Saturday, December 20, 2025
Home Blog Page 770

Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ; KYC साठी करा ‘या’ कागदपत्रांची पूर्तता

Mutual Fund

Mutual Fund | आज-काल अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. जर तुम्ही देखील फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता म्युचुअल फंडात केवायसी अपडेट करणे खूप गरजेचे आहे. त्यावेळी ऍड्रेस प्रूफ म्हणून देखील जमा केले होते. परंतु आता पोर्टफोलिओ 12 अंकी डिजिटल नॅशनल आयडेंटिटी नंबर जोडला नसेल म्हणजेच आधार नंबर जोडला नसेल, तर त्यांना नवीन एमएस युनिट खरेदी करता येणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता 2024-25 पासून जर म्युच्युअल फंडात खरेदी करायची असेल, तर त्यांना आधारद्वारे केवायसी करणे गरजेचे असणार आहे. अन्यथा त्यांना गुंतवणूक करता येणार नाही. (Mutual Fund)

सेबीने केवायसीबाबत घालून दिलेले हे नवीन नियम आता म्युच्युअल फंडासाठी 1 एप्रिल पासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक आणि रिडंप्शन सुरू ठेवण्यासाठी स्टेटसची माहिती तपासणं आवश्यक आहे.

केवायसी स्टेटस तपासा | Mutual Fund

गुंतवणूकदार त्यांचे केवायसी स्टेटस तपासण्यासाठी सीएएमएस ,कार्वी, सीव्हीएल आणि एनडीएमएल यांसारख्या वेबसाईटवर लॉगिन करू शकतात. त्यामुळे तुमचे केवायसी स्टेटस होल्डर वैद्य आहे की नाही हे स्पष्ट होईल

केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन
  • मतदान ओळखपत्र
  • मनरेगा तर्फे देण्यात आलेले जॉब कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • केंद्र सरकारने अनुसूचित केलेले इतर कोणतेही दस्ताऐवज.

Vande Bhart Express : राज्यातल्या आणखी एका शहराला मिळणार ‘वंदे भारत’ ; PM मोदींनी दिले संकेत

vande bharat express

Vande Bhart Express : संपूर्ण देशामध्ये नावाजली गेलेली वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) महाराष्ट्रातही मोठ्या पसंतीस उतरत आहे. सध्याचा विचार करता सध्या महाराष्ट्रात एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र आणखी एका शहराला वंदे भारत एक्सप्रेस जोडली जाणार आहे. होय, आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत ते शहर म्हणजे ‘कोल्हापूर’. राज्यातल्या इतर शहराला जोडल्यानंतर कोल्हापूरातूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) सुरू होणार असा दावा केला होता. दानवे यांनी त्यावेळी येत्या दोन महिन्यात कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन मिळणार असे म्हटले होते. मात्र, आता मे महिना उलटत चालला आहे तरीही कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली नाही. त्यामुळे शहरात वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरु होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

पंतप्रधान मोदींनी दिले संकेत (Vande Bhart Express)

मात्र नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरात झालेल्या प्रचारसमभाध्ये वंदे भारत एक्सप्रेस बाबत अपडेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले आहे.यामुळे पुन्हा एकदा या वंदे भारत एक्सप्रेसच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, लोकसभा निवडणुका संपल्यानंतर जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) सुरू करू शकते. असे झाल्यास मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास निश्चितच मोठा गतिमान होणार आहे.

कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी आंबाबाईचे प्रसिद्ध स्थान असून संपूर्ण देशभरातून येथे भाविक येत असतात. त्यामुळे जर मुंबई -कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) सुरु झाली तर भाविकांची चांगली सोय होणार आहे.

Bhendwal Ghatmandni | भेंडवळच्या भविष्यवाणीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पावसाने होणार पिकांची भरभराट

Bhendwal Ghatmandni

Bhendwal Ghatmandni | आपण वातावरणाबाबत हवामान विभागाने दिलेले अंदाज नेहमीच पाहत असतो. परंतु अनेकवेळा हवामान विभागाचे अंदाज खोटे ठरतात. परंतु वऱ्हाडातील सुमारे दीडशे वर्षांपासून एक परंपरा आहे. ती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असते. यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान, पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवतात. त्यामुळे शेतकरी बी- बियाणे कंपनी देखील येथे गर्दी करत असतात .

यावर्षी वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीची आणि भविष्यवाणीची सुरुवात केली. यामध्ये प्रामुख्याने कृषीविषयक पिके, पाऊस, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्य तसेच राजकारण या सगळ्या गोष्टीबाबत वर्षभराचे भाकीत करण्यात आलेले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावाजवळच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात या गटाचे मांडणी केली. आणि दुसऱ्या दिवशी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून करण्यात आलेले आहे. पाण्याचे नियोजन करतात. परंतु यावर्षी त्यांनी राजकीय भाकीत वर्तवले नाही.

यावर्षी पाऊस कसा असेल? | Bhendwal Ghatmandni

या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत आहे. आणि यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितलेला आहे. पहिला महिना कमी पाऊस असणार आहे, तर दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण माणूस असणार आहे. दुसऱ्या महिन्यात जास्त आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर चौथ्या महिन्यात अवकाळी पाऊस वर्तवलेला आहे.

पीक पाण्याचे नियोजन आणि भाकीत | Bhendwal Ghatmandni

यावर्षी ज्वारी पिकाचे सर्वसाधारण उत्पन्न असल्याचे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण उत्पन्न असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. मूग आणि उडदाचे उत्पन्न देखील चांगले असणार आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी तिळाचे उत्पन्न चांगले असणार आहेत. त्याचप्रमाणे पिकांवर रोगराई पडेल. आणि बाजरीचे पीक सर्वसाधारण असणार आहे. हरभरा पिकाचे पीक भाव मात्र निश्चित केलेला नाही.

राहुल गांधींनी कबूल केली काँग्रेसची ‘ती’ चूक; नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत ३ टप्प्यात मतदान पार पडलं असून अजून मतदानाचे ४ टप्पे बाकी आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाची (Congress) एक चूक मान्य केली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाला आपले राजकारण बदलावे लागेल तसेच काही धोरणात बदल करावे लागतील असं राहुल गांधी यांनी म्हंटल. इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित ‘राष्ट्रीय संविधान परिषदे’ला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते.

आपल्या भाषणात राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, असे मला म्हणायचे आहे, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे. आपल्याला काही चुका सुधारण्याची गरज आहे. मात्र, यावेळी राहुल गांधी यांनी थेटपणे कोणत्या चुकीचा उल्लेख केला नाही. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान मला समजलं कि मी जनेतचा आवाज आहे. त्यांच्या दुःखाचा सुखाचा आवाज आहे. मला इतर कशातही रस नाही असे राहुल गांधी यांनी म्हंटल.

पुढे राहुल गांधी यांनी आरक्षण, जातिव्यवस्था तसेच संविधानावरील कथित हल्ल्यांबाबतही भाष्य केलं. भारतातील कोट्यवधी लोक असे जीवन जगले आहेत जिथे त्यांनी त्यांचे भविष्य ठरवले नाही, परंतु समाजाने त्यांच्यासाठी ते केले आहे. अनेकांनी हे वास्तव स्वीकारले आणि ते बदलण्यासाठी उभे राहिले. आयुष्यभर राजकारणात सत्तेच्या मागे धावणाऱ्यांना हे वास्तव मान्य नाही, ते स्वतःचे किंवा इतरांचे वास्तव कधीच स्वीकारत नाहीत असे राहुल गांधी यांनी म्हंटल.

Paytm Gas Cylinder Booking | ‘या’ अ‍ॅप्सच्या मदतीने घरबसल्या करा गॅस सिलेंडर बुक; आणि मिळवा 100 रुपयांपर्यंतची सूट

Paytm Gas Cylinder Booking

Paytm Gas Cylinder Booking | आपल्याला जेव्हा गॅस सिलेंडर आणायचा असतो. त्यावेळी अनेकवेळा आपल्याला तिथे जाऊन लाईनमध्ये उभे राहावे लागते. जर तुम्ही देखील आता घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक युक्ती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करू शकता. आणि यावर तुम्हाला कॅशबॅक देखील मिळेल. यावेळी तुम्हाला गॅस सिलेंडरचा ऑप्शन देखील उपलब्ध असतो. तुम्हाला जर घर बसल्या गॅस सिलेंडर बुक करायचा असेल, तर खालील काही टिप्स फॉलो करा. ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू (Paytm Gas Cylinder Booking) शकता. आणि पहिल्या महिन्याच्या तीन रिचार्जवर कॅशबॅक देखील ऑफर दिली जाते.

पेटीएमने सांगितल्याप्रमाणे ही ऑफर केवळ मोबाईल डीटीएच रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, गॅसपेमेंट आणि गॅस सिलेंडर बुकिंगवर लागू होते. या अंतर्गत जर तुम्ही बिल भरले, तर तुम्हाला 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. ही ऑफर प्रत्येक युजरला वेगळी असू शकते. आणि कॅशबॅकची रक्कमही वेगळी असू शकते. परंतु या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 48 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करणे गरजेचे आहे.

तुम्ही ॲमेझॉन पेच्या (Paytm Gas Cylinder Booking) मदतीने देखील पेमेंट करू शकता. यामध्ये तुम्हाला ऑफरही मिळते. ॲमेझॉनवरून जर तुम्ही गॅस बुक केला, तर तुम्हाला 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळतो. यासोबतच तुम्हाला गॅस एजन्सीला कॉल करून वेळ वाया घालवण्याची देखील गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला कॅशबॅक देखील मिळतो.

घरबसल्या ऑनलाइन गॅस बुकिंगचे इतर पर्याय | Paytm Gas Cylinder Booking

तुम्ही जर घर बसल्या गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मेसेजद्वारे देखील बुक करू शकता. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गॅस एजन्सीला मेसेजद्वारे गॅस बुक करण्यासाठी क्रमांक घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये गॅस एजन्सीचे नाव स्पेस एसटीडी कोड आणि वितरणाचा फोन नंबर लिहून पाठवावा लागेल.

तुम्ही गॅस सिलेंडर व्हाट्सअप ॲप वरून देखील बुक करू शकता यासाठी तुम्हाला whatsapp वर जाऊन रिफील करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा मेसेज 7588888824 या नंबरवर पाठवायचा आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.

धोनीचा जबरा फॅन!! थेट मैदानात घुसला अन ‘थाला’ चे पाय धरले

MS Dhoni Fan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) … सिर्फ नाम ही काफी है !! भारतीय क्रिकेटप्रेमींनी जर सर्वात जास्त प्रेम कोणत्या खेळाडूवर केलं असेल तर तो धोनीच ,…. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धोनीने निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली तरीही त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) प्रत्येक सामन्यात याची प्रचिती पाहायला मिळते. धोनीला फक्त बघण्यासाठी चाहते मोठया संख्येने स्टेडियमवर येत असतात. काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तर धोनीचा एक चाहता थेट मैदानात घुसला आणि धोनीचे चरणस्पर्श केले.. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी धोनीचा नारा ऐकायला मिळाला.

काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा (GT Vs CSK) संघ अडचणीत असताना धोनी फलंदाजीसाठी आला. धोनी सामन्याच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना एक चाहता थेट मैदानात घुसला आणि त्याने माहीचे पाय पकडले. यानंतर धोनीने त्याला मिठी सुद्धा मारली. तेवढ्यात पाठीमागून सुरक्षारक्षक आले आणि त्या धोनीच्या फॅनला घेऊन ते बाहेर गेले. सोशल मीडियावर याबाबतचा विडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात धोनीने चौफेर फटकेबाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केलं. धोनीने ११ चेंडूत २६ धावांची ताबडतोब खेळी केली. यामध्ये त्याने १ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. मात्र गुजरातचे २३२ धावांचे आव्हान चेन्नईला झेपलं नाही.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २३१ धावांचा डोंगर उभारला. संलामीवर साई सुदर्शन आणि शुभमन गिलने आक्रमक खेळी करत शतके ठोकली. साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावा तर शुभमन गिलने ५५ चेंडूत १०४ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईला सुरुवातीलाच ३ जबर धक्के बसले. मात्र डार्लि मिचेल आणि मोईन अलीने संघाचा डाव सावरत जिंकण्याची आशा कायम ठेवली होती. धोनीने सुद्धा अखेरच्या २ षटकात वादळी खेळी केली परंतु तरीही चेन्नईला विजय मिळवता आला नाही.

Vitamin D Rich Food | ‘या’ पदार्थांच्या सेवनाने मिळते भरपूर व्हिटॅमिन डी; हाडे देखील होतील मजबूत

Vitamin D Rich Food

Vitamin D Rich Food | आपल्या शरीरासाठी विटामिन डी खूप महत्त्वाचे असते. विटामिन ‘डी’ला ‘सनशाईन विटामिन’ असे देखील म्हणतात. जेव्हा तुमची त्वचा अतिनील किरणांच्या संपर्कात येते. त्यावेळी हे विटामिन डी तुमच्या शरीरात तयार होते. हे नैसर्गिक पदार्थांमध्ये देखील आढळते. परंतु सूर्यप्रकाशात असून देखील आपल्या शरीराला विटामिन डीची (Vitamin D Rich Food)आवश्यकता असते. यावेळी तुम्ही अनेक अन्नपदार्थांमधून देखील विटामिन डी घेऊ शकता. आता आपण विटामिन डीचे असे काही पदार्थ सांगणार आहोत. त्यामध्ये पुरेपूर विटामिन डी असते आणि जे खाल्ल्याने तुमच्या शरीराला देखील खूप फायदा होतो.

फॅटी मासे | Vitamin D Rich Food

सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिनसह मासे – व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहे. स्वॉर्डफिश आणि कोळंबी मासा हे देखील यासाठी चांगले पर्याय आहेत. डॉक्टर आठवड्यातून किमान दोनदा ओमेगा-३ समृद्ध फॅटी मासे खाण्याची शिफारस करतात. यामुळे तुमची व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण होते.

मशरूम

मशरूम हे व्हिटॅमिन डीचे एकमेव पूर्णपणे वनस्पती-आधारित स्रोत आहेत. व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी, अधिक मशरूम खाण्याचा सल्ला दिला जातो. ते सॅलडमध्ये खाऊ शकता. किंवा साइड डिश म्हणून खाल्ले जाऊ शकतात किंवा रोटी किंवा भाताबरोबर शिजवले जाऊ शकतात.

अंडी आणि चीज

अंडी आणि चीज देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही तुमच्या नाश्त्यात हे तयार करून खाऊ शकता आणि तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात करू शकता.

दूध | Vitamin D Rich Food

आपल्या आहारात व्हिटॅमिन डीचा योग्य भाग घेणे खूप महत्वाचे आहे. दूध हा एक चांगला पर्याय आहे. जवळजवळ सर्व डेअरी दूध व्हिटॅमिन डीने मजबूत केले जाते आणि जर तुम्ही वनस्पती-आधारित दुधाला प्राधान्य देत असाल तर फोर्टिफाइड दुधाचा वापर करा, ते तुम्हाला तुमच्या व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यास मदत करेल.

तुम्हाला व्हिटॅमिन डी सप्लिमेंटची गरज आहे का?

लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सबद्दल विचार करणे किंवा त्यांच्या डॉक्टरांनी त्याची शिफारस करणे सामान्य आहे. परंतु या व्हिटॅमिनसाठी आपल्या शरीराची वैयक्तिक आवश्यकता निश्चित करणे कठीण आहे. यासाठी तुम्हाला डॉक्टरांशी बोलून वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागेल, जी तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचे नेमके प्रमाण सांगेल.

James Anderson : क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त!! जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती

James Anderson Retire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा दिग्गज खेळाडू आणि जलदगती खेळाडू जेम्स अँडरसन (James Anderson) लवकरच क्रिकेटला अलविदा करणार आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंग्लंडचा हा महान खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. त्यामुळे क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त होणार आहे. गोल्फच्या एका फेरीत अँडरसनने कोच मॅक्युलमला वैयक्तिकरित्या निवृत्तीबद्दल विचारणा केली. कसोटी संघाच्या भविष्याकडे पाहून त्याची विक्रमी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याची वेळ येऊ शकते, असं अँडरसनने मॅक्युलमला म्हटलं आहे.

२००३ मध्ये जेम्स अँडरसनने (James Anderson) क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. जगातील कोणत्याही देशातील मैदान असो, आपल्या इन स्विंग आणि आऊट स्विंगच्या जोरावर अँडरसनने भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं आहे. नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत त्याने ७०० बळी घेण्याचा विश्वविक्रम केला होता. सध्या अंडरसन ४१ वर्षाचा आहे, मात्र अजूनही त्याची विकेट घेण्याची भूक आहे तशीच आहे, परंतु इंग्लडच्या भविष्यासाठी तो आता क्रिकेटमधून कायमचा ब्रेक घेणार आहे.

इंग्लंडचा संघ जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सहा कसोटी सामने खेळणार आहे. कदाचित हीच अँडरसनची शेवटची कसोटी मालिका असू शकते असं बोललं जातंय. 2025-26 च्या हिवाळ्यात पुढील ऍशेस मालिकेसाठी नवा गोलंदाज तयार व्हावा, यासाठी अँडरसन निवृत्तीची घोषणा करू शकतो, कारण तोपर्यंत 43 वर्षांचा असेल.

कशी आहे जेम्स अँडरसनची कारकीर्द – James Anderson

४१ वर्षीय जेम्स अँडरसनने २००३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आत्तापर्यंत एकूण १८७ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये ७०० बळी घेतलेत. कसोटीमध्ये ४२ धावांत ७ बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर दुसरीकडे जिमीने १९४ एकदिवसीय सामन्यात २६९ बळी घेतले आहेत. तिथेही त्याने स्विंगचा प्रभाव टाकून अनेक दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. इंग्लंडच्या संपूर्ण क्रिकेट इतिहासात जेम्स अँडरसनचे नाव अत्यंत आदराने घेतलं जाईल यात शंका नाही.

मॅक्युलमने नुकतीच अँडरसनला भेट दिली आणि गोल्फच्या एका फेरीत त्याला वैयक्तिकरित्या सांगितले की, कसोटी संघ ‘भविष्याकडे पाहत आहे’ आणि त्याची विक्रमी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याची वेळ येऊ शकते.

अँडरसन अलीकडेच मार्चमध्ये इंग्लंडच्या भारताच्या कसोटी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी कसोटीत ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. इंग्लंड जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सहा कसोटी सामने खेळणार आहे आणि सुशोभित केलेला डावखुरा वेगवान गोलंदाज निवृत्त होण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केलेल्या टूरच्या शेवटी.

Benefits Of Curry Leaves Water | रोज सकाळी प्या कढीपत्त्याचे पाणी; आरोग्याला होतील ‘हे’ अद्भुत फायदे

Benefits Of Curry Leaves Water

Benefits Of Curry Leaves Water | भारतीय जेवणामध्ये कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जवळपास सगळ्या भाज्यांमध्ये कढीपत्त्याचा वापर करतात. कढीपत्त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुम्ही जर कडीपत्त्याच्या पानांचे पाणी करून त्याचे सेवन केले, तर त्यामुळे तुमचे शारीरिक आरोग्य खूप सुधारते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जी रोगांची लढण्यासाठी मदत करतात. आणि शरीराला देखील त्याचा खूप फायदा होतो.

कढीपत्त्याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया देखील सुधारते. त्याचप्रमाणे मधुमेहावर नियंत्रण राहते आणि तुमची त्वचाही एकदम निरोगी राहते. यासोबत मानसिक ताण देखील कमी होतो. आणि शारीरिक ऊर्जा वाढते. हे पाणी जर तुम्ही रोज पिले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होतात. आता आपण या कढीपत्त्याचे पाणी रोज पिले, तर काय फायदे होतात (Benefits Of Curry Leaves Water ) हे जाणून घेणार आहोत.

ॲनिमियाचा धोका कमी होतो | Benefits Of Curry Leaves Water

कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात लोह असते, जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. त्यामुळे कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी योग्य प्रमाणात राहते, ज्यामुळे ॲनिमियाचा धोका कमी होतो.

केसांचे आरोग्य राखते

कढीपत्त्याच्या पाण्यात बीटा कॅरोटीन आणि लोहासारखे पोषक घटक असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे केस मजबूत, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.

वजन कमी होणे

कढीपत्त्याच्या पाण्यात असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड आणि अँटी-ऑक्सिडंट भूक कमी करतात आणि तृप्ततेची भावना निर्माण करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

श्वसनाच्या समस्या कमी होतात

कढीपत्त्याच्या पाण्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे ते श्वसन रोगांचा धोका कमी करते.

दृष्टी | Benefits Of Curry Leaves Water

कढीपत्त्याच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य सुधारतात आणि दृष्टी चांगली ठेवतात. यामुळे डोळ्यांच्या कमकुवतपणाचा त्रास होत नाही.

कढीपत्त्याचे पाणी कसे बनवायचे?

ते तयार करणे खूप सोपे आहे. ४-५ कढीपत्त्यांची देठं धुवून घ्या आणि एका कढईत एक ग्लास पाणी टाका आणि त्यात कढीपत्त्याची देठं घालून काही वेळ उकळा आणि नंतर गाळून घ्या आणि थोडं थंड करून प्या.

मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेत काय चाललं होतं? निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

PDCC Bank Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर (PDCC Bank Baramati) सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दोषी आढळल्याने आयोगाने व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. रोहित पवार यांनी ट्विट करत पीडीसीसी बँक वेल्हा शाखा रात्रभर सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यांनी बँकेचे रात्रीचे फोटो शेअर केले होते. रोहित पवारांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल होते, PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय….आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे… कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर #ओव्हर_टाईम सुरू असावा…निवडणूक आयोग दिसतंय ना? पण सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल असं त्यांनी म्हंटल होते. रोहित पवार यांच्या ट्विट ची दखल घेत निवडणूक आयोग ऍक्शन मोड मध्ये आली.

बँक मॅनेजरवर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. बँक मॅनेजर या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल असता 40 ते 50 कर्मचारी आत आढळून आले. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.