Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 714

Organic Liquid Fertilizer | घरच्या घरी ताकापासून तयार करा लिक्विड खत, झाडाला होईल दुप्पट फायदा

Organic Liquid Fertilizer

Organic Liquid Fertilizer | आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, ताक हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ताकामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील भरून काढण्यासाठी ताकाचा वापर केला जातो. परंतु या ताकाचे फक्त आपल्या शरीरालाच नव्हे, तर झाडांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तुम्ही आता घरात तयार केलेल्या या ताकापासून ऑरगॅनिक लिक्विड फर्टीलायझर तयार करू शकता. आणि ते तुमच्या झाडांना घालू शकता. त्यामुळे तुमच्या झाडांची वाढ देखील चांगली होईल.

घन खतांपेक्षा लिक्विड खत (Organic Liquid Fertilizer ) हे झाडांच्या पोषण तत्वासाठी खूप चांगले असते. परंतु बाजारात मिळणाऱ्या रासायनिक खतांमुळे झाडांवर त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परंतु जर तुम्ही या ताकापासून घरच्या घरी ऑरगॅनिक लिक्विड तयार केले, तर त्याचे तुम्हाला खूप फायदे होतील. आता हे ऑरगॅनिक फर्टीलायझर तयार कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत.

ताकापासून ऑरगॅनिक लिक्विड फर्टीलायझर कसे करायचे? | Organic Liquid Fertilizer

  • ताकापासून लिक्विड फर्टीलायझर तयार करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी एका बॉटलमध्ये पाच कप ताक घ्या आणि मग त्यात कपाने नारळाचा ज्यूस टाका.
  • त्यानंतर तुम्ही या मिश्रणात 20 ग्रॅम हळद आणि चार ग्रॅम हिंग टाकून नारळाचा ज्यूस एकजीव करून घ्या.
  • हे पदार्थाचे मिश्रण एकजीव झाल्यानंतर तुम्ही हे लिक्विड पाच ते सहा तासांसाठी तसेच ठेवून द्या.
  • नंतर लिक्विड स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही ते रोपांच्या मुळण वर स्प्रे करा.

झाडाला होणारे फायदे

ताकाच्या लिक्विड फर्टीलायझरचे झाडाला खूप फायदे होतात. ताकामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम,पोटॅशियम सारखे अनेक पोषकतत्वे असतात. ज्यामुळे झाडाला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ताकात असलेल्या या गुणधर्मामुळे कीटक देखील लागत नाही. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी ताकापासून लिक्विड फर्टीलायझर तयार करून ते झाडांना घालू शकता.

Salman Khan : सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या 4 जणांना अटक; समोर आले पाकिस्तान कनेक्शन

Salman Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानवर आणखी एक हल्ला होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या हल्ल्याचा कट आधीच उघडकीस आला आणि या प्रकरणाशी संबंधित ४ जणांना पनवेल पोलिसांनी अटकसुद्धा केली. माहितीनुसार, या चौघांनी पनवेलमध्ये सलमानच्या कारवर हल्ला करून त्याला संपवण्याचा कट आखला होता. मात्र, त्यांचा कट आधीच पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांना अटक झाली. मुख्य माहिती अशी की, अटक केलेल्या चारही आरोपींचे बिष्णोई गँगशी कनेक्शन आहे. इतकेच नव्हे तर या कटाचे पाकिस्तान कनेक्शनदेखील असल्याचे समोर आले आहे.

सलमानला संपवण्याचा आणखी एक कट उघडकीस (Salman Khan)

अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात सामील असल्यानं मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता सलमान खानला संपवण्यासाठी आणखी एक कट आखण्यात आला होता असे समोर आले आहे. हा कट आखणाऱ्या ४ आरोपीना पनवेलमधून पोलिसांनी अटक केली आहे.

एका वृत्तानुसार, ‘पनवेलमध्ये सलमान खानवर (Salman Khan) हल्ला करण्यासाठी आरोपींचा पाकिस्तानमधून शस्त्रे मागवण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटकेत घेतले. अटकेत असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना, धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप आणि झिशान खान उर्फ जावेद खान.

पाकिस्तान कनेक्शन

या प्रकरणाबाबत पोलीस सूत्रांनी काही माहिती प्रदान केली आहे. त्यानुसार, तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा कॅनडात स्थायिक असलेला चुलत भाऊ अनमोल बिष्णोई आणि सहकारी गोल्डी ब्रार यांनी एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून AK-47, M-16 आणि AK-92 खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करून बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मारण्याचा कट रचल्याचे देखील पोलिसांना समजले आणि यानुसार त्यांनी कारवाई केली.

असं होत प्लॅनिंग

वृत्तानुसार, या प्लॅनमध्ये अभिनेता सलमान खानची गाडी रस्त्यात थांबवून किंवा फार्महाऊसवर हल्ला करून त्याला जीवानिशी मारणे असा उद्देश निश्चित करण्यात आला होता. यासाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीने महिनाभरापासून पूर्ण तयारी केली होती. सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसबाहेर गोळीबार करणाऱ्या २ नेमबाजांना नेमण्यात आले होते. (Salman Khan) दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी माहित मिळताना त्यांनी तडक कारवाई केली आणि आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. तरीही अद्याप प्रकरणाचा तपास संपलेला नाही. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 115, 120 (बी) आणि 506 (2) अंतर्गत पोलिसात FIR दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु राहील.

Jayant Patil : जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार, राहुल गांधींची वेळही मागितली; नव्या दाव्याने खळबळ

jayant patil congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे ४ जूनच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्यांनी त्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केला आहे. तर जयंत पाटील काँग्रेसमध्ये नक्कीच जाऊ शकतात असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही सुरज चव्हाण यांच्या दाव्यात हवा भरली आहे. आता यावर जयंत पाटील काय उत्तर देतात ते पाहायला हवं.

सुरज चव्हाण काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे. त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे ४ जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा रिकामा होईल आणि तिकडचे अनके लोक अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली पक्षप्रवेश करतील असं सुरज चव्हाण यांनी म्हंटल आहे. सुरज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.

दुसरीकडे , भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही सूरज चव्हाण यांच्या दाव्यात हवा भरली आहे. जयंत पाटील हे यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होते परंतु या बोलण्याला त्याठिकाणी अर्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भविष्य जयंत पाटील याना माहित आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीनतर अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र जयंत पाटील यांनी मात्र एकनिष्ठेने शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आजही जयंत पाटील हेच शरद पवार गटाकडून किल्ला लढवताना दिसतात. मात्र अधून मधून त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा प्रसारमाध्यमात सुरु असतात. यापूर्वी सुद्धा जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असून अमित शाह आणि त्यांची भेट झाली असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या बातमीचे खंडन करत आपण कधीच शरद पवारांची साथ सोडणार नाही असं ठणकावून सांगितलं होते. आता सुरज चव्हाण यांच्या दाव्यानंतर जयंत पाटील काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर

Indigo flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची धमकी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो 6E 5314 (IndiGo Flight) विमानाला मिळाली आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवरच इंडिगोने एक प्रेसनोट जारी केली आहे. यासह मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पोलीस यंत्रणा या सर्व प्रकाराचा तपास करीत आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सकाळी 5:40 वाजता IGI कडून बॉम्बच्या धमकीचा फोन आला होता. याशिवाय फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर ‘३० मिनिटांत बॉम्बस्फोट’ लिहिलेली ही आढळले होते. हा पेपर पायलटला सापडला होता. या सर्व प्रकारानंतर ताबडतोब पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले. यानंतर हे विमान एका विलगीकरण खाडीत नेण्यात आले. जिथे सर्व प्रवाशांना सुखरूप विमानातून उतरविण्यात आले. पुढे सर्व तपासण्या झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात घेऊन जाण्यात आले.

शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या विस्तारा विमानात (Vistara Flight) बॉम्बची धमकी मिळाली होती. या विमानात 177 लोक आणि एक लहान मूल प्रवास करत होते. ही धमकी मिळताच विमान कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तातडीने कारवाई केली. यानंतर फ्लाइट UK-611 ला दुपारी ठीक 12:10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा दलात गोंधळ उडाला होता.

Ratan Tata : रतन टाटांच्या ‘त्या’ आदेशामुळे ताजबाहेर भटक्या श्वानाला मिळाला निवांतपणा; व्हायरल फोटोने वेधलं लक्ष

Ratan Tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratan Tata) रतन टाटा कायम आपल्या कृतीतुन समाजाला काही ना काही शिकवण आणि प्रेरणा देत असतात. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेऊन ते कायम जबाबदारीने एक एक पाऊल उचलताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक कृतींबाबत कायम चर्चा होत असतात. दरम्यान, त्यांच्या अशाच एका कृतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मन जिंकलं आहे. आपण सारेच जाणतो की, मुंबईत रतन टाटा यांचे आलिशान ताज हॉटेल आहे. त्याची भव्यता आणि सुंदरता अनेकांसाठी आकर्षण आहे. या हॉटेल्सशी संबंधित एका दृश्याबाबत सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरु आहे.

मुंबईतील हॉटेल ताज हे सर्वात आलिशान असे फाइव्ह स्टार हॉटेल आहे. अशा या हॉटेलमध्ये अनेक दिग्गज मंडळी तसेच व्यावसायिक आणि बडे लोक येत जात असतात. अशा हॉटेलच्या दरवाजासमोर एक श्वान निवांत झोपलेला दिसत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो ताजमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोसोबत या महिलेने शेअर केलेल्या पोस्टनंतर युजर्स रतन टाटा (Ratan Tata) यांच्या कृतीचे कौतुक करताना दिसत आहेत.

व्हायरल फोटो

मुंबईतील सगळ्यात आलिशान अशा ताज हॉटेलच्या आवारात एक भटका श्वान (भटका कुत्रा) झोपलेला पाहून हॉटेलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेला थोडे आश्चर्य वाटले. इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये जिथे अनेक बडे सेलिब्रिटी, राजकीय नेते येत जात असतात. अशा ठिकाणी एका भटक्या श्वानाचे वावरणे ही बाब खरंतर खटकण्यासारखी होती. मात्र, रतन टाटा (Ratan Tata) यांनी स्वतः हॉटेलच्या आवारात येणाऱ्या प्राण्यांशी चांगले वागण्याच्या कडक सूचना दिल्याचे कर्मचाऱ्यांकडून समजताच ती महिला अवाक् झाली. यानंतर महिलेने एक पोस्ट शेअर करत रतन टाटा यांच्या निर्णयाचे कौतुक केले’.

महिलेची पोस्ट

(Ratan Tata)रतन टाटा यांच्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या महिलेचे नाव रुबी खान असे आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो आणि त्यासोबत भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलंय, ‘इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये भटक्या श्वानाला पाहून आश्चर्य वाटले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. त्या माहितीनुसार, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले की, तो जन्मापासून या हॉटेलचा एक भाग आहे. रतन टाटांनी स्वतः कडक सूचना दिल्या आहेत की, त्यांच्या हॉटेलच्या आवारात कोणी प्राणी आल्यास त्याला चांगली वागणूक द्यावी. या खास ठिकाणी श्वानाला सुरक्षित राहून शांततेने जगता येईल अशी जागा मिळाली आहे, हे पाहून मला आनंद झाला’.

पुढे लिहिलेय, ‘ताजमहाल हॉटेलमध्ये प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक येतात. त्यामुळे हॉटेल परिसर अगदी स्वच्छ, सुंदर आणि प्रतिमा जपणारा ठेवला जातो. अशा प्रतिष्ठित हॉटलेच्या प्रवेशद्वारालाही महत्त्व असते. पण, याच प्रवेशद्वारावर एक श्वान शांतपणे झोपला होता, बहुधा कोणाचेही त्याच्याकडे लक्ष गेले नसेल. या हॉटेलमध्ये मी समावेशन, मानसिक सुरक्षितता आणि भावनिक बुद्धिमत्ता अनुभवली’. (Ratan Tata) यावेळी रुबी खान यांनी रतन टाटांबाबत बोलताना म्हटले, ‘तुम्ही सर्वात यशस्वी उद्योजक होऊ शकता, परंतु तुम्ही सर्वांचा आदर करणे आणि आलिंगन देणे कधीही थांबवू नये’. ही पोस्ट व्हायरल झाली असून यावर अनेकांनी कमेंट करत रतन टाटा यांच्या महानतेविषयी आदर प्रकट केला आहे.

7 Th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA नंतर आता ग्रॅज्युएटीमध्ये देखील झाली वाढ

7 Th Pay Commission

7 Th Pay Commission | जे केंद्रीय सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता सरकारने रिटायरमेंट ग्रॅच्युएटी आणि डेथ ग्रॅज्युएटीची देखील मर्यादा 25% वाढवली आहे. त्यामुळे आता ही मर्यादा 20 लाखांवरून 25 लाख एवढी झालेली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप जास्त फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (7 Th Pay Commission) वाढ केली होती. त्यानंतर महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीए मूळ वेतनाच्या 50% केलेला होता. परंतु त्यानंतर रिटायरमेंट आणि डेथ ग्रॅच्युएटीमध्ये देखील वाढ करणे अपेक्षित होतं. त्यामुळे आता सरकारने या ग्रॅच्युएटीमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या कर्मचाऱ्यांना होणार फायदा | 7 Th Pay Commission

1 जानेवारी 2024 नंतर जे कर्मचारी निवृत्त होतील, त्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये या आधी सरकारने 4 टक्के वाढ केली होती. त्यानंतर त्यांचा डीए 50 टक्केपर्यंत देखील वाढवण्यात आलेला होता. यापूर्वी संदर्भात गेल्या महिन्यात 30 एप्रिल रोजी घोषणा करण्यात आली होती. परंतु 7 मे रोजी ती घोषणा थांबवण्यात आली. त्यामुळे आता पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी 1972 नुसार एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर एका संस्थेत सलग पाच वर्ष काम केले. असेल तर त्याला या ग्रॅच्युएटीचा लाभ घेता येणार आहे.

मार्चमध्ये होणार महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर त्यांचा डीए देखील 50% नी वाढवला होता. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईपासून दिलासा मिळालेला आहे.

Realme C63 : 50MP कॅमेरा, 8GB RAM सह Realme ने आणलाय स्वस्तात मस्त मोबाईल

Realme C63 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी रिअलमी ने सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme C63 असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 8GB RAM सह अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. सध्या या मोबाईलचे लौंचिंग जागतिक बाजारात झालं असून लवकरच तो भारतात सुद्धा दाखल होणार आहे. आज आपण या हँडसेटचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

6.74 इंचाचा डिस्प्ले –

Realme C63 मध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD + रिझोल्यूशनसह येत असून 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 450 nits पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Unisock चा T612 प्रोसेसर बसवला असून रिअलमीचा हा मोबाईल Android 13 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा – Realme C63

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Realme C63 मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आलाय. तर सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम सपोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती?

Realme C63 च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 1,999,000 IDR (अंदाजे 10255.10 रुपये) आहे तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 2,299,000 (अंदाजे 11794 रुपये) आहे. हा स्मार्टफोन निळ्या आणि हिरव्या अशा २ रंगात उपलब्ध असून 5 जून 2024 पासून इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये मोबाईलची विक्री सुरू होईल.

Xiaomi Mijia Massage Gun 3 | आता घरच्या घरी करा स्वस्तात मसाज; Xiaomi ने आणले अप्रतिम उपकरण

Xiaomi Mijia Massage Gun 3

Xiaomi Mijia Massage Gun 3 | बाजारात आजकाल अनेक मशीन उपलब्ध झालेल्या आहेत. ज्यामुळे माणसाचे जीवन अगदी सुलभ झालेले आहे. अशातच आता Xiaomi ने चीनी बाजारात Mijia Massage Gun 3 मसाज टूल लॉन्च केले आहे. हे मसाज साधन खेळाडू, फिटनेस प्रेमी आणि स्नायू पुनर्प्राप्ती वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेले आहे. हे सामान्य माणसांना परवडणारे उपकरण आहे. आज आपण मिजिया मसाज गन 3 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Xiaomi Mijia Massage Gun 3 माहिती

Xiaomi Mijia Massage Gun 3 मध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत थ्रस्टमध्ये 38 टक्के वाढ आहे, 25 किलोपर्यंत पोहोचली आहे. हे खोल स्नायूंच्या गटांना चांगली विश्रांती देते आणि लैक्टिक ऍसिड चांगल्या प्रकारे तोडते. यामुळे वेदना आणि थकवा यापासून जलद आराम मिळतो. ॲथलीट आणि फिटनेस प्रेमी दोघांसाठी डिझाइन केलेले, हे उपकरण 2800RPM आणि 10MM स्ट्रोक डेप्थची कमाल गती देते, ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.

हे डिव्हाईस दोन ऑपरेशनल मोड फिक्स्ड आणि व्हेरिएबल फ्रिक्वेंसीमध्ये येते. फिक्स्ड मोड व्यायामापूर्वी आणि नंतर आरामासाठी स्थिर गती प्रदान करतो. तर व्हेरिएबल मोड रोजच्या स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी व्यावसायिक मसाज तंत्र वापरतो. मसाज गन 3 मध्ये एक इंटेलिजेंट गियर मेमरी फंक्शन आहे जे स्टार्टअप करताना द्रुत प्रवेशासाठी शेवटची वापरलेली सेटिंग लक्षात ठेवते. याव्यतिरिक्त, फोर्स फीडबॅक लाइट रिंग लागू दाबावर व्हिज्युअल मार्गदर्शन प्रदान करते, वापरकर्त्यांना कठोर परिश्रम करण्यास मदत करते. दाबानुसार प्रकाश रिंगचा रंग बदलतो.

हे एकाधिक मसाज गट आणि गरजांसाठी डिझाइन केलेले एकाधिक मसाज हेड्ससह येते, ज्यामध्ये मोठ्या भागासाठी वर्तुळाकार डोके, मणक्यासाठी U-आकाराचे डोके आणि सामान्य मालिशसाठी एक सपाट डोके समाविष्ट आहे. तुम्ही व्यायामशाळेत असाल, ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात असाल तरीही जाता जाता स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मसाज गनमध्ये 2450mAh लिथियम बॅटरी आहे जी एका चार्जवर 30 दिवसांसाठी वापरली जाऊ शकते.

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची संधी; इथे करा अर्ज

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची नोकरीची अशी संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता तुम्हाला लवकरच नोकरी लागेल. कारण आता महावितरण अहमदनगर येथे एक भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 321 जागा रिक्त आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता. त्याचप्रमाणे 6 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. या तारखेनंतर भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ
  • पदसंख्या – 321 जागा
  • नोकरीचे ठिकाण – अहमदनगर
  • वयोमर्यादा – 18 ते 30
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन किंवा ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता म. रा. वि. वि. कं. मर्या, मंडल कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड, अहमदनगर 41 400 1
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2024.

शैक्षणिक पात्रता

  • दहावी उत्तीर्ण त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना याबद्दल संधी आहे. यात खुल्या वर्गासाठी किमान 55% गुण मागासवर्गीय साठी 50 टक्के गुण आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा? | Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी नोकरी फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • 6 जून 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे सामने कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध; पहा संपूर्ण शेड्यूल

T20 World Cup 2024 india schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून म्हणेजच 2 जूनपासून T20 World Cup 2024 ला सुरुवात होणार आहे. अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामन्याने विश्वचषकाचा श्रीगणेशा होणार आहे. अमेरिकेच्या भूमीवर पहिल्यांदाच विश्वचषक खेळवला जाणार आहे त्यामुळे एक वेगळी उत्सुकता या वर्ल्डकपकडे आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सुद्धा मोठ्या तयारीने अमेरिकेला रवाना झाला असून यंदा काहीही करून वर्ल्डकप जिंकायचाच असा चंग टीम इंडियाने बांधला आहे. यावर्षीची विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असल्याने टीव्ही किंवा मोबाईलवर लाईव्ह सामना पाहयचा झाल्यास कधी बघावा असा प्रश्न प्रत्येक क्रिकेटप्रेमीला पडला असेल. परंतु चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला टीम इंडियाचे सामने कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होतील हे अगदी सविस्तर सांगणार आहोत.

यावेळी T-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) पहिल्या फेरीसाठी 20 संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ सुपर-एटसाठी पात्र होण्यापूर्वी चार सामने खेळेल. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-8 मध्ये जातील तर तळाचे तीन संघ बाहेर पडतील. आता हे आठ संघ दोन वेगवेगळ्या गटात विभागले जातील. दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. बार्बाडोस येथे २९ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. टीम इंडिया ग्रुप-A मध्ये आहे. या गटात भारताशिवाय, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडाचा समावेश आहे. या संघाना हरवून भारताला सुपर-8 मध्ये जावे लागेल.

भारताचे सामने कधी आहेत? T20 World Cup 2024

5 जून- भारत vs आयर्लंड, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क

9 जून- भारत vs पाकिस्तान, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क

12 जून- भारत vs अमेरिका, नॅसो काउंटी स्टेडिअम, न्यूयॉर्क

15 जून- भारत vs कॅनडा, फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा

टीम इंडिया सुपर-8 मध्ये गेली तर त्यांचे शेड्युल पुढीलप्रमाणे असेल

20 जून- भारत vs C-1, ब्रिजटाउन, बार्बाडोस

22 जून- भारत vs D-2, नॉर्थ साउंड, अँटीगा

24 जून- भारत vs B-2, ग्रोस आयलेट, सेंट लूसिया

असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.