Sunday, December 14, 2025
Home Blog Page 6695

अवैद्य धंद्यांना बसणार चाप, गृह राज्यमंत्र्यांचे पोलीसांना सरप्राइज चेकिंगचे आदेश

Dipak Keskar
Dipak Keskar

मुंबई | राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद झाले आहे की नाही ते पाहणे. तसेच शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळा येथे विशेषतः मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांमार्फत सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.

ग्रामीण भागातील असामाजिक तत्वांवर कारवाई न केल्याचे या अचानक भेटीत (सरप्राइज चेकिंगमध्ये) आढळून आल्यास तेथील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. केसरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील अवैध व्यवसाय तसेच असामाजिक तत्वांविरुद्ध नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व या तक्रारींची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी निर्धास्तपणे तक्रार करावी, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.

हूश्श..! अखर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

petrol disel
petrol disel

मुंबई | केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात घोषित केल्यानंतर महाराष्ट्रानेही पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे राज्यातील पेट्रोल लिटरमागे 5 रुपयांनी स्वस्त झाले असून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) वाढत्या किंमतीचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशांतर्गत याचा प्रतिकूल परिणाम होऊन जनतेला त्याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली.

तसेच, राज्यांनीही आपला वाटा म्हणून इंधनावरील मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अडीच रुपयांची कपात करावी, असे आवाहनही श्री. जेटली यांनी केले आहे. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात लिटरमागे पेट्रोल एकूण 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह श्री. जेटली यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

अतिक्रमाणाची नोंद करण्यास टाळटाळ करणाऱ्या ग्रामसेवकास जागेवर शासन करणार- राज्यमंत्री भुसे

Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

जालना | अक्षय सुनिता मोहन

ग्रामीण भागातील लाभार्थीना सर्वांना २०२२ पर्यंत घरे या धोरणाची अंंमलबजावणी करण्यासाठी निवासासाठी गावठाण तसेच गायरान जमीनीवर केलेली अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रामसेवकांनी नोंद घेण्याबाबत टाळाटाळ केल्यास जागेवरच शासन करणार. असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. जालना पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या भुमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबाना २०२२ पर्यंत पक्की घरे देण्याचे सरकारेच उद्दीष्ट आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंब राज्य व केंद्र सरकाराच्या घरकुल योजनेसााठी पात्र असतात.मात्र जागेमुळे अडचणी येतात. म्हणून राज्य शासनाने निवासासाठी १९९९ ते २०११ दरम्याने गायरान जमीनीवर केलेेले अतिक्रमण नियमित करून ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर आठ मध्ये अतिक्रमण धारकांची नोंद करण्या्च्याच्या सूचना ग्रामसेकांना दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी आपण स्‍वतः गावाना भेटी देणार असून नोंदी घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकास जागेवर शासन करणार असल्याचे श्री भुसे यंानी सांगितले.

या वेळी राज्यमंंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतिश टोपे, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, माजी आमदार अरविंद चव्हाण,पंचायत समिती सभापती पाडुरं डोंगरे यांच्यासह आदींची उपस्‍थिती होती.

घरकुल यादीत नाव नसल्यास ‘ड’ फॉर्म भरा –
वर्ष २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानंतरही अनेक पात्र लाभार्थींची घरकुल यादीत नावे आलेली नाही. अशा लाभार्थींनी ग्रामपंचायतीत १५ ऑक्टोबर पर्यंत ‘ड’ फॉर्म भरण्याचे आवाहन श्री भुसे यांनी या वेळी केले.

शहरात वाढले सिगारेट फूंके

Smocking
Smocking

पुणे | सुनिल शेवरे

पुण्यात वाढत्या लोकसंख्येसोबतच सिगारेट फुंकनारे वाढले असून त्यांच्या मुळे वायु प्रदूषणात तर भर पड़ती च आहे पंरतु सामान्य जनतेच्या जीवाशी ही मंडळी सहज खेळत आहेत. पुण्यात सर्वसामान्य नागरिकांना होणारा वायु प्रदूषणाचा त्रास हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सिगारेट मधून निघणारा वायु हा प्राणघातक असतो. सिगारेट पिणाऱ्यांपेक्षा धुराच्या संपर्कात येणाऱ्याच्या मृत्युचं प्रमाण अधिक आहे.

काय होऊ शकतं सिगारेट च्या धुरामुळे

१) फुफुसाचे आजार
२)श्वसनाचा त्रास
३) दमा
४ ) हृदयरोग

काय काळजी घ्याल

१) घरातुन बाहेर पड़ताना तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून पडावे.
२) सिगारेट व टायर जाळणाऱ्या स्थळापासून लांब रहाणे.
३) सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यास प्रवृत्त करणे.
४) धूरांच्या (मोठ्या प्रमाणात धुर मारणाऱ्या वाहनांच्या) संपर्क टाळा.

“मुळशी पेटर्न” चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

Mulshi Pattern
Mulshi Pattern

पुणे | सुनिल शेवरे

गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा प्रविण तरडे दिग्दर्शित ‘ मुळशी पैटर्न ‘ सिनेमा चा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. त्यामध्ये ” आरा रा रा “गाण्यात दाखविले गेलेले सीन आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास येत आहे.

गाण्यात तलवारीने केक कापत असल्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कुख्यात गुंडाचा समावेश या चित्रपटात केला आहे. शेतकऱ्यांची पोर कशी या गुन्हेगारी जगताकडे वळाली आणि गुन्हेगारी चा शेवट कसा होतो हे दाखवन्यात आलं असलं तरीही, गुन्हेगारीचं उदात्तीकरण होणार यात शंका नाही. कारण मोक्का तील स्वतः गुन्हेगार या चित्रपटात प्रत्यक्ष काम करत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टि ला असे सिनेमे कुठे घेऊन जातील, आणि मराठीसृष्टिलाही भविष्यात सेन्सोर चं ग्रहण लागेल का असा प्रश्न उपस्थित होतोय.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे येथील पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध प्रश्नांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनास पात्र झोपडपट्टीधारक तसेच आदिवासी पाड्यांमधील कुटुंबाची यादी अद्ययावत करुन परिपूर्ण यादी म्हाडाकडे हस्तांतरित करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सोशल मिडियावर अतिरिक्त माहिती देणारे ठरतायत सायबर गुन्हेगारांचे लक्ष

a
a

पुणे | फेसबुक व इतर सोशल मिडियावर स्वतःची जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक हे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट बनतात व अशा व्यक्तींची सायबर गुन्हेगार लगेचच फसवणूक करतात असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा तज्ज्ञ अॅड वैशाली भागवत यांनी व्यक्त केले. सोशल मिडिया, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा आणि युवक व मानसिक आरोग्य ; समस्या आणि आव्हाने या विषयावर कर्वे समाज सेवा संस्था, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट, मनोदय मेंटल हेल्थ फोरम आणि पुणे पोलीस सायबर गुन्हे सुरक्षा विभागाने कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये अॅड भागवत युवकांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अॅड भागवत म्हणाले की, सोशल मिडियावरील केल्या जाणाया पोस्टचे निरीक्षण हॅकर करत असतात. जे लोक जास्त तीव्रतेने भावनिक पोस्ट करतात. अशांना हॅकर टार्गेट करतात. अशा लोकांना भावनिक पोस्ट पाठवणे, आपण त्यांना खुप चांगल समजूण घेतो हे सिध्द करत हॅकर त्यांचा विश्वास संपादत करतात. नंतर भावनिककरत त्यांच्या कडून विविध काम करून घेतात. मोमो आणि ब्लू व्हेल या प्रकारेच काम करतात. तरूण मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून मानवी तस्करीचे अनेक प्रकार होतात करतात. यामुळे सोशल मिडिया सावधगिरीने हाताळावे.

यावेळी गिरीश जोशी म्हणाले की वयस्कर माणसे टेक्नॉलॉजी शिकण्यासाठा उत्सुक नतात. त्यामुळे ४५ वयोगटातील व्यक्तीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण जवळपास ७०% आहे.सायबर सुरक्षतेकडे अद्याप गांभीर्याने पाहिले जात नाही. यावेली ऑनलाईन आर्थिक फसवणूक कशी होते. याचे अनेेक उदाहरणेजोशी यांनी दिली. फेसबुक वरील माहिती आणि फोटोचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जाते. फेसबुकवरील डाटा मोठया प्रमाणात चोरीलाजातो. या डाटाच्या आधारे सायबर गुन्हे केले जात आहे. यामुळे सतत फेसबुक वर आपली माहिती टाकत जाऊ नका असे मत लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केले.

डॉ दिपक शिकारपुर यांनी सांगितले की, अनेकाना सेल्फीचे व्यसन लागले आहे. काही काळानंतर सेल्फी व्यसनमुक्तीचीकार्यशाळा घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदलत आहे. भविष्यात काय खावे, कसे रहावे हे सगळ तुमचा स्मार्टफोन सांगेल. यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर हेम्हणाले की सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे ३० ते ४० % लोकांना मानसिक आजार झाला आहे.

सायबर गुन्ह्यासंबंधी पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे एका वर्षात जवळपासआठ हजार तक्रारी आल्या असून या तक्रारीनुसार गुन्हेगारांना पकडले देखील आहे. ऑनलाईन फसवणूक किंवा इतर सायबर क्राईम संबधी तक्रार असल्याल सायबर क्राईम विभागाशी नागरीकांनी संपर्क साधावा असे आवाहन सायबर क्राईम विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संचालक व मासवे संघटनेचेअध्यक्ष डॉ.दीपक वलोकर, सी.एस.आर. सेल चे मानद संचालक तथा परिषदेचे निमंत्रक डॉ. महेश ठाकूर, मेंटल हेल्थ फोरम चे कार्याध्यक्ष तथा परिषदेचं समन्वयक प्रा. चेतनदिवाण, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट चे अध्यक्ष रोटरीयन चारू श्रोत्री

रोटरीयन कल्याणी गोखले व पुणे पोलीस सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सोशल मीडिया, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा व युवकांचे मानसिक आरोग्य या विषयी पार पडलेल्या या परिषदेस महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयांतून अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

या परिषदेमध्ये दै सकाळ चे वृत्त संपादक माधव गौखले, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सदस्य डॉ दिपक शिक्ररापुर, टेक केअर गुडनाईट सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश जोशी, लेखक अतुल कहाते, पुणे सायबर क्राईम विभागातील पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव, जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. सुप्रकाश चौधरी, डॉ वासुदेव परळीकर, पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डिन डॉ अरविंद शालीग्राम, डॉ शैलेश पालेकर, कल्याणी गोखले, चारू श्रोत्री, डॉ. महेश ठाकूर आदी तज्ञांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदच्या यशस्वीतेसाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभाग व एम. एस. डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPSC विद्यार्थ्यांना धक्का! ८३३ आरटीओंची निवड उच्च न्यायालयाकडून रद्द !

RTO
RTO

मुंबई | मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा गलथानपणामुळे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अवजड माल वाहन आणि अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त, तसेच विशिष्ट वर्कशॉपमधील एक वर्षाच्या कामाच्या अनुभवाची अट शिथिल करून त्याजागी हलके मोटार वाहन व गिअर असलेली मोटारसायकल चालविण्याचा परवाना आणि वर्कशॉपमधील कामाचा अनुभव नंतर घेण्याची मुभा, असे नवीन निकष नमूद केले होते. त्याअनुषंगानेच विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आयोगाने शिफारसपत्रेही पाठवली होती.

१४ जून २०१८ रोजी पात्र उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र १२ जून २०१८ रोजी उच्च न्यायालयाने निवड झालेल्या उमेदवारांची निवड, जुन्या अटींची पूर्तता करत नसल्याच्या कारणास्तव रद्दबातल ठरवली आहे. राज्याच्या परिवहन विभागामध्ये एकूण ५,१०० पदांमधून २,२५६ पदे रिक्त आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर ८६७ पदांपैकी ३७३ पदे रिक्त आहेत, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर १३०२ पदांपैकी १००८ पदे रिक्त आहेत. त्यात निवड झालेली ही पदेही रद्द झाल्याने विभागात असलेला कामाचा ताण कसा कमी करायचा, असा प्रश्न विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या ४६ व्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती

रंजन गोगोई
रंजन गोगोई

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या ४६ व्या सरन्यायाधीशपदी रंजन गोगोई याची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते.

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर २०१९ पर्यंत असून त्यांना एकूण १३ महिने त्यांना कार्यभार सांभाळावा लागेल.

मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती.महत्वाचे म्हणजे त्यात न्या जे. चेलमेश्वर, न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ यांच्यासह न्या. रंजन गोगोई यांचा समावेश होता.

गोगोई २३ एप्रिल २०१२ पासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. गुवाहाटी उच्च न्यायालयात न्या. रंजन गोगोई यांनी अनेक वर्ष कारभार सांभाळा आहे .

अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी दाम्पत्यास यंदाचा मेरी पाटील स्मृती पुरस्कार जाहीर

Lalsu Nogoti
Lalsu Nogoti

मुंबई | गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांमधील आदिवासींचे अधिकार आणि शिक्षण याविषयी आनोखी कामगिरी करणारे अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी यांना मेरी पाटील स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा चौथा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयातील घैसास सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार डॉ. राजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे यावेळी व्याख्यानही होणार असून यास उपस्थित राहाण्याचे आवाहन शब्द पब्लिकेशन आणि मुक्त शब्द मासिकाच्या वतीने करण्यात आले आहे.

अत्यंत दुर्धर आजाराशी लढत असतानाही सामाजिक कार्यकर्त्या मेरी पाटील यांनी बोरिवली नँशनल पार्क परिसरातील आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीदिनी आदिवासी समाजासाठी शैक्षणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव केला जातो. आतापर्यंत मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील आधारशीला संस्थेचे अमित आणि जयश्री (२०१५), दंतेवाडा, छत्तीसगड येथील सोनी सोरी (२०१६) आणि कीम, सुरत येथील उत्तमभाई परमार (२०१६) यांना या पुरस्काराने सन्मिनित करण्यात आले आहे. या निमित्ताने मेरी पाटील स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. आतापर्यंत व्ही. गीता (२०१५), बेझवाडा विल्सन (२०१६), डॉ. आनंद तेलतुंबडे (२०१७) यांची या प्रसंगी व्याख्याने झाली आहेत.
यंदा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या अत्यंत मागासलेल्या आणि आव्हानात्मक तालुक्यात काम करणाऱ्या अँड. लालसू नोगोटी आणि उज्ज्वला बोगामी या दाम्पत्याची मेरी पाटील स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अँड सुरेखा दळवी, राहूल कोसम्बी आणि डॉ.हरिश्चंद्र थोरात यांच्या समितीने ही निवड केली आहे.
माडिया या अतिमागास आदिवासी जमातीतील पहिले वकील, ग्रामसभांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले पहिले लोकप्रतिनिधी आणि ग्रामसभा सक्षम करण्यासाठी झटणारे अँड लालसू नोगोटी आणि नक्षलींनी वडिलांची हत्या केल्यानंतरही खचून न जाता, आदिवासींच्या शिक्षणाचे काम सुरू ठेवणाऱ्या, माडिया भाषेत पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करणाऱ्या उज्ज्वला बोगामी या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आदिवासींसाठी कार्यरत दाम्पत्याच्या या अनोख्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. ग्रामसभांचे सक्षमीकरण, आदिवासी स्वशासन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन आणि सक्षमीकरण या विषयांवर नोगोटी आणि बोगामी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. त्यासाठी या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.