Friday, December 12, 2025
Home Blog Page 6698

तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी – आमीर खान

Amir Khan on Nana Patekar and Tanushree Datta conflict
Amir Khan on Nana Patekar and Tanushree Datta conflict

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान ‘मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती’ असेही तनुश्रीने म्हटले आहे. तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी असं मत अभिनेता अमिर खान याने मांडले आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अमिर बोलत होता.

इतर महत्वाचे –

साइना नेहवाल करणार या खेळाडू सोबत लग्न

ट्रायल रुममधे विदेशी तरुणीसोबत अश्लील चाळे

तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरु आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते. तसेच नाना पाटेकरांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तनुश्री ने केला आहे. ‘पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती’ असे गंभीर आरोप तनुश्री दत्ता ने एका मुलाखतीत केले होते.

इतर महत्वाचे –

झांशी की राणी फेम उल्का गुप्ता सध्या काय करते?

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

या प्रकाराबाबत ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या ट्रेलर लाँच प्रसंगी माध्यमांनी अमीरला प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला पूर्ण माहिती नसेल, तर त्यावर बोलणं कठीण आहे. जर असं झालं असेल, तर ते चुकीचं आहे. मी यावर अधिक बोलू शकत नाही. या गोष्टीची चौकशी व्हायला हवी”. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी या प्रकरणावर न बोलणेच पसंद केले

पूजेचा मान हिंदूंकडे असणार्या मुसलमान साधूची कबर | मलंगगड किल्ला

Malangad fort
Malangad fort

गडकिल्ले | ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे १५ कि.मी. अंतरावर मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, व खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या व रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथे तटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बसचा उपयोग होतो.

कसे पोहचाल ?

रेल्वेने – जवळचे रेल्वे स्टेशन – कल्याण ( सेंट्रल रेल्वे )

बसने – मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात.

पुण्यात कालवा फुटला, दांडेकर पूल पाण्याखाली

पुणे | पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुळा कालवा गुरूवारी दुपारी फुटला असून यामुळे दांडेकर पुलावर पाणी आले आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे.

जनता वसाहतीजवळ मुळा कालव्याची भिंत कोसळली. यामुळे कालव्यातील पाणी परिसरात शिरले आणि अवघ्या काही वेळात परिसर जलमय झाला. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दांडेकर पुलावर पाणी आले असून यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. कालव्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू झाले आहे.

खडकवासला धरणातून कालव्यात होणारा विसर्ग थांबवण्यात आला असून नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून कालव्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे. दांडेकर पुलाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि जलसंपदा विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

वास्तूरचनेतील अवकाशात मानवाशिवाय अन्य जीवसृष्टीचाही विचार केला जावा – मरिना तबस्सूम

Marina Tabassum
Marina Tabassum

पुणे | भौतिक जगातील अवकाश हा वास्तूरचनाकाराला काही सुचवत असतो. या अवकाशात वास्तूरूपात बांधून काढलेला अवकाश व रिकामा अवकाश यांचे एकमेकांशी असणारे नाते समजावून घेत त्याचा उत्सवच साजरा करायचा असतो. शेवटी हे जग माणसाबरोबर पशू-पक्षी, कीटक, व वनस्पतींसाठी आहे याचे भान ठेवायला हवे, असे प्रतिपादन बांगला देशातील प्रसिद्ध महिला आर्किटेक्ट मरिना तबस्सूम यांनी मांडले. निमित्त होते ते महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बीएनसीए) आणि रोहन बिल्डर्स यांच्या सहकार्यातून अद्वैत बडवे स्मृती व्याख्यानाचे व द ड्रॅाईंग बोर्ड स्पर्धेचे.

महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील आर्किटेक्ट अद्वैत बडवे स्मृती व्याख्यानमालेतील १७ वे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी बडवे कुटुंबियांपैकी प्रसिद्ध वास्तूरचनाकार व्ही.व्ही.बडवे,त्यांच्या पत्नी वृंदा बडवे आणि सत्यजीत बडवे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. शुभदा कमलापूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

एखाद्या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना मानसिक पातळीवर आपल्याला मला काय वाटते तसेच तेथे वावरताना आपल्या मनात काय विचार येतील याचे भान आपण त्याचा आराखडा तयार करताना ठेवत असतो, असा अनुभव प्रतिष्ठेचा आगाखान पुरस्कार विजेत्या तबस्सूम यांनी सांगितला. बांगला देशातील ढाका येथील स्वातंत्र्य स्मृतीस्तंभ, मशिद आणि पर्यटकांसाठी निवासाच्या त्यांनी केलेल्या प्रकल्पांचे दाखले त्यांनी दिले.

बांगला देश विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी घेतलेल्या तबस्सूम म्हणाल्या की, बांगला देशातील जीवनशैली व लोकजीवन, निसर्ग यांचा विचार वास्तूरचनेत करावा लागतो. ढाका येथील प्रतिष्ठेच्या स्वातंत्र्य स्मारकाच्या कामात आपण मानवी भावभावनांचा विचार वास्तूरूपात मांडला. त्यानुसार पृष्ठभागावर उत्तुंग व प्रकाशमान स्तंभ तुमच्या आनंद, आकांक्षाचे प्रतिक, तर जमिनीखाली दु:खद पण प्रेरणादायी इतिहास दाखवणार्‍या संग्रहालयाची भावस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात नैसर्गिक प्रकाश व अवकाश यांचा समतोल राहील, हा प्रयत्नही केला. तीच गोष्ट इतर निवासी प्रकल्पांमध्ये केली. आपल्या प्रत्येक प्रकल्पात तिथे वावरणारे मानवी मन त्या अवकाशात जास्तीत जास्त कसे गुंतेल हाच आपण कटाक्ष ठेवला, असे तबस्सूम यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्पर्धेचे परिक्षक व बंगलोर येथील आर्किटेक्ट पी. एन. मेडप्पा आणि आर्किटेक्ट सुमित्रो घोष यांनीही आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. सुरूवातीला डॉ. कमलापूरकर यांनी 25 व्या वर्षात पदार्पण करणार्‍या बीएनसीएच्या वाटचालीची माहिती दिली. त्यांनी रोहन बिल्डर्स व माईंड स्पेस संस्थेचे संजय मोहे यांनी विद्यार्थ्यांमधील संवेदनशीलतेला आवाहन करणार्‍या द ड्रॅाईंग बोर्ड स्पर्धेमागच्या संकल्पनेचे स्वागत केले. व्ही.व्ही.बडवे यांनी सादरीकरण करणार्‍या वक्त्यांचे स्वागत केले. रोहन बिल्डर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक सुहास लुंकड म्हणाले की. प्रत्येक बांधकामाच्या रचनेतून आपण समाज घडवत असतो. त्यामुळे ही महत्वाची जबाबदारी पर्यायाने वास्तूरचनाकारांवर येत असते. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांमधून ही जाणीव भविष्यात अधिक प्रगल्भतेने व्यक्त व्हावी असा आमचा हेतू आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा.प्राजक्ता कुलकर्णी, प्रा.अमृता बर्वे तसेच प्रा.महेश बांगड यांनी केले होते. विप्रा कोठारी यांनी सूत्रसंचालन केले, तर अभिषेक भटेवरा यांनी आभार मानले.

भारत पेट्रोलियममध्ये विविध पदांची भरती

Bharat Petrolium Job Vaccancy
Bharat Petrolium Job Vaccancy

करिअरनामा | भारत पेट्रोलिअममधे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. मेकेनिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी नोकरीची सुवर्णसंधी असून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. खालील पदांसाठी ही भरती होणार आहे.

इतर महत्वाचे –

तर मग UPSC /MPSC करू नका ???

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

क्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा आणि ५ वर्षाचा अनुभव

क्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) – २ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा आणि ५ वर्षाचा अनुभव

क्राफ्ट्समन (इंस्ट्रुमेंट) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी आणि ५ वर्षाचा अनुभव

प्रोसेस टेक्निशिअन – ५ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह केमिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

इतर महत्वाचे –

महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण | #भाग ६

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – २९ सप्टेंबर २०१८

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०१८

अधिक माहितीसाठीhttps://bit.ly/2IfUO6O

ताज्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
https://t.me/hellomaharashtra

रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे आयोजित वार्षिक आंतर संस्था वादविवाद स्पर्धेत कॉलेज ऑफ मिलटिरी इंजिनिअरींग आणि आर्मी पब्लिक स्कुल,खडकीला विजेतेपद

Rotery Club Pune
Rotery Club Pune

पुणे | रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंट यांच्या तर्फे ’द लास्ट वर्ड’ या वार्षिक आंतर संस्था वादविवाद स्पर्धेचे आयोजन नुकतेच सुमंत मुळगावकर सभागृह, आयसीसी टॉवर सेनापती बापट रोड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या कॅडेट ट्रेनिंंग विंगने आणि आर्मी पब्लिक स्कुल, खडकी ने आपआपल्या गटांत विजेतेपद पटकावले.

हा उपक्रम १९८९ मध्ये सुरू झाला असून यंदा ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगच्या कॅडेट ट्रेनिंंग विंगचे प्रतिनिधित्व जोरावर सिंग याने केले, तर आर्मी पब्लिक स्कुलचे प्रतिनिधित्व अनुष्का पन्नु हिने केले. सिम्बायोसिस इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या चिराग सिन्हा आणि द बिशप्स ज्युनिअर कॉलेज, कॅम्पच्या ध्वनी श्रोत्रीय यांनी उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा शाळा व महाविद्यालय या दोन प्रकारांत पार पडली. या स्पर्धेकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅझ्युमिंग कंट्रोल इन फ्युचर इस अ बून व अवर लाईफस्टाईल लिव्हज व्हेरी लिटिल रूम फॉर इंटर्नल अ‍ॅन्ड स्पिरिच्युअल ग्रोथ हे विषय होते.

या कार्यक्रमाला नरेंद्र गोडानी, डॉ.जॉन सॅमसन व कुणाल सरपाल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी अध्यक्ष डॉ.नितीन शाह होते. याप्रसंगी रोटरी क्लब पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष पंकज आपटे,मयांक नायडू व नितेश अगरवाल उपस्थित होते. मोहित अगरवाल हे प्रोजेक्ट चेअरमन तर रोटेरियन हसीब फकीह यांनी सूत्रसंचालनाचे काम पाहिले. याप्रसंगी सुमलता बंटवाल, रोटेरियन प्रभाकर बंटवाल यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचे प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर वेंकटा रमणा दित्तकवी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा एतिहासिक निकाल

Adultery
Adultery

नवी दिल्ली | स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीटाने आज निकाल दिला. व्यभिचार गुन्हा नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिटाने निकालात म्हटले आहे. मात्र व्यभिचार घटस्फोटास कारण होऊ शकतो असेही म्हटले आहे. ‘महिला आणि पुरूष काद्याद्याच्या दृष्टीने समान असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने कलम 497 अवैध ठरवून एेतिहासिक निर्णय दिला आहे.

इतर महत्वाचे –

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

तुमचं हे असं होतंय का? बाॅयफ्रेंडच्या मित्राबद्दल आकर्षण वाटतंय का?

व्यभिचार कायदा हा नेहमीच वादातीत राहिला आहे. या कायद्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना न्याय देण्यात भेदभाव करण्यात येत असल्याची अनेकांमध्ये भावना आहे. व्यभिचारमुळे लग्नात तणाव निर्माण होतो. त्यामुळे या व्यभिचाराच्या आधारावर दाम्पत्याला घटस्फोट मिळू शकतो, पण हा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही’, असं सर्वोच्च न्यायालायनं स्पष्ट केलंय. शिवाय पती हा पत्नीचा मालक नाही, महिलांचा सन्मान आपण राखलाच पाहिजे असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीटाने आज यावर निर्णय दिला. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांचा समावेश होता. ‘व्यभिचार घटस्फोटासाठी कारण ठरु शकतो परंतू त्याला गुन्हा म्हणता येणार नाही’ असे या घंडपिटाने म्हटले आहे.

इतर महत्वाचे –

जाणुन घ्या कोणत्या गोष्टींमुळे तुमची रिलेशनशिप येऊ शकते धोक्यात

 

केरळचे जोसेफ साइन यांनी या संदर्भात याचिका दाखल करत कलम 497 ला आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याचिका दाखल करून घेतली होती आणि जानेवारीमध्ये ती घटनापीठाकडे पाठवण्यात आली होती. त्याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिटाने निर्णय दिला.

काय आहे व्यभिचार कायदा?

दिडशे वर्षं जुन्या कलम 497 कलमांतर्गत विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पतीस काहीसं मोकळे रान मिळतं. एखाद्या विवाहित पुरुषानं इतर विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु त्यासाठी त्या विवाहित महिलेच्या पतीनं त्या परपुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज असते. तसेच पतीच्या इतर कुटुंबीयांनी अशा विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पुरुषाविरोधात कोणतीही तक्रार करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यावरच आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

World Tourism Day

World Tourism Day
World Tourism Day

मुंबई | २७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे.

‘टूरिझम अँड डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच ‘पर्यटन आणि डिजिटल क्रांती’ ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. पर्यटन हा व्यवसाय उद्योजकतेला चालना देणारा असून, या उद्यमशीलतेला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल, यावर या निमित्ताने मंथन होणे अपेक्षित मानले गेले आहे.

या व्यवसायात बिग डाटा, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आदी विकसित करण्याच्या दृष्टीने पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसयिकांनी जागरूक व्हावे, अशी यामागील भूमिका आहे. पर्यटनाचे महत्त्व आणि लोकप्रियता विचारात घेऊन १९८० मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्‍त राष्ट्रसंघाने घेतला.

भाजपच्या काळात नोकरीही नाही अन् छोकरीही नाही – धनंजय मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

औरंगाबाद | ‘मोदींनी दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितले. तुम्हाला वाटले नोकरी नही मिलेगी तो, छोकरी कैसे मिलेगी आणि छोकरी नाही मिळाली तर हम दो हमारे..कैसे होंगे? पण आता तुमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. मोदींनी देशातील ५५ कोटी तरुणांना फसवले आहे.’ असा जोरदार टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

औरंगाबाद येथील मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मोदी-फडणवीस सरकारचा खुमासदार शब्दात समाचार घेतला. मोदी लाटेवर स्वार झालेल्या तरुणांना त्यांनी आपल्या भाषणातून चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले, ‘मोदी बाबाने देशातील सर्व जनतेला फसवले, तरुणही फसले. आज चार वर्षानंतरची परिस्थिती काय तर नोकरीही नाही, छोकरीही नाही आणि हम दो हमारे दो ही नाही. बर आता गाडीत पेट्रोल टाकून आपापलं पहावं, तर ती सोय देखील मोदींनी ठेवली नाही. पेट्रोल शंभरी पार करायच्या तयारीत आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘पण यात तुमचा दोष नाही, सोशल मीडियावरच्या प्रचाराला तुम्ही भुललात. पण आता तुमच्या मनात असलेली आग येणाऱ्या काळात दिसली पाहिजे, सरकारच्या विरोधात तुम्ही पेटलात तरच तुमच्या अंगात तरुणांचं रक्त आहे असं समजल जाईल. कारण युवकांची फळी मजबूत असेल त्या पक्षालाच देशात आणि राज्यात सत्तेवर येता येईल.’

खोटं बोलून, फेकाफेकी करुन देखील आज भाजप सत्तेवर आहे, आणि आम्ही लोकांची काम करुनही सत्तेच्या बाहेर अशी खंत देखील धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुथ याद्यांचा नीट अभ्यास करावा. आपल्याला पडणारे मतदान, न पडणारे मतदान, काठावरचे मतदार अशी वर्गवारी करावी. तसेच नव्या मतदारांची नोंदणी करण्यावर सर्वाधिक भर द्यावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला. पहिल्यांदा जो पक्ष नव्या मतदारांची नोंद करतो ते मतदार कधीच त्या पक्षापासून लांब जात नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणीवर भर द्या असे आवाहन करतांनाच “चलो आज अपना हुनर आजमाते है, तुम तीर आजमाओ हम जिगर आजमाते है’ असा शेर सादर करत मुंडे यांनी तरुणाईची नस पकडली.

Happy Birthday Google |गुगल झाले २० वर्षांचे

googles th birthday . m
googles th birthday . m

Techबाबा | वीस वर्षांपूर्वी स्टेंडफोर्ड विद्यापिठाच्या पी.एच.डी. च्या दोन विद्यार्थ्यांनी एक नवीन सर्च इंजिन लाँच केले. जगभरातील सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन तिला अधिक उपयोगी बनवणे हे त्यामागिल उद्दिष्ट होते. १९९८ साली स्थापन झालेल्या या सर्च इंजिनमधे मधल्या काही वर्षांमधे अफाट बदल झाले आणि आज गुगल २० वर्षांचे झाले आहे. एकुण १५० भाषांमधे आणि १९० हून अधिक देशांमधे गुगल वापरले जाते. गुगलच्या वाढदिवसानिमित्त Happy Birthday Google हा हॅशटॅग सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. गुगलने मागील २० वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे. माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतला असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.

गुगल ने २० व्या वाढदिवसानिमित्त एक खास डुडल लाँच केले आहे. मागील २० वर्षांत जगभारत सर्वात जास्त सर्च झालेले सर्चेस गुगलने त्यात दाखवले आहेत.