Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 708

Viral Video : शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक गाण्यावर डान्स; युजर्स म्हणाले, ‘अशी मॅडम असेल तर…’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी विचित्र, कधी हसवणारे तर कधी थक्क करणारे हे व्हिडीओ कायम ट्रेंडिंगमध्ये असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून कित्येक लोक एका रात्रीत स्टार झाल्याचे समोर आले आहे. आजपर्यंत तुम्ही या व्हिडिओंमध्ये बरेच डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. ज्यामध्ये आणखी एका व्हिडिओचा समावेश झाला आहे. या व्हिडिओत एक शिक्षिका आणि विद्यार्थी चक्क एका रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा आपल्या विद्यार्थ्यांसोबत ‘आशिकी २’ मधील ‘तुम ही हो’ या रोमँटिक गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा डान्स त्यांनी निरोप समारंभादिवशी केल्याचे समजत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेक लोकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शिक्षिकेला विद्यार्थ्यांसोबत रोमँटिक डान्स

तसं पाहिलं तर सोशल मीडियावर रोजच विविध व्हिडीओ लक्ष वेधून घेत असतात. पण या व्हिडीओने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आपण सारेच जाणतो की, शालेय आयुष्यातील शेवटचा दिवस खूप खास असतो. (Viral Video) तो साजरा करण्यासाठी अख्खी शाळा आणि वर्ग सजवले जातात. या व्हिडिओत तसंच काहीसं दिसत आहे. तुम्ही निरोपावेळी भावुक झालेल्यांचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. यात दिसतंय की, एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेसोबत डान्स करत आहे.

साहजिक आहे निरोपाचा क्षण असल्यामुळे या विद्यार्थ्याने शिक्षिकेला डान्ससाठी विनंती केली असेल. जी विनंती शिक्षिका नाकारू शकल्या नसतील. त्यानंतर दोघांनी वर्गात सुंदर असा रोमँटिक डान्स केला आहे. जो पाहून इतर विद्यार्थी अवाक झालेले दिसत आहेत. अनेकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या डान्सला दादसुद्धा दिली आहे. (Viral Video) असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असता नेटकऱ्यांनी मात्र ट्रोलिंगचा सूर ओढल्याचे दिसत आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर kushal_m.j नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने त्या विद्यार्थ्याला ‘लकी स्टुडंट’ असे म्हटले आहे. (Viral Video) तर आणखी एकाने म्हटलंय, ‘शिक्षिकेच्या या वर्तनाचे समर्थन करण्याची गरज नाही.. हे चूक आहे’. तर अन्य एकाने लिहिले, ‘आमच्या काळात असे झाले नाही.. आम्ही फक्त पेन देण्यापुरते राहिलो’. तर आणखी एकाने लिहिले, ‘अशी शिक्षिका असेल तर ज्याला डान्स येत नाही तोपण डान्स करू लागेल’.

पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी करणार पहिले हे काम; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

PM Kisan Sanman Nidhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यातील शेतकरी पीएम किसान सन्मान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेच्या सतराव्या हाताची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या योजनेची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला, एक्झिट पोलच्या आकडेवारीमधून देशात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब खरी ठरल्यास सत्तेत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना शपथविधी पूर्वीच किसान योजनेचा हप्ता देतील असे म्हटले जात आहे.

या कालावधीत जमा होणार 17 वा हप्ता

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात भाजपचे सरकार पुन्हा येणार असल्याचे निश्चित झाले की, या योजनेचा 17 वा हप्ता 4 जूननंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. थोडक्यात, किसान योजनेचा 17 वा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर जारी केला जाऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारने अद्याप तारीख निश्चित केलेली नाही.

यापूर्वी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला होता. पीएम-किसान योजनेच्या 16 व्या हप्त्यात 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 21,000 कोटींहून अधिक रक्कम जारी करण्यात आली होती. तर योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी मोदी सरकारने जारी केला होता. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हा हप्ता मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच जारी करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

Kitchen Tips : किचनमधील तेलकट, मेणचट भांडी होतील चमकदार ; वापरा सोप्या ट्रिक्स

utensil cleaning hacks

Kitchen Tips : दररोज स्वयंपाक करीत असताना आपसूकच तेलाचे हात मसाल्याच्या चटणी, मिठाच्या आणि इतर भांड्याना लागत असतात त्यामुळे भाड्यांवर तेलकट चिकट डाग पडतात. शिवाय हे डाग दिसायला खूप वाईट दिसतात. तेलाची किटली, कंटेनर तेल घेताना बाहेरीळ बाजूला लागतेच त्यामुळे हे तेलाचे भांडे सुद्धा साफ करणे मेहनतीचे काम असते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुम्हाला अशा काही ट्रिक्स (Kitchen Tips) सांगणार ज्यामुळे डब्यांवरील हे तेलकट चिवट डाग चुटकीसरशी नाहीसे होतील. चला तर मग जाणून घेऊया

बेकिंग सोडा (Kitchen Tips)

स्वयंपाक घरातील विशेषतः दररोज वापरण्यात येणारे डबे आणि कंटेनर हे तेलकट होत असतात. वारंवार ते स्वच्छ करावे लागतात आणि हा जो तेलकटपणा असतो तो सहजासची निघत नाही. बेकिंग सोडा हा तेलकट डब्यांना स्वच्छ करण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोगी आहे. यासाठी एक ते दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळा आणि कापूस किंवा ब्रशच्या मदतीने डब्यांवर लावून ठेवा. 15 ते 20 मिनिटांसाठी हे तसंच (Kitchen Tips) ठेवा आणि त्यानंतर ब्रश किंवा स्क्रबरने डबे स्वच्छ करा आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. त्यामुळे तेलकटपणा निघून जाईल.

बोरेक्स पावडर (Kitchen Tips)

डब्यांचा चिकटपणा घालवण्यासाठी बोरेक्स पावडरचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे डब्यांचा चिकटपणा निघून जाईल शिवाय जर घाणेरडा वास येत असेल तर तोही निघून जाईल. ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये लिंबाची साल टाकून गरम करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे बोरेक्स पावडर घालून मिक्स करायचे आहे आता हे तयार मिश्रण स्वयंपाक घरातील सर्व डब्यांवर लावून ठेवा आणि हे तसंच काही वेळ तुम्हाला (Kitchen Tips) ठेवायचे आहे. त्यानंतर स्क्रबरने घासून डबे क्लीन करा आणि पाण्याने धुऊन घ्या.

कोमट पाणी आणि डिटर्जंट (Kitchen Tips)

कोणताही प्रकारच्या भांड्यांचा जर तेलकटपणा तुम्हाला घालवायचा असेल तर हा खूप सोपा आणि चांगला उपाय आहे. यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. त्यामध्ये डिटर्जंट मिक्स करा. तयार मिश्रण डब्यांवर लावा काही वेळानंतर स्क्रबरने (Kitchen Tips) डबे घासून पाण्याने धुऊन घ्या. अशा प्रकारे डब्यातील हट्टी डाग निघून जातील.

Sharad Pawar Letter To CM Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; थेट संघर्षाचा दिला इशारा

Sharad Pawar Letter To CM Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील एकूण दुष्काळी परिस्थितीवरून (Drought Situation In Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिले आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा पवारांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.

शरद पवार यांचे पत्र जसंच्या तसं

महोदय,
मी मागील महिन्यात दिनांक २४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू ह्या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो आहे. परंतू ह्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल, स्पष्ट नमूद करतो.

कळावे,

New Movie : शाळेतली धमाल मस्ती घेऊन ‘बंटी बंडलबाज’ येतोय दोस्तांच्या भेटीला; पहा पोस्टर

New Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) शाळेत असताना आपण केलेली मजा, मस्ती, धमाल तरुणपणातसुद्धा आठवते. शाळेतल्या या आठवणी कायम ताज्या राहतात. मनाच्या अत्यंत जवळ असल्यामुळे या आठवणींचा एक कोपरा असाच कायम राहतो. बालपणातली हीच धमाल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला ‘बंटी बंडलबाज’ येतोय. यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे शीर्षक पाहता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल.

पोस्टर रिलीज (New Movie)

‘बंटी बंडलबाज’ हा चित्रपट एका धमाल कथानकासह आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात आजच्या युगातील इंटरनेट, लॅपटॉपच्या साहाय्याने परीक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शाळेत प्रथम येण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न तसेच त्यांनी शाळेत केलेली धमालमस्ती आपल्याला पहायला मिळणार आहे. (New Movie) त्यामुळे हा चित्रपट सद्य परिस्थितीवर भाष्य करताना दिसेल. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचे कथानक खास ठरेल.

‘हे’ कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

माहितीनुसार, ‘बंटी बंडलबाज’ या आगामी चित्रपटात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्या सोबतीला ओम बेंडखळे, सार्थक पाटील, गणेश रेवडेकर, आकांक्षा गाडे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. (New Movie) ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची निर्मिती वैदही कृष्णन, ईशान महापात्रा, नेहा कोळवणकर आणि विवेक कदम यांनी केली आहे. अनिकेत रुमडे यांनी दिग्दर्शनासहित कथा, संवाद, पटकथा लेखनाची धुरा सांभाळली आहे तसेच या चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर प्रताप राऊत आहेत.

शाळेतले दिवस आणि त्या दिवसातला गोडवा परत अनुभवता येईल

दिग्दर्शक अनिकेत रुमडे चित्रपटाच्या घोषणेबाबत म्हणतात, ‘या चित्रपटात दोन विद्यार्थ्यांचा शाळेतील जीवनाचा प्रवास वर्णन केला असून शाळेत प्रथम येण्यासाठी त्यांनी उचलेली पावले तसेच बोर्डाने डिजिटल पद्धतीचा अवलंब केल्यानंतर त्यांनी निवडलेला मार्ग आपल्याला बघायला मिळेल. (New Movie) या चित्रपटात तुम्हाला शाळकरी मुलांची हुशारकी, मस्ती, धमाल, धमक, निरागसता बघायला मिळेल. तुम्हाला शाळेतले दिवस आणि त्या दिवसातला गोडवा परत अनुभवायचा असेल तर हा चित्रपट नक्की पाहा’.

विधान परिषदेसाठी भाजपकडून 3 उमेदवार जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

Vidhan Parishad Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी (Vidhan Parishad Election) लगबग सुरू झाली आहे. अशातच आता भाजपने एकूण 3 मतदारसंघांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (Kiran Shelar) आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे (Shivnath Darade) यांचे नाव जाहीर केले आहे.

येत्या 26 जून रोजी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकिय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये एकमत झालेले दिसत नाही. असे असताना ही भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाचे म्हणजे, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी देखील भाजपाने किरण शेलार यांना संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपने शिवनाथ दराडे यांना संधी दिली आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना संधी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार सामना रंगणार आहे.

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil : लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? ‘संघर्षयोद्धा’तून होणार मोठा खुलासा

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मनोज जरांगे पाटलांचा जीवनप्रवास दाखवणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १४ जून २०२४ असून या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचं वादळ धडकणार आणि चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवणार. सर्वत्र या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता पाहायला मिळते आहे,

ट्रेलर लाँच (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil)

अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असल्याने सर्वत्र ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ अशी परिस्थिती पहायला मिळतेय. रसिक प्रेक्षकांकडून चित्रपटाच्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता प्रतीक्षा आहे ती चित्रपटाच्या प्रदर्शनाची.

शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

महत्वाच्या भूमिकेत ‘हे’ कलाकार दिसणार

‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलेच पाहिजे

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. ‘एक मराठा कोट मराठा’ अशी साद अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली आहे. लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलेच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजत, असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहेत. (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच ट्रेलरही वादळी आणि तुफान आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास येत्या १४ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

AC Blast : ‘या’ कारणांमुळे होऊ शकतो AC ब्लास्ट; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

AC Blast

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (AC Blast) उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात, ऑफिसमध्ये, कार्यलयांमध्ये एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असते आणि अशावेळी एसीची थंडगार हवा हवीहवीशी वाटू लागते. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसात घरात एसी बसवून घेतात. चोवीस तास एसीचा वापर करून गरमीपासून सुटका मिळवतात.

दरम्यान, ३० मे २०२४ रोजी नोएडा हाऊसिंग सोसायटीमध्ये एसीच्या इनडोअर युनिटमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. इतकेच नव्हे तर मध्यंतरीच्या काळात अशी अनेक प्रकरणे नोंद केल्याचे समोर आले आहे. यावरून समजतंय की, वाढत्या तापमानामुळे एसीमध्ये स्फोट होऊ शकतो. याबाबत तज्ञांनी अधिक सांगताना नेमके या घटनांचे मूळ कारण काय? आणि कशी खबरदारी घ्यावी? याची माहिती दिली आहे.

AC मध्ये स्फोट होण्याची कारणे
(AC Blast)

विद्युत उपकरणांचा सतत वापर

उन्हाळ्याच्या दिवसात तापमानात प्रचंड उष्णता वाढलेली असते. अशा वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकरणांचा सतत वापर केला जातो. ज्यामुळे या उपकरणांवर ताण येतो. (AC Blast) सतत वापरल्यामुळे विद्युत उपकरणे अधिक गरम होतात आणि यामध्ये स्फोट होण्याची शक्यता वाढते.

विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने जाणे

आणखी एक कारण सांगायचे तर, शॉर्ट सर्किट किंवा जेव्हा सर्किटमधील विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने जातो तेव्हादेखील आग लागण्याची शक्यता असते. शॉर्ट सर्किट झाल्यास कायम धोकादायक परिस्थिती उद्भवते असे नाही. मात्र, जेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह असतो आणि तेव्हा शॉर्ट सर्किट झाले तर मात्र विद्युत प्रवाहित करणाऱ्या तारा वितळून मोठी आग लागू शकते. (AC Blast)

मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये दोष

तज्ञांच्या भाषेत सांगायचे तर, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मिनिएचर सर्किट ब्रेकर्स अर्थात एमसीबी बसवलेले असते. त्यामुळे विद्युत उपकरणांचा अधिक वापर झाल्यावर त्यावर जो ताण येतो त्याचा सर्किटला सिग्नल मिळतो. एका इलेक्ट्रिक कंपनीने म्हटल्याप्रमाणे, ‘मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये बीमेटलीक स्ट्रिप म्हणजेच दोन धातूंनी तयार झालेल्या पट्ट्या. इलेक्ट्रिक सर्किटमधून जास्त प्रमाणात विद्युतप्रवाह वाहत असल्यास एमसीबी बीमेटलीक स्ट्रिप गरम होतात. ज्यामुळे त्या आपली जागा सोडू शकतात. अशावेळी मिनिएचर सर्किट ब्रेकर्सवर दिलेले बटण बंद होते आणि सर्किट डिस्कनेक्ट होते.

(AC Blast) ज्यामुळे विद्युत प्रवाह थांबतो. मात्र, त्यानंतर बटण चालू करून पुन्हा विजेचा प्रवाह सामान्यपणे सुरू केला जाऊ शकतो’. दरम्यान बऱ्याचदा, मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये दोष असण्याची शक्यता असते. ज्यामुळे ही यंत्रणा अपयशी ठरते आणि परिणामी आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते.

चांगल्या क्वालिटीची उपकरणे न वापरणे (AC Blast)

याशिवाय विद्युत उपकरणांचा सर्वाधिक वापर, ओव्हरलोडिंग, चांगल्या क्वालिटीची उपकरणे न वापरणे यामुळे देखील अशा घटना घडू शकतात.

‘या’ गोष्टी महत्वाच्या

1. जर तुमच्या घरात स्प्लिट एसी असेल तर त्याबाबत आगीच्या संभाव्य धोक्यांसाठी आतील आणि बाहेरील दोन्ही युनिट्सकडे नीट लक्ष द्या. या एसीच्या इनसाइड युनिटमध्ये बाष्पीभवन, ब्लोअर आणि फिल्टर नेट्स असतात. तर आउटसाईड युनिटमध्ये कॉम्प्रेसरचा समावेश असतो. जो आपल्या घरात वाहणारी हवा थंड करण्यास मदत करतो. (AC Blast) या दोन्ही युनिटची वेळोवेळ सर्व्हिसिंग करून घ्या.

2. एसीच्या मॅन्युअलमध्ये लिहिल्याप्रमाणे, इनडोअर आणि आउटडोअर वायरिंग कनेक्शन सुरक्षित असेल याची काळजी घ्या. त्याच्या वायर योग्यरित्या लावून घ्या. म्हणजे कनेक्शन टर्मिनल्समधून वायर ओढले जाणार नाही आणि कनेक्शन नीट नसल्यामुळे उष्णता निर्माण होऊन आग लागणार नाही.

3. सर्किट ब्रेकर आणि फ्यूज चांगल्या स्थितीचे असावेत. (AC Blast) एसीच्या सेटअपमध्ये कोणतेही बदल किंवा अधिकृत दुरुस्ती ही सर्व्हिस सेंटरच्या मदतीने करावी. स्वतःहून कोणतेही प्रयोग करू नये.

4. इनडोअर युनिट पाण्याच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या.

5. बाहेरील युनिटच्या आजूबाजूला कचरा जमा होऊन देऊ नका. या कचर्‍यामुळे लहान प्राणी आकर्षित होतात आणि युनिटमध्ये प्रवेश करतात. ज्यामुळे युनिटमध्ये बिघाड होऊ शकतो आणि विजेच्या भागांशी त्यांचा संपर्क आल्यास आग लागू शकते.

6. एसी सतत चालू ठेवू नका. मुख्य पवरची बटणं काम झाल्यास आठवणीने बंद करा. (AC Blast)

7. कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरेंट गॅसची गळती तर होत नाही ना याची काळजी घ्या. यामुळेदेखील स्फोट होऊ शकतो.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; कारची ट्रकला धडक झाल्याने तिघांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता याच महामार्गावरील वाशिम येथील मालेगाव तालुक्यातील रिधोरा गावाशेजारील चॅनल नंबर 239 जवळ हुंडाई क्रेटा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अपघातात तिघांचा मृत्यू (Samruddhi Mahamarg Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजता संभाजीनगरवरून अमरावतीकडे निघालेल्या हुंडाई क्रेटा कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक कार ही ट्रकच्या मागच्या बाजूने आतमध्ये घुसली. त्यामुळे कारचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक लोक जमा झाले होते. त्यांनी तातडीने जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात हलवले.

महत्वाचे म्हणजे, भरधाव कार थेट ट्रकला जाऊन धडकल्यामुळे ती ट्रकमध्ये अडकली गेली होती. त्यामुळे या कारला कटर आणि जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढावे लागेल. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार दांदडे, पोलीस उपनिरीक्षक मोरे दाखल झाले होते. त्यांनीच ताबडतोब जखमी लोकांना रूग्णालयात हलवले. आता पोलीस या सर्व घटनेची पुढील कारवाई करत आहेत.

IAF Recruitment 2024 | भारतीय हवाई दलात 304 पदांसाठी नोकरी करण्याची संधी, 12 वी पास करू शकतात अर्ज

IAF Recruitment 2024

IAF Recruitment 2024  | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अजिबात विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी लागण्याची संधी आहे. त्यामुळे आता रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. या पदासाठी एकूण 304 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी आता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही अर्ज क्रिया 30 मे पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

ती भरती प्रक्रिया (IAF Recruitment 2024 ) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या भरती अंतर्गत फ्लाईंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी, ग्राउंड ड्युटी, नॉन टेक्निकल या पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. इयत्ता बारावी पास असलेले विद्यार्थी देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात बारावी पास असणे गरजेचे आहे. आणि बारावीला 50% गुण असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पदवीधर देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. पदवीच्या अभ्यासात 60 टक्के गुण असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे बीई आणि बीटेक पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर या भरती प्रक्रियेला सुरुवात करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा