Monday, December 22, 2025
Home Blog Page 696

SBI FD Scheme | SBI बँकेच्या या FD योजनेत करा गुंतवणूक, 400 दिवसातच बनाल श्रीमंत

SBI FD Scheme

SBI FD Scheme | अनेक लोक हे पैसे गुंतवणूक करून ठेवत असतात. काही लोक FD मध्ये गुंतवणूक करतात. कारण FD मध्ये त्यांचे पैसे पसुरक्षित राहतात. आणि त्यांना परतावा देखील खूप चांगला मिळतो. जर तुम्ही देखील आता FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एसबीआय बँकेची एक FD योजना आहे. जी तुमच्यासाठी खूप चांगली ठरेल. एसबीआय बँकेच्या या योजनेचे नाव अमृत कलश योजना असे आहे. ही बँक या 400 दिवसांच्या FD वर चांगला परतावा देते. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून 400 दिवसात चांगला परतावा मिळू शकता.

एसबीआयच्या (SBI FD Scheme) अमृत कलश योजनेचा लाभ आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. ही FD योजना 400 दिवसांची असते. ज्यामध्ये 7.6% दराने व्याज मिळते जर तुम्हाला देखील एसबीआयमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ही FD करू शकता. कारण नंतर बँक ही योजना बंद करणार आहे.

एसबीआयच्या अमृत कलश स्पेशल योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीवर त्यांना 7.10% दराने व्याज मिळते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 7.60% दराने व्याज देते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

400 दिवसात बनाल श्रीमंत | SBI FD Scheme

एसबीआयची अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. या अमृत कलश FD गुंतवणूकदारांना मासिक, त्रीमासिक आणि सहामासिक दिले जाते. या SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर टीडीएस कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकांना दिले जातात काढले. 400 दिवसांच्या आज जर तुम्ही पैसे काढले तर त्यामध्ये तुम्हाला दंड लागू शकतो. दंड हा लागू दरापेक्षा 0.50% ते 1 टक्का कमी व्याजदर असते.

NDA च्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड; 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीमध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आज NDA ची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली. पुढे नरेंद्र मोदींच्या शपथविधीची ही तारीख ठरवण्यात आली. त्यानुसार येत्या 9 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा 9 जूनला 6 वाजता पार पडेल.

आज एनडीएची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. या बैठकीच्या सुरुवातीलाच राजनाथ सिंह यांनी NDA च्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. हा ठराव मंजूर होताच नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, NDA च्या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “एनडीएवर देशाचा अढळ विश्वास आहे. आता लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. गेल्या 10 वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर आहे. आता आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही आमच्या पूर्वीच्या कामाचे सर्व रेकॉर्ड मोडावेत अशी जनतेची इच्छा आहे.

Sunita Williams Dance Video | अंतराळात डान्स करताना सुनीता विल्यम्स यांचा व्हिडिओ व्हायरल; एकदा पाहाच

Sunita Williams Dance Video

Sunita Williams Dance Video | भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्सन यांनी तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेतलेली आहे. अंतराळात नीट कोणी उभे देखील राहू शकत नाही. अशातच सुनीता विल्यम्सचा अंतराळातून डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाचे प्रमुख आकर्षण बनत आहे. अनेकजण या विषयावर त्यांच्या कमेंट करत आहेत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करत आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर‌ यांनी गुरुवारी म्हणजे 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. त्यांनी अंतराळात झेप घेतलेली आहे. सुनिता विल्यम्स यांनी 2007 आणि 2012 मध्ये अंतराळ प्रवास केला आहे. अंतराळ्यात जाण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित केल्यानंतर 26 तासांनी बोईंग अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यात आले.

सुनीता विल्यम्सने स्पेस स्टेशनवर पोहोचताच डान्स करून हा आनंद साजरा केला. डान्स केल्यानंतर त्यांनी अंतराळात उपस्थित असलेल्या इतर अंतराळवीरांनाही मिठी मारली. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहप्रवासी बुच विल्मोर यांचे स्टेशनवर बेल वाजवून स्वागत करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

BSNL vs Airtel | Airtel की BSNL !! 35 दिवसांच्या वैधतेसह कशात मिळणार जास्त फायदा

BSNL vs Airtel

BSNL vs Airtel | भारतामध्ये अनेक दूरसंचार कंपन्या आहेत. ज्याचा फायदा नागरिकांना वेळोवेळी होत असतो. BSNL ही ग्राहकांमध्ये अत्यंत स्वस्त आणि जास्त काळासाठी अनेक योजना घेऊन येत असतात. अशातच आता या कंपनीने ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन केला आहे. या प्लॅनमध्ये 107 रुपयांमध्ये 35 दिवसांची वैधता आहे . त्याचप्रमाणे एअरटेल देखील त्यांचा ग्राहकांसाठी नवीन प्लॅन घेऊन आली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

BSNL 107 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन | BSNL vs Airtel

BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 35 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची खासियत म्हणजे हा प्लॅन बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, त्याची गती मर्यादा 40kbps पर्यंत कमी होते. हाप्लॅन एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीची वैधता देतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 200 मिनिटांची मोफत व्हॉईस कॉल सेवा मिळेल. याशिवाय या प्लानमध्ये बीएसएनएल ट्यून्स सेवाही ३५ दिवसांसाठी उपलब्ध असेल.

जे लोक कमी पैशात सिम सक्रिय ठेवण्याचा प्लॅन शोधत आहेत त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. या प्लॅनमध्ये 200 मिनिटे कॉलिंग मोफत उपलब्ध आहे. हा प्लॅन तुमचे सिम ३५ दिवस सक्रिय ठेवेल. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही कमी डेटासह स्वस्त प्लॅन शोधत असाल तर ही योजना तुम्हाला मदत करू शकते.

एअरटेल 35 दिवसांची वैधता प्लॅन | BSNL vs Airtel

एअरटेलच्या 35 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची ​​किंमत 289 रुपये आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिले तर ही अतिशय स्वस्त आणि परवडणारी योजना आहे. Airtel आपल्या रु. 289 च्या प्लॅनमध्ये एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सारख्या 35 दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे ऑफर करते. कंपनी या प्लॅनमध्ये 300 एसएमएस मोफत देते. ग्राहकांना 4GB डेटाही मिळत आहे. 289 रुपयांचा हा नवीन रिचार्ज प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो ज्यांना कमी डेटाची आवश्यकता आहे.व

Gold Price Today : सोन्याच्या किमतींनी गाठला नवा उच्चांक; चांदीचा भावही गगनाला

Gold Price Today 7 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. सोने- चांदीच्या किमतींनी (Gold Price Today) आज नवा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 73083 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.16% म्हणजेच 120 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा किरकोळ वाढ दिसत आहे. आज एक किलो चांदी 93754 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७३१२४ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमतीत वाढ पाहायला मिळाली. १० वाजून ३० मिनिटांनी सोन्याचा दराने ७३३२० रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र त्यानंतर हि किंमत (Gold Price Today) कमी कमी होत गेली. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ७२९८१ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७३,७५० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६७६०० रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,600 रुपये
मुंबई – 67,600 रुपये
नागपूर – 67,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,650 रूपये
मुंबई – 73,650 रूपये
नागपूर – 73,650 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

विधान परिषदेच्या निवडणुकीतून राज ठाकरेंची माघार; फडणवीसांच्या विनंतीचा ठेवला मान

Fadanvis and thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी संपल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु मनसे पक्षाने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) त्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतरच मनसे निवडणूक लढवणार नसल्याची माहिती नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपचा एक मार्ग मोकळा झाला आहे.

माध्यमांशी बोलताना नितीन देसाई यांनी सांगितले की, “3 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. यानंतर पुन्हा त्यांची दोनदा चर्चा झाली. त्यावेळी, देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक विनंती केली की विधानपरिषद निवडणुकीच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने डावखरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अभिजीत पानसेंनी माघार घ्यावी. फडणवीसांच्या विनंतीचा मान राखतच राज ठाकरेंनी निर्णय घेतला आहे की, अभिजीत पानसे अर्ज भरणार नाहीत “

त्याचबरोबर, “कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीस यांना सांगितले आहे की, अशी गोष्ट वारंवार होणार नाही. कारण आमचाही स्वतंत्र पक्ष आहे. राजकारणात बऱ्याच गोष्टी घडत असतात, ज्याचा पक्षाला होणारा फायदा कालांतराने दिसतो. निवडणुकीची तयारी खूप चांगली झाली होती. मात्र फडणवीसांच्या विनंतीला मान देत माघारीचा निर्णय घेतला. पक्षाला याचा फायदा नजीकच्या काळात दिसेल” असेही नितीन देसाई यांनी माहिती दिली.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. तसेच या निवडणुकीसाठी मनसेने पूर्ण तयारीही केली होती. त्यामुळेच या निवडणुकीत मनसे आणि भाजप सामना सामना होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होते. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे.

AIESL Bharti 2024 | एयर इंडिया अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, 100 रिक्त जागांसाठी भरती सुरु

AIESL Bharti 2024

AIESL Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विमानतंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 100 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 25 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | AIESL Bharti 2024

  • पदाचे नाव – विमान तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थ तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 100 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2016.
  • रिक्त जागा
  • विमान तंत्रज्ञ – 72 जागा
  • प्रशिक्षणार्थ तंत्रज्ञ – 28 जागा

वेतनश्रेणी

विमानतंत्रज्ञ- 27, 940 रुपये
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ – 15000 रुपये.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • दिलेल्या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • 25 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करण्याचं वक्तव्य फडणवीसांची नवी चाल??

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी… लोकसभेच्या महाराष्ट्राच्या महानिकालात भाजपचे पानिपत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेलं हे धक्कादायक स्टेटमेंट… खरं म्हणजे महायुतीत 28 जागा पदरात पाडून निवडणुकीला लीड करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना कमळाच्या चिन्हावर अवघ्या नऊ उमेदवारांना विजयाचा गुलाल लावता आला…45 प्लसचं स्वप्न पाहून निकालाची वाट पाहणाऱ्या महायुतीची गाडी अवघ्या १७ जागांवर गुंडाळली.. अर्थात या सगळ्याचं खापर फडणवीसांवर फुटणं स्वाभाविक होतं आणि ते फुटलं देखील… या निकालामुळे फडणवीसांच्या भाजपातील राजकारणातील सुर्य मावळणार हे तर जवळजवळ निश्चितय. पण पराभवाची जबाबदारी घेत सरकारमधून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करुन फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत… आता हे पक्षी नेमके कोणते आहेत? आणि फडणवीस यातून कुणाला घायाल करु पाहतायत? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

फडणवीसांनी मोकळं करण्याच्या वक्तव्यातून पहिला पक्षी मारलाय तो दिल्लीतून त्यांच्यावर असणाऱ्या दबावाचा… खरं म्हणजे शिंदेंना शिवसेनेतून फोडून आपल्यासोबत घेतलं तेव्हापासूनच आपल्याला सरकारच्या बाहेर राहून पक्ष संघटनेचं काम करायचंय, असा फडणवीसांचा सूर होता. पण दिल्लीतून दबाव टाकून सत्तेत सहभागी व्हायला लावल्यामुळे फडणवीसांना नाईलाजाने उपमुख्यमंत्री व्हायला लागलं.. सिएम टू डेप्युटी सीएम असा उलटा प्रवास करायला लागल्यामुळे फडणवीसांची इमेजही बरीच डागाळली होती. त्यात दोन पक्ष फोडण्याच्या जनतेचा सगळा राग फडणवीसांवरच फुटत असल्यानं आता पक्ष संघटनेत जात पडद्याआड लपून काम करण्याची संधी त्यांना चालून आलीय. राजकारणात फडणवीसांना लाँग टर्म खेळायचं असेल तर या निगेटीव्ह वातावरणात फडणवीसांच्या फायद्याचं काय ठरणार असेल तर ते म्हणजे शांत राहून राजकारणात एक्टीव्ह राहणं… लोकसभेच्या पराभवाचा सगळा ब्लेम आपल्यावर घेत फडणवीसांनी त्यादिशेने एक पाऊल टाकलंय, असं म्हणायला हरकत नाही.

सरकारमधून मोकळं होण्याचं स्टेटमेंट करुन फडणवीसांनी मारलेला दुसरा पक्षी आहे तो विनोद तावडेंच्या समांतर राजकारणाला शह देण्याचा… २०१४ चा विचार केला तर राज्यात भाजपच्या पहिल्या फळीतील मोठं नाव म्हणून विनोद तावडेंकडं पाहीलं जात होतं. मात्र तावडेंना ओव्हरटेक करत फडणवीस पुढे निघून गेले… यानंतर फडणवीसांनी स्वत:च राजकारण सेफ करण्यासाठी स्पर्धेतल्या नेत्यांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरु केला.. अर्थात यात तावडेंचं नाव सर्वात टॉपला होतं. फडणवीसांनी आपल्या फेवरमधल्या नेत्यांना बळ दिल्यामुळे तावडे पक्षात आपोआप साईडलाईन झाले.. पण तावडेंनी शांत राहात हळूहळू पक्ष संघटनेची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली… तावडे पुढे महामंत्री झाले…तावडेंच्या शब्दाला दिल्लीत मोठा मान मिळू लागला… लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात तावडेंनी पुन्हा आपली माणसं पेरायला सुरुवात केली… अर्थात फडणवीसांसाठी हा रेड सिग्नल होता… त्यामुळे वेळीच पक्ष संघटनेत जाऊन स्वत: ची पोजिशन सेट करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तावडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी फडणवीसांनी अगदी सगळ्या बाबींचा विचार करुन हे स्टेटमेंट केलंय…

सरकारमधून मोकळं होण्याचं स्टेटमेंट करुन फडणवीसांनी मारलेला शेवटचा पक्षी आहे तो विधानसभेच्या पॉवर पॉलिटिक्सच्या केंद्रस्थानी जाण्याचा… भाजपने सर्वेंचा हवाला देत अनेक जागा आपल्याकडे वळत्या करून घेतल्या. एवढंच नाही तर शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा सोडण्यामध्येही यामुळेच बराचसा विलंब झाला… या सगळ्याचा परिणाम आता सगळ्यांच्या समोर आहे.. महाराष्ट्राच्या जनतेने या फोडाफोडीच्या राजकारणाला सपशेल तोंडावर आपटलंय, असे आकडे सांगतायेत. पण लोकसभेच्या परफॉर्मन्सवर विधानसभेला जागा सुटतील असा महायुतीचा आधीच फॉर्मुला ठरल्यामुळे कमी जागांवरच गुलाल लागल्याने भाजपची मोठी कोंडी होणार आहे.. शिंदे आणि अजित पवार हे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी प्रेशर क्रिएट करतील, हे स्पष्टच आहे…तेव्हा लोकसभेचे गणित चुकलं तरी विधानसभेलाही भाजपकडून आपल्यालाच लीड करण्याची इच्छा असल्याचं अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी ही मागणी करून बोलून दाखवलय… अर्थात आमदारकीचं तिकीट वाटप, कुणाला कुठून कोणत्या जागा सोडायच्या याचा कंट्रोलच फडणवीसांना पुन्हा एकदा सरकारमधून मोकळ होऊन मिळणार आहे…

एकूणच काय तर पराभवाची जबाबदारी स्वीकारतानाच पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी इमोशनल गेम कसा खेळायचा? हे शिकावं तर फडणीसांकडूनच…हेच या सगळ्यातून आपल्याला शिकता येऊ शकतं…बाकी मी पुन्हा येईन पासून सुरू झालेला फडणवीसांचा प्रवास मला मोकळं करा…पर्यंत येऊन थांबलाय…या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Indian Railway : RVNL ला भारतीय रेल्वेकडून 390 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली

Indian railway ticket cost

Indian Railway : संपूर्ण भारतात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. एवढेच नाही तर ,मागच्या काही वर्षात भारतातल्या दुर्गम भागाला सुद्धा रेल्वे द्वारे जोडण्याचे काम सुरु आहे. रेल्वे विभाग त्याच्या विस्तारीकरणासाठी आणि अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने पावले उचलत आहे. रेल्वे संदर्भांतली एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे. एका नव्या प्रकल्प बांधणीसाठी RVNL कडे भारतीय रेल्वे (Indian Railway) कडून 3.9 अब्ज रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने सरकारी मालकीच्या रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) कडे सुमारे 3.90 अब्ज रुपयांची ऑर्डर दिली आहे.आरव्हीएनएलने केलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, सीतारामपूर बायपास लाइन बांधण्यासाठी आसनसोल विभागासाठी हा करार आहे. त्यात पुढे म्हटले आहे की पूर्व रेल्वेच्या (Indian Railway) आसनसोल विभागांतर्गत सीतारामपूर बायपास लाईन बांधण्यासाठी RVNL ने पूर्व रेल्वेकडून स्वीकृती पत्र प्राप्त केले आहे.

3.9 अब्ज रुपयांची ऑर्डर (Indian Railway)

“प्रकल्पाची किंमत जीएसटीसह 3.9 अब्ज रुपये आहे आणि प्रकल्पाचा कालावधी 24 महिने आहे,” रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत, RVNL कडे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन, निधी आणि अंमलबजावणीची (Indian Railway) जबाबदारी आहे

शिंदे गटात भूकंप!! 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच पक्षप्रवेश करणार

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे गटात (Shinde Group) बंडाची चाहूल आहे. एकनाथ शिंदे यांचे ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असून लवकरच ते ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे. हे ६ आमदार नेमके कोण आहेत ते मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. उद्धव ठाकरेंना लोकांची प्रचंड सहानभूती मिळाल्याचे पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंचे ९ खासदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले. तर दुसरीकडे शिंदे गटाचे ७ खासदार जिंकले, मात्र निवडणुकीत महायुतीची पूरती वाताहत झाली. अवघ्या १७ जागाच महायुती जिंकता आल्याने युतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील धोका ओळखून शिंदे गटातील ६ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असं बोललं जात आहे.

कोणाकोणाला पक्षात घेणार ?

शिंदे गटात जाऊनही ज्या आमदारांनी आत्तापर्यंत तटस्थ भूमिका घेतली, ठाकरेंवर टीका केली नाही अशा आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा पक्षात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात. असं झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरेल.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना म्हंटल कि, अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत. परंतु त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा? नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.