Monday, December 22, 2025
Home Blog Page 695

Police Recruitment 2024 | पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ; सोमवारपासून होणार मैदानी चाचण्यांना सुरुवात

Police Recruitment 2024

Police Recruitment 2024 | यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलीस भरतीची प्रक्रिया मंदावले होती. परंतु आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्याच्या प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता येत्या सोमवारी म्हणजेच 10 जूनपासून शहर आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलीस भरतीसाठीची उमेदवारांची चाचणी परीक्षा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी डिसेंबर महिन्यांपासून उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. परंतु मुदतवाढ करून फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करून घेतले होते. परंतु त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आणि ही भरती प्रक्रिया थांबली.

परंतु या पोलीस भरती (Police Recruitment 2024)संदर्भात शेवटचे नियोजन सुरू झालेले आहे. येता 10 तारखेपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना हॉल तिकीट मेसेज आणि ई-मेल मोबाईलद्वारे कळवलेले आहे. त्यानुसार आता उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.

मैदानी चाचणी | Police Recruitment 2024

धावणे, गोळा फेक, शारीरिक पात्रता मोजणी, पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर तर फुगून 84 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 155 सेंटिमीटर

T20 वर्ल्ड कपसाठी Airtel कडून खास प्लॅन लाँच; Disney+ Hotstar चे मिळणार फ्री सबस्क्रिप्शन

Airtel plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| Airtel कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या ऑफर्स लॉन्च करत असते. आता Airtel ने T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक खास प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सना Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल. त्यामुळे ज्या लोकांना क्रिकेट पाहिला आवडते त्या लोकांसाठी हा प्लॅन सर्वात फायदेशीर ठरेल. खास म्हणजे, या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 499 रुपये मोजावे लागतील. ज्यात त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 3GB हायस्पीड इंटरनेटचा सेवा मिळेल.

प्लॅनद्वारे T20 World Cup विनामूल्य पहा

Airtel च्या 499 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Disney Plus हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. तसेच, या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेवर 20 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. ज्यावर तुम्ही तुमचे आवडते शो, चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकाल. या प्लॅन मुळे क्रिकेटप्रेमींना T20 World Cup चे सामने कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहता येणार आहेत. या प्लॅनमुळे तुम्ही Disney+ Hotstar वर T20 World Cup विनामूल्य पाहू शकाल.

खास म्हणजे, जर तुम्हाला या प्लॅनचा फायदा अधिक काळासाठी घ्यायचा असेल तर तुम्हाला 839 रुपये किंवा 3,359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन करावा लागेल. 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. यासह दररोज 2GB डेटा मिळेल. तसेच 3,359 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार विनामूल्य पाहता येईल. यासह Xstream ॲपवर OTT चाही आनंद घेता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. त्यामुळे हे तिन्ही प्लॅन तुम्हाला फायदेशीर ठरतील.

Viral Video | अबब ! महाकाय अजगर रस्ता ओलांडताना पाहून वाहतूक ठप्प, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर आजकाल मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनासाठी असतात. तर काही व्हिडिओ हे पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास देखील बसणार नाही. सोशल मीडियावर वन्यजीवांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अनेकदा आपण साप किंवा अजगर लांबून बघतो. परंतु सापाजवळ जाण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. असाच या अजगराबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

अजगराची ही (Viral Video) घटना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. ज्यामध्ये एक महाकाय अजगर ट्राफिकमधून जाताना दिसत आहे. हे भले मोठे अजगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग हळू होतो. या व्हिडिओमध्ये अजगर काळ्या रंगाचे आहे. ते हायवे ओलांडताना दिसत आहे. प्रथम ते हळूहळू पहिली लेन क्रॉस करते. आणि नंतर दुभाजकातून रस्त्याची दुसरी लाईन पार करत. हे दृश्य ब्राझीलमधील असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ सध्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 7 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे त्याचप्रमाणे 50000 लोकांनी या व्हिडिओला लाईक केलेले आहे. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट देखील करत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिलेले आहे की, ,”आपण जंगल तोडून महामार्ग तयार केले मग हे असेच होणार.’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, “हा खूप जाड आणि धोकादायक साप आहे.आजपर्यंत यापेक्षा मोठा साप मी पाहिलेला नाही” अशा प्रकारे अनेक लोक या व्हिडिओवर त्यांचे मत व्यक्त करत आहे.

मोदी सरकारमध्ये शिंदे- दादा गटाकडून कोणाकोणाला मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

shinde ajit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणुकीत भाजपप्रणीत NDA ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झालं आहे. NDA ला २९१ जागांवर बहुमत मिळाले असून NDA ने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. परवा म्हणजेच ९ जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला आणि अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला सुद्धा वाटा मिळणार आहे. एकनाथ शिंदेंना २ तर अजित पवारांना १ मंत्रिपद मिळेल असं बोललं जात आहे.

यंदा भाजप स्वबळावळ फक्त २४० जागा जिंकू शकल्याने मित्रपक्षांची सोबत भाजपसाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे मित्रपक्षांना योग्य तो सन्मान राखण्यासाठी भाजपला काही मंत्रिपदाचा त्याग करावा लागणार असून मित्रपक्षांच्या वाट्याला काही मंत्रीपदे द्यावी लागतील. त्यानुसार भाजपने मित्रपक्षांसाठी प्रत्येकी ४ जागांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंच्याकडे ७ खासदारांचे बळ असलयाने त्यांना किमान २ मंत्रीपदे देण्यात येतील तर अजितदादांकडे एकमेव खासदार असला तरी त्यांना मंत्रिपद मिळू शकते.

शिंदे गटाकडून कोणाला मंत्रीपदे मिळण्याची शक्यता

श्रीकांत शिंदे
संदीपान भुमरे
धैर्यशील माने
प्रतापराव चिखलीकर
श्रीरंग बारणे

अजितदादा गटाकडून कोणती नावे चर्चेत

प्रफुल्ल पटेल
सुनील तटकरे

दरम्यान, सत्तास्थापनेत किंगमेकर ठरलेले नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही नेते स्वतःकडे महत्वाची खाती मागत आहेत. चंद्राबाबू नायडू ३ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री मागत असल्याची बातमी समोर आली होती. तसेच लोकसभा अध्यक्षपद सुद्धा स्वतःकडे ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तर नितीशकुमार यांनीही महत्वाची खाती मागितली असल्याच्या चर्चा होत्या. तसेच अग्निवीर योजनेतील उणिवा दूर करण्याची मागणी सुद्धा JDU कडून करण्यात आली आहे. आता मोदी या दोन्ही नेत्यांच्या किती मागण्या पूर्ण करतात ते पाहायला हवं.

Jalgaon News: खुशखबर ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार जळगाव – मुंबई विमानसेवा

jalgaon news

Jalgaon News: जळगावकरांसाठी आता एक खुशखबर आहे. भारत सरकाराची कंपनी असलेल्या अलायन्स एअर कडून जळगाव -मुंबई सेवा लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. खरेतर जळगाव ते मुंबई या मार्गावर हवाई सेवा सुरु व्हावी अशी मागणी उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला आता यश मिळाले असून लवकरच ही विमान सेवा (Jalgaon News) सुरु होणार आहे.

किती होतील उड्डाणे (Jalgaon News)

अलायन्स एअर कडून जळगाव-मुंबई ही विमानसेवा 16 जून पासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोन वेळा ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव -मुंबई हवाईसेवा सुरु झाल्यामुळे व्यापारी आणि व्यवसायिकांचा वेळ वाचणार आहे. सध्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी ट्रॅव्हल्स आणि सरकारी बाय रोड वाहनांचा वापर करावा लागतो. यासाठी बराच वेळ लागतो. विमान सेवा सुरु झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 31 मे रोजी जळगाव-मुंबई विमानसेवेला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून (Jalgaon News) हिरवा कंदील मिळाला होता. सोबतच या सेबाबतचा डिजिटल बॅनर देखील प्रसिद्ध करण्यात आला होता.

लवकरच जळगाव-अहमदाबाद विमानसेवा (Jalgaon News)

मुंबईप्रमाणे गुजरात येथील अहमदाबाद मध्ये देखील उद्योग व व्यापार तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची (Jalgaon News) संख्या मोठी आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार, अलायन्स एअर कंपनीकडून जळगाव-अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार असून, याची लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे.

Weather Forecast | मुंबई-ठाण्याला पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा, ‘या’ भागाला दिला येल्लो अलर्ट

Weather Forecast

Weather Forecast | महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 48 तासात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट झाली करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकणात देखील पुढील दोन दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडणार आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज | Weather Forecast

महाराष्ट्रातील पुढील 48 तासात मुंबई, पुणे, पालघर, कोकण आणि मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या भागात पावसाचा येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी मान्सून पूर्ण पावसाने देखील हजेरी लावलेली आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस लवकरच दाखल होणार आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

आज महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर , हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यांमध्ये ऊन सावलीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे पाऊस जरी पडत असला, तरी दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी उष्णता वाढलेली आहे. त्यामुळे लोकांना त्रास देखील होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची देखील लागवड सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bajaj Chetak 2901 : Bajaj ने स्वस्तात लाँच केली Electric Scooter; पहा काय फीचर्स मिळतात?

Bajaj Chetak 2901 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आकर्षक लूक आणि चालवायला सुद्धा आरामदायी असल्याने आणि महत्वाची बाब म्हणजे पेट्रोलचा खर्च वाचत असल्याने नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Bajaj ने आपल्या इलेक्ट्रिक चेतकचे नवीन व्हेरिएन्ट लाँच केलं आहे. Bajaj Chetak 2901 असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव असून आधीच्या मॉडेलपेक्षा अगदी कमी किमतीत आणि ग्राहकांना परवडेल असा दरात हि इलेक्ट्रिक स्कुटर उपलब्ध आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ….

बजाज चेतक 2901 ची डिझाईन हि आधीच्या मॉडेल प्रमाणेच आहे, मात्र यामध्ये बोल्ड कलर ऑप्शन देण्यात आलेत, ज्यामध्ये पांढरा, काळा, निळा आणि पिवळ्या रंगाचा समावेश आहे. ARAI प्रमाणपत्रानुसार, एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर 123 किलोमीटर अंतर आरामात पार करू शकते. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी सुद्धा हि स्कुटर ग्राहकांच्या उपयोगाला येईल यात शंका नाही.

किंमत किती? Bajaj Chetak 2901

Bajaj Chetak 2901 ची कीमत 95,998 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या १५ जूनपासून या इलेक्ट्रिक स्कुटरची विक्री सुरू होणार आहे. भारतीय बाजारात हि स्कुटर Ather Rizta,TVS iQube, Ola S1X आणि Ola S1 Air या गाडयांना तगडी फाईट देईल. बजाज ऑटो लिमिटेडचे ​​अर्बनाइटचे अध्यक्ष एरिक वोस म्हणाले, “चेतक डीलरशिपवर चेतक 2901 ची शिपमेंट सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. चेतक 2901 ही डिझाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमत असलेली मेटल बॉडी इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना कमी पैशात मिळत आहे. तुम्ही हि इलेक्ट्रिक स्कुटर जवळपास पेट्रोल स्कुटरच्या किमतीत खरेदी करू शकता. आम्हाला विश्वास आहे की चेतक 2901 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत चांगलं यश मिळवेल.

8 Th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ?

8 Th Pay Commission

8 Th Pay Commission | नुकतेच लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झालेला आहे. यावर्षी बहुमताने भाजप सरकार आघाडीवर आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार आहे. मोदी सरकार हे पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नेमले जाणार आहेत. त्यामुळे आता नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे आता केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांवर खुश होईल, असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नवे सरकार आल्यावर आता आठवा वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. परंतु या संबंधित कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही. पुढील वर्षापर्यंत मोदी सरकार मोठी घोषणा करू शकते. अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पुढील वेतन आयोगाची तयारी | 8 Th Pay Commission

केंद्र सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करू शकतात, अशी माहिती आलेली आहे. आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी चर्चा होती. परंतु पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होईल. अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारने याबाबत अजून कोणतेही विधान केलेले नाही. परंतु या नव्या चर्चांना आता उधान आलेले आहे. पावसाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पगारात होणार वाढ

सरकारने जर आठवा वेतन आयोग लागू केला, तर पगारात मोठी वाढ होऊ शकते. याबाबतचे नियोजन आयोग देखील स्थापन होणार आहे. आणि असं मंत्रालयाला ही जबाबदारी जाणार आहे, अशी चर्चा चालू आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय घेऊ शकतात.

किती पगार वाढ होणार ?

सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगाचे सगळं काही सुरक्षित झाले, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात खूप मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 44.44% वाढ होऊ शकते.

EPFO च्या नियमात महत्वाचे बदल!! आता पैसे काढताना द्यावे लागणार नाहीत हे डॉक्युमेंट

EPFO rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी PF काढण्याच्या नियमात काही महत्वाचे बदल केले आहेत. या नियमानुसार, इथून पुढे ईपीएफओ सदस्यांना बँक पासबुक किंवा चेक लीफची कॉपी देण्याची गरज नसेल. यापूर्वी EPFO कडून क्लेम मिळविण्यासाठी ग्राहकांना चेकबुकचा फोटो देणे बंधणकारक होते. परंतु इथून पुढे बँक पासबुक किंवा चेक लीफची प्रत द्यावी लागणार नाही.

EPFO च्या नव्या नियमामुळे, इथून पुढे ऑनलाइन क्लेम व्हेरिफिकेशन बँक पासबुक किंवा चेक लीफच्या इमेजशिवाय केले जाईल. यामुळे ऑनलाईन क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान होणार आहे. EPFO ने 8 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हणले आहे की, EPFO चे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी अनेक ठिकाणी क्लेम सेटलमेंट ऑफिसेस सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे देखील कामकाजाच्या प्रक्रियेचा वेग वाढेल.

दरम्यान, EPFO ने PF खातेधारकांच्या मृत्यूच्या दाव्याचे नियम ही सोपे केले आहेत. यामुळे कोणत्याही खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे सहज मिळतील. EPFO ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जर PF खातेधारकाचा मृत्यू झाला आणि त्याचे खाते आधारशी लिंक केलेले नसेल किंवा पीएफ खात्यामध्ये टाकलेली माहिती आधार कार्डशी जुळत नसेल, तर अशा परिस्थितीत देखील खात्यात जमा केलेली रक्कम नामांकित व्यक्तीला दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत प्रथम संपूर्ण चौकशी केली जाईल. यानंतर रक्कम देण्यात येईल.

SBI FD Scheme | SBI बँकेच्या या FD योजनेत करा गुंतवणूक, 400 दिवसातच बनाल श्रीमंत

SBI FD Scheme

SBI FD Scheme | अनेक लोक हे पैसे गुंतवणूक करून ठेवत असतात. काही लोक FD मध्ये गुंतवणूक करतात. कारण FD मध्ये त्यांचे पैसे पसुरक्षित राहतात. आणि त्यांना परतावा देखील खूप चांगला मिळतो. जर तुम्ही देखील आता FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एसबीआय बँकेची एक FD योजना आहे. जी तुमच्यासाठी खूप चांगली ठरेल. एसबीआय बँकेच्या या योजनेचे नाव अमृत कलश योजना असे आहे. ही बँक या 400 दिवसांच्या FD वर चांगला परतावा देते. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून 400 दिवसात चांगला परतावा मिळू शकता.

एसबीआयच्या (SBI FD Scheme) अमृत कलश योजनेचा लाभ आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. ही FD योजना 400 दिवसांची असते. ज्यामध्ये 7.6% दराने व्याज मिळते जर तुम्हाला देखील एसबीआयमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ही FD करू शकता. कारण नंतर बँक ही योजना बंद करणार आहे.

एसबीआयच्या अमृत कलश स्पेशल योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीवर त्यांना 7.10% दराने व्याज मिळते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 7.60% दराने व्याज देते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

400 दिवसात बनाल श्रीमंत | SBI FD Scheme

एसबीआयची अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. या अमृत कलश FD गुंतवणूकदारांना मासिक, त्रीमासिक आणि सहामासिक दिले जाते. या SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर टीडीएस कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकांना दिले जातात काढले. 400 दिवसांच्या आज जर तुम्ही पैसे काढले तर त्यामध्ये तुम्हाला दंड लागू शकतो. दंड हा लागू दरापेक्षा 0.50% ते 1 टक्का कमी व्याजदर असते.