Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6765

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले होते तर मग प्रकल्पाबाबतचा करार झालाच कसा ? – नवाब मलिक

thumbnail 1530213717819
thumbnail 1530213717819

मुंबई : कोकणातील राजापूर येथे होऊ घातलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी एका सभेत नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असल्याचे सांगीतले होते मग तरी नाणार प्रकल्पाचा करार कसा काय झाला असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार येथील सभेत नाणार प्रकल्प रद्द केला असल्याची घोषणा केली होती. परंतु दोनच दिवसांपुर्वी भाजपचे केंन्द्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सरकारने नाणार प्रकल्पाबाबत गल्फच्या पेट्रोलियम कंपनीसोबत ३ लाख कोटीचा करार केला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे शिवसेना नाणारप्रकल्पाबाबत घेतलेल्या भुमिकेसंदर्भात तोंडावर पडली आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केल्याचे सांगितले असताना प्रकल्पाबाबतचा करार झालाच कसा असा सवाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यामधे ५० टक्क्यांनी वाढ

thumbnail 1530208799686
thumbnail 1530208799686

ज्युरिक/नवी दिल्ली : स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यामधे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदींनी राबवलेल्या काळा धन अभियानाल यामुळे मोठ्ठा धक्का बसला आहे. २०१७ या वर्षात स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमधे वाढ होऊन भारतीयांच्या एकुण ठेवींचा आकडा सात हजार कोटी इतका झाला आहे.
स्विस नॅशनल बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतीयांच्या ठेवींमधे २०१७ मधे ५० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. जगभरातील लोकांच्या एकुण ठेवींमधे तीन टक्क्यांनी वाढ झाली असून स्विस बँकेत १०० लाख कोटी रुपये असल्याचे अहवालात म्हणले आहे. पाकिस्तानी लोकांच्या ठेवींत २१ टक्क्यांची घट होऊनसुद्धा एकुण ठेवींमधे पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. स्विस बँकेतील पाकिस्तानी लोकांच्या एकुण ठेवी ७,७०० कोटी असल्याचे समोर आले आहे.
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर स्विस बँकेतील भारतीयांच्या पैस्यात वाढ झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रक्षकच भक्षक झाले तर जनतेने कोणाकडे पाहायचे? – सुप्रिया सुळे

thumbnail 1530111205369
thumbnail 1530111205369

औरंगाबाद : पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद होण्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली अाहे. महिला काॅन्स्टेबलच्या मुलीने औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेने पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालावी लागली आहे. समाजाच्या विविध स्तरांतून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. एका आय.पी.एस. दर्जाच्या अधिकार्यावर बलात्कारासारखा आरोप होणे ही गंभीर बाब असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे. औरंगाबाद येथील घटनेचा सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरुन निषेध केला आहे. रक्षकच भक्षक झाले तर जनतेने कोणाकडे पाहायचे ? असा सवालही सुळे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. गृहखात्याचा वचक नसल्याने अशा विकृती डोकंवर काढत आहेत असं म्हणुन त्यांनी गृहखात्यावर ताशेरे ओढले आहेत. गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नसल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी वाढल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला अाहे. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याला स्वतंत्र मंत्री मिळायलाच पाहीजे अशी मागणी यावेली केली आहे.

धक्कादायक! पोलीस उपायुक्ताचा काॅन्स्टेबलच्या मुलीवर बलात्कार

thumbnail 15301108728248
thumbnail 15301108728248

औरंगाबाद : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणार्या पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालायला लावणारी लज्जास्पद घटना औरंगाबाद येथे घडली आहे. औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. महिला पोलीस काॅन्स्टेबलच्या २२ वर्षीय मुलीने व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून श्रीरामे यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार नोंदवली आहे. फेब्रवारी २०१८ ते जून २०१८ दरम्यान श्रीरामे यांनी माझ्यासोबत जबरदस्ती शारीरीक संबंध ठेवूब वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप त्या तरुणीने केला आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार सदरील तरुणी स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करत होती. मी तुला मार्गदर्शन करतो असे म्हणुन श्रीरामे यांनी तरुणीला स्वत:च्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. नोकरीचे अमिष दाखवून श्रीरामे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हणले आहे. पोलीस उपायुक्त श्रीरामे यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपुर्ण पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालावी लागली आहे.

धर्माचे स्वातंत्र्य हे लोकस्वातंत्र्य व अधिकार स्वातंत्र्याइतकेच महत्वाचे – निक्की हालेय

thumbnail 1530093839014
thumbnail 1530093839014

दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या अॅम्बेसिडर असलेल्या निक्की हालेय सध्या भारत दौर्यावर आल्या आहेत. दिल्ली येथी हुमायूनच्या टोंबला भेट देऊन त्यांनी आपल्या दौर्याची सुरवात केली आहे. त्यावेळी धर्माचे स्वातंत्र्य हे लोकस्वातंत्र्य व अधिकार स्वातंत्र्याइतकेच महत्वाचे आहे असे निक्की हालेय यांनी म्हणले आहे.

“अमेरीकेचे भारताप्रती असलेले प्रेम अधिक घट्ट करण्यासाठीच मी हा दौरा करत आहे. जगभर अनिश्चिततेचे वातावरन असताना भारतासोबतचे संबंध अधिक मजबुत करण्यास अमेरीका उत्सुक आहे” असे निक्की हालेय पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या आहेत. “मला भारतात परतून आनंद झाला आहे. माझ्या आठवणीमधे इथे जेवढे सौंदर्य होते तितकेच आजही आहे.” असे मुळच्या भारतीय असलेल्या निक्की हालेय यांनी भारताबद्दल बोलताना उद्गार काढले आहेत. “भारत आणि अमेरीका ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी जगातील सर्वात जुनी राष्ट्रे असून दोघांनी दहशतवादाच्या प्रश्नांवर एकत्रीत काम करायला हवे” असेही हालेय म्हणाल्या आहेय. दोन दिवशीय दौर्यामधे निक्की हालेय विशेष सरकारी अधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणर्या विशेष संस्था, उद्योगपती तसेच काही विद्यार्थी आदींची भेट घेणार आहेत.

नाशिकमधे लष्कराचे लढावू विमान शिवारात कोसळून खाक

thumbnail 1530092068625
thumbnail 1530092068625

नाशिक : भारतीय लष्कराचे लढावू विमान तांत्रिक बिघाडामुळे नाशिकजवळील शिवारात कोसळून खाक झाले आहे. सुदैवाने दोन्ही वैमानिक अपघातातून बचावले आहेत. रशियन बनावटीचे सुखोई सु ३० हे लढावू विमान परिक्षण चाचणी दरम्यान पिंपळगाव बसवंत गावाजवळील वावी – तुशी परिसरातील शिवारात कोसळले. नाशिक पासून २५ कि.मी. अंतरावर सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावकर्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधल्याने अन्य हानि टळली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्तान अॅरोनोटिक्स कंपनीच्या नाशिक येथील कारखान्यामधे संबंधित विमानावर काम चालू होते. विमानाची परिक्षण चाचणी घेण्यासाठी वैमानिकांनी सुखोईतून उड्डान केले असता त्यांना विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. वैमानिकांनी समय-सुचकता दाखवत पॅराशुटच्या सहाय्याने चालू विमानातून उड्या घेतल्याने दोन्ही वैमानिकांचा जीव वाचला. पिंपळगाव येथील शिवारात विमान कोसळल्याची माहिती नाशिक परिसरात पसरता गावकर्यांनी विमान पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. संरक्षन मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिक चौकशी सुरु आहे.

छगन भुजबळांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

thumbnail 1530081668155
thumbnail 1530081668155

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मनी लाँन्ड्रींगच्या केस मुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. भुजबळ यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुत्र पंकज व पुतने समिर यांनाही भुजबळ यांच्यासोबत न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंद झाला तर त्यांना पुन्हा जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांनी स्वत:वरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोटे असल्याचे भाष्य केले होते. सक्तवसुली संचालनालयाच्या या कारवाईमुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सुरक्षा रक्षकांच्या चोख बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला सुरवात

thumbnail 1530075555797
thumbnail 1530075555797

श्रीनगर : हिदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरवात झाली आहे. जम्मु काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. दहशतवादी हल्ल्याचे सावट असणारी अमरनाथ यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मुत रवाना झाली आहे. भगवतीनगर बेस कॅम्पमधून आज यात्रेला सुरवात झाली आहे. जम्मु काश्मिरचे मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रमण्यम, जम्मु काश्मिरच्या राज्यपालांचे सल्लागार विजय कुमार आणि बी. बी. व्यास आदींनी यात्रेकरुंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. आज सुरु झालेली यात्रा २६ आॅगस्ट रोजी संपणार आहे. यंदा अमरनाथ यात्रमधे १९०૪ भाविकांनी सहभाग घेतला आहे. त्यामधील १५५૪ पुरुष तर ३२० महिला आहेत. तसेच यात्रेमधे ३० मुले आहेत. अमरनाथ यात्रेला सुरक्षा रक्षकांचा चोख बंदोबस्त असून यावेळी प्रथमच महिला सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप नगरसेवकाचा कोयत्याने खूण

thumbnail 1530039650956
thumbnail 1530039650956

पुणे : बालाजी कांबळे या भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पुण्यातील आळंदी रोडवर वडमुखवाडी परिसरात ही घटना घडली आहे. संध्याकाळी ૪ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी कांबळे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. डोक्याला जबरदस्त मार लागलेले कांबळे जागीच बेशुद्ध होऊन पडले होते. उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. बालाजी कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे आळंदी येथून नगरसेवक होते. त्यांच्या हत्तेमागील कारण अद्याप समजलेले नसून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

झारखंडमधे नक्षली हल्ला, ६ जवान शहीद

thumbnail 1530038652435
thumbnail 1530038652435

रांची : नक्षली हिंसेमुळे नेहमी चर्चेत असणारे झारखंड पुन्हा एकदा नक्षल्यांच्या रडावर आले आहे. झारखंड मधील गढवा जिल्ह्यातील छिंजो भागात नक्षली हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या भुस्फोटामधे सशस्त्र दलाचे ६ जवान जागीच ठार आहेत तर ૪ जवान जखमी झाले आहेत. नक्षलवाद्यांनी यावेळी बेछुट गोळीबार केल्याचेही बोलले जात आहे. जखमी जवानांना तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे पलमु रेंजचे पोलीस उपमहानिरिक्षक विपुल शुक्ला यांनी सांगितले आहे. सदरील घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असुन सुरक्षा दलाचे जवान जंगलात शोधमोहीम राबवत असल्याचेही शुक्ला यांनी यावेळी सांगितले आहे.