Share Market News| लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. आज सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीत (Sensex And Nifty) मोठी घसरण होत आहे. जाहीर झालेल्या अंकांनुसार आज सेन्सेक्स तब्बल 5000 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीतमध्ये तब्बल 1800 अंकांनी घसरण झाली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. सकाळपासून गुंतवणुकदारांचे तब्बल 29 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 जूनपासून एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले. या अंदाजावरूनच शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उसळी मारली होती. मात्र मंगळवारी मतमोजणी ला सुरुवात होतात शेअर बाजारात पडझड सुरू झाली. आज सेन्सेक्समधील 27 शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. यासह बँक, फायनान्शियल, आयटी, ऑटो, मेटल, फार्मा, ही लाल रंगातच व्यवहार करत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आज शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले आहे. पॉवर सेक्टर, पीएसयू बँका, मेटल शेअर्स, टेलिकॉम यासह अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स 4389.73 अंकांनी घसरून 72,079.05 वर आला आहे. ही टक्केवारी 5.74 इतकी आहे. यासह निफ्टीही 5.93% च्या मोठ्या नुकसानानंतर 21,884.50 वर बंद झाला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandava Temple) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी विविध देवीदेवतांची पुरातन तसेच प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. यांपैकी काही मंदिरे लोकांना ठाऊक असली तरी मंदिरे मात्र दुर्लक्षित झाली आहेत. आज आपण महाराष्ट्रातील पाच पांडव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे, संपूर्ण भारतात पाच पांडव आणि द्रौपदीचे एकत्र अशी दोनच मंदिरे आहेत. त्यापैकी एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात आहे. चला तर महाराष्ट्रातील हे मंदिर कुठे आहे आणि त्याचा काय इतिहास आहे? हे जाणून घेऊया.
कुठे आहे? (Pandava Temple)
महाराष्ट्रात जुना मुंबई- पुणे महामार्गालगत तळेगाव दाभाडे हे ठिकाण आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेले तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणे हे पाच पांडव आणि द्रौपदीचे अलौकिक मंदिर आहे.
मंदिराचे वैशिट्य
या मंदिराचे तोंड पूर्वमुखी असून आकाराने हे मंदिर बरेच लहान आहे. मंदिराच्या दरवाज्यातून आता पाहता आपल्याला ५ पांडवांच्या बैठ्या मुर्त्या दिसतात. यामध्ये धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव अशा पाच पांडवांच्या बैठक मांडून मांडलेल्या मूर्तींचे दर्शन होते. (Pandava Temple) दरम्यान धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मुर्तींच्या मधोमध एक छोटासा दरवाजा दिसतो. त्यातून आता पाहिले असता एका छोट्याशा चौथऱ्यावर द्रौपदी एका कुशीवर नीजलेल्या अवस्थेत दिसून येते. असं म्हणतात की, वषार्तून दोन वेळा द्रौपदी ६ महिन्याने पूर्वेकडे व पश्चिमेकडे मुख करून विश्रांती घ्यायची.
मंदिराचे बांधकाम
पाच पांडव आणि द्रौपदीचे हे स्थान अत्यंत ऐतिहासिक आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जतन करून ठेवण्यासाठी पाच पांडव आणि द्रौपदीच्या मूर्तींना रंगरंगोटी केली जाते. श्रीमंत सरसेनापती दाभाडे यांच्या घराण्याने या मंदिराची रंगरंगोटी व डागडुजी केली आहे. हे मंदिर एका दगडी चौथ्यावर उभे असून आकाराने फार लहान आहे. (Pandava Temple) मंदिराच्या पाच- सहा पायऱ्या चढून आपण आतमध्ये प्रवेश केला असता पाच पांडवांच्या साधारण साडेचार फूट उंचीच्या बैठ्या मुर्त्या लक्ष वेधून घेतात. एका सरळ ओळीत बसलेल्या पांडवांच्या मागील खोलीत द्रौपदीचे निजलेल्या अवस्थेत दर्शन होते.
मंदिराचा इतिहास
पूर्वीच्या काळात या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जायची. ही आख्यायिका अशी होती की, द्रौपदी दर ६ महिन्यांनी कूस बदलते. ६ महिने पूर्वेकडे तर ६ महिने पश्चिमेकडे तोंड करून नोजते. ही आख्यायिका या मंदिराचे वेगळेपण जपतेय. याशिवाय आणखी बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. ज्यामध्ये असेही म्हटले जाते की, पाच पांडव वनवासात असताना तळेगावी आले होते. तेव्हा द्रौपदी दमल्यामुळे तिने या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती. ते ठिकाण म्हणजेच हे मंदिर.
तर काही लोक असेही म्हणतात की, हे स्थान खुद्द पांडवांनीच द्रौपदीला विश्रांती घेता यावी म्हणून बांधले होते. (Pandava Temple) काही पौराणिक कथांमध्ये म्हटल्यानुसार, द्रौपदीने दिलेल्या एका शितावर भगवान श्रीकृष्णाचे पोट भरले आणि त्यामुळे दुर्वास ऋषींचेही काही न खाता पोट भरले असा उल्लेख आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण म्हणजे हे पाच पांडव अन द्रौपदी मंदिर.
भारतात केवळ २ मंदिरे
भारतात पाच पांडवांसह द्रौपदीचे दर्शन होईल अशी केवळ दोनच मंदिरे आहेत. त्यापैकी एक महाराष्ट्रात पुण्यातील दाभाडे येथे आहे. त्यामुळे हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ मानले जाते. येथील मूळ कलाकृतींवर काही स्थलकालदर्शक किंवा इतर खुणा असू शकतात. (Pandava Temple) मात्र ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केली जाणारी डागडुजी यामद्ये त्या झाकल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. या मंदिरात जवळच एक शिलालेख आहे. तो मात्र आपले लक्ष वेधून घेईल.
कसे जाल?
पुण्यापासून ४० किलोमीटर अंतावर असलेल्या तळेगाव दाभाडेला पोहोचण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग असे दोन पर्याय आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने गेलात तरी तुम्हाला चावडी चौक गाठायचा आहे. (Pandava Temple) पुण्यापासून साधारण तासाभरात या ठिकाणी पोहोचता येईल. आसपासच्या परिसरात आपल्याला राहण्याची, जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.
आपल्याकडे अनेक घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे देवाची पूजा केली जाते. आणि ही पूजा करताना घरात धूप आणि अगरबत्ती लावत असतात. कारण सकाळी आणि संध्याकाळी धूप अगरबत्ती लावल्याने घरात प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. आणि सकारात्मकता वाटू लागते. त्यामुळे अनेक लोक आवडीने आणि उत्साहाने धूप आणि अगरबत्ती लावत असतात. परंतु हाच धूप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरवून शकतो. असे एका अभ्यासात नमूद करण्यात आलेले आहे .घरात नियमितपणे जर अगरबत्ती आणि धूप लावत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.
ज्याप्रमाणे धूम्रपान केल्याने आपल्या फुप्फुसंमध्ये धूर जातो. आणि आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे घरात धूप आणि अगरबत्ती लावल्याने देखील होण्याचा धक्का असतो. त्यामुळे बंद खोलीमध्ये कधीही अगरबत्ती लावू नका. अगरबत्ती लावायची असेल तर मोकळ्या हवेत लावा. त्याचप्रमाणे धूपाच्या आणि अगरबत्तीच्या धुरात देखील जास्त वेळ बसू नका.
जर घरामध्ये कॅन्सरचे पेशंट असेल तर घरात धूप आणि अगरबत्ती लावणे पूर्णपणे टाळा. कारण की या धुरामुळे त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो. आणि त्याच्या जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे तूप आणि अगरबत्तीने घरात वातावरण कितीही प्रसन्न होत असले, कितीही सकारात्मकता येत असेल, तरी एका प्रमाणामध्ये धूप आणि अगरबत्तीचा वापर प्रमाणात करणे गरजेचे आहे. धूप आणि अगरबत्ती लावल्यावर घरातील दरवाजा आणि खिडक्या उघडा ठेवा. जेणेकरून अगरबत्तीचा धूर बाहेर जाईल आणि तुमच्या आरोग्याला जास्त हानी होणार नाही.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पुन्हा जनतेच्या विश्वासावर सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. मात्र या निवडणुकीत शशिकांत शिंदे विरोध उदयनराजे भोसले यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. आज लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत चौदाव्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शिंदेंना मागे टाकले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर विजयाच्या घोषणा केल्या. त्यावेळी उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले.
मतमोजणीच्या चौदाव्या फेरीमध्ये उदयनराजे भोसले यांनी बऱ्याच प्रतीक्षेनंतर 9 हजार मतांची आघाडी घेतली. ज्यामुळे जलमंदिर पॅलेस बाहेर शेकडाे कार्यकर्त्यांनी “एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज” अशी घोषणाबाजी केली. पुढे कार्यकर्त्यांचा हा जल्लोष पाहून उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी दमयंतीराजे भोसले या देखील उपस्थित होत्या. त्यांनीं उदयनराजे भोसले भावूक झालेले पाहून त्यांना प्रेमाने मिठी मारली. पुढे, उदयनराजे हात जोडून जनतेचे आभार मानतात.
महत्वाचे म्हणजे, सध्या सोशल मीडियावर उदयनराजे भोसले यांचा हाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आघाडीवर आल्यानंतर कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे निकालादरम्यान उदयनराजे भोसले यांचा हा व्हिडिओ चर्चेचा भाग बनला आहे. दरम्यान, सातारा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून उदयनराजे भोसले पिछाडीवर होते. परंतु पंधराव्या फेरीनंतर त्यांनी 9736 मतांची आघाडी घेतली.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Attractions in Kanyakumari) दक्षिण भारताला अलौकिक नैसर्गिक सौंदर्य, पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे. येथील तामिळनाडू हे सर्वात सुंदर, शांत आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न असे ठिकाण मानले जाते. अशा या तामिळनाडूतील कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक म्हणून ओळखले जाते. कन्याकुमारी म्हणजे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकीकरणाचा एक अनोखा संगम आहे, असे म्हणता येईल. इथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे जर तुम्ही कन्याकुमारीला फिरायला जायचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगू त्या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
1. थनुमलयन मंदिर (Top Attractions in Kanyakumari)
कन्याकुमारीमध्ये थनुमलयन मंदिर आहे. ज्याला बऱ्याच ठिकाणी थानुमलयन कोविल असेही म्हणतात. या मंदिराचे निस्सीम सौंदर्य मनाला मोहित करते. अत्यंत पवित्र आणि अलौकिक अनुभूती देणारे हे धार्मिक स्थळ पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मंडळी येत असतात.
2. अवर लेडी ऑफ रॅन्सम चर्च
कन्याकुमारी शहरात पाहण्यासारखी अनेक स्थळे आहेत. ज्यामध्ये अवर लेडी ऑफ रॅन्सम चर्च एक सर्वाधिक सुंदर असे स्थळ आहे. (Top Attractions in Kanyakumari) या ठिकाणी अध्यात्मासह अनेक ऐतिहासिक शिल्पे पहायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांसाठी हे स्थळ आकर्षणाची बाब ठरते.
3. विवेकानंद रॉक मेमोरियल
कन्याकुमारीच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे विवेकानंद रॉक मेमोरियल. इथे स्वामी विवेकानंद यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते. (Top Attractions in Kanyakumari) या ठिकाणी बरेच लोक शांतता आणि अध्यात्मात लीन होण्यासाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या स्थळाला भेट दिली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी येथे तब्बल ४० तास ध्यानसाधना केली होती. त्यामुळे हे स्थळ चांगलेच चर्चेत आले होते,
4. थिरुवल्लुवर पुतळा
कन्याकुमारीच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांमध्ये थिरुवल्लुवर पुतळा या स्थानाचे विशेष महत्व आहे. तमिळ साहित्यातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक म्हणून या पुतळ्याची ओळख आहे. (Top Attractions in Kanyakumari) माहितीनुसार, तिरुक्कुलचे लेखक तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा आहे. जो पाहून एखादी जिवंत कलाकृती पाहिल्याचा अनुभव घेता येईल.
5. थिरपराप्पू फॉल्स
थिरपराप्पू फॉल्स हा एक अतिशय सुंदर धबधबा असून कन्याकुमारीच्या सर्वोत्तम ठिकाणांमध्ये याचा समावेश आहे. या धबधब्याच्या पाण्याची खळखळ आणि शुभ्रता पर्यटकांना आकर्षित करते. (Top Attractions in Kanyakumari)
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holiday Destinations) बऱ्याचदा आपल्याला फिरायची खूप इच्छा असते. पण काही ना काही कारणांमुळे आपल्याला ऑफिसमधून सुट्टी घेता येत नाही. अचानक सुट्टी मागितली तर बॉस भडकणार आणि सुट्टी नाही घेतली तर घरातल्यांचा पारा चढणार. अशी द्विधा मनस्थिती झाली असताना बऱ्याच लोकांसाठी वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन बेस्ट ठरतो. आजकाल अनेक ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जाते. ज्यामुळे कामातून सुट्टी घ्यावी लागत नाही आणि त्यासोबत फिरणंसुद्धा होतं.
जर तुमच्याही ऑफिसमधून सुट्टी मिळत नसेल पण वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध असेल तर कामच झालं. वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन निवडा आणि आम्ही सांगतो त्या स्टेकेशन लोकेशन्सला भेट द्या. याशिवाय वर्कहोलिक लोकांसाठी कामासोबत आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. (Holiday Destinations) यामुळे दोन फायदे होतात. एक तुमच्या ऑफिसचं काम थांबणार नाही आणि दुसरं म्हणजे कुटुंबातील कुणी नाराजसुद्धा होणार नाही. चला तर देशातील टॉप स्टेकेशन डेस्टिनेशन्स कोणते ते जाणून घेऊया.
1. लोणावळा
महाराष्ट्रातील लोणावळा हे अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक कायम येत असतात. (Holiday Destinations) इथला सुंदर निसर्ग, डोंगर – दऱ्या, छोटे मोठे धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले कायम पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. या ठिकाणी अनेक चांगले रिसॉर्ट्स आहेत. जिथे तुम्ही उत्तम स्टेकेशन प्लॅन करू शकता.
2. उटी
दक्षिण भागातील उटी हे अतिशय सुंदर असे हिल स्टेशन आहे. (Holiday Destinations) इथले थंडगार हवामान आणि हिरव्यागार चहाचे मळे पर्यटकांना आकर्षित करतात. उटीमध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. जसे की, बोटॅनिकल गार्डन, उटी लेक आणि दोड्डाबेट्टा पीक. याशिवाय इथे अनेक चांगले आणि लक्झरी हॉटेल्स तसेच रिसॉर्ट आहेत. जिथे तुम्ही अगदी शांत आणि निवांत स्टेकेशन एन्जॉय करू शकता.
3. धर्मशाला (Holiday Destinations)
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे कायम पर्यटकांची गर्दी असते. हे तिबेटी संस्कृती, मठ आणि सुंदर टेकड्यांसाठी प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. तसेच धर्मशाला येथे तुम्हाला दलाई लामा मंदिर, भागसुनाग धबधबा आणि त्रिंड ट्रेकचा आनंद घेता. या ठिकाणी बरीच योग आणि ध्यान केंद्रे आहेत. जिथे तुम्ही मनःशांतीसाठी जाऊ शकता.
4. अल्मोडा
कुमाऊं उत्तराखंडच्या टेकड्यांमध्ये अल्मोडा नावाचे एक सुंदर हिलस्टेशन आहे. (Holiday Destinations) जिथे पर्यटक ऐतिहासिक मंदिरे, पाइन जंगले आणि हिमालयाची सुंदर झलक पाहण्यासाठीयेतात . इथले थंडगार आल्हाददायी वातावरण पर्यटकांना मोहित करते.
5. कुर्ग
कर्नाटकातील कुर्ग हिरव्यागार टेकड्या आणि कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला एलिफंट कॅम्प, अॅबी फॉल्स आणि राजाचे आसन अशी काही सुंदर स्थळे एक्स्प्लोर करता येतील. (Holiday Destinations) येथे अनेक लक्झरी होमस्टे आणि अॅडव्हेंचर ऑक्टीविटी स्टेकेशन आहेत. जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मस्त वेळ घालवू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) याना फोन लावला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नितीशकुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नितीशकुमार यांना INDIA आघाडीत येण्याची विनंती करण्यात येणार आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या JDU १२ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांचे महत्व वाढलं आहे. इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी नितीश कुमारांना फोन केल्याचं बोललं जात आहे. नितीशकुमार याना INDIA आघाडीकडून उपपंतप्रधान करण्यात येईल असेही म्हंटल जात आहे. नितीशकुमार यांच्याशिवाय चंद्राबाबू नायडू यांनाही इंडिया आघाडी सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान ,नितीश कुमार यांचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे आताही राजकीय परिस्थिती पाहून नितीशकुमार पुनः एकदा इंडिया आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. यावर जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी प्रतिक्रिया देत म्हंटल कि, आम्ही कुठेही जाणार नाही, जिथे आहोत तिथेच राहणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र नितीशकुमार कधी काय करतील? कोणती भूमिका घेतील याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा शक्य नाही हे सुद्धा नाकारता येत नाही.
Kolhapur Loksabha Election Result 2024| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने श्रीमंत छत्रपती शाहू उमेदवार म्हणून उभे राहिल्यापासून देशाचे लक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. अशातच आज लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना शाहू महाराजांची लीड 54 हजारांवर पोहचली आहे. शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत मान आणि मत गादीलाच दिले असल्याचे आता स्पष्ट होत आहे. यात शाहू महाराज यांचा विजयाकडील कल पाहून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्यात बंटी पाटलांनी आघाडी घेतली होती. तस पाहिले तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची होती.. त्यामुळे शाहू महाराजांनी ठाकरेंच्या मशालीवर महाविकास आघाडीकडून लढावं अशी ठाकरेंची इच्छा होती. परंतु बंटी पाटलांच्या विश्वासावर शाहू महाराजांनी मशालीवर न लढता काँग्रेसच्या हातावर लढणं पसंत केलं. परिणामी ठाकरेंनी शाहू महाराजांचा मान राखत काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली. आता जबाबदरी होती ती बंटी पाटलांची. इतक सगळं केल्यानंतर आता शाहूंच्या विजयासाठी बंटी पाटलांनी कोल्हापूरची सगळी सूत्रे हातात घेतली आणि संपूर्ण कोल्हापूर पिंजून काढला.
निवडणूक जिंकून कशी आणायची याचं पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात आधीपासूनच होती. त्यामुळे निकालानंतरच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शाहू महाराजांच्या विजयाचा दावा आधीपासूनच करण्यात आला होता. आता सतेज पाटलांचा कोल्हापुरातील करिश्मा, अगदी बूथ मॅनेजमेंट पासून केलेलं नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जीवावर शाहू महाराजांचा विजय नक्की झाला असल्याचे पाहिला मिळत आहे. कोल्हापुरातील काँग्रेसचा मताधिक्य जास्त असलेल्या करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात जास्तीच झालेल्या मतदानामुळे शाहू महाराजांचा विजय सोप्पा झाला आहे.
…. म्हणून शाहू महाराज विजयाच्या जवळ (Kolhapur Loksabha Election Result 2024)
सतेज पाटील यांच्यासोबत ऋतुराज पाटील, जयश्री पाटील आणि पी एन पाटील यांनी शाहू महाराजांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. त्याउलट महायुतीमध्ये एकदिलाने काम झालं नाही असं बोललं जात आहे. त्यातच संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर दत्तक पुत्राचा आरोप केल्यानंतर तर जनतेमध्ये शाहू महाराजांबद्दलची सहानभूती आणखी वाढली होती आणि त्याचा फायदा शाहू महाराजांना झाला. शाहू महाराजांची इमेज सुद्धा त्यांच्या विजयासाठी महत्वाची मानली जात आहे. भाजप आणि मोदी सरकार विरोधात असलेल वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीचे आधीपासून असलेले वलय शाहू महाराजांच्या पथ्यावर पडलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेने सुद्धा वार फिरलं असल्याचं चित्र आज दिसत आहे. याचाच परिणाम पाहता आज शाहू महाराज विजयापर्यंत पोहोचले आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Releases On OTT) थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांची जितकी संख्या आहे कदाचित तितकीच संख्या आता घरबसल्या डिजिटल प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची असेल. यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म देखील दररोज नवनवीन सिनेमे तसेच वेब सिरीजसारख्या अनोख्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणताना दिसतात. मे महिन्याचा शेवटचा आठवडा डिजिटल प्लॅटफॉर्म युजर्ससाठी चांगला धमाकेदार ठरला. दरम्यान, या आठवड्यात ‘पंचायत ३’ ही बहुप्रतीक्षित सिरीज देखील रिलीज झाली. त्यामुळे आता येत्या दिवसांत जून महिना कोणकोणते सिनेमे आणि सिरीज घेऊन येणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय. चला तर याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
1. गुनाह (New Releases On OTT)
जर तुम्हाला क्राईम सिरीज किंवा शो आवडत असतील तर ‘गुनाह’ ही सिरीज तुमच्यासाठी खास ठरेल. मुख्य म्हणजे, या वेब सीरिजमधून मराठी अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत दिसतो आहे.
तर त्याच्यासोबत टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती मध्यवर्ती भूमिकेत आणि इबाद खान महत्वाच्या भूमिकेत दिसतोय. ही वेब सिरीज ३ जून २०२४ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
2. द लिजेंड ऑफ हनुमान
द लिजेंड ऑफ हनुमानचा हा चौथा सीझन कमालीचा लक्षवेधी आहे. या सीझनचे कथानक हनुमानाभोवती फिरत असून यामध्ये रामाची सेवा करण्यासाठी महादेव हनुमंताच्या अवतारात कसा जन्म घेतात? हे दाखवण्यात आले आहे.
(New Releases On OTT) त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा शो आवडीने पाहू शकेल. हा शो तुम्ही येत्या ५ जून २०२४ पासून डिस्ने प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल.
3. बडे मियाँ छोटे मियाँ
अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ अभिनित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट थिएटर रिलीजनंतर आता OTT रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
(New Releases On OTT) हा चित्रपट येत्या ६ जून २०२४ पासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास ६५ कोटी रुपये होते. यानंतर आता ओटीटीवर हा सिनेमा काय जादू करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
4. ब्लॅकआउट
क्राईमशी संबंधित कोणताही ड्रामा पाहणे तुम्हाला आवडत असेल तर ‘ब्लॅकआउट’ हा सिनेमासुद्धा एक चांगला पर्याय आहे. या सिनेमाचे कथानक एका क्राईम रिपोर्टरभोवती फिरत आहे. जो लोभ आणि खोटेपणाच्या जगात अक्षरशः फसला आहे.
(New Releases On OTT) या सिनेमात अभिनेता विक्रांत मॅसी, मौनी रॉय आणि सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या ७ जून २०२४ रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
5. गुल्लक ४
‘गुलक ४’ ही बहुप्रतीक्षित वेब सिरीज येत्या ७ जून २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लीव्हवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये एका छोट्या शहरात राहणाऱ्या मिश्रा या मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट पहायला मिळेल.
(New Releases On OTT) यामध्ये जमील खान, हर्ष मायार, गीतांजली कुलकर्णी आणि वैभव राज गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका पहायला मिळणार आहेत.
6. हायरारकी
हायरारकी ही एक कोरियन वेब सीरिज आहे. ही वेब सिरीज एका शाळेच्या कथेवर आधारित आहे. यामध्ये किशोरवयीन विद्यार्थी प्रेमात पडतात आणि मग कशी रंजक होत जाते ते पहायला मिळेल. ही कोरियन सीरिज येत्या ७ जून २०२४ पासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. (New Releases On OTT)
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sant Dnyaneshwaranchi Muktai) अध्यात्माबाबत बोलायचे झाले की, वारकरी संप्रदायाचा उल्लेख आवर्जून केला जातो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांना भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मूर्तिमंत उदाहरण मानले जाते. यांपैकी संत मुक्ताबाईंनी आपल्या लहानग्या वयात आई- वडिलांमागे एकहाती कुटुंब सांभाळत आपल्या भावंडांची कोणत्याही अटी शर्तींशिवाय माऊली होण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांचा साधेपणा आणि भक्तीमार्गावरील वाटचाल अत्यंत प्रेरणादायी ठरली. अशा मुक्ताबाईंचा जीवनप्रवास सोपा नव्हता. मात्र, प्रेरणादायी होता. तोच आता रुपेरी पडद्यावर उलघडणार आहे.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हायरल होत आहेत. संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडणारा हा चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित करत आहेत. माहितीनुसार, हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.
पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर समोर येताच यामधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची झलक दिसली आहे. ज्यात आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी दिसत आहे. मुक्ताईचे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर चेतनादायी होते.
(Sant Dnyaneshwaranchi Muktai) त्यांनी लहानग्या वयात मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी आपल्या प्रवासात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. इतकेच नव्हे तर स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. अशी मुक्ताई आपल्या भावंडांसाठी माता, भगिनी, गुरु तर कधी शिष्या झाली. अशा मुक्ताईचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.
‘हे’ कलाकार साकारणार महत्वाची भूमिका
मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचे नाते अतिशय विलक्षण होते. मुक्ताईने ज्ञानेश्वरांना आपले गुरु मानले होते. मात्र, प्रसंगी त्या ज्ञानेश्वरांना उपदेशही करत. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी केलेले वर्णन असे की, ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई।।’ अशा या मुक्ताईची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे.
(Sant Dnyaneshwaranchi Muktai) यामध्ये मुख्य आणि महत्वाच्या भूमिकेत मराठी कलाकारांची दमदार फळी पहायला मिळणार आहे. ज्यात समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, आदिनाथ कोठारे, अश्विनी महांगडे अशा कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.