Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 721

टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येणार? विराट करणार ओपनिंग?

rohit kohli t20 world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup 2024) भारतीय क्रिकेट संघ अमेरिकेला पोचला असून ५ जूनला आयर्लंड विरुद्ध भारतीय संघाचा पहिला सामना होणार आहे. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र रोहित शर्माने सलामीला नव्हे तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर यावं असा सल्ला माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी दिलाय. जाफरने ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता हा बदल टीम इंडियामध्ये पाहायला मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे.

काय म्हणाला वसीम जाफर –

वसीम जाफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहली आणि जयस्वाल जैस्वाल यांनी विश्वचषकात सलामीला आले पाहिजे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी 3 आणि 4 व्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, मात्र हे आपल्याला कशा प्रकारची सुरुवात मिळते यावर अवलंबून आहे.. रोहित फिरकी खूप छान खेळतो त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर असणे ही त्याच्यासाठी चिंतेची बाब नसावी. असे मत वसीम जाफरने व्यक्त केलं.

मधल्या फळीत रोहितची कामगिरी कशी आहे?

3 आणि 4 क्रमांकावर फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माचा विक्रम तसा काय वाईट नाही. 3 आणि 4 क्रमांकावर फलंदाजी करताना रोहितने आत्तापर्यंत 2 टी-20 सामन्यांमध्ये 39.37 च्या सरासरीने 315 धावा केल्या आहेत, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे जर विराट कोहली सलामीला उतरला तरीही टीम इंडियाला नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आत्तापर्यंत ९ सामने खेळले असून यामध्ये त्याने 57.14 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. टी-२० मधील त्याचे एकमेव शतक सुद्धा सलामीवीर म्हणूनच जमलं. 2022 च्या आशिया कपमध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावा केल्या होत्या. त्यामुळे वसीम जाफरचा सल्ला चुकीचा आहे असेही म्हणता येत नाही.

Samruddhi Mahamarg : मुंबई – नागपूर सुसाsssट ! येत्या ऑगस्ट पर्यंत खुला होणार समृद्धीचा शेवटचा टप्पा

Samruddhi Mahamarg : राज्य सरकारने काही महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग… 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम आता पूर्ण होण्यासाठी केवळ शेवटचा टप्पा बाकी आहे, त्यापूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गातील (Samruddhi Mahamarg) शेवटचा टप्पा असणाऱ्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा आहे त्या ऑगस्ट महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांना नियोजन केलं असून एका पुलाची उर्वरित काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या शेवटचा टप्प्याचे काम तसे पाहायला गेले तर किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश असलेलं आहे. सद्यस्थितीचा विचार करता यामधील बोगदे आणि रस्त्यांची काम पूर्ण करण्यात आली आहेत मात्र ठाण्यातील खर्डी इथं जवळपास 1.5 किलोमीटर लांबीच्या पुलाचं काम अजून बाकी आहे. खर्डी येथील पुलाचे काम हे प्रमुख आव्हान आहे याशिवाय आठ किलोमीटर (Samruddhi Mahamarg) लांबीच्या बोगद्याचे काम पूर्णत्वास आलेले आहे.

खरंतर 701 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सहा पदरी मार्ग आहे. मात्र खर्डी पुलावर हा मार्ग केवळ चार पदरी राहणार असून थोडासा अरुंद होणार असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे काम अवघड असल्यामुळे पुलाच्या उभारण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. मात्र त्याआधी ऑगस्टपर्यंत या पुलाची एक बाजू उभारण्याचे नियोजन एमएसआरडीसी ने केलं आहे. त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली जाणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यातील 97% काम पूर्ण झाली आहेत.

7-8 तासांत पूर्ण होणार प्रवास (Samruddhi Mahamarg)

एकेकाळी मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळं हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नाशिककरांना इगतपुरीतून येथून येणाऱ्या वाहनांना थेट नागपूरपर्यंत आठ तासात पोहोचणे शक्य होणार. हा मार्ग खुला झाल्याने विदर्भ मराठवाड्याला मुंबईच्या वेशीपर्यंत वाहने जलद गतीने प्रवेश करण्याचा मार्ग (Samruddhi Mahamarg) सुकर झाला आहे.

Alyad Palyad Trailer : खेळ खल्लास!! ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज; उत्सुकता शिगेला

Alyad Palyad Trailer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Alyad Palyad Trailer) मराठी सिनेविश्वातील बऱ्याच कलाकृती प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात. अशीच एक लक्षात राहील आणि अंगावर काटा आणेल अशी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात. ज्यातील काही लक्षात येतात तर काही मात्र समजत सुद्धा नाहीत. अशीच एका दुर्गम भागातील घटना आणि त्यामागील रहस्याचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘अल्याड पल्याड’चा ट्रेलर रिलीज (Alyad Palyad Trailer)

गेल्या अनेक दिवसांपासून ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका गावातील विचित्र परंपरा आणि त्यामागील सत्य तसेच घडणाऱ्या घटनांना सुगावा घेणारे अनोखे कथानक आपल्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढली आहे. या ट्रेलरमध्ये आपण दुर्गम भागातील एका खेडे गावात घडणाऱ्या भीतीदायक घटनांची काही दृश्ये पाहू शकतो.

(Alyad Palyad Trailer) यांमध्ये एक एक जण कसा अडकत जातो आणि त्यांना सोडवण्यासाठी तसेच गावाला शापमुक्त करण्यासाठी सिद्ध नसलेला सिद्ध पुरुष काय काय करतो? हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागणार आहे. ‘अल्याड पल्याड’च्या माध्यमातून थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या भावना व्यवस्थित मांडल्या आहेत.

कधी रिलीज होणार ?

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळे कथानक आपल्या भेटीस येत आहे. हा भयपट असला तरीही कुठे ना कुठे थोडा कॉमेडीचा तडका लागणार आहे. शिवाय थरारक कथानक, उत्कंठा वाढवणारे संगीत आणि शोध घेणाऱ्या घटना हा चित्रपट पाहताना खिळवून ठेवतील अशी आशा आहे. हा चित्रपट येत्या १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Alyad Palyad Trailer) ‘या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल’, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?

माहितीनुसार, ‘अल्याड पल्याड’ या आगामी भयपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांनी केले आहे. (Alyad Palyad Trailer) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदी कलाकार मंडळी एकापेक्षा एक खतरनाक पात्र साकारताना दिसणार आहे.

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 | हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार 46 हजार रुपये पगार

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 | नोकरी शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तंत्रज्ञ आणि ऑपरेटर या पदांच्या एकूण 182 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे. ही अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 12 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

  • पदाचे नाव – तंत्रज्ञ ऑपरेटर
  • पदसंख्या – 182 जागा
  • वयोमर्यादा – 28 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2024
  • रिक्त पदांची संख्या
  • तंत्रज्ञ – 46 जागा
  • ऑपरेटर – 136 जागा

वेतनश्रेणी

  • तंत्रज्ञ – 46 हजार 511 रुपये
  • ऑपरेटर – 44 हजार 554 रुपये

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करताना सगळी माहिती सविस्तर भरा.
  • अर्ज करताना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा.
  • 12 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण पीडीएफ नीट वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Ratnagiri Ganpatipule : महाराष्ट्रातील असे गणेशमंदिर, जिथे समुद्राच्या लाटा करतात बाप्पाच्या पायाला स्पर्श

Ratnagiri Ganpatipule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ratnagiri Ganpatipule) महाराष्ट्रातील अनेक मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे त्यांच्या वैभवशाली इतिहासामुळे तर काही मंदिरे अध्यात्मिक वारसा आणि आख्यायिकांमुळे प्रसिद्ध आहेत. तर काही मंदिरे मात्र पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. जिथे कायम पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. असेच एक सुंदर मंदिर कोकणात आहे. जे तीर्थक्षेत्र देखील आहे आणि पर्यटन म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ‘गणपतीपुळे मंदिर’. कदाचित तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल. पण आज आपण या मंदिराविषयी काही महत्वाच्या आणि आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत.

तीर्थक्षेत्र गणपतीपुळे (Ratnagiri Ganpatipule)

कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं नयनरम्य निसर्गचित्र. लाल माती, अथांग समुद्र किनारा, नारळाची झाडे आणि बरचं काही… मात्र रत्नागिरीविषयी बोलताना आवर्जून तीर्थक्षेत्र गणपतीपुळेबद्दल बोलले जाते. कोकणातील हे एक महत्वाचे आणि अत्यंत पुरातन असे तीर्थक्षेत्र आहे. सुमारे ४०० वर्ष जुने हे गणपतीपुळे मंदिर अत्यंत चमत्कारिक आहे. आज आपण या मंदिराविषयी बऱ्याच लोकांना माहित नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत.

इच्छापूर्ती गणेश

भारताच्या आठ दिशांमध्ये आठ द्वार देवता आहेत. त्यापैकी एक म्हणजे गणपतीपुळ्यातील गणपती बाप्पा. गणपतीपुळ्याचा बाप्पा हा पश्चिमद्वार देवता असून इथे येणाऱ्या भक्तांची इच्छापूर्ती करतो, अशी मान्यता आहे. (Ratnagiri Ganpatipule) इथे पूर्ण श्रद्धेने येणाऱ्या भक्तांची इच्छा पूर्ण होते. या मंदिरात येणारा भक्त मूषकराजाच्या कानात जे काही सांगेल ती इच्छा श्री गणेश पूर्ण करतात, अशी इथे येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे.

काय आहे आख्यायिका?

रत्नागिरी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळे हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे हा बाप्पा इच्छापूर्ती आहेच. शिवाय गणपतीपुळे हे श्री गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. (Ratnagiri Ganpatipule) माहितीनुसार, सुमारे ५०० वर्षांपूर्वी बाळ भटजी भिडे यांना गणपती बाप्पाने साक्षात्कार दिला होता. त्यावेळी बाळ भटजी भिडे यांना बाप्पाच्या साकार रूपाचा दृष्टांत झाला. या दृष्टांतानंतर इथे गणपती बाप्पाची मूर्ती प्रकट झाली, अशी अख्यायिका आहे.

समुद्राच्या लाटा करतात चरणस्पर्श

गणपतीपुळे मंदिराची खासियत म्हणा किंवा वैशिट्य.. या मंदिराच्या आजूबाजूला नारळाची झाडे आणि समोर अथांग समुद्रकिनारा आहे. जो पर्यटकांना आकर्षित करतो. (Ratnagiri Ganpatipule) याच समुद्राच्या लाटा थेट मंदिराच्या आत श्री गणेश मूर्तीच्या पायाला स्पर्श करतात. पावसाळ्याच्या दिवसात समुद्राच्या लाटा मंदिराच्या आत प्रवेश करून थेट गणपती बापाच्या पायाला स्पर्श करतात आणि त्यानंतर लाटांची तीव्रता कमी होते.

कसे जाल?

समुद्रापुढे पुळणीच्या (वाळूचे) भव्य भागात श्री गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला ‘गणपतीपुळे’ असे नाव पडले. जगभरात हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही रेल्वेने किंवा स्वतःच्या गाडीने जाऊ शकता. मुंबईपासून सुमारे ३३३.२ किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. इथे रत्नागिरी एसटी डेपोतून गणपतीपुळेसाठी थेट एसटी बस आहे. (Ratnagiri Ganpatipule) ही बस ४५ मिनिटांमध्ये मंदिराबाहेर सोडते.

Bullet Train: मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत मोठी अपडेट ; 21 किमी बोगद्याच्या बांधकामाला गती

bullet train

Bullet Train: सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन… या प्रकल्पाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड कडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 394 मीटर लांबीच्या बोगदाचा काम पूर्ण झाले आहे. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. त्यामुळे घणसोली मध्ये अतिरिक्त बोगदा पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिळफाटा दरम्यानचा २१ किलोमीटर लांबीच्या बोगदाच्या बांधकामाला ( Bullet Train) गती मिळणार आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड न दिलेल्या माहितीनुसार बीकेसी ते शिळा फाटा येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनला जोडणाऱ्या 21 किलोमीटर लांबीच्या बोगदाचा बांधकाम वेगानं सुरू आहे या बोगदाचा सुमारे सात किलोमीटरचा भाग ठाणे खाडीत समुद्र खाली असणार आहेत सध्या घणसोली जवळील बीकेसी विक्रोळी आणि सावली इथे बांधकाम सुरू आहेत हे टनेल बोरिंग मशीन (Bullet Train) वापरून 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यास मदत करतील.

एडीआईटीसाठी उत्खननाचे काम 6 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाले, ते पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागले आणि 27,515 किलो स्फोटकांचा वापर करून 214 नियंत्रित स्फोट घडवून आणले. ADIT चे उत्खनन, जो 26 मीटर खोल झुकलेला बोगदा आहे, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) द्वारे आणखी 3.3 किमी लांबीचा बोगदा तयार करण्याचा मार्ग मोकळा करेल, प्रत्येक बाजूला सुमारे 1.6 मीटर बोगदा (Bullet Train) एकत्र आणेल परवानगी दिली जाईल. 21 किमी बोगद्याच्या बांधकामापैकी 16 किमी टनेल बोरिंग मशीनद्वारे आणि उर्वरित 5 किमीचे काम NATM द्वारे केले जात आहे.

समुद्राखालून जाणार 7 किमीचा भाग (Bullet Train)

NHSRCL अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन ते शिळफाटा या 21 किमी लांबीच्या बोगद्याशी संबंधित बांधकाम कामे वेगाने सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या बोगद्याचा ७ किमीचा भाग ठाणे खाडीत समुद्राखालून असेल, जो आंतरभरतीचा झोन आहे. देशात बांधला जाणारा हा पहिलाच बोगदा आहे.”

तीन तासांनी कमी होणार प्रवास (Bullet Train)

21 किलोमीटर लांबीचा हा बोगदा बुलेट ट्रेनच्या अप आणि डाउन ट्रॅकसाठी दोन ट्रॅकसह सिंगल ट्यूब बोगदा असेल. या बोगद्याच्या बांधकामासाठी 13.6 मीटर व्यासाच्या कटर हेडसह टनेल बोरिंग मशीन्स (टीबीएम) वापरल्या जातील. 2028 पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे NHSRCL चे उद्दिष्ट आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास तीन तासांनी कमी होणार आहे.

Mansoon Update: 10 जूनला मुंबईत मान्सून दाखल होणार; यंदा महाराष्ट्रात 106 टक्के अधिक पाऊस बरसणार

Mansoon Update

Mansoon Update| महाराष्ट्रातील लोकांना वाढत्या उकाड्याने हैराण करून सोडले आहे. मात्र आता रेमल वादळामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. ज्यामुळे उन्हाच्या तडक्यापासून लोकांचे सुटका होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या, 10 किंवा 11 जूनपासून मुंबईत पाऊस बरसायला सुरुवात होईल. तर 15 जूनपासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. यंदा महाराष्ट्रास राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा इतर भागात 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या केरळ भागात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे. तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मात्र आता रेमल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात लवकरच सरी बरसायला सुरुवात होईल असा अंदाज बांधला जात आहे. यांना यानुसार पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर त्यानंतर महाराष्ट्रात ही मान्सून दाखल होईल. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातील लोकांना काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहे.

जूनमध्ये उष्णतेची लाट कायम (Mansoon Update)

दरम्यान, पुढील एक ते दोन दिवसांमध्ये विदर्भाच्या तापमानात वाढ होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळामध्ये विदर्भातील तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढेल, अशी ही माहिती देण्यात आली आहे. तसेच, जून महिन्यामध्ये हे उत्तर पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला 29 मेपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. ज्यामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट पडेल.

78 वर्षीय वृद्धेवर 30 वर्षांच्या 3 जणांकडून बलात्कार; घरी सोडतो म्हणत थेट…

78 year old lady raped

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी आणि लाज काढणारी घटना समोर आली आहे. एका 78 वर्षीय वृद्धेवर ३० वर्षांच्या ३ मुलांकडून बलात्कार (Old Lady Raped) करण्यात आला आहे. कोला जिल्ह्यातील दाळंबी येथे ही घृणास्पद घटना घडली आहे. याबाबत रात्री उशिरा बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतत असताना दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला बसमधून उतरली होती. तेथून गावाकडे पायी जात असताना तिथे तीन जण मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका लिंबाच्या शेतात घेऊन गेले. यावेळी तिघांपैकी तीस ते पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीनं सदर वृद्धेवर अत्याचार केला. एवढच नव्हे तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.

या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले. तेव्हा वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. हे पाहताच अत्याचार करणारे तिघे नराधम घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर त्या दोन्ही व्यक्तींनी सदर वृद्धेला सुखरूपपणे तिला घरी सोडलं. घरी गेल्यानंतर वृद्ध महिलेने आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराचा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी थेट बोरगावमंजू पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Karnataka Hoysala Temple : कर्नाटकचे होयसळ मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा सर्वोत्तम नमुना; जाणून घ्या वैशिट्ये

Karnataka Hoysala Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Karnataka Hoysala Temple) भारतातील अनेक मंदिरे त्यांच्या वैभवशाली इतिहासासह, अध्यात्मिक वारसा आणि विशिष्ट शिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. यांमध्ये कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिराचा समावेश आहे. दक्षिण भारतातील ही मंदिरे एकूण ९०५ वर्ष जुनी असून स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. होय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ २०२३ च्या यादीत कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे.

नेमकं कुठं आहे? (Karnataka Hoysala Temple)

माहितीनुसार, कर्नाटकातील हसन या जिल्ह्यात होयसाळेश्वर मंदिर आहे. हे मंदिर उंच चबुतऱ्यावर बांधलेले असून या चबुतऱ्यावर एकूण १२ कोरीव थर आहेत. होयसाळ मंदिर हे स्थापत्य कलेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. विशेष शिल्पकला, कोरीव काम आणि लक्षवेधी वास्तुकला या मंदिराकडे लक्ष वेधून घेते. (Karnataka Hoysala Temple) हे मंदिर ज्या १२ कोरीव थरांवर उभारलेले आहे त्यांना जोडण्यासाठी चुना, सिमेंट किंवा इतर कोणतीही सामग्री वापरलेली नाही ही आणखी एक खासियत. येथील कोरीव काम अगदी थक्क करणारे आहे. एखाद्या मशीनच्या मदतीने देखील होणार नाही इतके सुरेख कोरीवकाम या मंदिरात केलेले आहे. त्यामुळे पाहताना अगदी हरवून जावेसे वाटते.

होयसाळ मंदिराचा इतिहास

दक्षिण भारतात इसवी सन १० ते १४ च्या शतकादरम्यान होयसळ साम्राज्य अस्तित्वात होते. या साम्राज्याने सध्याच्या कर्नाटक राज्याचा बहुतांश भाग आणि गोवा राज्याचा काही भाग काबीज केला होता. त्यामुळे या भागांवर त्यांचे राज्य होते. दरम्यान, होयसाळ राजांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे १५०० मंदिरे बांधली होती. या समूहातील ही मंदिरे कर्नाटक राज्यातील बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपुरा प्रदेशात विखुरलेली आहेत. (Karnataka Hoysala Temple) कर्नाटक राज्यातील होयसळ समूहातील ही मंदिरे राजा विष्णुवर्धनाच्या कारकिर्दीत बांधण्यात आल्याचे काही पुरावे इतिहास तज्ञांना सापडले आहेत. शिवाय काही अवशेषांनुसार आणि पुराव्यानुसार कर्नाटकातील होयसाळ मंदिराची निर्मिती ११२१ मध्ये करण्यात आल्याचे समजते.

कसे जाल?

म्हैसूर विमानतळापासून होयसाळ मंदिर सुमारे १५० किमी अंतरावर आहे. तर हसन रेल्वे जंक्शन हे कर्नाटकशी जोडलेले एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. हसन जंक्शन होयसाळेश्वर मंदिरापासून फक्त ३० किमी अंतरावर आहे. (Karnataka Hoysala Temple) त्यामुळे रेल्वे किंवा हवाई मार्गांपैकी एकाची निवड करून तुम्ही येथे जाऊ शकता.

शिंदे- अजितदादा महायुतीमधून बाहेर पडणार? भाजपचा फायदा की तोटा?

shinde fadnavis ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 जून नंतर महायुती (Mahayuti) तुटणार… अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महायुतीतून बाहेर पडणार…महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा प्रयोग सपशेल तोंडावर आपटलाय… अशी चर्चा आमची नव्हे तर ही चर्चा आहे सर्वसामान्य नागरिकांची… लोकसभेचा महाराष्ट्रातील चौथा टप्पा आटोपल्यावर अजितदादांचं प्रचारातून अलिप्त राहणं तर दुसरीकडे शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेलं वितुष्ट…अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट जास्त असेल, असे सगळेचजण सांगतायत… त्यामुळे दोन पक्ष फोडून भाजपच्या आशीर्वादाने तयार झालेली ही युती वर्कआउट होताना दिसत नाहीये. त्यामुळे लगेचच येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता चार तारखेनंतर महायुतीचा काडीमोड होईल का? हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर याचा नेमका कुणाला फायदा होईल आणि कुणाला तोटा? याचा अर्थ भाजपने फक्त लोकसभेसाठी या दोन्ही पक्षांचा वापर करून घेतलाय का? हेच थोडंसं खोलात जाऊन समजून घेऊयात…

राष्ट्रवादी ताब्यात घेऊन भाजपसोबत सत्तेचं संधान बांधणाऱ्या अजितदादांना महायुतीत फडणीसांना मागे सारत आपण बिग बॉस ठरु, अशी खात्री होती. पण लोकसभेच्या तिकीट वाटपातच अवघ्या पाच जागा मिळाल्याने आणि त्यातलीही एक रासपला म्हणजे मित्रपक्षाला सोडावी लागल्यामुळे अजितदादांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. या चार पैकी अवघ्या एका जागेवर कसं बस घड्याळ निवडून येईल, अशी शक्यता असल्याने घड्याळाचे सगळेच कार्यकर्ते धास्तावलेत… पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा असणारा व्होट शेअर भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील असं वाटतं असताना शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेने त्यावर पाणी फिरलं. उलट अनेक ठिकाणच्या स्थानिक राजकारणात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असल्याने निवडणुकीतही भाजपलाच याचा मोठा फटका बसला…महायुती तिघांच्या संगनमताने झाली असली तरी पक्ष फोडीचं खापर हे एकट्या भाजपवरच फुटत असल्याने ते निवडणुकीत भाजपाला बॅकफुटला घेऊन गेलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही घड्याळ वगळता म्हणावं असं महायुतीच्या उमेदवारांचं काम केलं नाही त्यामुळे अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर वाढत चाललंय, अशी चर्चा आहे… नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात पंधराच्या वरच्या सभा झाल्या मात्र त्यातल्या केवळ दोन सभांना अजित दादा हजर होते… मतदानाचा चौथा टप्पा उरकल्यावर तर अजितदादा कुठे फिरकलेच नाहीत. त्यांच्या अशा अचानक गायब होण्याला तब्येतीचं कारण पुढे करण्यात आलं पण महायुतीत दादांचे खटके उडालेत, असही आता काहीजण बोलू लागलेत.

आता वळूयात शिंदेंकडे… आपली पूर्ण ताकद वापरत शिंदेंनी लोकसभेच्या 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. पण प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. तेव्हा ठाकरेंच्या लाटेपुढे शिंदेंच्या उमेदवारांचा निभाव लागणार नाही, असं वातावरण तयार झालं. विशेष म्हणजे भाजपने शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर लावूनही जागा रेसमध्ये आली नाही… उलट याचा भाजपच्या जागांवरही रिव्हर्स इफेक्ट व्हायला लागला…मुंबईत आणि मराठवाड्यात शिवसेनेचं व्होट ट्रान्सफर भाजपला होत नसल्यानं भाजपसाठी शिंदे गट जुन दुखणं बनून गेलं. कल्याण, कोल्हापूर, ठाणे आणि अनेक महत्त्वाच्या जागांवर भाजपने शिंदेंच्या उमेदवारांची मदत केली नाही, असंही चित्र पाहायला मिळालं… महाविकास आघाडी काही अपवाद वगळता लोकसभेत एकदिलाने लढताना दिसली याउलट महायुतीमध्ये कशाचाच कशाला मेळ नव्हता, अशी परिस्थिती निर्माण झाली… या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय कळलं? तर भाजपचा पारंपारिक मतदार हा निवडणुकीपासून अलिप्त राहिला. फोडाफोडीच राजकारण करून या दोन्ही पक्षांना सोबत घेणं या मतदारांना पटलं नाही, भाजपसाठी राज्यात हा मोठा लॉस ठरू शकतो. शिंदे आणि अजितदादांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे भाजपला राजकारणात मोकळ्या मैदानात खेळता येत नाहीये… हेच सगळं ध्यानात घेऊन जितक्या लवकरात लवकर या महायुतीचं विसर्जन होईल. तितकाच भाजपाला विधानसभेला फायदा होणार आहे….

महायुती ब्रेक झाली तर भाजपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्रिशंकू अवस्थेचा… म्हणजे येत्या विधानसभेला महाविकास आघाडी, भाजप आणि शिंदे किंवा अजित पवार गट अशी तिहेरी लढत झाली तर आघाडीची मतं घड्याळ आणि तुतारी यांच्यामध्ये विभागली जाऊन वरच्या सरप्लस मतांचा फायदा हा भाजपाला उचलता येणार आहे. तसेच विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिल्याने राज्यभर भाजपचं केडर स्ट्रॉंग होऊन बहुमताच्या आकड्याकडेही भाजपाला झेप घेता येऊ शकते. त्यामुळे महायुतीचं ओझं उतरवणं भाजपासाठी अत्यंत गरजेचं बनलं आहे… स्थानिक नेत्यांचं एकमेकांशी न पटणं, पक्षामधील महत्वकांक्षी नेत्यांची वाढलेली अस्वस्थता, ओढून ताणून मतांचे गणित जुळवून आणण्यासाठी केलेली महायुती आणि आघाडीच्या बाजूने असणारे सहानुभूतीचं वारं या सगळ्याचा नीट विचार केला तर लोकसभेला केलेली चूक विधानसभेला रिपीट करण्यात काहीही अर्थ नाही. हीच गोष्ट ध्यानात घेऊन 4 जून नंतर हे तिन्ही पक्ष स्वतंत्र होऊन विधानसभेच्या तयारीला लागतील, याची शक्यता नाकारता येत नाही…त्यामुळे 4 जून नंतर महाराष्ट्रातील महायुतीचा काडीमोड होईल, असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.