Thursday, December 25, 2025
Home Blog Page 723

Lok Sabha Election 2024 : 400 पारचा नारा बकवास, भाजपच्या 200 जागाही येत नाहीत

BJP LOK SABHA SEATS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपचे ४०० पारचा नारा दिला होता, आपण ४०० जागा आरामात जिंकू असा दावा अजूनही भाजपचे नेते मोठ्या विश्वासाने देत असतात. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ४०० पारचा नारा बकवास आहे, त्याउलट भाजपच्या २०० जागाही येत नाहीत असं खर्गे यांनी म्हंटल आहे. अमृतसरमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या जागा कशा कमी होतील ते सुद्धा सांगितलं.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजपच्या कमी होतील तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या जागा वाढताना आपल्याला दिसतील. त्यामुळे 400 पारचा नारा हा मूर्खपणा आहे. भाजपवाले सरकारही बनवू शकत नाहीत आणि 200 जागांच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये भाजपचे अस्तित्व नाही आणि कर्नाटकात सुद्धा भाजप मजबूत परिस्थितीत नाहीत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये टक्कर पाहायला मिळेल तर महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे. मग अशा परिस्थितीत तुम्हाला 400 जागा कशा मिळतील असा उलट सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

दरम्यान, लोकसभा निडवणुकीत पराभव झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे याना आपली नोकरी गमवावी लागेल असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला होता, त्यावरही खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. लहानपणापासून लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. इथे आता मला तेवढीच वर्षे झाली आहेत, जेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आहे. ४ जूननंतर त्यांनी स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे, असा पलटवार खरगे यांनी केला. केंद्र सरकारमध्ये 30 लाख पदे रिक्त आहेत, जर देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर ही सर्व पदे भरली जातील असे आश्वासन खर्गे यांनी दिले.

Weather Update | पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार पाऊस; IMD चा अंदाज

Weather Update

Weather Update |राज्यात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मात्र कडाक्याचे ऊन पडलेले दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. तर काही ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना उष्माघाताचा देखील त्रास होत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी उष्णतेचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये ही पावसाची शक्यता पाहायला. (Weather Update)

या भागात पावसाची शक्यता | Weather Update

भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आजपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 29 मे पासून ते 1 जूनपर्यंत विविध भागात पाऊस पडणार आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आयएमडीच्या रिपोर्टनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये देखील पाऊस पडेल.

या भागात उष्णतेचा ऑरेंज आणि येल्लो अलर्ट | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता धुळे, जळगाव, नाशिक या भागात कोरडे वातावरण असणार आहे. त्याचप्रमाणे पुणे, अहमदनगर आणि अकोला या भागामध्ये तापमानाचा पारा मात्र चांगला चढणार आहे. त्याचप्रमाणे 29 मे रोजी अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता दिलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यालाही 29 आणि 30 मे साठी उष्णतेचा येलो जारी केलेला आहे.

Lok Sabha Election 2024 : भाजपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची उचल बांगडी केलीये??

BJP PM CANDIDATE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ४ जून….. भाजपला बहुमत मिळेल. कदाचित 400 प्लसचा आकडाही पूर्ण होईल. पण पंतप्रधान पदावर मोदी नाही तर एक नवा चेहरा असेल. या काही हवेतल्या बाता नाहीत तर अनेक विश्लेषकांनी नोंदवलेलं हे मत आहे. मोदी मॅजिकवर भाजपने सत्तेतील दहा वर्षे पूर्ण केलेली असताना 2024 ला मात्र हाच चेहरा पक्षाला नकोसा वाटायला लागलाय की काय? असा प्रश्न यामुळे तयार झालाय. भाजपचं इंटरनल पॉलिटिक्स काही का असेना, पण खरंच मोदी पंतप्रधान नसतील तर त्यांना रिप्लेस करेल असा पंतप्रधानपदाचा भाजपातील चेहरा कोण असेल? 4 जून नंतर भाजपमधील कुठला नेता आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर दिसेल? आणि या सगळ्याची नेमकी राजकीय कारण काय असतील? तेच पाहुयात,

अबकी बार मोदी सरकार… असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची सत्ता उलथवून लावत पंतप्रधानपदावर विराजमान झाले. 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्म त्यांनी बहुमताच्या गाजवल्या. 2024 ला जेव्हा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हाच अबकी बार 400 पार असं म्हणत भाजपने पुन्हा एकदा आपण आरामात जिंकून येऊ असा मेसेज दिला. पाचव्या टप्प्यालाच आपण बहुमताचा आकडा गाठला आहे, असं म्हणत अमित शहांनी जणू सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार यावर जणू शिक्कामोर्तब केलाय… त्यामुळे असं धरून चालू की 4 जूनला भाजप देशात पुन्हा एकदा सत्तेत आलीय. मात्र यावेळेस पंतप्रधान पदाचा चेहरा हा बदललेला असेल…

भाजपने मागील दहा वर्ष मोदींच्या चेहऱ्यावर राजकारण केलं. मोदींच्या नावाने मत मागितली. 2019 ची निवडणूक तर मोदी लाटेवरच भाजपाला जिंकता आली. पण 2024 पर्यंत सगळी गणित उलटी झालीयेत. मोदी फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत चालताना दिसला नाही. याउलट मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रागाची भावना असल्याचं एकूणच देशात चित्र होतं. मणिपूर, शेतकरी आंदोलन, महागाई, स्वायत्त यंत्रणांचा चुकीचा वापर या सगळ्यांचं खापर मोदींवर फुटताना दिसलं. यामुळे भाजपने तयार केलेल्या मोदी नावाच्या ब्रँडला आता लोकं कंटाळलेली आहेत, असं चित्र संपूर्ण लोकसभेच्या प्रक्रियेत दिसून आलं. हीच गोष्ट लक्षात घेऊन भाजपला देशात लॉन्ग टर्मचं राजकारण खेळायचं असेल तर भाजप पंतप्रधान पदासाठी खांदेपालट करू शकतो. मोदींना रिप्लेसमेंट असणाऱ्या या पंतप्रधान पदांच्या चेहऱ्यांची आता भाजपमध्ये मोठी चर्चा देखील आहे.

मोदींची जागा घेऊ शकतील, असे पंतप्रधान पदाचे पहिले दावेदार आहेत अमित शाह.

मोदी जरी चेहरा असतील तरी पक्षाची संपूर्ण यंत्रणा आणि रिमोट कंट्रोल हा अमित शहांच्या हातात असतो. शहांचा शब्द हा अंतिम शब्द असल्याने त्यांच्यापुढे कुणाचं काही चालत नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा गृहमंत्री होते.. तेव्हापासून ते आता देशाचे गृहमंत्री पदाचा कारभार संभाळताना सरकारचे सगळे महत्वाचे निर्णय हे अमित शहांच्या नेतृत्वाखालीच घेतले जातात. आधी गुजरात मध्ये आणि आता देशाच्या राजकारणात सक्रिय सहभाग असल्यानं देश कसा चालवायचा? हे शहांना पक्कं ठावूक आहे. आत्ताही अनेक महत्त्वाच्या संवेदनशील विषयांवर सरकारची भूमिका शहाच मांडत असतात. त्यामुळे मोदींना रिप्लेस करण शहांसाठी फारशी जड गोष्ट ठरणार नाही. पंतप्रधान मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, संसदेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत नाहीत. यावरून भाजपवर नेहमीच हल्लाबोल होत आलाय. अशात अमित शहा जर पंतप्रधान झाले तर ते आपल्या आक्रमक राजकारणामुळे सरकारची बाजू खंबीरपणे जनतेसमोर मांडत विरोधकांना डॅमेज करू शकतात. भाजपच्या सत्तेच्या खेळाचे चाणक्य म्हणून अमित शहांची ओळख आहे हे तर आपल्याला माहित आहेच. पण पंतप्रधान म्हणून भारतीय जनता त्यांना कशी स्वीकारेल? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरू शकतं.

पंतप्रधान पदासाठी या यादीतलं दुसरं नाव येतं ते योगी आदित्यनाथ यांचं.

भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी अनेक दिग्गजांना साईडलाईन करत पक्षाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास टाकला.हिंदू धार्मिक क्षेत्रात नाव असणाऱ्या या चेहऱ्याला राजकारणात आणून भाजपने मोठा डाव टाकला. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यापासूनच त्यांनी आपलं सरकार हे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करेल, याची पुरेपूर काळजी घेतली. अनेक कायदे संमत करून, शहरांची नावे बदलून त्यांनी हिंदू जनमानसात स्वतःची अशी एक छबी तयार केली. याच धार्मिक ध्रुवीकरणामुळे भाजपाला याचा मोठा फायदा झाला. हीच मेख ओळखून यंदाच्या लोकसभेच्या प्रचारातही धार्मिक ध्रुवीकरणावर मोदी शहांनी भर दिला. पण त्यांना जनतेने म्हणावा असा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे येत्या काळात हा आपला कट्टर धार्मिक वोटर कायम आपल्या सोबत जोडून घ्यायचा असेल तर यापुढे कडव्या धार्मिक ध्रुवीकरणाचा पर्याय भाजप समोर उरतो. मग यासाठी एकच नाव डोळ्यासमोर येतं ते योगी आदित्यनाथ. पब्लिक मध्ये केलेल्या वक्तव्यांपासून ते विधानसभेत पास केलेल्या कायद्यापर्यंत योगी कसलाही संकोच मनात न ठेवता कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. यामुळे गाय पट्ट्यातून त्यांच्या नावाची मोठी क्रेझ आहे. 2021 पर्यंत काही प्रमाणात थंडं पडलेलं भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला पुन्हा जिवंत ठेवायचं असेल तर मोदींना साईडलाइन करून योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान करण्याचे त्यामुळेच भाजपकडून चान्सेस वाढलेत…

तिसरं नाव येतं ते नितीन गडकरी यांचं

गडकरी हे भाजपच्या वर्तुळातील मोठं नाव. मोदींची सत्ता आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक ज्यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव करतात, असं नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी. गडकरींचं विकासांचं राजकारण बरंच काही बोलून जातं. त्यातही सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध गडकरींना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. त्यामुळे मोदींना पर्याय म्हणून जेव्हा पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याचा विचार केला जातो तेव्हा नितीन गडकरी यांच्या नावाला सर्वात जास्त प्राधान्य मिळू शकतं. गडकरी हे संघाच्या अतिशय जवळचे मानले जात असल्यामुळेच मोदी आणि शहांकडून त्यांचं नेहमी अवमूल्यन करण्यात आलं असा आरोप नेहमी होत असतो. संघाला भाजपवरचा कंट्रोल वाढवायचाय, अशाही चर्चा मागील काही दिवसात पेटल्या होत्या. संघ आणि मोदी शहा यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अशावेळेस सत्तेचा समतोल साधत संघालाही सोबत घेऊन राजकारण करण्याचा करिष्मा केवळ नितीन गडकरीच करू शकतात. हे पक्कं ठावूक असल्यामुळे मोदी आणि शहा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने नागपुरातून गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून झाला. आता या आरोपात किती तथ्य आहे. हा नंतरचा मुद्दा. पण यातून 4 जूननंतर नितीन गडकरी मोदींच्या ऐवजी भारताचे पंतप्रधान झाले. तर आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको…

बाकी नरेंद्र मोदी यांना रिप्लेसमेंट म्हणून तुम्हाला कुणाला पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बघायला आवडेल? अमित शहा, योगी आदित्यनाथ की नितीन गडकरी? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद…

Sangli Alto Car Accident : सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli Alto Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे अल्टो कार कालव्यात कोसळून (Sangli Alto Accident) मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास सदर ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. कॅनॉल मध्ये पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. गाडीचे स्पीड इतकं फास्ट होत कि, कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला आणि कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. मध्यरात्री अपघात झाल्यामुळे त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे या कुटुंबाला मदत सुद्धा मिळाली नाही. या घटनेमुळे परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60, सुजाता राजेंद्र पाटील -वय 55, प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव), ध्रुवा- वय 3 वर्ष , कार्तिकी- वय 1 वर्ष, राजवी- वय 2 वर्ष, जखमी स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष असे सदर अपघात ग्रस्तांची नावे आहेत. हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते. वाढदिवस आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास परत माघारी जाताना हा अपघात झाला. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.

Honor 200, 200 Pro मोबाईल लाँच; 16GB रॅम सह मिळतात भन्नाट फीचर्स

Honor 200, 200 Pro launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने Honor 200 आणि 200 Pro हे दोन्ही स्मार्टफोन चिनी बाजारात लाँच केले आहेत. 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा, 16GB रॅम यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स मोबाईल मध्ये देण्यात आले आहेत. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच कऱण्यात आला असला तरी लवकरच तो भारतीय बाजारपेठेत सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे. आज आपण या दोन्ही स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

Honor 200, 200 Pro चे फीचर्स –

Honor 200 आणि 200 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ रिझोल्यूशन OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील Honor 200 Pro मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आलाय तर Honor 200 मध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आहे. हे दोन्ही मोबाल Android 14 वर आधारित MagicOS 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. या दोन्ही मोबाईल मध्ये 1२ GB आणि 16GB रॅमचा पर्याय दिला आहे.

कॅमेरा –

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor 200 Pro आणि Honor 200 च्या पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे तर 50-मेगापिक्सेल IMX856 टेलिफोटो कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोटो आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 66W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Honor 200 आणि 200 Pro ची किंमत

Honor 200 च्या 12/256GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,699 (अंदाजे 30,926 रुपये) आहे. तर 16/512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,199 (अंदाजे 36,749 रुपये) आहे. तर दुसरीकडे Honor 200 Pro ची किंमत 12/256GB व्हेरिएंटसाठी CNY 3,499 (अंदाजे 40,158 रुपये) आणि 16GB/1TB स्टोरेज प्रकारासाठी CNY 4,499 ($621) आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये 31 मे पासून सुरू होणार आहे.

Weight Loss | वजन कमी करताना फॉलो करा ‘हा’ हाय प्रोटीन डाएट; शरीराला मिळतील सगळे पोषकतत्वे

Weight Loss

Weight Loss | आजकाल वाढते वजन हा अनेक लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे. वजन कमी करताना लोक आहार कमी करतात. परंतु आहार कमी केल्याने आपल्या शरीराला सर्व पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. तसेच आवश्यक पोषण तत्त्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला इतर आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे जर वजन कमी करताना (Weight Loss) आपण भरपूर प्रोटीनचे सेवन करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आपले स्नायू देखील बळकट होतात आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. तसेच आपले वजन देखील नियंत्रणात राहते. आता आपण असे काही पदार्थ पाहणार आहोत, जे खाल्ल्याने तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील आणि तुमच्या शरीरातील पोषकतत्वे देखील कमी होणार नाहीत.

सोयाबीन व्हेज चाट | Weight Loss

सोयाबीन व्हेज चाट बनवण्यासाठी तुम्ही एका भांड्यामध्ये भिजवलेले सोयाबीनचे तिकडे घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा, गाजर, शिमल, हिरवी मिरची, हिरवे धने, दही, काळे मीठ, भाजलेले जिरे आणि चाट मसाला घाला आणि ते सगळे एकत्र करा. आणि तुमच्या आवडीनुसार डाळिंबाचे दाणे घालून तुम्ही ते खाऊ शकता. यामधून खूप चांगले प्रोटीन मिळते आणि तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते.

मूग डाळ चिल्ला

सोललेली मूग डाळ भिजवावी. हिरवी मिरची, हिरवे धणे, आल्याचे तुकडे आणि जिरे सोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर मीठ आणि सेलेरी घाला. तव्यावर अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये चीला बनवा. प्रथिनांनी युक्त हा चीला अतिशय मऊ आणि चवदार बनतो.

काळा हरभरा कोशिंबीर

एका भांड्यात उकडलेले काळे हरभरे घ्या, त्यात भिजवलेले अंकुरलेले हिरवे हरभरे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर आणि बीन्स घाला. चाट मसाला, काळे मीठ आणि लिंबाचा रस घाला. मसालेदार काळ्या हरभरा सॅलडचा आनंद घ्या. प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असलेले हे सॅलड, कमी कॅलरी असलेले पौष्टिक सॅलड आहे, जे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी करणे सोपे करते.

सोया कबाब | Weight Loss

भिजवलेले सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात उकडलेले रताळे घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिरवी धणे, काळी मिरी पावडर, मीठ, जिरेपूड, धने पावडर आणि तिखट मिक्स करून चांगले मॅश करा. कबाब प्रमाणे गोल टिक्की बनवून तव्यावर एक चमचा तुपात शिजवून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा.

चिकूची भाजी सँडविच

उकडलेले चणे बारीक करून घ्या. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, स्वीट कॉर्न, मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घाला. किसलेले गाजर घालून चांगले मिसळा आणि स्प्रेड सारखे तयार करा. हा स्प्रेड मल्टी-ग्रेन मैदा किंवा गव्हाच्या पिठाने बनवलेल्या ब्राऊन ब्रेडवर पसरवा. कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड पानांची व्यवस्था करा आणि दुसरा तुकडा वर ठेवा आणि ग्रिल करा. यानंतर, त्याचे दोन भाग करा आणि प्रोटीनने भरलेल्या कमी कॅलरी सँडविचचा आनंद घ्या.

Gautam Gambhir India Coach : जमलं!! जय शाह यांचे ‘ते’ एक वाक्य आणि गंभीर टीम इंडियाचा कोच होण्यास तयार

Gautam Gambhir India Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्यास (Gautam Gambhir India Coach) तयार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि गौतम गंभीर यांच्यात याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर गंभीरने प्रशिक्षक पदासाठी होकार दिला असलयाचे बोललं जात आहे. गौतम गंभीरला तयार करणं जय शाह यांच्यासाठी सोप्प नक्कीच नव्हतं …. मात्र जय शाह यांनी चर्चेदरम्यान असं एक वाक्य बोललं ज्यामुळे गौतम गंभीर नाही बोलू शकला नाही.

जय शाह- गंभीरमध्ये नेमकी काय चर्चा ? Gautam Gambhir India Coach

रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 च्या फायनलनंतर जय शाह आणि गौतम गंभीर यांच्यात प्रशिक्षक पदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जय शाह गंभीरला म्हणाले, आता आपल्याला देशासाठी हे करायचे आहे. गौतम गंभीर हा त्याच्या देशभक्तीसाठी ओळखला जातो. त्यांनी अनेक प्रसंगी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यामुळेच त्याने जय शाहचे म्हणणे मान्य केले आणि आता तो टीम इंडियात राहुल द्रविडची जागा घेण्यास सज्ज (Gautam Gambhir India Coach) झाला आहे.

दरम्यान, गौतम गंभीर भारताच्या लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. २००७ च्या T20 वर्ल्डकप आणि २०११ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गंभीरनेच दमदार खेळ्या करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक व्हावा अशी . बीसीसीआयची इच्छा होती.

Cleaning Hacks : बाथरूमच्या हट्टी डागांना करा ढिशूsssम ! पांढरा ‘खडा’ करेल मोठी मदत

cleaning hacks

Cleaning Hacks : प्रत्येक गृहिणीला आपले घर स्वच्छ आणि चकाचक असलेले आवडते. म्हणून ती घरातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते. पण बाथरूम टॉयलेट साफ करणे म्हणजे मोठे मेहनतीचे काम ! शिवाय जर अपार्टमेंट मध्ये तुम्ही राहत असाल तर जड पाण्यामुळे केवळ बाथरूम मढी टाईल्सच नव्हे तर नळांवर देतील डाग जमा होतात. मग ही स्वच्छता करण्यासाठी महागडे बाथरूम क्लिनर वापरले तरी हे डाग जात नाहीत. मात्र आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे हे बाथरूम मधील हट्टी डाग (Cleaning Hacks) नाहीसे होतील.

आपल्याला माहितीच असेल तुरटी ही अनेक कारणांकरिता वापरा जाते, पाणी शुद्ध करण्यापासून ते अगदी शेव्हिंग केल्यानंतर सुद्धा तुरटीचा खडा वापरला जातो. हाच तुरटीचा खडा तुम्ही बाथरूम मधील हट्टी डाग काढायला वापरू शकता.

बाथरूम मधील टाइल्सचे हट्टी काढण्यासाठी आपल्याला (Cleaning Hacks) सर्वात आधी तुरटी घ्यायची आहे. दुकानात गेल्यास तुरटीचे मोठे (Cleaning Hacks) खडे आपल्याला मिळतात मात्र हे खडे आपल्याला वापरता येणार नाहीत. आपला उपाय करण्यासाठी तुरटी फोडून त्याची पावडर तयार करून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्या त्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली तुरटीची पावडर घालून चांगलं मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये डिटर्जंट चा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर हे पाणी बाथरूमच्या टाइल्स वर होता काही वेळानंतर ब्रशने टाइल्स घासा आणि पाणी ओतून पुन्हा एकदा बाथरूम स्वच्छ करा हे सर्व डाग निघून जातील.

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी (Cleaning Hacks)

  • आता टॉयलेट मधील डाग घालवण्यासाठी सुद्धा तुरटीचा वापर करू शकता त्यासाठी तुरटीच्या पाण्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट मिसळा.
  • त्यानंतर तयार मिश्रण टॉयलेटच्या डागांवर ओता.
  • दहा मिनिटानंतर क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करा यामुळे टॉयलेट स्वच्छ होईल.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करा हे काम; अन्यथा मिळणार नाही 17 वा हप्ता

kisan yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 16 हप्त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.

परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेले नाही, त्याचा 17 वा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. यासोबतच शेतकऱ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे, रहिवासी दाखला असणेही आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासह शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी होणे अत्यंत गरजेचे आहे.

योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही??

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अटीनुसार, पती किंवा पत्नीपैकी कोणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि त्यावर शेती केली तर अशा शेतकऱ्याला ही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीची मालकी आवश्यक आहे. परंतु , शेतकरी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने घटनात्मक पद भूषवले असेल तर त्याला ही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!! 31 मे रोजी कोकण रेल्वेच्या या मार्गावर मेगाब्लॉक राहणार

Kokan Railway Megablock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे गावी गेलेले कोकणकर पुन्हा कामासाठी शहरात परतत आहेत. अशा चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेकडून येत्या 31 मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येणार आहे. ज्याचा प्रवाशांवर मोठा परिणाम होईल. तसेच, शहरात परतणाऱ्या प्रवाशांचे हाल ही होऊ शकतात.

सध्या पायाभूत कामांसाठी मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे मेगाब्लॉक सुरू आहे. त्याचबरोबर आता, कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते वैभववाडी मार्गावर 31 मे रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. रत्नागिरी- वैभववाडी सुरू असलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 31 मे रोजी सकाळी 9.10 ते सकाळी 11.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते वैभववाडी रोडदरम्यान 80 मिनिटे थांबा घेतला जाईल. यासह गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान 40 मिनिटे थांबा घेईल. पुढे गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी दरम्यान 20 मिनिटे थांबा घेईल. या मेगा ब्लॉकमुळे डाऊन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेससह मुंबईकडे येणाऱ्या अप रेल्वे गाड्यांच्या ही वेळापत्रकात बदल होईल.