Thursday, December 25, 2025
Home Blog Page 733

गुगल मॅपने चालकाला फसवलं अन कार थेट नदीत कोसळली, 4 जण बुडाले

google map car drown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून आपण अनोळखी ठिकाणी सुद्धा आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय पोचतो. गुगल मॅपचा वापर शहर, गाव आणि महानगरात रस्ते शोधण्यासाठी अत्यंत सामान्य झाला आहे. गुगल मॅप जसा आपल्याला रस्ता दाखवते तस तस आपण पुढे पुढे जात असतो. मात्र आता याच गुगल मॅपच्या चुकीमुळे एका पट्ट्याची कार थेट नदीत बुडाली. त्यामुळे गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चांगलाच महागात पडला असं म्हणायला हवं.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दक्षिण केरळातील (Kerala) कुरुप्पनथारा इथं चार पर्यटकांनी एका जागेवरुन दुसरीकडे जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला, हे सर्व प्रवासी हैदराबादवरुन केरळमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्याच वेळी कोट्टायम जिल्ह्यातील कुरुपंथारा भागात शनिवारी सकाळी त्यांची कार नदीत पडली. सदर प्रवासी गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यानुसार पुढे पुढे जात होते. ज्या रस्त्यावरुन ते प्रवास करत होते, त्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचलं होतं. तरीही ते गुगल मॅपच्या विश्वासावरून पुढे पुढे सरकत होते. त्याच वेळी समोर नदी असल्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि कार सहित सर्वजण नदीत बुडाले.

सुरुवातीला रस्त्यावर पाणी जास्त असल्याचं चालकाला वाटलं, पण कार पाण्यात आणखी खोल जाऊ लागल्यानंतर कारमधले सर्वाना आपण बुडत असल्याची जाणीव झाली. यानंतर कारच्या काचा उघडल्या आणि चारही जणांनी खिडकीतून बाहेर पाण्यात उड्या मारल्या. कार नदीत पडल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे काय होऊ शकतो याचा अंदाज मात्र यावेळी पाहायला मिळाला. यापूर्वी सुद्धा गुगल मॅप मधील त्रुटी समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याने दोन डॉक्टरांचा नदीत पडून मृत्यू झाला होता

Ghanchakkar Peak : पर्यटकांना चक्रावणारे शिखर घनचक्कर; जोखमीची पायवाट देईल चित्तथरारक अनुभव

Ghanchakkar Peak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ghanchakkar Peak) महाराष्ट्रात अनेक गड किल्ले सर करण्यासारखे आहेत. जे ट्रेकर्स आणि पर्यटकांना कायम आकर्षून घेतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगा या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर अनुभव देणाऱ्या पर्वत रांगा आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते. ज्याची उंची ही १६४६ मीटर इतकी आहे. तर, सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले घनचक्कर हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. ज्याची चढाई करणे खाऊचे काम नाही. अशा या शिखरांविषयी अधिक माहिती घेऊया.

शिखर घनचक्कर (Ghanchakkar Peak)

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले शिखर घनचक्कर हे शिरपुंजे गावापासून भैरवगड माथा ते खिंडीपासून घनचक्करचा माथा असे आहे. त्यामुळे इथून पुन्हा शिरपुंजे गावात पोहचण्यासाठी जवळपास ५ तास पायपीट करावी लागते. एकूणच हे अंतर ८ किलोमीटर इतके आहे. दरम्यान, घनचक्कर शिखर हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वोच्च शिखर असून या शिखरावर चढाई करण्यासाठी ट्रेकर्स कायम उत्सुक असतात. या शिखराची पायवाट अत्यंत जोखीमीची असल्याने हे शिखर सर करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पर्यटकांपेक्षा जास्त इथे ट्रेकर्स पहायला मिळतात.

जोखमीची पायवाट

घनचक्कर शिखराची पायवाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. (Ghanchakkar Peak) या खिंडीत केवळ एक पाऊल बसेल इतकीच जागा असून एका बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे घनचक्कर शिखर सर करण्याचा अनुभव हा चित्तथरारक आहे. असा हा अनुभव जितका थरारक तितकाच नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी किमान एकदा तरी हे शिखर जरूर सर करावे.

महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर गावलदेव हे उंच शिखर मानले जाते. मुख्य म्हणजे हे शिखर घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे. (Ghanchakkar Peak) तर घनचक्कर हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखरांपैकी क्रमांक तीनचे शिखर आहे. घनचक्कर या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १५०९ मीटर उंच इतकी आहे.

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास गंभीर इच्छुक; मात्र BCCI समोर ठेवली ‘ही’ अट

gautam gambhir indian coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार यावर मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. यामध्ये स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर, गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण अशी नावे सुद्धा स्पर्धेत आहेत. गौतम गंभीरचे नाव यात अग्रेसर मानलं जात होते. आता तर गंभीर (Gautam Gambhir) सुद्धा टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. मात्र जेव्हा त्याची निवड फिक्स मानली जाईल तेव्हाच गंभीर प्रशिक्षक पदासाठी अर्ज करेल. त्यामुळेच त्याने अजून अर्ज दाखल केलेला नाही.

खरं तर भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team) राहुल द्रविड यांचा कार्यकाळ फक्त 2024 च्या T20 विश्वचषकापर्यंत आहे. त्याचवेळी द्रविड पुन्हा या भूमिकेसाठी अर्ज करणार नाही, तर व्हीव्हीएस लक्ष्मणलाही प्रशिक्षक होण्यात रस नसल्याचे समजते. याशिवाय पूर्णवेळ प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा नसल्यामुळे अनेक परदेशी खेळाडू सुद्धा प्रशिक्षक होण्यास इच्छुक नसल्याचे समजत आहे. तर दुसरीकडे गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मात्र आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

गंभीरला बीसीसीआयकडून नियुक्तीचे आश्वासन हवंय –

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरने भारताचा मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली.आणि यासाठी तो कोलकाता नाईट रायडर्स सोडण्यासही तयार आहे. मात्र बीसीसीआय त्याला प्रशिक्षक बनवण्याचे स्पष्ट संकेत देईल तेव्हाच तो प्रशिक्षक पदासाठी अर्ज करेल असं बोललं जात आहे. जो कोणी टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक होईल त्याचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.

Top 10 Cities : Tip Top राहणीमानासाठी देशातील उत्तम शहरे कोणती ? पुण्याचा नंबर कितवा ?

pune mumbai

Top 10 Cities : भारतातील शहरांचा मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. अशातच देशातील अशी काही शहरे आहे जी चांगल्या राहणीमानाची ओळखली जातात. देशातील अशी कोणती शहरे आहेत जी चांगल्या राहणीमानासाठी ओळखली जातात ? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. कारण एका संस्थेच्या अहवालात देशातील अशा शहरांची यादी तयार करण्यात आली आहे जी राहण्यासाठी उत्तम समजली जातात. चला तर मग जाणून घेउया…

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या संस्थेने उत्तम राहणीमानासाठी अर्थातच लिविंग स्टॅंडर्डच्या बाबतीत चांगल्या अशा जगभरातील टॉप 1000 शहरांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शहराचा देखील समावेश आहे.या संस्थेने अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, राहणीमान, पर्यावरण आणि प्रशासन व्यवस्थेसाठी चांगल्या असलेल्या शहरांची यादी जाहीर केली.आजच्या लेखात आपण Top 10 मध्ये कोणती शहरे येतात ते पाहणार आहोत.

टॉप 10 यादीतील शहरे

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स कडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये देशाची राजधानी दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. म्हणजेच स्टॅंडर्ड ऑफ लिविंग च्या बाबतीत दिल्ली हे सर्वात पहिल्या क्रमांकाचे शहर बनले आहे. तर दुसरा क्रमांक लागतो हा कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूचा. तर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे तो म्हणजे आपल्या मुंबईने. चांगलं राहणीमानाच्या बाबतीत मुंबईचा क्रमांक तिसरा लागतो.

यादीत पुण्याचे स्थान काय ?

आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्याचा नंबर कितवा आहे? तर ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये पुणे हे सातव्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. तर पुण्याच्या आधी चेन्नई कोची आणि कलकत्ता यांचा अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक लागतो आणि त्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा सातवा क्रमांक लागतो.

पुणे शहरानंतर आठवा क्रमांक हा त्रिशूलचा आहे तर त्यानंतर हैदराबाद आणि कोझिको यांचा नंबर अनुक्रमे नवा आणि धावा आहे. पण जर 1000 शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानीचा क्रमांक पाहायला गेला तर तो 350 वा क्रमांक आहे तर मुंबई ही 427 व्या क्रमांकावर आली आहे तर पुणे हे 534 व्या स्थानी आहे.

New Rules From 1 st June | 1 जूनपासून बदलणार हे नवीन नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार अतिरिक्त भार

New Rules From 1 st June

New Rules From 1 st June | मे महिना संपण्यास अगदी काहीच दिवस राहिलेले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होत असतात. जून महिन्यातही पैशाच्या संबंधित अनेक नियम बदलतात. आता 1 जून 2024 पासून कोणत्या नवीन आर्थिक नियम लागू होणार आहेत? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत | New Rules From 1 st June

तेल विपणन कंपनी दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती अपडेट करत असतात. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यवसाय सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. परंतु आता गॅस सिलेंडरच्या आणि व्यवसाय सिलेंडरच्या किंमती या 1 जून 2024 रोजी अपडेट केल्या जाणार आहेत.

बँकांना सुट्टी

आरबीआयने जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्ट नुसार बँका जूनमध्ये 8 दिवस बंद राहणार आहेत. रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसह यात समावेश आहे. त्याचप्रमाणे ईद यांसारख्या इतर सुट्ट्यांमुळे जूनमध्ये बँका आठ दिवस बंद राहणार आहे.

वाहतूक नियमांमध्ये बदल

1 जून 2024 पासून वाहतूक नियमांमध्ये देखील मोठ्या बदल होणार आहे. नवीन ड्रायव्हिंग लायसनचे नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. या नियमांचे जर कोणी उलंघन केले, तर त्याला दंड भरावा लागतो. एखाद्या व्यक्तीने जर अति वेगाने गाडी चालवली, तर त्याला एक हजार ते दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच लायसन शिवाय गाडी चालवली तर पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. हेल्मेट आणि सीट बेल्ट न लावता गाडी चालवली तर त्याला शंभर रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

आधार कार्ड अपडेट | New Rules From 1 st June

UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जून पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकता. तसेच ऑफलाइन अपडेटसाठी म्हणजेच आधार केंद्रावर जाण्यासाठी प्रति अपडेट पन्नास रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास 50 हजार रुपये दंड

भारतामध्ये ड्रायव्हिंग करण्याचे वय हे अठरा वर्षे आहे. 18 वर्षाखालील एखाद्या व्यक्तीने जर गाडी चालवली, तर त्याला मोठा दंड आकारला जाणार आहे. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळतात. त्याला 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे.

महाराष्ट्रातील याठिकाणी आहे “बटरफ्लाय बीच”; ज्याच्यासमोर अख्खा गोवा पडतो फिका

Butterfly Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गोव्याची ओळखच त्यांच्याकडे असलेल्या बिचेसमुळे आहे. महाराष्ट्रातील पर्यटन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला भेट देण्यासाठी जात असतात. अनेकजण तर फक्त गोव्यामध्ये असलेले बीच पाहण्यासाठी जातात. परंतु, गोव्यावर ही भारी पडेल असे एक बीच महाराष्ट्रमध्ये आहेत. या बीचला भेट देण्यासाठी लोक लांबून येतात. खास म्हणजे, या बीचला बटरफ्लाय बीच म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही या बीचला भेट देण्याचा प्लॅन नक्की करू शकतो.

कोकणातील सौंदर्य आणि तेथील खाद्य संस्कृतीविषयी आजवर आपण ऐकतच आहोत. याचं कोकणातील कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठे देवस्थान आहे. या कशेळी गावाला सुंदर असा समुद्रकिनारा ही लाभला आहे. याचं किनार्‍यावरील कड्यावर सुमारे 15 फूट उंचीवर, 40 चौ. फुटांची एक नैसर्गिक गुहा आहे. या गुहांमध्ये गावकऱ्यांना कनकादित्याची मूर्ती सापडली होती. पुढे या मूर्तीसाठी त्यांनी मोठे देऊळ उभारले. हेच देऊळ कोकणवासीयांचे श्रद्धास्थान आहे.

सर्वात खास गोष्ट म्हणजे, कशेळी गावातच देवघळी बीच आहे. या बीचला कशेळी बीच (Kasheli Beach) आणि बटरफ्लाय बीच (Butterfly Beach) देखील म्हटले जाते. या बीचपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना सर्वात अगोदर डोंगर उतरून समुद्र किनाऱ्यावर पोहोचावे लागते. कारण की, हा समुद्रकिनारा दोन डोंगरांच्या कपारीमध्ये आहे. याठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लांबपर्यंत फक्त समुद्र दिसतो. यासह तुम्हाला बटरफ्लाय बीच ही पाहता येते. या बिचचा आकारात बटरफ्लायसारखा असल्यामुळे त्याला बटरफ्लाय असे म्हटले जाते.

कशेळी बीच गोव्यातील अतिशय सुंदर आणि नितळ समुद्र किनारा आहे. सध्या याच बीचवरील सनसेट पॉईंटला टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून पर्यटकांकडून पसंती मिळत आहे. या पॉईंटवर गेल्यानंतर निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य पहायला मिळते. हे दृश्य पाहून आपल्याला गोव्यातील समुद्रकिनारेही फिके वाटतात.

Electric Spoon | बाजारात आलाय नवीन इलेक्ट्रिक चमचा, जेवताना आरोग्याला होतात ‘हे’ फायदे

Electric Spoon

Electric Spoon | आजकाल इलेक्ट्रिक कुकर आणि ब्रश सारखी उपकरणे बाजारात खूप लोकप्रिय होत आहेत. पण आता विजेचे चमचेही आले आहेत. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. जपानी पेय उत्पादन कंपनी होल्डिंग्स इलेक्ट्रिक चमचे विकण्यास सुरुवात करणार आहे. संशोधकांचा दावा आहे की, ते सोडियमशिवाय मीठाची चव टिकवून ठेवेल, तसेच हे निरोगी खाण्यास प्रोत्साहन देईल. हे उत्पादन सोमवारी लाँच करण्यात आले आहे. त्याला गेल्या वर्षी Ig नोबेल पारितोषिक मिळाले होते.

किरिन कंपनी (Electric Spoon) या महिन्यात केवळ 200 इलेक्ट्रिक सॉल्ट चमचे ऑनलाइन 19,800 येन (सुमारे 10,520 रुपये) मध्ये विकणार आहे. काही चमचे जूनमध्ये विकले जातील. परंतु पुढील पाच वर्षांत 1 दशलक्ष ग्राहकांना त्यांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील वर्षापासून परदेशात चमचे विकले जातील. प्लास्टिक आणि धातूपासून बनवलेला हा चमचा मीजी विद्यापीठातील प्राध्यापक होमी मियाशिता यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. याआधी प्रोटोटाइपने इलेक्ट्रिक चॉपस्टिक्समध्ये चव वाढवणारे प्रभाव दाखवले आहेत.

हा चमचा (Electric Spoon) अन्नातील खारटपणा वाढविण्यास मदत करतो. हे जिभेवर कमकुवत विद्युत क्षेत्र पाठवते. तर किरीन नावाची ही कंपनी बिअरचा व्यवसाय करत आहे. पण आता हेल्थकेअर प्रॉडक्ट्स बनवण्यावर भर देत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जपानमध्ये या तंत्रज्ञानाला खूप महत्त्व आहे. कारण येथील प्रौढ लोक दररोज सरासरी 10 ग्रॅम मीठ वापरतात. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले मीठाचे प्रमाण, हे त्याच्या दुप्पट आहे. जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन हे रक्तदाब वाढणे, पक्षाघात आणि इतर आजारांशी निगडीत आहे.

किरिन येथे काम करणारे संशोधक आय सातो म्हणतात, ‘जपानमध्ये खाद्यसंस्कृती आहे. ज्यामध्ये खारट चवीला प्राधान्य दिले जाते. जपानी लोकांना एकूणच मिठाचे सेवन कमी करण्याची गरज आहे, परंतु आपल्याला जे खाण्याची सवय आहे त्यापासून दूर जाणे कठीण होऊ शकते. यामुळेच आम्हाला हा विद्युत चमचा विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. हा 60 ग्रॅम चमचा रिचार्ज करण्यायोग्य लिथियम बॅटरीद्वारे समर्थित आहे.

Viral Video | बाप रे ! मगरीच्या तलावात चिमुकल्याने मारली उडी ; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Viral Video

Viral Video | आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्राण्यांची संबंधित अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. पाळीव प्राण्यांशी मस्ती वन्यप्राणी हे सगळे पाहून अनेकदा लोकांच्या मनोरंजन होते. परंतु अनेकवेळा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल.

मगरी (Viral Video) हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. त्याची भीती एवढी असते की, सिंहासमोर आल्यावर त्याचीही प्रकृती बिघडते. कारण मगरीची पकड अतिशय धोकादायक असते. एकदा धरलं की तोंडातून बाहेर पडण्याची शक्यता नसते. एवढ्या पातळीचा हा धोकादायक शिकारी आहे की तो त्याचे तुकडे करून त्याची पाण्यात विल्हेवाट लावतो, परंतु आजकाल एक लहान मूल या मगरींसोबत खेळताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगरींनी भरलेला तलाव दिसत आहे. इथे इतक्या मगरी आहेत की त्यांना बघून कोणाचीही अवस्था बिघडू शकते. पण याच वेळी एक मूल येते आणि काहीही विचार न करता तो तलावात उडी मारतो आणि ते मूल मगरीच्या बाळांमध्ये पोहत होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे इथे मुलाला जराही भीती वाटत नाही आणि तो आनंदाने पोहताना दिसत आहे.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @puranumawat76 नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत हजारो लोकांनी ती पाहिली आहे आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले- हे काम खूप धोकादायक आहे भाऊ. तर दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही तुमचा जीव धोक्यात का टाकता?’

Mumbai Local : रविवारी बाहेर पडण्याआधी आवश्य पहा रेल्वेचे वेळापत्रक; मध्य ,पश्चिम मार्गावर ‘मेगाब्लॉक’

Mumbai Mega block

Mumbai Local : मुंबईकरांसाठी लोकल खूप महत्वाची आहे. जर रविवारी तुम्ही कुठे सुट्टीनिमित्त लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्याकरिता हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही गाड्या उशिरा तर काही गाड्या रद्द (Mumbai Local) करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे मार्ग (Mumbai Local)

  • हा मेगाब्लॉक माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • हा मेगाब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे.
  • मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणारी आणि सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • त्यामुळे या लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत.

पश्चिम

  • पश्चिम मार्गावरील बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • हा मेगाब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
  • अंधेरी आणि बोरिवली लोकलला हार्बर मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच बोरिवली फलाट क्रमांक 1 ते 4 वरून (Mumbai Local) धावेल.

हार्बर (Mumbai Local)

  • सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
  • हा मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  • मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सीएसएमटी – वांद्र,गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
  • पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास (Mumbai Local) करता येणार आहे.

गर्डरच्या उबारणीचा परिणाम (Mumbai Local)

  • पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणीसाठी शनिवारी रात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असल्याने अनेक लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
  • रात्री 11.49 ची विरार – चर्चगेट, रात्री 12.05ची विरार – चर्चगेट, रात्री 12.30 ची बोरिवली – चर्चगेट, रात्री 12.10 ची बोरिवली – चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत तर पहाटे 4.15 ची विरार आणि 4.18 ची बोरिवली मुंबई सेंट्रलवरून सुटेल. रात्री 11.30 ची विरार – चर्चगेट शेवटची (Mumbai Local) लोकल असेल.

Redmi A3x : Redmi ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत 6000 पेक्षा कमी

Redmi A3x launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Redmi चे स्मार्टफोन बाजारात चांगलेच प्रसिद्ध आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत रेडमीचा मोबाईल स्वस्त आणि खिशाला परवडणारा असल्याने रेडमीचा ग्राहकवर्ग सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आताही कंपनीने गरिबाला परवडेल अशा किमतीत एक नवीन मोबाईल मार्केटमध्ये आणला आहे. Redmi A3x असे या मोबाईलचे नाव असून सध्या हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आलाय. आज आपण रेडमीच्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात …..

6.71 इंचाचा डिस्प्ले –

Redmi A3x मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.71 इंचाचा IPS LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल वापरत असताना या डिस्प्लेचा डोळ्यांवर कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून यामध्ये DC डिमिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे सिक्युरिटी साठी स्मार्टफोनच्या पुढील आणि मागील बाजूला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये Unisoc T603 प्रोसेसर बसवला असून Android 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा मोबाईल काम करतो.

कॅमेरा – Redmi A3x

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi A3x मध्ये 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल मध्ये 3 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मिळतेय. अन्य फीचर्स बाबत बोलायचं झाल्यास, यामध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरयांसारखी वैशिष्टये मिळतात.

किंमत किती?

Redmi A3x स्मार्टफोन 3GB RAM + 64GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतो. या मोबाईलची किंमत 18,999 PKR (भारतीय चलनानुसार अंदाजे 5,500 रुपये) आहे. रेडमीचा हा मोबाईल लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा मोबाईल ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि मूनलाईट व्हाइट रंगांमध्ये खरेदी करता येईल.