, डॉ. जयश्री तोडकर आदी उपस्थित होते.

भारत हा क्रीडाप्रेमी देश असून आता प्रत्यक्ष खेळणारा देश झाला पाहिजे. लहान मुलांमधील क्रीडा नैपुण्य हेरणारे उत्तम प्रशिक्षक देशाला हवे आहेत. देशात अनेक निवृत्त खेळाडू आहेत. त्यांच्या सेवा प्रशिक्षक म्हणून वापरल्या जाव्यात, असेही मत तेंडुलकर यांनी व्यक्त केले.

फळांचा राजा हापूसला भौगोलिक मानांकन

Mango GI
Mango GI

नवी दिल्ली | फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहिर झाले आहे. केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने आज मानांकनाची अधिकृत घोषणा केली. या मानांकनामुळे हापूस आंब्याची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व लगतच्या परिसरातील हापूस आंब्यास हे मानांकन जाहिर करण्यात आले आहे, हे भौगोलिक मानांकन अशा उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे, ज्यामध्ये त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता ही त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावरुन ओळखली जाते. हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे बळकटी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहान विभागाने हापूस आंब्यास हे मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. नुकतेच केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी भौगोलिक मानांकनाचा लोगो व टॅगलाईनचे अनावरण केले होते.

हापूसला कायद्याचे ‘कवच’

या मानांकनामुळे कोकण आणि लगतच्या भागातील आंबे वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापूस असे संबोधता येता येणार नाही किंवा त्यांची विक्री करताना हापूस असा उल्लेख करता येणार नाही. याआधी हापूस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जायचा. यामुळे ग्राहकांची फसवणूक तर व्हायचीच तसेच कोकणातील हापूस उत्पादकांचेही नकुसान व्हायचे. त्यावर कायदेशीर कारवाही करणे शक्य होत नव्हते. हापूस आंब्याला आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.

संयुक्त अरब अमिराती हापूसचा सर्वाधिक चाहता

कोकणच्या हापूस आंब्यास विदेशात सर्वाधिक मागणी आहे. सन 2018-19 या वर्षात परदेशात 26 हजार 937 मेट्रिक टन आंबा महाराष्ट्रातून निर्यात करण्यात आला होता. यामध्ये सर्व प्रकारच्या आंब्यांचा समावेश होता. हापूसला सर्वाधिक मागणी ही संयुक्त अरब अमिरातीतून आहे. यावर्षी या भागात 13 हजार 984 मेट्रिक टन आंबा निर्यात केला गेला, यापैकी 60 टक्के आंबा हा हापूस होता. हापूसला जगभरातील इंग्लड, ओमान, कतार, कुवैत, सौदी अरेबिया, कॅनडा, फ्रान्स, सिंगापूर , जर्मनी, बहरीन, हॉगकाँग या देशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. इंग्लंडमध्ये यावर्षी 3310 मेट्रिक टन आंबा निर्यात केला गेला, यामध्ये 40 टक्केहुन अधिक हापूस आंब्याचा समावेश होता.

हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आता हा आंबा निर्यात करताना हापुस या नावाने निर्यात केला जाईल, यापूर्वी भारतीय आंबा या नावाखाली निर्यात होत होती. या मानांकनामुळे जागतिक बाजारपेठेत हापूस आंब्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

महाराष्ट्रातील 31 उत्पादनांना भौगोलिक मानांकन

देशातील 325 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 31 उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनात सोलापुरी चादर, सोलापुरी टॉवेल, उपडा जमदानी साडी, पुणेरी पगडी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नासिकची द्राक्षे, वारली पेंटींग, कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदुळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तुरडाळ, आंबेमोहर तांदूळ, वेंर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणु घोळवड चिक्कु, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळगावचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री, करवत काटी साडी आणि आता कोकणच्या हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.

निवड रद्द झालेल्या त्या ८३३ अार.टी.ओ. उमेदवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Raj Thakre
Raj Thakre

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्या नंतर देखील हाती आलेली शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर इंजिनिअर्स वर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे इंजिनिअर्स अडचणीत आले आहेत. या सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची कृष्ण कुंज या निवासस्थानी आज भेट घेतली.

राज ठाकरे यांनी सदरील विषय या उमेदवारांकडून समजून घेतला. शिवाय या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करून आपणास न्याय मिळवून देणार असे आश्वासन राज ठाकरे यांनी या उमेदवारांना दिले. राज ठाकरे यांच्या कडून मिळालेल्या या भक्कम आधार आणि आश्वासना मुळे या उमेदवारांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.

सहायक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते. जड मोटर वाहन चालविण्याची परवाना आणि सरकारी गँरेंज मधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते. मात्र हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले. या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले. त्या आधारे जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली गेली. मात्र असे नियम बदलविण्यास कोर्टात आक्षेप घेतला गेला. पूर्वीच्या निकषांमुळे शासनाला आवश्यक त्या संख्येने उमेदवार मिळत नव्हते. तसेच खोटी प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकार उघडकीस आले होते.ते थांबविण्यासाठी शासनाने नियमा मध्ये बदल केला होता. असे बदल करण्याची गरज का भासली हे शासना तर्फे कोर्टात योग्य प्रकारे मांडले गेले नाही. त्यामुळे केवळ याचिका कर्त्याची बाजूच कोर्टा पुढे आली. राज्य सरकारने उत्तम वकील न देता कनिष्ठ कनिष्ठ वकीलावर ही जबाबदारी सोपवली.या सगळ्या प्रकारामुळे कोर्टाचा निर्णय शासना विरोधात गेला असल्याचे इंजिनीअर्सचे म्हणणे आहे.

या उमेदवारांची राज ठाकरे यांच्या सोबतची ही भेट महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष महेश जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे चिटणीस सुधीर नवले यांच्या प्रयत्ना मुळे घडून आली.

होर्डिंग अपघातात ३ जणांचा मृत्यु, पहा CCTV फुटेज

CCTV Footege of Pu e accident
CCTV Footege of Pu e accident

पुणे | सुनिल शेवरे

जुना बाजार मंगळवार पेठ जवळील शाहिर अमर शेख चौकात फ्लेक्स होर्डिंग पडून मोठा अपघात झाला आहे. यात ३ जणांचा मृत्यु झाला असून ५ ते ६ जणांची प्रकृति गंभीर आहे.
रिक्षा व चारचाकी गाड्यांचं नुकसान झाल आहे. जखमींना इस्पितळात हलवले असून , अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व पोलिस निरीक्षक वरिष्ठ अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत. बहुदा होर्डिंग्स जुना झाल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापरिक्षा पोर्टल विरोधात कोल्हापूरात विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

पोर्टल
पोर्टल

कोल्हापूर | जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज एकत्र येऊन “महापरीक्षा पोर्टल विरोधात” भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. “महापरिक्षा पोर्टल रद्द करा” अशी प्रमुख मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समिती यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित केला होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पदवी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी करून शासनाच्या बेरोजगारांसाठीच्या असफल धोरणांचा यावेळी निषेध केला गेला.

महाराष्ट्र शासनाने शासकीय रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही ‘महापरिक्षा’ पोर्टल तर्फे राबविण्याचा घाट घातलेला आहे. मात्र या पोर्टल तर्फे घेण्यात आलेल्या काही परीक्षांमध्ये गेल्या काही दिवसात अनेक गंभीर गैरप्रकार आढळून आलेले आहेत. मास कॉपी, परीक्षा वेळेवर सुरू न होणे, काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडणे, सर्व्हर डाऊन होणे, परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारास वैयक्तिक उत्तरपत्रिका न मिळणे इत्यादी मुळे विद्यार्थ्यांचा या पोर्टल वरील विश्वासच उडाला आहे. याबद्दल सरकार दरबारी यापूर्वी अनेक विनंती अर्ज दाखल केले गेले मात्र त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली.

सदर मोर्चामध्ये कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिहाधिकारी कार्यालयामध्ये मा. उपजिल्हाधिकारी यांच्याशी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून “महापरीक्षा पोर्टल “च्या गैरकारभाराबद्दल उपजिल्हाधिकारी यांना अवगत केले.

पुण्यात फ्लेक्स कोसळून दोन ठार

Pune
Pune

पुणे | पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात दोघे जागीच ठार झाले असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे.

शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता येथे अनेक वाहने सिग्‍नलला थांबली होती. यावेळी अचानक लोखंडी फ्‍लेक्‍स वाहनांवर कोसळला. त्यात रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहेत. तसेच दोघे ठार तर ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, अपघातानंतर येथील वाहतूक पूर्णपणे विस्‍कळीत झाली आहे. वाहतूक उपायुक्‍त आणि स्‍थानिक पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली असून जखमींना रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं होत. मात्र पुन्हा एकदा शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते पुणे मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी या मतदार संघात विजय प्राप्त केला होता. मात्र कॉमनवेल्थ खेळात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. विश्वजित कदम हे आता कडेगाव-पलूसचे आमदार आहेत. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पवारांसाठी पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्याची माहिती पुढे आली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजपा सोडून इतर सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. अशा वेळी राज्यसभेऐवजी लोकसभेची निवडणूक लढणे पवारांसाठी गरजेचं असणार आहे. त्यामुळे ही रणनिती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आण्विक ऊर्जा नियामक मंडळात २० विविध पदांची भरती

Jobs
Jobs

सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (G/F)

वयोमर्यादा – ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ५० वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)

सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (E)

वयोमर्यादा – ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ४५ वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)

सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (D)

वयोमर्यादा – ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ४० वर्षे (शासकीय नियमानुसार सवलत लागू)

सायंटिफिक ऑफिसर (C) – १२

शैक्षणिक पात्रता – बी.टेक / बी.ई (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / केमिकल / न्यूक्लियर / सिव्हिल (जिओ-टेक्निकल) / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा एम.टेक / एम.ई किंवा पी.एचडी आणि अनुभव आवश्यक

वयोमर्यादा – ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कमाल ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१८

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्जासाठी इथे क्लिक करा

ताज्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा

करिअरनामा
https://t.me/CareerNama1

जान्हवी कपूर-ईशानच्या हाॅट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Janhavi Kapoor
Janhavi Kapoor

मुंबई | जान्हवी कपूरचा पहिलावहिला चित्रपट ‘धडक’ चांगलाच गाजला. या सिनेमातील जान्हवीच्या अभिनयाचं कौतुक अनेकांनी केले. धडक पासून जान्हवी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. इशान आणि जान्हवीची जोडी रसिकांना भावली आहे.

‘धडक’ सिनेमानंतर इशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत जान्हवीच्या सेक्सी अदा पाहायला मिळत आहेत. तर रोमँटिक अंदाजात इशान तिच्या मांडीवर झोपल्याचेही या फोटोत दिसत आहे. जान्हवीने काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केले आहे. तर इशानने डेनिम शर्ट परिधान केले असून तो तिच्या मांडीवर झोपल्याचे दिसतंय. दोघांचा हा सेक्सी आणि तितकाच रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि जान्हवीची आई श्रीदेवी यांना जान्हवीच्या धडक सिनेमाबाबत खूपच उत्सुक होती. त्यासाठी जान्हवीकडून तयारी सुद्धा करून घेत होत्या, खरं तर जान्हवीने सिनेसृष्टीत करियर बनवू नये असं श्रीदेवींचं सुरुवातीला मत होतं. परंतु जान्हवीने बॉलिवूड हे ऑप्शन निवडलं तेव्हा श्रीदेवींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यासाठी ब्युटी टिप्सपासून अभिनयातील नजाकतींची सुद्धा तयारी तिच्याकडून करून घेतली.

धडकच्या शूटिंगच्या सुरुवातीला अनेकदा श्रीदेवी तिच्या सोबत शूटवर जायच्या आणि घरच्या फावल्या वेळात तिच्याकडून अभिनयाचे धडे गिरवून घ्यायच्या. जान्हवीचं बॉलिवूडमधील पदार्पण आणि धडकचं बॉक्स ऑफिसवरील यश पाहण्यासाठी त्या खूप उत्सुक होत्या. परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं.

म्हणुन पोलीसांनी जळत्या चितेवरुन तिचा मृतदेह ताब्यात घेतला

Malegao Murder Case
Malegao Murder Case

मालेगाव | पोलीसांनी अंत्यविधीच्या कार्यक्रमात अचानक धाड टाकुन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रकार मालेगाव येथे घडला. अनैतिक संबंधाच्या संशयाने आईवडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याच्या संशयाने पोलीसांनी सदर कारवाई केली आहे.

हाती आलेल्या माहीतीनुसार, मुलीचा मृत्यु झाल्यानंतर तिच्या आई वडीलांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह चितेवर ठेवलेला असताना पोलिसांनी अमरधाममध्ये अचानक धाढ टाकली. यावेळी पोलीसांनी मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. मालेगावमध्ये वाढदिवसाच्या दिवशी मुलीची तिच्याच आईवडिलांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली. या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय असून नेहाची तिच्या जन्मदात्यांनीच चुलत भावाच्या मदतीने गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समजत आहे. मात्र हा सर्व प्रकार उघड होण्यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. एका निवानी फोन कॉलवरून पोलिसांना तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली होती. यानंतर तिचा मृतदेह चितेवरून ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला असून या याप्रकरणी नेहाचे आई-वडील आणि तिच्या चुलत भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.