Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 706

Baramati Lok Sabha Result 2024: अखेर बारामतीकरांचा कौल सुप्रिया सुळेंनाच!! सुनेत्रा पवार पिछाडीवर

Baramati Lok Sabha Result 2024

Baramati Lok Sabha Result 2024: आज म्हणजेच 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठी आज सकाळीपासूनच मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीनुसारच, अजित पवार गटाला बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण की शिरूरमधून अमोल कोल्हे तर बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट राजकिय वर्तुळात निर्माण झाले आहे. या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या विरुद्ध लढताना दिसत आहेत. यालाच एक भाग म्हणून अजित पवार गटातून बारामतीतून सुनेत्रा पवार उभे आहेत तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उभ्या आहेत. या दोन्हींमध्ये बारामतीत नेमका विजय कोण मिळवले याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी आघाडीवर (Baramati Lok Sabha Result 2024)

सुरू असलेल्या मतमोजणीनुसार पाहायला गेलो तर, सध्या बारामतीतून सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. यातूनच बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना साथ दिली नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. तसेच शिरूर मतदार संघातूनही 18 हजार मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे शिरूर मतदार संघामध्ये अजित पवार गटाकडून उभ्या राहिलेल्या
आढाळराव पाटील यांना हार पत्करावी लागेल अशी दाट शक्यता दिसत आहे.

Gold Price Today: लोकसभेच्या निकालादिवशी सोन्या-चांदीच्या भावात मोठे बदल!!

Gold Price Today

Gold Price Today: आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे. तर दुसऱ्या बाजूला ऐन लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यासह चांदीचे भावही दणक्यात वाढले आहे. त्यामुळे केंद्रात मोदींची पुन्हा सत्ता आल्यानंतर सोन्या-चांदीच्या या भावात घसरण पाहायला मिळेल का?? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. Good Return नुसार आज सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, 4 जून 2024 रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 68,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 72,870 रुपयांवर आले आहे. MCX नुसार, आजचे सोन्याचे भाव पाहिले तर, आज 24 कॅरेट सोने 72,250 रुपयांनी बाजारात व्यवहार करत आहे. (Gold Price Today)

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 68,800 रुपये
मुंबई – 68,800 रुपये
नागपूर – 68,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,870 रूपये
मुंबई – 72,870 रूपये
नागपूर – 72,870 रूपये

चांदीचे आजचे भाव

निकालाच्यादिवशी ग्राहकांना चांदीच्या भागातही दिलासा मिळालेला नाही. Good Return नुसार, आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 940 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9400 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 94,000 रूपये अशी आहे.

Electric Spoon | शास्त्रज्ञांनी केला चमत्कार! जेवणात योग्य मीठ टाकण्याचा चमचा आणला बाजारात

Electric Spoon

Electric Spoon | जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण जेवणामध्ये मीठ टाकत असतो. मिठाशिवाय कोणत्याही जेवणाला चव येत नाही. ते स्वादिष्ट होत नाही. परंतु हेच मीठजर आपण जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्याचा आपल्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मिठाचा वापर कमी करा. असेच डॉक्टर सल्ला देत असतात. अशातच आता शास्त्रज्ञांनी एक इलेक्ट्रिक चमचा तयार केला आहे. जो स्वतः अन्न खारट करतो. म्हणजे तुम्हाला जेवणात कोणत्याही प्रकारचे मीठ टाकायची गरज नाही. जेवणाला जेवढी गरज आहे तेवढे मीठ त्या इलेक्ट्रिक चमचा मधून येते. बाजारातही हा चमचा उपलब्ध आहे.

जपानमध्ये बॅटरीवर चालणारा हा एक अनोखा चमचा तयार केला आहे. त्यामुळे जेवणाची चव खारट होते. हा चमचा प्लास्टिक आणि धातूंनी बनलेला आहे. जे लोक मीठ कमी करण्यासाठी धडपड करतात, त्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला चमचा आहे. मेजी विद्यापीठातील प्रोफेसर होमी मियाशिता यांनी इतर संशोधकांसह ते विकसित केले आहे. अहवालानुसार, या ‘इलेक्ट्रिक सॉल्ट स्पून’ तंत्राने 2023 मध्ये Ig नोबेल पुरस्कार जिंकला आहे. हे असे व्यासपीठ आहे जे अद्वितीय संशोधनाचा सन्मान करते.

संशोधकांनी नोंदवले आहे की जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि इतर परिस्थितींचा धोका वाढवते. जपानमधील प्रौढ लोक दररोज सरासरी 10 ग्रॅम मीठ खातात, जे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे.

चमच्याची किंमत काय आहे? | Electric Spoon

किरीन या जपानी कंपनीचे म्हणणे आहे की, याच्या वापरामुळे अन्नातील खारटपणा दीड पटीने वाढतो. कंपनीने म्हटले आहे की वापरकर्ते त्यांच्या पसंतीची तीव्रता चार वेगवेगळ्या स्तरांवर निवडू शकतात. 20 मे रोजी लाँच झालेल्या या अनोख्या चमच्याची किंमत 19,800 येन (म्हणजे भारतीय चलनात 10,469.79 रुपये) आहे.

LIC HFL Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना LIC मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

LIC HFL Bharti 2024

LIC HFL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Bharti 2024) अंतर्गत गृहकर्ज सल्लागार या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन करायचे आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊन येणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करता येईल.

महत्त्वाची माहिती | LIC HFL Bharti 2024

  • पदाचे नाव – गृह कर्ज सल्लागार
  • मयो मर्यादा – 18 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता, – जीवन सुमन पहिला मजला प्लॉट नंबर 3, N 5 टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद 431003
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास

अर्ज कसा करावा ? | LIC HFL Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • दिलेल्या पत्त्यावर अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान मोदी 6223 मतांनी पिछाडीवर; वाराणसीत मोठा उलटफेर??

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीअखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून पिछाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मोदी (Narendra Modi) तब्बल ६२२३ मतांनी पिछाडीवर आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोदींविरोधात काँग्रेसच्या अजय झा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

2019 मध्ये मोदींनी वाराणसी (Varanasi) मधून एकतर्फी लढत जिंकली. त्यावेळी सपाच्या शालिनी यादव दुसऱ्या तर काँग्रेसचे अजय राय तिसऱ्या क्रमांकावर होते. 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. आताही मोदी पुन्हा एकदा वाराणसी मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. संपूर्ण देशात मोदींचा जलवा असल्याने वाराणसी मधूनही मोदी मोठ्या फरकानं विजयी होतील असं अंदाज होता, मात्र आता मोदीच ६२२३ मतांनी पिछाडीवर गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे वाराणसीत मोठा उलटफेर पाहायला मिळणार का हे बघायला हवं.

दरम्यान, INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. NDA २८७ जागांवर आघडीवर आहे तर INDIA आघाडी २१७ जागांवर पुढे आहे. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात INDIA आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात तब्बल २८ जागांवर INDIA आघाडीवर आहे तर उत्तर प्रदेशात सुद्धा ३५ जागांचा टप्पा INDIA आघाडीने पार केला आहे.

Muscles Gain | मजबूत स्नायूंसाठी आहारात आजच ‘या’ पदार्थांचा समावेश करा; होईल दुप्पट फायदा

Muscles Gain

Muscles Gain | आपल्या शरीरातील हाडे आणि स्नायू एका उत्तम आरोग्यासाठी चांगले असणे खूप गरजेचे असते. अनेकदा आपण आपली हाडे मजबूत करण्यावर भर देत असतो. हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला आपल्याला आहारात कॅल्शियम, प्रोटीन यांसारख्या अनेक प्रथिनांचा समावेश करायला लागतो. परंतु बऱ्याचवेळा लोकं हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्नायूंच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. आज आपण आपल्या लेखांमध्ये स्नायूला बळकट करण्यासाठी असे काही पदार्थ पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीराला चांगले पोषण तत्त्व मिळतील. आणि स्नायूंचे (Muscles Gain) आरोग्य देखील चांगले होईल.

अंडी | Muscles Gain

अंड्यांमध्ये प्रथिने आणि चरबी मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, ते स्नायूंना मजबूत करते.स्नायूंच्या मजबुतीसाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात आणि अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन बी 12 देखील असते, जे स्नायूंसाठी खूप महत्वाचे आहे.

सॅल्मन

ओमेगा -3 समृद्ध सॅल्मन फिशमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे स्नायूंमध्ये जळजळ कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, त्यात निरोगी चरबी आणि प्रथिने देखील असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात.

फ्लेक्ससीड्समध्ये

ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि फायबर यांसारखी अनेक पोषक तत्त्वे अंबाडीच्या बियांमध्ये आढळतात. ते शरीराला भरपूर ऊर्जा देतात आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करतात.

चिकन

चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 12 असते, जे स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक असतात.

पालक

पालकामध्ये जीवनसत्त्वांसोबतच आयरन आणि मॅग्नेशियम देखील आढळतात, जे स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, त्यात अमीनो ऍसिड आढळतात, जे स्नायूंची कमजोरी दूर करण्यास मदत करतात. याशिवाय, हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास देखील मदत करते, जे स्नायूंसाठी देखील फायदेशीर आहे.

रताळे

रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, जे वर्कआउट दरम्यान शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात.

दूध | Muscles Gain

दुधात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्स देखील आढळतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होतात.

सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज, विशाल पाटील आघाडीवर

Lok Sabha 2024 Result (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात एकीकडे भाजपप्रणीत NDA ला मोठं यश मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी २६ जागांवर आघडीवर दिसत आहे. सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज आणि सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार या नणंद भावजय या लढाईत सुप्रियाताई आघाडीवर दिसत आहेत, तर शिरूर मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे, याठिकाणी आढळराव पाटील हे पिछाडीवर दिसत आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ असलेल्या कोल्हापुरात शाहू महाराज यांनी संजय मंडलिक यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे पुढे दिसत आहेत.

पहा कोण कोण आघाडीवर ? Lok Sabha 2024 Result

बारामती – सुप्रिया सुळे
माढा – धैर्यशील मोहिते पाटील
सातारा – उदयनराजे भोसले
कोल्हापूर – शाहू महाराज
सोलापूर – प्रणिती शिंदे
नागपूर- नितीन गडकरी
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
पालघर – भरती कामडी
ठाणे- राजन विचारे
लातूर शिवाजी कालगे
गडचिरोली- नामदेव किरसाण
नाशिक – राजाभाऊ वाझे
शिरूर- अमोल कोल्हे
बुलढाणा- प्रतापराव जाधव
ईशान्य मुंबई – मिहीर कोठे

रामटेक – राजू पारवे
सिंधुदुर्ग – नारायण राणे
यवतमाळ – संजय देशमुख
नांदुरबार- हिना गावित
दिंडोरी – भास्कर भगरे
रायगड – अनंत गीते
धुळे – सुभाष भामरे

Lok Sabha 2024 Result : लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; पहा कोण-कोण आघाडीवर??

Lok Sabha 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला (Lok Sabha 2024 Result) सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलातून देशात NDA ला 275 जागांवर आघाडी दिसत आहे तर विरोधकांची INDIA आघाडी 120 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी दिसत आहे. महायुतीमध्ये भाजपच्या जागा आघाडीवर दिसत असल्या तरी शिंदे- अजित दादांचे शिलेदार पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी २३ जागांवर आघाडीवर आहे तर महायुती २२ जागांवर आघाडीवर आहे.

पहा कोण कोण आघाडीवर ? Lok Sabha 2024 Result

बारामती – सुप्रिया सुळे
माढा – धैर्यशील मोहिते पाटील
सातारा – उदयनराजे भोसले
कोल्हापूर – शाहू महाराज
सोलापूर – प्रणिती शिंदे
नागपूर- नितीन गडकरी
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
पालघर – भरती कामडी
ठाणे- राजन विचारे
लातूर शिवाजी कालगे
गडचिरोली- नामदेव किरसाण
नाशिक – राजाभाऊ वाझे
शिरूर- अमोल कोल्हे
बुलढाणा- प्रतापराव जाधव
ईशान्य मुंबई – मिहीर कोठे

रामटेक – राजू पारवे
सिंधुदुर्ग – नारायण राणे
यवतमाळ – संजय देशमुख
नांदुरबार- हिना गावित
दिंडोरी – भास्कर भगरे
रायगड – अनंत गीते
धुळे – सुभाष भामरे

फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्याचा ठाकरेंना फोन; भेटीसाठी वेळही मागितली

Fadanvis And Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला हा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपासोबत जातील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यक्तीने निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ ही मागितली असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीनंतर देशातील राजकारणाचे चित्र स्पष्ट होईल. परंतु मतमोजणीचा निकाल येण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता भेटीची वेळ मागितली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही वेळ देण्यात आलेली नाही. या नेत्याला उद्धव ठाकरे यांना निकाल लागल्यानंतर सदिच्छा भेट घ्यायची आहे. त्यामुळेच या नेत्याने भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राजकिय वर्तुळात ही बातमी पसरल्यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच आपल्या भागात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे हे त्यांनी सांगितले आहे. इतकेच नव्हे तर, “आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करुन भेटीची वेळ मागितली, ही अतिशय धांद्यात खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा प्रयत्न केला गेला आहे. ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती, ना आहे आणि ना भविष्यात कधी लागेल. निश्चितपणे कुणीतरी पर्सेप्शन करण्यासाठी ही माहिती पसरवली आहे.” असे प्रसाद लाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Zomato Request | ‘दुपारी जेवण ऑर्डर करू नका…’ झोमॅटोने ग्राहकांना का केली ही विनंती?

Zomato Request

Zomato Request | यावर्षी संपूर्ण भारतात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुपारनंतर घराबाहेर पडणे देखील खूप कठीण झालेले आहे. उन्हामुळे घराच्या बाहेर जाता येत नाही. परंतु या उष्णतेमुळे अनेकजण घरात देखील आजारी पडताना दिसत आहे. अशातच आपण अनेक वेळा फूड डिलिव्हरी बॉईजला भर उन्हात रस्त्याने फिरताना पहात असतो. अशातच आता फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने अनेक ग्राहकांना एक विनंती केलेली आहे. दुपारच्या वेळेमध्ये अन्न ऑर्डर करणे टाळण्याची विनंती केलेली आहे.

झोमॅटोचे ग्राहकांना आवाहन | Zomato Request

2 जून रोजी, Zomato ने आपल्या ग्राहकांना आवाहन करण्यासाठी X (पूर्वी Twitter म्हणून ओळखले जाणारे) वर नेले. झोमॅटोने लिहिले, “कृपया अत्यंत आवश्यक नसल्यास दुपारी ऑर्डर करणे टाळा.” Zomato चे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे याकडे ऑनलाइन लोकांचे बरेच लक्ष वेधले गेले आहे. ही पोस्ट 8 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि 11,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

झोमॅटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी डिलिव्हरी एजंट्सबद्दल कंपनीच्या काळजीचे कौतुक केले, तर इतरांनी सूचना आणि टीका केल्या. त्यांनी सुचवले की कंपनीने आपल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी दिवसाच्या सर्वात उष्ण काळात आपली सेवा तात्पुरती निलंबित करणे चांगले होईल.

त्याच वेळी, काही लोकांनी प्रस्तावित केले की झोमॅटोने पीक अवर्समध्ये डिलिव्हरी पैसे वाढवण्याचा विचार करावा किंवा ड्रायव्हर्सना उष्णतेमध्ये काम करण्यासाठी पुरेशी भरपाई दिली जाईल याची खात्री करण्यासाठी किमान टीप देणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांनी त्यावर टीकाही केली आहे. त्यांनी लिहिले की हे प्रत्येकासाठी व्यावहारिक असू शकत नाही. काही लोक अन्न वितरण सेवांवर खूप अवलंबून असतात, विशेषत: जे स्वयंपाक करू शकत नाहीत किंवा ज्यांना मर्यादा आहेत.

आरोग्यावर उष्णतेचा परिणाम

अतिउष्णतेमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात हे विशेष. यात उष्माघात, उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर रोगांचा समावेश आहे. वाढत्या तापमानात, तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. गोड पेये आणि कॅफिन टाळा. याशिवाय कॉटनचे कपडे निवडा.

उन्हाळ्याच्या उच्च तासांमध्ये (सामान्यतः दुपारी 12 ते 4 पर्यंत) घरात राहण्याचा प्रयत्न करा. तसेच, हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी उच्च SPF असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा.