Friday, December 12, 2025
Home Blog Page 6697

तुमच्या यशामध्ये कोणीतरी आडवं येतंय ? मग या गोष्टी लक्षात ठेवा..तुमची प्रगती कुणी अडवू शकत नाही

Success Mantra
Success Mantra

सक्सेस मंत्रा | जीवनात यश मिळविण्यासाठी नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. परिश्रमी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा अशी परिस्थिती येते. त्यावेळी असं वाटतं की आता पुढे जाण्याचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत, अशाने ते अस्वस्थ होतात. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, मात्र ही वेळ हार मानण्याची नाही तर स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची आहे की मी यशस्वी होण्यासाठीच बनलो आहे. चला तर मग जाणून घेवूयात काही सर्वोत्तम टिप्स ज्यामुळे तुम्ही तूमचं लक्ष्य प्राप्त करू शकाल.

१. उद्देश निर्धारित करा-

जीवनात लक्ष्य निर्धारित करणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा चांगल्या पद्धतीने आपण आपला उद्देश जाणून घेतला तर लक्ष्य प्राप्त करणं सोपं जातं. एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की उद्देश फार छोटा किंवा फार मोठा देखील असून नये जो मिळवणं जवळजवळ अशक्य असेल. त्यामुळे उद्देश विचार करूनच निर्धारित केला पाहिजे.

२. उपलब्ध संसाधनांचा योग्यप्रकारे वापर करणे –

आयुष्य आपल्याला दररोज खूप संधी देत असतं. आपल्याला फक्त त्यांना ओळखून त्यांचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. उद्देश प्राप्त करण्यासाठी आपल्या आसपासच्या संसाधनांचा योग्य वापर करता आला पाहिजे, संसाधनं वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसे वेळ, मेहनत, धन- संपत्ती यांसारखे..

३. नवे विचार आणि योजनांचा स्वीकार करताना घाबरू नये –

नवे विचारच आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देत असतात. नवे विचार आणि योजना ही आपल्या यशाची सुरुवात आहे. काही शतकांपूर्वी आपण ज्या पद्धतींचा वापर करायचो त्यातल्या पद्धती आता अस्तित्वातच नाहीयेत. आज आपण अश्या काळात जगत आहोत जिथे दिवसागणिक प्रत्येक गोष्ट वेगाने बदलताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या काळात नवीन गोष्टी शिकताना मागे हटता काम नये.

४. वेळ आल्यावर सगळ्या जखमा भरल्या जातात-
प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या परिस्थितीतून जावं लागतं. जीवनात कितीही वाईट दिवस असोत वेळ आल्यावर सगळ्या जखमा भरल्या जातात आणि आपण या अशा परिस्थितीशी दोन हात करायला शिकतो.

५. धैर्य ठेवा-
जेव्हा केव्हा अपयशाचा सामना करावा लागेल तेव्हा आपण डगमगून जावू नये. धैर्याने या परिस्थितीचा सामना करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगाच कुणी म्हंटलेलं नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरुन वाद, आठवलेंनी MMRDA अधिका-यांना धरले धारेवर

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारक पुतळ्याच्या उंचीवरुन वादात सापडण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ३५० फुटांवरुन थेट २५१ फुट केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली. यावरुन आठवले संतप्त झाले. शुक्रवारी स्मारकाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती, त्यामध्ये हा खुलासा झाला आहे.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असावा अशी मागणी होती. मात्र एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी परस्पर पुतळ्याची उंची कमी करण्याचा घाट घातला. यावरुन आंबेडकरवादी आणि दलित संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक भव्यदिव्य असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आपल्या भाषणातून सांगितले होते. मात्र अचानक पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय अधिकारी कसे काय घेतात? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

स्मारकाच्या आढावा बैठकीत हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आता सरकार या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहिद भगतसिंग आजच्या संदर्भात

bhagat Singh Quates
bhagat Singh Quates

भगतसिंग जयंतिविशेष | मोनाली अवसरमल

Centre for the study of development societies (CSDS) च्या २०१७ च्या सर्वेक्षणा नुसार भारतीय तरुणांची वैचारीक दृष्टी पुरोगामी व प्रतिगामी अशा दोन्ही विचारधारेचं समिश्रण आहे, असं पहाण्यात आलं आहे. मागे शशी थरुर ही एकदा म्हणाले होते की, ‘भारतीय तरुण हा कट्टर प्रतिगामी किंवा सनातनी नाही. तो फक्त Confused आहे.

ह्या अशा समिश्र, confused अवस्थेसाठी भगतसिह चे एक वाक्य आठवतं, “आपल्या पारंपारिक वारशाचे दोन भाग असतात, एक सांस्कृतिक आणि दुसरा मिथीहासिक. निरपेक्ष देशसेवा, बलिदान, आपल्या निष्ठांवर अढळ राहणे, अशा आपल्या सांस्कृतिक गुणांना पुर्ण प्रामाणिक पणे आत्मसात करुण पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे. पण जुन्या काळातील समजेनुसार बनलेले जे मिथिहासिक विचार आहेत ते जसेच्या तसे स्विकाराण्याला मी अजिबात तयार नाही. कारण विज्ञानाने ज्ञानामधे प्रचंड भर टाकली आहे आणि वैज्ञानिक दृष्टी आत्मसात करुनच भविष्यातील समस्या सोडवता येतील.”

इतर महत्वाचे –

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

भगतसिंगांनी फाशीवर जाण्यापूर्वी ही गोष्ट केली

भगत सिंह चे विचार आज कधी नसेल इतक्या तीव्रतेने तरुणां पुढे जाणे म्हणुन महत्वाचे आहे. जिथे वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमांद्वारा आम्हा तरुणांना influence किंवा brain wash केलं जात आहे, तिथे भगत सिंह म्हणतो, “टिकात्मक दृष्टी आणि स्वतंत्र विचार करणे हे दोन असे अत्यावश्यक गुण आहे” (मी नास्तिक का आहे, १९३०)

“युवावस्था मानवी जीवनाचा वसंत काळ आहे”, असं भगत सिंह ‘युवक’ नामक त्याच्या एका लेखात म्हणत असताना आम्हा तरुणांना आठवण करुण देतो की तरुणां मधे किती ताकद आहे, उर्जा आहे. जेव्हा तो आम्हाला “महासागराच्या उन्मत, उत्तुंग लाटेची उपमा देतो तेव्हा मनात एक वेगळीच स्फुर्ती निर्मान होते.

इतर महत्वाचे –

क्रांतिसिंह नाना पाटील जयंती विशेष

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

ह्या अशा शहीद भगत सिंहा विषयी आणखी काय लिहिणार. जन्म होऊन १११ वर्ष लोटली असताना सुद्धा त्याचा एक एक शब्द जणू काही आमच्यासाठी, ह्या परिस्थितीसाठीच लिहीला आहे की काय असं वाटतं. २३ वर्षांचं जेमतेम आयुष्य त्यात फक्त साडे आठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असलेलं त्याचं वाचन, लिखाण व वैचारिक प्रगल्भता हे विस्मयकारक तर आहेच पण प्रेरणादायी ही आहे.

साहित्य, तत्वज्ञान व भाषा या सर्व विषयांचा त्याचा अभ्यास होता. मार्क्स, एंगल्स, प्लेटो, रुसो, ट्राॅटस्की अशा अनेक विचारांचा त्याने अभ्यास केला. याची प्रचिती भगत सिंहा ने लिहीलेल्या प्रत्तेक लेखातून वा पुस्तकातून होते. आणि हळूच मग कानाशी एक हाक येते, “अभ्यास कर..चर्चेला तोंड देणे शक्य व्हावे म्हणुन अभ्यास कर. तुझ्या निष्ठेच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून अभ्यास कर.” (मी नास्तिक का आहे, १९३०)

मोनाली अवसरमल

(लेखिका समाजविज्ञान अकादमी, पुणे येथे समन्वयक आहेत)

 

भगतसिंगांनी फाशीवर जाण्यापूर्वी ही गोष्ट केली

भगत सिंह जयंतिविशेष | भगत सिंहांचे वकील प्राण मेहता २३ मार्च रोजी भगतसिंहांना भेटायला गेले होते. फाशीचा दिवस असूनही भगत सिंहांच्या चेहऱ्यावर कसल्याही चिंतेचा किंवा भीतीचा भाव दिसत नव्हता. त्यांनी उत्कट हास्यानं मेहता यांचं स्वागत केलं आणि त्यांनी मागवलेलं लेनिन (Vladimir Lenin) यांचं “स्टेट अँड रिव्होल्यूशन (State and Revolution)” हे पुस्तक आणलं काय असा प्रश्न केला.

मेहता यांनी जसं त्यांना पुस्तक दिलं तसे ते पुस्तक वाचायला बसले. त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही आणि त्यांना ते पुस्तक वाचून संपवायचं होतं. वाचनावरची अशी पराकोटीची निष्ठा जगभर शोधून सापडायची नाही. मेहता निघून गेले आणि भगत सिंह यांना सांगण्यात आलं तुमची फाशी अलीकडे घेतली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला फाशी देण्यात येईल. तोवर त्यांची थोडीथोडकीच पानं वाचून झालेली.

या प्रसंगाबद्दल भगत सिंहांचे निकटचे सहकारी श्री मन्मथनाथ गुप्त यांनी लिहून ठेवलं आहे,

जेव्हा फाशीचा तख्त तयार आहे हे सांगायला एक अधिकारी भगत सिंह यांच्याकडे आला तेंव्हा भगतसिंह लेनिन यांनी लिहिलेलं किंवा लेनिन यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचत होते, भगत सिंह यांनी त्यांचं वाचन चालू ठेवलं आणि दृढतम् आवाजात म्हणाले,

“काही काळ प्रतीक्षा करा. एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकारकाची (पुस्तकातून) गळाभेट घेत आहे.”

त्यांच्या त्या आवाजात काहीतरी विशेष होतं, तो मृत्यूचा संदेश घेऊन आलेला अधिकारीही काही काळ संमोहित झाला. भगतसिंह वाचत राहिले. काही क्षणांनंतर त्यांनी ते पुस्तक छताच्या दिशेने भिरकावून दिलं आणि धीरगंभीर आवाजात गरजले,

“चला जाऊया.”

भगतसिंग – वाचनावर प्रेम करणारा अवलिया

Bhagat singh book Love
Bhagat singh book Love

भगतसिंग जयंतिविशेष | वाचन प्रेम काही वेगळंच होतं. समाजवादाविषयी त्यांच्या मनात हळवा कोपरा असूनही त्यांनी कादंबर्या वाचण्याची, खासकरून राजकीय आणि आर्थिक विषयांबद्दल उत्कट इच्छा मनी धरलेली. डिकन्स (Dickens), अप्टन सिन्क्लेअर (Upton Sinclair), हॉल केन (Hall Caine), व्हिक्टर ह्यूगो (Victor Hugo), गॉर्की (Gorky), स्टेपॅनिक (Stepnik), ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) आणि लिओनार्ड अँड्रयू (Leonard Andrew) हे त्यांचे काही आवडते लेखक. कादंबर्यांतल्या काही विशिष्ट पात्रांसमवेत भगतसिंग भावनात्मक-रित्या जोडले जायचे. काही काही वेळा त्या पात्रांसमवेत ते अक्षरशः रडायचे तर कधी मनमोकळे हसायचे.

क्रांती अभ्यासताना त्यांनी विनाकारण येणारं अकाली प्रौढत्व नाकारलं होतं. जगाला कलाटणी देणारी पुस्तकं वाचताना त्यांनी कथा – कादंबऱ्या आणि शेर-शायरीही मनसोक्त वाचली. त्याचा मनमुराद आनंद घेतला. गालिब यांची एक शायरी त्यांना प्रचंड आवडायची त्यांनी ती एका कागदावर उतरवून काढलेली.

यह न थी हमारी किस्मत जो विसाले यार होता,
अगर और जीते रहते यही इन्तेज़ार होता ।

तेरे वादे पर जिऐं हम तो यह जान छूट जाना,
कि खुशी से मर न जाते अगर ऐतबार होता ।

भगतसिंह शब्दशः पुस्तके खाऊन टाकायचे. ते पुस्तके वाचायचे, त्यातून नोट्स तयार करायचे, वाचलेल्या पुस्तकांबद्दल मित्रांसोबत चर्चा करायचे आणि ज्ञानाच्या नव्या प्रकाशात स्वतःच्या मान्यतेची-आकलनाची कठोर समीक्षा करायचे. सर्वंकष मंथनातून ज्या चुका सापडल्या त्या दुरुस्त करून घ्यायचे.

भगत सिंह कायम स्वतःसोबत एक छोटंसं फिरतं ग्रंथालय बाळगायचे. भगतसिंह यांनी आग्रा इथं सुमारे ७० लेखकांच्या सुमारे १७५ पुस्तकांचं एक ग्रंथालय स्थापन केलेलं. हे तेच ठिकाण जिथं असेम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचं प्लॅन निश्चित करण्यात आला होता. क्रांतीची ठिणगी जी पडली तीही पुस्तकांच्या सानिध्यात असतानाच.

भगत सिंह स्वतः जे वाचत त्याबद्दल सर्वांशी चर्चा करत, त्यांनी जे वाचलं ते इतरांनीही वाचवं अशी त्यांची इच्छा असे. याच इच्छेमुळं त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॅन ब्रिन यांची आत्मकथा “आयरिश स्वातंत्र्यासाठी माझा लढा” या पुस्तकाचा अनुवाद केला. इतरांनीही वाचावं यासाठी एवढं कष्ट वाचनावर नितांत प्रेम करणारा अवलियाच करू जाणो.

शहीद भगत सिंह बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

भगतसिंग
भगतसिंग

शहिद भगतसिंह आजही तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. लाखो युवक भगतसिंहांना आपले आदर्श मानतात. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान मोठे आहे. अवघ्या तेविसाव्या वर्षी देशासाठी शहिद झालेल्या भगतसिंहांची आज जयंती. त्यानिमित्ताने तुम्हाला माहिती नसलेल्या भगतसिंहांबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घ्या…

लहानपणीच हवी होती बंदूक

भगतसिंगांना लहान असतानाच देशभक्तीची ओढ होती. घरी क्रांतिकारी वातावरण असल्यामुळे भगतसिंहानाही क्रांतीची ओढ होती. भगतसिंहांविषयी एक गोष्ट अशी बोलली जाते की, ते लहान असतानाच त्यांना बंदूक हवी होती जेणेकरून त्यांना ब्रिटिशांशी लढता येईल.

जलियनवाला बाग हत्याकांडानंतर

ज्या वेळी जलीयनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी भगतसिंह केवळ १२ वर्षांचे होते. शाळेतून पळून जाऊन भगतसिंह जलियनवाला बाग येथे गेले होते. तिथे त्यांनी भारतीयांच्या रक्ताने ओली झालेली माती एका बाटलीमध्ये भरून घेतली. असे म्हटले जाते की ते त्या रक्ताने माखलेल्या मातीची रोज पूजा करत असत. यावरून आपण भगतसिंह यांची देशाप्रती व देशबांधावाप्रती असलेली तळमळ लक्षात येते.

इतर महत्वाचे –

नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero

क्रांतिसिंह नाना पाटील जयंती विशेष

एक उकृष्ट अभिनेता

भगतसिंह एक उकृष्ट अभिनेता होते. महाविद्यालयात असताना भगतसिंहांनी एक अभिनेता म्हणून अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यापैकी एक-दोन नाटकात त्यांनी ‘सम्राट चंद्रगुप्त’ आणि ‘राणा प्रताप’ यांच्या भूमिका केल्या होत्या.

सेंट्रल असेंम्बलीवर बॉम्ब

बहिऱ्यांना आवाज जाण्याकरिता धमाका आवश्यक आहे असे भगतसिंहांचे मत होते. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा आवाज ब्रिटन पर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने भगतसिंह व त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती सभेत बॉम्ब फेकला. बॉम्ब हा कमी दर्जाच्या स्फोटक द्रव्यांनी बनवला गेला होता कारण त्यांना कोणालाही जखमी करायचं नव्हतं.

घोषवाक्य

भारतात अनेकांना हे माहिती नाही कि ‘इन्कलाब जिंदाबाद’ नारा हा भगतसिंहांची देन आहे. आधुनिक राजकीय पक्षांनी याचा गैरवापर केला, परंतु हा एक शक्तिशाली नारा होता जो भगतसिंह यांनी ब्रिटीशांविरूद्ध सशस्त्र लढ्याद्वारे तयार केला होता.

इतर महत्वाचे –

नेताजींच्या आझादहिंद फौजेची कहाणी

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

समाजवाद

कुमारवयातच भगतसिंह समाजवादाच्या विचाराने प्रेरित झाले होते. लेनिनच्या नेतृत्वाखाली असलेल्या रशियन बोल्शेव्हीक समाजवादी क्रांतीमुळे त्यांचा उत्साह वाढला होता.

गुलाम असलेल्या भारतात लग्न करणार नाही

जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न लावुन देण्याचा प्रयत्न केला तेव्हा म्हणाले की जर या गुलाम असलेल्या भारतात लग्न करणार नाही. आणि ते घर सोडून कानपुर कडे रवाना झाले. तिथे ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले. त्यानंतर भगतसिंह यांच्याच आग्रहाने संघटनेच्या नावात ‘सोशलिस्ट’ हा शब्द समाविष्ट करण्यात आला.

ते एक नास्तिक होते

भगतसिंग हे एक चांगले वाचक होते. एक महान विचारवंत होते. त्यांनी मार्क्स, एंगल्स, लेनिन आणि ट्रॉट्स्की यांच्या विचाराचे वाचन केले होते व प्रेरणा घेतली होती. या विचारांनी प्रेरित झाल्यानंतर भगतसिंह विचारपूर्वक एक नास्तिक बनले आणि त्यांनी आपल्या धार्मिक श्रद्धेचा त्याग केला. “मी नास्तिक का आहे?” हा त्यांचा दीर्घलेख सर्वत्र प्रसिद्ध आहे.

क्रांतिकारी लेखक

क्रांतिकारक म्हणून भगतसिंह ब्रिटिशांसाठी एक भयानक स्वप्न बनले होते. भगतसिंह हे एक महान लेखक होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी लिखाण केले होते.

सत्य कथन करणारी डायरी

भगतसिंह हे उत्तम लेखक असल्यामुळे त्यांना दैनंदिनी लिहायची सवय होती. भगतसिंह लाहोरच्या तुरुंगात कैदेत असताना त्यांच्याकडे एक डायरी होती. स्वातंत्र्य आणि क्रांतीबद्दलचे त्यांचे मनोवेधक विचार असलेली ही डायरी वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहे.

इतर महत्वाचे –

Birsa Munda | बिरसा मुंडा

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे कणखर नेतृत्व : लोकमान्य टिळक

अंतिम निरोप

२४ मार्च १९३१ हा त्यांचा फाशीचा दिवस ठरविण्यात आला होता परंतु लोक जमतील ह्या भीतीने २३ मार्च रोजी त्यांना सायंकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली. सतलज नदीच्या काठावर गुप्तपणे तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले. परंतु, हे लपून राहिले नाही. ही बातमी ऐकून हजारो लोक एकत्र झाले आणि त्यांनी नदीकाठावरची शहीदांची राख गोळा करून मिरवणूक काढली.

फासावर जातानाही चेहर्यावर स्मित हास्य

फासावर जात असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते, आणि शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधात घोषणा दिल्या. अनेकांच्या मनामध्ये आजही भगतसिंहांचा वारसा कायम आहे.

अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे, तो कोर्टात सुटणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut

नंदुरबार | शिवसेना प्रवक्‍ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्‍येच्‍या मुद्द्यावरून वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. ‘अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे. तो कोर्टात सुटणार नाही.’ असे राऊत यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत म्‍हटले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी ते नंदूरबारला आले होते.

तसेच ‘अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. मोदी सरकारने राम मंदिरासंदर्भात अध्‍यादेश काढून मंदिराचे काम सूरू करावे’ असे म्हणुन ‘२५ वर्षांपुर्वी आम्ही बाबरी मस्जिदचा ढाचा तोडायला गेलो, तेव्हा सुप्रीम कोर्टाला विचारुन गेलो नाही, बाळासाहेबांच्या आदेशाने गेलो’ असेही राऊत यावेळी म्हणाले.

सुप्रीम कोर्टात सुनावणीद्वारे हा प्रश्‍न सुटणार नाही’, न्यायालय अलीकडे अनेक गोष्टींवर मत मांडते. त्यामुळे भाजप ने त्यापासून दुर रहायला पाहीजे, असे मत राऊत यांनी यावेळी मांडले.

शिवसेनेची २०१९ लोकसभा स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरु

unnamed file
unnamed file

नंदुरबार | शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सध्या खानदेश दौर्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी राऊत यांनी या दौर्याचे आयोजन केले आहे. यावेळी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत बोलताना सेना-भाजपा युतीवरही भाष्य केले. आगामी लोकसभा राज्यसभा निवडणुकांमधे शिवसेनेची स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी सुरू असल्‍याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

‘भाजपाने २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती तोडली. तेव्हा दानवेंना निवडणुकासोबत लढवण्याचा सु-विचार का सुचला नाही. आता २०१४ पासून पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले आहे. म्‍हणून आमच्या पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे’.असे राऊत यांनी यावेळी सांगीतले.

तसेच येत्या काळात नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत दिसेल, असा विश्‍वासही राऊत यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.

ए भगत सिंह तू जिन्दा है

unnamed
unnamed

कविता | शीतल साठे

ए भगत सिंह तू जिन्दा है, हर एक लहू के कतरे में

हर एक लहू के कतरे में, हर इंकलाब के नारों में

तू ने तो तब ही बोला था, ये आजादी नहीं धोखा है

ये पूरी मुक्ति नहीं है यारों ये गोरों के संग सौदा है

इस झूठे जस्न के रौनक में, फ़से हुए किसानों में, रोये हुए जवानो में

ए भगत सिंह तू जिन्दा है, हर एक लहू के कतरे में

इतिहास में हम भूखे थे और आज भी ठोकर खाते है

जीस खादी पर रखा भरोसा आज भी धोखा देते है

कोई राम नाम बलिहार पुकारे कोई आज भी जाने लेते है

अब याद है भक्ता तेरी आती आग लगी है सीने में

अंधेरो का ये तख़्त हमें अब ताकत से ठुकराना है

हर साँस जहाँ लेगी उड़ान उस लाल सुबह को लाना है

शहीदो के राहों पर मर मिटने कि क्रांति कारी उम्मीदो में

ए भगत सिंह तू जिन्दा है , हर एक लहू के कतरे में

इंकलाब के नारों में, इंकलाब के नारों में , इंकलाब के नारों में

अमेरिकेतील ऑस्टिन आणि पुणे शहरांमध्ये मैत्री करार

महापौर मुक्ता टिळक
महापौर मुक्ता टिळक

पुणे | अमित येवले

शाश्वत विकासाच्या उद्देशाने अमेरिकेतील ऑस्टिन आणि पुणे शहरांमध्ये मैत्री करार झाला. दोन्ही शहरांच्या शाश्वत विकासासाठी विविध विषयांवर चर्चा, मुद्दे, समस्या आणि त्यावरील मार्ग यावर माहितीचे आदान-प्रदान होणार आहे. यावेळी ऑस्टिनच्या महापौर स्टीव्ह एल्डर व त्यांचा अधिकारी वर्ग उपस्थित होता.

ऑस्टिन शहर हे अमेरिकेतील सांस्कृतिक, आर्थिक आणि उद्योगांसाठी महत्वाचं शहर आहे. त्यामुळे या मैत्री कराराचा मोठा फायदा पुण्याला होणार आहे.