Friday, December 19, 2025
Home Blog Page 762

NCERT Recruitment 2024 | ‘या’ ठिकाणी सरकारी नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार 35 हजार रुपये पगार

NCERT Recruitment 2024

NCERT Recruitment 2024 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला नॅशनल शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एनसीईआरटीमध्ये (NCERT Recruitment 2024) नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. एनसीईआरटी मध्ये एक मोठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा न देता थेट सरकारी नोकरीची संधी मिळत आहे.

या भरतीमध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत सीनियर रिसर्च असोसिएट आणि जेपीएफ या पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख | NCERT Recruitment 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी 22 मे 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्हाला अर्ज करायचे आहेत.

एकूण रिक्त पदांची संख्या

  • सीनियर रिसर्च एसोसिएट्स (SRA) : 2 पदे
  • जेपीएफ (JPF) : 4 पदे

शैक्षणिक पात्रता

SRA : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हिंदी किंवा उर्दूमध्ये 50% गुणासह पदवीत्तर पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागात दोन वर्षाचा काम करण्याचा अनुभव असावा.

JPF : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह हिंदी आणि उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.

वयोमर्यादा

SRA : या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा कमी असावी.
JPF : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे.

Samruddhi Mahamarg : आनंदाची बातमी ! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार, जोडली जाणार 2 महत्वाची शहरं

samrudhi mahamarag

Samruddhi Mahamarg : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग. हा प्रकल्प ९५ टक्के पूर्ण झाला आहे. लवकरच हा मार्ग प्रवाशांकरिता खुला होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बाब म्हणजे या महामार्गाचा विस्तार (Samruddhi Mahamarg) होणार असून राज्यातील आणखी २ महत्वाची शहरे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. चला जाणून घेऊया या महामार्गाच्या विस्ताराबाबत

खरेतर या प्रकल्पातील तीन महामार्गांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या. या निवेदाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, चंद्रपूरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते चंद्रपूर, नागपुर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 46 निविदा दाखल झाल्या आहेत. एमएसआरडीसीने या महामार्गासाठी तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यानंतर आठवड्याभरातच आर्थिक निविदा खुल्या (Samruddhi Mahamarg) केल्या जाणार आहे. लवकरच या प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नियुक्ती होणार आहे.

कसा असेल मार्ग ? (Samruddhi Mahamarg)

या विस्तारीकरणाचे उद्देश म्हणजे राज्याच्या सीमावर्ती भागांना मुंबईशी जोडणे हा आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. नागपूर ते चंद्रपूर असा 195 किमी लांबीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. तर, नागपूर ते गोंदिया असा 162 किमी व भंडारा ते गडचिरोली असा 142 किमी लांबीचा महामार्ग (Samruddhi Mahamarg) उभारण्यात येणार आहे. हे तिन्ही महामार्ग खुले झाल्यानंतर विदर्भातील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार पाऊसाचा हाहाकार; 2 ठिकाणी कोसळले मोठमोठे होर्डिंग; Video Viral

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने (Mumbai Rain) वादळ वाऱ्यासह हजेरी लावली आहे. सुरुवातीला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये पावसाळी हजेरी लावली होती. पुढे ठाणे शहर, नवी मुंबई, पालघरमध्ये आहे पाऊस कोसळायला सुरुवात झाली. बघता बघता मुसळधार पावसासह वेगाने वारे वाहू लागले. ज्यामुळे मुंबईत 2 ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग कोसळतानाचे दृश्य कॅमेरातही कैद झाले आहे. ज्यात अनेकजण या होर्डिंग खाली दबले गेल्याचे दिसत आहे.

सर्वात प्रथम मुंबईत वादळी वाऱ्यामुळे वडाळ्यात होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली. ही दुर्घटना श्री जी टॉवरजवळ घडली. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस मदतीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून होर्डिंग खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक सेवा ही खोळंबली आहे. तर, मुसळधार पाऊस ही कोसळत असल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, वडाळ्यातील कोसळलेल्या होर्डिंग खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना
घाटकोपर मध्ये रमाबाई परिसरातही मोठे होर्डिंग कोसळली आहे. हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहिला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, या होर्डिंग खाली 100 पेक्षा जास्त नागरीक आणि वाहने अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने बचाव यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे.

Income Tax Rules : तुम्हीही करता ‘असे’ व्यवहार? तर सावधान!! आयकर विभाग कधीही नोटीस पाठवेल

Income Tax Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Income Tax Rules) आपल्या दैनंदिन शैलीत आपण अनेक छोटे मोठे आर्थिक व्यवहार करत असतो. यातील प्रत्येक व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर असते. त्यामुळे आयकर विभागाच्या नियमाबाहेर जाऊन कोणतेही व्यवहार करणे आपल्या अंगलट येऊ शकते. आजकाल अनेक लोक ऑनलाईन देखील आर्थिक व्यवहार करतात. अगदी मोठमोठ्या रक्कमेचे व्यवहार ऑनलाईन स्वरूपात सोप्या पद्धतीने होतात.

त्यामुळे बरेच लोक ऑनलाईन तर काही ऑफलाईन देखील व्यापार करतात. पण असे व्यवहार करताना तुमच्याकडून एखादी चूक झाली तर समजा तुमची वाट लागलीच. कारण तुमच्या प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवणारं आयकर विभाग या चुकांसाठी तुमच्यावर मिनिटांत कारवाई करू शकत. (Income Tax Rules) याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

आयकर विभागाकडून नवीन आर्थिक वर्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र ITR भरताना जरा जपून. कोणतीही चूक झाली तर तुम्हाला महागात पडू शकते. तर कोणत्या चुका झाल्याने कारवाईला तोंड द्यावे लागेल याविषयी जाणून घेऊया.

प्रॉपर्टी व्यवहार (Income Tax Rules)

जर तुम्ही प्रॉपर्टी रजिस्ट्रारसोबत रोखीने मोठा व्यवहार करत असाल तर याचा पूर्ण रिपोर्ट प्राप्तिकर विभागाकडे जातो. त्यामुळे एका आर्थिक वर्षात ३० लाख वा त्यापेक्षा जास्त रकमेची मालमत्ता तुम्ही रोख स्वरूपात खरेदी करत असाल तर त्याची नोंदणी आणि मुद्रांक विभाग अशा व्यवहारांची माहिती आयकर विभागाला द्या. याबाबत माहिती न दिल्यास तुम्हाला संबंधित प्रॉपर्टीबाबत विचारणा केली जाऊ शकते. योग्य माहिती न मिळाल्यास आयकर विभाग तुमच्यावर तडक कारवाईच्या दृष्टीने नोटीस पाठवू शकते.

शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बाँड्स खरेदी

जर तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगायची गरज आहे. कारण, जर तुम्ही एका आर्थिक वर्षात अशा व्यवहारांसाठी जास्तीत जास्त १० लाख रुपये रोख खर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. (Income Tax Rules) त्यामुळे शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बॉंड्समध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरायची नाही हे लक्षात घ्या. अन्यथा आयकर विभागाकडून तुमच्यावर कारवाई झाली म्हणून समजाच.

क्रेडिट कार्डचे मोठे बिल

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणार नाही याची काळजी घ्या. कारण तुमच्या कार्डचे बिल १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि ते तुम्ही रोख स्वरूपात भरलात तर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत नेमका काय आहे? याविषयी आयकर विभाग तुम्हाला विचारणा करेल. (Income Tax Rules) याबाबत तुम्ही योग्य ती माहिती देऊ शकला नाहीत तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून तुमच्यावर कारवाई शकते.

बँक मुदत ठेव (FD)

मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करताना एका आर्थिक वर्षात एफडीमध्ये १० लाख वा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलात तर याबाबत तुम्हाला आयकर विभागाकडून विचारणा केली जाऊ शकते. याबाबतची योग्य माहिती न दिल्यास कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर बहुतेक पैसे FD मध्ये ऑनलाइन माध्यमातून किंवा चेकद्वारे जमा करा.

बचत खाते ठेव

जर तुमचे खाते खाजगी किंवा सहकारी बँकेत असेल आणि वर्षभरात तुम्ही तुमच्या बचत खात्यात १० लाख वा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलीत तर, याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. (Income Tax Rules) याबाबत जर तुम्ही आयकर विभागाला माहिती दिली नाहीत तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते.

Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीचा लूटा मनमुराद आनंद ; भेटी द्या ‘या’ अप्रतिम हिल स्टेशन्सना

Travel

Travel : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी , समुद्रकिनारी भटकायला जायला कुणाला आवडणार नाही ? खरंतर उन्हाळ्याच्या दिवसात थंड ठिकाणी फिरायला जाणे अनेकांना आवडते. जर तुम्ही सुद्धा असे काही पर्याय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशी काही थंड हवेची ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही उन्हाळी सुट्टीचा (Travel ) मनमुराद आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया…

दक्षिण भारत खूप सुंदर प्रदेश आहे. प्रत्येकाने एकदा दक्षिण भारताला भेट द्यावीच असे हे ठिकाण आहे. उत्तर भारताप्रमाणेच दक्षिण भारतातही अनेक हिल स्टेशन्स आहेत. आज आपण त्याच बद्दल जाणून घेणार आहोत. दक्षिण भारतातील पर्यटक समुद्रकिनाऱ्यांचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. शिवाय तुम्ही अनेक मंदिरांनाही तिथे भेट देऊ शकता.

उटी, तामिळनाडू (Travel )

सदाहरित निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेले, उटी हे दक्षिण भारतात भेट देण्याच्या सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. विस्तीर्ण चहाचे मळे, घनदाट जंगले आणि प्राचीन तलावांसह, ऊटी प्रत्येक वळणावर शांत वातावरण तुमचे मन प्रसन्न करेल. शिवाय तुम्ही उटी तलावावर आरामशीर बोट राईडचा आनंद घेऊ शकता. निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हच्या निसर्गरम्य पायवाटा एक्सप्लोर करू शकता. शिवाय युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक निलगिरी माउंटन (Travel ) रेल्वेवर राइड घेऊ शकता.

कुर्ग, कर्नाटक

पश्चिम घाटात वसलेले, कुर्ग, ज्याला अनेकदा भारताचे स्कॉटलंड म्हटले जाते, त्याच्या धुक्याने झाकलेल्या टेकड्या आणि हिरव्यागार लँडस्केपने पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. कॉफीचे मळे, धबधबे आणि मसाल्याच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेले कूर्ग निसर्गप्रेमींसाठी आनंददायी वातावरण देते. प्रवासी मंत्रमुग्ध करणाऱ्या ॲबी फॉल्सला भेट देऊ शकता.

मुन्नार, केरळ (Travel )

मुन्नार हे आणखी एक हिरवेगार नंदनवन आहे जे त्याच्या विस्तीर्ण चहाचे मळे, हिरवीगार जंगले आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिरव्यागार दऱ्या आणि धुक्याने आच्छादलेल्या टेकड्यांच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, कोलुकुमलाईच्या नयनरम्य चहाच्या बागांचे अन्वेषण करण्यासाठी किंवा मूळ अनामुडी शिखरापर्यंत ट्रेक करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. एरविकुलम राष्ट्रीय उद्यान देखील पाहण्यासारखे आहे.

कोडाईकनाल, तामिळनाडू

घनदाट जंगले आणि टेकड्यांनी वेढलेले, ठिकाण नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. निसर्गरम्य कोडाईकनाल तलाव, विहंगम दृश्ये देणारा मंत्रमुग्ध करणारा कोकर वॉक आणि सिल्व्हर कॅस्केड धबधबा यांसारखी पर्यटकांची आकर्षणे तुम्हाला खिळवून ठेवतील. पर्यटक पिलर रॉक्सच्या ट्रेकला जाऊ शकता. ब्रायंट पार्क हे देखील तिथे पाहण्यासारखे ठिकाण (Travel ) आहे.

वायनाड, केरळ (Travel )

पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेले, वायनाड हे एक प्राचीन हिल स्टेशन आहे जे हिरवेगार, धबधबे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. तुम्ही शांत पुकोडे तलाव, भव्य मीनमुट्टी धबधबे किंवा प्रागैतिहासिक पेट्रोग्लिफ्सने सजलेल्या प्राचीन एडक्कल लेण्यांद्वारे काही विश्रांतीसाठी वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी भेट देणे निवडू शकता. वायनाड विस्तीर्ण थोलपेटी आणि मुथंगा वन्यजीव अभयारण्यांमध्ये वन्यजीव सफारीसाठी (Travel ) सुद्धा प्रसिद्ध आहे.

सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ; काँग्रेसची मोठी घोषणा

Congress party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विजय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून आता काँग्रेसने जनतेला आश्वासन दिले आहे की, “इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देऊ”. ज्यामुळे आता काँग्रेस या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

नुकतेच काँग्रेस नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी X वर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन आहे” असे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नवा वाट पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये काय म्हणले??

जयराम रमेश X वर ट्विट करत म्हणले आहे की,” डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला होता. 11 जुलै 2014 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही निर्णय घेतला नाही. इंडीया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा  दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत आहे”

त्याचबरोबर, “मराठीच्या समृद्ध अभिजात इतिहासाचा पुरावा देणारा सबळ अहवाल यूपीएच्या अखेरीस सादर शासनाकडे करण्यात आला असे असुनही मागील 10 वर्षातील काळात नरेंद्र मोदींनी एकही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही किंवा नोंद केलेली नाही. मार्च 2022 मध्ये काँग्रेस खासदार श्रीमती रजनी पाटील यांनी याबद्दल राज्यसभेत आवाज उठवला होता तरी पण या बाबतीत पूर्ण 2 वर्षे उलटूनही पंतप्रधान मौन आणि निष्क्रिय आहेत. आम्हाला विश्वास आहे की, महाराष्ट्रातील मतदार या पंतप्रधानांना त्यांच्या मराठीबद्दलच्या असलेल्या त्यांच्या उदासिनते बद्दल चांगलाच धडा शिकवतील” असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Monsoon Picnic Spot: ही आहेत महाराष्ट्रातील शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे; पावसाळ्यात आवश्य द्या भेट

Monsoon Picnic Spot

Monsoon Picnic Spot| पावसाळा ऋतू सुरू झाला की पर्यंतकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. तसेच, धबधबे आणि डोंगरदऱ्यातील हिरवाई पाहण्यासाठी महाराष्ट्रात पर्यटकांची चांगलीच गर्दी जमते. पावसाळ्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ पाडतात. ही पर्यटन स्थळे नेमकी कोणती असतात?? तेथे पाहण्यासारखे नेमके काय आहे?? याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Monsoon Picnic Spot)

भीमाशंकर – पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर हे पर्यटन स्थळ पावसाळ्यात मनमोहीत करून टाकते. भीमाशंकर या ठिकाणी शंकराचे एक सुंदर असे मंदिर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत असतात. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तर मंदिर आणि मंदिराचा परिसर पर्यटकांना भुरळ पडतो. भीमाशंकर हे निसर्ग सौंदर्याचे परिपूर्ण आणि समृद्ध उदाहरण आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी नक्की भेट द्यायला जावा. याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला धबधबे, डोंगर-दर्या, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा अनुभवायला भेटेल.

चिखलदरा – विदर्भ भागातील एकमेव थंडगार हवेचे ठिकाण म्हणजेच चिखलदरा. पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी जात असतात. आजच्या घडीला चिखलदरा हे सुंदर पर्यटक स्थळांमध्ये गणले जाते. (Monsoon Picnic Spot) तुम्हाला जर शहराच्या गोंधळापासून सुटका करायची असेल आणि एखाद्या निवांत ठिकाणी भेट द्यायची असेल तर चिखलदरा हा चांगला पर्याय आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे अद्भुत रूप पाहायला मिळेल.

भंडारदरा – पावसाळ्यामध्ये पिकनिकला जाण्यासाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे भंडारदरा. हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. (Monsoon Picnic Spot) पावसाळा ऋतुचा मन मुराद आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी जातात. खास म्हणजे, पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी काजवा महोत्सव भरतो. या महोत्सवाला महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून लोक येत असतात.

UGC NET Exam 2024 | ‘या’ तारखेपर्यंत करता येणार UGC NET परीक्षेसाठी अर्ज, परीक्षेची तारीख देखील जाहीर

UGC NET Exam 2024

UGC NET Exam 2024 | UGC NET 2024 साठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता UGC NET जून (UGC NET Exam 2024) सत्रातील परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नोंदणी करायची प्रक्रिया संपत असतानाच, आता मुदतवाढ देखील करण्यात आलेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या अंतर्गत मुदतवाढ करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता 15 मे 2025 पर्यंत पात्र असलेल्या उमेदवारांना नोंदणी करता येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत वर्षातून दोन वेळा UGC NET परीक्षेच्या आयोजन केले जाते

त्यानुसार आता जून सत्रातील परीक्षा याआधी दिलेल्या वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार होती. परंतु आता या तारखेत देखील बदल झालेला आहे. आणि आता 18 जूनला ही परीक्षा होणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक, एचडी प्रवेश यांसारख्या विविध पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

या दिवशी होणार परीक्षा | UGC NET Exam 2024

बदललेल्या वेळापत्रकानुसार आता उमेदवारांना मंगळवार 15 मे 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख ही 16 आणि 17 मे अशी असणार आहे. त्याचप्रमाणे अर्जामध्ये दुरुस्ती करायची असल्यास 18 ते 20 मे या कालावधीमध्ये आता उमेदवार दुरुस्ती करू शकतात.

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार

राज्यस्तरावरील सेट परीक्षा ही नुकतीच ऑफलाइन पद्धतीने झालेली आहे. परंतु आता यापुढेही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर यूजीसी नेट जून सत्रातील परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने ओएमआर सीटवर घेतली जाणार आहे. एकूण 83 विषयांसाठी ही परीक्षा होणार आहे.

Viral Video : हे काय नवीन ? अतरंगी, कुकर वाली कॉफी ? पहा व्हिडीओ होतोय व्हायरल

viral video coffee

Viral Video : खरंतर भारतीय लोकांचे चहा , कॉफी वरचे अतोनात प्रेम काही वेगळे सांगायला नको. मग जिथे हटके काही मिळेल तिथली चहा कॉफी टेस्ट करायची… हे अनेक टी, कॉफी लव्हर्सचे ठरलेले प्रोग्रॅम असतात. हल्ली वेगवेगळे प्रकार चहा, कॉफी मध्ये पाहायला मिळतात. मटका चहा , इराणी चहा, कोल्ड कॉफी , हॉट कॉफी, आईस कॉफी असे बरेच प्रकार तुम्ही पाहिले आणि ट्राय सुद्धा केले असतील पण आज आम्ही तुम्हाला एक हटके कॉफीचा प्रकार सांगणार आहोत. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

तुम्ही हा व्हिडीओ पाहताना पटकन तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडीओ खाद्यपदार्थाविषयी आहे. या व्हिडिओमध्ये एक चहा विक्रेता दिसतो आहे. एका चहा कॉफी वरच्या टपरिवरचा हा व्हिडीओ आहे. गॅसवर एक कुकर ठेवला असून जनरली कुकरच्या शिट्टी मधून वाफ येते. मात्र इथे ठेवलेल्या कुकरला एक वेगळी पाईप लावली असून त्याचे आउटलेट बाहेरच्या दिशेला आहे. व्हिडीओ तील कॉफी विक्रेता स्टीलच्या कपात दूध, कॉफी, साखर घालतो आणि मग पुढे मशीनला जोडलेले प्रेशर कुकर दाखवतो. ज्यामध्ये स्टीलचा एक पाईप प्रेशर कुकरच्या शिट्टीजवळ जोडलेला असतो. ज्यामधून वाफ निघत असते. तो कॉफीचा कप त्या आउटलेट जवळ घेऊन जातो आणि त्यात पाईप बुडवतो. विक्रेत्याने प्रेशर कुकरच्या शिट्टीजवळ जोडलेल्या पाईपच्या मदतीने फेसाळलेली कॉफी तयार केली आहे. त्यानंतर कॉफी कपमध्ये ओतून (Viral Video) ग्राहकाला देतो. कॉफीचे सेवन केल्यानंतर ग्राहकाला सुद्धा या कॉफीची चव खूप आवडते.

भारी देशी जुगाड (Viral Video)

हा व्हिडीओ @india_food_hustle या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना फूड ब्लॉगरने कॅप्शन दिले आहे की, “अतरंगी प्रेशर कुकरवाली कॉफी, ब्रँड कॉफीपेक्षाही भारी’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. अनेकांनी या व्हिडीओ वर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा देशी जुगाड भारी असल्याचे म्हंटले आहे तर काहींनी या व्हिडिओला (Viral Video) निगेटिव्ह कमेंट दिल्या आहेत. मात्र कुकरवाल्या कॉफी व्हिडीओला आतापर्यंत ७५ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत.

Raver Lok Sabha : रक्षा खडसे खासदारकीची हॅट्रिक करणार, वारं काय सांगतंय?

Raver lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) सुनबाई शरद पवारांच्या तुतारीपुढे टिकतील का?… नाथाभाऊ चहुबाजूने कोंडी झालेली असताना आपल्या सुनबाईला सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवतील का?… रावेर मतदारसंघाचं वारं कुणाच्या बाजूने फिरतय? हे प्रश्न रावेरच्या राजकारणात सध्या पिंगा घालतायत… नाथाभाऊ विरुद्ध शरद पवार, तुतारी विरुद्ध कमळ, रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पवार यांच्यात उद्या रंगणाऱ्या सामन्यात मैदान कुणाच्या बाजूने आहे? जिंकतंय कोण? याचाच अंदाज घेऊयात

जळगाव… हे नाव काढलं तरी राजकारणातला एक चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ! 35 वर्ष आमदारकी, 20 वर्षे लाल दिवा, भाजपचं महाराष्ट्रात रोपट लावण्यापासून पक्षासोबत एकनिष्ठ असणारं नेतृत्व…पण राज्याची सूत्र फडणवीसांकडे गेली आणि खडसे पक्षातून साईडलाइन झाले. पक्षावर नाराजी असली तरी आपल्या सुनबाईंना रावेरमधून पुन्हा उमेदवारी रिपीट झाल्याने त्यांनी नाईलाजाने भाजपचं काम केलं… सुनबाईंना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठवलं… पण नंतर नाथाभाऊंचा विधानसभेतूनच पत्ता कट झाला, त्यांच्या मुलीचा आमदारकीला बालेकिल्ल्यातूनच पराभव झाला… त्यात त्यांचा मागे चौकशीचा फास लागला होताच… या सगळ्याला कंटाळून नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला… घड्याळ हातात बांधून विधानपरिषद गाठली… राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटासोबत राहत रावेरमधून (Raver Lok Sabha 2024) निवडणूक लढणार हे जगजाहीर केलं.. खरं म्हणजे भाजप आपल्या सुनबाईंचं म्हणजे रक्षा खडसे यांचं तिकीट कापणार असा अंदाज असल्याने नाथाभाऊ यांनी लोकसभा लढवायचं ठरवलं… पण भाजपने मास्टर स्ट्रोक खेळत सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांनाच तिकीट दिलं. आणि नाथाभाऊंची गोची केली. तब्येतीचं कारण पुढे करत आपण तुतारीकडून आपण लोकसभा लढणार नाही, असं म्हणत त्यांनी स्वतःला कव्हर अप केलं. पण राष्ट्रवादीत असल्यानं 2024 ला स्वतःच्या सुनेच्या विरोधातच राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण जास्त वेळ न दवडता त्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपात प्रवेश केलाय. मी माझ्या घरट्यात प्रवेश केलाय लवकरच दिल्लीतील नेत्यांकडून माझा पक्षप्रवेश होईल, असं जरी त्यांनी सांगितलं असलं. तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अंतर्गत विरोधामुळे टेक्निकली नाथाभाऊ अजून भाजपात नाहीयेत… पण असं असताना देखील, आपल्या सुनबाईंना सलग तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी नाथाभाऊंनी मोठी फिल्डिंग लावलीय.

नाथाभाऊ यांनी विविध पक्षातील असणारे आपले कार्यकर्ते, सहकारी यांना कामाला लावलंय. लेवा पाटील समाज ही नाथाभाऊंची सर्वात मोठी ताकद राहिली, या समाजाचं जास्तीत जास्त मतदान रक्षा खडसे यांनाच कसं होईल, यासाठीही नाथा भाऊंनी मतदारसंघ पिंजून काढलाय. खरंतर एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज झाल्यापासूनच गिरीश महाजनांनी जिल्ह्यातील राजकीय स्पेस भरून काढायला सुरुवात केली होती. सध्या महाजन यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल आहे. पण महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा रावेर लोकसभेसाठी भाजपची डोकेदुखी ठरू शकते. खडसेंच्या येण्यानं महाजन कदाचित दुखावले गेलेत. त्यामुळेच रावेरपेक्षा त्यांनी त्यांचं सगळं लक्ष हे जळगावकडे लावलय. खडसेंवरचा राग काढण्यासाठी भाजपच्या या संकटमोचकाने विरोधी उमेदवाराला मदतीचा हात दिला तर रक्षा खडसेंच्या अडचणी वाढू शकतील…

पण ग्राउंडचा नीट अभ्यास केला तर मागच्या दोन्हीही निवडणुका रक्षा खडसेंनी मोठ्या मार्जिनने जिंकल्या… एकनाथ खडसेंची ताकद आणि भाजपचा असणारा पारंपारिक बालेकिल्ला यामुळे इथं विरोधक टिकताना दिसत नाही. 2009 मध्ये लोकसभेची पुनर्रचना झाल्यानंतर रावेर मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासूनच इथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अशी पारंपारिक लढत होत आलीय. पण इथे भाजपाचा उमेदवार हा मोठ्या लीडने जिंकत आला. 2014 ला याच रावेरची उमेदवारी रक्षा खडसे यांना मिळाली तेव्हा काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील तर 2019 ला राष्ट्रवादीच्या मनीष दादा जैन यांचा पराभव करत ते दोन लाखांहून जास्तीच्या लीडने खासदार झाल्या…

दुसरीकडे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात गेल्याने राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ उमेदवार नव्हता. तेव्हा शरद पवारांनी अनेक पर्यायांची चाचपणी केली. अखेर लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उद्योजक श्रीराम पाटील यांच्या हातात तुतारी देत रावेरची लढत फिक्स केली. त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यात महामुकाबला उद्या निवडणुकीच्या दिवशी पाहायला मिळेल. पण रावेरच्या लढतीला खरंच तुल्यबळ लढत म्हणता येईल का? तर याचं उत्तर अर्थात येतं, नाही… जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खडसेंचे कट्टर विरोधक आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि स्वतः गिरीश महाजनांचा अंतर्गत विरोध असतानाही रक्षा खडसे आरामात लोकसभेचं मैदान मारतील, अशी सध्या रावेरची परिस्थिती आहे. एकनाथ खडसेंना मानणारी एक खूप मोठी व्होट बँक मतदारसंघात आहे… त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी सलोख्याच्या संबंध आहेत…

लेवा पाटील समाजाची निर्णायक मतं ही तर नाथाभाऊंची स्ट्रेंथ राहिली आहे… त्यात भाजपच्या महाशक्तीचा बॅक सपोर्ट आहेच.. हे सगळं गणित जोडून बघितलं तर रक्षा खडसे या निवडणुकीत फार पुढे निघून जातात… दुसरीकडे शरद पवारांनी श्रीराम पाटील यांच्या रूपाने अगदीच नवखा उमेदवार रक्षा खडसेंच्या विरोधात दिल्यानं याकडे सगळेच संशयानं पाहतायत… नाथाभाऊंच्या सुनबाईंसाठी शरद पवारांनी या जागेचं साटंलोटं केल्याची चर्चाही मतदारसंघात आहे… त्यामुळेच जिल्ह्यातल्या जळगाव मतदारसंघ निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने जितकी ताकद लावलीय त्या तुलनेत रावेरमध्ये सगळ्यांनीच सैल सोडलीय…एकूणच काय तर रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभेत दिसतील…याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे रावेरच्या जागेवरून शरद पवार आणि नाथाभाऊ यांच्यात काही साटंलोट झालय का? रावेर मध्ये खासदारकीचा गुलाल कुणाला लागेल? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.