Saturday, December 20, 2025
Home Blog Page 6734

अजिक्य राहणे ने घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar with ajinkya rahane
Sharad Pawar with ajinkya rahane

मुंबई | भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बी.सी.सी.आय. चे माजी अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा घेतली. या भेटी मधे दोघांमधे कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अजून समजलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आॅफिशीअल ट्विटर वरुन ही सदिच्छ भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.

शरद पवार आणि अजिंक्य रहाणे यांचा जुना स्नेह असून रहाणे ज्यावेळी रणजी करता खेळत होता त्याच काळात पवार मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होते. पवार पुढे आयसीसीआय चे आणि बीसीसीअाय चे अध्यक्ष झाले. त्याच काळात रहाणे यानेही क्रिकेट मधे चांगली कामगिरी करत भारतीय संघात नाव कमावले.

धक्कादायक, केवळ २ तासात २१ देशांतून १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन त्यांनी घातला काॅसमाॅस बँकेला गंडा

Cosmos bank fraud
Cosmos bank fraud

मुंबई | काॅसमाॅस बँकेवर आजवरचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. केवळ २ तासात वेगवेगळ्या अशा २१ देशांतून एकूण १२,००० ट्रान्झेक्शन्स करुन महाराष्ट्रातील काॅसमाॅस बँकेला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण मोठे सायबर क्राइम असल्याचे काॅसमाॅस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे यांनी म्हटले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, जगभरातील वेगवेगळ्या २१ देशात शनिवारी एकाच वेळी एकून १२,००० बँकव्यवहार करण्यात आले आहेत. यासाठी ४५० इंटरनेशनल व्हिसा डेबिट कार्ड वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. गुन्हेगार चपळाई दाखवत केवळ २ तास १३ मिनिटं एवढ्या वेळात वेगवेगळ्या ठिकाणांहून १२,००० ट्रान्झेक्शन्स करण्यात यशस्वी झाले आहेत. भारतात २,८०० अवैद्य ट्रान्झेक्शन्स द्वारा अडीच करोड रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समजत आहे.

सदरील गुन्हा हा सायबर क्राइमचा असून तो वेगवेगळ्या २१ देशांत एकाच वेळी घडला असल्याने यामागे मोठे नियोजन असून हा आंतराष्ट्री गुन्हा असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. कोणाही ग्राहकाच्या खात्याला यामुळे धक्का लागलेला नसून सर्व ट्रन्झेक्शन्स डमी कार्ड वापरु करण्यात आली असल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

 

 

मुख्यमंत्र्यांना मध्यावधी निवडणूक नको आहे

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर ठाम असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या थोडासा वेगळा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळवताना दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकी बरोबर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाव्या या मुद्द्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत अशातच मुख्यमंत्री मात्र या घोष वाक्याच्या सोबत जायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारने हाती घेतलेली कामे पूर्ण करायला पूर्ण पाच वर्षाचाच कालावधी पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.
लोकसभेच्या निवडणुकी सोबत ११ विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी भाजप नेतृत्व आग्रही आहे. तसा प्रस्ताव ही त्यांनी विधी समिती पुढे ठेवला आहे. या प्रस्तावात महाराष्ट्रात २०१७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हवाला दिला आहे. २०१६ – १७ च्या ३६५ दिवसांपैकी ३०६ दिवस आचारसंहितेत केले असे त्यात म्हणले आहे.
दरम्यान १९९९ ची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकात होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकत्रित निवडणुकांना विरोध करत आहेत असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. १९९९ साली महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाल सहा महिने शिल्लक असताना लोकसभेच्या निवडणुकी सोबत विधानसभेच्या निवडणुका लावण्यात आल्या होत्या त्यात भाजप आणि सेना युतीचा दारुण पराभव झाला होता. मात्र अटल बिहारी वाचपेय यांच्या झंझावाती नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास दर्शविला होता आणि राज्यातून युतीचे सर्वाधिक खासदार निवडून गेले होते.

विद्या बालन दिसणार इंदिरा गांधींच्या भुमिकेत

Vidya Balan in Indira Gandhi Biopic
Vidya Balan in Indira Gandhi Biopic

आयरन लेडी म्हणुन ओळख असणार्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर लवकरच एक बायोपिक येणार आहे. विशेष बाब म्हणजे बाॅलिवुड अभिनेत्री विद्या बालन यात मुख्य भुमिका करणार असून विद्या इंदिरा गांधींच्या भुमेकेत साकार असल्याचे समजत आहे.

इतर महत्वाचे  –

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

सनी लिओनीची “द अनटोल्ड स्टोरी” कायद्याच्या कचाट्यात

सध्या बाॅलिवुडमधे बायोपिक चे वारे आले आहे. संजय दत्त च्या संजु चित्रपटासोबतच नुकताच सनी लिओनचा बयोपिक येऊन गेला आहे. बायोपिक ला बाॅलिवुड मधे जोरात डिमांड असून प्रेक्षक तशा चित्रपटांना पसंती देताना दिसत आहेत. यापर्श्वभुमीवर रोनी स्क्रुवाला निर्मित इंदिरा गांधी यांच्या जीवणावर बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इंदिरा गांधी यांचे जीवण चित्रपटाच्या दोन तासात बसवणे कठीण असल्यामुळे सदर बायोपिक वेबसिरिज मधे बनवण्याचा निर्मात्यांचा विचार असून मुख्य भुमिकेत विद्याच असणार हे फायनल झाले आहे.

या गोष्टी करणार्या बाॅयफ्रेंडवर मुली भरभरुन प्रेम करतात

relationship
relationship

मुलींना नेहमीच त्यांचा बाॅयफ्रेंड केअरिंग असावा असे वाटत असते. बाॅयफ्रेंडने आपली काळजी घ्यावी, आपल्याला काय हवं काय नको ते पहावं असे मुलींना वाटत असते. मुलींनी भरभरुन प्रेम करावं असे वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

इतर महत्वाचे –

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

अलियासारखे स्लिम व्हायचंय ? मग या गोष्टी करा

१. मुलींना रोमॅंटिक मुलं जास्त आवडतात. तेव्हा रोजच्या गोष्टींमधे काहीतरी रोमॅंटिक करण्याचा प्रयत्न करा. रोमॅंटिसिझम म्हणजे केवळ किस करणे किवा इतर असे होत नाही. रस्त्यावरुन चालता चालता सहज हात हातात घेणे, अधून मधून हग करणे या गोष्टी करा.

२. कपाळावती किस केल्याने प्रेम, कालजी व्यक्त होते. तेव्हा कधीतरी कपाळावर हलकासा कुस करा. मुलींना असा प्रकारे किस केलेले आवडते.

३. तिला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती एखाद्या गोष्टीला नाही म्हणत असेल तर जरी तुम्ही बरोबर असाल तरी तिची बाजू ऐकून घ्या. तिचं म्हणनं काय आहे ते समजून घ्या.

४. तिला तिची स्पेस द्या. सारखे सारखे फोन, मेसेजेस करुन आठवण काढू नका. समोरच्या माणसाला आपल्यामुळे बांधल्यासारखे वाटणार नाही याची काळजी घ्या.

५. तिच्या आवडी निवडी कायम लक्षात ठेवा. बारिक सारीक गोष्टींची काळजी घ्या. तिच्या इच्छेविरुद्ध अथवा मनाविरुद्ध काही करण्याचं शक्यतो टाळा.

या गोष्टी तुमचही नीट फोलोअ केल्या तर नक्की समोरची मुलगी तुमच्यावर भरभरुन प्रेम करेल यात शंका नाही.

इतर महत्वाचे –

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

B.A. पास

शरीरसंबंध हा प्रेमबंधाचाच भाग, त्यासाठी वाट पाहता येते | Film Review #3

Shubh Mangal Saavdhan movie review in marathi
Shubh Mangal Saavdhan movie review in marathi
परिक्षण – घनश्याम येणगे

“मर्द को कभी दर्द नही होता” अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. परंतु या ‘मर्द’ पणाच्या भोवतीचे प्रश्‍न हलक्या फुलक्या व मजेदार पद्धतीने सांगुन ‘शुभ मंगल सावधा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमानने मर्द असण्याची नवीच व्याख्या सांगीतली आहे. त्याच्या मतानुसार ‘मर्द तो असतो जो ना दर्द देतो ना कुणाला दर्द द्यायला लावतो’

इतर महत्वाचे –

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

B.A. पास

शुभमंगल सावधान या चित्रपटाची वाट निसरडी होती कारण लग्न हा विषय आपल्या खूप जवळचा असला तरी सेक्स या विषयावर आपल्याकडे तितके मोकळेपणाने बोलले जात नाही. दिग्दर्शक आर. एस. प्रश्‍न्ना यांनी कुठेही बटबटीतपणा न दाखवता चित्रपटात उत्तम तोल साधला आहे. त्यांना सर्वच कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.

चित्रपटात दिल्लीतील मुदित शर्मा (आयुष्यामन खुराणा) ची गोष्ट आहे, ज्याचा साखरपुडा दिल्लीतल्याच सुगंधा (भूमी पेडणेकर) सोबत होतो. साखरपुडा आणि लग्न यांच्यादरम्यान मुदित आणि सुगंधा एकमेकांच्या जवळ येतात तेंव्हा त्यांना कळते की मुदितला सेक्सुअल प्रॉब्लम आहे. आणि हे कळल्यानंतर सुगंधाचे पालक लग्नाला विरोध करतात परंतु सुगंधा आणि मुदित एकमेकांवर प्रेम करत असतात आणि त्यांनी काहीही झाले तरी लग्न करायचे आहे. असे ठरवतात. लग्न वाराणसीला होणार असते. तिथे निघण्या आधी मुदित सुगंधला लग्न मोडण्याविषयी सांगतो. त्याचा तो प्रश्‍न पुढे दोघांनाही खुप त्रासदायक ठरेल, अशी त्याची भूमिका असते. सुगंधा मात्र त्याला ठाम नकार देते, हा प्रश्‍न लग्नानंतर समजला असता, तो माझ्याबाबत असता तर असा प्रश्‍न त्याला विचारते.

अशा प्रश्‍नोत्तरांतून दिग्दर्शक अनेक बाबींवर बोट ठेवत जातो. दोष माझ्यात आहे, तर उपाय सुगंधाबाबत का? असा थेट प्रश्‍न विचारत मुदित केळीच्या झाडाशी लग्न करतो, तेव्हा नक्की पुरूषत्व मर्दपणा कशामध्ये आहे हे न बोलता सांगतो. आपल्या या प्रश्‍नाला घेऊन मुदीत वैदुंपासून बंगाली बाबांपर्यंत अनेकांच्या सल्ल्यांपासून ते थेट पशुवैद्यक डॉक्टरांपर्यंत संगळ्यांकडे जातो. परंतु हा प्रश्‍न तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जावा असे ना त्याला वाटते ना त्याच्या मित्रांना! या सगळ्यांमध्ये रूसवे – फुगवे, समज – गैरसमज आणि मजेशीर घटना घडत जातात यात या दोघांचे लग्न होते की नाही हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले चांगले.

हा विषय अतिशय नाजूक असला तरी दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनी खुप चांगल्या प्रकारे मांडला आहे. हा चित्रपट पाहताना आपल्याला कुठेच तो व्हल्गर वाटू नये याची काळजी घेतली आहे. चित्रपट खरे तर २०१३ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट कल्याण समायल साधम याचा हिंदी रिमेक आहे. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक ही प्रसन्नाच होते.
चित्रपट समाजाचा आरसा असतो आणि समाजवर चित्रपटांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो. म्हणूनच हा चित्रपट पाहणार्‍या युवक- युवतींवर समाजामध्ये बोलल्या न जाणार्‍या एका अशा विषयावर जागृती वाढेल असे वाटते. शरीरसंबंध हा प्रेमबंधाचा एक भाग आहे. त्यासाठी वाट पाहता येते. प्रेमबंध महत्वाचा असतो. तो असला की, कशावरही मात करता येते. असे अजिबात भाषण बाजी न करता या चित्रपटात सांगीतले आहे. हि विशेष बाब सुगंधाचे ठाम राहणे, मुदितला मदत करणे या दोघांनीही इतर कोणाहीपेक्षा एकमेकांना काय वाटते याला महत्व देणे हे अतिशय सुंदर, चित्रपटातील आईने मुलीशी सेक्सबद्द साधलेल्या संवाद, घरात ब्लू फिल्मची सिडी मिळाल्यानंतर झालेला हाहाकार, लग्नाच्या आदल्या दिवशी मुला- मुलीला एकत्र राहण्याची घरातल्यांनी दिलेली परवानगी ही दृश्य प्रेक्षकांना नक्कीच खळखळून हसवतात. सेक्स, नपुसंकत्व या गोष्टीवर विनोदी पण मार्मिक रितीने या चित्रपटाद्वारे भाष्य करण्यात आले आहे.

कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची सर्वात उत्तम बाजू अतिशय वेगळ्या प्रकारच्या भूमिका आयुष्यमान अतिशय उत्तमरित्या निभावतो हे त्याने अजुन एकदा सिद्ध केले. भूमी पेडणेकर हा तिसराच चित्रपट अतिशय बोलक्या डोळ्यांची ही सुंदर अभिनेत्री आपल्याला खुप लांबचा टप्पा गाठायचा आहे हे पटवून देते. सुगंधाच्या आईची भूमिका साकारणार्‍या सीमा पहावा उत्तम. त्यांच्या सोबतच ब्रीजेंद्र काला यांनाही पैकीच्या पैककी गुण दिले पाहिजेत. चित्रपट शेवटाकडे थोडा रेंगाळतो हे सोडले तर चित्रपटात कमी दाखवण्यासारखे काही नाही. एक निखळ मनोरंजन आणि वेगळा विषय तसेच कलाकारांच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहण्यास कांही हरकत नाही.

चित्रपट – शुभ मंगल सावधान
वेळ – १ तास ४८ मिनिट
दिदर्शक – आर. एस. प्रसन्ना

कलाकार – आयुष्यमान खुराणा, भुमी पेडणेकर, ब्रीजेंद्र काला, सीमा पाहवा.

n

घनश्याम येणगे

 

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला लाल किल्ल्यावर कडक सुरक्षा यंत्रणा

security forces increased in delhivahead of independencec day
security forces increased in delhivahead of independencec day

दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला राजधानी दिल्ली येथील एतिहासिक लाल किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात कडक सुरक्षा लावण्यात आलेली असून स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी चालू आहे.

लालकिल्ल्यासोबतच शहरातील विविध भागात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानीत अनेक नागरीक येत असतात. लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांचे भाषण कार्यक्रम देशवासीयांसाठी उत्साहाचा असतो. स्वातंत्र्यदिन सोहळा आनंदा आणि सुरळीत पार पडावा याकरता सुरक्षा करर्मीयांनी चांगलीच कंबर कसली आहे.

बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर ‘एसएफआय’ चे आंदोलन

SFI beed
SFI beed

बीड | स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने सोमवारी बीड जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिष्यवृत्ती, ईबीसी व आयटीआय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडच्या मागण्यांसाठी झालेल्या या आंदोलनात भारतीय संविधान जळणाऱ्या देशद्रोह्यांचा जोरदार निषेध ‘एसएफआय’ ने केला.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील मागील वर्षातील शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. तसेच जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी अजूनही जाहीर केलेली नाही. या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन झाले. तसेच दिल्ली येथे काही देशद्रोही प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रति जाळल्या आणि महापुषांबद्दल अवमान करणारे वक्तव्य केले. या घटनेचा देखील ‘एसएफआय’ ने तीव्र निषेध यावेळी केला आहे.

या आंदोलनात ‘एसएफआय’चे राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव रोहिदास जाधव, राज्य कमिटी सदस्य सुहास झोडगे, जिल्हा सचिव रुपेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष लहु खारगे, रवि जाधव, रामेश्वर जाधव, रवि राठोड, अनिल पवार, गोपाल निरडे, प्रविण चव्हाण, सुहास जायभाये, कुंडलिक खेत्री, सुहास विद्यागार, आकाश सासवडे, आकाश जाधव, कृष्णा भालेराव, नागेश माने, अनिकेत राऊत, रमेश पवार, विश्वास डीकले, आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रेयसीने वाढदिवसाला बोलण्यास नकार दिला म्हणुन प्रियकराचा आत्महत्तेचा प्रयत्न

Thumbnail
Thumbnail

जळगाव | वाढदिवसाच्या दिवशी प्रियसिने बोलण्यास नकार दिल्याने एका तरुणाने आत्महेत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील खानदेश मिल सेंटर परिसरात घडली आहे. गणेश पवार असे त्या मुलाचे नाव असून त्याचे एका मुलीवर प्रेम होते. ती वाढदिवसादिवशी बोलावलेक्या ठिकाणी आली नाही आणि बोलण्यास नकार दिला म्हणुन पवार यार याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हाती आलेल्या माहितीनुसार, गणेशचा आज वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या प्रेयसीला भेटायला बोलावले होते. मात्र ती त्याला भेटायला आली नाही. म्हणून गणेश ती काम करत असलेल्या बिग बजार मॉल मध्ये गेला. तेथे ती एका अज्ञात मुलाशी बोलताना गणेश ला आढळली. या घटनेचे गणेशला दुःख अनावर झाले आणि त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तो बिग बजारच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन जीव देण्याचा प्रयत्न करु लागला. हे पाहुण बघ्यांची मोठी गर्दी जमली. काय करावे ते कोणालाच समजत नव्हते. एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. तोपर्यंत दुसर्या कोणीतरी पोलिसांना बोलावून घेतले.

जळगाव पोलिसांनी चलाखीने गणेशला पकडून इमारतीच्या खाली आणले. गणेश पवार याला अटक करण्यात आलेली असून जळगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सोलापुरी हरबरा चटणी

Maharashtrian recipies
Maharashtrian recipies

जेवणाच्या ताटात चटणी असल्या शिवाय जेवण रुचकर वाटत नाही. जेवण चविष्ट बनण्यासाठी चटणी महत्वाची भूमिका बजावते. म्हणून चटण्यांचे वेग वेगळे प्रकार खवय्यांना आकर्षित करत असतात. म्हणूनच आम्ही आजची रेसिपी चटणीची निवडली आहे. चला तर बघुयात कशी बनवायची सोलापुरी हरबरा चटणी.

साहित्य –

१.हरबरा डाळ एक वाटी
२.कांदा अर्धा वाटी
३.धने पूड एक चमचा
४.चिरे एक चमचा
५.चिंचेचा कोळ एक मोठा चमचा
६.तेल एक चमचा
७.सोलापुरी लाल मिरचा पाच ते सात. (मिरच्या चवीनुसार वाढवाव्यात.)
८.चवी नुसार मीठ

कृती –

हरभरा डाळ सहा तास पाण्यात भिजवून घ्यावी. भिजवल्या नंतर सुती कापडावर पाच मिनिटं पसरवून ठेवा जेणेकरून डाळीतील पाणी निघून जाईल. त्या नंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा, एक चमचा धने पूड, एक चमचा धने पूड, एक मोठा चमचा चिंचेचा कोळ, सात सोलापुरी लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ घ्यावे. सर्व साहित्य बारीक वाटल्या नंतर त्यात हरभऱ्याची डाळ घालून जाडसर वाटून घ्यावे. चटणी वाटीत काढून त्यात एक चमचा कच्चे तेल घालावे. चटणी पानात वाढण्यासाठी तयार.