Saturday, December 20, 2025
Home Blog Page 769

Raireshwar Fort : ‘या’ शिवकालीन किल्ल्यावर आढळते सप्तरंगी माती; भव्य इतिहासासोबत होते नैसर्गिक खजान्याचे दर्शन

Raireshwar Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raireshwar Fort) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले पाहायला मिळतात. प्रत्येक किल्ल्याचे काही ना काही वैशिट्य काही ना काही खासियत आहे. असेच अत्यंत असामान्य वैशिट्य असलेल्या रायरेश्वर किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या रायरेश्वर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्याच पावन किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठिकाणी ७ वेगवेगळ्या रंगांची माती आढळते. होय. हे आश्चर्यकारक असले तरीही सत्य आहे. चला याविषयी जाणून घेऊ.

रायरेश्वर किल्ला (Raireshwar Fort)

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्थित असलेला रायरेश्वर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. अशा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला हा किल्ला इतिहासाबरोबरच त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. या किल्ल्यावर एक दोन नव्हे तर चक्क ७ वेगवेगळ्या रंगांची माती एकाच ठिकाणी आढळते. त्यामुळे हा किल्ला खऱ्या अर्थाने वेगळा सिद्ध होतो. अनेक वैज्ञानिकांनी या मातीचा अभ्यास करून विविध निष्कर्ष लावले आहेत.

रायरेश्वराच्या टेकडीवर नैसर्गिक खजान्याचे दर्शन

रायरेश्वर किल्ल्यावर जाताना लागणारी वाट अतिशय दुर्गम आहे. त्यामुळे शिड्यांचा आधार घेतल्याशिवाय हा गड सर करणे कठीण आहे. गडावर चिंचोळी वाट चढून आल्यावर रायरेश्वराचं भव्य पठार दिसत. शेकडो एकरावर पसरलेल्या या पठाराच्या मध्यभागी रायरेश्वराचं पुरातन मंदिर आहे आणि याच मंदिरात महादेवाला साक्षी मानून छत्रपतींनी स्वराज्याचा संकल्प सोडला व तो सिद्धीस नेल्याची ऐतिहासिक घटना घडली होती. (Raireshwar Fort) अशा या पुरातन आणि ऐतिहासिक मंदिराच्या पाठी सुमारे १ किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे जिथे निसर्गाचा अद्भुत खजाना पाहायला मिळतो. या एकाच ठिकाणी ७ वेगवेगळ्या रंगाची माती पहायला मिळते.

सप्तरंगी मातीचे प्रकार

रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिरामागे असणाऱ्या टेकडीवर विविध रंगाची माती पहायला मिळते. इथे काही माहिती जांभळी तर खालच्या बाजूस पाहिले असता काही माती पिवळ्या रंगाची दिसून येते. (Raireshwar Fort) तसेच थोडे वरच्या बाजूला पाहिले तर इथली माती लाल आणि पलिकडे गुलाबी माती दिसून येते. याशिवाय कड्याच्या खालील बाजूला मातीचा रंग करडा होत गेल्याचे दिसते. तर काही भागात काळी आणि पांढरी माती देखील पहायला मिळते. अशाप्रकारे येते जवळपास ७ रंगाच्या विविध मातीचे प्रकार पहायला मिळतात.

संशोधक काय म्हणाले?

रायरेश्वरावर सापडलेल्या या ७ रंगाची माती पाहिल्यानंतर अनेक संशोधकांनी या मातींचा अभ्यास केला. त्यानुसार काहींनी म्हटले, कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीत काळ्या पाषाणाची निर्मिती झाली होती. पुढे या पाषाणावर निसर्गातील इतर घटकाचा परिणाम होऊन वेगवेळ्या रंगांचे दगड तयार झाले आणि त्या दगडांपासून अशी वेगवेगळ्या रंगाची माती तयार झाली असावी. (Raireshwar Fort) मातीचे वेगवेगळ्या रंगांचे थर इथे कायम दिसून येतात. अशा एकाच ठिकाणी मातीच्या इतका छटा दुर्मिळ असल्याने पर्यटक इथे कायम येत असतात.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त परतावा देणारी योजना; दरमहा 333 रूपये गुंतवल्यास मिळेल एवढी रक्कम

Post Office scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसकडून (Post Office Scheme) अनेक विविध योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजना. ज्यात दररोज पैसे गुंतवल्यास लाखोंचा निधी उभा राहू शकतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला मोठा परतावाही दिला जातो. या योजनेमध्ये दरमहा शंभर रुपये गुंतवणूक खाते सुरू करता येऊ शकते. या योजनेत एकल आणि संयुक्त खाते उघडण्याची ही सुविधा देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला या योजनेवर 6.7 टक्के चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळत आहे. तर नवीन व्याजदर 1 जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आले आहे.

आवर्ती ठेव योजनेत किती रुपये गुंतवावेत??

महत्वाचे म्हणजे, आवर्ती ठेव योजनाही जोखीममुक्त आहे. परंतु या योजनेत दरमहा योग्यवेळी गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. या योजनेचा हप्ता चुकला तर गुंतवणूकदाराला एक टक्का दंड भरावा लागतो. तसेच चार महिने हप्ता चुकवला तर RD खाते आपोआप बंद करून टाकले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. सुरुवातीला आवर्ती ठेव योजनेत दररोज 333 रुपये जमा करावे म्हणजेच महिन्यात तुम्ही दहा हजार रुपये गुंतवाल. असे केल्यास तुमची वार्षिक गुंतवणूक 1.20 लाख रुपये होईल. ज्यामुळे तुमची पाच वर्षाच्या मॅच्युरिटी पर्यंत 6 लाखांची बचत होईल. पुढे मॅच्युरिटी नंतर तुम्हाला 7,13,659 रुपये मिळतील.

लक्षात ठेवा की या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. परंतु तो पाच वर्षांपुढे ही वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच एकूण दहा वर्षांसाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. असे केल्यास दरमहा तुम्ही एकूण बारा लाखांची गुंतवणूक कराल. ज्यावर तुम्हाला 5.08,546 रूपये व्याज मिळेल. यानंतर दहा वर्षात तुम्हाला 17,08,546 रूपये मिळतील. अशा बऱ्याच सोयीसुविधांसाठी पोस्ट ऑफिसची योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरत आहे.

मोदी अमित शहांना पंतप्रधान करणार; नव्या दाव्याने खळबळ

amit shah pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत तर अमित शहांना (Amit Shah) पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागत आहेत असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. मोदींनी स्वतः भाजपमध्ये नियम बनवला होता की जो कोणी 75 वर्षांचा होईल तो भाजपमध्ये निवृत्त होईल. त्यामुळे जर देशात भाजपची सत्ता आली तर मोदी आपल्या जागी अमित शाह याना पंतप्रधान करतील असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं.

अरविंद केजरीवाल म्हणाले, मोदीजी येत्या 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होणार आहेत. परंतु मोदींनी (Narendra Modi) स्वतः भाजपमध्ये नियम बनवला होता की जो कोणी 75 वर्षांचा होईल तो भाजपमध्ये निवृत्त होईल. त्यामुळे आता जर NDA चे सरकार आलं तर पहिल्या दोन महिन्यांत ते योगीजींची विल्हेवाट लावतील, त्यानंतर नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे असलेल्या अमित शहांना पंतप्रधान करतील. मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत तर शहांना पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागत आहेत. अमित शहा मोदींची गॅरेंटी पूर्ण करणार का? असा सवाल केजरीवाल यांनी केला.

NDA चे सरकार येणार नाहीच

दरम्यान, देशात पुन्हा भाजपप्रणीत NDA चे सरकार येणार नाहीच असा विश्वास सुद्धा केजरीवाल यांनी व्यक्त केला. मला जेल मधून बाहेर येऊन २० तास झाले. मी अनेक लोकांशी बोलत होतो, राजकीय विश्लेषकांशी बोललो … तसेच माझा स्वतःचे असं आकलन आहे कि 4 जून नंतर NDA चे सरकार येणार नाही. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल, झारखंडमध्ये भाजपच्या जागा कमी होत आहेत. सट्टेबाजीच्या बाजारातही त्यांना जास्तीत जास्त 220-230 जागा मिळत आहेत, त्यामुळे भारतात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजपला वाटतं होते कि खोट्या केसमध्ये केजरीवाल ला अडकवायचं आणि तुरुंगात टाकून राजीनामा द्यायला लावायचा … दिल्ली सरकार पाडायच … म्हणूनच मी तुरुंगातूनच सरकार चालवले. मला कोणत्याही पदाचा लोभ नाही, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

Marleshwar Waterfall : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तीर्थक्षेत्र; जिथे कोसळणारा बारमाही धबधबा पहायला होते पर्यटकांची गर्दी

Marleshwar Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marleshwar Waterfall) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अनेक ऐतिहासिक तसेच नयनरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये काही तीर्थक्षेत्रांचादेखील समावेश आहे. आज आपण अशाच एका तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. हे तीर्थक्षेत्र म्हणजे कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मार्लेश्वर. महाराष्ट्रातील कोकण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. इथले समुद्रकिनारे, पांढरी वाळू, नयनरम्य परिसर पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात.

तर कोकणातील मार्लेश्वराच्या (Marleshwar Waterfall) दर्शनासाठी देखील अनेक भाविक मोठा पल्ला पार करून येतात. या देवस्थानाची खासियत अशी की, हे अत्यंत जागृत देवस्थान नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात बारमाही कोसळणारा एकमेव धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतो. चला याविषयी अधिक जाणून घेऊया.

श्री क्षेत्र मार्लेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे भगवान शंभू महादेवाचे अत्यंत जुने आणि जागृत देवस्थान आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आणि आंगवली या गावापासून ११ किमोमीटर अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी हे पवित्र आणि जागृत देवस्थान वसलेले आहे. भोवतालचा रमणीय परिसर आणि हिरवीगार झाडी आपले लक्ष वेधून घेते. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ आणि त्यामध्ये बारमाही कोसळणारा (Marleshwar Waterfall) शुभ्र फेसाळलेला ‘धारेश्वर’ धबधबा या ठिकाणाचे चैतन्य वाढवतो. खास करून पावसाळ्यात या ठिकाणी भेट देण्याची मजाच काही औरच आहे.

बारमाही धारेश्वर (Marleshwar Waterfall)

मार्लेश्वर मंदिराशेजारी धारेश्वर नावाचा धबधबा आहे. जो बारमाही कोसळणारा असा नयनरम्य धबधबा आहे. या धबधब्यासमोर एक खोल डोह आहे ज्याच्या खोलाची अंदाज लावणे अत्यंत कठीण आहे. या परिसरातील वनराई आणि शांतता तसेच धारेश्वर धबधब्याची सुंदरता फारच मनमोहक आहे.

ऋतू बदलत राहिले तरीही धारेश्वर धबधबा कोसळायचा थांबत नाही. हे येथील एक खास वैशिष्ट्य आहे. (Marleshwar Waterfall) त्यामुळे वर्षाचे बाराही महिने या धबधब्याला पाणी असतं. वर्षाचे बारा महिने कोसळणारा हा धबधबा पहायला लोक कोणत्याही ऋतुत येऊ शकतात. खास करून पावसाळ्यात सह्याद्रीच्या दगडातून फेसाळत कोसळणारा हा धबधबा पाहण्यात विशेष आनंद वाटतो.

पावसाळ्यात पर्यटक करतात गर्दी

मार्लेश्वर परिसरातील धारेश्वर धबधबा बारमाही असल्याने हा धबधबा वर्षाचे १२ महिने कोसळतो. मात्र पावसाळ्यात सह्याद्रीच्या काडेकपाऱ्यांतून इतर छोटे छोटे धबधबे देखील कोसळू लागतात. (Marleshwar Waterfall) अनेकदा हे धबधबे एकत्र येऊन धारेश्वरला मिळतात. ज्यामुळे काही वेळा धारेश्वर धबधबा रौद्र रूप देखील धारण करतो. मात्र पावसाळ्यात या ठिकाणची गर्द वनराई, थंडगार वातावरण आणि उंचावरून कोसळणारा फेसाळलेला धारेश्वर धबधबा पाहून मन अगदी प्रफुल्लित होते. हा अनुभव घेण्यासाठी अनेक भाविक तसेच पर्यटक खास करून पावसाळ्यात या ठिकाणी गर्दी करतात.

WhatsApp Update: जबरदस्तच!! व्हाट्सअपचे येणार नवे व्हर्जन; कलर ते डिझाईनपासून पाहायला मिळतील हे बदल

WhatsApp Update

WhatsApp Update| फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात व्हाट्सअप लोकप्रिय आहे. या व्हाट्सअपमध्ये (WhatsApp App) युजर्सच्या सोयीसाठी अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात येतात. तसेच आवश्यकतेनुसार काही बदलही केले जातात. खास म्हणजे, असाच एक मोठा बदल पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार आहे. हा बदल व्हाट्सअपच्या डिझाईनशी संबंधित असेल.(WhatsApp Update) हे बदल झाल्यानंतर युजर्सला एका नव्या रूपात व्हाट्सअप पाहिला आहे. हे नवे व्हाट्सअप वापरण्यासाठी ही अधिक सुलभ असेल.

व्हाट्सअपमध्ये होणार हे बदल (WhatsApp Update)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअपने आपल्या डिझाईनमध्ये एक मोठा बदल करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आपल्याला व्हाट्सअप डार्क मोडमध्येही पाहायला मिळू शकते. हे बदल अँड्रॉइड आणि अ‍ॅपल अशा दोन्ही युजर्ससाठी करण्यात आले आहेत. या नव्या बदलामुळे व्हाट्सअप ॲप एका नव्या रंगांमध्ये आणि नव्या रुपात दिसेल. ज्यामुळे व्हाट्सअपची आकर्षकता आणखीन वाढेल. नव्या बदलानंतर व्हाट्सअप ॲपमध्ये आणखीन काही फीचर्स पाहिला मिळतील.

कंपनीने सांगितले आहे, व्हाट्सअपच्या नव्या डिझाईन साडी व्हाट्सअपवर 35 हून अधिक रंगांचे प्रयोग करण्यात आले आहेत. परंतु यात डार्क मोड पर्याय निवडण्यात आला आहे. यामुळे कमी प्रकाशात युजरला व्हाट्सअप वापरता येईल. यापूर्वीही व्हाट्सअपमध्ये डार्क मोड हा पर्याय होता, परंतु नवीन रूपात देण्यात आलेला डार्क मोड अधिक उत्तम असणार आहे. ज्याला युजर्सकडून चांगली पसंती मिळेल.

नविन फीचर मिळणार (WhatsApp Update)

व्हाट्सअपच्या या नव्या अपडेटमध्ये नवीन नेव्हिगेशन दिले जाईल. या बारच्या मदतीने युजर्स महत्त्वाच्या सेक्शनपर्यंत सहज पोहोचू शकतील. यात त्यात चॅट्स, कॉल्स, कम्युनिटीज आणि अपडेट्स याचा समावेश असेल. व्हाट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये आयफोन युजर्ससाठी एक खास बदल करण्यात आला आहे. आता आयफोन युजर्स ला व्हिडिओ किंवा एखादी फाईल पाठवत असताना पूर्ण स्क्रीन भरणारा मेनू दिसणार नाही. त्या जागी त्यांना एक छोटा बॉक्स दिसेल. तो उघडल्यानंतर त्यात फोटो डॉक्युमेंट असे पर्याय असतील.

दरम्यान, व्हाट्सअप आपल्या बॅकग्राऊंडमध्ये देखील बदल करणार आहे. परंतु हे बदल युजर्सला कधी दिसतील याची तारीख अजून समोर आलेले नाही.(WhatsApp Update) पुढील काही आठवड्यांमध्ये व्हाट्सअपचे अपडेटेड व्हर्जन पाहायला मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Eastern Railway Bharti 2024 | पूर्व रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 108 रिक्त पदांची होणार भरती

Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पूर्व रेल्वे अंतर्गत रिक्त जागा आहेत. पूर्व रेल्वे अंतर्गत गुड्स ट्रेन मॅनेजर या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 108 जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 27 मे 2024 पासून अर्ज करायला सुरू होतील. तर 25 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे जवळपास एक महिना आहे.

महत्त्वाची माहिती | Eastern Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – गुड्स ट्रेन मॅनेजर
  • पदसंख्या – 108 जागा
  • वयोमर्यादा – 47 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त यूनिवर्सिटीतून पदवी परीक्षा पास असणे गरजेचे

वेतनश्रेणी | Eastern Railway Bharti 2024

या भरतीत पात्र झालेल्या उमेदवारांना level – 5 नुसार पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा ?

  • वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करता येईल.
  • 25 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचावी.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Rare Disease : तुम्ही तुमच्या पार्टनरच्या एक्सवर लक्ष ठेवता?? सावधान!! कदाचित तुम्हाला झालाय ‘हा’ गंभीर आजार

Rare Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rare Disease) आजच जग पूर्णपणे डिजिटल झालंय. त्यामुळे जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. कितीही दूर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज कनेक्ट राहता येत. अगदी जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधणं सोपं होत. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. या माध्यामातून ओळखीच्या नव्हे तर अनोळखी लोकांशी देखील कनेक्ट होता येत.

कुणाच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी बरेच लोक या माध्यमाचा वापर करतात. (Rare Disease) खास करुन असे लोक जे आपल्या जोडीदाराबाबत इनसिक्युअर असतात. असे लोक कायम आपल्या जोडीदाराच्या एक्सबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जर तुम्हीही असे करत असाल तर कदाचित तुम्ही एका गंभीर आजाराशी सामना करताय. याविषयी आपण जाणून घेऊया.

.. तर तुम्ही आजारी आहात

बऱ्याच लोकांना आपल्या पार्टनरच्या फोन, सोशल मीडिया हॅण्डल चेक करण्याची सवय असते. या माधमातून ते आपल्या पार्टनरच्या एक्सची माहिती घेत असतात. (Rare Disease) खरतर याची काही गरज नसते. मात्र असुरक्षिततेची भावना आपल्याकडून असं करून घेते. जर तुम्हीही असे करत असाल तर लक्षात घ्या तुम्ही एका मानसिक आजराला बळी पडलाय. या आजाराचं नाव आहे, रेबेका सिंड्रोम. हा आजार नेमका काय आहे? आणि तो कुणाला होतो? याविषयी जाणून घेऊ.

या आजारात नेमकं काय होत? (Rare Disease)

रेबेका सिंड्रोम ही परिस्थिती प्राथमिकपणे एखाद्या व्यक्तीला वाटणारी ईर्ष्या आणि त्याच्या जोडीदाराबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामुळे होऊ शकते. हा एक मानसिक आजार आहे. जो आपल्या जोडीदाराच्या आधीच्या नात्याबद्दल सतत विचार करणे, संपुष्टात आलेल्या नात्याबद्दल इर्षा वाटणे यासारख्या भावनेतून होते. शिवाय अधिक विचार करणे यामुळे देखील हा आजार होऊ शकतो.

महिला रुग्णांची संख्या जास्त

एका रिसर्च रिपोर्टनुसार, पुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्ये रेबेका सिंड्रोम आजार प्रकर्षाने दिसून येति. त्यांच्या आयुष्यात असलेल्या पार्टनरला गमावण्याची भीती त्यांना या आजराचा शिकार बनवते. (Rare Disease) आपल्या पार्टनरच्या आयुष्यातील पहिली ‘ती’च्याबाबत ईर्ष्या, राग निर्माण झाल्याने महिला मानसिक रित्या त्रासात जातात. ज्यामुळे त्यांना हा आजार होतो.

कशी घ्याल काळजी?

जर तूम्हीही या आजाराला बळी जाताय असे वाटत असेल तर सगळ्यात आधी तुम्ही भूतकाळात रमणे बंद करा. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा, आपल्या नात्यावर आणि त्यातील प्रेमावर विश्वास ठेवा. भूतकाळातील कोणत्याही घटना आणि प्रसंगांमुळे वर्तमान आणि भविष्य खराब होणार नाही याची काळजी घ्या. (Rare Disease) तुम्हाला मानसिक ताण येत असेल तर जोडीदाराशी चर्चा करा. तसेच फोन, सोशल मीडियापासून अंतर राखा आणि जोडीदारासोबत वेळ घालवा.

Mega Block On Sunday: प्रवाशांनो ऐका!! रविवारी मुंबई लोकलच्या या तिन्ही मार्गांवर असेल मेगाब्लॉक

Mega Block News

Mega Block On Sunday| मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्तीसाठी आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे मेगाब्लॉक माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर आणि सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन धीम्या मार्गावर घेण्यात आले आहे. ज्यामुळे उद्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.

मध्य रेल्वे मेगाब्लॉक (Mega Block On Sunday)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.10 पर्यंत मेगाब्लॉक आहे. ज्यामुळे CSMT येथून निघालेल्या ट्रेन माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. पुढे या लोकल ट्रेन जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळतील. त्यानंतर ठाण्यातून निघालेल्या ट्रेन अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या ट्रेन मार्गावरील थांब्यांवर थांबतील. तिथून पुढे ट्रेनस् अप जलद मार्गावर पुन्हा वलविल्या जातील.

हार्बर रेल्वे मेगाब्लॉक

उद्या हार्बर रेल्वेच्या कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे वाशी, बेलापूर, पनवेलमधून निघालेल्या CSMT मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि CSMT मधून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान CSMT ते कुर्ला, पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा धावेल. उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करता येईल.

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक (Mega Block On Sunday)

रविवारी पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील. विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकावर लोकल थांबणार नाही. यात काही लोकल बोरिवली-अंधेरी लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकांपर्यंत सुरू असतील.

Bad Habit : गरम चहासोबत सिगारेट फुकण्याची सवय देते कर्करोगाला आमंत्रण; वेळीच थांबा नाहीतर..

Bad Habit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bad Habit) बऱ्याच लोकांची सकाळ चहासोबत होते. तर काही लोकांची सकाळ चहा आणि सिगारेट सोबत होते. सिगारेटच्या पाकिटावर ती आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे लिहिलेलं असत. पण तरीही लोक हसत हसत सिगारेटसोबत आपलं आयुष्य जाळताना दिसतात. बऱ्याच लोकांना चहाची टपरी दिसली की, चहासोबत सिगारेट पिण्याची तलफ येते.

तुम्ही कोणत्याही टपरीवर पहा, नुसता चहा पिणारे कमी आणि चहा- सिगरेट पिणारेच जास्त दिसतात. पण हे लोक स्वतःहून आपल्या आरोग्याची चिंता वाढवत आहेत, हे यांच्या लक्षात येत नाही. कारण, नुसती सिगारेट जितकी धोकादायक आहे त्याहून जास्त ती चहासोबत पिणे जास्त डेंजर आहे. चला याविषयी जाणून घेऊ.

चहा सोबत सिगारेट प्यायल्याने काय होतं?

बऱ्याच लोकांना चहासोबत सिगारेट पिण्याची सवय असते. ताणतणाव कमी करण्यासाठी आपण चहासोबत सिगारेट ओढतो, असं यांचं म्हणणं असत. पण खरतर या सवयीमुळे ताणतणाव कमी व्हायचं सोडा आरोग्यविषयक इतर समस्या वाढतात. (Bad Habit) एकंदरच काय तर ही एक अत्यंत वाईट सवय आहे. चहा आणि सिगारेटचे मिश्रण हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरु शकते. कारण चहा- सिगारेट एकत्र प्यायल्याने अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका एकावेळी ३० टक्क्यांनी वाढतो.

कारण, चहामध्ये कॅफीनचे प्रमाण सर्वाधिक असते. (Bad Habit) जे सिगारेटसोबत मिसळल्याने प्राणघातक घटकांची निर्मिती होते. जे आपल्या शरीरात जाऊन कॅन्सर पेशींना उत्तेजित करतात. त्यामुळे चहासोबत सुट्टा मारणे अर्थात सिगारेट फुकणे हे कोणत्याही दृष्टीने कुल असू शकत नाही. उलट ही सवय तुम्ही किती फुल आहात हे दर्शवते.

असा वाढतो कॅन्सरचा धोका

एका रिसर्च रिपोर्टनुसार, गरम चहामुळे अन्ननलिकेच्या पेशींचे नुकसान होते. त्यात जर तुम्ही चहासोबत सिगारेटदेखील ओढत असाल तर अशावेळी आरोग्याचे नुकसान दुप्पट होण्याचा धोका संभवतो. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असल्याचे यात सांगण्यात आले आहे. (Bad Habit) आरोग्य तज्ञ सांगतात की, चहामध्ये कॅफिन असते. जे पोटात एक प्रकारचे अॅसिड तयार करण्यास सक्षम असते. खरंतर कॅफिन हे पचनासाठी उपयुक्त आहे. मात्र, त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याचे नुकसान होते. कारण चहात कॅफिन तर सिगारेटमध्ये निकोटीन असते. हे दोन्ही घटक एकत्र आल्यास आरोग्याचे गंभीर स्वरूपात नुकसान होऊन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने काय त्रास होतो? (Bad Habit)

चहा आणि सिगारेटचे एकत्र सेवन केल्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका, पोटाचा अल्सर, स्मृती भ्रंश, फुफ्फुसाचा कर्करोग, घश्याचा कर्करोग, नपुंसकत्व आणि वंध्यत्व, अन्ननलिकेचा कर्करोग, हात आणि पायांवर व्रण असे त्रास होऊ शकतात. इतकेच नव्हे तर ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज सुद्धा होऊ शकते.

Maharashtra Civil Services Bharti 2024 | महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत नोकरीची मोठी संधी, असा करा अर्ज

Maharashtra Civil Services Bharti 2024

Maharashtra Civil Services Bharti 2024 | अनेक लोकांची शाळेत असल्यापासून सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात. आम्ही तुमच्यासाठी नेहमी सरकारी नोकरीच्या त्याचप्रमाणे प्रायव्हेट नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एका सरकारी नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र, वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या तब्बल 524 जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 24 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

महत्वाची माहिती | Maharashtra Civil Services Bharti 2024

  • पदाचे नाव – राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024

रिक्त पदसंख्या

  • राज्यसेवा परीक्षा – 431 पदे
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – 48 पदे
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – 45 पदे

अर्ज कसा करायचा ? | Maharashtra Civil Services Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
  • 24 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा