Saturday, December 20, 2025
Home Blog Page 751

शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट लोकसभेनंतर उचलणार मोठं पाऊल ?

Uddhav thackeray sharad pawar

हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायचीच! महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचारातील हे गाजलेलं वाक्य… लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडताना तुतारी, मशाल आणि पंज्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढलेत. त्यामुळे सध्यातरी वातावरण तसं चील आहे… पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार आपल्या पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होतील (Regional Parties to Merge In Congress) … अशा बऱ्याच वावड्या उठल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार याची मोठी माहिती समोर आलीय… प्रादेशिक पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरत असताना आता लोकांची सहानुभूती लाभत असलेले हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याने राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडण्याची शक्यता आहे… पण खरंच शरद पवार (Sharad Pawar) आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन्ही मोठे नेते आपापली पॉलिटिकल आयडेंटिटी सोडून काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता का आहे? याचा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणात कसा होईल? हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात…

तर गोष्ट सुरू होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्टेटमेंटपासून… राज्यातील दोन पक्ष लवकरच संपुष्टात येतील किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होतील. असं जाहीरपणे सांगून चव्हाणांनी नव्या वादाला तोंड फोडलं. चव्हाणांच्या या स्टेटमेंटनंतर सगळ्यांच्याच नजरा तुतारी आणि मशालीकडे गेल्या… हे कमी होतं की काय म्हणून शरद पवारांनीही यात भर घातली… लवकरच देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील… व काँग्रेसमध्ये विलीन होतील… असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाची आणि काँग्रेसची विचारधारा एकच असून पुढील निर्णय सहकाऱ्यांना विचारून घेतला जाईल… असं स्टेटमेंट करून शरद पवार आपल्या पक्षासह लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, या चर्चेला आणखीनच हवा दिली…

पण आता थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होतील, अशी गॅरंटी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलीये. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाची उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराच्या वेळेस पंतप्रधानांनी अनेक गौप्यस्फोट केले… नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणारच आहे. हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणायचे की, मला काँग्रेससोबत जाण्याचे वेळ आली की, मी माझे दुकान बंद करेल. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही…असं म्हणत पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसमध्ये दिसतील यावर जणू शिक्कामोर्तब केलाय…

एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला… तर पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसमधून केली… काँग्रेस पक्षात असतानाच त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मान मिळाला… नंतरच राजकारण बदललं आणि त्यांनी राजकारणाचं नवं समीकरण जन्माला घालत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली… पण असं असलं तरी पक्षाचा बेस हा काँग्रेसच्या विचारांचाच होता… म्हणूनच की काय त्यानंतर लगेच वर्षभरात झालेल्या निवडणुकीनंतर त्यांनी याच काँग्रेस सोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं… यानंतर महाराष्ट्रातील त्यांचं राजकारण काँग्रेसला पूरक असंच राहिलं. सध्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष टिकवण हे अवघड आहे… आधीच अजित दादांनी पक्षात बंड करून राष्ट्रवादीवर क्लेम केल्याने याला आणखीनच बळ मिळालं… हाच धडा लक्षात घेऊन राजकारणात मुरलेल्या शरद पवारांना आता मुख्य धारेतील पक्षाची गरज वाटतेय.. म्हणूनच पवार हे कुठलाही आड पडदा न ठेवता काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं बोलायला चान्स उरतो…

प्रश्न उरतो तो शिवसेनेचा… मुळात शिवसेनेचा जन्मच काँग्रेसला विरोध करून झाली… बाळासाहेबांनी काँग्रेसच्या विचारांचा जाहीर सभेतून भुगा पाडत आपलं राजकारण पुढे रेटलं. शिवसेनेच्या उदयामुळेच काँग्रेसचं मुंबईतील अस्तित्व संपुष्टात आलं… त्यात हिंदुत्व हा बेस धरून शिवसेना राजकारण करत असल्याने तो पक्ष कधी काँग्रेसच्या सोबत जाईल याचा कोणी विचारही केला नव्हता… पण हे घडलं 2019 मध्ये… महाविकास आघाडीचा प्रयोग करून शरद पवारांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांची मोट बांधली… यानंतरचा गेला बाजार इतिहास आपल्याला माहित आहेच! थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसच्या फेवर मध्ये गेली… हळूहळू पक्षाच्या हिंदुत्वाच्या कन्सेप्टही बदलत गेल्या.. सध्याचं राजकारण भावनिकतेवर चालत असलं तरी यापुढे त्यांना एक कुठलातरी वैचारिक स्टॅन्ड घेणं गरजेचं आहे… अशा वेळेस उत्तरा अर्थातच येतं ते नाही! उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची सध्यातरी शक्यता दिसत नाही… कारण यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या सेप्रेट आयडेंटिटीला धक्का बसतो.. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला पूरक म्हणजेच भाजपच्या विरोधात भूमिका घेतील. पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा होत असलेल्या चर्चा या चर्चाच म्हणाव्या लागतील…

Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबई लोकलच्या या मार्गांवर मेगाब्लॉक राहणार

Mega Block News

Mumbai Local Mega Block: रविवार म्हणलं की मुंबई लोकलला सर्वात जास्त गर्दी पाहिला मिळते. रविवारच्या दिवशी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वात जास्त असते. परंतु मुंबई लोकलने रविवारचे मेगाब्लॉक घेतले की प्रवाशांचे हाल होतात. आता या रविवारी ही लोकल प्रवाशांना याच मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. येत्या 19 मे 2024 रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. यामुळे रविवारी रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो. (Mumbai Local Mega Block)

मिळालेल्या माहितीनुसार, उपनगरी रेल्वे रुळांवरील दुरुस्ती काम आणि सिग्नल यंत्रणेबाबत तांत्रिक काम करण्यात येणार असल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गाच्या माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गाच्या कुर्ला- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक राहील. यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अधिकच्या गर्दीचा सामना करावा लागेल.

मेगाब्लॉकमुळे झालेले बदल (Mumbai Local Mega Block)

मध्य रेल्वेमार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील. त्यामुळे CSMT वरून निघणाऱ्या Fast Local माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. यासह पुढे या लोकल ठाण्यापासून जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाण्यामधून सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड ते माटुंग्यादरम्यान अप धिम्या मार्गावर धावतील.

हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11.10 मिनिटांपासून सायंकाळी 4 वाजून 10 मनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील. याकाळात वाशी, बेलापूर आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द असतील. तसेच, सीएसएमटीहून पनवेल, वाशी आणि बेलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल देखील बंद असतील. (Mumbai Local Mega Block)

INDIA आघाडीचा पंतप्रधान कोण?? ठाकरे म्हणतायत आमचं ठरलंय!!

Uddhav Thackeray on INDIA Alliance PM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) पंतप्रधान कोण होणार याची चिंता नरेंद्र मोदी यांनी करू नये .. कोणाला पंतप्रधान करायचं याबाबत आमच ठरलय अशी मोठी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली. आज कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विविध राजकीय मुद्द्यावरून त्यांनी भाजप आणि NDA आघाडीवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडी हि देशाची लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी केली आहे. इंडिया आघाडीकडे भरपूर पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत असं नरेंद्र मोदी म्हणतात याचा अर्थ त्यांनी मान्य केलं आहे कि त्यांचे सरकार येत नाही. आमच्याकडे चेहरा कोण हा प्रश्नच नाही… प्रश्न आहे तो म्हणजे भाजपकडे.. त्यांच्याकडं एकच चेहरा आहे तो पण आता चालत नाही. आमच्या इंडिया आघडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. त्याबाबत काय करायचं हे आमच्या बैठकीत ठरलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानाने चर्चाना उधाण आलं आहे. (Uddhav Thackeray on INDIA Alliance PM)

दरम्यान, केंद्र सरकारला मुंबई तोडायची आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा यावर भाजपचा भर आहे, शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, मात्र आता 4 जूनला जुमला पर्व संपत आहे. 4 जूनला अच्छे दिनला सुरुवात होईल. अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली . आमचं सरकार आल्यावर मुंबई आणि महाराष्ट्रचा वैभव आम्ही परत आणू, आमचे सरकार आल्यावर आम्ही राम मंदिराचे अपुरे राहिलेले काम पूर्ण करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली . मोदी मला नकली म्हणतात म्हणून मी त्यांना बेअकली म्हणतो असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाही.

इंडिया आघाडी महाराष्ट्रात 46 जागा जिंकेल

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी कमीत कमी 46 जागांवर विजय मिळवेल असा मोठा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. सध्याचे वातावरण बघता आम्ही लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी कमीत कमी ४६ जागा जिंकू. याचा अर्थ विरोधकांना त्यांना शून्य जागा मिळतील असं मी बोलत नाही. काही ना काही त्यांना मिळेल परंतु आमची आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाला हरवेल असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.

Accident News: भाविकांच्या बसला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; 9 जणांचा मृत्यू तर 24 हून अधिकजण जखमी

Accident News

Accident News| शुक्रवारी रात्री हरियाणातील नूह येथे धार्मिक यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये आगीत होळपळून तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये सुमारे 64 भाविक प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान बसमध्ये शॉर्टसर्किट झाले. ज्यामुळे संपूर्ण बसला आग लागली. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी प्रवासी बसच्या खिडक्या फोडून बाहेर पडले. (Accident News) परंतु ज्या प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती बसला आग लागल्याचे दुर्घटना घडली. ही आग 17 ते 18 मे च्या रात्री 1.30 च्या सुमारास लागली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासी लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. (Accident News) हे प्रवासी मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन पुन्हा आपल्या घरी परतत होते. परंतु घरी परतण्याच्यापूर्वीच या सर्व प्रवाशांवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे नूह मार्गावर गोंधळ उडाला होता. तसेच, वाहतूक खोळंबली होती.

महत्वाचे म्हणजे, बस लागल्याची माहिती मिळतात स्थानिक स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने ही आग भिजवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र या सर्व घटनेची माहिती पोलिसांना दिली असतानाही पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा आले, असे आरोप लावण्यात येत आहेत. सध्या या घटनेमुळे संबंधित प्रवाशांच्या कुटुंबावर सुखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसऱ्या बाजूला, सोशल मीडियावर ही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

शॉर्टसर्किटमुळे बसला आग (Accident News)

प्राथमिक माहितीनुसार, या बसला शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागण्याचे समोर आले आहे. ही आज लागली असल्याची माहिती चालत आला आहे समजले नव्हती असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. जेव्हा ही बस थांबवण्यात आली तोपर्यंत बसमध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.

Monsoon Update | ‘या’ दिवशी केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Monsoon Update

Monsoon Update | शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एका महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे यावर्षी 21 मे रोजी केरळमध्ये पाऊस दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावर्षी 7 जून रोजी कोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी मान्सून 11 तारखेला दाखल झाला होता. परंतु या वर्षी तो 7 जून रोजी दाखल होण्यार आहे. मागच्या वर्षी 8 जून रोजी केरळमध्ये पाऊस दाखल झाला होता. आणि राज्यात 11 जून रोजी मान्सूनचा (Monsoon Update) आगमन झालं होतं. परंतु यावर्षी लवकरच पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यात काही दिवस अवकाळी पाऊस पडणार | Monsoon Update

हवामान विभागाने जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होणार असला, तरी पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल. असे देखील सांगण्यात आलेले आहे.

यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरी पेक्षा जास्त म्हणजे 106% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. हिंदी महासागरात जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निनो परिस्थिती निर्माण होईल. त्याचा परिणाम नैऋत्य मान्सून होणार आहे. त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची सरबत शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी | Monsoon Update

राज्यामध्ये सध्या मान्सून पूर्व अवकाळी पाऊस अनेक राज्यात पडत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. कोकणात रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये मान्सून पूर्व पाऊसाने हजेरी लावलेली आहे.

JP Nadda On RSS : सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची, आता आम्ही सक्षम झालोय – जेपी नड्डा यांचे महत्वाचे विधान

JP Nadda On RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (JP Nadda On RSS) एक मोठं विधान केलं आहे. सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची, आता आम्ही सक्षम झालोय असं त्यांनी म्हंटल आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळाच्या तुलनेत भाजपमधील आरएसएसची उपस्थिती कशी बदलली आहे? या प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, पक्षाची रचना मजबूत झाली आहे. आता भाजप स्वबळावर चालतो. भर निवडणुकीच्या काळात नड्डा यांनी केलेले हे विधान चर्चेत आलं आहे.

भाजप स्वतःच स्वतःला चालवत आहे- JP Nadda On RSS

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, वाजपेयींच्या काळात पक्षाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. त्यामुळे आम्हाला आरएसएसची (JP Nadda On RSS) गरज होती. मात्र आता आम्ही मोठे झालो आहोत, पूर्वीपेक्षा आम्ही अधिक सक्षम झालो असून भाजप स्वतःच स्वतःला चालवत आहे.

भाजपला आरएसएसच्या पाठिंब्याची गरज आहे का, असा सवाल केला असता जेपी नड्डा म्हणाले की, भारतीय जनता पक्ष मोठा झाला आहे आणि पक्षाचे नेते त्यांची भूमिका आणि कर्त्यव्य व्यवस्थित पार पाडत आहेत. आरएसएस ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. आरएसएस वैचारिकपणे काम करत आहे. तर आम्ही आमचा कारभार आमच्या पद्धतीने हाताळतो. आणि हेच राजकीय पक्षांनी केले पाहिजे,” असे जेपी नड्डा यांनी म्हंटल.

Kanhaiya Kumar Slapped : कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्याच्या बहाण्याने कानाखाली मारली (Video)

Kanhaiya Kumar Slapped

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला आहे. गळ्यात हार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या या व्यक्तीने थेट कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लावली (Kanhaiya Kumar Slapped), तसेच कन्हैया कुमार यांच्यावर त्याने शाईफेक सुद्धा केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. यानंतर कन्हैया कुमारच्या समर्थकांनी हल्लेखोराला मारहाण केली.

नेमकं काय घडलं? Kanhaiya Kumar Slapped

याबाबत अधिक माहिती अशी कि, कन्हैया कुमार यांना काँग्रेसनं उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात कन्हैया कुमार स्थानिक आप नगरसेविका छाया शर्मा यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर कन्हैया कुमार कार्यालयातून बाहेर पडत असताना समोर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. आधी हार घालून नंतर कन्हैया कुमार यांच्या कानशिलात (Kanhaiya Kumar Slapped) लगावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर कन्हैया कुमार गाडीत चढला आणि लोकांना आव्हान देऊ लागला. कन्हैयाने भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर निवडणूक हरण्याच्या भीतीने गुंड पाठवल्याचा आरोप केला. भाजप 400 चा आकडा पार करण्याची तयारी करत नाही, तर लोकशाही नष्ट करण्याची तयारी करत आहे. आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना कन्हैया कुमारने व्यक्त केली.

Railway Recruitment 2024 | कोणतीही परीक्षा न देता होणार थेट रेल्वेमध्ये भरती, असा करा अर्ज

Railway Recruitment 2024

Railway Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. कारण आता उत्तर निवासी पदे भरण्यासाठी अर्ज मागवलेले आहेत. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. 27 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.

पदाचे नाव | Railway Recruitment 2024

या भरती अंतर्गत वरिष्ठ निवासी पदे भरली जाणार आहे.

एकूण रिक्त पदे

रेल्वेच्या या भरती अंतर्गत 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रेल्वेत निवड झाल्यावर पगार

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल 7 CPC नुसार मॅट्रिक्स लेव्हल-11 अंतर्गत रुपये 67700 ते 208700 रुपये दिले जातील.

पात्रता | Railway Recruitment 2024

उमेदवारांनी MCI/NBE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

अशा प्रकारे निवड होईल

अधिकृत अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Benefits of Ashwagandha | अश्वगंधाचे शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे; अशा पद्धतीने करा सेवन

Benefits of Ashwagandha

Benefits of Ashwagandha | अश्वगंधाला आपल्या आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. अश्वगंधाचे एक दोन नाही तर अनेक गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्रिया या दोघांनाही अश्वगंधा खूप फायदेशीर असते. बऱ्याच वेळा लोकांना अश्वगंधाच्या गुणधर्म बद्दल माहिती नसते. आजकाल लोकांच्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यावर मात करण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. तुम्हाला जर तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल, शारीरिक कमजोरी, झोप न लागणे, वंध्यत्व यांसारख्या समस्या असेल, तर अश्वगंधा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता अश्वगंधाचे (Benefits of Ashwagandha) आपल्याला नक्की कोणकोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेणार आहोत.

तणाव मुक्त | Benefits of Ashwagandha

आजकाल प्रत्येकजण चिंता आणि तणावाने त्रस्त आहे. अशा परिस्थितीतगरम दुधात अश्वगंधा मिसळून प्यायल्याने तुम्हाला चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. मूड स्विंगसाठी जबाबदार हार्मोन्सचे व्यवस्थापन करण्यासाठी हे एक अद्भुत औषधासारखे देखील कार्य करते.

झोप सुधारणे

अश्वगंधामध्ये ॲडाप्टोजेन नावाचे संयुग असते, जे कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. झोपेच्या कमतरतेसाठी कोर्टिसोल हार्मोनची वाढलेली पातळी जबाबदार आहे. अशा परिस्थितीत दररोज झोपण्यापूर्वी कोमट दुधात अश्वगंधाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदात अश्वगंधा हा रामबाण उपाय मानला जातो. आपण पुरुष असो वा स्त्रिया, दोघांमधील वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी अश्वगंधा एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध आहे. याच्या सेवनाने केवळ थकवा दूर होत नाही तर पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत लक्षणीय वाढ होते.

त्वचा निरोगी ठेवते | Benefits of Ashwagandha

व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या अश्वगंधाचे सेवन केल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे जळजळ दूर करते आणि आपल्या त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते. याशिवाय, दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे ते जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.