Saturday, December 20, 2025
Home Blog Page 771

Jio Reacharge Plan | ‘हा’ आहे जीओचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; वर्षभराच्या वैधतेसह मिळणार बऱ्याच सेवा

Jio Reacharge Plan

Jio Reacharge Plan | सध्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या उद्यास आलेल्या आहेत. परंतु त्यातील रिलायन्स जिओने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन घेऊन येत असतात. अनेक वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील ते ऑफर करतात. पूर्वी कंपनी 365 दिवसांच्या वैद्यतेचा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांछा वार्षिक प्लॅन म्हणून देत होती. परंतु. आज आम्ही तुम्हाला 365 दिवसांच्या वैद्यतेत येणाऱ्या प्लॅनबद्दल (Jio Reacharge Plan) माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा कॉलिंग तसेच sms ची देखील सुविधा मिळणार आहे.

जिओचा 2999रुपयांचा प्लॅन | Jio Reacharge Plan

आज आपण रिलायन्स जिओच्या 2999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या प्लॅन सह तुम्हाला सुमारे 230 रुपये महिन्याचा खर्च येईल. या वार्षिक प्लॅनमध्ये युजरल एकूण 912. 5 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये युजरला अनलिमिटेड वाईस कॉलिंगची देखील सुविधा आहे. त्याचप्रमाणे मोफत मेसेज देखील करता येतात. रोज तुम्हाला 100 एसएमएस फ्री मिळते. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा यांचा मोफत एक्सेस मिळणार आहे.

336 दिवसाच्या वैद्यतेसह येणारा प्लॅन

जिओ तुम्हाला 336 दिवसांच्या वैद्यतेसह येणार वार्षिक प्लॅन ऑफर करते. जो 2545 रुपयांचा हा आहे. याची मर्यादा 336 दिवसांची असते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज दीड जीबी डेटा मिळतो. यासह अमर्यादित डेटाचा लाभ देखील मिळटॉम जेणेकरून तुम्हाला अडथळा येणार नाही. तसेच तुम्हाला मोफत कॉलिंग आणि दररोज 100 sms ची देखील सुविधा या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

Cleaning Hacks : फ्रिजच्या डोअर रबर वर जमलीये झुरळांची फौज ? वापरा ‘ह्या’ सोप्या ट्रिक्स

cleaning hacks

Cleaning Hacks : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे फ्रीजचा वापर जास्त होतो. पण तुम्हाला माहितीच असेल. फ्रिज साफ करण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते. त्यातही फ्रिजचे रबर साफ करणे म्हणजे मोठे कटकटीचे काम. फ्रिज साफ केला तरी त्याचे रबर साफ करणे बहुदा विसरून जाते. त्यामुळे फ्रिजचे कुलिंग खराब होते. झुरळांसारखे कीटक त्यामध्ये अडकून राहतात. त्यामुळे फ्रिज लवकर (Cleaning Hacks) खराब होतो. म्हणूनच आजच्या लेखात आपण रबर कसे स्वच्छ करायचे ते पाहणार आहोत. चला जाणून घेऊया काही सोप्या ट्रिक्स

लिक्विड डिश बेकिंग सोडा आणि विनेगर (Cleaning Hacks)

ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्यावं लागेल. त्यामध्ये एक चमचा लिक्विड डिश वॉश मिक्स करा. त्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा व्हिनेगर मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे आहे. आता फ्रीजच्या डोअर रबर वर हे तयार मिश्रण स्प्रे करा. पाच मिनिटांसाठी तसेच ठेवा त्यानंतर ब्रशने स्वच्छ करून घ्या.

कोमट पाणी (Cleaning Hacks)

कोमट पाण्याने देखील फ्रीजच्या डोव्हरच्या रबर वर साचलेली घाण स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात (Cleaning Hacks) त्यात कोमट पाणी घ्या. त्यामध्ये सुती कापड भिजवा आणि रबर पुसून घ्या.

टूथपेस्ट

ही ट्रिक वापरण्यासाठी टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या. यानंतर टूथ ब्रशने रबर घासा. रबर स्वच्छ (Cleaning Hacks) घासल्यानंतर पाच मिनिटांसाठी तसेच ठेवा. पाच मिनिटानंतर सुती कापडाने डोअर रबर स्वच्छ पुसून काढा.

Kitchen Tips : गव्हाची कणिक मळताना वापरा ‘ही’ ट्रिक ; हाडे होतील मजबूत, गुडघेदुखी होईल गायब

kitchen tips roti

Kitchen Tips : आपण रोज जे अन्न खात असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून नेहमी पौष्टिक आणि चांगले अन्न खाण्यास सांगितले जाते. त्यातही भारतीय आहार पद्धती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश आहे ज्यामुळे केवळ जेवणाची लज्जत वाढत नाही तर शरीराला पोषणही मिळते. आपल्या रोजच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच असतो. मात्र आजच्या लेखात (Kitchen Tips) आम्ही तुम्हाला रोजच्या जेवणातील चपातीला अधिक रुचकर आणि पौष्टिक वबनवण्याचा फंडा सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

गव्हाचे पीठ खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु जर तुम्हाला त्याचे फायदे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही तुमच्या गव्हाच्या पिठात तीन पीठ घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पीठ मळताना हे पीठ मिक्स करू शकता किंवा तुम्ही डब्यात (Kitchen Tips) पीठ एकत्र ठेवू शकता.

बेसन

बेसनाचा थंड प्रभाव असतो. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या नेहमीच्या गव्हाच्या पिठात बेसन मिसळून घेतल्यास उष्णतेपासून आराम मिळू शकतो. या पीठातील २५ ते ५० टक्के तुम्ही गव्हाच्या पिठात (Kitchen Tips) मिसळू शकता.

नाचणीचे पीठ (Kitchen Tips)

हे पीठ तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही गव्हाच्या पिठात सुमारे २५ टक्के नाचणीचे पीठ मिक्स करू शकता.यामुळे चपातीची चव तर बदलेलच पण त्यात आरोग्यही वाढेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डब्यात पीठ (Kitchen Tips) मिसळून ठेवू शकता किंवा ताजे पीठ तयार करताना त्यात गरजेनुसार नाचणीचे पीठ मिक्स करू शकता. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

सोयाबीनचे पीठ

घरात लहान मुले असतील तर सोयाबीनचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळावे. यामुळे (Kitchen Tips) चपाती प्रोटिन्सने समृद्ध होईल. तसेच चपाती मऊ होण्यास मदत होते. 2 किलो गव्हाच्या पिठात 500 ग्रॅम पर्यंत सोयाबीनचे पीठ मिसळता येते.

Home Remedies For Mouth Ulcers : उष्णतेमुळे तोंडात आले फोड? खाणेही झाले मुश्किल; ‘हे’ घरगुती उपाय केल्यास मिळेल त्वरित आराम

Home Remedies For Mouth Ulcers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies For Mouth Ulcers) उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या गरमीसोबत शरीराचे तापमान आपोआप वाढत जाते. ज्यामुळे आरोग्यविषयक विविध समस्या जाणवतात. यामध्ये अनेकांनी डिहायड्रेशनची समस्या जाणवते. तर काहींना तोंडात फोड येऊन जखमा येतात. ज्यामुळे काहीही खाणे पिणे मुश्किल होते. अगदी थंड पदार्थ खातानाही तोंडातील जखमा झोंबतात. मग गरम काही खाणे सोडाच. अशावेळी तोंडातील फोड घालवण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी प्रभावी उपायांची गरज असते.

सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे जर तुम्हीही अशा त्रासाने वैतागले असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. कारण या बातमीतून आम्ही तुम्हाला तोंडात फोड येण्याची मुख्य करणे आणि या समस्येवर अत्यंत प्रभावी आणि झटपट आराम देणारे घरगुती उपाय सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

तोंडात फोड येण्याचे आणि व्रण होण्याचे कारण

बऱ्याच लोकांना विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात असा त्रास जाणवतो. कारण, या दिवसात शरीराचे तापमान वाढलेले असता. परिणामी ती अशा प्रकारे शरीरातून उत्सर्जित होते. (Home Remedies For Mouth Ulcers) याशिवाय तोंडात असे व्रण होण्यामागे आणखी काही कारणे असू शकतात. जसे की, जास्त मसालेदार अन्न किंवा गरम अन्न खाणे, पोट खराब होणे किंवा बद्धकोष्ठता, सुपारी खाल्ल्यानंतर रात्री तोंड स्वच्छ न करता झोपणे, तंबाखू पान- मसाला आणि धूम्रपान करणे.

घरगुती उपाय (Home Remedies For Mouth Ulcers)

1. तुळशीची पाने – तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. शिवाय इतर औषधी गुणांनी समृद्ध असलेली तुळस तोंडातील फोड आणि जखमा बरे करण्यासाठी प्रभावी ठरते. यातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म तोंडाच्या व्रणांमूळे होणाऱ्या वेदना दूर करून आराम देतात. यासाठी तुळशीची पाने चावून खावी. त्यावर कोमट पाण्याने गुळण्या केल्यास लगेच आराम मिळेल.

2. कोरफड ज्यूस – कोरफड आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांची संपन्न असल्याने कोरफडीचा रस तोंडातील जखमांवर लावल्यास लगेच आराम मिळतो. (Home Remedies For Mouth Ulcers) जळजळ थांबते आणि मुख्य म्हणजे वेदना कमी होतात. त्यामुळे लवकर आराम मिळवण्यासाठी दिवसातून किमान २ वेळा कोरफडीचा रस लावा.

3. मध – जर तुम्हीही उष्णतेमुळे तोंडात फोड येण्याच्या समस्येने हैराण असाल तर प्रभावी घरगुती उपचार म्हणून मधाचा वापर करा. (Home Remedies For Mouth Ulcers) एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून तोंडात लावा. यामुळे लवकर आराम मिळेल.

4. खोबरेल तेल – खोबरेल तेलात बुरशीविरोधी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. शिवाय यातील दाहक विरोधी गुणधर्म तोंडातील जखमांपासून आपली सुटका करू शकतात. त्यामुळे तोंडातील फोड आणि व्रण घालवायचे असतील खोबरेल तेल लावा. यामुळे की=जळजळ आणि वेदनांपासून त्वरित आराम मिळेल. (Home Remedies For Mouth Ulcers)

Eating Pointed Gourd Benefits : सारखे आजारी पडता? आहारात ‘या’ फळभाजीचा समावेश करा; आजारपण जाईल पळून

Eating Pointed Gourd Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Pointed Gourd Benefits) तुम्ही रोजच्या आहारात काय खाता? याचा तुमच्या आरोग्यावर विशेष परिणाम होत असतो. त्यामुळे तज्ञ सांगतात की, आहार पूर्ण आणि सकस हवा. पण बिघडत्या जीवनशैलीमूळे चुकीच्या आहाराचे सेवन केले जाते. ज्यामुळे सतत आजारपण येतं. तुम्हीही सारखे आजारी असता का? तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे असे समजा. कारण, आज आपण एका अशा फळभाजीची माहिती घेणार आहोत. जी नियमित आहारात असेल तर तुम्ही बऱ्याच आजारांवर मात करू शकता. या भाजीचे नाव आहे तोंडली. चला तर तोंडलीतील पौष्टिक घटक आणि ते खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

आरोग्यवर्धक तोंडली (Eating Pointed Gourd Benefits)

आपल्या आहारात हिरव्या भाज्या जितकी फायदेशीर भूमिका निभावतात तितकेच फायदे फळभाज्या देखील देतात. त्यापैकी एक म्हणजे तोंडली. ही फळभाजी अत्यंत लोकप्रिय भाज्यांपैकी एक असून शरीरासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरते. परवलसारखी दिसणारी ही फळभाजी आकाराने थोडीशी लहान आणि मऊ असते. यात अनेक पोषक घटक आहेत.

(Eating Pointed Gourd Benefits) तोंडलीच्या भाजीत खनिज, लोह, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर तोंडली खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

हृदय निरोगी राहते

तोंडलीच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. जे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्याचे काम करतात. तोंडलीतील फ्लेव्होनॉइड्स, अँटी इम्फेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदय आणि रक्त वाहिन्यांसंबंधी समस्या वाढवणारे फ्री रॅडिकल्स कमी करतात. (Eating Pointed Gourd Benefits) यामुळे हृदयाचे संरक्षण होते आणि परिणामी मोठमोठ्या आजारांचा धोका टळतो.

पचनप्रक्रिया सुरळीत होते

तोंडलीच्या भाजीत फायबरचे प्रमाण बरेच असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. परिणामी बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटीची समस्या होत नाही. यामुळे आपल्या आहारात जर तोंडलीचा समावेश असेल तर पचनक्रिया सुरळीत होऊन पोटाचे इतर त्रास होत नाही.

डोळ्यांची दृष्टी वाढवते (Eating Pointed Gourd Benefits)

तोंडली या फळभाजीतील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन हे घटक डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. जे मोतीबिंदूसारख्या आजरापासून डोळ्यांची काळजी घेतात आणि दृष्टी वाढवतात.

वाढत्या वजनावर नियंत्रण

आजकाल वजन वाढण्याची समस्या बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात तोंडलीचा समावेश करा. तोंडलीत फायबरचे प्रमाण अधिक असते. (Eating Pointed Gourd Benefits) त्यामुळे तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण राखणे सोपे जाते. परिणामी अनावश्यक खाणे बंद होते आणि वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते.

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सरकार देत आहे कर्ज; फक्त भरावा हा महत्त्वाचा अर्ज

kisan credit card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या मार्फत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. परंतु केंद्र सरकारने आता अशी योजना आणली आहे ज्यात शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त व्याजदरात कर्ज मिळू शकते. परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी त्यांना एक अर्ज भरावा लागेल. त्यामुळेच हा अर्ज कोणता असेल?? ही सरकारची योजना कोणती आहे?? याविषयी ताबडतोब जाणून घ्या.

किसान क्रेडिट योजनलनेची (Kisan Credit Card) माहिती

एखाद्या शेतकऱ्याला मत्स्यपालन, पशुपालन किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो शेतकरी किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा पुरवली जाते. सरकारकडून हे कर्ज 2% ते 4% पर्यंत व्याजदरावर दिले जाते. ज्यामुळे शेतकरी हे कर्ज सहज फेडू शकतो. खास म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांना बराच वेळ देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला विमा संरक्षण लवचिक परतफेड आणि कमी व्याजदर अशा सुविधा दिल्या जातात.

इतकेच नव्हे तर, शेतकऱ्याला स्मार्ट कार्ड, बचत खाते आणि डेबिट कार्डची ही सुविधा दिली जाते. परंतु या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज भरावा लागतो. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला बँकेत जाऊन क्रेडिट कार्डसाठी अर्ज घ्यावा लागतो. या अर्जामध्ये शेतकऱ्याला ॲड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट, आयडी-प्रूफ अशी कागदपत्रे जोडावी लागतात. हा फॉर्म भरल्यानंतर तो बँकेत जमा करावा लागतो. या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Shri Kshetra Kanifnath : पुण्यातील अद्भुत गुंफा मंदिर; भाविकांना सरपटत करावा लागतो गाभाऱ्यात प्रवेश

Shri Kshetra Kanifnath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shri Kshetra Kanifnath) महाराष्ट्रात अनेक मंदिरं आहेत. ज्यांपैकी कित्येक मंदिरे प्राचीन आणि पुरातन आहेत. प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिट्य, खासियत आहे. प्रत्येक मंदिराची एक गोष्ट, कथा किंवा आख्यायिका आहे. अशाच एका प्राचीन, अद्भुत आणि मनाला शांतता देणाऱ्या एका मंदिराची आज आपण माहिती घेणार आहोत. सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला असणाऱ्या कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची खासियत अशी की, गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल तर सरपटत जावे लागते. अशा या अद्भुत मंदिराविषयी अधिक जाणून घेऊया.

श्री क्षेत्र कानिफनाथ गड (Shri Kshetra Kanifnath)

सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिम दिशेला बोपगांव आहे. या ठिकाणी कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे मंदिर स्थित आहे. श्री कानिफनाथ महाराज हे नवनाथ संप्रदायातील नऊ शिक्षकांपैकी एक होते. हिंदू मान्यतेनुसार, ऋषी दत्तात्रेय, पवित्र त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे अवतार त्यांचे पहिले शिक्षक आहेत. त्यामुळे हे मंदिर कानिफनाथ यांना समर्पित आहे. या मंदिरात कानिफनाथांच्या दर्शनासाठी अनेक भाविक लांबून प्रवास करून येत असतात.

शिल्पकलेचा उत्तम नमुना

श्री क्षेत्र कानिफनाथ हे मंदिर अत्यंत प्राचीन असून पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. या मंदिराचा गाभारा प्रचंड मोठा आहे. (Shri Kshetra Kanifnath) कानिफनाथ यांच्या मंदिरातजाण्यासाठी तुम्हाला साधारण २० ते ३० पायर्‍या चढून वर यावे लागते. हे मंदिर इतर कोणत्याही मंदिरांसारखे भव्य संगरमरावरचे वगैरे नसून एक छोटी गुहा आहे. ज्यामध्ये सरपटत आत शिरावे लागते. अर्थात कानिफनाथांच्या दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जायचे असेल तर तुम्हाला आत सरपटत प्रवेश करावा लागतो.

सरपटत करावा लागतो गाभाऱ्यात प्रवेश

श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिराचा गाभारा अत्यंत मोठा आहे. मात्र, या मंदिरात प्रवेश करण्याचा दरवाजा केवळ १ × १ फुट इतक्या आकाराचा आहे. त्यामुळे कानिफनाथ यांच्या दर्शनासाठी जायचे असेल तर सरपटत जाण्याशिवाय मार्ग नाही. यासाठी येथील पुजारी मदत करत. (Shri Kshetra Kanifnath) मंदिरात प्रवेश कसा करायचा यासाठी काही पुजारी युक्ती सांगतात. गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. तसेच बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडावे लागते.

कसे जाल?

श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे जाण्यासाठी पुण्यापासून २ घाट पार करावे लागतात. इथे जायला मगरपट्टा येथून दोन मार्ग आहेत. एकतर सासवडला वरून किंवा मग कोंढवा रोडने या ठिकाणी जात येते. रस्त्याची खात्री होत नसेल तर कुणाला बोपदेव घाट विचारून जात येईल. हा घाट चढून गेल्यावर डावीकडे श्री क्षेत्र कानिफनाथ असा एक मोठा फलक दिसेल आणि मग तो सरळ डोंगराच्या माथ्यावर जाणारा रस्ता आहे. तो धरून जा. (Shri Kshetra Kanifnath) म्हणजे तुम्ही श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे पोहचाल.

Summer Places To Visit : महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणे फिराल, तर उन्हाळाही वाटेल मजेशीर

Summer Places To Visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places To Visit) उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घामाच्या धारा आणि शरीराची लाही लाही होणं आलंच. वाढत्या तापमानामुळे शरीराचं तापमान वाढत. मग चिडचिड होणं आलंच. अशावेळी कुठे बाहेर पडायचं पण नको वाटत. पण मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून छोट्या पिकनिकचा तरी प्लॅन करावा लागतो. अशावेळी कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्यासाठी आणि त्यासोबत उन्हाळ्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाण सांगत आहोत. महाराष्ट्राबाहेर किंवा अगदी देशाबाहेर जायची गरज नाही. चला तर तुमच्या खिशाला परवडतील आणि मनाला आवडतील अशी कमाल ठिकाण जाणून घेऊया.

आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रातील महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणी १००% फिरायला गेले असाल. पण आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याचा विसर पडेल अशा ठिकाणांची माहिती देत आहोत. जिथे एकदा जाल तर परत परत जायची इच्छा होईल.

1. रत्नागिरी (Summer Places To Visit)

उन्हाळ्याच्या दिवसात रत्नागिरी जिल्हा फिरायला जरूर जा. कारण, छत्रपती शिवाजी महाराज रत्नागिरीचे शासक होते आणि त्यामुळे येथील मंदिरे, गडकिल्ले, समुद्र, बीच पाहण्यासारखे आहेत. भाट्ये बीच, मांडवी बीच, गणेशगुले बीच, गणपतीपुळे बीच, मालगुंड, गुहागर बीच पाहण्यासारखे नव्हे तर अनुभवण्यासारखे आहेत. गणपतीपुळे मंदिर, परशुराम मंदिर, बामणघळ, वेळणेश्वर शिवमंदिर, जयगड किल्ला, रत्नदुर्ग किल्ला देखील एक्स्प्लोर करण्यासारखे आहेत. शिवाय सागरी मत्स्यालय, संग्रहालय, थिबा पॅलेस, टिळक अली संग्रहालय देखील पाहण्यासारखे आहे.

2. मालवण

उन्हाळ्यात मालवण फिरायची मजा काही वेगळीच आहे. इथला निसर्ग, नारळाची झाडं, समुद्र, मासेमारी बंदर, सनसेट्स, पाणथळ पाहण्यात एक वेगळंच सुख आहे. शिवाय इथले तारकर्ली बीच, मालवण बीच, चिवला बीच, देवबाग बीच, भोगवे बीच, निवती बीच निसर्गरम्य दृश्य आणि मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय येथील छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग किल्ला एकदा तरी जरूर एक्स्प्लोर करा. (Summer Places To Visit) याशिवाय रॉक गार्डन, गोल्डन रॉक, डॉल्फिन पॉईंट, जय गणेश मंदिर, त्सुनामी आयर्लंड ही ठिकाणे देखील पाहण्यासारखी आहेत. इथे पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, जेट स्की राईड, बंपर बोट राईड, स्कुबा डायविंग सारखे वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला पाण्यातून बाहेर येऊच देणार नाहीत, इतके मजेशीर आहेत.

3. काशीद

उन्हाळ्यात आल्हाददायी वातावरणात फिरायला कुणाला नाही आवडणार? त्यामुळे सुंदर खळखळणाऱ्या लाटांचा समुद्रकिनारा, हवीहवीशी शांतता आणि नयनरम्य सूर्यास्ताच्या दृश्यांसह महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेल्या काशीद बीचला फिरायला जा. इथला निसर्ग तुम्हाला जवळपास प्रेमात पाडेल. (Summer Places To Visit) निळा समुद्र, पांढरी वाळू, जंगल सफर आणि सीफूड प्रेमींसाठी हे एक कमालीची ठिकाण आहे. इथे समुद्रकिनाऱ्यासोबत मुरुड जंजिरा किल्ला, कोरलाई किल्ला पाहण्यासारखा आहे. शिवाय स्कुबा डायविंग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग, केळीच्या बोटी अशा बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत.

4. अलिबाग

मुंबईपासून जवळ आणि रायगड जिल्ह्यात वसलेले अलिबाग हे एक असे पर्यटन स्थळ आहे जे प्रत्येक मौसमात फिरायची एक वेगळीच मजा देत. (Summer Places To Visit) महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तिन्ही बाजुंनी अरबी समुद्र, स्वच्छ किनारे, चविष्ट सी फूड यांसह येथील किल्ले पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. इथे राहायला स्वस्त असे रिसॉर्ट, हॉटेल्स आणि निवासी व्यवस्था उपलब्ध आहे. शिवाय फिरण्यासोबतच इथे पॅरासेलिंग,जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, बम्पी सवारी, कॅम्पिंग, सगर्गद ट्रेकिंग अशा विविध गोष्टी करू शकता.

5. आंबोली

आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असल्याने येथील हवामान मनाला आणि शरीराला विशेष थंडावा देते. पावसाळ्यात तर या ठिकाणी तुडुंब गर्दी असते. पण उन्हाळ्यात आवर्जून भेट देता येईल असे हे ठिकाण आहे. कारण येथील हवामान कायम थंड असते. येथे माधवगड किल्ला, नंगता पॉईंट, सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, आंबोली फॉल्स अशी बरीच मस्त ठिकाण एक्स्प्लोर करता येतात. शिवाय निसर्ग प्रेमी आणि जंगल ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे. (Summer Places To Visit) आंबोलीतील कावळेशेत पॉईंट तर आवर्जून पाहावा असा आहे. कारण इथे दरीत एखादी वस्तू फेकली की हवेच्या दाबाने ती उलट दिशेने परत बाहेर फेकली जाते.

CIRCOT मध्ये काम करण्याची संधी; दरमहा मिळेल 30 हजार रूपये पगार; येथे करा अर्ज

CIRCOT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हणजेच CIRCOT अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागवले जात आहे. हे अर्ज इच्छुक उमेदवारांनी 22 मे 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेल करावेत. पुढे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर निवडक उमेदवारांना रिक्त पदांसाठी नोकरीची संधी दिली जाईल.

रिक्त जागा आणि पदसंख्या – ICAR अंतर्गत “यंग प्रोफेशनल” पदाच्या 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे डिप्लोमा / टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी / टेक्स्टाईल केमिस्ट्रीची पदवी असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 21 ते 45 दरम्यान असावे.

पगार किती – पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 30 हजार रुपये पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाण मुंबई असेल.

मुलाखतीची तारीख – 27 मे 2024 रोजी मुलाखत घेतली जाईल.

मुलाखतीचा पत्ता – “ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्सजवळ, माटुंगा, मुंबई-४०० ०१” याठिकाणी मुलाखत घेतली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ – https://circot.icar.gov.in/

अर्ज करण्याची प्रक्रिया – इच्छुक उमेदवारांनी [email protected] या ईमेलवर अर्ज आणि Resume पाठवावा. हा अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2024 आहे.

Post Office Schemes | 5 वर्षात लखपती व्हायचे असले, तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा

Post Office Schemes

Post Office Schemes | आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत ठेवत असतात. महागाईचा विचार करता, आज केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात जाऊन तुम्हाला खूप चांगला फायदा देऊ शकते. परंतु आजकाल बाजारामध्ये अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहेत. कशात गुंतवणूक केल्याने चांगला फायदा मिळेल हे लोकांना माहीत नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही योजना सांगणार आहोत .ज्यामध्ये तुम्ही अगदी निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीचे अनेक पर्यायी उपलब्ध असताना देखील आजकाल अनेक लोक हे पोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास ठेवतात. कारण ही अनेक वर्षापासून चालत आलेली एक विश्वासहार्य योजना आहे. आणि आज आपण पोस्ट ऑफिसच्या (Post Office Schemes) काही योजनाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा तुम्हाला चांगला परतावा मिळेल.

पोस्ट ऑफिस एफडी | Post Office Schemes

बँकाप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये देखील वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एफडी योजना असतात. जर तुम्हाला चांगले व्याज मिळवायचे असेल, तर पाच वर्षाच्या एफडीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या एफडीवर सध्या 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

या योजनेत देखील पाच वर्षासाठी गुंतवणूक केली जाते. सध्या या योजनेमध्ये 7.60% दराने व्याजदर दिले जाते. तुम्ही या योजनेमध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याला यावर मर्यादा नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते. या योजनेमध्ये देखील तुम्ही पाच वर्षासाठी रक्कम जमा करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला 8.2% दराने व्याजदर मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अत्यंत फायदेशीर अशी योजना आहे.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना | Post Office Schemes

पोस्ट ऑफिस एमआयएस या नावाने प्रसिद्ध असलेली योजना आहे. ही मासिक उत्पन्न मिळवून देणारी एक चांगली योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही एका खातात 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक आणि संयुक्त खातात 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला दर महिन्याला 9250 रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते