Friday, December 26, 2025
Home Blog Page 738

MS Dhoni : धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; चेन्नईच्या CEO नी सांगूनच टाकलं

MS Dhoni retirement update (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्सचा संघ बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचा (MS Dhoni) आयपीएल प्रवास संपला कि काय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. पुढच्या आयपीएल मध्ये धोनीची बॅटिंग पाहायला मिळेल का? मैदानावर धोनी दिसेल का? या विचारांनी चाहते चिंतेत आहेत. धोनीने सुद्धा आपल्या आगामी करिअरबाबत किंवा निवृत्तीबाबत ठोस असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र त्याच दरम्यान,. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन (Kasi Vishwanathan) यांनी धोनीच्या करिअरबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

,महेंद्रसिग धोनी २०२५ चाय आयपीएल मध्ये खेळेल कि नाही हा निर्णय धोनीच घेऊ शकतो. आम्ही नेहमी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. मला आशा आहे की तो लवकरच निर्णय घेईल. मात्र, तो पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आम्हाला खूप आशा आहे, आणि ही चाहत्यांची आणि माझीही इच्छा आहे, असं काशी विश्वनाथन म्हणाले. धोनीने घेतलेल्या निर्णयांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे, आपणा सर्वांना माहिती आहे की, धोनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेतो आणि धोनीने योग्य वेळी ते जाहीर सुद्धा केले आहेत . परंतु आम्हाला खूप आशा आहे की तो पुढील वर्षी CSK साठी उपलब्ध असेल.

दरम्यान, 18 मे रोजी आरसीबी विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पराभव होताच चेन्नई सुपर किंग्सचा संघ स्पर्धेबाहेर गेला. यानंतर धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसावा अशी इच्छा त्याच्या चाहत्यांची असेल. धोनीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धोनीने चेपॉकवर शेवटचा सामना खेळण्याचे वचन संघाला दिले होते ते तो पाळेल अशी आशा व्यवस्थापनाला आहे. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीचा खेळ चांगलाच राहिला आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याने जवळपास 200 च्या स्ट्राइक-रेटने 25 धावा केल्या होत्या तसेच त्याने ४ ओव्हर फलंदाजी केली होती. क्रिझमधून धावत असताना सुद्धा त्याला कोणताही त्रास झाला नाही, अगदी आरामात तो सिंगल- डबल धावा पूर्ण करत होता. धोनी कुठेही दमलेला दिसला नाही तसेच त्याच्यात कोणतीही अस्वस्थता पाहायला मिळाली नाही. उलट स्टेडियमच्या बाहेर चेंडू घालवत आपण आजही मोठमोठे शकतो हे धोनीने दाखवून दिले हा त्याचा प्लस पॉईंट आहे.

वाढल्या गरमाईमुळे लोक हैराण!! गेल्या 3 दिवसात विजेच्या मागणीत विक्रमी वाढ

mahavitaran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक घरोघरी फॅन, कुलर, एसीचा वापर केला जात आहे. या कारणामुळेच गुरुवारी महावितरणने 23 हजार 571 मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे भारनियमन टाळलं आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 43 ते 44 अंशांवर आहे. अशा परिस्थितीत लोकांची गरज लक्षात घेऊन महावितरणने अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करून महाराष्ट्राला वीज पुरवली आहे.

सध्या राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये भयानक उष्णता जाणवत आहेत. त्यामुळे लोक घराच्या बाहेर पडण्याऐवजी घरातच राहावे निवडत आहेत. यात गरमाई पासून स्वतःच्या बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एसी कुलर फॅनचा वापर केला जात आहे. तसेच थंडगार पेयांसाठी सर्वांत जास्त फ्रीज वापरले जात आहेत. थोडक्यात अशा विविध कारणांमुळे विजेची मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणाने इतर वीज कंपन्यांकडून वीज खरेदी केली आहे.

मात्र दुसऱ्या बाजूलाही विजेची मागणी वाढल्यामुळे राज्याला लोड शेडिंगचा ही सामना करावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण की, कमी पडलेला पाऊस आणि विजेची वाढलेली मागणी त्यामुळे महावितरणावर अधिक भार आला आहे. या दोन दिवसाच्या काळामध्ये म्हणजेच 21 मे रोजी 24 हजार 418 मेगावॅट, 22 मे रोजी 24 हजार 604 मेगावॅट, 23 मे रोजी 23 हजार 579 मेगावॅट वीज पुरवठा करण्यात आला आहे. आता विजेची ही मागणी आणखीन वाढेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता महावितरणाने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांचा वेग वाढवला आहे.

‘गो ग्रीन’चा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टिझर लॉंच; पहा व्हिडीओ

Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित हा चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अर्थात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे.प्रशांत मुरकुटे सह-दिग्दर्शक व गणेश मोरे प्रमुख सहयोगी दिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, रंगभूषा, वेशभूषा केली आहे. शरद ठोंबरे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. पी. शंकरम यांनी पार्श्वसंगीत केलं आहे. प्रल्हाद उजगरे यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शनाचं काम केलं आहे.आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

तगडी स्टारकास्ट

चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास मोरे, जयदेव वायबसे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आयन हजारे अशी स्टारकास्ट आहे.

टिझर लॉंच

निसर्गचक्रामध्ये झाडांचं स्थान अनन्यसाधारण आहे. कारण फळे, फुलांवर अनेक प्रकारचे पक्षी अवलंबून असतात. मात्र माणसाने आपल्या हव्यासापायी प्रचंड प्रमाणात झाडे तोडली. त्यातून जंगलांचा नाश होऊ लागला आणि वन्यजीव, माणूस असा नवा संघर्ष उभा राहिला. जागतिक तापमानवाढीचा मुद्दा तापत असताना, उन्हाची तीव्रता वाढतच जात आहे . त्यामुळे झाडे लावणे, त्यांची जोपासना करणे, जंगले निर्माण करणे हाच उपाय आहे. म्हणूनच झाडांचं जतन, संगोपन आणि पर्यावरण संवर्धन हा विषय चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न झाड चित्रपटातून केला आहे. चित्रपटाच्या टीजर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नव्या दमाचे कलाकार, संपूर्णपणे वेगळा विषय हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

Driving Licence Rules | महत्वाची बातमी ! ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये 1 जूनपासून होणार मोठे बदल

Driving Licence Rules

Driving Licence Rules | वाहन चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन असणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवताना खूप गरजेचे आहे. आपल्याला माहीतच आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतुकीचा परवाना काढायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते. ती गुंतागुंतीची आणि अवघड देखील असल्यामुळे अनेक लोक ड्रायव्हिंग लायसन काढण्याकडे दुर्लक्ष करतात.

ड्रायव्हिंग लायसन (Driving Licence Rules) काढण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. फॉर्म भरावा लागतो. त्याचप्रमाणे पैशांची देवाण-घेवाण आणि गैरव्यवहार देखील होण्याची यामध्ये शक्यता असते. या सगळ्या गोष्टी लक्षात असल्यामुळे आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबतच 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्स जे काही नियम आहे. त्यात देखील बदल केले जाणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये 1 जूनपासून बदल | Driving Licence Rules

  • आपल्याला जर सध्या ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल, तर त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आपल्याला जाऊन परीक्षा द्यावी लागते. परंतु या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेला असून नवीन नियमानुसार अर्जदार हे त्यांच्या पसंतीचे आणि सर्वात जवळच्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देखील देऊ शकतात.
  • एखाद्या खाजगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
  • ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल अशा वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वैद्य लायसन्स शिवाय वाहन चालकांना 2 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अल्पवयीन चालक सापडला तर 25 हजार रुपयांचा दंड आणि त्याच्या पालकावर कारवाई करण्याची शक्यता देखील आहे.
  • कोणत्या प्रकारच्या परवान्यामध्ये कोणती कागदपत्रे हवी याची यादी आता अर्जदाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी जी काही कागदपत्रे लागतात. त्याची पूर्तता आपल्याला सहज करता येणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स संबंधीच्या शुल्कामध्ये बदल

  • शिकाऊ परवाना अर्जातील करता 150 रुपये शुल्क
  • शिकऊ परवाना चाचणी शिल्पासाठी 50 रुपये शुल्क
  • ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये
  • ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी 200 रुपये शुल्क
  • आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन 1 हजार रुपये शुल्क
  • परवण्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडायचा असेल तर 500 रुपये
  • परवानाचे नूतनीकरण करायचे असल्यास 200 रुपये
  • परवानावरील पत्ता बदलायचा असल्यास 200 रुपये

Kisan Vikas Patra Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे होणार डबल; पहा कसा मिळेल फायदा?

Kisan Vikas Patra Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kisan Vikas Patra Scheme) गेल्या काही काळात लोकांना गुंतवणुकीचे महत्व चांगले पटले आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक उत्तम आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. ज्यातील बरेच पर्याय हे गुंतवणूक केलेला पैसे दुप्पट करण्याची चांगली संधी देतात. गुंतवणूक करायची म्हटली की, सर्वात आधी सुरक्षा आणि हमखास परतावा याचा विचार केला जातो. हे घटक लक्षात घेता गुंतवणूकदार आवर्जून सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. खास करून पोस्टाच्या योजना गुंतवणूकदारांची पहिली पसंती असल्याचे समोर आले आहे.

अशातच गुंतवणुकीतून हमखास परतावा मिळेल आणि तितकीच सुरक्षा प्रदान करणाऱ्या एका योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. (Kisan Vikas Patra Scheme) पोस्टाच्या योजनांना गुंतवणूकदार पसंती देतात कारण इथे निश्चित परतावा मिळतो. आज आपण ज्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत त्या योजनेत न केवळ निश्चित परतावा तर गुंतवलेले पैसे डबल म्हणजेच दुप्पट करण्यासाठी सरकार मदत करते. आता ही योजना कोणती आणि ती कशी फायदा देते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिसची योजना (Kisan Vikas Patra Scheme)

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बऱ्याच योजना चालवल्या जातात. त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना होय. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यास हमखास परतावा मिळतो. शिवाय पैशांची हमी सरकार स्वतः घेत. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. तसेच किसान विकास पत्र योजनेची खासियत सांगायची म्हणजे, यामध्ये खाते सुरु करणे फार सोपे आहे.

पैसे करता येतील दुप्पट

समजा तुम्ही या योजनेमध्ये तुमच्या कमाईतील ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाख रुपये मिळतात. मात्र, यासाठी तुम्हाला योजनेच्या काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजचे आई. (Kisan Vikas Patra Scheme) तसे न केल्यास ही योजना तुम्हाला काहीच फायदा देऊ शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर किसान विकास पत्र योजनेतून दुप्पट परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम ९ वर्ष ७ महिने अर्थात ११५ महिन्यांसाठी गुंतवावी लागेल. अर्थात तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे हे ११५ महिन्यांनी दुप्पट होतील. तसेच या योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर ७.५% दराने परतावा मिळेल.

कोणाला मिळेल लाभ?

सगळ्यात महत्वाचे सांगायचे झाले तर, किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला खाते उघडता येणे शक्य नाही. यामध्ये तुम्ही संयुक्त खाते उघडू शकता. समजा, एखाद्या मुलाचे वय १० वर्षापेक्षा जास्त असेल तर तोसुद्धा या योजनेचा भाग होऊ शकतो. (Kisan Vikas Patra Scheme)

कोणती कागदपत्रे लागतात?

किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे गरजची आहेत. यामध्ये आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट फोटो, किसान विकास पत्र एप्लीकेशन फॉर्म इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.

मॅच्युरिटीआधी पैसे काढता येतील का?

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर जर तुम्हाला काही कारणास्तव योजनेच्या मॅच्युरिटी आधी पैसे काढायचे असतील तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. तुम्ही गुंतवणूक सुरु केल्याच्या तारखेपासून २ वर्ष ६ महिन्यानंतर तुम्ही या योजनेचा परिपक्व कालावधी पूर्ण होण्याआधी काही रक्कम काढू शकता. (Kisan Vikas Patra Scheme)

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad : मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडींना करणार सन्मानित

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा नुकताच जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आनंदाची बातमी अशी की. मराठी कलाविश्वात दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अर्थात सर्वांचे लाडके मामा आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी याना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या घोषणेनंतर एकूणच नाट्य रसिकांमध्ये या पुरस्कार सोहळ्याबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

कधी आणि कुठे पार पडणार पुरस्कार सोहळा? (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १४ जून २०२४ रोजी हा पुरस्कार सोहळा मुंबईत, माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात पार पडणार आहे. यावेळी नाट्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंतांचा मेळावा आयोजित केला गेला आहे. यामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या सोहळ्यात आणखी कोणते पुरस्कार दिले जाणार?

माहितीनुसार, या सोहळ्यात अन्य काही महत्वाचे पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहेत. (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) ते खालीलप्रमाणे: –

1. लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार – गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्य)

2. डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार – प्रशांत जोशी

3. कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार – दीपाली घोंगे

4. कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार – शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक) (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

5. बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार – विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)

6. वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार – संजय देवधर (समीक्षा)

7. अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार – गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)

8. सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक – प्रणीत बोडके

9. नाट्य मंदार पुरस्कार – अशोक ढेरे

10. उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार – अशोक बेंडखळे (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

11. कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार – श्याम आस्करकर

12. विशेष पुरस्कार – रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार)

13. कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार – प्रायोगिक नाट्यसंस्था : अभिनय संस्था (कल्याण) – अभिजीत झुंझारराव (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad)

Weather Update | मुंबईमध्ये वाढले तापमान, तर कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; जाणून तुमच्या शहराचे वातावरण

Weather Update

Weather Update | मान्सून राज्यात येण्यासाठी अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे. अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस चांगला पडत आहे. काही ठिकाणी वातावरण तयार होत आहे. परंतु पाऊस मात्र येत नाही. राज्यांमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा दाह वाढलेला आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे तापमान अगदी 40 च्या पार गेलेले दिसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) मुंबईमध्ये हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे येथे जास्त प्रमाणात काळा जाणवत आहे. येथील तापमानाचा आकडा जास्त नसला, तरी उष्णतेचा दाह मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांना जाणवत आहे. शहरांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी मात्र कडाक्याचे ऊन पडलेले दिसत आहे.

हवामान दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये वातावरणात जास्त बदल होणार नाही. परंतु संध्याकाळी ज्यावेळीला पावसाची चिन्हे दिसू शकतात. मुंबई आणि उपनगरावर महाराष्ट्रात बाजूंच्या आगमन इतक्यात होणार नाही. त्यामुळे शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हवामान कोरडे असणार आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पुढील 48 तासांमध्ये मान्सून बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापणार असून निकोबार बेटावर देखील श्रीलंकेच्या बहुतांश ठिकाणी मान्सून येणार आहे. मान्सूनच्या वारसा वेगळीचा मंदावल्यामुळे भारतात आणि प्रामुख्याने दक्षिण भारतात महाराष्ट्रात उकडा वाढणार, असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

Accident News: वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Accident news

Accident News| 24 मे रोजी सकाळच्या वेळी वैष्णो देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर झाला असून अपघातावेळी बसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते. त्यामुळे यातील काही प्रवाशांना ही गंभीर दुखापत झाली आहे. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. तर मृतांना शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मिनी बस 27 प्रवाशांना घेऊन वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेली होती. मात्र ही बस दिल्ली- जम्मू नॅशनल हायवेवर येताच तिचा भीषण अपघात झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात घडला त्यावेळी जखमी झालेल्या लोकांच्या किंचाळ्या स्थानिकांच्या कानावर पडल्या. त्या ऐकून स्थानिक लोक तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी स्थानिक पोलिसांना ही घटनास्थळी बोलवून घेतले आणि बसमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले.

अपघात कसा झाला?? (Accident News)

या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. तर मृतांना शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिनी बसचे एका ट्रॅक्टरला धडक बसली होती. ही बस हायवे वरून जात असताना बसच्या पुढे एक ट्रॅक्टर होता. या ट्रॅक्टरच्या चालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे बस थेट ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या अपघातानंतर ट्रॅक्टरचा चालक तिथून फरार झाला. जखमींनी पोलिसांना सांगितले की, ट्रॅक्टर मधला चालक दारू पिऊन गाडी चालवत होता. त्याने अचानक ब्रेक मारल्यामुळे बस ट्रॅक्टरला धडकली. यामुळे बसचे मोठे नुकसान झाले. आता या सर्व माहितीच्या आधारावर पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करीत आहेत.

National Health | नॅशनल हेल्थ क्लेम एक्सचेंज तीन महिन्यांत होणार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने IRDAI सोबत केली हातमिळवणी

National Health

National Health | येत्या दोन ते तीन महिन्यातच नॅशनल हेल्थ प्लॅन एक्सचेंज सुरू होण्याची शक्यता आहे. NHCX ने हेल्थ अतिरीतीने विकसित केलेल्या डिजिटल हेल्थ क्लेम प्लॅटफॉर्म आहे आणि. ते पारदर्शकतेसह आरोग्य विमा दाव्याच्या प्रगतीला गती देणार आहे.

मागील वर्षी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी NHCX लाँच (National Health) करण्यासाठी हातमिळवणी केली. विमा कंपन्यांकडे स्वतंत्र पोर्टल आहेत आणि रुग्णालये, रुग्ण आणि इतर भागधारकांसाठी लक्षणीय विलंबासह आरोग्य विमा दाव्यांची प्रक्रिया करतात.

परंतु आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत विकसित केलेल्या NHCX च्या माध्यमातून सर्व विमा कंपन्या एका व्यासपीठावर असतील. हे हेल्थकेअर आणि हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टममधील विविध भागधारकांमध्ये दाव्यांच्या संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करेल. पॉलिसीधारक आणि रुग्णांना NHCX कडून आरोग्य दाव्यांच्या जलद प्रक्रियेचा फायदा होईल.

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनी आणि HDFC ERGO इन्शुरन्स, ICICI Lombard General Insurance, The New India Assurance Company यासारख्या विमा कंपन्या NHCX मध्ये सामील झाल्या आहेत.

Sindhudurg Boat Accident : सिंधुदुर्गातील वेंगुर्लेत बोट पलटी; 7 खलाशी बुडाले

Sindhudurg Boat Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाण्यात जाणाऱ्यांसाठी हा आठवडा धोक्याचा ठरला आहे. २ दिवसांपूर्वी उजनी जलाशयात बोट उलटून 6 प्रवासी गेले तर त्यानंतर नगरमध्ये ४ जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले बंदरात सुद्धा बोट पलटी (Sindhudurg Boat Accident) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटल्याने सात खलाशी बुडाले. यातील तिघांनी पोहून किनारा गाठला तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं- Sindhudurg Boat Accident

याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.त्याच दरम्यान काल रात्री वेंगुर्ले बंदरात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन बोट घऊन जात असताना अचानकपणे ती बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण सात खलाशी होते. बोट पलटी झाल्यानंतर (Sindhudurg Boat Accident) तीन जणांनी पोहत पोहत किनारपट्टी गाठली मात्र बाकीचे ४जण मात्र बेपत्ता झाले. यातील २ जणांचा मृतदेह सापडला तर दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. अचानक घडलेल्या या घटनेनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वाऱ्यामुळे ही बोट भरकटली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. महत्वाची बाब म्हणजे मागील ३ दिवसात बोट बुडाल्याची हि तिसरी घटना आहे. यापूर्वी उजनी जलाशयात बोट उलटली होती तसेच अहमदनगर SDRF च्या टीमची बोट बुडाल्याने खळबळ उडाली होती. या दोन्ही घटनेत लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यात आता सिंधुदुर्गात सुद्धा बोट पलटी झाल्याने भीतीची वातावरण निर्माण झालं आहे