Netflix plans 2024 | आजकाल जगभरात सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. यावर ऑनलाईन चित्रपट, सिरीयल, डॉक्युमेंटरी, वेबसिरीज पाहिल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण घरबसल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेतात. परंतु आता अनेक प्लॅटफॉर्मचे रिचार्ज महाग झाल्यामुळे लोक जास्त ओटीटी वापरत नाही. त्यामुळे आता काही मोबाईल कंपन्या सुद्धा त्यांच्या प्लॅनवर नेटफ्लिक्ससाठी काही ऑफर देत आहेत. अशातच आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेटफ्लिक्स या व्हिडिओज स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने नवीन प्लॅन बाजारात आणलेले आहेत
नेटफ्लिक्स भारतात चार वेगवेगळे म्हणजेच मोबाईल, बेसिक, स्टॅंडर्ड आणि प्रीमियम या चार स्वरूपाचे प्लॅन घेऊन आलेली आहे. या प्लॅनची किंमत 159 रुपयांपासून ते 649 रुपयांपर्यंत असते. आता आपण या चारही सबस्क्रीप्शनबद्दल माहिती जाणून घेऊया.
नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन | Netflix plans 2024
या प्लॅनची किंमत 159 रुपये प्रति महिना एवढी असणार आहे. भारतातील हा सगळ्यातील स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये व्हिडिओची गुणवत्ता ही 480p रिझोल्युशन मिळेल. अँड्रॉइड, टॅबलेट, आयफोन आणि आयपॅड यूजर्स याचा आनंद घेऊ शकतात.
नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन
या प्लॅनचा कंटेंट तुम्ही तुमच्या फोनशिवाय टॅबलेट, कम्प्युटर आणि टीव्हीवर देखील पाहू शकता. या प्लॅनची किंमत 199 रुपये एवढी आहे. या बेसिक प्लॅनमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स एकाच वेळी एकाच स्क्रीनवर ऑपरेट करू शकता.यामध्ये तुम्हाला व्हिडिओची गुणवत्ता 720p रिझोल्युशन मध्ये मिळेल.
नेटफ्लिक्स स्टॅंडर्ड प्लॅन
या प्लॅनमध्ये युजर्स एका वेळी दोन वेगळ्या डिवाइसवर कंटेंट पाहू शकतात. या प्लॅनची किंमत 499 प्रति महिना एवढी आहे. यामध्ये व्हिडिओची गुणवत्ता 1080p रिजॉल्युशन एवढी आहे. तुम्ही मोबाईल फोन, टॅबलेट, टीव्ही त्याचप्रमाणे कम्प्युटर या ठिकाणी एकाच वेळी दोन उपकरणांवर पाहू शकता. तसेच तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता.
नेटफ्लिक्स प्रीमियम प्लॅन | Netflix plans 2024
नेटफ्लिक्सच्या या प्रीमियर प्लानची किंमत ही 649 रुपये प्रति महिना एवढी आहे. हा प्लॅन मोठे कुटुंब त्याचप्रमाणे मित्र-मैत्रिणींच्या मोठ्या ग्रुपसाठी डिझाईन केलेले आहे. तर तुम्हाला मोबाईल डिव्हाईस आणि टीव्हीवर 4 k गुणवत्तेवर हाय डेफिनीशन उपलब्ध आहे. तुम्ही सहा वेगवेगळ्या उपकरणांवर देखील हा कंटेंट पाहू शकता. आणि डाऊनलोड करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील हिंजवडीचा (Hinjawadi) भाग हा आयटी कंपन्यांनी (IT Companies) व्यापून घेतला आहे. परंतु आता याच कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत आयटीतील सुमारे 40 कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केलेत, असा मोठा दावा उद्योजक आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने आहे. इतकेच नव्हे तर आता पुन्हा एकदा आयटी पार्कमधील इतर कंपन्या स्थलांतरित होतील, असेही असोसिएशनने म्हणले आहे.
पुणे शहरातील पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीचा भाग आयटी क्षेत्रामुळे सर्वात जास्त चर्चेत आला. मात्र असे असतानाही या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास अजूनही झालेला नाही. यासह वाहतूक कोंडीची समस्या आहे अद्याप सुटू शकलेली नाही. सध्या हिंजवडीतील आयटी कंपन्या अनेक अडचणींना सामोरे जात आहे. त्यामुळेच या आयटी कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे या कंपन्या स्थलांतरित झाल्यानंतर त्याचा मोठा फटका पुण्याला बसेल असे म्हटले जात आहे.
या कंपन्या झाल्यात स्थलांतरित
बार्कले, नाईस, क्रेडिट स्विस, ल्युमीडेक्स यांसारख्या 20 पेक्षा अधिक बड्या कंपन्या आतापर्यंत दुसऱ्या भागात स्थलांतरित झाल्या आहेत. यामध्ये वेंचुरा टेक्नॉलॉजी, टी क्यूब सॉफ्टवेअर अशा कंपन्यांचाही समावेश आहे. तसेच, बाणेर,खराडी भागातील ही कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या आहेत. येत्या काळामध्ये इतरही अनेक कंपन्या स्थलांतरित होतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यानंतर याचा सर्वात मोठा परिणाम तरुणांच्या रोजगारावर पडणार आहे.
दरम्यान हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या लोकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यात सकाळी आणि संध्याकाळी तर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. तसेच आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या सर्व समस्यांवर सरकार तोडगा कधी काढणार याबाबत सतत प्रश्न विचारले जात आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मिशन 45 प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपचाच राज्यात परफेक्ट कार्यक्रम होतोय.. महायुतीत शिंदेंना आणि अजितदादांना कुठल्या जागा सोडायच्या इथपासून ते उमेदवार कोण असणार? यावर सगळा कंट्रोल भाजपचा असायचा. पण त्याच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या भाजपला मेजर झटका बसतोय. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रभाव असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला एकही जागा निवडून आणता येत नाहीये, असं चित्रं आता क्लिअर होऊ लागलंय. शिंदे आणि अजितदादांना जागा सोडून भाजपने पश्चिम महाराष्ट्रात उरलेल्या 5 जागांवर आपले दिग्गज उमेदवार मैदानात उतरवले… या पाचपैकी एक जागा सोडता इतर चारही जागा 2019 मध्ये भाजपच्या ताब्यात होत्या. पण राजकारण रिव्हर्स गिअर मध्ये पडलं आणि या पाचही जागांवर भाजपला महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून चारी मुंड्या चीत मिळतोय अशी परिस्थिती आहे.. भाजप पश्चिम महाराष्ट्रात लढवत असलेली या पाच जागा कोणत्या? विद्यमान खासदार भाजपचेच असतानाही भाजपवर पश्चिम महाराष्ट्रातून तडीपार होण्याची वेळ का आलीय? तेच साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. शेती, उद्योग, सहकार, शिक्षण संस्था आणि कोटींची उलाढाल करणारी अनेक शहर…मुळात राज्याच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्रातीलच नेत्यांचा बराच डॉमिनन्स राहिलाय. म्हणूनच हा पट्टा प्रत्येकच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा असतो… सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथं वन साईड निवडून येत असे. या दोन्ही पक्षांचं इथल्या मतदारसंघावर दबदबा होता. पण हळूहळू हा स्पेस भाजपने आणि शिवसेनेने भरून काढला. आणि इथं अटीतटीचे सामने व्हायला लागले. पश्चिम महाराष्ट्र वर्चस्वाखाली आणायचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा इथला प्रभाव कमी करायचा हा भाजपच्या राजकारणाचा एक भाग राहिला. म्हणूनच इथून आपल्या पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी भाजपने आपली सारी ताकद खर्ची घातली. मोदी आणि दिल्लीतील मंडळींच्या सभा घेतल्या पण भाजपने या पट्टयातून जे 5 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. ते सर्वच्या सर्व डेंजर झोनमध्ये असल्याचं आता मतदानानंतर बोललं जातंय. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपच्या ज्या 5 मतदारसंघातून दांड्या गुल झाल्या आहेत.
त्यातली पहिली जागा आहे ती साताऱ्याची…
राष्ट्रवादी नाही तर साताऱ्यात फक्त आपला शब्द चालतो. असं धाडसाने बोलणाऱ्या उदयनराजे यांनी 2019 मध्ये घड्याळाच्या चिन्हावर निवडून येऊन राजीनामा दिला… आणि भाजपचं कमळ हाती घेत पोटनिवडणूक लढवली. पण तेव्हा पवारांच्या पावसातल्या सभेनं दाखवून दिलं की इथं फक्त राष्ट्रवादीचा ब्रँड चालतो. श्रीनिवास पाटील निवडून आले… उदयनराजे आणि भाजपसाठी ही मोठी मानहानी ठरली… म्हणूनच 2024 साठी इथून शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरलं तरी भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत नव्हता. कदाचित भाजपला आपण इथून डेंजर झोन मध्ये आहोत याची कल्पना असावी. पण अखेर शेवटच्या यादीत राजेंच्या नावाची घोषणा झाली खरी. पण तोपर्यंत शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात तुतारी पोहचवली होती. महायुती एकत्र लढत असली तरी उदयनराजेंच्या प्रचार करण्यात शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांनी चांगलाच ढील दिला होता. शेवटी राजेंनी एकट्याने ताकद लावली… मोदींनीही राजेंसाठी सभा घेतली… पण प्रचार टू मतदानापर्यंतच्या साताऱ्याच्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर उदयनराजेंना सलग दुसऱ्यांदा शरद पवारांकडून धोबीपछाड मिळतोय, असं एकूणच वातावरण आहे. त्यामुळे उदयनराजेंसारखा मोहरा फोडून… दोन सहकारी पक्षांचा बॅकअप असतानाही सातारा नशिबात नाहीच, अशी भाजपची परिस्थिती झालीय. असं बोललं तर चुकीचं ठरणार नाही…
पश्चीम महाराष्ट्रातल्या ज्या दुसऱ्या जागेवरून भाजपच्या दांड्या गुल होणार असल्याचं बोललं जातंय तो मतदारसंघ माढ्याचा…
माढा आणि शरद पवार पाडा… असं म्हणत भाजपने 2019 ला इथून भाजपचा खासदार निवडून आणला. माढ्यात जास्तीत जास्त आमदार पेरून भाजपची ताकद बरीच वाढवली. लोकसभेचं बिगुल वाजताच भाजपनं इथून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रिपीट उमेदवारी जाहीर केली. खरतर निंबाळकरांना उमेदवारी मिळता कमा नये अशी रामराजे आणि मोहिते पाटलांसरख्या महायुतीतल्या दिग्गज नेत्यांची मागणी होती. पण त्याकडे कानाडोळा करत भाजपने आपलं राजकारण पुढे रेटलं. आपल्याला हलक्यात घेतल्यानं मोहिते पाटलांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेत पक्ष विरोधी भूमिका घेतली.. शरद पवारांची तुतारी हाती घेत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधातच लढत दिली… धैर्यशील मोहिते पाटील प्लस उत्तमराव जानकर प्लस रामराजे प्लस पवारांच्या सहानुभूतीची मतं असं सगळं जोडून पाहिलं तर माढ्यातून तुतारी फिक्स हे प्रत्येकजण सहजपणे बोलू लागलंय. थोडक्यात भाजपच्या हाता तोंडाचा असणारा खासदारकीचा घास अती आत्मविश्वासामुळे पक्षाला नडला, असं म्हणायला हरकत नाही…मोदींनी दोन सभा घेऊनही माढा हातातून गेला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल, एवढं मात्र नक्की…
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा गेम झालेली तिसरी जागा आहे ती सोलापूरची…
काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचं राजकारण संपवत भाजपने इथून सलग दोन टर्म आपला खासदार निवडून आणला. लिंगायत फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून भाजपला हा विजय सोप्पा झाला. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघातून भाजपने यंदा मात्र वेगळी खेळी खेळत फडणवीसांचे डोक्यावर आशीर्वाद असणाऱ्या राम सातपुते यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला. तर काँग्रेसकडून वडिलांच्या पराभवचा वचपा काढण्यासाठी शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या. सोलापुरातील भाजपच्या प्रचाराचा बेसलाईन ठरला तो हिंदुत्वाचा अजेंडा… मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांनी कट्टर हिंदुत्वाचं कार्ड वापरत जाहीर सभांमधून वातावरण तापवलं. पण यंदाची निवडून मूलभूत प्रश्नांवर लढली गेल्याने आणि भाजपला कंटाळलेल्या जनतेची सुप्त लाट शिंदेंच्या पाठीशी उभी राहताना दिसली. दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्यांक मतं एकत्रितपणे पंजाच्या पाठीशी उभी राहिल्याने 4 तारखेला सोलापुरात पुन्हा एकदा काँग्रेसची शिंदेशाही लोकशाही मार्गाने चालेल, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. अर्थात पहिल्याच टर्म मध्ये आमदार झालेल्या सातपुत्यांना पहिल्याच टर्ममध्ये खासदार होण्याचं भाग्य दिसत नाहीये, असं एकूणच निकालाचा अंदाज सांगतोय…
भाजप पश्चिम महाराष्ट्रातून बॅकफुटला गेलेली चौथी जागा आहे ती म्हणजे सांगलीची…
सलग दोन टर्म संजय काका पाटलांच्या रूपाने भाजपने दबदबा ठेवलेल्या सांगलीवर यंदा विशाल पाटलांचा पंजा चालणार, हे फिक्स समजलं जातं होतं. पण जागावाटपाच्या तिढ्यात काँग्रेसने सांगलीचा बळी दिला आणि ही जागा ठाकरे गटाला सुटली. मतदारसंघात आपली ताकद नसतानाही ठाकरेंनी सांगलीच हट्ट धरत अगदी नव्या नवख्या चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं…भाजपकडून संजय पाटलांची उमेदवारी निश्चित होतीच… पण विशाल पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्यामुळे त्यांनी आघाडीच्या चंद्रावर पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न करूनही सोलुशन निघत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी सांगलीतून अपक्ष उभ राहत दंड थोपटले…वंचितनेही विशाल पाटलांना पाठिंबा दिल्यानं या तिहेरी लढतीत विशाल पाटलांचं वजन वाढलं. नो मशाल ओन्ली विशाल अशी सहानुभूतीची लाट पुऱ्या मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली. विश्वजीत कदमांच्या रूपाने काँग्रेसचा मिळालेला मदतीचा छुपा हात, वंचितची हक्काची दलित – मुस्लिम व्होट बँक आणि दादा पाटील घराण्याचं राजकारण यामुळे विशाल पाटलांचा लिफाफा यंदा दिल्लीत जाणार असा कॉन्फिडन्स तसा ठाकरे गट सोडून सर्वांनाच आहे. तसं बघायला गेलं तर आघाडीच्या खात्यात जाणारी एक जागा काँग्रेसच्या शहापणामुळे आणि ठाकरेंच्या हट्टीपणामुळे हातची गेली… विद्यमान खासदार असणाऱ्या सांगलीत भाजपच्या दांड्यागुल झाल्या असल्या तरी विकेट काँग्रेसची गेलीय, असं म्हणायला स्कोप उरतो…
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची जी पाचवी जागा रेड झोनमध्ये आहे तो मतदारसंघ आहे पुण्याचा…
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यावर मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. गिरीश बापटानंतर भाजपची पुण्याची परंपरा कोण चालवणार? असा प्रश्न पडलेला असताना मुरलीधर मोहोळ यांना प्राधान्य देऊन भाजपने अचूक खेळी केली. एकतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पारंपारिक ब्राह्मण मतदारांना भाजपने शांत केलं. त्यात मराठा उमेदवार देऊन जातीय राजकारणाच्या दृष्टीने मोहोळांची उमेदवारी ही चांगली समजली गेली. महापौर पदाचा त्यांना असणारा अनुभव आणि शांत, संयमी नेतृत्व असल्यामुळे पुणे भाजपासाठी वन साईड ठरेल असं बोललं गेलं. पण काँग्रेसने कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपासाठी जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकरांना तिकीट देऊन पुण्याची जागा रेसमध्ये आणली. काँग्रेसला पुण्यातून पहिल्यांदाच धिस इज धंगेकर सारखा पॉप्युलर चेहरा मिळाल्यामुळे आणि महाविकास आघाडीने ताकद लावल्यामुळे पुण्याचं मतदान घासून झालं. भाजपचं केडर मजबूत असल्याने आणि युतीनं जीव तोडून काम केल्याने मोहोळ जिंकतील असं बोललं जात असताना धंगेकरांच्या पाठीशी असणारं बहुजन समाजाचं मतदान वर्क आऊट झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची पाचवी जागाही रेड झोनमध्ये जावून भाजपला इथून भोपळा मिळू शकतो… तर हे सगळं विश्लेषण ऐकल्यावर पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला खरंच एकही जागा मिळणार नाही, असं तुम्हाला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर या मतदानाचा निकाल जाहीर होईल. त्यामुळे सर्वांचेच लक्ष चार जूनच्या तारखेकडे लागले आहे. तर दुसऱ्या बाजूला निकालाची तारीख आणि वेळ जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींचा वेग ही वाढला आहे. मात्र अशातच अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) महिला उमेदवाराच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या महिला उमेदवाराच्या विरोधात थेट गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला नेत्या आणि लोकसभा उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी परवानगी नसतानाही आचारसंहितेचे उल्लंघन करत रॅली काढून जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे अर्चना पाटील आणि त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचा निकाल आला असताना अर्चना पाटील अडचणीत सापडल्या आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अर्चना पाटील यांनी भव्य रॅली काढली होती. या रॅलीला पोलिसांकडून ही परवानगी मिळाली होती. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य सभा झाली. या सभेसाठी कोणतीही परवानगी काढण्यात आली नव्हती. त्यामुळे अखेर तब्बल 43 दिवसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, परवानगी न घेतलेल्या या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे बडे नेते उपस्थित होते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) देशातील ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज सुरु असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. देशात भाजपप्रणीत NDA आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये थेट सामना आहे. भाजपकडून आमचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे तर विरोधकांना सुद्धा विजयाचा विश्वास आहे. जर इंडिया आघाडीची सत्ता आली तर ४८ तासांत नवा पंतप्रधान जाहीर करू असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हंटल होते. त्यानंतर इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) पंतप्रधान कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाल्या. मात्र आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नाव घेऊनच इंडिया आघाडीचा पंतप्रधान सांगितला आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना इंडिया आघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण असेल असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधींचे (Rahul Gandhi) नाव घेतलं. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉईस असल्याचं सांगितलं. मीही सांगतो, पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशाची पसंती राहुल गांधी आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. त्यामुळे देशानं राहुल गांधींना स्वीकारलं आहे. राहुल गांधींचं नेतृत्व जनतेने स्वीकारलं आहे, राहुल गांधी देशाचे नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणाले.
मोदींवर टीका –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळमध्ये ध्यानस्त बसले आहेत यावरही राऊतांनी निशाणा साधला. मोदी कॅमेरा लावून ध्यानाला बसले आहेत. सर्व बाजूंनी कॅमेराच्या माध्यमातून मोदींच्या शरीराचा प्रत्येक भाग तुम्ही पाहू शकता. मोदींची ध्यानधारणा म्हणजे स्टंट आहे. 3000 सुरक्षारक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रक्षा करण्यासाठी तेथे तैनात करण्यात आले आहेत. तो संपूर्ण रस्ता, मार्ग, परिसर बंद करण्यात आला आहे. याला ध्यानधारणा म्हणत नाही असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर टीका केली.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matka Water) उन्हातून घरी आलं की, सगळ्यात आधी आपण फ्रिज उघडतो आणि थंडगार पाणी घटाघट पितो. पण यामुळे घसा दुखणे, सर्दी होणे अशा समस्या जाणवू शकतात. याउलट मातीच्या माठातील नैसर्गिक रित्या थंड झालेले पाणी प्यायल्याने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून मातीचा माठ घेऊन येतात. एकतर माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. त्यामुळे याचा तब्येतीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. शिवाय या पाण्यामुळे लगेच तहान भागते आणि मुख्य म्हणजे हे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकते. चला तर माठातील पाणी पिण्याचे इतर फायदे जाणून घेऊया.
1. नैसर्गिक थंडावा
मातीच्या माठात साठवलेले पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. (Matka Water) कारण, या मातीच्या भांड्यात पृष्ठभागावर लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे बाष्पीभवन होते. या प्रक्रियेमुळे भांडे आतील पाण्याची उष्णता नष्ट करून पाण्याचे तापमान कमी करते.
2. पिण्यास सुरक्षित (Matka Water)
मातीचा माठ सेंद्रिय पद्धतीने पाणी शुद्ध आणि थंड करतो. यात पाण्याच्या सच्छिद्र मायक्रोटेक्चरमुळे हे पाणी पिण्यास अत्यंत सुरक्षित मानले जाते. कारण मातीचे भांडे प्रदूषकांना अडवटे आणि पाण्याचे निर्जंतुकीकरण करते. मुख्य म्हणजे या पाण्याचे तापमान आदर्श असल्याने असे पाणी प्यायल्यास घसा खवखवणे, दुखणे, सुजणे अशा समस्या होत नाहीत.
3. शारीरिक ऊर्जा
माठातील पाणी प्यायल्याने शारीरिक ऊर्जा मिळते. कारण, मातीची भांडी बनवताना वापरण्यात येणारी चिकणमाती खनिजे आणि विद्युत चुंबकीय उर्जेने परिपूर्ण असते. त्यामुळे यात साठवलेले पाणी शरीराला ऊर्जा देतात आणि रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढतात. (Matka Water)
4. पोटाच्या समस्या होत नाहीत
मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी हे रसायनरहित असते. असे प्यायल्याने चयापचय वाढते. शिवाय या पाण्यात असणारी खनिजे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत.
5. सनस्ट्रोक प्रतिबंधित करते
कडक उन्हाळ्यात सनस्ट्रोक ही एक सामान्य समस्या समजली जाते. (Matka Water) या समस्येपासून आपल्या रक्षण करायचे असेल तर मातीच्या माठातील पाणी पिणे फायदेशीर ठरते. कारण यामध्ये भरपूर खनिजे आणि पोषक घटक असतात. जे शरीर हायड्रेटेड ठेवून डिहायड्रेशन आणि सनस्ट्रोक सारख्या समस्या लांब ठेवते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahesh Manjrekar) छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस. हा कार्यक्रम विविध भाषांमध्ये विविध भाषिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. त्यापैकी ‘बिग बॉस मराठी’ हा शो कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. ज्याच्या पहिल्या चार सिझनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यानंतर आता सर्वाना प्रतीक्षा आहे ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनची. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र, यामध्ये एक मोठा बदल पहायला मिळणार आहे. तो म्हणजे यावेळी बिग बॉस मराठीचा शो होस्ट बदलणार आहे.
आतपर्यंत बिग बॉस मराठीच्या चार सिजनचे होस्टिंग मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या नावाचा दबदबा कायम राखणारे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले आहे. मात्र, येऊ घातलेल्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनचे होस्टिंग महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार नसून अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. तसा कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर प्रोमो देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये होस्ट चेअरवर महेश मांजरेकरांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख दिसून आला आहे. त्यामुळे सर्वत्र मांजरेकरांनी शो का सोडला? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. ज्याचं कारण स्वतः महेश मांजरेकरांनी दिल आहे.
.. म्हणून सोडला शो (Mahesh Manjrekar)
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी महेश मांजरेकरांऐवजी अभिनेता रितेश देशमुख शोचे होस्टिंग करणार आहे. म्हणजे आता मांजरेकरांची शाळा भरणार नाही. या विचाराने प्रेक्षकांच्या मनात चलबिचल सुरु झाली आहे. मांजरेकरांनी शो सोडला याबाबत विविध चर्चा आणि तर्क वितर्क लावले जात आहेत. हे पाहून अखेर महेश मांजरेकरांनी मौन सोडत शोचे होस्टिंग सोडण्यामागे काय कारण आहे? ते स्वतःच सांगितले आहे.
यंदाच्या सिझनमध्ये नवे सरप्राईज, एक्स्ट्रा धमाल, मस्ती, गॅासिप्स, मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यासोबत नवा होस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. महेश मांजरेकर यांनी पहिल्या चार सिझनचे सूत्रसंचालन केले होते. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतरही त्यांनी शो का सोडला? (Mahesh Manjrekar) असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. याबाबत सांगताना एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, ‘माझ्या समोर बरेच प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे मला शोसाठी आवश्यक तितका वेळ देता येणार नाही आणि म्हणून मला हा शो सोडावा लागला’.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारच्या माध्यमातून उज्वला योजनेचे (Ujwala Yojana) ग्राहक आणि एलपीजी गॅसचे (LPG Gas) ग्राहक यांना अनुदान देण्यात येते. हे अनुदान केंद्र सरकार प्रति सिलेंडर देत असते. या अनुदानाची राशी योजनेची जोडलेल्या ग्राहकांच्या खात्यात थेट पाठवली जाते. मात्र आता सरकारने उज्वला योजनेसह एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता गॅस ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिकची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे असणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्या ग्राहकांना अनुदान मिळणार नाही.
सध्या केंद्र सरकार संबंधित गॅस एजन्सीच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना याबाबत सूचना करत आहे. या सूचनेनुसार ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस जोडणी आहे अशा ग्राहकांना केवायसी करण्याकरिता गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यावेळी त्या ग्राहकाकडे मोबाईल व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या ऑफिसमध्ये ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडर वितरण व अनुदान सरकारकडून बंद केले जाईल.
परंतु जर एखाद्या ग्राहकाने केवायसी केली नाही तर त्याचे अनुदान बंद होईल. यानंतर तो पुन्हा संबंधित एजन्सी मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. या एजन्सीकडून संबंधित ग्राहकाची गॅस जोडणी पुन्हा सुरू करण्यात येईल. ग्राहकांनी एक केवायसी केल्यानंतर मोबाईल नंबर बदलला असेल तर तोही अपडेट करता येईल. इतकेच नव्हे तर जोडणी असलेल्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर ही जोडणी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करता येऊ शकते. त्या व्यक्तीला जर सरकारच्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वेगळे रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच मोबाईलवरून सिलेंडर रिफिलिंग बुकिंग करावे लागेल. हे बुकिंग केल्याशिवाय ग्राहकाने सिलेंडर घेऊ नये, अन्यथा अनुदानामध्ये नुकसान होऊ शकते.
Southern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता दक्षिण रेल्वे अंतर्गत वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच रेडिओलॉजी या पदांसाठी रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा आहेत त्या जागा भरण्यासाठी आता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 ही आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.
महत्त्वाची माहिती | Southern Railway Bharti 2024
पदाचे नाव – वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ रेडिओलॉजी
पदसंख्या – 10 जागा
प्रक्रिया शुल्क – 100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2024
शैक्षणिक पात्रता – बारावी पास
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही थेट अर्ज करू शकता .
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीपेक्षा महाविकास आघाडी चार जूनला भाव खाऊन जाणार… तुतारी आणि मशाल जोरदार मुसंडी मारणार… महायुतीकडे आमदारांची संख्या जास्त असली तरी हवा महाविकास आघाडीची होणार… महाराष्ट्रातील लोकसभा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून वारं आघाडीच्या बाजूने आहे, असा एकंदरीत ट्रेंड दिसत होता. म्हणूनच आम्ही 35 जागा जिंकू, असा दावा आघाडीकडून करण्यात आला… तर महायुतीच्या 40 च्या आसपास जागा निवडून येतील, असं सत्ताधारी गटाकडून सांगण्यात येतय… पण येत्या ४ जूनला मशाल आणि तुतारीला जनतेने कौल दिला तरी महाराष्ट्रात कमळच जिंकणार आहे… महायुतीच्या कमी जागा येण्यामध्ये भाजपचा (BJP) कसा फायदा आहे? शिंदे आणि अजितदादांच्या छातीत धडकी भरवणारा नेमका कोणता डाव भाजपने टाकलाय? याचंच सविस्तर विश्लेषण पाहूया,
2019 ची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित लढली होती. यात शिवसेनेने लढवलेल्या 23 जागांपैकी अमरावती, शिरूर, रायगड, संभाजीनगर आणि सातारा या पाच जागा सोडल्या तर 18 जागांवर विजय झाला होता. तर भाजपने जबराट कामगिरी करत 25 जागांपैकी केवळ बारामती आणि चंद्रपूर सोडता 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे युतीला 2019 मध्ये महाराष्ट्रातून तब्बल 41 खासदारांचं संख्याबळ मिळालं होतं. आता यातील शिवसेनेच्या शिंदे गटासोबत 13 तर अजितदादांना 4 पैकी एका खासदाराने सपोर्ट केल्याने महायुतीच्या खासदारांची संख्या 40 पर्यंत म्हणजे जवळपास जैसे थेच राहिली…
हा झाला गेला बाजार इतिहास… हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं तेव्हा भाजपाला 28, शिवसेना शिंदे गटाला 15, राष्ट्रवादीला चार तर रासपला 1 अशा जागा सुटल्या होत्या. आता निकालानंतर भाजपची पोझिशन पाहिली दिंडोरी, भिवंडी, नंदुरबार, माढा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पालघर, सातारा या सात ते आठ जागांवर घासून लढत झाली. इथे भाजपा बॅक फुटला असल्याने समजा या सातही जागा आपण मायनस केल्या तरी भाजपला 21 खासदार आरामात निवडून आणता येतायेत, असा याचा अर्थ होतो. म्हणजे 2019 च्या तुलनेत खासदारांचा आकडा केवळ दोन ने घटतोय. पण शिंदे गटाच्या दोन ते तीन जागा आणि अजितदादांची एक जागा सोडली तर बाकीच्या सगळ्या जागा या काठावरच्या आहेत. या जागांवर तुतारी किंवा मशालीला पाठिंबा असल्याचं बोललं जात असल्यामुळे महायुतीच्या जागा घटत असल्या तरी त्याचा फटका शिंदे गट आणि अजितदादांना बसतोय, हे चित्र क्लिअर आहे. महाविकास आघाडीच्या या वाढणाऱ्या खासदारांच्या संख्येचा इम्पॅक्ट दिल्लीतील भाजप सरकारवर होणार नाही, असही बोलायला हरकत नाही. याउलट जर अशी परिस्थिती राहिली तर याचा भाजपलाच भविष्यात फायदा होणार आहे.
यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विधानसभेतील बार्गेनिंग पॉवर.
विधानसभेला कुठल्या पक्षाला किती जागा सुटणार याची परीक्षा 4 जूनला पार पडणार आहे. भाजपने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केली आणि अजित पवार आणि शिंदे गटाला समाधानकारक खासदारांचा आकडा गाठता आला नाही. तर यामुळे भाजपची महाराष्ट्र विधानसभेतील जागा वाटपात बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. अजित पवार गटाने आत्तापासूनच 90 जागांची मागणी करून वादाला तोंड फोडलेलं पाहून लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीत मोठी घासाघीस होणार हे तर आता जवळपास कन्फर्म आहे. त्यामुळे भाजपचा वाढलेला खासदारांचा आकडा तर दुसरीकडे शिंदे आणि अजितदादांचा एकेरी आकडा ही गोष्ट कळत नकळतपणे भाजपच्याच पथ्यावर पडणारी आहे. बंडाळीचा आणि गद्दारीचा टॅग, काठावरच का होईना पण भाजपला दिल्लीतील दिसत असणारं बहुमत आणि स्वतंत्रपणे लढण्यासाठी नसणारी परिपक्व यंत्रणा यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपवर अवलंबून राहावं लागणार आहे. याचाच विचार केला तर लोकसभेला झालेलं जागावाटप इथेच भाजपने विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केला होता, असं म्हणायला हरकत नाही.
महायुतीचा कमी आकडा म्हणजे भाजपची ताकद असं म्हणायला दुसरं कारण ठरतं ते म्हणजे पक्षाची पुन्हा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फोडाफोडीच्या राजकारणात सर्वात जास्त फटका हा भाजपालाच बसला. महाविकास आघाडी कायम असताना एकटी भाजप विरोधात होती. तेव्हा विरोधक म्हणून आक्रमक होत फडणवीसांनी ट्रिपल इंजिन सरकारला चांगलाच घाम फोडला होता. राज्यातील कडवट विरोधक म्हणून भाजपने आपला स्पेस तयार केला होता. पण पुढे सत्तेच्या महत्त्वकांक्क्षेपोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून भाजप सत्तेत आली खरी. पण जनतेच्या मनात भाजपबद्दल एक निगेटिव्ह परसेप्शन्स बिल्डप व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे चार जूनला महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यातही भाजपची कामगिरी समाधानकारक तर शिंदे आणि अजितदादांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. तर हे कारण पुढे करत भाजप विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढू शकते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रिशंकू परिस्थितीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संधी ही भाजपालाच मिळू शकते…या सगळ्याचा विचार करता लोकसभेला मशाल पेटन असो, की तुतारी वाजणं यात फायदा हा भाजपचाच आहे,असं चित्रं सध्यातरी पाहायला मिळतंय. महायुतीच्या खासदारांचा आकडा घटला तर यात भाजपचाच फायदा आहे, असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा