Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6766

पंतप्रधान नरेंन्द्र मोदींच्या सुरक्षेत वाढ

thumbnail 1530021438094
thumbnail 1530021438094

दिल्ली : पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सुरक्षेमधे वाढ करण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एस.पी.जी.) कडे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. एस.पी.जी. च्या परवानगीशिवाय आता मत्र्यांनाही मोदींना भेटता येणार नसल्याचे बोलले जात आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारांत रोड शो एवजी जनसभा घेण्यावर भर देण्याचा सल्लाही एस.पी.जी. ने मोदींना दिला आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदीं यांची हत्या करण्याचा सी.पी.आय.(माओवादी) संघटनेने कट रचला होता अशी चर्चा मधे रंगली होती. त्यातूनच पंतप्रधानांची सुरक्षा वाढवण्याचे पाऊल उचलले गेले असल्याचे समजत आहे.
पुणे पोलिसांनी कोरेगाव भिमा प्रकरणात पाच संशयित माओवाद्यांना अटक केल्यानंतर माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येच्या कट रचल्याची माहीती समोर आली होती. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात तातडीची बैठक बोलावली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, केन्द्रीय गृह सचिव राजीव गौबा तसेच गुप्तहेर खात्याचे अधिकारी हे बैठकीस उपस्थित होते. नरेंन्द्र मोदी यांच्या सुरक्षेसंदर्भात बैठकीत चर्चा केल्यानंतर गृहमंत्री सिंह यांनी छत्तिसगड, झारखंड, प. बंगाल इत्यादी नक्षल प्रभावित राज्यांमधे हाय अलर्ट जारी केला होता. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक पावले उचलण्याचे आदेशही संबंधित खात्यांना दिले होते. त्यातुनच पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे समजत आहे.

प्रियांका अाणि निकचा लवकरच साखरपुडा!

thumbnail 1530017291764
thumbnail 1530017291764

बाॅलिवुडमधे सध्या प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जाॅनस यांच्या अफेरची जोरदार चर्चा चालू आहे. मुळचा न्यु जर्सीचा असलेला निक सद्या प्रियांकासोबत भारत दौर्यावर आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज सोशलमिडीयावर पोस्ट करत आहेत. प्रियांकाच्या घरच्यांना भेटण्याकरताच निक भारतात आला असून २१ जून ला निक प्रियांकाच्या आईला भेटला असल्याचे बोलले जात आहे. “आमच्यातील नाते अधिक घट्ट आहे” असेही त्यांनी सोशलमिडियावरील एका पोस्टमधे म्हणले आहे. प्रियांका आणि निक सध्या गोव्यामधे एन्जाॅय करत आहेत. विशेष म्हणजे निक प्रियाका पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. गायक आणि हाॅलिवूड अभिनेता असलेला निक येत्या आॅगस्ट महिण्यात प्रियांकासोबत साखरपुडा करणार आहे असेही बोलले जात आहे. प्रियांका आणि निक यांची एन्गेजमेंट लवकरच होणार असून प्रियांकामुळे भारताला अमेरीकन जावई मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांमधे आनंद आहे.

काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

thumbnail 1529834129587
thumbnail 1529834129587

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा केला आहे. कश्मिरमधे केवळ २७५ दहशतवादी आहेत. काश्मिरातील दहशतवाद्यामधे लष्कर ए तोयबा च्या दहशतवाद्यांची सख्या अधिक असून काश्मिरमधे आयसिस हा मोठा धोका उरलेला नाही असेही भट यांनी म्हटले आहे. कश्मिर खोर्यातील भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे हेच आमच्या समोरील आव्हान असून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असेही भट पत्रकारांशी बोलताना म्हणले आहेत.

शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारी निलंबित

thumbnail 1529828492361
thumbnail 1529828492361

बुलढाना : बँक अधिकार्याने पीक कर्जासाठी शेतकर्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कदायक प्रकार मलकापूर तालुक्यातील दातार गावामधे घडला होता. पीक कर्जासाठी अर्ज करण्याकरता सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीकडे बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात होता. शेतकरी संघटनेने राजेश संबंधीत शाखाधिकार्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली होती. काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा” असे म्हणुन शेतकर्यांवर अन्याय होत असल्याचे म्हणले होते. विविध पक्ष व संघटनांकडून संबधित अधिकार्याच्या निलंबनाची मागणी होत असल्याने अखेर राजेस हिवसे ला सेंट्रल बँक आॅफ इंडीयाने निलंबित केले आहे.

दोन बेडकांचा जंगी विवाह, पाऊस पडावा यासाठी मध्यप्रदेशात अजब धार्मिक विधी

thumbnail 15298206318861
thumbnail 15298206318861

टीम HELLO महाराष्ट्र : दोन बेडकांचे धुमधदाक्यात लग्न लावण्याचा प्रकार मध्यप्रदेशातील छत्तरपूर गावात घडला आहे. पाऊस पडावा यासाठी दोन बेडकांचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात अाला होता. बेडकांचा विवाहसोहळा हा धार्मिकविधीचा भाग असून असे केल्याने वर्षा देवता प्रसन्न होते व पाऊस पडतो अशी मध्य प्रदेशातील लोकांची श्रद्धा असल्याचे समजत आहे.

विशेष म्हणजे मध्य प्रदेशच्या मंत्री ललिता यादव यासुद्धा या विवाह सोहळ्यास उपस्थित होत्या. “आम्ही दुष्काळग्रस्त बुंदेलखंड भागात पाऊस पडावा यासाठी देवाकडे मागणी केली आहे. तसेच शेतकर्यांचे भले व्हावे म्हणुन देवाकडे प्रार्थना केली आहे”. असे विवाहस्थळी उपस्थित असणार्या बबर यांनी म्हटले आहे.

शेतकरी भगिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा तो अधिकारी असंवेदनशील आणि शेतकरीद्वेश्या सरकारचा प्रतिनिधी – जयंत पाटील

thumbnail 1529771289522
thumbnail 1529771289522

मुंबई : कर्जमाफीचा अर्ज करण्यासाठी बँकेत आलेल्या शेतकर्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाना जिल्ह्यातील दातार गावात घडला आहे. पिडित शेतकरी कर्ज माफीसाठीचा अर्ज भरण्याकरता गावातील सेंट्रल बँक आॅफ इंडीयामधे गेला असता त्याने त्याची व त्याच्या पत्नीची वैयक्तिक माहिती अर्ज भरतेवेळी बँकेत जमा केली होती. बँकेच्या शाखाधिकार्याने त्या माहितीचा दुरउपयोग करत परस्पर शेतकर्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक घेऊन शरिरसुखाची मागणी केली आहे.

“बुलढाण्यात घडलेला प्रकार पुरोगामी महाराष्ट्रावर लागलेला कलंक आहे” असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. कर्ज मंजुर करुन देण्यासाठी शेतकरी भगिनीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारीच खर्या अर्थाने या असंवेदनशील आणि शेतकरीद्वेश्या सरकारचा प्रतिनिधी असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. शेतकर्यांना कर्जमाफीचा अर्ज भरतेवेळी विनाकारण अनावश्यक कागदपत्रे बँकांत नेऊन द्यावी लागतात. यातूनच हा प्रकार घडला आहे. तेव्हा सरकारने शेतकर्यांचा छळ थांबवावा व महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच दोषी अधिकार्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जयंत पाटील यांनी केली आहे.

साहित्य अकादमी विजेत्या “फेसाटी” कादंबरीवरील पुस्तक परिक्षण

thumbnail 1529669296369
thumbnail 1529669296369

भारतीय सेनेत रुजू असलेले युवराज पाटील यांनी “फेसाटी” या साहित्य अकादमी विजेत्या कादंबरिवर लिहीलेले पुस्तक परिक्षण गोरेंच्या लेखणीचा वेध घेणारे आहे. थेट जम्मु-काश्मिर मधून युवराज यांनी फेसाटी कादंबरीवर परीक्षण लिहीले आहे.

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार लेखक नवनाथ गोरे यांच्या “फेसाटी” या आत्मकथनपर कादंबरीस जाहीर झाला आहे. धनगर समाजात जन्मलेल्या नवनाथ गोरे यांचे मुळ गाव सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधे निगडी खुर्द हे आहे. गोरे यांनी त्यांना आजवरील आयुष्यात आलेल्या अनुभावांतून फेसाटी या कादंबरीचे लेखन केले आहे. शेळ्या – मेंढ्या पाळणे हा पारंपारिक व्यवसाय असलेल्या गोरे यांनी अतीशय हलाखीतून स्वत:चे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या नवनाथ गोरे शिवाजी विद्यापिठ, कोल्हपुर येथे मराठीचे प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत.

“अडचणींंचा डोंगर पार करतानाची फेसाटी”

पु‍स्तकाचे नाव – फेसाटी

लेखक – नवनाथ गोरे

एखाद्या माणसाच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर असावा तरी किती मोठा. जो चढुन पार करता करता त्या माणसाचे बालपण, किशोरवय, तरुणपण कायमच दुःखाच्या अंधारात गडुप व्हावे. तिथं सुखःचा प्रकाश अभावानेच पडावा. कुटुंबाची होणारी ससेहोलपट न थांबणारी, वरुन संकटांचा हल्यावर हल्ला. यातुन मार्ग काढता काढता दमगीर होणाऱ्या अस्वस्थ नायकाचे जीवनविश्व ढवळुन काढणारी आणि वाचणा-याला गलबलुन सोडणारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतुन आणि प्रकाशिका प्रियंका प्रशांत पटवर्धन यांच्या प्रकाशन संस्थेकडुन प्रकाशित झालेली मित्र नवनाथ गोरे यांची पहिलीच आत्मकथन पर कादंबरी म्हणजे “फेसाटी”.

बारमाही भणभणता दुष्काळ असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चार मुली आणि दोन मुलं त्यामधील एक मुलगा जन्मताच अपंग अशी कौंटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अल्पभुधारक आणि निसर्गाच्या वक्रदृष्टीने बेजार झालेल्या कुटुंबाच्या जगण्याच्या संघर्षाने फेसाटीच्या “सुंबरानाला” सुरवात होते. कुटुंबकबिला मोठा अशात अर्थिक परिस्थिती बेताची, मिळकतीचे दरवाजे मर्यादित, जे उघडे ते निसर्गाच्या भरवशावर, शेळ्या मेंढ्यावर आणि रोजंदारीच्या मिळकतीवर कुटुंबाची गुजराण. खाणारी तोंड जास्त आणि कमावणारं हात कमी. वाताहत ठरलेली. त्यातुनही लेखकाचे वडील मार्ग काढत कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. लेखक स्वतः कादंबरी मधुन स्वतःचं करुणादायी बालपण मांडत आहे. घरात घडणाऱ्या प्रत्येक हालाकीच्या प्रसंगाचं वर्णन करत आहे. दुष्काळामुळं रोजगाराची वाणवा, घरचं अठराविश्व दारीद्र, घरप्रमुखाची उपासमार, वारंवार होणारी कुटुंबाची उपासमार, होरपळत असलेलं लेखकाचं बालपण वाचणारा अस्वस्थ होतोय. जेवढी जमिन आहे त्यातही भावबंदकी आडवी येते. चलतचित्रासाखी कादंबरी प्रवाहीत होणारी आहे, दिवस अन दिवसाच्या दुखाचा मागोवा कादंबरीतुन समोर येतोय. गरीबीची स्वप्नं किती मर्यादित असतात याच मन सुन्न करणारं वर्णन समोर येतं. रक्ताच्या नात्याकडून होणारी फसवणूक, परिस्थिती चा फायदा उठवु पाहणारे माजोर धनदांडगे ठळकपणे दिसतात. शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचली तरी भटकंती करणाऱ्या समाजाची मुलं अजुनही कोसोदुर असल्याचं पहायला मिळतय. प्रसंगी जातीय अपशब्द वापरुन सुशिक्षित पांढरपेशीकडुन अवहेलना झालेली वाचायला मिळते. या अवहेलनेला प्रत्युंतर म्हणुन लेखक महापुरुषांचे उदाहण देत आहे लेखकाने पहिली पासुन ते पदवीधर पर्यतच्या शाळेतील घटनांची तपशील वार मांडणी “फेसाटी” मधुन मांडली आहे. बालपण अन्नान्न दशेमध्ये गेल्यानंतर खातं पितं वयही अपवाद राहीलेलं नाही, फेकुन दिलेल्या केळीची सालं पोटाची भुक भागवण्यासाठी खाल्यालं वाचताना न कळत डोळ्यांच्या कडा ओलावत्यात. शाळेमधील घटना वाचताना ते दिवस जगलेल्या वाचकांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. सबंध कादंबरीत जत आणि परिसरातील बोली भाषेचा गोडवा जाणवतो. लहानपणापासून लेखकाला कावीळ मुतखड्यासाख्या दुखण्यांनी पिडलेलं आहे. पोटाला पिळ पडेपर्यत अंगावर ताप कणकणी घेत रोजगार असा लेखकाचा प्रवास चाललेला आहे.

सणसुद म्हणजे लेखक आणि कुटुंबाला संकटच वाटत आलेले आहेत. शेजारच्या घरात तव्यावर भाजणा-या खमंग पुरणपोळीचा वास पसरल्यावर लेखकाच्या घरात भाकरीसाठीची परवड पहायला मिळते.लेखकाने शाळा शिकावी म्हणून लागेल ती मदत आई वडील करण्यास तयार आहेत पण लेखकाला शाळेत रस वाटत नाही. कधी शाळेतील गुरुजींचा मार खाल्यावर, कधी अंगावरील फाटकी कपडे बघितल्यावर लेखकाला शाळाच शिकु नये असं वाटतय.रोजगार करत करत लेखक शाळा शिकतोय. आल्या प्रसंगाला धोरोदात्तपणे तोंड देताना सबंध कादंबरीतुन दिसतोय. शाळेपासुन अलिप्त राहु पाहणाऱ्या लेखकाच्या जीवनाला आशादायी कलाटणी मिळण्यास कारण ठरलेले दोन मित्र म्हणजे विष्णू माने आणि बापु टोणे. ईथुन लेखकाचा शाळेचा प्रवास ख-या अर्थाने सुरु होताना दिसतोय. लेखक स्वतःचे अवगुण जे सर्वामध्ये कमी जास्त प्रमाणात आढळतात ते स्पष्टपणे मांडण्याच धाडस करताना दिसतोय हे विशेष आहे. त्यामुळं कादंबरीला जीवंतपणा आला आहे. सावकारी कर्ज, आगीच्या हवाली झालेलं झोपडीवजा घर,जळून काळंकुट्ट पडलेलं धान्य, पोटापाण्याची झालेली आबाळ, तारुण्यसुलभ वयात जीवनात आलेली आणि नंतर दुरावलेली जया, शिकवणी दरम्यान मित्रांकडून झालेली मदत, जीवनात आलेले कटु गोड प्रसंग लेखकाने ओघवते व्यक्त केले आहेत. भाषामाध्यम, रुपबंध असाच असावा आणि ईत्यादी बाबींच्या चौकटीत न अडकता मुक्तपणे पुर्वायुष्य शब्दबद्ध करीत मनातील घुसमटीला मोकळी वाट करुन दिली आहे. निसर्गताच आलेली बोलीभाषा वाचकाला आपली वाटते प्रसंगाचे गांभीर्य समजण्यास मदत होते. कादंबरी वाचकाचा ताबा घेते. सुरवातीला शाळा म्हणजे बंदीवास वाटणारा लेखक आज पदवीधर आहे हे उल्लेखनीय आहे.
आदरणीय लेखक मित्र नवनाथ गोरे यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

युवराज कुंडलिक पाटील, सांगली
मोबाईल – ९५९५७३०४०८
मेल – [email protected]

रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

thumbnail 1529669191260
thumbnail 1529669191260

पुणे : साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जेष्ठ लेखक रत्नाकर मठकरी आणि सांगलीचे लेखक नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे. देशातील एकुण ૪२ साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी २१ तर बालसाहीत्य पुरस्कारासाठी २१ साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. नवनाथ गोरे यांच्या “फेसाटी” या आत्मकथनपर कादंबरीस यावर्षीचा युवा साहीत्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मठकरी यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डाॅ. चंद्रशेखर कंबार यांनी साहित्य अकादमी पुरस्कारासाठी मठकरी व गोरे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्याचे सांगितले आहे.

प्रियांका चोप्राची “भारत” साठी १૪ कोटींची मागणी

thumbnail 1529663047712
thumbnail 1529663047712

हाॅलिवुड आणि परदेशी मालिकांमधे काम केल्यापासून प्रियांका चोप्राचे ग्लॅमर चांगलेच वाढले आहे. प्रियांकाच्या चाहत्यांमधे दिवसेदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशात वावरणार्या या अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा बाॅलिवुडमधे पदार्पन करण्याचा निर्णय घेतला अाहे.

सलमान खानची मुख्य भुमिका असणार्या “भारत” या आगामी चित्रपटासाठी प्रियांकाला आॅफर आहे. सल्लुसोबत “भारत” मधे काम करण्यासाठी प्रियांका चोप्राने १૪ कोटी रुपये मानधनाची मागणी केली असल्याची चर्चा आहे. बाॅलिवुडमधे १૪ कोटी मानधन एैकुण अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. आजवर दिपिका पदुकोन सर्वात महागडी अभिनेत्री ठरली होती. पद्मावतसाठी दिपिकाला १२ कोटी इतके मानधन मिळाले होते. आता मात्र प्रियांका चोप्रा दिपिकाचे रॅकोर्ड ब्रेक करणार असल्याचे दिसत आहे.