Friday, December 12, 2025
Home Blog Page 6701

विघ्नहर्त्यानेच पाठवले देवदूत

Ganesh Festival
Ganesh Festival

पुणे | सुनिल शेवरे

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहराच्या विविध ठिकाणी मोफत आपत्कालीन आरोग्य सेवा व रुग्णवाहिनी सेवेचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी ट्रस्टच्या वतीने कोथरूड गणेश विसर्जन समितीच्या सहकार्याने नळस्टॉप चौक येथे तसेच मॉडर्न विकास मंडळाच्या सहकार्याने विजय टॉकीज चौक येथे या व्यवस्थेबरोबर मिनी हॉस्पिटलचे आयोजन करण्यात आले. तसेच शरीरातील अवयवांचे कट आउट करून अवयवदान मोहीमेची जनजागृती करण्यात आले.

या उपक्रमामध्ये डॉ. राजेंद्र खेडेकर यांसह डॉ. संदीप बुटाला, डॉ. धर्मेंद्र शहा, डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. मनोज मढवी, डॉ. ज्योती निकम, डॉ. तुषार जगताप यांनी काम पाहिले. दिवसभरात डोकेदुखी , ताप, अंगदुखी, चक्कर येणे, घाम सुटणे, घाबरल्यासारखे होणे , ठेच लागणे यांसारखे जवळपास १३० हुन अधिक रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले.

दुपारी ४ च्या सुमारास कु. अस्मिता कुलकर्णी ( २५ वर्ष ) ही गरुड गणपती या ठिकाणी मिरवणुकीचा आनंद घेताना खिडकीची तुटलेली काच अचानक तिच्या डोक्यात पडून तिच्या डोक्याला , चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या रुग्णवाहिनीचे वाहक शत्रुग्न ओजरकर याना घेऊन सदर मुलीला त्वरीत रुग्णवाहिनीतून ३ मिनिटात गर्दीतुन वाट काढत पूना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. रुंगवाहिनीमध्ये रक्तस्त्राव थांबवण्यासाठी केलेले उपचार व वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्याने अस्मिताच्या जीवावर आलेले संकट टळल्याने तिच्या वडिलांनी साक्षात विघ्नहर्त्यानेच देवदूत पाठवल्याची भावना व्यक्त केली.

रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती काढणार फुलेवाडा ते मुंबई मंत्रालय लाँगमार्च

पुणे | कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त छात्रभारती आयोजित शिक्षण-रोजगार हक्क व डी.बी.टी विरोधी परिषद साने गुरुजी स्मारक, पुणे येथे पार पडली. परिषदेची सुरवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमापुजनानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाने करण्यात आली. यावेळी छात्रभारती, राष्ट्र सेवा दल तसेच समातावादी संघटनांतर्फे लवकरच शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर ११ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर ‘फुलेवाडा ते मुंबई मंत्रालय’ असा पायी लाँगमार्च काढण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.

या परिषदेत शिक्षण-रोजगार तसेच डी.बी.टी. योजनेच्या अनुषंघाने जेष्ठ मार्गदशकांबरोबर विद्यार्थी वक्त्यांनी अभ्यासपुर्ण भाषणे केली. मदन पथवे यांनी डी.बी.टी योजनेबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी करुन सरकार दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्या भाषणामधून पटवुन दिले. तर वचिष्ट बढे यांनी बेराजगारीच भयाण विदारक चित्र मांडल. शिक्षणाच खाजगीकरण-बाजारीकरण करुन सरकारी शिक्षण संपवण्याचा सरकारचा डाव आहे. तसेच लाखो पदे ‍रिक्त असतांना देखील ती भरली जात नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न देखील गंभीर होत आहे. अशावेळी सर्व विदयार्थ्यांनी तसेच समविचारी संघटनांनी एकत्र येवुन न्याय हक्कांच्या मागण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. असा सुर ‍शर्मिला येवले, निलेश निंबाळकर यांच्या भाषणामधुन उमटला.

यावेळी विचारपीठावर अल्लाउद्दीन शेख, प्रा.सुभाष वारे,प्रमोद दिवेकर, उपेंद्र टण्णु, विनय सावंत सारंग पुणेकर, मदन पथवे,शर्मिला येवले, निलेश निंबाळकर ,वचिष्ट बढे होते तर कार्यक्रमाची सांगता डॉ.शरद जावडेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकश लाटे यांनी केले तर योगेश वाघ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी संदिप आखाडे, तुकाराम डोईफोडे, समृद्धी जाधव, लिंग्गाम्मा, रशीद मणियार, सुरज दाभाडे, लोकश लाटे, योगेश वाघ यांनी प्रयत्न केले.

उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar
Sharad Pawar

बारामती | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग या त्यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापले असून येत्या लोकसभेचं तिकिट कोणाला भेटणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. यापार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आमदारांची पवार भेट चर्चेचा विषय ठरली आहे. उदयनराजेंचं काय करायचं? असा प्रश्न या आमदारांनी पवारांना विचारला असल्याचं राजकिय वर्तुळात बोललं जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या शनिवारी पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर फसवाफसवी करू नका, नाहीतर आम्हालाही कळतं, असं त्यांनी विधान केलं होतं. तर शरद पवार यांनी उदयनराजे यांचाबाबत बोलण्याचे टाळले होते.

या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्र राजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते.

मंटो, ‘मंटो’ साठी..

Sahadat Hasan Manto
Sahadat Hasan Manto

चित्रपटनगरी | सिनेमाचा विषय निव्वळ मनोरंजनावर आधरित नसावा तर व्यापक अर्थाने सामाजिक वास्तवाचं चित्र समाजापुढे मांडण्याचं काम सिनेमाद्वारे व्हावं ही साधारण अपेक्षा असते. ही अपेक्षा असली तरी असे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणं ही अपवादात्मक बाब आहे.

‘मंटो’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सकाळचे शो रद्द झाले अशी बातमी सर्वत्र पसरली. त्यावर जाणत्या लोकांनी ट्विटरच्या माध्यमातुन ट्वीट करत त्याबद्दल खेद व्यक्त केला. दुपारनंतर लीगल प्रॉब्लममुळे शो रद्द झाले अशी माहिती समोर आली. मग पुन्हा दुसरा शो सुरु आहेत असं कळालं. तोपर्यंत सोशलमीडियावर तूफान चर्चा झाल्या. कोणी म्हणालं की हा सरकारचा डाव आहे. मंटो त्यांना पचणार नाही म्हणून सरकारने असले अडथळे जाणीवपूर्वक निर्माण केले आहेत. तर कोणी म्हणत होतं असले सिनेमा दाखवून काय साध्य होणार? या सगळ्या घडामोडीनंतर सिनेमा प्रदर्शित झाला.

अगदी मोजक्या सिनेमागृहात हा सिनेमा पहिल्या दिवशी लागला. तिकिट काढायला गर्दी असेल असं वाटलं मात्र सिनेमागृहात बोटावर मोजता येतील इतके लोक होते. त्यात ज्यांना थोडाफार मंटो माहित आहे ते आणि ज्यांना मंटो माहीत करून घेण्याची थोडीफार इच्छा आहे ते असे मोजके लोक सिनेमागृहात होते. हे सगळं साहजिक आहे कारण जिथे भारतीय लोकांना भारतीय साहित्यिक माहित नाहीत तिथे पाकिस्तानी साहित्यिक माहित असणं केवळ आदर्शवत स्वप्न ठरावं.

मंटो’ हा खऱ्या अर्थाने व्यक्तिविशेष प्रकारातला चित्रपट आहे. बॉलीवुड विश्वात असा ट्रेंड अगदी अलीकडच्या काळात सुरु झाला. इतिहास जमा झालेली व्यक्ती नव्याने पुढे करुन त्या व्यक्तीला ‘न्याय’ देण्याचा प्रयत्न अशा सिनेमातून केला जातो. दिग्दर्शक नंदिता दास यांनी आपल्या खास शैलीत मंटो या सिनेमातून सआदत हसन मंटोचा जीवनक्रम मांडला आहे.

मंटोचं जीवन वादळात अडकलेल्या बोटीप्रमाणे हेलकावे खात पुढे जाणारं. मंटोचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील एका मुस्लिम कुटुंबात झालेला. अगोदरच्या पिढ्या भारतीय म्हणून जीवन जगलेल्या. फाळणीनंतर मंटोने भारतात राहण्याचा निर्णय घेतलेला पण पुढे हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मंटोला भारतात अस्वस्थ वाटू लागते म्हणून तो पकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतो. एक लेखक, कथाकार, पत्रकार म्हणून त्याची ओळख तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात पसरलेली. पाकिस्तानात स्थायिक झाल्यानंतर देखील त्याच्यावर येणारे आक्षेप कमी होत नाहीत. मंटोचं लेखन अनुभवाधारित असल्याने समाजात घडणारं वास्तव आपल्या लिखाणामधून मांडतो. समाजात असणाऱ्या प्रत्येक घटकात एक अदृश्य कथा असते तीच वास्तविकता असते आपण लेखक म्हणून ते वास्तव समाजापुढे मांडलं पाहिजे असं मंटोचं ठाम मत असल्याने मंटो समाजात वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं दाहक आणि वास्तव चित्र आपल्या लिखाणातुन मांडतो.

पण हे वास्तव तथाकथित सभ्य समाजाला पचनी पडत नाही म्हणून मंटोचं लिखाण हे संस्कृतीला घातक आहे. मंटो अश्लील लिहीतो त्याच्या लिखाणावर बंदी आणायला हवी, असं संस्कृतीरक्षकांचं म्हणणं. त्यामुळे मंटोवर न्यायालयात खटला भरवला जातो. अशा एकूण सहा खटल्यापैकी अगोदरचे तीन खटले भारतात तर नंतरचे तीन खटले पाकिस्तानमध्ये मंटो विरोधात भरवले जातात. ‘ठंडा गोश्त’ नावाची कथा लिहल्यानंतर पाकिस्तानमधील संस्कृतीरक्षकांचं पित्त चांगलंच खवळतं. मंटोच्या आयुष्यातली ही कथा त्याच्या आयुष्याला आगीच्या तोंडात नेऊन टाकते. एकूण सहा खटल्यात विरोधकांच्या हाती तो लागत नाही.

हा सगळा घटनाक्रम सिनेमा पाहत असताना प्रेक्षकांना मंटोत गुंतुन ठेवतो. शेवटी त्याच्या वाट्याला आलेलं दारिद्रय आणि दुःख त्याला दुबळं करणारं ठरतं. त्यात सुद्धा मंटो लेखणीवरचं प्रेम कमी होऊ देत नाही. दिग्दर्शक नंदिता दासने मंटोच्या पात्रासाठी नवाजउद्दीन सिद्दीकी का निवडला? हे सिनेमा बघताना सहज लक्षात येतं. मंटोच्या पात्रात नवाजुद्दीन सिद्दिकीने जीव ओतून मंटो पडद्यावर जिवंत केलाय. सिनेमातला प्रत्येक संवाद भाव खाऊन जातो.

मंटोच्या जीवनाकडे बघत असताना फक्त एक लेखक आहे म्हणून बघणं त्याच्यावर अन्याय करणारं ठरतं. हे तत्कालीन समाजाने केलं .तेच कमी अधिक फरकाने आजही होताना दिसतं. भारताची फाळणी झाल्यानंतर जे काही राजकीय,सामाजिक पेच निर्माण झाले त्याचा प्रभाव लेखक म्हणून मंटोच्या लिखाणावर झालेला दिसतो. त्या वेळची एकूण राजकीय,सामाजिक परिस्थिती पाहता मंटो समाजव्यवस्थेकडे कुठल्या दृष्टिने पाहतो हे दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नंदिता दासने केला आहे. मंटोचं व्यक्तिगत आयुष्य प्रचंड दुःखाने व्यापलेलं असलं तरी मंटो आपल्या मतावर आणि भूमिकावर ठाम (असं ठाम राहणं सध्याच्या साहित्यिकात अपवादाने दिसतं) राहतो. सिनेमाच्या पूर्वार्धात सुख समृद्ध जीवन जगणाऱ्या मंटोचं जीवन कसं दुःखद होतं हे पाहताना प्रेक्षकापर्यंत साहित्यिकाचं दुःख पोहचतं. लेखकाच्या अभिव्यक्तीवर येणारी गदा लेखकाला जिवंतपणे मारते हेच वास्तव सिनेमा बघताना लक्षात येतं. सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसं सिनेमातलं प्रत्येक पात्र प्रेक्षकावर छाप सोडून जातं.

अश्लीलता म्हणजे काय? अमुक अमुक म्हणजे अश्लीलता हे कोण ठरवणार? तो ठरविण्याचा अधिकार कोणाला? असे प्रश्न मंटो तथाकथित सभ्य समाजला विचारतो तेव्हा त्याची उत्तरं त्याला मिळत नाहीत. या अनुत्तरीत प्रश्नामुळे मंटोला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. मंटोचा मृत्यु १९५५ मध्ये झाला.मात्र आजही कित्येक साहित्यिकांना ‘अश्लील’ लेखक म्हणून तुच्छ वागणूक मिळते. लेखकाच्या अभिव्यक्तीवर येणारी गदा आजही कमी अधिक प्रमाणात साहित्यक्षेत्रातल्या लोकांच्या वाट्याला येते. समाजाच्या प्रगतीचा वेग किती आहे हे त्यावरून लक्षात यावं. म्हणून ‘मंटो’ सारखा सिनेमा कालसुसंगत ठरतो.

आजही मंटोचं साहित्य अश्लील समजलं जातं हे वास्तव आहे. कितीतरी मंटो साहित्यक्षेत्राने समाजातल्या मागास मानसिकतेमुळे संस्कृतीरक्षणाच्या ओझ्याखाली जिवंत गाडले आहेत. अशा कित्येक गाडल्या गेलेल्या मंटोला उकरून समाजासमोर आपल्या लेखणीचा आरसा धरता यावा आणि त्यात आपली माणूस म्हणून काय भूमिका असावी याचा शोध घेण्यासाठी हा सिनेमा एकदा बघणं गरजेचं ठरतं.

सिनेमाच्या मर्यादा लक्षात घेता मंटोबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यानी मंटोचं साहित्य यानिमित्ताने नक्की चाळून बघावं. ‘मंटो’ हा चित्रपट त्या अर्थाने सामाजिक वास्तव आजही आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षक वर्गाने चित्रपट बघून ठरवावं. शेवटी मंटोच्या विचारांची प्रगल्भता समजून घेण्यासाठी आणि मंटोची पाळंमुळं जाणून घेण्यासाठी सिनेमात चपखल वापरलेलं मंटोचं वाक्य इथे देऊन थांबतो.

“अगर आपको मेरी कहानियां अश्लील या गंदी लगती हैं, तो जिस समाज में आप रह रहे हैं, वह अश्लील और गंदा है. मेरी कहानिया तो सच दर्शाती हैं.” – सआदत हसन मंटो

Manto

धनंजय सानप
मो.क्र. – +919850901073
ई मेल – [email protected]

मोठी बातमी, नक्षलवाद्यांकडून दोन आमदारांची भर रस्त्यात हत्या

Naxalites killed two MLA in Andra Pradesh
Naxalites killed two MLA in Andra Pradesh

विशाखापट्टनम | नक्षलवाद्यांनी दोन आमदारांची भर रस्त्यात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आध्रप्रदेशातील विशाखापट्टनम जिल्ह्यात घडला आहे. तब्बल ५० माओवाद्यांनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर तेलगू देसम पार्टीचे एक आमदार आणि एक माजी आमदार यांच्यासह अन्य दोघांची हत्या केली आहे. या घटनेने संपुर्ण आंध्रप्रदेश हादरुन गेले असून विशाखापट्टनम परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम जिल्ह्यातील तेलगू देसम पक्षाचे आमदार किडारी सर्वैश्वरराव आणि माजी आमदार सोमु हे दिनांक २३ सप्टेंबर रोजी जनसंपर्क दौ-यावर गेले होते. त्यावेळी ५० सशस्त्र माओवाद्यांनी त्यांचा रस्ता अडवला आणि कार्यकर्त्यासमोरच त्यांना गोळया घालुन ठार केले. यावेळी तब्बल ५० माओवादी उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये बॉक्साईडच्या काही खाणींचे उत्खनन होणार होते. परंतू माओवाद्यांचा त्या खाणप्रकल्पाला विरोध होता. या सगळ्याचा बदला घेण्यासाठीच माओवाद्यांनी भर रस्त्यात आमदारांची हत्या केली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil and Udayanraje Bhosle
Shrinivas Patil and Udayanraje Bhosle

सातारा | सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील महिण्याभरापूर्वी राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपवून आपल्या मायभूमीत परतले आहेत. कराड लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेले पाटील २०१९ ची लोकसभा लढवणार काय या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आलेले अाहे. यापार्श्वभुमीवर पाटील यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत सुचक विधान करत ‘पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा लढवेन’ असे म्हटले आहे.

इतर महत्वाचे –

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

‘सामान्य माणसांचे मत, पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांचे मत विचारात घेवून पक्ष जो आदेश देईल मग तो कोणत्याही प्रकारचा असेल तो मान्य करून त्यानुसार काम करेन’ असे यावेली पाटील यांनी म्हटले आहे. ‘एकेकाळी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता असताना सतरंजाच्या घड्या घालण्यापासून खुर्च्या उचलण्यापर्यंत काम केले आहे. त्यामुळे जे पडेल ते, पक्ष-नेते, सहकारी सांगतील ते काम करण्याची मानसिकता ठेवूनच मी आज सातार्‍यात आलो आहे. जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूकही लढवेन’ असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमासाठी सातार्‍यात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप केला.

Join Our WhatsApp Group

ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई | सतिश शिंदे

राज्यात विविध विकासात्मक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यातच उद्योग विस्तारा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यातील या विकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाची बैठक वर्षा निवासस्थानामध्ये पार पडली, त्यावेळी फडणवीस बोलत होते.

ऑस्ट्रेलिया देशातील गुंतवणुक सल्लागार मंडळाने राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ राज्यात भेटीसाठी आले होते. या बैठकीला ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी हुबर, मुख्य गुंतवणूक अधिकारी डॅमियन ग्रॅहम, गुंतवणूक नियोजन प्रमुख डॅमियन लिलिक्रॅप, इमेर्जिंग मार्केटच्या व्यवस्थापिका श्रीमती कॅरोलिन गोरमन, नॉन कोर मार्केटच्या व्यवस्थापिका श्रीमती एमिली फंग यांच्यासह इतर सदस्य तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव सतीश जोंधळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, परकीय गुंतवणुकदारांची पसंती महाराष्ट्राला आहे. देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही राज्यात होते. निर्यात क्षेत्रातही राज्याचे काम उल्लेखनीय आहे.राज्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याने राज्यात होणारी परकीय गुंतवणूक सुरक्षित आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिताना दिला.

राज्यात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावासह सेवा क्षेत्रातही गुंतवणुकीला भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही गुंतवणूक फायदेशीर आहे. तसेच ऊर्जा व या क्षेत्रामधील पुनर्वापर या क्षेत्रातही गुंतवणूक करण्यास मोठी संधी आहे. राज्याने 2025 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठेवले असून सध्या राज्यातील गुंतवणुकीसाठी योग्य काळ असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

चार वर्षातील प्रमुख उपलब्धींबद्दल ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये खूप मोठी भर पडली आहे. 300 मीटर लांबीची मेट्रो, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बरलिंक, नवीन विमानतळ यासारख्या मुंबईतील कामांमध्ये 20 बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली असून राज्यातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. याशिवाय जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने राज्यातील 25 हजार गावे पाणीदार झाली आहेत. यामुळे राज्यातील दुष्काळी समस्येवर मात करता आली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join WhatsApp Group

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत योजने’चा २३ सप्टेंबरला शुभारंभ

जनआरोग्य योजना
जनआरोग्य योजना

मुंबई | अमित येवले

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’- (प्रधानमंत्री जन आरोग्य) योजनेचा देशभरात २३ सप्टेंबरला शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात हा लोकार्पण सोहळा राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

आयुष्मान भारत योजनेमुळे दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत दिली.

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle and Sharad Pawar
Udayanraje Bhosle and Sharad Pawar

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सातारा येथे बैठक झाली. यावेळी ‘शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि तुम्ही आमचेच आहात असे सांगीतल्याचे उदयराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या अंतर्गत वाद उफाळल्याची चर्चा होती. रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे यांच्यातील वाद तर हमरातूमरीवर आला असताना उदयनराजे २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवणार की दुसरा अन्य पर्याय निवडणार असा प्रश्न निर्मान झाला होता. परंतू आजच्या शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर उदयनराजे राष्ट्रवादी सोबतच राहतील असे दिसत आहे.

“शरद पवार यांच्या इतका मोठा नेता दुसरा नाही. आपल्या सर्वांना लाजवेल एवढी ते धावपळ करत असतात.” असे म्हणुन उदयराजेंनी पवारांविषयी गौरोद्गार काढले. त्याचबरोबर आपण अशा मोठ्या माणसाविषयी काय बोलणार असे म्हणून ‘फक्त फसवाफसवी करु नका, नाहीतर आपल्याला पण कळतं’ असे म्हणून शरद पवारांना टोला मारला आहे.

इतर महत्वाचे –

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

[youtube https://www.youtube.com/watch?v=oEl0VuCJijc&w=560&h=315]

बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

Bachhu kadu and Ravsaheb Danve
Bachhu kadu and Ravsaheb Danve

अमरावती | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक जालन्यातून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात जालन्यातून २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता बच्चू कडू विरुद्ध दानवे अशी लढत येत्या लोकसभेला जालन्यात पहायला मिळणार असून कडू दानवेंना जोरदार टक्कर देतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

इतर महत्वाचे –

माझ्यामुळेच नरेंन्द्र मोदी सत्तेत – अण्णा हजारे

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्याचा निश्चय बच्चू कडू यांनी केला आहे. ‘शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव करुनच जालन्यातून परत येईन’, असा पण बच्चू कडू यांनी केला आहे.

मागील वर्षी मार्च २०१७ मध्ये तूर खरेदीवरून रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ संबोधले होते. या विधानामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, त्यांच्या जाहीर अपमानाचा बदला म्हणून आपण ही निवडणूक लढवावी, असे जालन्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचे मागणी होती . रावसाहेब दानवे हे १६ व्या लोकसभेत जालन्यातून भाजपचे खासदार असून, १९९९ पासून ते सलग चौथ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत.

इतर महत्वाचे –

B.A. पास

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करतानाच, बच्चू कडू यांनी दानवेंवर टीकाही केली आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट आहे. तिथे रेती तस्करी चालते, तसेच अवैध दारु विक्रीमध्येही दानवेंचा हस्तक्षेप आहे, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.