Thursday, December 25, 2025
Home Blog Page 727

SBI | SMS आणि Whatsappद्वारे आलेली लिंक क्लिक केल्यास होऊ शकते नुकसान; SBIने ग्राहकांना दिला सतर्कतेचा इशारा

SBI

SBI | आजकाल पैशाबाबत मोठमोठे फ्रॉड व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होत आहे. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना सावधानतेच्या इशारा दिलेला आहे. बँकेकडून येणाऱ्या फ्रॉड फोन आणि एसएमएसपासून सावध राहण्यास एसबीआय बँकेने सांगितलेले आहे. बँकेने( SBI) एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे. मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या काही बनावट लिंकवर क्लिक करण्यास आणि फाइल्स डाऊनलोड करण्यास बँकेने मनाई देखील केलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की, सायबर गुन्हेगार एसबीआय रिवार्ड पॉईंट्स रिडीम करण्यासाठी ग्राहकांना एसएमएस आणि व्हाट्सअप मेसेजमध्ये बनावट लिंक पाठवत आहे. ज्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.

रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याचा सेफ मार्ग | SBI

एसबीआय त्यांच्या ग्राहकांना लॉयल्टी प्रोग्राममध्ये तर रोज जे काही व्यवहार होतात त्यासाठी काही रिवॉर्ड पॉइंट देत असते. बँकेने दिलेल्या प्रत्येक रिवॉर्ड पॉईंटचे मूल्य हे 25 पैसे एवढे असते. एसबीआयच्या नुसार एसबीआय रिवॉर्ड प्रोग्रॅमसाठी ग्राहकांची आपोआप नोंद केली जाते. आता ही नोंदी करण्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सगळ्यात आधी तुम्ही कम्प्युटरच्या स्मार्टफोनवर अधिकृत वेबसाईट चालू करा.
  • त्यानंतर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर तुमचा एसबीआय रिपोर्ट कस्टमर आयडी इंटर करा.
  • त्यानंतर नोंदणी करत मोबाईल क्रमांकवर तुम्हाला ओटीपी येईल.
  • आता तुमचे सगळे पेपर व्हेरिफाय करा.
  • या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही पॉईंट रीडिम करणे सुरू करू शकता.

ऑफलाइन पद्धतीने एसबीआय कार्ड रिपोर्ट कसे रीडिम करायचे | SBI

तुम्ही एसबीआयच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअर नंबर वर कॉल करून देखील ही क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट ऑफलाइन पद्धतीने रीडिम करू शकता. त्यानंतर कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही संपूर्णपणे पॉईंट्समध्ये पैसे देऊ शकता.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी याच ‘त्या’ 35 जागांवर सेफ आहे

mahavikas aghadi

महाविकास आघाडीच्या 35 जागा येणार, असा अंदाज अनेकांनी बांधला. पण याला तेव्हा बळ मिळालं जेव्हा शरद पवारांनी यावर वक्तव्य केलं. महाविकास आघाडीच्या किमान 35 जागा येतील या पवारांच्या दाव्याने मग यावर बरी चर्चा झाली. मतदानाचे टप्पे पुढे सरकत गेले तेव्हा तुतारी, मशाल आणि हाताच्या पंजाला मिळणारा रिस्पॉन्स पाहता स्थानिक पत्रकारांपासून ते सर्वसामान्य जनताही आघाडीला 35 जागा तर मिळतीलच, असं आत्मविश्वासाने बोलू लागलेत. पण महाविकास आघाडीला ज्या 35 जागा आरामात जिंकू असं वाटतंय त्या नेमक्या कोणत्या आहेत? त्यातही तुतारी, मशाल आणि पंजा यापैकी कुणाच्या वाट्याला जास्त सेफ जागा आहेत? तेच पाहू

सुरुवात करूयात ठाकरे गटापासून…

ठाकरेंना जी आपली पहिली जागा सेफ वाटतेय ती जागा आहे यवतमाळ वाशिमची…भावना गवळी यांचे तिकीट कापण, मराठा – कुणबी – मुस्लिम मतांची झालेली एकी आणि बाहेरचा उमेदवार असा लागलेला टॅग या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या पथ्यावर पडल्या होत्या. राजश्री पाटील यांचं स्वतःच राजकीय अस्तित्व नसणं यामुळे सुद्धा इथे मशालच जिंकणार, हे जवळपास फिक्स आहे. ठाकरेंना दुसरा सेफ मतदारसंघ वाटतोय तो धाराशिवचा… ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळे ओमराजे निंबाळकरांना याचा आधीपासूनच अडवांटेज होता. त्यातही भाजप ठाकरेंना घाबरलीय म्हणून अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला पाठवलय, असं नरेटीव ठाकरेंनी बिल्डप केल्यामुळे आणि निंबाळकर यांची मतदारसंघातील ताकद पाहता इथे मशाल वन साईड येईल असं चित्र आहे…ठाकरेंचा तिसरा सेफ मतदारसंघ वाटतोय तो बुलढाण्याचा…ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी इथली लढत झाली. शि प्रतापराव जाधव यांच्या विरोधातली अँटीइनकंबनसी गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन आणि जरांगे फॅक्टरमुळे शिवसेनेकडे झुकलेली मराठा ताकद हे बुलढाण्यात खेडेकरांच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे इथे मशाल जोरात आहे.

ठाकरेंना सेफ वाटणारा चौथा मतदारसंघ हा हिंगोलीचा…ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट अष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत अष्टीकर यांच्या बाजूने सध्या निकाल दिसतोय…ठाकरेंची पाचवी जागा शिर्डीची…इथे सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली. सदाशिवराव लोखंडे यांच्याविरोधातील अँटी इन्कमबन्सी, शिंदेंना साथ दिल्याने तुटलेला शिवसैनिकांचा कनेक्ट आणि वाकचौरे यांनी जुळवून आणलेली जातीची समीकरण यामुळे शिर्डी हा ठाकरेंसाठी सेफ समजला जातोय…सेफ असणारी ठाकरेंची सहावी जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, मुस्लिम आणि मराठा मतांचं ठाकरेंच्या बाजूने झालेलं कन्वर्जन, मतदारसंघातील जुना आणि कट्टर शिवसैनिक यामुळे संदीपान भूमरे आणि इम्तियाज जलील यांच्यापेक्षा चंद्रकांत खैरेच निकालात उजवे ठरतील, हे पहिल्यापासूनच बोललं जात होतं.

ठाकरेंचा सातवा मतदारसंघ हा हातकणंगलेचा…हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली. भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेले संबंध यामुळे माने बॅकफुटला होते.. त्यात जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी दिलेला बॅक सपोर्ट तसेच सत्यजित आबा पाटील यांचा मतदारसंघातील कनेक्ट यामुळे मशाल इथून जिंकून येईल असा ठाकरेंनाही विश्वास वाटतोय…ठाकरेंचा आठवा सेफ मतदारसंघ आहे तो नाशिकचा…नाशिकात प्रचाराला सुरुवात झाल्यापासूनच ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे यांच्या नावाची हवा होती. ग्रामीण भागाला आपलंसं करणार नेतृत्व, साधी राहणीमान यामुळे शिवसैनिकांनी त्यांना उचलून घ्यायचं ठरवलं होतच. त्यात हेमंत गोडसे यांची निष्क्रियता, स्थानिक राजकारणात ढवळाढवळ आणि भुजबळांसारखा नेता नाराज असणं हे सगळंच वाजेंच्या पथ्यावर पडलं. ग्रामीण भागातील वाढलेला मतदानाचा टक्का यामुळे वाजे मशाल आणणार, हे घराघरात बोललं जातंय…ठाकरेंना सेफ वाटणारा नववा मतदारसंघ परभणीचा…महायुतीकडून जानकरांच्या विरोधात ठाकरेंच्या बंडू उर्फ संजय जाधवांनी दंड थोपटले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव परभणीत जास्त दिसला नाही. ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या परभणीचा निकाल हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला. त्यामुळे जेव्हा जानकरांच्या विरोधात लढत झाली तेव्हा इथे बंडू जाधव सहज निवडून येतील, असं चित्र आहे…

ठाकरेंचा दहावा मतदारसंघ मावळचा…मावळात अजित पवार गटाच्या आमदाराने आपला म्हणावा असा प्रचार केला नाही, अशी खंत स्वतः बारणेंनीही व्यक्त केली. वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जातं. थोडक्यात संजोग वाघेरे मावळाच्या राजकारणात ठाकरेंसाठी प्लसमध्ये राहिले…ठाकरेंची अकरावी सेफ जागा ही रत्नागिरी सिंधुदुर्गची…विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी इथं काटे की टक्कर होती. राणेंच्या मदतीला राज ठाकरे धावून आले. केसरकर, सामंत, तेली या सगळ्यांनी राणेंसाठी खिंड लढवली. पण इथे शिवसेना शिंदे गटाची नाराजी, त्यात राणेंच्या उमेदवारीनं काठावरचा शिवसैनिक ठाकरे गटाकडे झुकल्याने इथं विनायक राऊत यांचं पारडं जड आहे, असं सगळेजण बोलू लागलेत…ठाकरेंची बारावी सेफ जागा ठाण्याची ..राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील, असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं. नरेश म्हस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडका वेळ, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश म्हस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होण…या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या…ठाण्यातून शिंदेंचा उमेदवार पडणं ही मात्र ठाकरेंसाठी मोठी नाचक्की असू शकते ..

ठाकरेंची तेरावी सेफ जागा मुंबई उत्तर पश्चिमची…वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ…मात्र इडीने चक्र फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदेंसोबत जावं लागलं… पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगत होते… त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील, हा मोठा प्रश्नच होता. हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर इथून मशाल पेटवणार हे फिक्स होतं. ठाकरेंची चौदावी सेफ जागा ही दक्षिण मुंबईची…राहुल नार्वेकर, मंगलप्रसाद लोढा या भाजप नेत्यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात, यासाठी बराच जोर लावला. पण मराठी विरुद्ध अमराठी, अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार, इडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी, असं बिल्डप केलेल नरेटिव्ह आणि सहानुभूतीची लाट यामुळे अरविंद सावंत यांच्यासाठी इथून विजय सोप्पा समजला जातोय…

ठाकरे यांचा पंधरावी सेफ मतदारसंघ हा मुंबई दक्षिण मध्यचा…दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्त्वाचा फॅक्टर राहिला. शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठ केडर असल्याने इथे देसाई मशाल पेत्वतील, असा ठाकरेंना विश्वास आहे…ठाकरेंसाठी सेफ असणारा सोळावा मतदारसंघ येतो जळगावचा…भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यातील ही लढत. भाजपच्या बाजूने असणाऱ्या जळगावचं वातावरण उन्मेष पाटलांच्या खेळीमुळे ठाकरेंच्या बाजूने फिरले… थेट सांगणं अवघड असलं तरी ठाकरेंची शिवसेना जळगावात मतदानानंतर सेफ झालीय, असं सगळेच जळगावकर सांगतायत…तर या होत्या ठाकरेंच्या 21 पैकी सोळा जागा जिथे ठाकरेंना आपण सहजपणे निवडून येऊ असा विश्वास वाटतोय…

आता वळूयात काँग्रेसकडे…

काँग्रेसला सेफ वाटणारा पहिला मतदारसंघ हा सोलापूरचा…राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी इथली प्रमुख लढत झाली. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, असं चित्र आहे.काँग्रेससाठी यंदा सर्वात सेफ झालेला दुसरा मतदारसंघ होता कोल्हापूरचा. काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी दिल्यापासूनच शिवसेनेचे संजय मंडलिक बॅकफुटला गेले होते. धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांच्या पाठीशी आपली सारी ताकद लावली असली तरी बंटी पाटलांच्या यंत्रणेपुढे तिचा निभाव लागताना दिसला नाही. मान आणि मत दोन्ही गादीलाच… या स्टॅन्डमुळे कोल्हापुरातही यंदा पंजा येतोय, हे क्लिअर आहे.काँग्रेसला सेफ वाटणारी तिसरी जागा नंदुरबारची…हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत अटीतटीची झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात हिना गावित यांच्या विरोधात वातावरण होतं. त्यात काँग्रेसने अनेक सभांचा धडाका लावत फिरवलेलं वातावरण आणि महायुती मध्ये असणारा समन्वयाचा अभाव यामुळे नंदुरबारमध्ये यंदा काँग्रेसच्या बाजूने वारं आहे.

काँग्रेसचे चौथी सेफ जागा ही लातूरचा…सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. देशमुख कुटुंबानं आपली सारी यंत्रणा प्रचारात उतरवल्याने आणि शृंगारे यांच्या विरोधातील जनतेची नाराजी पिकअप करण्यात काळगेंना यश येताना दिसलं. त्यामुळे सध्याच्या राजकारणात भाजपचा गड असणारा लातूर हा काँग्रेसला निकालात सेफ वाटतोय…काँग्रेसला सेफ वाटणारी पाचवी सेफ म्हणजे अकोल्याचा…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. संजय धोत्रे यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीला कंटाळलेले लोक, दलित आणि मुस्लिम समाजाचं काँग्रेसच्या बाजूने असणं आणि काँग्रेसने लावलेली ताकद यामुळे अकोला काँग्रेसला खात्रीशीर वाटतोय…सहावा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. एकूणच हाताचा पंजा इथून लीड घेईल असं मतदान सांगतंय.

काँग्रेससाठीचा सेफ सातवा मतदारसंघ आहे रामटेकचा…शिंदेंनी राजू पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेस मधून आयातवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला. काँग्रेसची दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक विकासाचं नरेटीव रामटेकमध्येही काँग्रेसला 4 तारखेला लीडमध्ये ठेवेल, असं इथलं चित्र आहे.आठवा मतदारसंघ आहे भंडारा – गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी आणि काँग्रेसने लावलेली ताकद पाहता प्रशांत पडोळे जिंकतील, असं बोललं जातंय…काँग्रेससाठीची नववी सेफ जागा आहे. गडचिरोली – चिमूरचा…भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती.

विदर्भातील सर्वात सेफ दहावी जागा आहे चंद्रपूरची…मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्याआलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत लिडमध्ये दिसल्या. त्यामुळे चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर निकालात लीड घेतील हे फिक्स आहे…अकरावा मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबईचा…भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने उत्तर मध्य मधून वर्षा गायकवाड यांचा विजय फिक्स समजला जातोय…तर अशाप्रकारे काँग्रेस लढवत असणाऱ्या 17 जागांपैकी या 11 मतदार संघात आपण आरामात निवडून येऊ असा काँग्रेसला विश्वास वाटतोय…

आता वळूयात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे…

शरद पवारांना आपल्या पक्षाकडून लढवल्या जाणाऱ्या दहा जागांपैकी नेमक्या कुठल्या आठ जागा सेफ वाटतायेत. ते एकदा पाहुयात…. शरद पवारांना पहिला सेफ मतदारसंघ वाटतोय तो बारामतीचा…सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणे यामुळे ताई तुतारी वाजवणार हे फिक्स होतं… अजितदादांनी आव्हान उभं केलं असलं तरी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी… यामुळे बारामतीत तुतारीचा आवाज घुमणार, असं सगळेजण सांगू लागलेत…दुसरा सेफ मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा…प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे नावाची सातारा मतदारसंघात चर्चा होती… उदयनराजेंचा मतदारांशी तुटलेला कनेक्ट, शरद पवारांच्या बाजूने असणार सहानुभूतीच वार आणि शशिकांत शिंदेंचा जनसंपर्क यामुळे साताऱ्यात यंदाही तुतारी फिक्स समजली जातेय…तिसरा सेफ मतदारसंघ आहे तो माढ्याचा…. मोहिते पाटलांनी उडवून दिलेला प्रचाराचा धुराळा आणि शरद पवारांनी घेतलेल्या एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील इथल्या लढतीत प्लसमध्ये राहिले… उत्तमराव जानकर, सुशील कुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथलं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळत करून घेतलं… त्यामुळे माढ्यात तुत्तारी फिक्स असं सगळेच सांगतायत…

पवारांना सेफ वाटणारा चौथा मतदारसंघ आहे तो शिरूरचा… दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणाव असं आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा झाली… शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीच पारड शिरूरमध्ये जड आहे.तुतारीसाठीचा पाचवा मतदारसंघ आहे तो दक्षिण नगरचा…निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार लढत… पैसे वाटण्यापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या… विखेंना पक्षांतर्गतच सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेंवर केलेलं पण विखेंवर बूमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यामुळे लंके नगरमध्ये तुतारी वाजवतील, याची खात्री अनेकांना वाटतेय…पवारांना सेफ वाटणारा सहावा मतदारसंघ आहे तो बीडचा…अत्यंत हायव्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली… मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं पारड शेवटपर्यंत जड दिसलं… त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यात तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा ठरू शकते…

पवारांसाठीचा सातवा सेफ मतदारसंघ आहे तो भिवंडीचा…कपिल पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… हेच जनमानस ओळखून पवारांनी इथून बाळ्यामामा यांना मैदानात उतरवलं… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणार वारं याचा अचूक अंदाज घेतला, तर बाळ्यामामा भिवंडी गाजवणार, असं इथलं वातावरण आहे…पवारांसाठीचा आठवा आणि शेवटचा सेफ मतदारसंघ म्हणजे दिंडोरीचा…भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे अशी इथली लढत झाली. दिंडोरीत मतदान लोकांनी हाती घेतलं होतं. भाजपच्या सत्तेला जनता कंटाळली होती. भगरेंनी केलेला वादळी प्रचार आणि तुतारीच्या बाजूने असणारी सौम्य लाट इथेही भास्कर भगरे यांना विजय मिळवून देईल, असं वातावरण आहे…तर अशा होत्या महाविकास आघाडीला सेफ वाटणाऱ्या या 35 जागा…याची फोड करून पाहिली तर ठाकरेंच्या 21 पैकी 16, काँग्रेसच्या 17 पैकी 11 तर शरद पवारांच्या दहा पैकी तब्बल आठ जागा या सेफमध्ये असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी खरंच महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल असं तुम्हालाही वाटतं का? तुमचा अंदाज काय सांगतोय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Samsung Galaxy F55 5G : सॅमसंगने लाँच केला नवा 5G मोबाईल; 50MP कॅमेरासह मिळतात ‘हे’ फीचर्स

Samsung Galaxy F55 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर Samsung Galaxy F55 5G मोबाईल भारतीय बाजारात लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत नवनवीन बातम्या समोर येत होत्या, अखेर आज मोबाईल बाजारात दाखल झाला असून यामध्ये ग्राहकांना अनेक भन्नाट फीचर्स पाहायला मिळतील. 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण सॅमसंगच्या या नव्या मॉडेलचे खास स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात …..

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy F55 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल एंड्रॉइड 14-बेस्ड ONE UI 6.1 वर काम करतो. सॅमसंगच्या या हँडसेट मध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळत. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, 4G LTE, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कॅमेरा – Samsung Galaxy F55 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy F55 5G मध्ये 50 MP चा प्राथमिक सेन्सर, 5 MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 50 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Samsung Galaxy F55 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू होते. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे. तुम्ही हा मोबाईल आज रात्री 7 पासून Flipkart आणि Samsung India वरून खरेदी करू शकता. तुम्ही जर HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास या मोबाईल खरेदीवर तुम्हाला 2,000रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

Chhaya Kadam : आधी स्टँडिंग ओव्हेशन मग पुरस्कार! कान्स’मध्ये मराठी सिनेमाचा जलवा; छाया कदम म्हणाल्या..

Chhaya Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhaya Kadam) मराठी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. विविध मालिका, चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकतेच ‘मडगाव एक्स्प्रेस’ या सिनेमात त्यांनी साकारलेली कंचन कोमडी आणि ‘लापता लेडीज’मधील मंजू माई प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. छाया कदम यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली आहे. अशातच ‘कान्स’मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला मोठं यश मिळालं. यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

कान्समध्ये भारतीय चित्रपटाचा जलवा

यंदा ७७ वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडला. दरम्यान, २ दिवसांपूर्वी पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला आधी स्टॅण्डिंग ओव्हेशन आणि त्यानंतर मिळालेल्या पुरस्कारामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल ३० वर्षांनंतर कान्समध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाने ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार अत्यंत मानाचा असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Chhaya Kadam) तसेच अनेक कलाकार मंडळी देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून आनंद व्यक्त करत आहेत. अभिनेत्री छाया कदम यांनीसुद्धा ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ने पुरस्कार जिंकल्यावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

छाया कदम यांची पोस्ट (Chhaya Kadam)

मराठी तसेच हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कान्समध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाने ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाट्याला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक – एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते’.



पुढे लिहिलंय, ‘कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहचला आहे. माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार…की, तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहोचली आहे. खूप समाधान – आनंद आणि मन भरून आलं’. (Chhaya Kadam)अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्री छाया कदम यांनी त्यांच्या चाहत्यांसह कलाकार मित्रमंडळींचेसुद्धा आभार मानले आहेत.

आता एकाचवेळी WhatsApp एकूण 4 डिव्हाइसवर वापरता येणार; जाणून घ्या सर्व प्रोसेस

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आतापर्यंत व्हाट्सअप युजर्सला व्हाट्सअप कोणत्याही एका डिव्हाइसवर वापरता येत होते. मात्र आता हेच व्हाट्सअप युजर्सला एकूण चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर एकाच वेळी वापरता येणार आहे. यामुळे फोन बंद असला तरी युजर्सची चॅट आणि डेटा सुरक्षित राहील. तसेच, विविध डिव्हाइसवरून व्हाट्सअप ऑपरेटर करता येईल. याचा फायदा सतत डिव्हाइसवर काम करणाऱ्या व्यक्तींना होईल, असेम्हणले जात आहे.

या 4 डिव्हाइसवर व्हाट्सअप वापरता येईल

युजर्सला एकाचवेळी डेस्कटॉप, स्मार्टवॉच, व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट, टॅब्लेट या डिव्हाइसवर वापरता येणार आहे.

विविध डिव्हाइसवर व्हाट्सअप वापरण्याची पद्धत

Android यूजर्स

  • सर्वात प्रथम फोनवर WhatsApp उघडा आणि सेटिंगमध्ये जावा.
  • “लिंक्ड डिवाइसेस” वर टॅप करून “लिंक डिवाइस” पर्याय निवडा.
  • तुम्हाला जो डिव्हाइस लिंक करायचा आहे तो फोनच्या समोर ठेवा आणि दाखवलेला QR कोड स्कॅन करा.

iPhone यूजर्स

  • अँड्रॉइड फोनसाठी दिलेल्या सूचनेप्रमाणे “लिंक अ डिवाइस” वर जावा.
  • आयफोन ज्या डिव्हाइसशी लिंक करायचा आहे तो समोर ठेवा. आणि QR कोड स्कॅन करा.

डेस्कटॉप यूजर्स

  • तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
  • सेटिंग्जमध्ये जाऊन लिंक्ड डिवाइसेस निवडा.
  • यानंतर ब्राउझरवर WhatsApp उघडा.
  • पुढे एक विंडो QR कोडसह उघडेल. तो कोड फोनने स्कॅन करा. थोडा वेळा डिव्हाइस सिंक वाट पहा.

स्मार्टवॉच यूजर्स:

  • प्रथम Wear OS स्मार्टवॉचवर WhatsApp उघडा.
  • तुमच्या स्क्रीनवर 8 अंकी कोड दिसेल.
  • पुढे तुमचे मुख्य व्हाट्सअप डिव्हाइस घ्या आणि आठ-अंकी कोड एंटर करा.

Latest OTT Releases : जबरदस्त मनोरंजनाचा MAY महिना; शेवटच्या आठवड्यात OTTवर येणार ‘या’ हटके सिरीज अन् सिनेमा

Latest OTT Releases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Latest OTT Releases) गेल्या काही काळात सिनेमा, नाटक यांच्याइतकंच वेब सीरिजचं सुद्धा क्रेझ वाढलं आहे. त्यात घरी बसल्या बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निवांतपणे चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्याचा एक वेगळाच आनंद प्रेक्षकांना मिळत आहे. त्यामुळे दार आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणकोणते सिनेमे किंवा सिरीज येणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकात दिसून येते. मे महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे. या आठवड्यात काही दमदार सिनेमे आणि सिरीज ओटीटीवर येणार आहेत. चला त्याविषयी जाणून घेऊया.

1) पंचायत – 3 (Latest OTT Releases)

‘पंचायत’ या वेब सीरिजचे पहिले २ सीझन तुफान गाजल्यानंतर आता प्रेक्षक तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार असून या सीरिजचा तिसरा सीझन रिलीजसाठी सज्ज झाला आहे. उद्या २८ मे २०२४ रोजी ‘पंचायत ३’ ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर रिलीज होत आहे. फुलेरा गावाची कथा, सरपंच, सचिव आणि बनराकस आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

2) स्वातंत्र्य वीर सावरकर

रणदीप हुड्डा अभिनित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रचंड चर्चेत राहिल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. (Latest OTT Releases) वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा स्वतः मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर उद्या २८ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

3) इल्लीगल – 3

‘इल्लीगल’ या वेब सीरिजच्या २ हिट सिझननंतर आता तिसरा सीझन प्रदर्शित होत आहे. येत्या २९ मे २०२४ रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. (Latest OTT Releases) या सिनेमात नेहा शर्मा, पियुष मिश्रा, अक्षय ओबेरॉय, नील भूपलम आणि सत्यदीप मिश्रा असे अनेक तगडे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

4) डाय हार्ट – 2

डाय हार्ट – २ हा एक कॉमेडी ॲक्शन सिनेमा आहे. ज्यामध्ये केविन हार्ट, नताली एम्युनल आणि जॉन सीना यांसारख्या हॉलीवूड स्टार्सच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा क्लासिक ‘डाय हार्ट’ मालिकेचा पॅरोडी शो आहे. (Latest OTT Releases) यामध्ये केविन हार्टचा प्रवास दाखविण्यात आला असून हा सिनेमा येत्या ३० मे २०२४ रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

5) द गोट लाइफ

द गोट लाइफ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असून नुकताच २६ मे २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. (Latest OTT Releases)

Collard Vegetable : ब्लड शुगर कंट्रोल करायची आहे? तर आहारात ‘या’ भाजीचा समावेश करा

Collard Vegetable

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Collard Vegetable) भारतात मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. मधुमेहींना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत फार काळजी घ्यावी लागते. तसेच बराच वेळ उपाशी राहणे किंवा सतत खाणे अशा सवयी देखील टाळाव्या लागतात. एकंदरच काय तर मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत अत्यंत जागरूक रहावे लागते. आपल्याला आहारात काय खायचे आहे? हे डॉक्टरला विचारल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. कारण, ज्या पदार्थाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढेल अशा अन्नपदार्थांपासून मधुमेहींना लांब राहावे लागतो.

बऱ्याचदा खाण्यापिण्यात अचानक बदल झाला तर मधुमेहींना त्रास होण्याची शक्यता असते. तज्ञ सांगतात की, मधुमेहींच्या आहारात हिरव्या भाज्या असणे अत्यंत गरजेचे आहे. (Collard Vegetable) मेथी, पालक आणि कोथिंबीर अशा देशी तसेच केल आणि कोलार्डसारख्या विदेशी हिरव्या भाज्यासुद्धा मधुमेहींच्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. आज आपण यांपैकी एका विदेशी भाजीविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. ती भाजी म्हणजे कोलार्ड. चला तर जाणून घेऊया हिरव्या भाज्यांपैकी एक कोलार्ड भाजीचे फायदे.

कोलार्ड पालेभाजी (Collard Vegetable)

मधुमेहींच्या आरोग्यासाठी निश्चितच हिरव्या पालेभाज्या चांगल्या आणि महत्वाच्या असतात. त्यात कोलार्ड या विदेशी भाजीचादेखील समावेश आहे. आजकाल कोणत्याही सुपरमार्केटमध्ये ही भाजी सहज उपलब्ध होताना दिसते. ही भाजी मधुमेहींसाठी फार फायदेशीर मानली जाते. कारण या भाजीमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात. तसेच यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे कोलार्ड या हिरव्या भाजीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी थेट वाढत नाही. याचा फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होतो.

आरोग्यदायी कोलार्ड

मुळात, हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते. (Collard Vegetable) त्यामुळे मधुमेहींच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश महत्वाचा मानला जातो. त्यात खास करून कोलार्ड भाजीचे सेवन केल्याने हाडांची आणि दातांची ताकद वाढते. तसेच या भाजीमध्ये व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात असते. ज्याच्या सहाय्याने मेंदू, हाडे आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना विशेष लाभ होतो.

कॅन्सरचा धोका टळतो

कोलार्डमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे या भाजीचे सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्ती चांगली वाढते आणि मजबूत होते. (Collard Vegetable) परिणामी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, असा दावा काही अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.

Elon Musk माणूस नव्हे, तर एलियन आहे; स्वतःच केला दावा

Elon Musk Aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक एलोन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. मंगळावर मानवी जीवन साकारण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. मात्र तत्पूर्वी मस्क यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. आपण माणूस नसून एलियन (Aliens) आहे मात्र लोकांचा यावर विश्वास बसत नाही असं मस्क यांनी म्हंटल आहे. तंत्रज्ञानाच्या स्टार्ट-अप्ससाठी जागतिक शिखर परिषद असलेल्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या व्हिवाटेक इव्हेंटमध्ये त्यांनी हा दावा केला.

या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या सूत्रधाराने त्याला विचारले होते, “काही लोकांचा विश्वास आहे की तू एलियन आहेस? यावर उत्तर देताना मस्क यांनी म्हंटल, होय मी एलियन आहे, मी अनेकदा लोकांना सांगत राहतो की मी माणूस नाही तर एलियन आहे. मी वारंवार सांगूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मस्कने केवळ आपण एलियन असल्याचा दावा केला नाही तर यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचा पुरावाही देण्यास सांगितले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात एलोन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसबाबत सुद्धा इशारा दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस हि माणसासमोर रोबोट पृथ्वीवरील प्रत्येक काम पुसून टाकतील,” असे भाकीत त्यांनी केले. “कदाचित आपल्यापैकी कोणालाच नोकरी नसेल,” तो म्हणाला. ते म्हणाले की भविष्यात रोजगार पर्यायी असेल आणि एआय आणि रोबोट सर्व आवश्यक काम करण्यास सक्षम असल्याने नोकऱ्या हा छंद बनू शकतो. ही लोकांसाठी अधिक तात्कालिक समस्या आहे. “रोबोट पृथ्वीवरील प्रत्येक काम पुसून टाकतील, कदाचित आपल्यापैकी कोणालाच नोकरी नसेल,असे मस्क यांनी म्हंटल. भविष्यात रोजगार पर्यायी असेल आणि एआय आणि रोबोट सर्व आवश्यक काम करण्यास सक्षम असल्याने नोकऱ्या हा छंद बनू शकतो.असा इशाराही एलोन मस्क यांनी दिला आहे.

Palm Oil Benefits : पाम तेल वापरून करा स्मार्ट कुकिंग; आरोग्यालाही होईल भरपूर फायदा

Palm Oil Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Palm Oil Benefits) आपण काय खातो याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे आहाराबाबत जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा पदार्थ फोडणीला घालायचा असेल तर त्यातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तेल. आपल्या आहारात आपण जे तेल वापरतो त्यामुळे आपल्या आरोग्याचे एकतर नुकसान होऊ शकते किंवा नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो. बऱ्याच लोकांचा समज आहे की, पाम तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

पाम तेल हे गुणवत्तेने कमी असल्याचे म्हणत बरेच लोक याचा वापर टाळतात. इतकंच काय तर पाम तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ सुद्धा भेसळयुक्त असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे लोक आपल्या आहारात पाम तेलाचा वापर टाळतात. (Palm Oil Benefits) असे असताना नुकतेच ICMR च्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे की, मध्यम प्रमाणात पाम तेलाचे सेवन केल्यास आरोग्याला बराच फायदा होऊ शकते. खास करून रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पाम तेल उपयुक्त ठरू शकते. याशिवाय पाम तेलाचे इतर काय फायदे आहेत हे देखील तज्ञांनी सांगितले आहेत. ते जाणून घेऊया.

पोषणयुक्त पाम तेल

पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे खराब कोलेस्टेरॉल वाढवू शकते. पण, तेच निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्ससुद्धा वाढवू शकते. शिवाय पाम ऑइलमध्ये अ आणि ई जीवनसत्त्वे असतात. (Palm Oil Benefits) ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते. तसेच पाम तेलात असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्याची ताकद देतात. त्यामुळे पाम तेल बऱ्याच प्रमाणात लाभदायी ठरू शकते. ते कसे हे जाणून घेऊ.

सर्टिफाईड पाम तेल वापरा

तज्ञांनी सांगिल्याप्रमाणे, आपल्या आहारात RSPO (राऊंडटेबल ऑन सस्टेनेबल पाम ऑइल) सर्टिफिकेट असणारे पाम तेल निवडा. (Palm Oil Benefits) उत्पादनावर छापलेले तपशील वाचल्यास तुम्हाला तेलाचा दर्जा समजून येईल.

प्रमाणात करा वापर

इतर खाद्य तेलांप्रमाणेच पाम तेलाचा वापरदेखील प्रमाणात केल्यास आरोग्यास चांगला फायदा होऊ शकतो. (Palm Oil Benefits) कारण सॅच्युरेटेड फॅटचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

आहारातील संतुलन

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने असलेल्या संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पाम तेलाचा वापर करावा. (Palm Oil Benefits) असे केल्यास आहारात संतुलन राहील आणि प्रत्येक घटकाचा आरोग्याला चांगला फायदा मिळेल.

पाम तेलासोबत करा स्मार्ट कुकिंग (Palm Oil Benefits)

पाम तेलाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करताय त्यावर हे तेल हानिकारक ठरणार की आरोग्यदायी ते ठरते. तळणे आणि बेकिंग यांसारख्या कमी उष्णता आवश्यक असलेल्या कुकिंग पद्धतींसाठी पाम तेलचा वापर करता येईल. मात्र, तळण्यासारख्या उच्च- तापमान आवश्यक असणाऱ्या पद्धतींसाठी पाम तेलाचा वापर करणे हानिकारक ठरू शकते. अशावेळी अधिक उष्णता आवश्यक असणाऱ्या पदार्थांमध्ये ऑलिव्ह ऑईल किंवा कॅनोला तेलसारख्या आरोग्यदायी तेलांसोबत पाम तेलाचे मिश्रण करा आणि मग त्याचा वापर करा.

पहिली ते आठवीपर्यंतची शाळा शनिवारची “दप्तरविना” भरणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

School student news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता या विद्यार्थ्यांची नव्या उपक्रमानुसार आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहेत. याची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासूनच होणार आहे. या संबंधित नुकताच आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे . या निर्णयामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकदिवस दप्तर न नेताच शाळेत जाता येणार आहे.

सध्याच्या घडीला शालेय शिक्षण विभाग शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, याची खबरदारी घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ बदलली आहे. त्यामुळे लवकर भरणाऱ्या शाळा सकाळी नऊ वाजता भरणार आहेत. त्याचबरोबर आता आठवड्यातील फक्त पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके धडे देण्यात येणार आहेत. तर शनिवारी दप्तर विना विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाईल.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील दर शनिवारी त्यांच्या आवडीच्या विषयांवर शाळा घेतली जाईल. यात कला, खेळ, ऐतिहासिक किंवा प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाइड, कथा सांगणे असे विविध उपक्रम राबवले जाते. म्हणजेच आठवड्यातील 2 दिवस अभ्यासापासून विश्रांती घेतल्यानंतर मुले पुन्हा सोमवारी शाळेत येतील. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची गोडी वाढेल. तसेच त्यांना अभ्यासाचा अधिक ताण जाणवणार नाही. असा विश्वास शालेय विभागाने व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना भरवली जाईल. हा उपक्रम आनंदी शनिवार या संकल्पनेअंतर्गत राबवला जात आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांचे आवडीचे विषय शिकवले जाते. यात स्काऊट गाइड, कला, खेळ, विविध ठिकाणांना भेट देणे अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल.