Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 722

HDFC Bank : HDFC खातेधारकांना मोठा धक्का; UPI पेमेंट वापरकर्त्यांसाठी ‘ही सुविधा होणार बंद

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Bank) जर तुमचे अकाउंट HDFC बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आजकाल जो तो UPI पेमेंट ऍपचा वापर करताना दिसतोय. पण जर तुम्ही HDFC खाते धारक असाल तर मात्र तुम्हाला UPI पेमेंट सुविधेतील एक विशेष लाभ घेता येणार नाहीये. लवकरच HDFC बँक UPI पेमेंट ऍप वापरकर्त्यांची एक सुविधा बंद करणार आहे. ज्यामुळे बँकेच्या सर्व ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मॅसेज आणि ई- मेलच्या माध्यमातून माहिती दिली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

SMS सेवा होणार बंद (HDFC Bank)

HDFC बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, अल्प रकमेच्या UPI व्यवहारांसाठी आता SMS अलर्ट पाठवले जाणार नाही. अर्थात, जर तुम्ही HDFC खातेधारक असाल आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी UPI पेमेंट ऍपच्या मदतीने १०० रुपयांपेक्षा कमी रकमेचा व्यवहार केल्यास त्याचा तुम्हाला SMS अलर्ट येणार नाही. आतापर्यंत ही बँक प्रत्येक लहान रकमेच्या व्यवहारासाठी तुम्हाला SMS पाठवत होती. मात्र आता कोणत्याही लहान वा छोट्या व्यवहारांसाठी ही बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे SMS पाठवणार नाही. मात्र, तुम्ही १०० रुपये वा त्यापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केलात तर आणि ५०० रुपयांपेक्षा जास्त रुपये रिसिव्ह केलात तर तुम्हाला बँकेकडून SMS मिळत राहतील.

तसेच HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी देखील अशीच सुविधा असेल. एखाद्या ग्राहकाने ५०० रुपयांपर्यंत क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले तर त्याबाबत कोणताही मॅसेज पाठवला जाणार नाही. (HDFC Bank) तथापि, UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारे सर्व प्रकारच्या पेमेंटवर ई- मेल अधिसूचनेची सुविधा मात्र सुरु ठेवली जाणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ही SMS अलर्टची सुविधा येत्या २५ जून २०२४ पासून बंद होणार आहे. याबाबत बँकेने मॅसेज तसेच ई – मेल पाठवून ग्राहकांना माहिती दिली आहे.

आपल्या देशात डिजिटल पेमेंट ऍपच्या दुनियेत Paytm, PhonePe आणि GooglePay हे सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरले जाणारे ऍप आहेत. हे ॲप्स आजकाल UPI Lite चा प्रचार करत आहेत. ज्याच्या मदतीने, ५०० रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी कोणताही पासवर्ड वा पिनची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे बँकेलाही मॅसेज सुविधेचा वापर केल्याने खर्च करावा लागत नाही. मात्र, गेल्या काही काळात UPI वापरून छोट्या व्यवहारांची संख्या प्रचंड वाढली आहे. (HDFC Bank) अगदी ५ ते १० रुपयांसाठी देखील UPI ऍपचा वापर केला जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, गेल्या वर्षी UPI व्यवहारांची संख्या वर्षाच्या अखेरीस ११८ अब्जांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काळात ही बाब आणखी गंभीर ठरू शकते.

गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त 7 दिवस उरले- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकसभा (Lok Sabha Election 2024) निडवणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. पुनः एकदा देशात मोदी सरकार येणार असं NDA मधील नेते म्हणत आहेत तर दुसरीकडे मोदींना हरवून देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास विरोधकांना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. गुड बाय मोदी, खोट्या फकीरासाठी आता फक्त ७ दिवस उरलेत असं राहुल गांधींनी म्हंटल.

राहुल गांधी यांचे ट्विट काय?

4 जूननंतर गुड बाय भाजप, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा! जनतेची फसवणूक करणाऱ्या खोट्या फकीरासाठी आता फक्त ७ दिवस उरले आहेत. भारताला मतं मिळत आहेत – नॉक नॉक नॉक! भाजपपासून देशाला स्वातंत्र्य मिळणारच, देशाचे खरे अच्छे दिन येणार आहेत – फटाफट फटाफट असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील आपलं भाषण सुद्धा शेअर केलं आहे. यात ते म्हणत आहेत कि काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पार्टी हे आता एकमेकांसोबत आहेत. काँग्रेसच्या पंज्याने समाजवादीची सायकल पकडली आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. उत्तरप्रदेशात इंडिया आघाडी भाजपला क्लीन स्वीप देणार आहे, जागांची लाईन लागणार आहे खटाखट खटाखट. ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा!” असंही राहुल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमध्ये १३ जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये वाराणसी, गोरखपूर, मिर्झापूर, चंदौली, घोसी, गाझीपूर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, सलेमपूर, बलिया आणि रॉबर्टसगंज जागांचा समावेश आहे. या जागा जिंकून लोकसभेत आघडी घेण्याचा प्रयत्न इंडिया आणि एनडीए आघाडीचा आहे. त्यामुळे दोन्हीकडून जोरदार प्रचार याठिकाणी पाहायला मिळाला.

भाजपा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Hit and run case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रामध्ये सध्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सर्वाधिक चर्चेत आहे. परंतु आता पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन प्रकरण (Hit and run case) घडले आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह (Karan Bhushan Sing) यांच्या ताफ्याने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 1 मुलगा गंभीर जखमी आहे. त्यामुळे आता घडलेल्या प्रकाराबाबत परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. यासह भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत करण भूषण सिंह यांना कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. याचं करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या वाहनाने 3 मुलांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे. यातील 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात कर्नलगंज-हुजूरपूर मार्गावरील छायपुरवा गावाजवळ घडला आहे

या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यासह पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत लोक रस्त्यावर ही उतरले. त्यानंतर काही लोकांनी घटनास्थळी उभी असलेली फॉर्च्युनर कार जाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याला संबंधित नातेवाईकांनी विरोध दर्शवला. मात्र पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या सर्व घटनेमुळे निर्माण झालेले परिस्थिती पाहता परिसरात पोलीस तैनाब करण्यात आले आहे.

MSRTC Dhule Bharti 2024 | ST महामंडळात नोकरीची संधी; 10वी पास करू शकतात अर्ज

MSRTC Dhule Bharti 2024

MSRTC Dhule Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत एक मोठी भरती चालू होणार आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती होणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 256 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | MSRTC Dhule Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 256 जागा
  • नोकरीचे ठिकाण – धुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2024
  • अर्ध शुल्क
  • खुल्या प्रवर्गासाठी – 500 रुपये
  • मागासवर्गीय उमेदवार – 250 रुपये

अर्ज कसा करावा ? | MSRTC Dhule Bharti 2024

  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्र काळजीपूर्वक जोडावे.
  • 6 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…; कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण

kalicharan maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात बोलतानाच कालीचरण महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केली आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता कालीचरण महाराज यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालीचरण महाराज काय म्हणाले??

आपल्या व्याख्यानात बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की , “जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा देखील वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही. देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो अंनाद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद हा मिळाला पाहिजे. टार्गेट पूर्ण करून देणारं टार्गेट म्हणजे धर्म आहे”

त्याचबरोबर, “सध्याची परस्थिती आता दिसत आहे. पूर्वी काय होती आणि आता काय आहे? ह्या परस्थितीची परिपूर्ण जाणीव करून देतो. माणुसकी आपल्याला धर्म शिकवणार आहे. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे , पिणे, झोपणे, सेक्स करणे हे लक्षण पशूमध्ये असतात. ढोरांमध्ये आणि माणूस ही या गोष्टी करतो.” असेही कालीचरण महाराज यांनी म्हणले आहे.

दरम्यान, हिंदू धर्माबाबत बोलताना “देवी मानणारे ईश्वर मानत नाही. इस्लाम आणि ख्रिश्चन पुनर्जन्म मानत नाही ते धर्म नाही. मी कुराणाचा ब्रँड अँबेसिडर आहे , मुस्लिम लोकं जो प्रचार करत नाही तो मी करतो. येशूने खिळे ठोकून घेतले आणि पूर्ण जगाचे पापा फेडून घेतले. हिंदू म्हणजे काय? अच्छे को छेडना नाही बुरे को छोडणा नाही. काही हरामखोरांनी म्हटलं इकडे मारलं तर इकडेही मारून घ्या. चु** बनण्याचा उद्देश देऊन देशाचा सत्यानाश केला.” असे कालीचरण महाराज म्हणाले.

PAN-Aadhaar Linking | करदात्यांनी 31 मेपूर्वी करा ‘हे’ काम; अन्यथा भरावा लागेल दुप्पट TDS

PAN-Aadhaar Linking

PAN-Aadhaar Linking | तुम्ही देखील कर भरत असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कर भरत असेल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता आयकर विभागाने 31 मे पूर्वी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याचे आव्हान केलेले आहे. तुम्ही जर असे केले नाही तर त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करून सगळ्यांना ही माहिती दिलेली आहे.

आयकर विभागाने (PAN-Aadhaar Linking) दिलेल्या नियमानुसार आता ज्या लोकांनी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही तर त्याला दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. 24 एप्रिल 2024 रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी म्हटलेले आहे की, ज्या खात्यांमध्ये 31 मार्च 2024 पर्यंत व्यवहार झाले असतील, त्या खात्यांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसल्यावर जास्त टीडीएस कापला जाणार आहे.

आयकर विभागाने करतात त्यांना 31 मे म्हणजे शुक्रवार पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे. जेणेकरून त्यांचा कर कपात होऊ नये. आयकर नियमानुसार पॅन कार्ड बायोमेट्रिक आधार कार्डशी लिंक नसेल तर त्यांना मोठा आर्थिक धक्का सहन करावा लागू शकतो.

आयकर भरण्याची शेवटची तारीख | PAN-Aadhaar Linking

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून याआधी सीबीडीटीने प्रत्येकाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची आव्हान दिलेले आहे. त्याचप्रमाणे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही, तर त्यामुळे काय तोटे होऊ शकतात. हे देखील सांगितलेले आहे. त्यामुळे आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी दोनच दिवस राहिलेले आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करा.

Gold Price Today : सोन्याची चमक आणखी वाढली; भरगोस दरवाढीमुळे खरेदीदारांची निराशा

Gold Price Today 20 May

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज २९ मे २०२४ रोजी भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीची किंमत (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळत आहे. मॅलिटी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोने 72260 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.16% म्हणजेच 115 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात सुद्धा 806 रुपयांची वाढ झाली असून १ किलो चांदी 96121 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७११६० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात हि किंमत (Gold Price Today) ७१२९० रुपयांवर गेली. त्यानंतर या यामध्ये आणखी वाढ होऊन सोन्याच्या किमतीनी ७२३६९ रुपयांचा उच्चांक गाठला. थोड्या वेळानी दुपारी १२ वाजता सोन्याच्या किमती थोड्याफार प्रमाणात घसरून सध्या १० ग्राम २४ कॅरेट सोने 72260 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत प्रचंड चढउतार पाहायला मिळाला त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Gold Price Today 3 april

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,100 रुपये
मुंबई – 67,100 रुपये
नागपूर – 67,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 73,200 रूपये
मुंबई – 73,200 रूपये
नागपूर – 73,200 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

RBI | RBI ने ‘या’ 2 मोठ्या बँकांवर केली कठोर कारवाई; ठोठावला 1 कोटी 90 लाखांचा दंड

RBI

RBI | देशातील सर्व आर्थिक घडामोडीवर आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व बँकेची चांगलीच नजर असते. आता आरबीआयने पुन्हा एकदा देशातील मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आरबीआयकडून आयसीआयसीआय आणि एस बँक या दोन खाजगी क्षेत्रातील बँकांविरोधात कारवाई केलेली आहे. आरबीआयने (RBI ) आखून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने ही कार्यवाही केलेली आहे. आयसीआयसीआय वर एक कोटी रुपये तर एस बँकेवर 90 लाख रुपयांचा दंड देखील ठरवण्यात आलेला आहे. आता ही कारवाई नेमकी का केली? हे आपण जाणून घेणार आहोत.

आरबीआयने (RBI) देशातील सर्व लहान-मोठ्या बँकांना काही नियम आखून दिलेले होते. परंतु आरबीआयकडून आखण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यामुळे या कारवाई अंतर्गत आरबीआयने या दोन मोठ्या बँकांवर एक कोटी 90 लाख रुपयांचे कारवाई केलेली आहे. कार्यालयीन कामामध्ये चुकीच्या पद्धतीने व्यवहार केल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतलेला आहे. आरबीआय बँकिंग नियमन अधिनियम 1949 अंतर्गत आयसीआयसीआय आणि एस बँकेवर कारवाई करण्यात आलेली आहे.

खातेधारकांवरही होणार परिणाम ? | RBI

आरबीआयने घेतलेल्या या मोठ्या नेल्यानंतर दोन मोठ्या बँकांवर कारवाई होत असतानाच, बँकेचा आर्थिक गुरदंड त्यांच्या खातेधारकांनाही होणार आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. परंतु याचा खातेधारकांवर परिणाम होणार नाही. किंबहुना या दंडाच्या रकमेच्या बँकेच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बँकांची कार्यपद्धती सुरळीत होणार आहे. त्यामुळे खातेधारकांना याबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.

Morning Food | सकाळी रिकाम्या पोटी खा ‘या’ 5 गोष्टी, 60 वर्षांपर्यंत राहाल निरोगी

Morning Food

Morning Food | आपले जीवनशैलीमध्ये आपण ज्यांना खातो. ते खूप महत्त्वाचे असते. त्यातही आपण सकाळी जो नाश्ता करतो. त्याचा परिणाम दिवसभर आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे सकाळचे जेवण हे खूप आरोग्यदायी असणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीराला सगळे पोषणतत्व मिळतील आणि दिवसभर देखील तुमच्या मदती ताकद निर्माण होईल. सकाळच्या नाश्त्यांमध्ये काही अशा गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमची चयापचय देखील चांगले काम करेल आणि आहार देखील संतुलित असेल. आता आम्ही तुम्हाला दिवस रोज सकाळी काही पाच आरोग्यदायी गोष्टींचे (Morning Food) सेवन करायला पाहिजे, ते सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होईल.

कोमट पाणी | Morning Food

सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिल्याने तुमची पचनक्रिया खूप चांगली सुधारते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. कोमट पाणी हेच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यामध्ये मध आणि लिंबू देखील टाकू शकता. शरीर देखील डीटॉक्स होते.

हर्बल टी

सकाळी उठल्यावर चहा प्यावासा वाटत असेल, तर दुधाचा चहा पिणे बंद करा. उठल्यानंतर थोड्या वेळाने, हर्बल चहा घ्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ताजी तुळशीची पाने किंवा काही औषधी वनस्पतींसह घरच्या घरी ताजे हर्बल चहा बनवू शकता. हे पचन सुधारेल, चयापचय गतिमान करेल, प्रतिकारशक्ती मजबूत करेल आणि तणाव दूर करेल.

हरभरा, मनुका आणि मूग

सकाळी तुम्ही प्रथिने आणि जीवनसत्त्वे युक्त आहार घ्यावा. हरभरा, बेदाणे आणि मूग रात्रभर भिजवून सकाळी खा. यामुळे तुम्हाला ऊर्जा, प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतील. हरभरा, मूग आणि मनुका खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही आणि हे एक सुपर हेल्दी फूड आहे.

खजूर

तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये 2 भिजवलेल्या खजूरांचा समावेश करा. रोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने अनेक फायदे होतात. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, फायबर आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक मिळतात. खजूर खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी रोज खजूर खावे.

पपई | Morning Food

जर तुम्हाला नाश्त्यात काही फळ आवडत असेल तर पपई हा उत्तम पर्याय आहे. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पोट निरोगी राहते. पचनास मदत होते. पपईमध्ये पॅपेन नावाचे एंजाइम असते जे प्रथिने तोडण्यास मदत करते. सकाळी पपई खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो.

खरंच गडकरींना पाडण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली? काहीतरी शिजतंय

gadkari fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपूरच्या प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली, आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.” संजय राऊतांनी माध्यमांसमोर केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट… गडकरींचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) प्रयत्न करतायत, या त्यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं… भाजप पक्षातच एकमेकांना पाडण्यासाठी अंतर्गत चढाओढ लागलीय, असा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो. पण दिल्लीच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मात्र तरीही राज्याच्या राजकारणात कसलाही हस्तक्षेप न करणाऱ्या गडकरींचा फडणवीसांना धोका का वाटतोय? राऊतांनी केलेल्या आरोपानुसार गडकरींना नागपूरमधून पाडून मोदी, शाह यांना नेमकं काय साध्य करायचंय? हे सगळं खरं असेल तर गडकरी निवडणूक हरले तर याचा फडणवीसांना काय फायदा होऊ शकतो? तेच पाहुयात

भाजपने आपल्या बऱ्याच यंत्रणांना गडकरींच्या विरोधात कामाला लावलं आहे. असं नेतृत्व नागपुरातच संपवलं पाहिजे हा प्रयत्न आज नाही तर आधीपासूनच भाजपाकडून सुरु आहे. अंबादास दानवे यांनी भाजपवर केलेला सनसनाटी आरोप. हे कमी होतं की काय म्हणून गडकरींच्या पराभवासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे सगळ्या नागपूरला माहिती आहे, असं म्हणून अनिल देशमुखांनीही या आगीत तेल ओतलं…तेव्हा भाजपच्या गोटात नेमकं काय राजकारण सुरुय? हे पाहणं महत्त्वाचं ठरतं…मोदी शहांचा गडकरींना असणारा विरोध आणि त्यासाठी फडणवीसांनी केलेली मदत या उठलेल्या वावड्यांना कोणतं पॉलिटिकल लॉजिक असू शकतं याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो. तेव्हा पहिली गोष्ट समोर येते ती आरएसएसचा वाढू पाहणारा हस्तक्षेप…

आता पक्ष चालवण्यासाठी आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या या स्टेटमेंटमुळे नवं वावटळ उठलं… नरेंद्र मोदी, अमित शहा संघाला डावलून आपला कारभार चालवतात. त्यांना कोअर संघाची माणसं पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयात नको असतात. पण संघ अनेक दिवसांपासून या ना त्याकारणाने पक्षावर प्रभाव टाकतच असतो. गडकरी हे संघाच्या जास्त जवळचे मानले जातात. मोदींच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर आता दिल्लीत खांदेपालट होणार याच्या बऱ्याच चर्चा आहेत. त्यात गडकरी यांचं नाव टॉप लिस्टला असल्यामुळे मोदी शहा यांच्यासाठी ती गोष्ट अडचणीची ठरू शकते. मोदींच्या गॅरंटीवर शंका उपस्थित केली जाऊ शकते. पण नितीन गडकरींनी केलेल्या कामांवर सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत असतो. त्यामुळे भाजपच्या तयार झालेल्या निगेटिव्ह इमेजला नीट करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील धुमसणारा राग शांत करण्यासाठी गडकरींच्या नावाचा पंतप्रधान पदासाठी विचार होऊ शकतो. यासाठी मुळावरच घाव घालायचा म्हणून मोदी शहांकडून फडणवीसांना समोर करत गडकरींना नागपुरातच पाडण्याचा डाव कदाचित रचला गेला असावा…

अमित शहांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पर्धेतल्या नावाचा नेहमीच विरोध होत आलाय. म्हणून गडकरी सारख्या अनुभवी नेत्यालाही एक खातं आणि एक मतदारसंघ यापूरतं मर्यादित ठेवण्यात आलय. मात्र तरीही गडकरींच्या नावाची क्रेज कायम असल्यामुळे पक्षातच हा पाडापाडीचा खेळ सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही…आता गडकरी हे दिल्ली लेवलच राजकारण करतात. त्यामुळे फडणवीसांच्या राज्यातील राजकारणाला त्याचा काही तोटा होत नाही. मग गडकरींना पाडून त्याचा फडणीसांना नेमका काय फायदा होतो? तर त्याच उत्तर समोर येतं दिल्लीच्या राजकारणातील स्पेस…

हे पण वाचा : भाजपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची उचल बांगडी केलीये??

तर मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे लोकसभेनंतर फडणवीस राज्याच्या राजकारणातून दिल्लीत शिफ्ट होणार. अशा वेळेस त्यांच्यासमोर महाराष्ट्रातून सध्या दोनच चेहरे हे जास्त ॲक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळतात. एक म्हणजे विनोद तावडे. तर दुसरे नितीन गडकरी… तावडे आणि फडणवीस यांच्यातील वाद आपल्याला माहित आहेच. त्यामुळे तावडेंनी पक्षात तयार केलेल्या वर्चस्वाला धक्का द्यायचा असेल तर समांतर राजकारण खेळण्याशिवाय फडणवीसांकडे सध्यातरी दुसरा पर्याय दिसत नाही. अशावेळेस गडकरी यांचं राजकारण संपणं हे एक प्रकारे फडणवीसांच्या राष्ट्रीय महत्त्वकांक्षांना बळ देणारी घटना ठरू शकते. त्यात गडकरी हे नागपुरातून येत असल्याने नागपूर बेल्टवर आपला राजकीय दबदबा कायम रहावा. याचा देखील विचार फडणवीसांच्या बॅक ऑफ द माईंड सुरू असेल, याची शक्यता नाकारता येत नाही… बॉटम लाईन काय तर नरेंद्र मोदींना प्रतिस्पर्धी तयार होऊ नये आणि फडणीसांच्या राष्ट्रीय महत्वकांक्षांना बळ देण्यासाठी नितीन गडकरी लोकसभेला पडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असल्याचं राऊतांचं एकंदरीत म्हणणं असावं. बाकी तुम्हाला काय वाटतं? मोदी, शहा यांनी फडणवीसांच्या मदतीने गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवली असेल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.