Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 720

Nothing Phone 2a Special Edition : Nothing Phone 2a चे स्पेशल एडिशन लॉन्च; पहा काय खास गोष्टी मिळणार ?

Nothing Phone 2a Special Edition

Nothing Phone 2a Special Edition । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Nothing ने Nothing Phone 2a चे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. जुन्या मॉडेलप्रमाणेचा या नव्या एडिशन मध्ये ट्रांसपैरंट डिजाइन देण्यात आली आहे मात्र पाठीमागील बाजूला लाल, पिवळे आणि निळे हायलाइटर आहेत, जे फोनला वेगळे बनवतात. या स्पेशल एडिशन मॉडेलचा मुख्य रंग पांढरा आहे, तर कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास आणि तळाशी काही भागात राखाडी हायलाइटर आहेत. कॅमेरा मॉड्यूल निळ्या रंगात आहे, तर काही इतर पार्ट लाल आणि पिवळ्या रंगात हायलाइट केले आहेत.

काय फीचर्स मिळतात ? Nothing Phone 2a Special Edition

Nothing Phone 2a मध्ये 30Hz ते 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,080×2,412 पिक्सेल रिझोल्युशन, 40Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1,300 nits पीक ब्राइटनेससह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7200 Pro SoC प्रोसेसर वापरला असून हा मोबाईल Android 14 वर आधारित Nothing OS 2.5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Nothing Phone 2a मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि समोरील बाजूला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईलला 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. हि बॅटरी 59 मिनिटांत 100 टक्के चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. ( Nothing Phone 2a Special Edition)

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Nothing Phone 2a स्पेशल एडिशनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठीची किंमत 27,999 रुपये आहे. हे स्पेशल एडिशन मॉडेल 5 जूनपासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Rohit Sharma : रोहित मुंबईच्या जर्सीत कधीच दिसणार नाही, त्याने शेवटची मॅच खेळलीय; बड्या खेळाडूने उडवली खळबळ

rohit sharma mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता कधीच मुंबईच्या निळ्या आणि सोनेरी जर्सीत दिसणार नाही. त्याने आपली शेवटची मॅच खेळली आहे असा मोठा दावा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीच रोहितचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवल्याने आधीच मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल मध्ये चर्चेत राहिली होती.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, मला वाटते की रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला आहे, त्या सामन्यात त्याने अर्धशक सुद्धा मारलं होते. आता पुन्हा तो मुंबई इंडियसच्या जर्सीत दिसेल असं मला वाटत नाही. हे फक्त माझं मत आहे, कदाचित माझं चुकत सुद्धा असेल पण तरीही मला वाटत रोहित शर्मा पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही. रोहितला रिटेन व्हावं असं वाटत नसेल किंवा मुंबई इंडियन्स त्याला जाऊ देईल. आकाश चोप्रा पुढे म्हणाला, मुंबई इंडियन्स ईशान किशनला सुद्धा कायम ठेवणार नाही. ते ‘राइट टू मॅच’ कार्ड वापरू शकतात कारण 15.5 कोटी रुपये खूप पैसे आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की इशानला कायम ठेवले जाईल.

दरम्यान, रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे आले होते. 2013 ते 2023 असं सलग १० वर्ष रोहितने मुंबईचे नेतृत्व केलं होते. त्याने आपल्या नेतृत्वाखाली तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी मुंबईला जिंकून दिली आहे. रोहित शर्मा मुंबईची आन बाण आणि शान राहिला आहे. मात्र 2020 च्या आयपीएल विजेतेपदानंतर मुंबईला पुढच्या तीन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्यात अपयश आल्यानंतर मुंबईने रोहितच्या ऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिले. परंतु हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ अगदी तळाशी गेला.

Viral Video : ट्रॅक्टर नाही, बैल नाही मोटारसायकलला जोडला नांगर ; व्हायरल झाला व्हिडीओ

viral video farming

Viral Video : सध्या देशातल्या बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी जमीन तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. शेत नांगरण्यासाठी बहुतांशी एक तर ट्रॅक्टर किंवा मग बैल जोडीचा वापर केला जातो. पण मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ‘हा देशी जुगाड भारीच की…! व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ (Viral Video) मध्ये चक्क मोटारसायकलला नांगर जुंपलेला दिसतो आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडिओ क्लिपची सुरुवात एका माणसाने बाईक चालवताना त्याच्या मागच्या चाकाला जोडलेली नांगरणी अवजाराने होते. त्याच्या वर एक मोठा दगड ठेवला आहे. गाडी चालवताना तो डाव्या बाजूला हँडलच्या मदतीने नांगर खाली करतो. त्यामुळे नांगर जमिनीत धसतो. यानंतर व्हीडीमधील व्यक्ती बाईक चालवतो आणि जमीन खोदण्यास सुरुवात करतो. या पोस्टवरील कॅप्शनमध्ये (Viral Video) म्हटले आहे, “हे DIY बाईक टिलिंग मशीन पहा, जे कडक, कॉम्पॅक्ट माती रेक करण्यासाठी आणि तोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्याचा नंतर लागवड करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.”



हा व्हिडीओ ‘mia_farms’ नावाच्या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत असून आतापर्यंत 78 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एक लाख लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओच्या (Viral Video) कमेंट बॉक्समध्ये नेटिझन्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की बाइक अशा प्रकारे काम करण्यासाठी बनवल्या जात नाहीत. तर इतरांना हा देसी जुगाड खूप आवडला आहे.एका युजरने कमेंट केली, ‘बाईकचे इंजिन अशा कामासाठी बनवलेले नाही.’ दुसऱ्याने लिहिले, ‘बाइक शेतात चालणार नाही, टायर घसरेल.’ ‘ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘भारतीय लोकांना प्रत्येक गोष्टीचा जुगाड माहित आहे.’

Viral Video | ट्रॅफिकपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा देशी जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून सगळेच अवाक होतात. आपल्या भारतामध्ये ट्राफिक जाम ही एक मोठी समस्या बनलेली आहे. याबाबतचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वाढलेले आहेत. कारण आता खाजगी वाहनाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. कितीही नवीन रस्ते, सिग्नल तयार केले, तरी वाहतूक कोंडी कोणीही रोखू शकत नाही. आता या समस्येवर एका तरुणाने खतरनाक जुगाड शोधून काढलेला आहे. जर ट्राफिक जाम असेल, तर या जुगाडाचा वापर करून तुम्ही यातून बाहेर पडू शकता. या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.

आपल्या भारतामध्ये अनेक जुगाडी लोक आहेत. त्यामुळे ते प्रत्येक समस्येवर उपाय शोधून काढतात. असाच एक उपाय तरुणांना शोधून काढलेला आहे. ट्रॅफिकच्या समस्येवर हा उपाय शोधून काढलेला आहे. रस्त्यावरून बाईक चालवता येत नाही, म्हणून तो तरुण डिव्हायडरवर बाईक चालवतोय. इतर गाड्या ट्रॅफिकमुळे जागीच थांबत आहे. मात्र हा व्यक्ती वाऱ्याच्या वेगाने पुढे जाताना दिसत आहेत. हा प्रकार पाहून आजूबाजूचे लोक देखील हैराण झालेले आहेत. त्याची ही घटना कॅमेरात कैद झालेली आहे. आणि सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ (Viral Video) ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. आणि आत्तापर्यंत 21000 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहे. अनेक लोकांना या व्यक्तीचे कौतुक वाटत आहे, तर काही लोकांनी ट्राफिकचे नियम तोडल्याचा देखील दावा केलेला आहे. अशाप्रकारे नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

Diesel Plant Business | डिझेल प्लांट देईल भरघोस उत्पन्न; वर्षभरातच होईल करोडपती

Diesel Plant Business

Diesel Plant Business | आज-काल अनेक लोकांना बिझनेस करण्याची इच्छा असते. परंतु हा बिजनेस करताना नेमका कोणता बिजनेस करावा? ज्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न होईल हे समजत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मोठ्या कामाच्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमतीपासून नक्कीच दिलासा मिळवू शकता. आणि त्याचा फायदा देखील होणार आहे. सध्या शेतकरी देखील पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांकडे वळताना दिसत आहे. असाच एक डिझेल प्लांट देखील असेल तर त्याची लागवड करून शेतकरी श्रीमंत होताना दिसत आहे. याला जट्रोफा किंवा रतनजोत असे म्हणतात. या वनस्पतीमधून बायोडिझेल मिळते.

या पिकाची लागवड (Diesel Plant Business) वर्षात कोणत्याही वेळी नापीक जमिनीत देखील करता येते. यात तुम्हाला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. आणि वर्षाला तुम्ही लाख रुपये सहज कमवू शकता. या रोपाच्या लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही. त्याचप्रमाणे शेतीची नांगरणी देखील करावी लागत नाही. केवळ चार ते सहा महिन्यांमध्ये हे पीक चांगले येते.

जट्रोफा ही एक झुडूप असलेली वनस्पती आहे जी अर्ध-शुष्क भागात वाढते. या वनस्पतीच्या बियांपासून 25 ते 30 टक्के तेल काढता येते. या तेलाचा वापर करून कार इत्यादी डिझेल वाहने चालवता येतात. त्याच्या उरलेल्या अवशेषांपासून वीज निर्माण करता येते. हे एक सदाहरित झुडूप आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात याची लागवड केली जाते. जट्रोफा वनस्पती थेट शेतात लावली जात नाही. सर्व प्रथम त्याची रोपवाटिका स्थापन केली जाते. मग त्याची रोपे शेतात लावली जातात. त्याच्या लागवडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती एकदा शेतात लावली की पाच वर्षांपर्यंत पीक सहज मिळू शकते.

जट्रोफाच्या बियाण्यापासून डिझेल कसे मिळते? | Diesel Plant Business

जट्रोफा वनस्पतीपासून डिझेल बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. आधी जट्रोफा वनस्पतीच्या बिया फळांपासून वेगळे कराव्या लागतात. यानंतर बिया पूर्णपणे स्वच्छ केल्या जातात. ते नंतर मशीनमध्ये टाकले जातात. जिथून त्याचे तेल निघते. ही प्रक्रिया मोहरीपासून तेल काढण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे.

जट्रोफाच्या मागणीत वाढ | Diesel Plant Business

डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे भारतासह जगभरात त्याची मागणी वाढली आहे. भारत सरकारही शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीसाठी मदत करत आहे. एक हेक्टर जमिनीवर सरासरी 8 ते 10 क्विंटल बियाणे तयार होते. सरकार 12 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाणे खरेदी करते. बाजारात 1800 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाते. त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत बंपर उत्पन्न मिळू शकते.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा सहभाग; नाना पटोलेंचा मोठा खुलासा

Porsche car accident case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण (Porsche Car Accident Case) चर्चेचा भाग बनले आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हणले आहे की, “ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या, त्यांच्यात रेस लागली. त्यातली एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहिली त्या गाडीनं दोघांना चिरडलं. जी दुसरी गाडी होती, त्यात एका आमदाराचा मुलगा होता.” त्यामुळे सध्या चर्चांचा वेग आणखीन. वाढला आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “पबमधून जाताना दोन गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये रेस लागली होती. एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहीली त्या गाडीने दोघांना चिरडलं, जी गाडी पुढे गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. कोण आमदार? हे मुख्यमंत्री यांनी सांगीतल पाहिजे. मुख्यमंत्री सुट्टी घेऊन गेले, दोन उपमुख्यमंत्री हे जनतेच्या आरोपीच्या पिंजऱ्यांत आहेत.”

त्याचबरोबर, “या घटनेतील डॉ. तावरेंनी सर्वांची नावं समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना सुरक्षा पुरवावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी” अशी मागणी नाना पटोले यांनी केली. “डॉ. तावरे याप्रकरणाचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. तावरेंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने याची काळजी घेतली पाहिजे. कोण पोलीस आणि डॉक्टर यांच्यासोबत बोलत होतं, याची चौकशी झाली पाहिजे” असेही नाना पटोले यांनी म्हणले.

दरम्यान, “ही घटना हायप्रोफाईल आहे, या घटनेत ज्या पद्धतीनं पुरावे नष्ट केले जात होते, त्यावरुन हायप्रोफाईल असल्याचं सिद्ध होत होतं. म्हणजेच, या घटनेशी सहाव्या मजल्याचं कनेक्शन नक्कीच आहे. त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी पोर्शे कार अपघात प्रकरणात नाना पटोले यांनी केली आहे.

7/12 उताऱ्याशिवाय शेतजमीन कशी विकत घ्यावी?, जाणून घ्या कायदेशीर पद्धत

Farm

हॅलो महाराष्ट्र | महाराष्ट्रमध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा उतारा आहे. त्या व्यक्तीलाच शेत जमीन खरेदी करता येते. असा नियम देखील करण्यात आलेला आहे. परंतु असा नियम आल्यापासून इतर लोकांना शेतजमीन खरेदी करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. अनेक लोकांकडे शेती नसते, परंतु त्यांना शेती करण्याची आवड असते. शेतजमीन घ्यायची आवड तसेच पैसा असून, देखील त्यांना शेतजमीन खरेदी करता येत नाही. कारण त्यांच्या नावावर सातबारा नसतो. परंतु अशावेळी नेमके काय करायचं? हे लोकांना समजत नाही. तर आज आपण ज्या लोकांच्या नावावर सातबारा उतारा नाही आणि त्यांना शेतजमीन खरेदी करायची आहे. त्यांना काय करता येईल? हे जाणून घेणार आहोत.

आधीच्या पिढीने विकलेल्या जमिनीची विक्री पत्राची प्रत पुरावा

महाराष्ट्र सरकारने शेती जमिनीवर शेतकऱ्यांनाच अधिकार असावा. या उद्देशाने हा कायदा तयार केलेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबांच्या आधीच्या पिढीने शेत जमीन विकली, असल्याने अशा कुटुंबातील व्यक्तींना शेतजमीन खरेदी करता येत नाही. म्हणजे जर तुमच्या नावावर सातबारा नसेल आणि तरी देखील तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढ्यांनी वडिलोपार्जित जमीन नेमकी कोणाला विकली आहे. याची माहिती करून त्या विक्री पत्राची कॉपी देऊन तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापरू शकता.

विक्री पत्रावर तुमच्या वडिलापार्जित शेतीचा जुना सातबारा क्रमांक मिळेल, त्या क्रमांकावरून तुम्ही त्या वेळच्या रेकॉर्डची कॉपी देखील मिळू शकता. यावरून तुम्ही वंश परंपरेने शेतकरी आहात. हे सिद्ध होईल. मग तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र बनवून घेता येईल. तुम्ही शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळवले की, तुम्हाला शेतजमीन घेता येईल.

नातेवाईकांच्या नावावर नाव लावू शकता

यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची मदत लागणार आहे. म्हणजे जर तुमचे काका, चुलत काका, आईचे वडील यांची जमीन असेल, तर त्या जमिनीच्या उतारावर तुमचे नाव लावून घेणे, हा एक पर्याय आहे. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे नाव लावून घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला तुमची जमीन खरेदी करता येईल. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना हक्क सोडपत्र देऊ शकता. ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात देखील नाही. कारण ज्या व्यक्तीला वारस म्हणून शेती मिळते, तो आपोआप शेतकरी होत असतो.

4 जूनला ‘या’ 4 उमेदवारांची सरशी होईल का? निकाल पाहा ..

independent candidates in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्या… महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला… पण या लोकसभेत मोजक्या चार उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं. रविकांत तुपकर (Ravikant tupkar) , विशाल पाटील (Vishal Patil) , प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) , राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लढवलेल्या जागांमध्ये नेमकं कोण जिंकतय? आघाडी आणि युतीला फाट्यावर मारून यांपैकी खासदारकीचा मान कुणाला मिळतोय? तेच पाहूया …

सांगलीचा तिढा हा लोकसभेत सर्वात जास्त इंटरेस्टिंग राहिला. विशाल पाटलांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे फुल चान्सेस असताना कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं स्वतःला सेफ करत ठाकरेंनी इथून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली… त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीने दिल्लीच्या हायकमांड पर्यंत धडका मारल्या… पण उपयोग काही झाला नाही… शेवटी विशाल पाटलांनी बंड करत सांगलीतून अपक्ष लढत दिली… वंचितच्या आंबेडकरांनीही त्यांना पाठिंबा दिला… त्यामुळे सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीला वजन आलं… ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या तीन पाटलांच्यात रंगलेल्या या खासदारकीच्या कुस्तीत विशाल पाटील आपोआपच वरचढ राहिले… वंचितचा पाठिंबा, तिकीट न मिळाल्यानं तयार झालेली सहानुभूतीची लाट, दादा पाटील घराण्याला मानणारा हक्काचा मतदार आणि काँग्रेसने आतून दिलेला मदतीचा हात यामुळे ‘नो मशाल ओन्ली विशाल’ ही घोषणा जितकी फेमस झाली तेवढाच तिचा इम्पॅक्टही सांगलीत पाहायला मिळाला… थोडक्यात हाताच्या पंजावर निवडून येऊ शकणारे विशाल पाटील इथून लिफाफ्याच्या चिन्हावर अपक्ष खासदार होतील, हे फिक्स दिसतंय…

बुलढाण्यात इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून अपक्ष लढत दिली. प्रतापराव जाधवांच्या विरोधातील मतदारसंघातील अँटी इन्कमबन्सी, गद्दार विरुद्ध खुद्दार असं प्रचाराला दिलेलं स्वरूप आणि मराठा – कुणबी मतांचं झालेलं कन्वर्जन यामुळे खरी लढत ही नरेंद्र खेडेकर विरुद्ध रविकांत तुपकर अशी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वसामान्य शेतकरी घरातून येत शेती प्रश्नासाठी स्वतःला वाहून घेतलेला शेतकरी नेता म्हणून रविकांत तूपकरांची ओळख. शेतमालाच्या हमीभावापासून ते नुकसान भरपाईसाठी केलेल्या अनोख्या आणि हटक्या आंदोलनामुळे तुपकर हे नाव प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचलं. बुलढाणा ही त्यांची कर्मभूमी असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांचा नेता म्हणून तुपकरांची ओळख आहे. याच इमेज बिल्डिंगचा त्यांना लोकसभेत मोठा फायदा झाला… निवडणुकीत अनेक पक्षांच्या फाटाफुटी असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची नेहमी एकनिष्ठ असं स्वतःचं नरेटीव्ह तयार केल्यानं आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुपकरांनी टफ फाईट दिली. पण ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकर आणि रवींद्र तुपकर यांच्यातलं मतदान सध्या फिफ्टी फिफ्टी असं दिसतय. त्यामुळे बुलढाण्याचा निकाल सध्यातरी स्पष्ट सांगता येत नसला तरी तुपकर हे ठाकरेंना अनपेक्षित धक्का देऊ शकतात, एवढं मात्र निश्चित…

महाविकास आघाडीसोबत बिनसल्यापासून यंदा काहीही झालं तरी बाळासाहेबांना लोकसभेवर पाठवायचंच यासाठी वंचितची सारी यंत्रणा अकोल्यात उतरली होती. भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात असल्याने वारं कुणाच्या बाजूने आहे, याचा काही अचूक अंदाज येत नव्हता… संजय धोत्रे यांच्या कारकीर्दीला जनता आधीच कंटाळली होती. त्यात अकोल्यात महायुतीची यंत्रणा विस्कटल्यामुळे प्रचार जसा पुढे सरकत गेला तसं काँग्रेसच्या अभय पाटील यांच्या बाजूने वारं झुकताना दिसलं. काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक आणि त्याला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मिळालेली प्रामाणिक साथ यामुळे अभय पाटील अकोल्याच्या निकालात पुढे निघून गेलेत, असं सगळेच बोलू लागलेत. आंबेडकरांना मोठं मतदान एकगठ्ठा होईल हे जरी खरं असलं तरी विजयाचं मार्जिन तोडेल इतकं ते जास्त नसेल… थोडक्यात आंबेडकरांचा यंदाही खासदारकीचा चान्स हुकतोय, अशी एकूणच परिस्थिती आहे…

2009 ला नुकत्याच तयार झालेल्या हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष निवडून येत राजू शेट्टी यांनी आपली ताकद दाखवून दिली. साखर आणि सहकार पट्टयाचं राजकारण करत शेतकरी नेता म्हणून शेट्टींनी महाराष्ट्रात इमेज तयार केली. त्यांची अनेक आंदोलनं ही सरकारच्या अनेक निर्णयातील मैलाचा दगड ठरली. हाच कित्ता 2014 ला गिरवत ते पुन्हा खासदार झाले… पण 2019 ला शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव करत मतदारसंघात त्यांना बॅकफुटला टाकलं. पण 2024 च्या सध्या पार पडलेल्या निवडणुकीत हातकणंगले राजकारणाचा हॉटस्पॉट ठरला… राजू शेट्टींनी हातकणंगलेतून महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. पण मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातल्याने प्रस्ताव बारगळला आणि शिट्टी अपक्ष लोकसभेच्या मैदानात उतरले… शिंदे गटाकडून धैर्यशील माने, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील तर वंचितनंही आपला उमेदवार मैदानात उतरवल्याने हातकणंगलेत मतदानाच्या दिवशी बरीच घासाघीस झाली. महाविकास आघाडी बनल्यापासून मतदारसंघातील राजू शेट्टी यांची क्रेझ कमी झाली, वंचितचाही म्हणावा असा प्रभाव लोकसभेला दिसला नाही, धैर्यशील मानेंच्या विरोधात त्यांच्या पक्षांतर्गत आणि मित्र पक्षांकडून असणारा तक्रारीचा सूर पाहता इथे ठाकरेंच्या सत्यजित पाटील यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांचं पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचं स्वप्न स्वप्नच राहील, अशी चर्चा आहे…

थोडक्यात विशाल पाटील आणि रविकांत तुपकर या दोघांनाही अपक्ष म्हणून खासदार होण्याचे इक्वल चान्स आहेत. त्यामुळे आता 4 तारखेला हा अंदाज खरा ठरेल की काही अनपेक्षित धक्के आपल्याला पाहायला मिळतील. हे येणारा काळच सांगेन. बाकी अपक्ष म्हणून महाराष्ट्रातून कोणते खासदार दिल्लीत जातील? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. अ

Green Vegetable : मूळव्याधाच्या त्रासाने केले हाल? उठता, बसता येईना; ‘ही’ रानभाजी खाल्ल्यास मिळेल आराम

Green Vegetable

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Vegetable) बिघडती जीवनशैली आरोग्याची पुरेपूर वाट लावत आहे. यामध्ये आहाराबाबत हयगय करणे सगळ्यात जास्त महागात पडतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात, असे वारंवार सांगून देखील लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. यामुळे बरेच लोक पोटाच्या समस्या, मुतखडा होणे आणि त्रासदायी मुळव्याध सारख्या त्रासांना सामोरे जातात. यांपैकी मूळव्याध अतिशय वेदनादायी त्रास आहे. मूळव्याधाचा त्रास होणाऱ्या लोकांना उठणे आणि बसने देखील मुश्किल होणे. अशा लोकांसाठी आज आम्ही एक खास उपाय घेऊन आलो आहेत.

जसे ज्या त्या मोसमातील फळे खाणे आरोग्यदायी असते. (Green Vegetable) अगदी तसेच पावसाळ्यात आवर्जून भेटणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फलदायी असतात. जर तुम्ही मुतखडा किंवा मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झाले असाल तर तांदुळजा ही रानभाजी आवर्जून खावी. यामुळे एकतर खळखळून मुतखडा बाहेर पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळव्याधाचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. चला तर ही रानभाजी खाण्याचे काही फायदे जाणून घेऊया.

तांदुळज्याची भाजी खाण्याचे फायदे (Green Vegetable)

1. तांदळज्याची भाजी खाल्ल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे पोटाच्या समस्या दूर होतात. या भाजीचे नियमित सेवन केल्याने पॉट साफ होते आणि परिणामी बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या जाणवत नाहीत.

2. (Green Vegetable) तांदुळज्याची भाजी नियमित आहारात असल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सीफाय होते.

3. तांदुळज्याची भाजी तेल न वापरता तुपाचा वापर करून बनवा. अशी भाजी खाल्ल्याने जुलाबाची समस्या लगेच थांबू शकते.

4. तांदुळज्याची भाजी खाणे पोटासह आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. या भाजीतील काही घटक पोटाच्या आतड्यांमधील घाण बाहेर काढतात आणि यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते.

5. तांदुळज्याच्या भाजीत भरपूर फायबर असते. (Green Vegetable) त्यामुळे या भाजीचे सेवन केल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते. यामुळे इतर जंक फूड किंवा अन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

6. तांदुळज्याची भाजी खाल्ल्याने लघवी साफ होत नसेल तर ही समस्या सुद्धा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ही भाजी खाल्ल्यास युरिनच्या समस्या होत नाहीत.

7. तांदुळज्याची भाजी आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्याने यातून शरीराला सी जीवनसत्त्व मिळते. (Green Vegetable) ज्यामुळे पित्त कमी होतं, मूळव्याध, मुतखडा असा समस्या दूर होतात.

Lok Sabha Election 2024 : भाजपने ताकद लावूनही इथल्या दिग्गज नेत्यांचा पराभव होतोय

bjp seats in trouble

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पंकजा मुंडे.. कुणी कितीबी ताकद लावली तरी भाजपचे हे तीन उमेदवार विरोधकांना पाणी पाजून खासदार होणारच, असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण निवडणुकीच्या तोंडावर वारं फिरलं आणि तुतारीचा जोर वाढू लागला. भाजपनं संपूर्ण ताकद लावून दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं असतानाही सातारा, माढा आणि बीडची जागा धोक्यात का आलीये? सगळीकडूनच तुतारी वाजेल अशी चर्चा सुरू असताना भाजपचे हे खमके उमेदवार अजूनही थाटात निवडून येतील, याचे काही चान्सेस आहेत का? शरद पवारांमुळे भाजपच्या प्लॅनिंग गंडलंय का? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा…

राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडल्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेला भाजप प्लसमध्ये राहणार असा सगळ्यांनाच विश्वास होता. याच विश्वासातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दोन आणि मराठवाड्यातल्या एका हक्काच्या जागेवर भाजपने उमेदवार दिले. काही झालं तरी या तिन्ही बालेकिल्ल्यात गुलाल आपलाच! असं सांगायला सुरूवातही केली. पण हीच भाजपची मोठी चूक झाली. सुरुवात करूया ती माढा लोकसभा मतदारसंघापासून….. (Madha Lok Sabha 2024) माढा शरद पवार पाडा असं म्हणत 2019 ला भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना निवडून आणलं. मतदारसंघात भाजपचे आमदारही वाढले. त्यामुळे माढ्यात आपण आरामात निवडून येऊ असा भाजपला आत्मविश्वास होता. त्यामुळे इथल्या स्थानिक राजकारणाकडे काना डोळा करत भाजपने रणजीतसिंह निंबाळकरांनाच उमेदवारी रिपीट केली. यावेळेस मोहिते पाटलांच्या नाराजीला भाजप हायकमांडने भिकही घातली नाही. माढ्यात मोहिते पाटलांचा नाही तर आपल्या पक्षाचा शब्द चालतो, असा भाजपचा भ्रम होता. निंबाळकर माढ्यातून लोकसभेची दुसरी टर्म पूर्ण करतील असं वातावरण तयार झालेलं असताना इथल्या शरद पवारांच्या एंट्रीने इथलं समीकरण बदलून गेलं.

नाराज धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातात तुतारी देत त्यांनी भाजप समोर नवं आव्हान उभं केलं. उत्तमराव जानकर यांना सोबत घेऊन धनगर समाजाचा मिळवलेला पाठिंबा असो, किंवा रामराजेंच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे फलटणमधून मिळविलेला जनाधार उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच तुतारीच्या बाजूने होता… शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांनी माढ्यात प्रचाराचा धुराळा उडवून दिला. माढ्यात वारं फिरतंय हे लक्षात येताच भाजपने ही सावध पवित्र घेतला. फडणवीसांनी इथं जातीनं लक्ष घातलं. मोदींचीही सभा झाली. पण मतदानानंतर माढ्यातील भाजपची जागा धोक्यातय. अस सरसकट सगळेच बोलू लागलेत…

भाजपचा दुसरा गेम झालाय तो साताऱ्यात.… (Satara Lok Sabha 2024)

पोटनिवडणुकीत चितपट होऊनही भाजपने अगदी शेवटच्या यादीमध्ये उदयनराजेंनाच तिकीट देऊ केलं. राजेंच्या विरोधात साताऱ्यात सुप्त लाट असतानाही महायुतीच्या ताकदीच्या जोरावर आपण लोकसभेचं मैदान मारू, असा भाजपला विश्वास होता. वयोमानाचं कारण देत श्रीनिवास पाटलांनी इथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनीही मग अगदी मोक्याच्या क्षणी शशिकांत शिंदे नावाच्या मोहऱ्याला लोकसभेच्या मैदानात उतरवलं. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे यंदा तेल लावलेल्या पवारांच्या राजकारणाला साताऱ्यात जम बसवता येणार नाही, असा भाजपाचा अंदाज असावा. पण निवडणुका जशास जवळ येऊ लागल्या तशी साताऱ्यातही तुतारीचा जोर वाढू लागला. बारामतीनंतर शरद पवारांना सर्वाधिक प्रेम हे साताऱ्यातूनच मिळतं. त्याची जणू पोचपावतीच प्रचाराच्या काळातही मतदारसंघातून मिळत होती. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याची ही जागा काही केल्या मिळवायचीच हे भाजपचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी उदयनराजेंच्या बाजूने संपूर्ण ताकद लावली. पण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच शशिकांत शिंदे यांनी साताऱ्याच्या मैदानात आघाडी मारली होती… शरद पवारांची पावसातील सभा आणि त्याने पोटनिवडणुकीचं फिरवलेलं वातावरण याचा अनुभव असल्याने आणि आता त्यात शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट साताऱ्यात शिंदेंची मोठी ताकद ठरली. माढ्या सोबत भाजपच्या साताऱ्याच्या उमेदवारालाही तुतारीकडून सहज मात मिळेल. असा एकूणच मतदारसंघातील जनतेचा कौल दिसतोय…

भाजपची धोक्यात आलेली सर्वात महत्त्वाची जागा आहे ती बीडची… (Beed Lok Sabha 2024)

गोपीनाथ मुंडे आणि बीड हे जणू एका नाण्याच्या दोन बाजू. मुंडे फॅक्टर शिवाय बीडच्या राजकारणाचं पाणी हालत नाही, असं बोललं जातं. गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतरही त्यांच्या पुढच्या पिढीमुळे या जागेवर भाजपचाच दबदबा राहिला. प्रीतम मुंडे यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर भाजपसमोर आव्हान होतं की, पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा… शेवटी प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजाताईंना तिकीट सुटलं. आणि 2024 ला मुंडे आणि भाजप फिक्स असा एकूणच बीडमध्ये ट्रेंड दिसला. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वात सेफ जागांपैकी बीडची जागा समजली जात होती. त्यातही पंकजा मुंडे यांना तिकीट, भाऊ धनंजय मुंडे सोबतीला असताना भाजप बीडमधून निर्धास्त झाली होती. भाजपसाठी सगळं काही ठरवेल तसं घडत असताना इथून शरद पवारांनी बजरंग बप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं… आणि बीडची निवडणूकीला मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय रंग आला. मराठा आणि कुणबी समाज बजरंग बप्पांच्या पाठीशी एकवटल्यामुळे बीडच्या निवडणुकीने अनपेक्षित वळण घेतलं. चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या बीडच्या मतदानातही बरंच थ्रील बघायला मिळालं. वाढलेला मतदानाचा टक्का आणि बोगस मतदान यामुळे बीडची निवडणूक चर्चेत आली. बजरंग बाप्पांनी याच्या विरोधात आता अपील केलीय. पण न्यायालयाने हस्तक्षेप करायला नकार दिल्याने स्पष्ट निकाल हा 4 जूनलाच समजणार आहे. बीडची निवडणूक अत्यंत घासून झाली असून इथं पंकजाताईंना अनपेक्षित धक्का बसू शकतो.

त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने माढा, सातारा आणि बीड मधून लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या भाजपचा या तिन्ही ठिकाणी तुतारीकडून गेम होतोय की काय? अशा चर्चेला सध्या पेव फुटलंय? हे झालं आमचं एनालिसिस. तुम्हाला काय वाटतं? भाजपाच्या या तिन्ही जागा धोक्यात आहेत का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.