हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जेव्हा जेव्हा गुंतवणुकीबाबत बोलले जाते तेव्हा अनेकजण SIP करण्याचा सल्ला देतात. SIP म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. या अंतर्गत तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून पुढे भरघोस रक्कम मिळवू शकता. परंतु त्याकरिता काही खास टिप्स वापरण्याची आवश्यकता आहे. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी कालावधीत जास्त परतावा मिळेल.
1) फंड हिस्ट्री – कधीही कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची फंड हिस्ट्री चेक करा. तुम्हाला जर त्यात दीर्घ कालावधीपासून चांगली कामगिरी दिसून आली तर गुंतवणुकीचा निर्णय घ्या. त्याशिवाय कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नका.
2) एक्सपेंस रेशियो – ज्या म्युच्युअल फंडाचा एक्सपेंस रेशियो कमी आहे. अशाच फंडामध्ये गुंतवणूक करत चला. कारण की, गुंतवणूक करत असताना म्युच्युअल फंडाकडून आकारले शुल्क पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.
3) फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड – कधीही गुंतवणुकी पूर्वी फंड मॅनेजरचा अनुभव आणि कौशल्य पहा. तसेच फंड मॅनेजरचे ट्रॅक रेकॉर्ड देखील चेक करा. यातून तुम्हाला समोरील व्यक्तीवर विश्वास किती ठेवायचा याबाबत कल्पना येईल.
4) शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक – कोणत्याही गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित नियोजन करा. कारण दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे केल्यामुळे खूप कमी वेळा नुकसानाला सामोरे जावे लागते.
5) आर्थिक उद्दिष्टे ठरवा – SIP करताना सर्वात अगोदर तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. कमी कालावधीमध्ये जास्त नफा कसा मिळवता येईल यावर अधिक भर द्या.
6) योग्य फंड निवडा – कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करत असताना जोखीम घ्यायची तयारी ठेवा. तसेच तुम्ही निवडलेला फंड योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण अनेकवेळा फंडाच्या नावावर लोकांची फसवणूक केली जाते.
7) SIP ची रक्कम वाढवा – SIP ची रक्कम वाढवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. असे केल्यामुळे कमी कालावधीत अधिक निधी निर्माण होईल. रक्कम कमी निवडल्यानंतर तुम्हाला वेळही तितकाच द्यावा लागेल
SSC Result 2024 Date | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु अखेर पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही परीक्षा संपलेली आहे. आणि आता 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
काही दिवसांपूर्वी सीबीएससीने दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील निकाल पाहण्याची सगळ्यांना आतुरता लागली होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर एका आठवड्यात दहावीचा निकाल लागतो. त्यामुळे सगळेच प्रतीक्षेत होते. या वर्षी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढलेली आहे 2023- 24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता त्यांचा निकाल लागणार आहे
दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर कोकण आणि लातूर विभागामार्फत घेण्यात आलेली होती. आता या विभागाकडून उत्तर पत्रिका तपासणी आणि निकाल तयार करण्याचे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.
Wedding Insurance policy| भारतामध्ये लग्न समारंभ मोठ्या थाटामाटा साजरी केले जातात. या लग्नासाठी सलग चार-पाच दिवस मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांवर लाखो रुपये ही खर्च केले जातात. मात्र काही कारणांमुळे हे लग्न रद्द झाले किंवा पुढे ढकलण्यात आले तर दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ती बाब लक्षात घेऊन आज काल अनेकजण लग्न सोहळाचाही विमा करतात. या विम्यामुळे लग्नात खर्च झालेले सर्व पैसे पुन्हा मिळून जातात. तसेच कोणतेही आर्थिक नुकसान होण्याची भीती उरत नाही. आज आपण याच विम्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)च्या डेटानुसार, या वर्षी देशभरात सुमारे 35 लाख विवाह होणार आहेत. ज्यामध्ये अंदाजे 4.25 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ग्लोबल वेडिंग सर्व्हिसेस मार्केटच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये विवाह सोहळ्यांवरील खर्च 60.5 अब्ज डॉलर होता. जो 2030 पर्यंत 414.2 बिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. परंतु बऱ्याच वेळा अशा मोठ्या समारंभांमध्ये एका चुकीमुळे अघटित घटना घडतात. ज्यात लग्न रद्द करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्फोट होणे, नैसर्गिक आपत्ती येणे अशा गोष्टींचा समावेश असतो.
वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीची माहिती (Wedding Insurance policy)
एखाद्या लग्नकार्यात अशी कोणती घटना घडली तर त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. यालाच पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी आता वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीसारख्या योजना आणल्या आहेत. या पॉलिसी संरक्षक कवच म्हणून करतात. त्याचा प्रीमियम प्रत्येक इव्हेंटच्या आधारावर ठरवला जातो. कोणत्याही कारणास्तव लग्न रद्द झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तारीख बदलली गेली तर हॉटेल आणि वाहतूक बुकिंगसह इतर ज्या ज्या गोष्टींवर खर्च करण्यात आला आहे, त्या खर्चाची विमा कंपनी भरपाई देते.
विम्याचे काही नियम आणि अटी
वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ॲड-ऑन आणि रायडर्सचीही सुविधा आहे. ज्याअंतर्गत लग्नाच्या ठिकाणी जात असताना वाटेमध्येच काही अनुचित प्रकार घडला तर त्यावेळी रायडर्स तेथे मदत करू शकतात. मात्र, प्रत्येक विम्याचे काही नियम, अटी आणि कायदे असतात. उदाहरणार्थ, कोणत्याही जन्मजात आजारामुळे, अपहरणामुळे किंवा आत्महत्यामुळे मृत्यू झाला तर विमा कंपनी त्याची जबाबदारी घेत नाही. यासह दहशतवादी हल्ला किंवा अनैसर्गिक इजा झाल्यास विमा वैध राहत नाही.
कोणत्या कंपन्या हा विमा देते??
सध्या अनेक कंपन्या ही विमा पॉलिसी देत आहेत. ज्यात बजाज अलियान्झ, आयसीआयसीआय लोम्बार्ड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे.
7 Th Pay Commision | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ केली होती. 1 जून पासून कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे आता त्यांच्या मूळ वेतनात देखील भर पडणार आहे. 2024 पासून मिळणाऱ्या महागाई भत्ता (7 Th Pay Commision) कर्मचाऱ्यांसाठी शून्यातून मोजला जाणार आहे. किंबहुना महागाई भत्ता 50% झाला तरी, तो शून्यातून मोजला जाईल. अशी तरतूद पाचव्या वेतन आयोगात देखील करण्यात आलेली आहे.
जानेवारी ते जुन्यादरम्यान हे एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे आकडेवारी निश्चित देखील केली जाणार आहे. जानेवारी महिन्याचा एआयसीपीआयचा आकडा फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार महागाई भत्त्यात एक टक्क्यांनी वाढ देखील करण्यात आली होती. म्हणजे हा महागाई भत्ता 50 टक्केपर्यंत झाला होता. परंतु फेब्रुवारी महिन्याचा एआयसीपीआय निर्देशकांचा आकडा अजूनही जाहीर केलेला नाही.
सातवा वेतन आयोग लागू करताना शून्य भत्ता | 7 Th Pay Commision
याआधी सरकारने 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्यानुसार महागाई भत्ता शून्यावर आणला होता. परंतु महागाई 50% पर्यंत पोहोचतो. पुन्हा एकदा शून्यावर आणला जाईल आणि 50% नुसार जे पैसे असतील. ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडले जाईल. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 30000 रुपये असेल आणि 50% महागाई भत्ता नुसार त्याला 15000 रुपये मिळतील. हा महागाई भत्ता त्याच्या मूळ वेतनाशी जोडला जाईल म्हणजेच त्या व्यक्तीचा पगार हा 45 हजार रुपये करण्यात येईल.
डीए वाढ कधी होणार ?
तज्ञांच्या मते महागाई भत्त्याची गणना जुलैमध्ये केली जाऊ शकते. वर्षातून दोन वेळा महागाई भत्यात वाढ केली जाते. जानेवारी महागाई व त्याची मंजुरी मार्चमध्ये देण्यात आली आहे. तसेच पुढील सुधारणा जुलै 2024 मध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयुष्यात वादळ आलं असल्याच्या चर्चा आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्यातील नात्यात काही आलबेल नसल्याचे बोललं जात आहे. हार्दिक आणि नताशा वेगळे होणार (hardik pandya natasha split) असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आधीच आयपीएल मधील वाईट कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रॉल केलं जात होते, त्यातच आता खासगी जीवनात सुद्धा त्याला अडचणींना सामोरं जावं लागू शकते. जर हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट झाला तर हार्दिकला आपल्या संपत्तीचा तब्बल ७० % वाटा नताशाला द्यावा लागेल असं बोललं जातंय.
का सुरु झाल्यात अफवा?
हार्दिक पांड्या आणि त्याची सर्बियन पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील नात्यात सर्व काही ठीक नसल्याच्या अफवा सुरु व्हायला काही कारणेही आहेत. याला पहिले कारण ठरले ते म्हणजे नताशाने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून ‘पंड्या’ हे आडनाव काढून टाकले आहे. एवढच नव्हे तर यापूर्वी प्रत्येक सामन्यात नताशा हार्दिकला चिअर करायला स्टेडियममध्ये यायची, मात्र यंदाच्या आयपीएल मध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असूनही नताशा एकही सामन्यात स्टेडियममध्ये दिसली नाही. त्यामुळेच हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटस्फोट झाल्यास हार्दिक होणार कंगाल?
अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, अशीही अफवा आहे की नताशा सोबत घटस्फोट झाल्यास हार्दिक पांड्या कंगाल होऊ शकतो, कारण त्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागेल असेही म्हटले जात आहे. अशाही चर्चा आहेत कि इतका सगळा पैसे उभारण्यासाठी हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचे ठरवलं.. मात्र या सर्व चर्चेत किती तथ्य आहे ते सांगता येत नाही. हार्दिक आणि नताशा यांचे लग्न मे 2020 मध्ये झाले आणि त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.
IRCTC : भारत म्हणजे संस्कृती आणि परंपरा जपणारा देश …! भारतातील लोक आपल्या धर्मीक श्रद्धेसाठी सुद्धा ओळखले जातात. भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना अनेक लोक दरवर्षी भेटी देतात. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे अनेकजण आपल्या पूर्ण कुटुंबासह धार्मिक ठिकांणांच्या सफारीला निघतात. आज आम्ही तुम्हाला एक खास धार्मिक सफरीबद्दल सांगणार आहोत. भारतीय रेल्वेने (IRCTC) भाविकांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारत गौरव विशेष ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.
या पॅकेज अंतर्गत सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर अशा 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन (IRCTC) घेता येणार आहे.
भारतीय रेल्वेचा हा दौरा राजस्थानची राजधानी जयपूर येथून सुरू होणार आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 1 जून 2024 रोजी जयपूर येथून 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी सुरू होईल.
हे पॅकेज 10 रात्री आणि 11 दिवसांसाठी असेल. जयपूर रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, प्रवासी अजमेर, भिलवाडा, चित्तोडगड आणि उदयपूर स्थानकांवरून चढू/डिबोर्ड करू शकतील.
कुठे कुठे जाल ?
वेरावळ : सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर द्वारका: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि द्वारकाधीश मंदिर पुणे : भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर औरंगाबाद : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर उज्जैन: महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
काय आहे पॅकेजची किंमत ?
टूर पॅकेजचे दर प्रवाशाने निवडलेल्या पर्यायानुसार असतील. पॅकेज 26,630 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. जर तुम्हाला कॅम्फोर्ट क्लास मधून प्रवास करायचा असेल तर दोघा /तिघांकरिता जागेसाठी प्रति व्यक्ती खर्च २६,६३० रुपये आहे. तर स्टँडर्ड क्लास मध्ये , डबल ट्रिपल सीट करीता प्रति व्यक्ती खर्च 31,500 रुपये येतो.
कसे कराल बुकिंग ?
IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात. पॅकेजशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही 8595930996/ 8595930998/ 8595930997/ 9001094705 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चर्चा होती ती मशाल आणि तुतारीची… आपल्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि दिग्गज नेत्यांना सोबत घेत दुसरी चूल मांडल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. सगळं गेलं असलं तरी जनमत आमच्या बाजूने आहे, हे ठासून सांगण्याची संधी लोकसभेच्या निमित्ताने समोर आली… ठाकरेही शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या दरबारातच लागेल, असं सांगत राहिले.. आणि तेच टारगेट डोक्यात ठेवत लोकसभेला भली मोठी फील्डिंग लावली. तब्बल महाविकास आघाडीच्या गोटातून 21 जागा पदरात पाडत यातले बहुतांश उमेदवार दिल्लीत खासदार दिसतील. अशी परिस्थिती मतदानानंतर समोर दिसतेय… म्हणूनच ठाकरेंच्या या 21 शिलेदारांपैकी लोकसभेचं मैदान सर करत दिल्ली कोण गाठतंय? कुठल्या मतदारसंघातून कुणाचा गेम करून हे उमेदवार खासदार बनतायत? त्याचाच सविस्तर निकाल तुम्हाला सांगतोय…
पहिल्यांदा पाहुयात कोकणात काय घडतंय ते…
पहिला मतदारसंघ आहे तो रायगडचा…
इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली… कागदावरचं गणित पाहिलं तर तशी तटकरेंसाठी ही तशी एकहाती लढत होती. पण मशालीला मविआच्या घटक पक्षांनी दिलेल्या मजबूत हातांनी वारं फिरलं. त्यात शेकापने गीतेंसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. कदम पितापुत्र यांनी रत्नागिरीमधून तर भरत शेठ गोगावले यांनी महाड, पेण मधून ताकद लावल्याने आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल, असं सध्यातरी दिसतंय. त्यातल्या त्यात सुनील तटकरे यांचा निसटत्या लीडने रायगडमधून विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय…
दुसरा मतदारसंघ येतो तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा…
इथून ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध भाजपकडून नारायण राणे अशी काटे की टक्कर होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने ठाकरे गटासोबत होणारी थेट लढत बहुतांश ठिकाणी टाळली. पण नारायण राणेंसारखा खमक्या नेता असल्याने आणि सोबत शिंदे गटातील सामंत बंधू यांनी मदतीचा शब्द दिल्याने इथून ठाकरे गट बॅकफुटला गेला. स्वतः राणेंच्या मदतीला राज ठाकरेही धावून आले. केसरकर, सामंत, तेली या सगळ्यांनी राणेंसाठी खिंड लढवली. तर दुसऱ्या बाजूला मविआचे नेते राऊतांच्या पाठीशी ताकद लावून होते. सहानुभूतीचा फॅक्टर इथेही महत्त्वाचा राहिला. मतदान घासून झालं असलं तरी विनायक राऊत इथून आघाडी घेतील, असं आता बोललं जाऊ लागलंय…
तिसरा मतदारसंघ आहे कल्याणचा…
सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिंदेच्या विरोधात ठाकरे टफ उमेदवार देतील अशी शक्यता होती. पण माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवत ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना फ्री हिट दिलीय अशी मतदारसंघात चर्चा होती. पण प्रचारात दरेकरांनी घेतलेली आघाडी, भाजपच्या अंतर्गत नाराजीचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध फुटीर हे मुद्दे फ्रंटला असल्याने दरेकर या रेसमध्ये आल्या.. मात्र श्रीकांत शिंदे अगदी निसटत्या लीडने कशीबशी कल्याणची जागा राखतील. अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे…
चौथा मतदारसंघ आहे ठाण्याचा…
ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील, असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं. नरेश म्हस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडका वेळ, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश म्हस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होण…या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या. याशिवाय राजन विचारे यांचं मतदारसंघातील काम, मतदारांशी असणारा सुसंवाद आणि बंडाळीच्या वेळेस दाखवलेली निष्ठा यामुळे राजन विचारे मोठ्या लीडने निवडून येतील, अशी ठाण्यामध्ये चर्चा आहे…
पाचवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिमचा…
मुंबई उत्तर पश्चिमच्या या इंटरेस्टिंग लढतीत ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात होते. वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ…मात्र इडीने चक्र फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदेंसोबत जावं लागलं… पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगत होते… त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील, हा मोठा प्रश्नच होता. हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचे मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
सहावा मतदारसंघ आहे तो दक्षिण मुंबईचा…
दक्षिण मुंबई मधून शिंदेंच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे स्टँडिंग खासदार अरविंद सावंत यांनी दंड थोपटले होते. राहुल नार्वेकर, मंगलप्रसाद लोढा यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात, यासाठी बराच जोर लावला होता. पण मराठी विरुद्ध अमराठी, अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार, इडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी, हे नरेटीव ठाकरे गटाने संपूर्ण प्रचारात वापरलं. मतदानानंतर इथेही ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येतील, अशी चर्चा आहे…
सातवा मतदारसंघ आहे तो मुंबई दक्षिण मध्यचा…
मुंबई दक्षिण मध्य मध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई विरुद्ध शिंदेंकडून राहुल शेवाळे यांच्यातील झालेली ही अटीतटीची लढत. दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठ केडर असल्याने इथे देसाईंचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत…
आठवा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर पूर्वचा…
शिवसेना ठाकरे विरुद्ध भाजप अशी इथली लढत झाली. भाजपकडून मिहीर कोटेचा तर ठाकरेंनी संजय दिना पाटील यांना इथून मैदानात उतरवलंय. भाजपचा या मतदारसंघावर पगडा असला तरी देखील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदा शिवसेनेला इथे निवडून येण्यासाठी स्कोप मिळाला. मुंबईत ज्या काही अटीतटीच्या लढती होतील. त्यांमध्ये मुंबई उत्तर पूर्वचा समावेश करावा लागेल. इथून कोण निवडून येईल हे आत्ताच सांगणं कठीण असलं तरी जिंकून येणाऱ्या उमेदवाराचं मार्जिन हे खूप कमी असेल, असं चित्र सध्या तरी दिसतंय…
नववा मतदारसंघ आहे तो पालघरचा…
भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकत डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवले. हेमंत सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे युती सरकारमध्ये आदिवासी मंत्री होते. आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कामडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली. मात्र येथे बाहुबली समजल्या जाणाऱ्या बहुजन विकास आघाडी अर्थात ‘बविआ’ने अगदी शेवटच्या दिवशी आपला पत्ता उघडत बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगली. मतदानानंतर या जागेवर भाजपच्या हेमंत सावरा यांचं पारड थोडं जड दिसतंय…
दहावा मतदार संघ आहे धाराशिवचा…
शिवसेनेकडून स्टॅंडिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजित दादांना बरीचशी चाचपणी करावी लागली… भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला छत्तीसचा आकडा सगळ्यांना माहित आहेच. धाराशिवची निवडणुकही या दोघांच्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं. जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं… वाढलेली महागाई, शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजेंनी लीड घेतली होती. तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्याने इथं मशाल निवडून येतेय, असा एकूणच कल आहे…
अकरावा मतदारसंघ आहे तो यवतमाळचा…
वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांच्या विरोधात कडवा प्रतिस्पर्धी शोधण्याचा आव्हान होतं. मात्र अत्यंत नाट्यमयरित्या नागेश पाटील यांची हिंगोलीतील उमेदवारी रद्द करत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ मधून उमेदवारी देण्यात आली. बाहेरचे उमेदवार त्यात गद्दारीचा लागलेला टॅग यामुळे संजय देशमुख निवडणूक प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लसमध्ये राहिले. महायुतीला इथे पाठिंबा असला तरी त्याचं मतांमध्ये कन्वर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलं नाही, अशी मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यानंतर आता मशालीचा उजेड यवतमाळ वाशिमवर पडेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे…
बारावा मतदारसंघ आहे बुलढाण्याचा…
बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत झाली. शिंदेंच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाण्यात अँटीइनकंबनसी होती. त्यात ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन पुढे घेऊन गेल्यामुळे याचा मोठा फटका जाधवांना बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इथे खरी लढत ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अशी असल्याची मतदारांच्या चर्चा आहे. मत विभाजनाचा प्रॉपर गेम जुळून आला तर इथे अपक्ष म्हणून रविकांत तुपकर देखील आघाडी मारू शकतील…
तेरावा मतदारसंघ आहे हिंगोलीचा…
खरंतर हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण आणि महागाई हे फॅक्टर इथे ठाकरेंना साथ देऊ शकतात. अष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत मशाल फिक्स आहे, असं बोललं जातंय…
चौदावा मतदारसंघ आहे शिर्डीचा…
अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेंकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली. वंचितकडून उत्कर्षा रूपवते इथं मैदानात उतरल्याने शिर्डीची लढत तिरंगी झाली. वंचितच्या उमेदवारीने वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका आणि सदाशिवराव लोखंडे हे आपल्या विकासकामांच्या जोरावर निकालात लीडला राहतील, असं सध्या शिर्डीचं वातावरण आहे…
पंधरावा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगरचा…
अगदी बरीच काथ्याकूट झाल्यानंतर ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदेंनी संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. इम्तियाज जलील यांच्यामुळे छत्रपती संभाजी नगरची लढत ही तिरंगी आणि अटीतटीची असणार आहे. चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फूटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे इथे चंद्रकांत खैरे निकालात लीडला असतील, असा अंदाज वर्तवला जातोय…
सोळावा मतदारसंघ आहे हातकणंगलेचा…
हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली. राजू शेट्टींमुळे तयार झालेलं कडवं आव्हान आणि ठाकरेंच्या सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा होल्ड यामुळे इथे काटे की टक्कर होती. मानेंच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी इथं जाहीर सभा घेतली होती. पण भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेले संबंध याचा फटका मानेंना निकालात बसू शकतो.. इथं मशाल या चिन्हावर सत्यजित पाटील आघाडी मिळवतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे…
सतरावा मतदारसंघ आहे तो नाशिकचा…
राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी ही लढत… राजाभाऊ वाजे यांना ठाकरेंनी केव्हाची उमेदवारी घोषित केली… पण महायुतीत छगन भुजबळामुळे नाशिकचा तिढा वाढला होता… अगदी शेवटच्या टप्प्यात भुजबळ यांनी माघार घेतल्याने गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली… मतदारसंघात स्वपक्ष आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता… गोडसे स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करतात… त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना ॲक्सेस नसतो.. अशा बऱ्याच तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या… मात्र तिकिटाचा पेच वाढल्याने शेवटी ही जागा गोडसेंनाच सोडण्यात आली… आज होत असणाऱ्या या नाशिकच्या मतदानात कागदावर गोडसेंची म्हणजेच महायुतीची ताकद जास्त दिसत असली. तरी मशालीचं पारड इथं जड झालंय…
अठरावा मतदारसंघ येतो जळगावचा…
भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यातील ही लढत. भाजपच्या बाजूने असणाऱ्या जळगावचं वातावरण उन्मेष पाटलांच्या खेळीमुळे ठाकरेंच्या बाजूने फिरले… उन्मेष पाटील यांची खासदारकीच्या काळातील विकासकामं, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीने शेतकरी प्रश्नांवरून उठवलेलं रान यांचा करण पवार यांना चांगला फायदा होताना दिसला. थेट सांगणं अवघड असलं तरी ठाकरेंची शिवसेना जळगावात मतदानानंतर आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय….
एकोणिसावा मतदारसंघ आहे सांगलीचा…
नो मशाल ओन्ली विशाल असं म्हणत सांगलीचा तिढा वाढला. काँग्रेसला जागा सुटण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेली असताना ही जागा ठाकरेंना सुटली. त्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील अपक्ष रिंगणात उतरले. त्यामुळे सांगलीची लढत ही तिरंगी झाली. शिवसेनेकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील अशा तीन पाटलांनी एकमेकांचे विरोधात दंड थोपटले होते. विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट, काँग्रेसचा अंतर्गत पाठिंबा आणि वंचितची ताकद यामुळे विशाल पाटलांचं पारडं जड होतं. त्यामुळे विशाल मशाल विझवणार हे जवळपास कन्फर्म आहे…
विसावा मतदारसंघ आहे परभणीचा…
परभणी हा राजकारणातील उलथापालथीचा सेंटर पॉईंट ठरला. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली ही जागा त्यांनी महादेव जानकरांना सोडली. जानकरांच्या विरोधात ठाकरेंच्या बंडू उर्फ संजय जाधवांनी दंड थोपटले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव परभणीत जास्त दिसला नाही. ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या परभणीचा निकाल हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला. त्यामुळे जेव्हा जानकरांच्या विरोधात लढत झाली तेव्हा इथे बंडू जाधव हे दोन पाऊल पुढे दिसतायत… इथे मशालच पेटण्याची दाट शक्यता आहे…
एकविसावा मतदारसंघ आहे मावळचा…
मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. बारणे तगडे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अंतर्गत विरोध इथे लपून राहिला नव्हता. अजित पवार गटाने आपला म्हणावा असा प्रचार केला नाही, अशी खंत स्वतः बारणेंनीही व्यक्त केली. वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जातं. त्यात अँटी इनकमबंसीचा फटका आणि ठाकरे आणि पवारांच्या बाजूने असणाऱ्या वातावरणाचा फायदा इथे वाघेरेंना झाला. थोडक्यात संजोग वाघेरे मावळात शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकतील..
एकूणच या सर्व मतदारसंघाची गोळा बेरीज करून पाहिली तर ठाकरे गटाचे 17 ते 18 खासदार आरामात निवडून येतील, असं सध्या चित्र आहे… त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत, जनतेच्या दरबारात निकाल हा मशालीच्या बाजूने लागतोय, त्यामुळे आता हा अंदाज खरा ठरतो की खोटा? यासाठी 4 जूनची वाट सगळ्यांनाच पहावी लागणार आहे…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिक महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य माणूस चिंतेत आहे. आता या चिंतेत आणखी भर पडू शकते, कारण येत्या काळात TV, वॉशिंग मशीन आणि AC च्या किमतीत मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा फटका भारताला बसत आहे. चीनमधून येणाऱ्या मालावरील मालवाहतूक शुल्कात वाढ झाल्यामुळे टीव्ही, वॉशिंग मशीन आणि एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या थेट फटका खरेदीदारांच्या खिशावर पडणार आहे.
मार्केट मधील काही तज्ज्ञांच्या मते, गेल्या 2 महिन्यांत काही ठिकाणच्या मालवाहतुकीत जवळपास चारपट वाढ झाली आहे. पूर्वी युरोप आणि मध्यपूर्वेतून भारतात जाण्यासाठी सागरी जहाजे सुएझ कालव्याच्या मार्गाने जात असत. पण, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर आता त्यांना सुमारे 8500 किमीचा लांबचा रस्ता धरावा लागणार आहे. सुमारे 12 हजार कंटेनरने भरलेल्या सुमारे 330 मोठ्या जहाजांनी हा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे मे महिन्यापासून चीनच्या बंदरांवर जहाजांची कमतरता भासू लागली आहे. याशिवाय कंपन्यांना त्यांच्या उत्पादन पद्धतीतही बदल करावा लागणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत लॉजिस्टिक खर्चाचा वाटा सुमारे 2 ते 3 टक्के आहे. हाही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जो काही अतिरिक्त खर्च कंपन्यांना करावा लागतोय तो सगळा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जहाजांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला जितका वेळ लागायचा त्या वेळेत सुद्धा आता ३५ ते ४० % नी वाढ झाली आहे. लाल समुद्राच्या या एकूण संकटामुळे (Red Sea Conflict) जगभरात 20 आणि 40 फूट कंटेनरच्या किमती वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होणार असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात TV, वॉशिंग मशीन आणि AC च्या किमती वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही.
Almond Cultivation | ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर होतात. आपल्या मेंदूला देखील याचा खूप फायदा होतो. यापैकी बदाम हे एक असे ड्रायफूट आहे, जे अनेक लोकांना खायला आवडते. बदाम आपल्या मेंदूसाठी त्याचप्रमाणे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे बदामाला आजकाल बाजारात मोठी मागणी वाढलेली आहे. अनेक शेतकरी आजकाल बदामाची शेती करून चांगल्या नफा कमवत आहे. बादामाशिवाय बदामाच्या तेलाला देखील बाजारात खूप मोठी मागणी आहे.
बदामाच्या (Almond Cultivation) तेलापासून औषध देखील बनवली जातात. अनेक लोक हे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सेवन करतात. बदामाच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात बदामाचे दर देखील वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी दरवर्षी खूप जास्त नफा कमवतात. जर तुम्हाला देखील बदामाची लागवड करायची असेल आणि त्याबद्दल तुम्हाला माहीत नसेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आज आम्ही बदामाच्या लागवडी बद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत.
रोपे लावण्यासाठी योग्य वेळ | Almond Cultivation
बदामाची लागवड करण्यापूर्वी कोणत्या हंगामात बदामाची लागवड करावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. बदामाच्या रोपाची लागवड डिसेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करावी. यावेळी चांगल्या वातावरणामुळे झाडाचा विकास योग्य प्रकारे होतो. हिमाचल प्रदेश आणि शिमला सारख्या ठिकाणी बदामाची सर्वाधिक लागवड केली जाते. आता मैदानी भागातील शेतकरीही बदामाची लागवड करू लागले आहेत. परंतु ते खूप गरम भागात लागवड करता येत नाही.
बदाम लागवडीसाठी माती
बदामाची लागवड आणि विक्री करताना शेतकऱ्यांना फारसा त्रास सहन करावा लागत नाही. चिकणमाती आणि खोल माती हे त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. त्याच्या सिंचनासाठी शेतकरी ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब करू शकतात. बदामाची रोपे कोणत्याही रोपवाटिकेतून प्रत्यारोपणासाठी तयार केली जाऊ शकतात. त्याची लागवड करून दरवर्षी लाखोंचा नफा कमावता येतो. तुम्ही बदाम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विकू शकता.
तोडणी कधी करायची | Almond Cultivation
या झाडाची वाढ होण्यास थोडा वेळ लागतो, त्याची झाडे ६ ते ७ वर्षांनी फळे देण्यास सुरुवात करतात, तर फळे पिकल्यानंतर ८ महिन्यांनी त्याची काढणी केली जाते. शेतकरी शरद ऋतूतील फळे काढू शकतात. त्याची फळे अतिवृष्टीच्या वेळी काढू नयेत.
Konkan Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता कोकण रेल्वे अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 42 जागा आहेत. त्यामुळे या जागानुसार आता अर्ज मागविण्यात झालेले आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ही 5, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 ही ठरवण्यात आलेली आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
महत्त्वाची माहिती | Konkan Railway Bharti 2024
पदाचे नाव – AEE करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल, इंजिनिअर तांत्रिक सहाय्यक/ सिव्हील, डिझाईन असिस्टंट /इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक /इलेक्ट्रिकल
पदसंख्या – 42 जागा.
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 5 10 12 14 19 21 जून
मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्यूटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड जवळ सिवूड्स रेल्वे स्टेशन सेक्टर 40
मासिक वेतन
AEE/करार – 56 हजार 100 रुपये
वरिष्ठ तांत्रिक सहाय्य / इलेक्ट्रिकल – 44,900 रुपये
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल – 35,400 रुपये
जुनिअर जागतिक सहाय्यक / सिव्हिल- 35, 400 रुपये
डिझाईन असिस्टंट / इलेक्ट्रिकल – 35,400 रुपये
तांत्रिक सहाय्यक / इलेक्ट्रिकल – 25, 500 रुपये
महत्वाचे कागदपत्र
पात्रतेच्या पुराव्यामध्ये प्रमाणपत्राची प्रत
जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत
माजी सैनिकांसाठी दाव्याच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र
दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
व्यावसायिक अनुभव अंतिम सेवा व इतर संबंधित कागदपत्रांची प्रत
निवड प्रक्रिया
भरती अंतर्गत मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
उमेदवारांनी तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहणे गरजेचे आहे.
मुलाखतीला येताना सर्व कागदपत्र सोबत असणे गरजेचे आहे.