Thursday, December 25, 2025
Home Blog Page 735

Pune Accident Update : पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक

Pune Accident surendra agrawal arrest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सुरेंद्र अग्रवाल याना अटक केली आहे. सदर अपघात प्रकरणातील ड्रायव्हरला हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी त्यांनी दबाव टाकला तसेच त्याला डांबून ठेवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याने गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal Arrested) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

यापूर्वी पुणे अपघात प्रकरणात सदर अल्पवयीन मुलगा आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल याना अटक झाली होती, आता मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. चालकाला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आधी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली होती. तसेच विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी झाली होती. सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी अपहरणाचे कलम लावले आहे. कलम 365 आणि 368 कलम लावले आहे. त्यामुळं संपूर्ण अग्रवाल कुटुंबाचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत. अल्पवयीन मुलाकडून जेव्हा अपघात झाला. त्यावेळी ड्रायव्हर या मुलासोबत पुढच्या सीटवर बसला होता. हा अपघात झाल्यानंतर संबधित मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी हा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा, यासाठी ड्रायव्हरला सांगितले होते. त्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखविण्यात आले होते अशीही माहिती समोर येत आहे.

UPSC CDS Bharti 2024 | UPSC अंतर्गत 459 पदांसाठी नवीन भरती!! असा करा थेट अर्ज

UPSC CDS Bharti 2024

 UPSC CDS Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी अंतर्गत एक भरती निघालेली आहे. ही भरती संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा ll साठी निघालेली आहे. या पदाच्या एकूण 459 रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 4 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाची माहिती |  UPSC CDS Bharti 2024

  • पदाचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा II 2024
  • पदसंख्या – 459 जागा
  • वयोमर्यादा – 20 ते 24 वर्ष
  • अर्ज शुल्क – 200 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जून 2024

अर्ज कसा करावा ?

  • उमेदवारांनी वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे खूप गरजेचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार
  • 4 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचावी

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Coriander Benefits | हिरवी असो वा कोरडी, कोथिंबीर खाल्याने होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Coriander Benefits

Coriander Benefits | कोथिंबीर ही आपल्या भारतीय मसाल्यातील एक महत्त्वपूर्ण अशी वनस्पती आहे. जवळपास सगळ्याच भरतीत भाज्यांमध्ये कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरी ही एक औषधी वनस्पती देखील आहे. कोथिंबिरीमुळे जेवणाची चव वाढण्यासोबतच शरीरासाठी अनेक फायदे देखील होतात. कोथिंबीरीच्या बिया म्हणजेच धने हे वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. त्याचा रंग सामान्यता तपकिरी असतो. आता या कोथिंबिरीचा (Coriander Benefits) आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

कोलेस्ट्रॉल कमी करा | Coriander Benefits

कोथिंबीरमध्ये असलेले लिनोलिक ॲसिड, पाल्मिटिक ॲसिड, ओलेइक ॲसिड आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात. हे धमन्या आणि शिरांवर जमा होणारे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना प्रतिबंध होतो.

अतिसार प्रतिबंधित करा

कोथिंबीरमध्ये असलेले बर्नॉलॉल आणि लिनालूल यांसारखे संयुगे यकृताचे कार्य सुधारतात आणि पचन सुधारतात. त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म डायरियापासून बचाव करतात. उलट्या, मळमळ आणि पोटाशी संबंधित आजार टाळण्यासाठी घरगुती उपायांमध्ये कोथिंबिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करा

धणे हे उत्कृष्ट जंतुनाशक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि एंटीसेप्टिक गुणधर्मांचे भांडार आहे. याच्या मदतीने त्वचेचा संसर्ग टाळता येतो.

रक्तदाब संतुलित करा

कोथिंबीर रक्तवाहिन्यांचा ताण कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातापासून बचाव होतो आणि रक्तदाबही संतुलित राहतो.

मधुमेह नियंत्रित करा

आहारातील फायबर समृद्ध धने पावडर रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते. तसेच स्वादुपिंडातून बाहेर पडणाऱ्या इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन वाढवते.

वृद्धत्व कमी होते | Coriander Benefits

कोथिंबीरचे पाणी एक्जिमा, सोरायसिस सारख्या त्वचेच्या समस्या दूर करते आणि मुक्त रॅडिकल्सशी देखील लढते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते.

Realme Narzo N55 : फक्त 9,770 रुपयांत खरेदी करा 6GB रॅम वाला मोबाईल

Realme Narzo N55 Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जीवनात मोबाईल हि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांच्या हातात सुद्धा मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईल मुळे माणसाची अनेक कामे सुद्धा सोप्पी होत आहेत, त्यामुळे मोबाईल नसलेला माणूस जगात सापडणार नाही. मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या नवनवीन प्रकारचे मोबाईल बाजारात लाँच करत असतात. मात्र सर्वसामान्य माणूस खिशाला परवडणारा आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदीचा विचार करत असतो. तुम्ही सुद्धा अगदी कमी पैशात परंतु दमदार फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे… आज आम्ही तुमच्यासमोर असा एक मोबाईल घेऊन आलो आहे ज्याची किंमत अवघी 9,770 रुपये आहे. Realme Narzo N55 असे या मोबाईलचे नाव असून तुम्हाला यामध्ये 6GB रॅम मिळतेय.

कुठे कराल खरेदी?

Realme Narzo N55 मोबाईल तुम्ही प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरून अवघ्या 9,770 रुपयांत खरेदी करू शकता. जर तुम्ही बँक ऑफर्सचा फायदा घेतला तर या फोनची किंमत आणखी कमी होईल. जर तुम्ही HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल, त्यानंतर या स्मार्टफोनची किंमत केवळ 8,790 रुपये होईल. म्हणजेच तुम्ही खूपच कमी आणि परवडणाऱ्या किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

काय फीचर्स मिळतात? Realme Narzo N55

Realme Narzo N55 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईलचे वजन 189.50 ग्रॅम आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G88 प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 13-आधारित Realme UI 4.0 स्किनसह येतो. मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, 64MP चा मुख्य AI कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी रिअलमी च्या या मोबाईल मध्ये 5,000mAh बसवण्यात आली असून हि बॅटरी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आला आहे.

शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाची मोठी चाल; अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी

Teacher-Graduate election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे मोठी चाल खेळत अनिल परब, ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी याना उमेदवारी दिली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. २६ जून रोजी शिक्षक-पदवीधर निवडणुक होणार आहे.

कोण आहेत अनिल परब –

अनिल परब हे ठाकरे गटातील मोठं नाव आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अतिशय घनिष्ट असे त्यांचे संबंध आहेत. मातोश्रीचे एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख आहे. अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळली होती. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब याना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत ज. मो. अभ्यंकर?

ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शिक्षकांचे प्रश्न आणि समस्यांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. आता त्यांना ठाकरे गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात निवडणूक होणार आहे. 26 जूनला विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडेल. त्यानंतर 1 जुलै रौजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल

Benefits Of Dry Fruits | रोज ड्रायफ्रुट्स खाल्याने मेंदूला होतो दुपटीने फायदा, अशाप्रकारे करा सेवन

Benefits Of Dry Fruits

Benefits Of Dry Fruits | ड्राय फ्रुट्स म्हणजे सुका मेवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक डॉक्टर देखील सुकामेवा खाण्याचे सल्ला देत असतात. बदाम खाल्ल्याने आपला मेंदू तीक्ष्ण होतो. कारण बदामामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्सने आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते. त्यामुळे अल्झायरम सारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड यांसारखे विविध पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. त्याचे अनेक फायदे देखील असतात. सुक्या मेव्याचे आपल्या मेंदूला खूप फायदे असतात (Benefits Of Dry Fruits). आता हे नक्की कोणते फायदे आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

फायबर आणि निरोगी चरबी | Benefits Of Dry Fruits

पिस्ता आणि काजू हे फायबर आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते आणि मेंदूला ऊर्जा प्रदान करते.

प्रथिने

अक्रोड आणि बदामामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे ड्राय फ्रूट्स न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करतात. मेंदूला माहिती पाठवण्यात न्यूरोट्रांसमीटर महत्त्वाची भूमिका बजावतात.

मॅग्नेशियम

काजूमध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळते, जे तणाव कमी करण्यास मदत करते. याशिवाय डिप्रेशनसारख्या समस्यांवरही हे ड्रायफ्रूट फायदेशीर आहे.

रक्त प्रवाह

पिस्त्यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या उघडते आणि मेंदूला चांगला रक्तपुरवठा करण्यास मदत करते. यामुळे तुमच्या मेंदूचे कार्य सुधारते. तसेच हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने स्मरणशक्ती मजबूत होते.

अँटिऑक्सिडंट्स | Benefits Of Dry Fruits

अक्रोड, बदाम आणि पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. जसे की व्हिटॅमिन ई आणि पॉलिफेनॉल. हे मेंदूच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि वयानुसार होणारे आजार कमी करण्यास मदत करतात.

ओमेगा -3 फॅटी ऍसिड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळते. हे मेंदूच्या विकासात आणि कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून, वाढत्या मुलांना अक्रोड खायलाच पाहिजे, त्यांच्या वाढीसाठी ते खूप महत्वाचे आहे.

Kitchen Tips : घराच्या घरी बनवा साजूक तूप ; वापरा ‘ह्या’ सोप्या पद्धती

desi ghee

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये दुधापासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. रोजच्या जेवणात दही, ताक, तूप, दूध अशा पदार्थांचा समावेश असतोच. त्यातही तूप हे भारतीय भोजन परंपरेतील महत्वाचा घटक मानला जातो. रोज एक चमचा तुपाचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. लहान मुलांच्या आहारात आवर्जून तुपाचा समावेश केला जातो. मात्र घराच्या घरी तूप बनवण्यापेक्षा बाजारातील उपलब्ध तूप खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. या बाहेरील तुपात विविघ घटकांची भेसळ केली जाते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही सोप्या पद्धतीने तूप कसे बनवता येईल याची माहिती घेणार आहोत.

पहिली पद्धत (Kitchen Tips)

  • सगळ्यात आधी दुधाला चांगली उकळी आल्यानंतर त्याची साय एका भांड्यामध्ये काढून घ्या.
  • पुढचे आठवडाभर किंवा चार दिवस दुधाची साय दररोज एकाच भांड्यामध्ये साठवून ठेवा. हे भांड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साठवलेली साय खराब होणार नाही.
  • त्यानंतर जेव्हा आपल्याला तूप काढायचा आहे (Kitchen Tips) त्या दिवशी सकाळी लवकर तुम्ही फ्रीजमधून हे साईचं भांड काढून ठेवा. त्यामुळे साय ही नॉर्मल कंडिशनला येईल.
  • साय साठवलेले भांडे नॉर्मल झाल्यानंतर हे भांड गॅसवर मंद आचेवर तापण्यासाठी ठेवा.
  • पुढे या भांड्यात सतत एक चमचा हलवत रहा.
  • त्यामुळे मलई खाली चिकटणार नाही आणि हळूहळू तूप मलाई पासून वेगळे होईल.
  • त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने तूप गाळून घ्या.

दुसरी पद्धत (Kitchen Tips)

  • तूप बनवण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे बटर पासून देखील तूप बनवता येते.
  • त्यासाठी आधी फुल फॅट असलेले दूध घ्या.
  • फुलफॅट दूध एका मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या.
  • मिक्सरला फिरवताना यात बर्फाचे तुकडे टाका बर्फानी थंड पाण्याने दूध फेकल्यानंतर वेगळं होतं बटर वेगळे झाल्यानंतर त्यात पुन्हा थोडा बर्फ टाकून घ्या. जास्तीत जास्त दूध निघून जाईल फक्त लोणी उरेल.
  • त्यानंतर हे लोणी गॅसवर बारीक आचेवर कापून घ्या तूप तयार झाल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि गाळणीच्या साह्याने गाळून एका काचेच्या बाटलीमध्ये (Kitchen Tips) भरून ठेवा.

Traffic Update : अलर्ट व्हा …! घोडबंदर रोडवर 6 जूनपर्यंत ‘या’ वाहनांना नो एन्ट्री, पहा पर्यायी रस्ते

ghodbandr road

Traffic Update : तुम्ही जर घोडबंदर रोडवरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या मार्गापैकी हा एक महत्वाचा मार्ग आहे. हा रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या कडून (Traffic Update) या मार्गावर ६ जून पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी दिनांक 24 मे 2024 पासून घालण्यात आली आहे.

प्रामुख्याने मुंबई गुजरात भिवंडी आणि उरण मधील जेएनपीटी बंदरातून गुजरात मार्गावर माल वाहून येणारी हजारो वाहन ही घोडबंदर रोडचा वापर करतात. याबरोबरच मुंबई, वसई, विरार, भाईंदर मधील छोट्या वाहनांकडूनही मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर केला जातो. याशिवाय या रस्त्यावर बसेसची सुद्धा वर्दळ असते त्यामुळे हा रोड नेहमी (Traffic Update) गजबजलेला असतो.

कोणत्या वाहनांना परवानगी? (Traffic Update)

दिनांक 24 मे ते 6 जून या दरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र हलक्या वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय दुरुस्ती सुरू असतानाही येथील वाहतूक सिंगल लेन पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता घोडबंदर मार्गावरील घाटाजवळ चा रस्ता हा अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एकाच वेळी अवजड वाहनांना (Traffic Update) आणि हलक्या वाहनांना भार वाढवल्यास ठाणे घोडबंदर आणि मुंबई अहमदनगर मार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात.

वाहतुकीत केलेले बदल (Traffic Update)

  • नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना मानकोली नाक्यावर प्रवेशबंदी असेल. या वाहनांना मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे जावे लागेल.
  • गुजरातमधून घोडबंदर मार्गे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना चिंचोटी नाक्याजवळ प्रवेशबंदी असेल. ही वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडी मार्गाने जातील.
  • मुंबई, ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड/अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवड्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या ऑफिसजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गाने किंवा कशेळी, अंजुरफाटा मार्गे पुढे निघतील.
  • मुंब्रा, कळव्यावरुन घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या जड/अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला जाईल. ही वाहने खारेगाव खाडी पूलाखालून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे जातील.

पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेतून कमवा करोडो रूपये; या पद्धतीने करा गुंतवणूक

Public Provident Fund Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळात पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये, एफडीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरत आहे. यात गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस च्या योजनांना अधिक प्राधान्य देत आहेत. कारण की इतर योजनांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानल्या जात आहेत. पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (Public Provident Fund Scheme) तर अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. आज आपण याच योजनेविषयी जाणून घेणार आहोत.

योजनेविषयी सविस्तर माहिती

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजने अंतर्गत तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. ही योजना एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये सरकारकडून परताव्याची हमी दिली जाते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के चक्रवाढ व्याजदराचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 500 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. PPF खात्याची कालमर्यादा 15 वर्षांची आहे. यात तुम्ही 5-5 वर्षांसाठी गुंतवणूक कालावधी वाढवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला करोडो रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी दरमहा 12,500 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही एवढी गुंतवणूक 15 वर्षे सतत केली तर मॅच्युरिटी होईपर्यंत तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यातील 22.50 लाख रुपये ही गुंतवलेली रक्कम असून उर्वरित रक्कम व्याजाची असेल. खास म्हणजे, जर तुम्ही हे खाते प्रत्येकी 5 वर्षांसाठी दोनदा वाढवले तर 25 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1.03 कोटी रुपयांचा निधी मिळेल. या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. त्यामुळे सर्व बाजूंनी ही योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.

Viral Video : काय सांगता…! McD च्या कर्मचाऱ्याने चक्कं फ्रेंच फ्राईज वॉर्मरखाली सुकवले फरशी पुसण्याचे मॉप

McD viral video

Viral Video : फास्ट फूड मधील आवडता प्रकार म्हणजे फ्रेंच फ्राईज. जगभरात फ्रेंच फ्राईज चे चाहते काही कमी नाहीत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फ्रेंच फ्राईज आवडतात. त्यातही मॅकडोनाल्ड्सचे फ्रेंच फ्राईज म्हणजे अनेकांचे फेव्हरेट स्नॅक… संपूर्ण जगभरात मॅकडोनाल्ड्सचे चाहते आहेत. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ जर तुम्ही पहिला तर McD चे फ्रेंच फ्राईज नको रे बाबा …! असे म्हणाल. नक्की काय आहे हा व्हिडीओ ? चला पाहूया …

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडीओ मध्ये मॅकडोनाल्डचा कामगार फ्राय स्टेशनच्या वार्मर खाली चक्क फरशी पुसण्यासाठी वापरला जाणारा ओला मॉप सुकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला McD च्या हायजीन बाबत प्रश्न (Viral Video) उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.

मात्र तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही कारण हा व्हायरल होणारा व्हिडीओ (Viral Video) भारतातला नसून ऑस्ट्रेलिया मधला आहे. हे दृश्य नक्की कुणी पहिले ? त्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. डेबी बरकत, ४ एप्रिल रोजी आपल्या मुलासह ब्रिस्बेनमधील बूव्हल मॅकडोनाल्डमध्ये गेली होती तेव्हा तिने हे विचित्र दृश्य पाहिले. तिने एका कर्मचाऱ्याला वॉर्मर लॅम्पखाली आणि फ्राईजपासून फक्त काही इंच वर ओलसर मॉप धरलेले पाहिले. ४ एप्रिल रोजी घडलेली घटना असूनही, रेस्टॉरंटबद्दल अधिक तक्रारी लक्षात आल्यानंतर बरकतने व्हिडिओ शेअर करण्यासाठी सहा आठवड्यांहून अधिक कालावधी घेतला.

याबाबत माहिती देताना Yahoo! न्युज ऑस्ट्रेलियाला बरकत यांनी सांगितले की , “मी माझ्या ऑर्डरची वाट पाहत होतो जेव्हा मी दुसऱ्या स्टाफ सदस्याला असे म्हणताना ऐकले, ‘मला वाटत नाही की तु हे केले पाहिजे, जर त्याने आग लागली तर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा इशारा ऐकून कामगार फक्त हसला.” इतर कर्मचारी तिथेच ऑर्डर पूर्ण करण्यासाठी फ्राईज तळत होता. सुमारे एक मिनिट मॉप-ड्रायिंग करत ती महिला कर्मचारी तिथेच उभी होती. “मी जे पाहिले ते पाहून मला धक्काच बसला आणि तिने हसून दुर्लक्ष केल्याचे (Viral Video) बरकतने सांगितले.

तर दुसरीकडे “आम्ही सुधारात्मक कारवाई करत आहोत याची खात्री बाळगा, त्यामुळे अशी कारवाई पुन्हा होणार नाही,” असे व्यवस्थापकाने उत्तर दिले. “मॅकडोनाल्ड्स अन्न सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेते आणि सर्व रेस्टॉरंट्समध्ये कठोर स्वच्छता, स्वच्छता आणि स्वच्छता प्रक्रियांचे पालन करते.” असे म्हंटले आहे.
मॅकडोनल्ड्स सारख्या प्रसिद्ध फ्रॅन्चायजी मध्ये ही घटना घडल्यामुळे एकूणच मॅकडोनाल्ड्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह (Viral Video)उभे राहिले आहे.