Friday, December 26, 2025
Home Blog Page 736

Pune Porsche Accident: आम्ही पैसे देतो, आळ स्वतःला घ्या; मुलाला वाचवण्यासाठी चालकाला दिली ऑफर

Pune Porsche Accident

Pune Porsche Accident| पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
कल्याणीनगरमध्ये अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला वाजवण्यासाठी चालकांची अदलाबदल करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी कार 17 वर्षीय मुलगाच चालवत होता हे एका व्हिडिओतून समोर आले, असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या घटनेप्रकरणी लोकांचा संताप आणखीन वाढला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली की, सुरुवातीला चालकाने आपणच कार चालवत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्याने दिलेल्या या जबाबावरूनच पुढील शोध सुरू करण्यात आला. मात्र या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यानुसार कार 17 वर्षीय मुलगा चालवत होता हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता चालकाने कोणाच्या दबावाखाली हा जबाब दिला ते आम्ही तपासत आहोत. आमच्याकडे 17 वर्षीय मुलगाच गाडी चालवत असल्याचे व्हिडीओ आहे.

त्याचबरोबर, “आमच्याकडे पबमधील सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यात आरोपी मुलगा दारु पिताना दिसत आहे. आमचा तपास ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही. तो मुलगा शुद्धीत होता. ते सगळं दारुच्या नशेत होते, आपण काय करतोय याची त्यांना जाणीवच नव्हती, अशी स्थिती नव्हती. अपघात होऊ शकतो. त्यात एखाद्याचा जीव जाऊ शकतो याची जाणीव त्यांना होती” असेही पोलिसांनी सांगितले आहे.

सूत्रांकडून धक्कादायक खुलासा (Pune Porsche Accident)

धक्कादायक बाब म्हणजे, “आरोपी सतरा वर्षीय मुलाच्या पालकांनीच चालकाला या अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितले होते. या बदल्यात त्याला पैसे देण्याची ऑफर देण्यात आली होती.” अशी माहिती पुणे पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाकडून कल्याणीनगरमध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातात 2 अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र तरी या मुलावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Yamraj Temple : मृत्यूनंतर आत्मा येतो ‘या’ मंदिरात; मग उघडते स्वर्ग वा नरकाचे द्वार

Yamraj Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yamraj Temple) संपूर्ण भारतात अशी अनेक पुरातन आणि प्राचीन मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास फार प्रभावी आहे. जगात एकही माणूस असा नाही जो मृत्यूला घाबरत नाही. मरण येणार.. या नुसत्या कल्पनेने हात पाय गाळणारी बरीच लोक आहेत. आपण सारेच जाणतो की, मृत्यूनंतर आत्मा एकतर स्वर्गात जातो नाहीतर नरकात जातो. पण याचा न्यायनिवाडा मृत्युदेवता यमराज करतात. यमराजाच्या नावानेच लोक चळाचळा कापतात. अशा मृत्युदेवतेचे भारतात एक अनोखे आणि अद्भुत मंदिर आहे. जिथे मृत्यूनंतर सर्वात आधी आत्मा हजेरी लावतो आणि मगच त्याचा न्याय होतो.

कुठे आहे मृत्यु देवतेचे मंदिर? (Yamraj Temple)

भारतात अनेक मंदिरे आहेत. ज्यामध्ये एक मंदिर मृत्युदेवता यमराजाचे आहे. इथे मृत्यूनंतर आत्मा येतो आणि त्यानंतर न्यायदेवता यमराज त्या आत्म्यासाठी एकतर स्वर्ग नाहीतर नरकाचे द्वार उघडतात. मानवाच्या मृत्यूनंतर या मंदिरात भरतो यमराजाच्या दरबार आणि मग होतो आत्म्याचा न्याय निवाडा. असे हे अद्भुत आणि रहस्यमय मंदिर हिमाचलमधील चंबा जिल्ह्यात भरमौर येथे आहे. यमराजाचे हे एकमेव मंदिर आहे. जे भारतात आहे. मुख्य म्हणजे, या मंदिरात लोक दर्शनासाठी जायलासुद्धा घाबरतात.

काय सांगते आख्यायिका?

या मंदिराची आख्यायिका सांगते की, मृत्यूनंतर आत्मा सर्वात आधी या मंदिरात येतो. त्यानंतर या मंदिरात मृत्युदेवता यमराजाचा दरबार भरतो. मग तो आत्मा स्वर्ग सुख भोगणार की नर्क यातना याचा निर्णय होतो. हे मंदिर अगदी लहान आणि घरासारखं दिसतं. जे उंच पर्वतांच्या मधोमध वसलेलं असून त्याची ओळख धर्मराज अशी आहे. (Yamraj Temple) हे मंदिर कोणी आणि कधी बांधले? याबद्दल काहीही माहिती नाही. पण इतिहासात असा उल्लेख सापडतो की, सहाव्या शतकात चंबाच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केलं होतं. या मंदिराला तांबे, लोखंड, सोनं आणि चांदीचे चार दरवाजे आहेत. जे खरोखरच या मंदिराला आकर्षक बनवतात. असे असले तरीही या मंदिराच्या आत जाण्याची कुणाची हिंमत होत नाही.

चित्रगुप्ताची खोली

यमराजाच्या या एकमेव मंदिरात जेव्हा एखादा आत्मा हजेरी लावतो, तेव्हा सर्वात आधी भगवान चित्रगुप्त त्याच्या कर्माचे तपशील पाहतो. या मंदिरात एक खोली आहे जी चित्रगुप्ताची खोली असल्याचे म्हटले जाते. याच खोलीत बसून चित्रगुप्त माणसाच्या कर्माचा लेखजोखा करतात, असे म्हणतात. (Yamraj Temple) जेव्हा चित्रगुप्त आत्म्याच्या कर्माचे तपशील पाहतात यानंतर तो आत्मा स्वर्गसुख घेणार की नर्क यातना भोगणार हे ठरवले जाते. न्याय झाल्यानंतर यमराज त्या आत्माला ओढत घेऊन जातात, असे म्हटले जाते. कदाचित म्हणून या मंदिरात जाण्यापासून लोक घाबरतात. बरीच लोक या मंदिराच्या बाहेरूनच हात जोडतात. तर काही लोक आसपास देखील भटकत नाहीत.

Viral Video : शहाणपणा नडला!! ओव्हरटेक करायला गेला आणि स्वतःच पडला; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल गाडी चालवणं काही फार मोठी गोष्ट उरलेली नाही. अगदी अल्पवयीन मुलंसुद्धा आरामात गाड्या चालवतात, अपघात करतात आणि सुटतात सुद्धा. मुळात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराने इतर दुचाकींना ओव्हरटेक करायच्या नादात स्वतःचचं नुकसान करून घेतलंय. पाहुयात व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरु आहे. एक बाईकस्वार कॅमेरात लाईव्ह शूट करतो आहे. दरम्यान, एक दुचाकीस्वार वेगात गाडी घेऊन येतो आणि २ दुचाकींना ओव्हर टेक करू लागतो. यावेळी त्याच्या बाईकची रॉयल एनफिल्ड बुलेटला जोरदार धडक बसते. (Viral Video) पण, बुलेट चालक स्वतःचा तोल सावरतो. मात्र, ओव्हरटेक करणारा तरुण बाईकसह रस्त्यावर पडतो. हे पाहून कुणालाही क्षणभर आता पुढे काय? असे वाटू शकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही स्तब्ध झाले असाल.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्राम हँडलवर motovlogger_akash’s नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ‘लाइव्ह बाइक क्रॅश’ असे कॅप्शन दिले असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. (Viral Video) हा व्हिडीओ पाहून अतिवेगाने वाहन चालवणे, ओव्हर टेक करणे, स्टंटबाजी करणे, हेलमेट न घालणे या गोष्टी किती धोकादायक ठरू शकतात ते समजते.

Viral Video : हद्द झाली राव!! मरिन ड्राइव्हवर तरुणीचा अश्लील डान्स; Video पाहून नेटिझन्सने व्यक्त केला संताप

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही केलं जात. कुणी विचित्र चाळे करत, तर कुणी धडाकेबाज स्टंट करून जीव धोक्यात घालत. इतकंच काय तर कुणी बुद्धीचा कमाल वापर करताना दिसताना तर कुणी बुद्धी घाण टाकल्यासारखं वागताना दिसत. गेल्या काही काळात रस्त्यावर डान्स करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ फार व्हायरल झाले. ज्यात दिल्ली मेट्रोतील एका तरुणीचा अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला दिसला. यातच आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे.

दिल्ली मेट्रोनंतर आता मुंबई मरिन्स (Viral Video)

दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील हावभाव करत डान्स करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप दर्शवला होता. यानंतर आता मुंबईतील मरीन लाईन्सवर एका तरुणीने अश्लील डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओतील तरुणी ही इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सर असल्याचे समजत आहे. जी या व्हिडिओत अत्यंत घाणेरड्या पद्धतीने डान्स करताना दिसतेय. (Viral Video)या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक तरुणी मरिन्सवर डान्स करायला सुरुवात करते. पुढे ती अश्लील हावभाव करू लागते.



दरम्यान रस्त्यावरील लोक तिच्याकडे पाहू लागतात. तर काही जण तिचा घाणेरडा डान्स पाहून तिच्याकडे दुर्लक्ष करतात. ससोहळ मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. अनेक नेटकरी या व्हिडिओवर आपला संताप दर्शवत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर manishadancer01 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.(Viral Video) या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक लोकांनी विविध कमेंट करत संताप दर्शवला आहे. एकाने लिहिलंय, ‘हिने तर लाज सोडलीये’. तर आणखी एकाने म्हटले, ‘आता हे लोक मुंबईला खराब करणार’.

BSNL Offer : ऑफर!! ऑफर!! 5 लाख रुपये जिंकण्याची संधी; फक्त मारा ‘हे’ 2 मोबाईल रिचार्ज

BSNL Offer 5 lakh rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देसी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL चे रिचार्ज स्वस्त आणि कमी पैशात असल्याने BSNL कडे सुद्धा मोठा ग्राहकवर्ग आहे. कंपनी येत्या ऑगस्टपर्यंत 4जी सेवा सुरु करणार आहे, तसेच नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी कंपनी नवीन टॉवर्सही बसवत आहे. एकीकडे हे सर्व चाललं असताना आता BSNL आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर (BSNL Offer) घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना तब्बल ५ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळत आहे. मात्र त्यासाठी पात्र ग्राहकांकडे २ मोबाईल रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे.

काय आहे ऑफर – BSNL Offer

याबाबत BSNL ने आपल्या x हँडलवरून पोस्ट केले आहे की जर यूजर्सनी या दोन योजनांसह त्यांच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज केले तर त्यांना 5 लाख रुपयांचे बंपर बक्षीस जिंकण्याची (BSNL Offer) संधी आहे. यासाठी बीएसएनएलने हार्डी गेम्ससोबत पार्टनरशिप सुद्धा केली आहे. कंपनी वापरकर्त्यांना सोना जीतो स्पर्धेत सहभागी होण्यास सांगत आहे. मात्र त्यासाठी सदर बीएसएनएल ग्राहकाकडे 118 रुपयांचा आणि १५३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन असायला हवा.

बीएसएनएलचा 118 रुपयांचा प्लॅन-

BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 20 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्ही अनलिमिटेड व्हाईस कॉल करू शकता, अगदी देशभरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही कोणालाला फोन लावू शकता. तसेच या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 10GB हाय स्पीड डेटाचा लाभ मिळतोय. याशिवाय युजर्सना फ्री नॅशनल रोमिंग देखील देण्यात येत आहे.

बीएसएनएलचा १५३ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना २६ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये देशभरातील वापरकर्त्यांना मोफत कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळतेय. इथेही तुम्ही कोणालाही अनलिमिटेड कॉल करू शकता. तसेच दररोज तुम्ही 1GB इंटरनेट डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा लाभ घेऊ शकता.

Gopinath Munde Scheme | पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला मिळणार 2 लाख रुपयांची मदत; काय आहे सरकारची नवी योजना ?

Gopinath Munde Scheme

Gopinath Munde Scheme | राज्य सरकारकडून अनेक योजना लागू केलेल्या आहेत. यामध्ये सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात योजना शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यूसह अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असते. आता राज्य सरकारने या योजनेमध्ये महिलांना महत्त्वाचे स्थान देण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे प्रसूती दरम्यान जर एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्याचे देखील सरकारने ठरवलेले आहे. परंतु मागील सहा ते सात महिन्याचा जिल्हास्तरावर याबाबत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

सरकारने शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्यास देखील या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. यासाठी सरकारने दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून अर्ज देखील करावा लागतो.

प्रस्ताव कसा दाखल करावा ? | Gopinath Munde Scheme

ज्या शेतकऱ्यांचा अपघात घडला आहे. त्या शेतकऱ्याने 30 दिवसाच्या आत आपला सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडून गाव नमुनाम, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी कागदपत्र. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेला अहवाल,स्थळ, पंचनामा, पोलीस पाटील माहिती, अहवाल इत्यादी कागदपत्रे कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून तिथे सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार | Gopinath Munde Scheme

पाण्यात बुडून अपघाती विषबाधा, वीज पडून, विजेचा धक्का बसून, सर्पदंश, उंचावरून पडल्याने, जनावरांच्या हल्ल्यात तसेच जनावर चावल्याने जखमी झाल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा या योजनेतून विमा मिळतो.

White Onion Benefits : पांढरा कांदा म्हणजे आरोग्याचा खजाना; फायदे जाणून व्हाल चकित

White Onion Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Onion Benefits) प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ म्हणजे कांदा. एखादी भाजी असो किंवा सलाड बनवताना कांदा हा लागतोच. इतकंच काय तर, बऱ्याच लोकांना जेवणाच्या ताटात आवर्जून कांदा लागतो. घराघरात भाजीच्या ग्रेव्हीपासून ते तोंडी लावण्यापर्यंत लाल कांद्याचा वापर केला जातो. पण पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा जास्त आरोग्यदायी मानला जातो. कारण पांढऱ्या कांद्यामध्ये असे काही पोषक तत्त्व असतात ज्यांच्या सेवनाने आरोग्याला बराच फायदा होतो.

पांढऱ्या कांद्यातील पोषक तत्त्वे (White Onion Benefits)

आपल्या आहारात नियमित पांढऱ्या कांद्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारण पांढऱ्या कांद्यामध्ये सोडियम पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, फायबर, पाणी, प्रथिने, कॅलरीज, कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असतो. चला तर जाणून घेऊया पांढरा कांदा खाण्याचे फायदे.

1. हृदयविकाराचा मिटेल धोका

तज्ञ सांगतात की, नियमित पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. (White Onion Benefits) कांद्यातील अँटी-इंफ्लेमेटरी गूण रक्तदाब वाढू देत नाहीत. त्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराचा धोका मिटतो.

2. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

पांढऱ्या कांद्यातील काही पोषक घटक आपल्या शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकतात. (White Onion Benefits) ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते आणि त्रास होत नाही.

3. पचनसंस्था राहील मजबूत

पांढरा कांदा खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत राहते. कारण, यात फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पचन आरोग्य मजबूत करते आणि यातील प्रो- बायोटिक्स आपले पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात.

4. केसांचे आरोग्य सुधारते

पांढरा कांदा केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण, पांढऱ्या कांद्याचा रस केसांमध्ये लावल्यास कोंड्याची समस्या होत नाही आणि असेल तर दूर होते. शिवाय पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर नियमित पांढरा कांदा खा. (White Onion Benefits) यामुळे अकाली केस पांढरे होणार नाहीत.

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुक जाहीर; 26 जूनला होणार मतदान

Legislative Council

हॅलो महाराष्ट् ऑनलाईन| विधान परिषदेच्या (State Legislative Council) निवडणुकीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 26 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण 4 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी पार पडणार आहे. यापूर्वी याचं निवडणुकीची तारीख 10 जून ठरवण्यात आली होती. मात्र शाळांच्या सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक, पदवीधर संघटनांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. ज्यामुळे निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली.

मात्र आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, येत्या 26 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच, 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्षक, पदवीधर संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. तसेच, या संघटनांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की, “शाळांना सुट्टी असल्यामुळे त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात”

या मागणीच्या आधारावरच आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलली होती. दरम्यान, येत्या 7 जुलै रोजी मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या जागांचा कार्यकाळ संपत आहे. यामुळेच निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. ज्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहणार आहेत.

Railway Employees | 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मिळणार वेतनवाढ; रेल्वे बोर्डाने केला आदेश जारी

Railway Employees

Railway Employees | रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार 3 जून रोजी निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही यावर दावा करू शकतात. आणि त्यांना देखील थकबाकी मिळणार आहे. वेतनवाढी मळे कर्मचाऱ्यांना आता मूळ पेन्शन, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसेच इतर भत्तेही वाढीव मूळ आधारावर मिळणार आहेत. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (वेतन आयोग) संदीप पाल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार आता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही 1 जुलै रोजी वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नव्हता | Railway Employees

रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या तारखेनुसार 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी तीन टक्के वार्षिक वेतनवाढीचा लाभ देते आतापर्यंत 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षभर काम करूनही 1 जुलै रोजी वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता.

अशा स्थितीत न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या आधारे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा लाभ देण्याचे आदेश मंडळाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. वेतनवाढ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव मूळ आधारावर पेन्शन, ग्रॅच्युइटी, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि इतर भत्तेही मिळतील.

निवृत्त कर्मचारी देखील दावा करू शकतात

रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, जे कर्मचारी आदेश जारी होण्याच्या तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. आदेशानुसार वेतनवाढ मिळाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी वाढीव मूळच्या आधारे मोजली जाईल आणि त्यांना मागील तीन वर्षांची थकबाकीही मिळेल.

‘गृहमंत्री महोदय… गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली, राजीनामा द्या

Devendra Fadnavis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी इंदापूर शहरातील संविधाना चौकात जीवघेणा हल्ला केला. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची गाडी संविधान चौकात आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. भरदिवसा अज्ञातांनी हल्ला केल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे रोहित पवारांचे ट्विट –

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल, देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घोसाळकर यांच्या घराजवळ राहणारा मॉरिस या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह दरम्यानच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असता एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील असे देवेंद्र फडणवीस म्हटलं होते. त्याचा विधानाचा धागा पकडत रोहित पवारांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

दरम्यान, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हंटल कि, नेहमीप्रमाणी मी इंदापूर प्रशासकीय भावनाकडे निघालो होतो. संविधान चौकात माझी गाडी असता चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी राॅडने त्यांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला. एवढच नव्हे तर सदर व्यक्तींकडून आमच्या अंगावर मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळी माझ्या गाडीत चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आणखी दोन ते तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी देखील आमच्यावर हल्ला चढवला.